(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सॉफ्ट कॉन्टेक्ट लेन्सचे जनक ओटो विक्टरले

    सॉफ्ट कॉन्टेक्ट लेन्सचा शोध लावणारे ओटो विक्टरले हे स्वतः चष्मा वापरत होते आणि त्यांनी त्यावर उपाय म्हणून आधुनिक सॉफ्ट कॉन्टॅक्ट लेन्सचा शोध लावला.

      May 11, 2023


  • देवदत्त दाभोलकर

    शिक्षणक्षेत्रात मुलगामी विचार मांडणारे दाभोलकर हे स्वातंत्र्योत्तर सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील बिनीचे शिलेदार म्हणून ओळखले जात असत.

      June 30, 2022


  • कवयित्री बहिणाबाई चौधरी

    बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. त्या निरक्षर होत्या; तथापि त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्म २४ ऑगस्ट १८८० रोजी झाला. ज्यात त्यांचे सारे आयुष्य गेले, ते शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे त्या ओव्या रचून गात असत. सोपानदेव चौधरी आणि त्यांचे एक आप्त ह्यांनी जमेल तेव्हा त्या वेळोवेळी तेथल्या तेथे उतरून घेतल्या आणि जपल्या. लिहिता न येणाऱ्या बहिणाबाई अहिराणीत आपल्या कविता रचत व त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरी त्या कागदावर लिहून ठेवत.

    महाराष्ट्रातील कवी सोपानदेव चौधरी हे बहिणाबाईंचे पुत्र. बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर बहिणाबाईंचे सुपुत्र कविवर्य सोपानदेव व त्यांचे मावसबंधू श्री. पितांबर चौधरी यांनी लिहून घेतलेली बहिणाबाईंची गाणी हस्तलिखित स्वरूपात होती. आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या चीजवस्तू पाहताना हे हस्तलिखित सोपानदेवांच्या हाती लागले. ह्या कविता सोपानदेवांनी आचार्य अत्रे ह्यांना दाखविल्या. अत्रे उद्‌गारले, "अहो हे तर बावनकशी सोनं आहे! हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे!’,आणि अत्र्यांनी त्या कविता प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला.

    अत्रे ह्यांच्या विस्तृत प्रस्तावनेसह बहिणाबाईंची गाणी १९५२ मध्ये प्रकाशित झाली आणि ‘धरत्रीच्या आरशामधी सरग’ (स्वर्ग) पाहणाऱ्या ह्या कवयित्रीचा महाराष्ट्रास परिचय झाला. ह्या काव्यसंग्रहात बहिणाबाईंच्या फक्त ३५ कविता आहेत; परंतु कवित्वाची कोणतीच जाणीव मनात न ठेवता, केवळ सहजधर्म म्हणून रचिलेली त्यांची बरीचशी कविता वेळीच लेखनिविष्ट न झाल्याने त्यांच्याबरोबरच नाहीशी झालेली आहे. बहिणाबाईंच्या कविता वऱ्हाडी-खानदेशीत, त्यांच्या मातृबोलीत, रचिलेल्या आहेत.त्यांच्या कवितांचे विषय माहेर, संसार; शेतीची साधने, कापणी, मळणी इ. कृषिजीवनातील विविध प्रसंग; अक्षय्य तृतीया, पोळा, पाडवा इ. सणसोहळे; काही परिचित व्यक्ती, असे आहेत. या साऱ्यांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती असे त्यांच्या काव्यातून दिसून येते.

    ‘असा राजा शेतकरी, चालला रे आलवानी (अनवाणी) देखा त्याच्या पायाखाले, काटे गेले वाकीसनी.
    तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षण, उपजत विनोदबुद्धी, जीवनातील सुखदुःखांकडे समभावाने पाहू शकणारे शहाणपण आणि जगण्यातून कळलेले तत्त्वज्ञान ही त्यांच्या कवित्वाची वैशिष्ट्ये होत. ‘आला सास, गेला सास, जीवा तुझं रे तंतर, अरे जगनं-मरनं एका सासाचं अंतर!’ किंवा ‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’ अशा किमान शब्दात अर्थाची कमाल गाठणारे शब्द, ‘अरे संसार संसार - जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके - तव्हा मीयते (मिळते) भाकर’ किंवा ‘देव कुठे देव कुठे - आभायाच्या आरपार देव कुठे देव कुठे - तुझ्या बुबुयामझार’.

