जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
देव आनंद यांचे मूळ नाव देवदत्त पिशोरीमल आनंद असे होते. त्यांचा जन्म २६ सप्टेंबर १९२३ रोजी झाला. बालपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. लाहोरच्या प्रसिद्ध सरकारी कॉलेजमध्ये १९४२ मध्ये इंग्रजी साहित्यात ग्रॅज्युएशन केले. याच कॉलेजमध्ये त्यांची ओळख बलराज साहनी, बी. आर. चोपडा, आणि खुशवंत सिंह या भविष्यात खूप मोठ्या झालेल्या व्यक्तींशी झाली.शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी लष्कराच्या सेन्सॉर ऑफिसमध्ये कारकून पदावर नोकरी सुरू केली. सैनिक आणि त्यांचे नातलग यांच्यातील पत्रव्यवहार तपासणे आणि पत्र योग्य पत्त्यावर लवकर पोहोचवण्याची व्यवस्था करणे हे त्यांचे काम होते. अल्पावधीतच नोकरी सोडून त्यांनी चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला. प्रभात कंपनीच्या हम एक है मधून चित्रपट सृष्टीतली कारकिर्द सुरू करणा-या देव आनंद यांना आधी मोठे अपयश पचवावे लागले. हम एक है आपटला. पुढे देव आनंद यांच्याच नवकेतन कंपनीचा अफसर हा चित्रपट देखील पडला. पण या अपयशाने न डगमगता चित्रपट सृष्टीत पाय रोवून उभ्या राहिलेल्या देव आनंद यांचा बाजी हा सिनेमा प्रचंड लोकप्रिय झाला. त्यानंतर उत्तरोत्तर देव आनंद यांनी अनेक छान चित्रपट दिले.
हम एक है, अफसर, बाजी, मुनीम जी, दुश्मन, कालाबाजार, सी. आय. डी., पेइंग गेस्ट, गॅम्बलर, तेरे घर के सामने, काला पानी, जाल, गाइड, तेरे मेरे सपने, छुपा रुस्तम, हरे रामा हरे कृष्णा, हिरा पन्ना, देश परदेस, लूटमार, स्वामी दादा, सच्चे का बोलबाला, अव्वल नंबर, हम दोनो आणि ज्वेल थीफ हे देव आनंद यांचे निवडक चित्रपट कायमच चर्चेचा विषय राहिले. देव आनंद यांची हम एक है चित्रपटाचे काम सुरू असतानाच गुरुदत्त यांच्याशी एक कॅमेरामन म्हणून ओळख झाली होती. पुढे ज्येष्ठ बंधू चेतन आनंद यांनी दिग्दर्शित केलेला अफसर चित्रपट पडल्यावर देव आनंद यांनी गुरुदत्त यांनाच दिग्दर्शकाच्या भूमिकेत आणले. नवकेतन कंपनीसाठी गुरुदत्त यांनी बाजी चित्रपटाचे दिग्दर्शन केले. हा सिनेमा हिट झाला. त्यानंतर गुरुदत्त यांनीच देव आनंदसाठी जाल चित्रपटाचे दिग्दर्शन केले. जाल चित्रपटानंतर मात्र गुरुदत्त यांनी फक्त स्वतःच्या कंपनीसाठी काम करण्याचा निर्णय घेतला आणि देव आनंद यांच्या नवकेतन कंपनीच्या चित्रपटांच्या दिग्दर्शनाची जबाबदारी विजय आनंद यांच्याकडे आली. देव आनंद यांचे धाकटे बंधू विजय आनंद यांनी काला बाजार, तेरे घर के सामने, छुपा रुस्तम या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. याच काळात देव आनंद आणि सुरय्या विवाहाची चर्चा सुरू झाली. चित्रपट सृष्टीत वावरणा-या देव आनंद यांनी अभिनय आणि चित्रपट निर्मिती सोबतच पटकथा लेखन करण्याचाही प्रयोग केला.
