(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • भावगीत गायक दत्ता वाळवेकर उर्फ मास्टर दत्ता

    दत्ता वाळवेकर हे फक्त मराठी भावगीत गायक आणि संगीतकार नव्हते तर उत्तम समीक्षक, शिक्षक, साहित्यिक, चित्रकार, सुलेखनकार, छायाचित्रकार सुध्दा होते.

    त्यांचा जन्म ३० मार्च १९२८ रोजी बेळगाव येथे झाला. १९४८ च्या सुमारास मास्टर दत्ता या नावाने ते मेळयामध्ये काम करीत. बापूराव माने यांच्या बरोबर त्यांनी ’’युध्दाच्या सावल्या’’, ’’लग्नाची बेडी’’ अशा नाटकातून भूमिका केल्या. याच काळात त्यांना नटश्रेष्ठ बालगंधर्व, सीताकांत लाड अशा मोठ्‌या व्यक्तींचा सहवास लाभला.

    रविकिरण मंडळाच्या सदस्यांनी त्या काळात कविता गाण्यास सुरूवात केली होती. जी. एन. जोशी, जे. एल. रानडे, गजानन वाटवे यांनी काव्यगायनास आरंभ केला. मास्टर दत्ता यांनी याच काळात भावगीत गायन सुरू केले. गजानन वाटवे यांना गुरू मानून त्यांनी विविध ठिकाणी गायनाचे कार्यक्रम सादर केले. आकाशवाणीच्या पुणे, मुंबई केंद्रावर त्यांनी अनेक कार्यक्रम सादर केले.

    दत्ता वाळवेकर यांनी गायलेल्या गीतांची पहिली ध्वनिमुद्रिका ‘रिगल’ कंपनीने १९४९ मध्ये काढलेली होती. अत्यंत शुध्द शब्दोच्चार आणि गोड आवाज ही त्यांच्या गाण्याची वैशिष्ट्ये होती. गीताचा अर्थ श्रोत्यांपर्यंत नेण्यासाठी ते भावपूर्ण उच्चार करीत. त्यांच्या अर्थवाही गाण्यामुळे श्रोते प्रभावित होत. करमणुकीचे कोणतेही साधन नसल्यामुळे जाहीर कार्यक्रम हेच लोकांना आवडत असत. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अशा वेळी मा.वाटवे, मा.नावडीकर आणि मा.दत्ता वाळवेकर या त्रिकुटाने राज्यातील अनेक गावात आपल्या गाण्याने लोकांना मोहित केले.

    नव्या पिढीमधील गायकांना दत्ता वाळवेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन होत असे. त्यांनी ’’पुष्पविण कल्पतरू’’ हे आत्मकथनपर पुस्तक लिहिले. ते श्रीविद्या प्रकाशनाने प्रकाशित केले. खत्री भाषेच्या अभ्यासावर त्यांनी लिहिलेले ’’क्षात्र बोली’’ हे पुस्तकही गाजले. १९७६ मध्ये पुणे विद्यापीठाने त्यांना खत्री भाषेवरील संशोधनासाठी पी. एच. डी. प्रदान केली.

    पुणे साहित्य संमेलनात तसेच कराड नाट्‌य संमेलनात त्यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे पुण्यात २००८ मध्ये सवाई गंधर्व महोत्सवात जीवनभर संगीत क्षेत्रात त्यांनी बजावलेल्या मोलाच्या कामगिरीबद्‌दल विषेश गौरव करण्यात आला.

    दत्ता वाळवेकर यांचे १६ मार्च २०१० रोजी निधन झाले.

    दत्ता वाळवेकर यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली दुर्मिळ गीते, त्यांच्या गायनाच्या कार्यक्रमांची दृक्‌-श्राव्य मुद्रणे, वेगवेगळ्या वाहिन्यांवर झालेल्या त्यांच्या मैफली, विविध ठिकाणी झालेल्या मुलाखती हे http://www.dattawalvekar.com या संकेतस्थळावर आपण बघू शकता.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    दत्ता वाळवेकर यांची गाजलेली काही गाणी.
    सांग पोरी सांग, हे काय गडे, गोपाल गोपाल नाचलो नानापरी गोपाल, माइया स्वप्नात आला सखा, काय झालं विचारू नका, जे घडले ते सगळे सांग कसे विसरावे, का ठेविल्या इथे खुणा, आठविती मज पुन्हा पुन्हा, स्वप्नातल्या मिठीचे रोमांच अजुनी गात्री

    https://youtu.be/4wePRfs_uqU

    https://youtu.be/u4Jp5nUbQQc

    https://youtu.be/QPAT236XS5k

      March 18, 2017


  • वर्षा माडगूळकर

    दुर्गा नागरी सहकारी पतसंस्था, जिजामाता सहकारी बॅंक आणि जिजामाता महिला सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून वर्षा माडगूळकर यांनी महिलांना स्वावलंबी बनविले. सहकारातले आगळे उदाहरण उभे केले. सामान्य कुटुंबात जन्म घेऊन त्यांनी घेतेलेली बरारी चकित करणारी आहे...