    एखाद्या मोठ्या ग्रंथाचा विषय असणारे जीवनाचे तत्त्वज्ञान त्या साध्या, सोप्या, आणि कमी शब्दांत सहजपणे सांगून गेल्या आहेत. बहिणाबाई चौधरी यांचे ३ डिसेंबर १९५१ रोजी निधन झाले.
    श्री.संजीव, वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- विकीपीडीया

      November 4, 2019


  • संगीतकार राम किंकर

    आकाशवाणीवर राम किंकर ह्यांनी काम केले होते तसेच पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टीट्यूटच्या म्युझिक डिपार्टमेंटमध्येही त्यांनी काम केलं होते. धाकटी मेहुणी, जय तुळजा भवानी, अत्तराचा फाया, अशा चित्रपटांना राम किंकरांनी संगीत दिले. आशा भोसले, उषा मंगेशकर, सुरेश वाडकर, यांनी राम किंकर यांच्या कडे गाणी गायली आहेत.

      April 11, 2022


  • मोहन वाघ

    छायाचित्रकार, नाट्यनिर्माते, नाट्यदिग्दर्शक, प्रकाशयोजनाकार, नेपथ्यकार मोहन वाघ यांचा जन्म ७ डिसेंबर १९२९ रोजी झाला.

    मोहन वाघ मूळचे कारवारचे. जे. जे. कला महाविद्यालयातील शिक्षण अर्धवट सोडलेल्या वाघांनी नंतर छायाचित्रण सुरू केले. छायाचित्रणापासून करिअरची सुरूवात करणारे मोहन वाघ नंतर नेपथ्य, नाट्यदिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते म्हणून नावारूपास आले. कमाल अमरोहींच्या पाकिजासाठी त्यांना डिझाईनचा राष्ट्रपती पुरस्कारही मिळाला. नाटकाच्या प्रेमापोटी ते त्या कलेकडे वळले. अनेक नाटकांसाठी त्यांनी नेपथ्यरचना केली. त्यानंतर या कलेच्या प्रेमापोटीच त्यांनी चंद्रलेखा ही नाट्यसंस्था काढली.

    चंद्रलेखा हे खरे तर नाटककार वसंत कानेटकरांच्या मुलीचे नाव. त्यांनीच हे नाव वाघांना सुचवले आणि ही नाट्यसंस्था जन्माला आली. या संस्थेतर्फे त्यांनी अनेक दर्जेदार नाटके रंगभूमीवर आणली. चंद्रलेखाची नाटके म्हणजे नेपथ्यापासून, कथा, सादरीकरण, कलावंत आणि अभिनय यांचा दर्जा असा अलिखित नियम होऊन बसला. ऑल दी बेस्ट ही एकांकिका पाहिल्यानंतर तिचे नाटकात रूपांतर करण्याचे व्यावसायिक धाडस त्यांनीच दाखवले आणि हे नाटक यशस्वीही करून दाखवले. या नाटकाच्या माध्यमातून संजय नार्वेकर, अंकुश चौधरी, भरत जाधव, श्रेयस तळपदे हे कलावंत पुढे आले. दरवर्षी ३१ डिसेंबरला नवे नाटक आणण्याचा पायंडा पाडून तो त्यांनी कसोशीने पाळला.

    मोहन वाघांनी तब्बल ८३ नाटकांची निर्मिती केली. त्यांचे १५,६४७ एवढे प्रयोग केले, पण त्यांची फक्त १५ नाटकंच व्यावसायिकदृष्टय़ा यशस्वी ठरली. तरीही प्रत्येक कलाकाराला प्रयोगानंतर पाकीट द्यायलाच हवं, आजचं पाकीट उद्या द्यायचं नाही, हा त्यांचा नियम होता. नाटक चांगले पैसे मिळवून देवो अथवा नाही, पण त्यांनी कधीही कलाकारांना मानधनासाठी रखडून ठेवलं नाही. ही त्यांची शिस्त होती. त्यातही रणांगण, स्वामी, बटाट्याची चाळ, ऑल द बेस्ट ही नाटके तुफान गाजली.

