(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • यशवंत चकोर

    आपल्या पहाडी आवाजाने महाराष्ट्राला दणाणून सोडणारे गोवा मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील सेनानी शाहीर यशवंत चकोर.

    १९४२ च्या स्वातंत्र्य-लढ्यात जयप्रकाश नारायण यांच्या सभेची सुरुवात करण्याची संधी शाहीर चकोर यांना मिळाली होती. १९४७ मध्ये क्रांतिवीर नाना पाटील यांच्या सभेत त्यांनी स्वातंत्र्यगीते गायली. पुढे शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे अशा ज्येष्ठ शाहिरांसोबत त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत भाग घेतला.

    त्यावेळी मुंबई प्रांत सरकारविरोधात प्रचार केल्यामुळे त्यांना रेल्वेची नोकरी गमावावी लागली. आचार्य अत्रे यांना हे कळल्यानंतर त्यांनी 'दैनिक मराठा' नाशिक जिल्ह्याची एजन्सी त्यांना दिली. पुढे चकोर १० वर्षे मनमाड नगरपालिकेत नगरसेवक होते. लोककलेतून जनजागृती करणार्‍या या कलाकारावर आचार्य अत्रे प्रचंड खुश होते. सभेपूर्वी ते 'जय देव जय देव जय मंगलमूर्ती' हे गीत शाहीर चकोर यांना म्हणायला सांगत.

    स्वातंत्र्यापासून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत कार्यरत राहणार्‍या आणि अनेक वर्षे पुरोगामी पक्षाबरोबर जनजागृतीचे काम करणार्‍या या शाहिराच्या वाट्याला अखेरपर्यंत उपेक्षाच आली. निळू फुले, राम नगरकर यांच्यासोबतीने पुण्यात कलापथकात काम करणारे शाहीर केवळ आईच्या आग्रहास्तव पुन्हा मनमाडला आले. त्यानंतर त्यांनी मनमाड सोडले नाही.

    पुण्याच्या बालगंधर्व नाट्यगृहाच्या उदघाटनाप्रसंगी पहिले गाणे शाहीर चकोरांनी सादर केले. त्या गाण्याला चाल व संगीत पु. ल. देशपांडे यांनी दिले. अशा कितीतरी आठवणींवर शाहीर शेवटपर्यंत चिरतरुण होते. त्यामुळेच उपेक्षित जगण्याची त्यांनी कधीही खंत व्यक्त केली नाही.

    गोवामुक्ती संग्राम स्वातंत्र्यसैनिकाचा दर्जा मिळावा, यासाठी त्यांनी केलेले सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्याने त्यांचा अखेरच्या टप्प्यातील प्रवास खडतर झाला होता. जागा मराठा, आम जमाना बदलेगा, उठा है जो तुफान, वह आखिर बंबई लेके दम लेगा अशी महाराष्ट्र गीते, पोवाडे आणि शौर्यगीते गाऊन एकेकाळी महाराष्ट्राला वेड लावणारे शाहीर चकोर अखेरच्या क्षणी स्वातंत्र्यसैनिकाचा दर्जा मिळविण्यासाठी दारोदार भटकत होते. उदरनिर्वाहासाठी अल्पबचत एजंट म्हणून घरोघरी पैसे गोळा करण्याचे काम करणार्‍या शाहिरांनी अखेरपर्यंत काम केले.

    त्यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. अखेरपर्यंत चकोर हे शाहीर म्हणून मिळणारे तुटपुंजे मानधन व पतसंस्थेचे कमिशन यावर गुजराण करत होते.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


      August 8, 2017


  • प्रसिध्द चित्रकार  प्रफुल्ला डहाणूकर

    प्रफुल्ला दिलीप डहाणूकर, माहेरच्या प्रफुल्ला सुब्राय जोशी. प्रफुल्ला डहाणूकर या एक मराठी चित्रकार होत्या. बॉम्बे आर्ट सोसायटी, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, आर्टिस्ट्स सेंटर, जहांगीर आर्ट गॅलरी, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, गोवा कला अकादमी आदी अनेक कलासंस्थांच्या त्या अध्वर्यू होत्या. प्रफुल्ला डहाणूकर यांचे वडील सुब्राय अनंत जोशी, यांचा वाहतुकीचा व वाहनांचा व्यवसाय होता. प्रफुल्ला डहाणूकर पाच वर्षांच्या असतानाच त्यांचे कुटुंब मुंबईत आले.

