(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • एका कलाकाराची छबी

    मिशी ठेवणार्‍या एका कालाकराने हॉलीवूडमधे प्रवेश केला.  तीन वर्षात ऑस्कर नामांकन व तीन गोल्डन ग्लोब अवॉर्ड मिळवले. पहिल्या  हॉलीवुडपटात  उत्कृष्ट  दिग्दर्शकाबरोबर व प्रसिद्द  नटासोबत  काम  करून त्याने  आपली  भूमिका  अजरामर  केली.  हाताने पत्र लिहीण्याच्या व पोस्टमने पत्र पोचवण्याच्या काळात, त्याला आलेल्या प्रेमपत्रांची व मागण्यांची संख्या होती एक महिन्यात ३०००! सुरुवातीची कारकीर्द इजिप्त मधे अरेबिक चित्रपटात घडवलेला व पुढे इंग्रजी येत असल्याच्या गुणावर हॉलिवुड्चा झालेला हा थोर कलाकार म्हणजे ‘ओमर शरीफ’. तरुणींच्या दिलाची धडकन ‘ओमर शरीफ’.

      February 11, 2020


  • आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते “चिंचोरे गुरुजी”

    माझे वडील पूज्य पंडित विष्णू चिंचोरे हे त्यांच्या काळातील नामवंत शिक्षक होते ! पुणे येथील डेक्कन जिमखान्यावरील भांडारकर रोडवर असलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल शिक्षण मंदिर शाळेचे, जून १९३६ ते ३१ मे १९६१ ह्या कालावधीमध्ये ते मुख्याध्यापक होते. पुढे १ जून १९६१ ते ३० सप्टेंबर १९७५ या कालावधीमध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे प्राथमिक शाळेचे ते मुख्याध्यापक होते !

    "चिंचोरे गुरुजी" ह्याच नावाने ते ओळखले जायचे ! गोष्टीरूप इतिहास शिकवण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. गणित विषयाची भीती, मुलांच्या मनातून कायमची काढून टाकण्यात ते वाकबगार होते. भाषेचे धडे शिकविताना ते चित्ररूपी भाषेतील वर्णन करून सांगायचे तर प्रत्येक कविता ते चालीमध्ये म्हणून दाखवित असत, आपोआपच मुलांच्या कविता तोंडपाठ होत असायच्या. स्कॉलरशिपचे वर्ग ते वर्षानुवर्षे घेत होते !

    चिंचोरे गुरुजींच्या शिकवण्याच्या हातोटीचे अनेक दाखले, त्यांचे विद्यार्थी ज्येष्ठ साहित्यिक व. पु. काळे ह्यांनी त्यांच्या वपुर्झा, गुलमोहर, रंगपंचमी, ककचीक अश्या अनेक पुस्तकाद्वारे वाचकांसमोर दिले आहेत. तसेच १७ मार्च १९८२ रोजी मुंबई दूरदर्शन वरून सादर झालेल्या, "आमची पंचविशी" ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून, व. पुंनी आपल्या लाडक्या चिंचोरे गुरुजींच्या अनेक हृद्य आठवणी साध्यंत कथन केल्या होत्या !

    माझ्या वडिलांच्या काही विद्यार्थ्यांची नावेच पाहा ना, ज्यांनी आपल्या यशोगाथेचे सर्व श्रेय मुक्तकंठाने आपल्या चिंचोरे गुरुजींना आदरपूर्वक दिले आहे :
    भारताचे एअर मार्शल भूषण गोखले, ज्येष्ठ साहित्यिक व. पु. काळे, ज्येष्ठ उद्योगपती अरुण फिरोदिया, ब्रिगेडिअर विजय खांडेकर, ब्रिगेडियर सदाशिव जावडेकर, डायबेटीस स्पेशलिस्ट डॉ. सुभाष काळे, कँसरतज्ज्ञ डॉ. पुष्पाताई शिरोळे, विख्यात निर्माते व्ही.शांताराम ह्यांचा पुतण्या व्हणकुद्रे. रोहिणी भाटे, ज्योत्स्ना भोळे ह्यांचा मुलगा सुहास केशव भोळे, अभिनेते विक्रम गोखले, मनीषा साठे, डॉ ओतूरकर, विद्युत बापट, दिलीप जोशी, जयंत दामले (मॅनेजमेंट कन्सलटंट) डॉक्टर माधव कवडे, अल्हाद धर्माधिकारी, चारू रानडे, नीता, पुष्पा पुजारी भगिनी, मेधा पंडित, सुरेखा गायधनी-पेठे, दिलीप दाणी, जयंत मालशे, जयंत झेंडे, चंद्रशेखर म्हैसकर, ही यादी फार मोठी आहे ….