    प्रेमगंध, बहुरूपी आणि एक तिकीट सिनेमाचं ही नाटके तर उत्कृष्ट नेपथ्यामुळेही गाजली. नेपथ्यामुळे नाटक गाजविण्याचाही विक्रम मोहन वाघ यांनी प्रस्थापित केला. मोहन वाघांनी नवख्या कलाकारांना घेऊन केलेल्या ऑल दी बेस्ट नाटकाचे तीन हजारांवर प्रयोग झाले आहेत. भरत जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर या सध्या मराठी सिनेसृष्टीत गाजणार्याफ नटांना मोहन वाघांनीच ऑल दी बेस्टमधून ब्रेक दिला. त्यांच्या गरूडझेप या नाटकाने मराठी रंगभूमीवर विशेष स्थान निर्माण केले. नाट्यपरिषदेने त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविले होते. लता मंगेशकर, बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचे ऋणानुबंध होते. बाळासाहेबांनी तर त्यांना कॅमेरा भेट म्हणून दिला होता.

    रंगमंचासोबतच त्यांनी कॅमेरा हे माध्यमही अतिशय समर्थपणे पेलले. फोटोग्राफीची अत्यंत आवड असणाऱ्या लतादीदींनी तर याचे धडे मोहन वाघ यांच्याकडून गिरविले. दीदींसह असंख्य तारे-तारका आणि सुनील गावस्कर यांच्यासारखे क्रिकेटपटू मोहन वाघ यांना आपल्या जिव्हाळ्याच्या आप्तेष्टांपैकी मानत असत. पु.ल. देशपांडे, व्हि. शांताराम, बाळासाहेब ठाकरे, लता मंगेशकर या आणि अनेक विभुतींचे फोटो त्यांच्या कॅमेर्यााने टिपले. ते फोटो 'वाघांचे फोटो' म्हणून ओळखले जावेत असा त्यांचा ठसा त्यावर उमटलेला आहे. त्यांच्या या फोटोग्राफीबद्दल खुद्द लतादिदींनी त्यांना 'हे तर फोटोग्राफीतले लता मंगेशकर आहेत, अशी कौतुकफुले उधळली होती. मोहन वाघ यांच्यामुळेच मधुबाला, नर्गिस, वैजयंतीमाला या गाजलेल्या अभिनेत्रींची विलोभनीय छायाचित्रे लोकांसमोर येऊ शकली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांचे जावई.

    मोहन वाघ यांचे निधन २४ मार्च २०१० रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

      December 7, 2021


  • ज्येष्ठ गायक पं. राजाभाऊ कोगजे

    पं.अनंत केशव उर्फ राजाभाऊ कोगजे हे ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक होते. त्यांचे आईवडील दोघेही संगीतप्रेमी होते. वडील संगीत नाटकात काम करायचे. राजाभाऊंनी आपल्या वडिलांकडून संगीताचे सुरुवातीचे प्रशिक्षण घेतले. वयाच्या ६ व्या वर्षी त्यांना शास्त्रीय संगीताचे धडे घेण्यासाठी जबलपूरचे पं. गोविंदराव मुलतापीकर (विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे शिष्य). यांच्याकडे पाठवण्यात आले.

      March 1, 2024


  • विठ्ठलराव एकनाथराव विखेपाटिल

    (१२ ऑगस्ट १८९७ - २७ एप्रिल १९८०)

    महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारीचे आद्य प्रवर्तक. अहमदनगर जिल्हयातील लोणी बुद्रुक या खेडयात एका शेतकरी कुंटूंबात जन्म. लोणी खुर्दच्या प्राथमिक शाळेत चौथीपर्यंत शिक्षण नंतर त्यांनी लहान वयातच शेतीला सुरुवात केली. त्याकाळी शेतकर्‍यांच्या जमिनी कर्जबाजारीपणामुळे सावकारांच्या घशात गेल्यामुळे ते कंगाल बनले होते, हे नेमके हेरुन त्यांनी व्यवहारबुध्दी, चातुर्य व काटकसरीने शेती केली. १९२३ मध्ये ‘लोणी बुद्रुक सहकारी पतपेढी‘ची स्थापना करुन ते सार्वजनिक जीवनातील सहकारी क्षेत्राकडे वळले. त्यांनी जिल्हयात सहकारी संस्थांचे जाळे निर्माण केले, तसेच गावातील पाथरवट-वडार मंडळींना एकत्र आणून ‘मजूर सहकारी सोसायटी‘ची स्थापना केली.

    इंग्रज सरकारने मुंबई कौन्सिलमध्ये ‘तुकडे बंदी आणि तुकडे जोड‘ हे विधेयक आणले. या विधेयकामुळे शेतकर्‍यांच्या जमिनीचे तुकडे सावकारांच्या घशात जाऊन ते जमिनीला मुकणार होते. अशा वेळी इस्लामपूर येथे शाहू महारांनी घेतलेल्या शेतकरी परिषदेला विखे -पाटील नगर जिल्हयातील अनेक शेतकर्‍यांसह गेले व तेथे हजारो शेतकर्‍यांपुढे भाषण देऊन शेतकर्‍यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्यातुनच त्यांच्या शेतकरी नेतृत्वाचा जन्म झाला. पुढे महाराष्ट्राच्या एक लाख शेतकर्‍यांनी याच प्रश्नासाठी पुण्याच्या कौन्सिल हॉलला वेढा घातला, त्यात विखे पाटील आघाडीवर होते. त्यांनी शेतकर्‍यांना त्यांच्या दैन्यावस्थेची जाणीव करुन देऊन, संघटित होण्याचे व त्यातून व्यक्तिगत व सामुदायिक विकास साधण्याचे महत्व पटवून दिले. विखे पाटील यांच्यावर सत्यशोधक चळवळीचा व डाव्या विचारसरणीचा प्रभाव होता. प्रसिध्द अर्थशास्त्रज्ञ धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली बेलापूर रोड येथे १९४५ मध्ये पार पडलेल्या ‘डेक्कन कॅनॉल्स बायायतदार परिषदे‘त विखे पाटील यांनी सर्व शेतकर्‍यांनी एकत्र येऊन सहकारी पध्दतीने साखर कारखाना काढण्याचा ठराव मांडला या परिषदेचे अध्यक्ष डॉ. धनंजयराव गाडगीळ यांनी व उपस्थित शेतकर्‍यांनी या कारखान्याचे मुख्य प्रवर्तक म्हणून विखे पाटील यांच्यावरच जबाबदारी टाकली. त्यांनी ही जबाबदारी पार पाडण्यासाठी १९४५ ते १९५० या कालखंडात अतोनात कष्ट घेऊन, गावोगावी व दारोदारी भटकंती करुन भाग भांडवल जमविले, तसेच कारखान्याला शासनाकडून मंजूरी मिळविली कारखान्याच्या उभारणीसाठी त्यांनी केलेल्या भटकंतिकरिता शेतकर्यांचा एकही पैसा खर्च केला नाही. ‘परान्न घेणार नाही‘ अशी त्यांची प्रतिज्ञा होती, त्यामुळे आपली भाकरी ते नेहमी आपल्या कोटाच्या खिशात बाळगीत असत. विखे पाटील यांची साखर कारखाना काढण्याची कल्पना त्यावेळी हास्यास्पद ठरविली गेली. अशा सर्वस्वी प्रतिकूल पिरस्थितीला तोंड देत विखे पाटील यांनी प्रवरानगर येथे शेतकर्‍यांच्या पहिल्या ‘प्रवरा सहकारी साखर कारखान्यातून साखर उत्पादन सुरु झाले.