      March 1, 2024


  • मराठी भाषेतील कवी दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ दत्त

    कवि दत्त यांची अलीकडच्या संदर्भात ओळख करून द्यायची झाल्यास ती अशी करून देता येईल. त्यांचा जन्म २७ जून १८७५ रोजी झाला. ज्येष्ठ साहित्यिक वि. द. घाटे यांचे ते वडील. कवयित्री अनुराधा पोतदार यांचे आजोबा आणि कवी प्रियदर्शन पोतदार यांचे पणजोबा!

    महाराष्ट्रकवी यशवंत दिनकर पेंढरकर यांनी दत्त यांच्या काव्यगुणांचे रसग्रहण करणारा लेख लिहिला होता. कवीचे अकाली जाणे आणि त्याचे काव्यवैभव यांची सांगड घालणे कसे अयोग्य आहे, ते एका इंग्लिश वचनाच्या आधारे त्यांनी त्या लेखात स्पष्ट केले होते.

    यशवंतांनी म्हटले होते : 'एज डजंट मॅटर. नो. यू आर नॉट टू यंग; पिट वॉज प्राईम मिनिस्टर ऍट 23, नो. यू आर नॉट टू ओल्ड; ग्लॅडस्टन वॉज प्राईम मिनिस्टर ऍट 83. ' पाश्चात्यांच्या इतिहासातील अनन्यसाधारण दाखल्यानी वयोमानाची निरर्थकता जशी या उताऱयांत व्यक्त केली आहे, तशी ती आपल्याकडील दाखल्यांनीही करता येईल. सारांश इतकाच की, वयाची आडकाठी कर्तृत्वाला येत नाही.

    हे सांगतानाच यशवंतानी हेही स्पष्ट केले होते की, 'दत्तांच्या कवितेत असे पुष्कळ गुणधर्म सापडत नाहीत की, ते व्यक्त व्हायला त्यांना अधिक अनुभव, समृद्ध आयुष्याची आवश्यकता होती. ' असे असले तरी दत्त यांना लाभलेल्या आयु्ष्याच्या अवकाशात जी काही कविता लिहिली ती कसदार आहे, हे निश्चित.
    कवी दत्त हे मूळचे नगर जिल्ह्यातील. श्रोगोंदे हे त्यांचे गाव. कवी दत्त यांचे शिक्षण अहमदनगर येथील मिशन हायस्कूलमध्ये झाले, महाविद्यालयीन शिक्षण विल्सन कॉलेज, मुंबई आणि ख्रिश्चन कॉलेज, इंदूर येथे झाले. कलकत्ता विद्यापीठातून बी. ए. ही पदवी मिळाल्यावर पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात शिक्षक म्हणून नोकरीला लागले. रेव्हरंड ना. वा. टिळक आणि कविवर्य चंद्रशेखर यांच्याशी दत्त यांचे विशेष सख्य होते. तिघांमध्ये खास जिव्हाळा होता.
    कवी दत्त म्हटले की आठवते ती 'बा नीज गडे' ही कविता. या कवितेवरूनच ते ओळखले जातात.

    कवी दत्त यांच्या बहुसंख्य कविता १८९७ व १८९८ या काळातील आहेत. त्या काव्यरत्नावली, मनोरंजन, सुविचार समागम, बालबोध मेवा, करमणूक इत्यादी नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या. एकूण एक्कावन्न कविता आज उपलब्ध आहेत. त्यांपैकी ४८ कवितांचा संग्रह त्याचे शिक्षणतज्ज्ञ चिरंजीव कवी वि.द. घाटे यांनी इ.स. १९२२ साली दत्तांची कविता या नावाने प्रसिद्ध केला. ’नवे पान’ या डॉ. मा.गो. देशमुख संपादित संग्रहात मात्र त्यांच्या सर्व कविता आहेत. मा.दत्तात्रेय कोंडो घाटे यांचे १३ मार्च १८९९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट / प्रदीप कुलकर्णी