    कर्तबगार पंखांची भरारी

      July 14, 2017


  • प्रतिभावंत कवी जगदीश खेबूडकर

    वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी गांधी हत्याकांडात त्यांचे घर जळाले अन् त्या ज्वाळा पाहून घरासमोरील झाडाखाली बसून त्यांना आयुष्यातली पहिली कविता ‘मानवते तु विधवा झालीस’ सुचली. त्यांचा जन्म १० मे १९३२ रोजी झाला.

      May 10, 2019


  • श्रीपाद दामोदर सातवळेकर

    सातवळेकर, श्रीपाद दामोदर - 0262

    ३१ जुलै १९६८
    १९६८> वैदिक तत्वज्ञानाचे भाष्यकार वेदमूर्ती श्रीपद दामोदर सातवळेकर यांचे निधन. जवळपास ४०० हून अधिक पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. वैदिक राष्ट्रगीत व वैदिक प्रार्थनांची तेजस्विता या लेखांमुळे त्यांना इंग्रजांनी कारावासात धाडले. “भारतीय संस्कृती” हा ५० लेखांचा संग्रह, “संस्कृत स्वयंशिक्षक माला (२४ भाग)” वेदकालीन समाजदर्शनाची १२ पुस्तकांची मालिका, वेदांतील देवमंत्रांची “दैवतसंहिता” आदी पुस्तके त्यांनी सिद्ध केली होती.
    ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

    सातवळेकर, श्रीपाद दामोदर - 0466

    ११ सप्टेंबर १८६७
    १८६७> वेदांचे गाढे अभ्यासक (वेदवाचस्पती) श्रीपाद दामोदर सातवळेकर यांचा जन्म. मराठी, हिंदी व इंग्रजी मिळून तब्बल ४०० पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. “वैदिक धर्म” हे हिंदी व “पुरुषार्थ” हे मराठी मासिक त्यांनी काढले होते. “संस्कृत स्वयंशिक्षक” या मालेत २४ पुस्तके, “भारतीय संस्कृती” हा ५० लेखांचा संग्रह, एक हजार पृष्ठांची “उपनिषद भाष्य ग्रंथमाला” असे लेखन त्यांनी केले.

    mss

      August 1, 2017


  • रमेश देव

    भिंगरी’ चित्रपटात त्यांनी साकारलेला खलनायक अविस्मरणीयच. मराठीत यापूर्वी खलनायक रूबाबदार असू शकतो ही संकल्पनाच नव्हती. रमेश देव यांनी खलनायकी भूमिकेला ग्लॅमर मिळवून दिले.तरीही त्यांनी स्वतला विशिष्ट परिघात अडकवून न घेता चौफेर मुशाफिरी केली. त्यांनी नायक, सहनायक, चरित्र अभिनेता ते खलनायक अशा सर्वच भूमिका केल्या.

      July 20, 2022


  • कैलास जीवन स्किन क्रीम चे सर्वेसर्वा राम कोल्हटकर

    कैलास जीवनचे क्रीम ही सर्वांत मऊ व इलाजकारक असल्याची खात्री ते देतात.चंदनाचे तेल, दुवा, शंखजीरा, राळ, तेल तसेच पाण्याचे सममिश्रण करुन त्यापासून हे मऊ क्रीम तयार केला जात. केवळ भारतातच नव्हे तर जगात या प्रकारचे आयुर्वेदिक क्रीम कसे तयार केले जात नसल्याचा कोल्हटकर यांचा दावा आहे. या उत्पादनात कोणत्याही प्रकारचे अल्कोहोल वापरले जात नसल्याने त्याचा परिणाम लगेच दिसून येता असे ही ते म्हणतात. ग्राहकाला कमीत कमी खर्चात हे क्रीम उपलब्ध व्हावे यासाठी हे क्रीम १२ ग्रँम पासून २० ग्रँम पर्यंतच्या ट्यूब मध्ये ही ते उपलब्ध केले आहे. विश्वास व सचोटी हे बीदवाक्य नेहमी पाळले जात असेही ते म्हणतात.