    विशेष म्हणजे ह्या तमाम विद्यार्थीगणांनी आपल्या लाडक्या चिंचोरे गुरुजींना आजही लक्षात ठेवलेय, ते तसा आवर्जून उल्लेख करतात, ह्यामाध्येच चिंचोरे गुरुजींच्या पवित्र शिक्षकी पेशाचे चीज झाले, असे मी आदरपूर्वक म्हणतो, माझ्या सर्व ज्ञात-अज्ञात गुरु बंधू-भगिनींना माझा मनोभावे नमस्कार,
    वरून कडक शिस्तीचे दिसणारे चिंचोरे गुरुजी आतून मात्र खूप हळवे होते. व. पु. काळे, उद्योगपती अरुण फिरोदिया, जेंव्हा माझ्या वडिलांच्या अखेरच्या आजारपणात भेटायला घरी आले, तेव्हां सर्वजण जुन्या आठवणीत रमले. त्यावेळी चिंचोरे गुरुजींनी त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांच्या आठवणी नावासह सांगितल्या, संग्रहामधील जुने फोटो दाखविले, तेव्हां तर सर्वजण भावुक झाले होते. व पु काळे जेव्हां बोलत होते, तेव्हां मी म्हणालो, "बापू, "शिक्षक" शब्दाची व्याख्या अशी करता येईल कां ? शिकविण्याच्या क्षमतेचा कलावंत म्हणजे शिक्षक", माझे वाक्य पूर्ण होताच, व पुंनी मला टाळी दिली ! एअर मार्शल बी एन गोखले सर तर अभिमानाने सांगतात, "आम्हांला चिंचोरे गुरुजींनी घडवलं" डायबेटीस स्पेशलिस्ट डॉ. सुभाष काळे ह्या त्यांच्या विद्यार्थ्याने तर, चिंचोरे गुरुजींना एकवीस वर्षे विनामोबदला औषधोपचार केले, मी काही बोललो, कि ते म्हणायचे, "उपेंद्र, गुरुजींची सेवा, हीच माझी गुरुदक्षिणा आहे"! ज्येष्ठ उद्योगपती श्रीमान अरुण फिरोदिया ह्यांना पद्मश्री जाहीर होताच, त्यांनी मुलाखत कर्त्यांना आपल्या यशाचे श्रेय माझ्या आई वडिलांना आणि चिंचोरे गुरुजींना असल्याचे जाहीर केले. टीव्ही वर मी जेव्हां हे ऐकले, पाहिले तेव्हां माझे डोळे भरून आले. मी त्यांना लगेच फोन केला आणि दुसऱ्या दिवशी त्यांचे घरी जाऊन नमस्कार केला, तेव्हां त्यांनी माझ्या वडिलांच्या अनेक आठवणी कथन केल्या होत्या. धन्य ते शिक्षक आणि धन्य ते कृतज्ञ विद्यार्थी !