    दत्त यांची कविता
    .......................................
    निज नीज माझ्या बाळा (ही रचना १८९७ मधील आहे.)
    .......................................
    बा नीज गडे नीज गडे लडिवाळा
    निज नीज माझ्या बाळा

    रवी गेला रे सोडुनी आकाशाला । धन जैसे दुर्भाग्याला ।।
    अंधार वसे चोहिकडे गगनात । गरिबांच्या जेवी मनात ।।
    बघ थकुनी कसा निजला हा इहलोक । मम आशा जेवी अनेक ।।ध्रृ।।
    खडबड हे उंदिर करिती ।
    कण शोधायाते फिरती ।
    परी अंती निराश होती ।
    लवकरी हेही सोडतील सदनाला । गणगोत जसे आपणाला ।। ध्रृ ।।
    बहू दिवसांच्या जुन्या कुडाच्या भिंती । कुजुनी त्या भोके पडती ।।
    त्यांमधुनी त्या दाखविती जगताला ।दारिद्य्र आपुले बाळा ।।
    हे कळकीचे जीर्ण मोडके दार । कर कर कर वाजे फार ।।
    हे दुःखाने कण्हुनी कथी लोकांला । दारिद्य्र आपुले बाळा ।।
    वाहतो फटींतून वारा ।
    सुकवीतो अश्रूधारा ।
    तुज नीज म्हण सुकुमारा ।
    हा सूर धरी माझ्या ह्या गीताला । निज नीज माझ्या बाळा ।।ध्रृ।।
    जोवरती हे जीर्ण झोपडें अपुले। दैवाने नाही पडले ।।
    तोवरती तू झोप घेत जा बाळा । काळजी पुढे देवाला ।।
    तद्नंतरची करू नको तू चिंता । नारायण तुजला त्राता ।।
    दारिद्य्र चोरिल कोण? ।
    आकाशा पाडिल कोण? ।
    दिग्वसना फाडिल कोण? ।
    त्रैलोक्यपती आता तुजला त्राता । निज निज माझ्या बाळा ।।ध्रृ।।
    तुज जन्म दिला सार्थक नाही केले । तुज काही न मी ठेविले ।।
    तुज कोणी नसे, छाया तुज आकाश । धन दारिद्य्राची रास ।।
    या दाही दिशा वस्त्र तुला सुकुमारा । गृह निर्जन रानीं थारा ।।
    तुज ज्ञान नसे अज्ञानाविण काही ।भिक्षेविण धंदा नाही ।।
    तरी सोडुं नको सत्याला ।
    धन अक्षय तेच जिवाला ।
    भावें मज दीनदयाळा ।
    मग रक्षिल तो करुणासागर तुजला । निज नीज माझ्या बाळा ।।ध्रृ।।

      June 27, 2017


  • विजय हजारे

    विजय हजारे हे सी. के. नृायडू यांचे शिष्य होते. १९५१ ते १९५३ ते भारतीय क्रिकेट टीमचे कप्तान राहिले होते. ॲ‍डीलेड येथे १९४८ मध्ये डॉन ब्रॅडमन यांच्या संघासमोर त्यांनी दोन्ही डावांत शतके झळकवण्याचा पराक्रम केला.

      May 10, 2010


  • मला भावलेला नट – टॉम हँक्स

    माझे मन टॉम हँक्स चा धागा पकडून मागे गेले, मी त्याचा Cast Away हा चित्रपट पहिल्यांदा पाहिला त्या काळात. टॉम हँक्स माझ्या मनावर ठसला. मी त्याचे चित्रपट जेव्हा संधी मिळेल तेव्हा पहात गेलो, मोठ्या पडद्यावर असो वा छोटया पडद्यावर. यात काही चित्रपट पुन्हा पुन्हा बघितले कारण मला ते आवडले. प्रत्येक वेळी बघताना मला एक वेगळे परिमाण लक्षात येत गेले.