      March 12, 2015


  • आज अर्वाचिन मुंबईचे शिल्पकार व ज्येष्ठ समाज सुधारक नाना शंकरशेट

    त्यांचा जन्म १० फेब्रुवारी १८०३ रोजी झाला. मुंबईच्या १९ व्या शतकातील इतिहासाचे प्रणेते म्हणून मा. नाना शंकरशेट यांना ओळखले जाते. जगन्नाथ शंकरशेट यांचे खरे नाव नाना मुरकुटे. मुरकुटे कुटुंब हे मुळातच सधन. नानांचे एक पूर्वज बाबूलशेट हे कोकणातून १८ व्या शतकात मुंबईत आले.
    म्हैसूरच्या १७९९ च्या टिपू-इंग्रज युद्धात वडिलांना खूप पैसा मिळाला. आई भवानीबाई नानांच्या लहानपणीच वारली. नानांनी तिच्या स्मरणार्थ पुढे भवानी शंकर मंदिर व एक धर्मशाळा गोवालिया तलावाजवळ बांधली. वडील गेल्यावर तरुणपणीच त्यांच्यावर प्रपंचाची व व्यापाराची सर्व जबाबदारी पडली. मा.नाना शंकरशेट हे त्या शतकातील मुंबईच्या प्रमुख व्यापाऱ्यांमध्ये गणले जात. नानांनी आपला व्यापार इतका पद्धतशीरपणे वाढवला, की त्यांनी अल्पावधीत प्रचंड पैसा मिळवला. तोही सचोटीने आणि आपली विश्वासार्हता कायम राखून. त्यांचे नाव आणि त्यांची विश्वासार्हता एवढी पक्की होती, की अरब, अफगाण आणि अन्य परदेशी व्यापारी बँकांकडे आपली संपत्ती ठेवण्याऐवजी नानांकडे ठेवत असत, असे म्हटले जाई. १९ व्या शतकाच्या मध्यापर्यंत मुंबईतील असे एकही क्षेत्र नव्हते ज्यावर मा.नानांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटला नाही. समाजकारण, समाज सुधारणा, प्रशासन, विकास, धार्मिक रुढी अशा सर्व क्षेत्रांत नानांनी भरीव कामगिरी बजावली. नानां त्यांवर सर जमशेटजी जिजिभाईंची छाप पडली होती. हिंदवासियांत शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे, यासाठी एल्‌फिन्स्टनने १८२२ मध्ये हैंदशाळा व शाळापुस्तक मंडळी काढली, त्यांचे आधारस्तंभ नानाच होते. ही पहिली शैक्षणिक संस्था स. का. छत्रे यांच्या साह्याने स्थापिली. पुढे हिचे १८२४ मध्ये बाँम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीत रूपांतर झाले.