      April 14, 2022


  • विष्णू दत्तात्रेय साठे

    नाट्य साहित्याचे अभ्यासक विष्णू दत्तात्रेय साठे यांचा जन्म १९ डिसेंबर १९१६ रोजी झाला.

    मराठी नाट्यकथा, तसेच निवडक नाटकांचे प्रवेश एकत्र केलेले नाट्यप्रवेश १ ते ५ हे संकलन त्यांनी केले.

    ## Vishnu Dattatrey Sathe

      July 26, 2017


  • प्रसिद्ध तबला वादक झाकिर हुसेन

    तबल्याचा ठेका आणि द्रुत लयीत जुगलबंदीचा शेवट करताना एका उन्मनी अवस्थेत मानेला वारंवार झटका दिल्याने लयीत डोलणारे डोईवरचे केस, ही तबला नवाज झाकीर हुसेन यांची रसिकजनांच्या मनांवर ठसलेली प्रतिमा. त्यांचा जन्म ९ मार्च १९५१ रजी झाला. त्याच प्रतिमेच्या प्रेमात पडून सहज उमटणारी ‘वाह उस्ताद’ ही दाद आणि या सदासतेज, हसतमुख चेहरा व त्यांचे भारतीय संगीताला वैश्विक परिमाण मिळवून देणारे योगदान कितीतरी अमूल्य. भारतातील सर्वात प्रसिद्ध तबला वादक अशी ओळख असणारे मा. झाकिर हुसेन हे मा.अल्लाराखा खां यांचे सुपुत्र आहे. मा.झाकिर हुसेन यांचे बालपण मुंबई मध्ये गेले. झाकिर हुसेन संगीत जगात वयाच्या बाराव्या वर्षी तबला शिकण्यास सुरुवात केली मा.झाकिर हुसेन हे एक व्यक्तिमत्त्व बहुआयामी आहे. सोलो वादन, फ्युजन आणि साथसंगत हे तिन्ही प्रकार ते तितक्यानच तन्मयतेने व उत्तमरीत्या करतात. भारतीयांसाठी मा.झाकीर हुसेन हे सर्वश्रेष्ठ तबलावादक असले, तरीही जगाच्या व्यासपीठावर ते एक श्रेष्ठ संगीतकार म्हणून विराजमान आहेत. जगात सारे प्रवाह एकत्र येण्याचे श्रेय जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला जरी जात असले, तरीही संगीताच्या क्षेत्रात मा. झाकीर हुसेन यांनी ही प्रक्रिया अगदी सत्तरच्या दशकापासूनच सुरू केलेली आहे. मा.झाकीर हुसेन हे असे एकमेव तबलावादक आहेत, की ज्यांनी सर्व प्रकारच्या कलाकारांबरोबर आणि कला-प्रकारांबरोबर तबलावादन केलेले आहे. मग तो मा.गिरीजा देवी यांचा टप्पा असो, किंवा त्यांचीच ठुमरी किंवा झुला असो; तो मा.भीमसेन जोशी यांचा अभंग असो किंवा मा.जसराजजी यांचे भजन. हे सारे प्रकार आत्मसात करून त्यांनी या सर्वांबरोबर वादन केले आहे. इतकेच काय, तर देशातील प्रमुख गायकांबरोबर आणि वादकांबरोबर त्यांनी तबल्याची साथ करून प्रत्येकाची शैली सांभाळत आपले अष्टपैलूत्व सिद्ध केले आहे. मा.झाकीर हुसेन स्वतः तबला या वाद्याला व्यासपीठावर प्रतिष्ठा मिळवून देण्याचे श्रेय मा. रवि शंकर, उस्ताद अली अकबर खां आणि त्यांचे वडील उस्ताद अल्लाराखा खां यांना देतात. कारण भारतीय संगीत सर्वप्रथम देशाबाहेर या तिघांनी नेले. ते जगमान्य कलाकार झाले आणि त्यानंतर अनेक कलाकार देशात-परदेशात आपली कला सादर करू लागले. परंतु या साऱ्या प्रक्रियेत कळस जर कुणी चढवला असेल तर तो मा.