      May 26, 2019


  • निर्माता नितिन चंद्रकांत देसाई

    नितिन चंद्रकांत देसाई यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटांसाठी कलादिग्दर्शन केले आहे.त्यांचा जन्म ६ ऑगस्ट १९६५ रोजी झाला.
    चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याआधी नितिन देसाई यांनी मुंबईतल्या सर जे.जे. कला विद्यालयातून प्रकाशचित्रणाचे प्रशिक्षण घेतले.१९८७ सालापासून त्यांची चित्रपट कारकीर्द सुरू झाली.

    प्रतिभा, प्रयत्न आणि प्रज्ञा या त्रयीच्या जोरावर आपले अढळ स्थान निर्माण करणारे नाव म्हणजे नितीन चंद्रकांत देसाई!
    एका चाळकरी मध्यमवर्गीय मुलानं रुपेरी पडद्यावर हालचाल करणारी चित्रं पाहिली, त्यामागचे भव्य सेटस् पाहिले आणि ते सारं मोहमयी वातावरण पाहताना आपणही असंच माणसाला मोहवून टाकणारं भव्य काही तरी निर्माण केलं पाहिजे असं मनाशी ठरवूनही टाकलं. अडीच खणांच्या खोलीत राहणार्‍या माणसानं अडीच दशकांनंतर मुंबई-पुणे महामार्गावर चौक-कर्जत रस्त्यावर अडीचशे एकरात ते भव्य स्वप्न साकारलं- एन् डी स्टुडिओ! आज देशातील अग्रगण्य स्टुडिओमध्ये या स्टुडिओची गणना होते.

    नितीन देसाई हे भारतीय चित्रपटसृष्टीमधील एक महत्वाचे नाव. गेल्या शतकातील ऐंशीच्या दशकापासून हे नाव छोट्या पडद्याला व मोठ्या पडद्याला आपलं रुपडं देत आलं आहे. भारतातील प्रत्येक मोठा चित्रपट किंवा दूरदर्शनवरील प्रकल्प हा नितीन देसाई यांच्या कलादिग्दर्शनाने सजत असतो. भारत की खोज सारखी ऐतिहासिक महत्वाची मालिका असो किंवा लगान सारखा अफाट चित्रपट असो. त्या प्रकल्पावर नितीन देसाई हे असणारच!

    त्यांनी पंधरा वर्षांपूर्वी खालापूर तालुक्यातील चौकजवळ हा स्टुडीओ उभारायला घेतला. एक भव्य स्वप्न सृष्टी येथे आकाराला येऊ लागली. हा स्टुडिओ मुंबई आणि पुण्यासारख्या महानगरांपासून समान अंतरावर आणि हमरस्त्याला लागून आहे. शेजारीच मोरबे धरणाचा सुंदर परिसर, सह्याद्रीच्या डोंगररांगा, वळणदार रस्ते, सहकार्याला कायम उत्सुक असणारे गावकरी आणि नयनरम्य पार्श्वभूमी ही या स्टुडिओची खासियत आहे. आज खालापूर कर्जतचे नाव एक कलापूर या नात्याने सर्वदूर पसरण्यात एन् डी स्टुडिओचा फार मोठा सहभाग आहे. स्टुडिओमुळे खरंतर या संपूर्ण परिसरातील अर्थकारण आणि समाजकारण बर्‍ यापैकी बदललं आहे. या परिसरात भारतातील छोटे मोठे सर्व कलाकार येतात, हजारो जणांना रोजगार मिळतो, याबरोबरच एका व्यवसायाला जोडून अनेक नवनवे जोडधंदे सुरू होत जातात. एकूणच सारा भाग हा जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे अनेक कंपन्या बंद पडत असताना, एन् डी स्टुडिओमुळे काही प्रमाणात सावरला गेला आहे.