    एल्‌फिन्स्टननंतर उच्च शिक्षणाच्या सोयीसाठी ४,४३,९०१ रुपयांचा एल्‌फिन्स्टन फंड जमविण्यात आला. त्याचे नाना हे विश्वस्त राहिले. या संस्थेचे एल्‌फिन्स्टन कॉलेज झाल्यावर (१८३७) तिला एल्‌फिन्स्टन इन्स्टिट्यूट म्हणण्यात येऊ लागले. १८५६ मध्ये महाविद्यालय व विद्यालय पृथक झाले.बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना १८४१ मध्ये झाली. बोर्डातील तीन एतद्देशीय सभासदांत सतत सोळा वर्षे नाना निवडून आले. १८५५ मध्ये त्यांनी विधी महाविद्यालयाचा पाया घातला. सर ग्रँटच्या मृत्यूनंतर ग्रँट मेडिकल कॉलेजची १८४५ मध्ये स्थापना करून येथे आंग्ल वैद्यक-शिक्षणाची सोय त्यांनी केली.
    मुंबई कायदे मंडळाच्या आरंभीच्या सभासदांत ते प्रमुख होते. नानांचे सामाजिक कार्यही मोठे होते. त्यांनी सतीच्या चालीस बंदी घालणाऱ्या कायद्यास पाठिंबा दिला. सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे, या तत्त्वावर स्त्रीशिक्षणास प्राधान्य दिले. भारतीयांना कलाशिक्षण मिळावे, म्हणून सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेत सक्रिय भाग घेतला. याशिवाय ग्रँड ज्यूरीत भारतीयांचा समावेश व्हावा, तसेच जस्टिस ऑफ द पीस अधिकार भारतीयांस मिळावा, यासाठी त्यांनी खटपट केली व काही अधिकार मिळविले. मुंबईच्या प्रशासनात कार्यरत असताना त्यांनी आरोग्यव्यवस्था, विहिरी, तलाव वगैरे योजना अंमलात आणल्या. गँस कंपनी सुरू केली; धर्मार्थ दवाखाना काढून तसेच पुढे जे. जे. हॉस्पिटलचा पाया घालून त्यांनी रुग्णसेवेस चालना दिली. बाँबे स्टीम नॅव्हिगेशन कंपनीची स्थापना, मुंबई-ठाणे रेल्वेचा प्रारंभ, नाटकांचे प्रेक्षागृह, सोनापूरच्या स्मशानभूमीचे रक्षण याही गोष्टींचे श्रेय नानांनाच द्यावे लागेल. विशेष म्हणजे बोरीबंदर ते ठाणे पहिली रेल्वेगाडी १८५३ मध्ये धावली, तिचे कार्यालय नानांच्या राहत्या घरातच होते. मा.नाना आणि गिरगाव यांचे नाते नानांच्या अंतापर्यंत अतूट राहिले. गिरगावचा नानांनी अक्षरश: कायापालट केला. गिरगावातला नानांचा वाडा आज अस्तित्वात नाही, त्याजागी आता आधुनिक वास्तू उभी आहे. पण या जुन्या वाडय़ाचा इतिहास, त्या वाडय़ाला भेट दिलेली महनीय मंडळी, नानांचे देवघर, दिवाणखाना आणि दारावरची घंटा आणि तिचा नाद या सर्वाना कालपरवापर्यंत दंतकथांचे स्वरूप होते. मा. नानांच्या निधनानंतर मा.नानांच्या स्मरणार्थ मॅट्रिकला संस्कृत विषयात पहिल्या येणाऱ्या विद्यार्थास शंकरशेट शिष्यवृती देण्यात येऊ लागली. मा.नाना शंकरशेट यांचे ३१ जुलै १८६५ निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

      February 10, 2017


  • प्रभात बँडचे संस्थापक मोरेश्वर वासुदेव उर्फ बंडोपंत सोलापूरकर

    मोरेश्वर वासुदेव उर्फ बंडोपंत सोलापूरकर यांचा जन्म १८ एप्रिल १९३३ रोजी झाला.

    बँड संस्कृती रुजवण्यात महत्त्वाची भूमिका असलेलं अनुभवी व्यक्तिमत्त्व म्हणून बंडोपंत सोलापूरकर यांची ख्याती होती. त्यांनी बँडची संस्कृती नुसती रुजवलीच नाही, तर तिला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्याचे महत्त्व अधोरेखित केले. वयाच्या सातव्या वर्षांपासून त्यांनी त्यांचे मोठे बंधू अण्णासाहेब सोलापूरकर यांच्याकडे क्लॅरोनेट वादनाचे प्राथमिक आणि पंडित नागेश खळीकर यांच्याकडे गायकी अंगाने वादनाचे धडे गिरवले. उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांच्या मार्गदर्शनाखाली लयकारी आणि मिंड यांतील बारकाव्यांचा अभ्यास केला. या दिग्गजांकडे मिळालेल्या शिक्षणाचा फायदा घेत त्यांनी क्लॅरोनेटसारख्या पाश्चात्त्य वाद्याला आपलेसे करीत ते जनमानसात पोहोचवले. परंपरावादी पुण्यात पाश्चात्त्य वाद्यांविषयी उत्सुकता निर्माण करण्याची महत्त्वाची कामगिरी त्यांनी यानिमित्तानं केली. पाश्चात्त्य वाद्यातून भारतीय स्वर काढण्याचे कौशल्य त्यांना साध्य झाले होते. एकल वादनाच्या मैफलीतून त्यांनी प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवलीच होती. कुंदगोळ आणि पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवासारख्या मोठ्या संगीत महोत्सवांमध्ये त्यांनी सातत्यानं वादन केले.