    मॅनेजमेंट कन्सलटंट जयंत दामले आणि मोहन कानडे, हे त्यांचे विद्यार्थी आजही साठ वर्षांपूर्वीच्या, चिंचोरे गुरुजींच्या शालेय सहल नियोजनाच्या आठवणी सांगतात ! डॉ उषा केळकर वय वर्षे फक्त सत्याऐंशी, चिंचोरे गुरुजींनी, गीतेचा पंधरावा अध्याय कसा पाठ करून घेतला, ह्याविषयी त्यांच्या लेखात सांगतात. डॉ सुमन करमरकर (सध्याचे वय ८७) ह्या चिंचोरे गुरुजींच्या शब्दसंग्रहाचे वर्णन करतात. हो, शब्दकोडी पटापट सोडविण्यात ते तरबेज होते. महाराष्ट्र कोश मंडळ लि. पुणे, ह्यांनी १९३५-१९३६ मध्ये सात खंड प्रसिद्ध केले होते. पीवायसी ग्राउंड जवळ राहणारे कर्नल के जि घारपुरे साहेबांनी ते सातही खंड त्याकाळी चिंचोरे गुरुजींना भेट दिले होते. आजही ते खंड म्हणजे माझा जीव कि प्राण आहेत ! ह्या कर्नल घारपुरे साहेबांचे अजून एक वैशिष्ठ्य म्हणजे त्याकाळी शाळेच्या संमेलनाची अनेक छायाचित्रे त्यांनी स्वतः टिपलेली होती, जी आजही माझ्या संग्रहामध्ये आहेत, ह्या पोस्टवर टाकलेले छायाचित्र हे त्याचेच सर्वोत्तम उदाहरण आहे !

    शिक्षणतज्ज्ञ वि वि चिपळूणकर सरांच्या हस्ते जेव्हां चिंचोरे गुरुजींचा "शिक्षक दिनी" सन्मान झाला, तेव्हां ते म्हणाले होते, "पंडित" हे नाव सार्थ करणारे "पंडित विष्णू चिंचोरे गुरुजी" ! महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण संचालिका डॉक्टर चित्राताई नाईक ह्यांच्या शुभहस्ते चिंचोरे गुरुजींचा "आदर्श शिक्षक" हे बिरुद अर्पण करून पुणे येथे १७ ऑगस्ट १९७३ रोजी सन्मान करण्यात आला होता !

    माझी आईनं त्याकाळी गाण्याचं नियमित शिक्षण घेतलं होतं ! आमचे नातेवाईक होसिंग काकांनी त्यांची बेल्ज्यियम सुरांची पेटी माझ्या आईला भेट दिली होती. चिंचोरे गुरुजीही पेटी वाजवायचे, "तुला रं गाड्या भीती कशाची" हे गाणं ते पेटीवर वाजवायचे आणि आम्ही भावंडं ते ऐकत, त्यांच्या पुढ्यात बसायचो !

    तिथीने चंपाषष्ठीला आणि तारखेनी ३ डिसेंबर रोजी चिंचोरे गुरुजींची जयंती आहे, आज सात मे रोजी त्यांची ३३ वी पुण्यतिथी आहे,

    -- उपेंद्र पंडित चिंचोरे

      May 7, 2016


  • प्रदीप भिडे

    प्रदीप भिडे यांना नाटकाचीही पार्श्वभूमी आहे. नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या संस्थेत त्यांनी काही काळ प्रायोगिक नाटकांतून काम केले. दिलीप प्रभावळकर, वसंत सोमण, रवी पटवर्धन हे त्यांचे सहकलाकार. नाटकातून काम केलेले असल्याने ‘स्टेज फीअर’ म्हणून जे काही असते त्याची भीती, दडपण त्यांच्यावर नव्हते.

      July 7, 2022


  • लेखक, चित्रपट अभ्यासक सुधीर नांदगावकर

    नाटकाचे वेड असलेल्या, महाराष्ट्रात सिनेमासारखी नवी विज्ञानाधिष्ठित कला रुजवण्याचे खडतर काम सुधीर नांदगावकर यांनी केले. त्यांनी महाराष्ट्रात आणि भारतातही फिल्म सोसायटीची चळवळ पसरवली. सुधीर नांदगावकर यांचा प्रवास छापील माध्य्माकडून दृकश्राव्य माध्यमाकडे असा झालेला दिसतो.

      June 20, 2022


  • सुधा वर्दे

    स्वातंत्र्याचा लढा, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि राष्ट्रीय सेवादलाशी जोडले गेलेले प्रमुख महिलांपैकी एक नाव आणि राष्ट्रीय सेवादलाच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणजे सुधा वर्दे. माहेरचं अनुताई कोतवाल हे नाव असलेल्या सुधाताईंचा जन्म १९३२ सालचा;लहानपणापासूनच सुधाताईंना विविध कलांची आवड होती.