    आमीर खानचा द रायझिंग हा येथे चित्रित केला गेलेला पहिला भव्य चित्रपट. त्यानंतर या स्टुडिओने मागे पाहिले नाही. मधुर भांडारकर यांचा गाजलेला ट्रॅफिक सिग्नल हा त्यानंतरचा महत्वाचा चित्रपट. १८५७ चा भारला गेलेला कालखंड असेल किंवा मुंबईची अफाट गर्दी वाहून नेणारा गजबजलेला हमरस्ता असेल, तो तेथे साकारला गेला. जोधा अकबर सारखा पिरियड ड्रामा असणारा चित्रपटही येथेच चित्रित झाला. आग्र्याचा भव्य किल्ला येथे दिमाखाने त्यातील सर्व बारकाव्यांसह स्टुडिओमध्ये उभा केला गेला.

    ग्रेट कॉमेडी सर्कस, बिग बॉससारख्या अनेक लोकप्रिय आणि भव्य मालिकांचे निर्माण येथे झाले आहे. राजा शिवछत्रपतिसारखी भारतीय दूरचित्रवाणीमधील आजवरची सर्वात भव्य मालिका जवळपास संपूर्णपणे येथेच चित्रित झाली. छत्रपतींची राजधानी, त्यांचा दरबार, राजगड, पन्हाळा, रायगड, शिवनेरीसारखे किल्ले उभे केले गेले, आणि ते आजही मालिका संपून गेल्यानंतर त्याच दिमाखात जतन केले गेले आहेत. यासंदर्भात बोलताना श्री नितीन देसाई म्हणाले की, हे सर्व सेट आम्ही निर्माण केले पण ते आम्ही मोडणार नाही, ते तसेच जतन करून ठेवणार, या प्रत्येक सेटला एक ऐतिहासिक महत्व आहे याची जाणीव आम्हाला आहे.

    भारतीय कलाइतिहासाची ही सोनेरी पाने आहेत. हा स्टुडिओ म्हणजे लवकरच एक पर्यटन स्थळ म्हणून आम्ही विकसित करणार आहोत. आज अनेकदा ही मयसृष्टी आणि सर्वसामान्य माणसं यांच्यात अंतर पडलेले आपणांस जाणवते. हे अंतर या निमित्ताने कमी होईल आणी कलावंताबद्दलच्या आकर्षणाबरोबरच या कलावंताला आपली कला जोपासायला, पडद्यावरील आपली व्यक्तिरेखा साकारताना किती प्रकारचे कष्ट उपसावे लागतात याची नम्र जाणीव आम्ही करून देऊ शकू. एका दृष्टीने ते लोकशिक्षणच असेल. आमच्या स्टुडिओमध्ये एकाच वेळी शेकडो कलावंतांची, सहयोगी तंत्रज्ञांच्या राहण्याची, जेवण्याची, अखंड विद्युत पुरवठ्याची आम्ही सोय करू शकतो. आज आमच्या कंपनीचं प्रचंड मोठं असं कार्यालय पवई येथे आहे.

    एका सामान्य कुटुंबात मी जन्माला आलेलो असल्यामुळे मला माझ्यासारखी परिस्थिती असणार्यान लोकांसमोर विनम्र असं उदाहरण ठेवता येतं आहे यासाठी मी परमेश्वराचा आभारी आहे.

    एन् डी स्टुडिओने आता स्वत:ची कंपनी स्थापन करून नव नव्या दूरचित्रवाणी मालिका , नवे चित्रपटही घडवायला सुरुवात केली आहे. राजा शिवछत्रपति या मालिकेच्या निर्मितीबरोबरच तुफान गाजलेल्या महाराणी पद्मिनी, झाशीची राणी या मालिकांची निर्मिती एन् डी स्टुडिओने केली आहे. भविष्यामध्ये संबाजी महाराजंवरील एक भव्य मालिका स्टुडिओ निर्माण करणार आहे असे नितीन देसाई यांनी सांगितले. जून महिन्याच्या तिसर्याब आठवड्यापासून बाजीराव- मस्तानी यांची अमर कहाणी छोट्या पडद्यावर एन् डी स्टुडिओ आणत आहे. येत्या दोन वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांवर एक आंतरराष्ट्रीय चित्रपट बनवला जाणार आहे.