झाकीर हुसेन यांनी! वीस वर्षांचे असताना झाकीर हुसेन अमेरिकेला गेले. त्यांना तिथे बोलावण्यात पंडित रविशंकर यांचा फार मोठा आग्रह होता. तोपर्यंत ते देशभर दौरे करीत होतेच, परंतु अमेरिकेतला तो अनुभव त्यांच्या आयुष्याला नक्कीच मोठी कलाटणी देऊन गेला. त्या काळातील अमेरिका हा उर्वरित जगासाठी एक ‘कल्चरल मेल्टिंग पॉट’ होता. यातूनच साहित्य-कला प्रांतात रूढी-परंपरा नाकारणारी प्रतिचळवळ म्हणजेच काऊंटर कल्चर मुव्हमेंट जन्माला आली. विशेषतः पूर्वेकडील संस्कृती, संगीत आणि अध्यात्म या सर्वांचे आकर्षण सामान्य अमेरिकी लोकांमध्ये वाढले. पं. रविशंकर, अली अकबर खां, उस्ताद अल्लाराखा खां अमेरिकेत प्रचंड लोकप्रिय होत गेले. याच काळात अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या मा.झाकीर हुसेन यांनी जगातील वेगवेगळ्या सांगीतिक परंपरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कलाकारांबरोबर सांगीतिक वार्तालाप केला. त्यांनी आपली थोर परंपरा, आपले संगीत सर्वश्रेष्ठ असे काहीही मनात न आणता अगदी खुल्या मनाने या साऱ्या भिन्न परंपरा आत्मसात केल्या. त्या सर्वांमध्ये तबला या वाद्याला एक मानाचे स्थान मिळत गेले. आंतरराष्ट्रीय कलाकारांमध्ये जॉन मॅक्लॉलिन, मिकी हार्ट, हर्बी हन्कॉक, एरिक हर्लंड या आणि अशा अनेक दिग्गज कलाकारांबरोबर मा.झाकीर हुसेन यांनी सहवादन केले. त्यातूनच त्यांना वैश्विक स्तरावर उत्तरोत्तर लोकप्रियतादेखील मिळत गेली. त्याचबरोबर भारतीय गायक-वादकांबरोबर त्यांचे जगभर दौरेही सुरू राहिले. सत्तर आणि ऐंशीची दशके अशी होती तेव्हा भारतातील संगीत तर सातासमुद्रापार जात होतेच, परंतु जागतिक पातळीवर अनेक सांगीतिक प्रवाह एकमेकांना प्रभावितही करीत होते. मा. झाकीर हुसेन यांनी या दोन्ही प्रकारच्या सांगीतिक प्रवाहात आपले विशिष्ट स्थान निर्माण केले होते. म्हणूनच नव्वदच्या दशकात जेव्हा जागतिकीकरण ही संकल्पना दृढ झाली, तेव्हा मा.झाकीर हुसेन हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे संगीतकार म्हणून ध्रुवस्थान प्राप्त झालेले नाव बनले! याचाच प्रभाव म्हणून १९९६ च्या अॅटलांटा ऑलिंपिकच्या उद्घाणटन समारंभाला ज्या संगीतकारांनी संगीत दिले, त्यातील एक नाव मा.झाकीर हुसेन हे होते. मास्टर्स ऑफ पर्कशन या संकल्पनेद्वारे ते भारतातल्या लोकसंगीत वादकांना दरवर्षी आपल्या बरोबर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर घेऊन जात आहेत. अनेक गुणी ज्युनियर कलाकारांबरोबर तबल्याची साथ करून ते त्यांना प्रोत्साहन देत आहेत. या कलाकारांमध्ये राहुल शर्मा, नीलाद्री कुमार, राकेश चौरासिया यांचा प्रामुख्याने समावेश आहे. मागच्या वर्षी पुण्याला जेव्हा त्यांनी राहुल देशपांडे यांच्या सोबत तबला वाजवला, तीस वर्षांपूर्वी याच मा.झाकीर हुसेन यांनी देशपांडे यांचे आजोबा पं.वसंतराव देशपांडे यांच्याबरोबर पुण्याला तबल्याची साथ केली होती. मा. झाकिर हुसेन यांना भारत सरकारने पद्मश्री, पद्मभूषण, देऊन गौरवले आहे. त्यांना ग्रॅमी पुरस्कारही मिळाला आहे. संगीत क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल मा.झाकीर हुसेन यांना "एस.डी. बर्मन आंतरराष्ट्रीय क्रिएटीव अवॉर्ड' नुकतेच मिळाले आहे. मा.झाकीर हुसेन यांचे वास्तव्य पत्नी आणि दोन मुलींसमवेत कॅलिफोर्निया येथे असते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    झाकिर हुसेन यांचे तबला वादन.