      April 18, 2014


  • नगर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे संस्थापक बाळासाहेब भारदे

    स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले “सहकार” मंत्री म्हणून बाळासाहेब भारदे यांनी केलेले कार्य संपूर्ण देशाने गौरविले. ते त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष झाले. ते मुरब्बी राजकारणी तर होतेच त्याचबरोबर ते गांधीवादी विचारवंत, संत साहित्याचे अभ्यासक, सहकार क्षेत्रातील अग्रणी, पत्रकारही आणि कीर्तनकार होते.

      November 23, 2021


  • नुसरत फतेह अली खान

    कव्वाली, गझल, शास्त्रीय, पारंपारिक गायक म्हणून नुसरत फतेह अली खान यांनी जागतिक स्तरावर नाव मिळवले. नुसरत यांच्या आवाजाची जादू भारतावरही चालली. त्यांचा जन्म १३ ऑक्टोबर १९४८ रोजी पाकिस्तानमधील पंजाबच्या लायलपूर येथे पंजाबी मुसलमान कुटुंबात झाला. त्यांनी गायलेली ‘आफरीन आफरीन’, ‘मेरा पिया घर आया’, ‘पिया रे-पिया रे’, ‘सानू एक पल चैन ना आए’, ‘तेरे बिन’ अशी अनेक गाणी आजही तितकीचं प्रसिद्ध आहेत.

    शिकागो येथे १९९३ साली झालेल्या रॉक कॉन्सर्टमध्ये नुसरत यांनी गाण्यास सुरुवात केली आणि अमेरिकेतील नागरिकही त्यांच्या आवाजावर फिदा झाले. मात्र, नुसरत फतेह अली खान यांना केवळ ४९ वर्षांचेच आयुष्य लाभले. नुसरत फतेह अली खान यांचे १६ ऑगस्ट १९९७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 8, 2017


  • निर्मात्या,दिग्दर्शिका, अभिनेत्री किशोरी शहाणे-विज

    ‘प्रेम करुया खुल्लम खुल्ला’ पासूनची त्यांची रुपेरी वाटचाल तब्बल पंचवीस वर्षांपेक्षा जास्त काळाची आहे. पण तरी त्या आजच्या पिढीच्या तारकेच्या स्पर्धेत कार्यरत आहे. त्यांचा जन्म २३ एप्रिल १९६८ रोजी झाला. किशोरी शहाणे यांचे शिक्षण मिठाबाई कॉलेज मध्ये झाले. त्यांना मिठाबाई कॉलेजमध्ये मिस मिठाबाई हा किताब मिळाला होता. किशोरी शहाणे यांचा पहिला चित्रपट माहेरची साडी.त्या स्वतः डान्सर आहेत, भारतात व परदेशात त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. किशोरी शहाणे यांची निर्मिती केलेला पहिला मराठी चित्रपट "ऐका दाजिबा' यासह मराठी चित्रपट, मराठी आणि हिंदी मालिका, रिअॅलिटी शोज इत्यादीतून त्यांनी कामे केली आहेत. ३० वर्षं त्या मराठी इंडस्ट्रीचा भाग आहे. आतापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या जॉनरचे आठ चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. पती दीपक बलराज वीज हे निर्माते आहेत. आता किशोरी शहाणे या ‘स्टेप अप’ या नृत्यावर आधारित हॉलीवूड चित्रपटात काम करत आहेत. किशोरी शहाणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      April 23, 2017


  • डॉ. सिंधू दोंदे-मांडवकर

    सीकेपी समाजातील अनेक महिला आज जागतिक स्तरावर विविध क्षेत्रांमध्ये अग्रणी राहून आपल्या समाजाला गौरवीत करत आहेत. खासगी संस्था ते मल्टिनॅशनल कोर्पोरेट्स, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पाककला, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रांत सुद्धा आपल्या महिलांचा वावर वाखाणण्याजोगा आहे. तलवार आणि लेखणीचा वारसा सांगणाऱ्या आपल्या या समाजात लेखणीचा उत्तम वापर करत साहित्य निर्मिती करणाऱ्या अनेक महिला आजही विविध माध्यमांतून आपले साहित्यिक योगदान देत असतात. योगायोगाने या वर्षी २२ मे रोजी पुणे येथे दुसरे सीकेपी साहित्य संमेलन आयोजित केले जात आहे. या पार्श्वभूमीवर सीकेपी समाजातील शंभराहून अधिक लेखिका कवयित्रींना आणि अगदी पाकशास्त्रावरील पुस्तके लिहिणाऱ्या सुगरणींना तुमच्यासमोर आणायचा हा एक छोटासा प्रयत्न.