    ताजमहालाची कहाणी सांगणारा एक चित्रपटही स्टुडिओच्या वतीने बनविला जाणार आहे. जगातील सात आश्चर्ये येथे उभी करून ज्यांना ज्यांना ही आश्चर्ये पहाणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी त्या सात आश्चर्यांच्या प्रतिकृती येथे उभारल्या जातील, येथे एक जागतिक दर्जाचं म्युझियम बनविण्याचा श्री देसाई यांचा मानस आहे.

    एन् डी स्टुडिओ हे एका सामान्य परिस्थितीमध्ये जन्माला आलेल्या व्यक्तीनं आपल्या जिद्द, चिकाट आणि कला यांच्या सहाय्याने साकारलेलं सत्य-स्वप्न आहे!

    नितिन देसाई यांच्यावर एक पुस्तक सकाळ प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे.
    आधुनिक युगाचा विश्वकर्मा: नितीन चंद्रकांत देसाई
    लेखक मंदार जोशी.
    नितीन देसाई हे व्यक्तिमत्व एकूणात ‘नाही रे’ वर्गाला भुरळ घालणारं व्यक्तिमत्व आहे. खिशात काहीही नसताना, वरळीच्या चाळीत राहणार्याव एका सर्वसामान्य परिस्थितीतील बँक कर्मचार्‍याचा हा मुलगा पुढे अवघ्या अडीच दशकात जागतिक कीर्तीचा कर्तबगार कलादिग्दर्शक, प्रॉडक्शन डिझायनर बनतो, १०० एकरांच्या एन्. डी. स्टुडिओचा मालक कसा बनतो याचा शोध हा मराठी मनाच्या कुतुहलाचा विषय आहे आणि हे कुतुहल शमविणारं हे पुस्तक आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट / नीतिन आरेकर

      August 6, 2017


  • कसोटी क्रिकेटपटू रामनाथ पारकर

    भारतातर्फे दोन कसोटी सामने खेळलेले त्यांचे दोन्ही सामने इंग्लंडविरुद्धच होते. गुणवत्ता असूनही पारकर यांच्या वाटयाला केवळ दोनच कसोटी सामने आले. ७०च्या दशकात सुनील गावस्कर यांचे सलामीचे साथीदार म्हणून पारकर यांना पुरेशी संधी मिळाली नाही.