    http://www.youtube.com/watch?v=wOUM8K0-Wkc&list=RDEMX5Bz5WHsWxd4Xz_V2LK_Xw

    https://www.youtube.com/shared?ci=rBMTQl_JG70

    https://www.youtube.com/shared?ci=ia22SQ-W40g

      March 9, 2017


  • अल्हाद महाबळ

    आल्हाद महाबळ हा ठाण्यामधील तरूण व प्रथितयश फोटोग्राफर आहे. निसर्गाचे जिवंत रूप व त्याच्या असंख्य लीला आपल्या कॅमेर्‍यामध्ये कैद करण्यापेक्षा त्याला आवड आहे.

    कोणत्याही सजीव गोष्टीवरील सुक्ष्म भाव व भावनांचे टिपणं, आपल्या जिवापेक्षाही जास्त जपलेल्या कॅमेर्‍यात करण्याची गोडी त्याला लहानपणापासूनच होती.

    व्यक्तींचे चित्रण हा त्याने आपल्या व्यवसायाचा भाग बनवला व या प्रातांतील सर्व बारकावे व कौशल्यांचा नीट आभ्यास करून ती सर्व कौशल्ये प्रयत्नपुर्वक त्याने आत्मसात केली. आज अनेक हिंदी, व मराठी मालिकांसाठी, सिनेमांसाठी, व मासिकांसाठी स्थिरफोटो काढणे, पोर्टफोलिओंसाठी लागणारी फोटोग्राफी करणे, व्यक्तींच्या विविध वैशिष्ट्यपूर्ण शारिरीक लकबींच शैलीदार चित्रण करणारी फॅशन फोटोग्राफी, एखाद्या वस्तूची प्रभावी जाहिरात करण्यासाठी लागणारी पब्लिसिटी फोटोग्राफी, कुठला तरी आशय किंवा संदेश देणारी सामाजिक फोटोग्राफी अशा अनेक निरनिराळ्या वाटा चोखंदळून आपल्यामधील सृजनशील व प्रयोगशील कलाकाराला त्याने भरगोस न्याय दिला आहे.

    व्यक्तीच्या चेहर्‍यावर फोकस ठेवून त्या व्यक्तीच्या भावभावनांना अधोरेखित करणारी पार्श्वभुमी व छायाप्रकाशाचा खेळ रंगविला, तर त्या व्यक्तीचे एक चिमुकलं भावविश्वच पाहणार्‍यासमोर उलगडता येवु शकत हे त्याच्या फोटोजवरून प्रकर्षाने जाणवतं. आपल्या रोजच्या अनुभवांमधुन व अवती भवती घडणार्‍या प्रसंगांमधून तो त्याच्या व्यावसायिक फोटोग्राफीसाठी लागणारे दृष्यसंदर्भ घेत असतो. प्रकाश, अंधार, सावल्या व रंग या निसर्गाकडून मानवाला मिळालेल्या प्रेमपुर्वक भेटींना बोलत करून त्यांद्वारे रसिकांशी मनसोक्त संवाद साधण्याच त्याच स्वप्न, त्याचा हा व्यवसाय पूर्ण करत आहे.

    फायनल युसेग डिपेन्डन्ट एक्सिक्युशन, गारमेन्ट शुट, इमोटीव्ह पोट्रेचर, या तांत्रिकदृष्ट्या महत्वाच्या संज्ञांमध्ये व प्रकारांमध्ये तो विशेष निपुण आहे. सध्या आल्हाद एम. फोटोग्राफी हा नामांकित फोटो स्टुडियो तो चालवित आहे. त्याने अनेक संस्थांमध्ये साहाय्यक फोटोग्राफरची, तर काही ठिकाणी स्वतंत्रपणे प्रकल्प निवडून आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटविली आहे.

      December 29, 2015


  • भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला कल्पना चावला

    कल्पना चावला या सर्टिफाइड कमर्शिअल पायलट होत्या. त्यांना सीप्लेन, मल्टी इंजिन एअर प्लेस आणि ग्लायडर चालवण्याचा परवाना होता. ग्लायडर आणि एअरोप्लेनसाठी त्या सर्टिफाइड फ्लाइट इन्स्ट्रक्टरही होत्या.

      February 1, 2022