      March 22, 2022


  • खलनायिका, अभिनेत्री नादिरा

    आज ५ डिसेंबर
    आज खलनायिका, अभिनेत्री नादिरा यांची पुण्यतिथी.
    जन्म. ५ डिसेंबर १९३२

    भारतीय चित्रपटसृष्टीतील एके काळची आघाडीची साहाय्यक अभिनेत्री नादिरा ह्या मूळच्या बगदादच्या, एका ज्यू कुटुंबातली. जन्म बगदादमध्ये. फरहान इझिकेल (नादिरा) ह्या फ्लोरेन्स या नावाने अधिक ओळखली जायच्या. ‘मुड मुड के ना देख मुड मुड के गर्ल’ या लोकप्रिय नावाने ओळखल्या गेलेल्या नादिरा यांनी एकूण ६३ हिंदी चित्रपटांत भूमिका करून १९५० ते १९६० हे दशक गाजविलं. नादिरा या दिग्दर्शक मेहबूब खान यांची पत्नी सरदार बेगम हिची मत्रीण होत्या. त्यांच्या आग्रहामुळे नादिरा या मुंबईत वयाच्या १९ व्या वर्षी दाखल झाल्या आणि आवारासाठी मा.नर्गिस यांनी आन चित्रपटावर वर पाणी सोडल्यानंतर मेहबूब खान यांनी त्यांच्या ‘आन’ या चित्रपटात एका फरहान इझिकेल या फिल्मी क्षेत्रात अगदी नवख्या असलेल्या बगदादी ज्यू मुलीची निवड केली व तिलाच ‘नादिरा’ या नावाने स्टार बनविण्याचा निर्धार केला. ‘आन’मधील एका राजपूत राजकन्येच्या तिच्या भूमिकेनंतर त्यांच्यावर साहाय्यक खलनायिकेचा शिक्का बसला. ‘आन’, ‘श्री ४२०’, ‘पाकिजा’, ‘दिल अपना प्रीत पराई’, ‘ज्यूली’, ‘सागर’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका अविस्मरणीय झाल्या. यापकी ‘श्री ४२०’, ‘पाकिजा’, ‘ज्यूली’ या चित्रपटांतील तिच्या भूमिकांमुळे त्यांना सर्वोत्तम साहाय्यक अभिनेत्रीचे फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. ‘श्री ४२०’ मधील ‘मुड मुड के ना देख मुड मुड के’ या गाण्याने आणि ‘ज्यूली’तील मार्गारेट ऊर्फ मॅगीच्या भूमिकेने नादिरा यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन बसवले. नादिरा यांच्या वेगळ्या, पाश्चिमात्य व्यक्तिमत्त्वामुळे इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळेपण उठून दिसे. २००० साली प्रदíशत झालेला ‘जोश’ हा नादिरा यांचा अखेरचा चित्रपट. दोन वेळा लग्न करून घटस्फोट झालेल्या नादिराचे मुंबईतील सर्व नातेवाईक इस्रायलमध्ये स्थायिक झाल्याने म्हातारपणी नादिराच्या नशिबी एकटेपणा आला. विविध विषयांच्या वाचनाची आवड असलेल्या नादिराच्या खासगी ग्रंथसंग्रहात शेक्सपियर, विवेकानंद, हिटलर, ज्युडाइझम, दुसरे विश्वयुद्ध आणि तत्त्वज्ञानविषयक विपुल पुस्तके होती. हिंदी चित्रपटसृष्टीत मा.नादिरा ह्या स्वत:कडे रोल्सराइस असलेली पहिली अभिनेत्री. मा.नादिरा यांचे ९ फेब्रुवारी २०१३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      December 12, 2016