      October 31, 2019


  • नटवर्य चित्तरंजन कोल्हटकर

    संगीतरंगभूमीवरील सुप्रसिद्ध अभिनेते चिंतामणराव कोल्हटकर हे त्यांचे वडील तर विनोदी साहित्याचे मेरूमणी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे चित्तरंजन कोल्हटकर यांचे काका. चित्तरंजन कोल्हटकर यांनी कोल्हापूर येथे १९४४ साली ललित कला कुंजच्या भावबंधन याच नाटकाद्वारे रंगभूमीवर पदार्पण केले. त्यांचा जन्म १५ जानेवारी १९२३ रोजी अमरावती येथे झाला. मात्र पदार्पणातील त्यांची भूमिका घनःश्यामची नसून मोरेश्वरची होती. घनःश्यामची भूमिका त्यांनी प्रथम १९४९ मध्ये केली. आपल्या समर्थ अभिनयाने त्यांनी भावबंधन नाटकातील घनःश्यामची भूमिका अजरामर केली. मात्र याच भूमिकेने त्यांच्यावर खलनायकाचा शिक्का बसला आणि खलनायकाच्या भूमिकेलाही त्यांनी नवीन उंचीवर नेऊन ठेवले. तत्पुर्वी १९४७ मध्ये गरीबांचे राज्य या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. कुंकवाचा धनी या १९५० मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात त्यांनी शांताबाई आपटे यांच्याबरोबर नायकाची भूमिका प्रथमच केली. त्यानंतर त्यांनी पेडगावचे शहाणे, शेवग्याच्या शेंगा, मोहित्याची मंजूळा, हिरवा चूडा, थांब लक्ष्मी कुंकु लावते, जावई माझा भला, तू तिथे मी आदी ८० पेक्षा जास्त चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या. त्यांच्या ऐतिहासिक नाटकातील भूमिका अतिशय गाजल्या. आग्य्राहून सुटका, बेबंदशाही, पद्मिनी, इथे ओशाळला मृत्यू, नटसम्राट आदी प्रसिद्ध मराठी नाटकांतून त्यांनी अजरामर भूमिका केल्या. भावबंधन प्रमाणेच एकच प्याला, स्वामिनी, दुरीतांचे तिमिर जावो, गारंबीचा बापू, पंडितराज जगन्नाथ, अश्रूंची झाली फुले इ. नाटकांमधील त्यांच्या भूमिका प्रसिद्ध आहेत. ‘गारंबीचा बापू’मधील मा.चित्तरंजन कोल्हटकर यांच्या एन्ट्रीला तर टाळ्या पडत असत. काही नाटकांचे त्यांनी दिग्दर्शनही केले. इंदुर येथे १९८७ मध्ये झालेल्या ६८ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. नाट्यपरिषदेच्या पुणे शाखेचेही ते अध्यक्ष होते. तर संस्कार भारतीचे ते महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदही त्यांनी भूषविले होते. त्यांना सिने आणि नाट्य अभिनयासाठी विविध पुरस्कार प्राप्त झाले होते. त्यात विष्णूदास भावे पुरस्कार, शासनाचा चिंतामणराव कोल्हटकर पुरस्कार, छ. शाहू पुरस्कार, अल्फा गौरव पुरस्कार, नानासाहेब फाटक जीवनगौरव पुरस्कार आदींचा समावेश आहे. मा.चित्तरंजन कोल्हटकर यांनी रंगात रंगलो मी हे आत्मकथनात्मक पुस्तक लिहिले आहे. मा.चित्तरंजन कोल्हटकर यांचे निधन २५ ऑक्टोबर २००९ रोजी झाले. आपल्या समूहातर्फे मा.चित्तरंजन कोल्हटकर यांना आदरांजली
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 16, 2017


  • वत्सला देशमुख

    वत्सला देशमुख या मराठी रंगभूमी तसंच चित्रपटातील अभिनेत्री असून हिंदी-मराठी चित्रपटांमधुन विविधांगी व चारित्र्य संपन्न अभिनेत्री तसंच सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या आहेत.

      June 4, 2014


  • ग्वाल्हेर घराण्याचे जेष्ठ गायक काशिनाथ बोडस

    काशिनाथ बोडस यांच्या घरातच गायनाची समृद्ध परंपरा होती. त्यांचा जन्म ४ डिसेंबर १९३५ रोजी झाला. तात्या उर्फ पं. काशिनाथ शंकर बोडस हे ग्वाल्हेर घराण्याचे गायन होते. काशीनाथ बोडस यांचे वडील पं. शंकर श्रीपाद बोडस व काका लक्ष्मणराव बोडस हे विष्णु दिगंबर पलुस्कर यांचे शिष्य होते.

    काशीनाथ बोडस हे सुरूवातीस तबल्या कडे आकर्षित झाले, पण नंतर त्यांनी गायन शिकण्यास आपल्या वडिलांकडून सुरवात केली. त्यांची गायन करण्याची शैली आपल्या वडिलांसारखेच होते. त्यांचे ख्याल, ताराना आणि भजन यावर प्रभुत्व होते. वीणा सहस्रबुद्धे या त्यांच्या भगीनी. वीणा सहस्रबुद्धे यांनी काशिनाथ बोडस यांना गुरू मानून त्यांनी गाणे शिकायला सुरुवात केली होती.

    पं. कुमार गंधर्व यांच्या गायन शैलीवर काशीनाथ बोडस यांचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या शिष्यात रंजणी रामचंद्रन, रचना बोडस, सुषमा वाजपेयी आणि मनु श्रीवास्तव यांचा समावेश आहे. काशिनाथ बोडस यांचे २० जुलै १९९५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
    काशिनाथ बोडस यांची अधिक माहिती असल्यास सांगावी.

      December 4, 2017