    प्रभात फिल्म कंपनीच्या संगीत विभागात काम करताना ‘माणूस’सारख्या चित्रपटातही क्लॅरोनेट वाजवले होते. तसेच राम कदम, कल्याणजी आनंदजी, रवींद्र जैन, वसंत देसाई आदी संगीतकारांसह काम केले. ‘गुळाचा गणपती’, ‘बाळा जो जो रे’, ‘माहेरची साडी’, ‘राम लखन’ आदी अनेक चित्रपटांसाठीही वादन केले. एकल वादनातून मोठी लोकप्रियता मिळत असतानाही त्यांनी बँडकडे दुर्लक्ष केले नाही. उलट, या दोन्हीत योग्य तो समन्वय राखत त्यांनी दोन्ही गोष्टी जनमानसात पोहोचवल्या.

    प्रभात बँडने अमृतमहोत्सवी वर्ष पूर्ण केले आहे. सोलापूरकर कुटुंबीयांनी स्थापन केलेल्या या बँडपथकाने मिरवणुकीमध्ये ब्रास असलेल्या वाद्यांवर मराठी गीतांचे वादन ही प्रथा सुरू केली. क्लॅरोनेटवादक म्हणून ख्याती असलेले बंडोपंत सोलापूरकर हे सॅक्सोफोन, ट्रम्पेट अशा ब्रासच्या वाद्यवादनासह अनेक वर्षे गणपती मंडळाच्या मिरवणुकीच्या अग्रभागी असायचे. त्यांच्या कष्टांमुळे बँडसंस्कृतीला प्रतिष्ठा मिळाली. बँडबरोबर राहात त्यांनी लग्नसमारंभ, गणेशोत्सवातही उत्साहाने वादन केले होते. गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सव मिरवणुकीत त्यांचे वादन हा आकर्षणाचा विषय असे. एखाद्या गायकाला महोत्सवांत सातत्याने गाण्याची संधी मिळते; पण बंडोपंतानी गाणगापूर आणि कुंदगोळच्या महोत्सवात ५० वर्षांपेक्षा जास्त काळ विनाखंड वादन करून अलिखित विक्रमच नोंदवला. त्यांच्या या संगीतसेवेसाठी अनेक मानसन्मान त्यांना प्राप्त झाले. या पुरस्कारांबरोबरच त्यांना रसिकांच्या प्रेमाची दादही मिळाली.

    बंडोपंत सोलापूरकर यांचे २३ जानेवारी २०१३ रोजी निधन झाले.

      January 23, 2022


  • बॉलीवूडचे पोलीस अधिकारी जगदीश राज

    पाकिस्तानातील सरगोधा येथे जन्म झालेले जगदीश राज फाळणीनंतर भारतात स्थायिक झाले. जगदीश राज खुराणा हे जगदीश राज यांचे पूर्ण नाव. जगदीश राज यांनी दीडशेहून अधिक चित्रपटात विविध भूमिका केल्या मात्र ते ‘पोलीस’ अधिकाऱ्याच्या भूमिकेत विशेष गाजले.

    तब्बल १४४ चित्रपटांमधून त्यांनी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका वठविली होती. सिनेक्षेत्रातील २१ वर्षांच्या कारकिर्दीत एकाच प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारण्याचा विक्रम जगदीश राज यांच्या नावावर आहे. त्यांच्या या भूमिकांची ‘गिनिज् बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्येही नोंद घेण्यात आली होती. बहुतांश हिंदी चित्रपटातून त्यांनी रंगविलेली ‘पोलीस अधिकारी’ ही भूमिका गाजली. ‘मजदूर’, ‘इनाम धरम’, ‘गोपीचंद जासूस’, सिलसिला’, ‘बेशरम’, तुम्हारी कसम’, सुहाग’, ‘ड्रीम गर्ल’, 'गुलामी', 'असली नकली', 'विरोधी', 'चार दिन की चांदनी' आदी चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. जगदीश राज हे अभिनेत्री अनीता राज यांचे वडील.

    जगदीश राज यांचे २८ जुलै २०१३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      July 28, 2021