आंधिया, हरे रामा हरे कृष्णा , हम नौजवान, अव्वल नंबर, प्यार का तराना, गँगस्टर, मै सोलह बरस का, सेन्सॉर या चित्रपटांसाठी देव आनंद यांनीच पटकथालेखन केले. हिरा पन्ना, देश परदेस, लूटमार, स्वामी दादा, सच्चे का बोलबाला, अव्वल नंबर अशा निवडक चित्रपटांचे दिग्दर्शनही केले. अफसरच्या निमित्ताने देव आनंद-सुरय्या जोडी पहिल्यांदा पडद्यावर एकत्र दिसली होती. तेव्हापासूनच देव आनंद सुरय्याच्या प्रेमात होते. पुढे एका शूटिंगच्या वेळी नाव उलटली त्यावेळी देव आनंद यांनी बुडणा-या सुरय्या यांना वाचवले होते. त्यामुळे आता लवकरच विवाह सोहळा होणार असे वाटत होते. पण सुरय्या आजीने तीव्र विरोध केल्यामुळे हे लग्न झाले नाही. अखेर देव आनंद १९५४ मध्ये चित्रपट अभिनेत्री कल्पना कार्तिक हिच्याशी विवाहबद्ध झाले. देव आनंद यांनी अनेक नव्या अभिनेत्रींना चित्रपटसृष्टीत आणले. हरे रामा हरे कृष्णा मधून झीनत अमान चित्रपटसृष्टीत आली. टीना मुनीम, नताशा सिन्हा, एकता यांना देखील देव आनंद यांनी चित्रपटसृष्टीचे द्वार खुले करुन दिले.
संगीतप्रधान हिंदी चित्रपटांतून रंगवलेल्या त्यांच्या अनेक भूमिका लोकप्रिय ठरल्या. केसांचा महिरपी तुरा, गुलछबू आणि देखणी चेहरेपट्टी यांमुळे उठून दिसणार्या् त्यांच्या फॅशनदार व्यक्तिमत्त्वाने चित्रपटरसिकांच्या हृदयात स्थान मिळवले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे हॉलिवूड चित्रपटसृष्टीतील ग्रेगरी पेक या अभिनेत्याशी तुलना केली जाई. गीता बाली, वहिदा रेहमान, मधुबाला अशा अनेक नामवंत अभिनेत्रींसोबत त्यांनी अनेक चित्रपट केले. देव आनंद यांची अनेक गाणी गाजली. तू कहा ये बता, देखे रूठा ना करो, दिल का भवर करे पुकार, गाता रहे मेरा दिल, मै जिंदगी का साथ निभा था चला गया, दिन ढल जाये, छोड दा ऑँचल अशी अनेक गाणी प्रचंड गाजली. देव आनंद यांना काला पाला सिनेमासाठी बेस्ट अॅक्टर फिल्मफेअर पुरस्कार १९५० व गाइड सिनेमासाठी बेस्ट अॅक्टर, फिल्मफेअर पुरस्कार १९६५ साली मिळाला. देव आनंद यांना यांना दादासाहेब फाळके पुरस्कार व पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते. देव आनंद यांचे ३ डिसेंबर २०११ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
चैत्यन्याचा रुपेरी झरा अशा वैशिष्ट्याने पडद्यावर वावरलेल्या देव आनंद यांनी आपल्या अजरामर भूमिकांनी अनेक चित्रपट गाजवले. त्यातील सर्वोत्तम दहा चित्रपट.
१. गाईड (दिग्दर्शक विजय आनंद)
राजू गाईड(देव आनंद) व विवाहीत रोझी (वहिदा रेहमान) यांच्या ओळखीचे रुपांतर प्रेमात होते, पण हे प्रकरण खूप वेगळे वळण घेते. या चित्रपटातील देव आनंद यांचा अभिनय त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम सर्वोत्तम अभिनय ठरला. चित्रपटाच्या शेवटी त्याचा मृत्यू होतो असे दाखवण्यात आले आहे, हा देखील त्यांच्या कारर्किदीतील दुर्मिळ योग.
२. ज्वेल थीफ (दिग्दर्शक विजय आनंद)
देव आनंद यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रहस्यरंजक चित्रपट. आपण चित्रपटाच्या नायकावर( अर्थात देव आनंद) तोच गुन्हेगार असल्याचा संशय ठेवतो (हे दिग्दर्शकाचे कसब). चित्रपटाचा शेवट धक्कादायक. वैजयंती माला आणि अशोक कुमार महत्त्वाच्या भूमिकेत.
३. जॉनी मेरा नाम (दिग्दर्शक विजय आनंद)
देवचा सर्वोत्तम गुन्हेगारी पट. हेमा मालिनीशी त्याची जोडी छान शोभली. प्रेमनाथ, प्राण, पद्मा, रंधावा अशा कितीतरी कलाकारांनी हा मसालापट खुलवला. प्रत्येक गाण्यात देव आनंद यांचा मस्तच वापर करण्यात आला आहे.
४. तेरे घर के सामने (दिग्दर्शक विजय आनंद)
गाण्यांतून दिसणारा देव आनंद..अनुभवणाऱयांसाठी हा चित्रपट उत्तम! ‘एक घर बानाऊंगा तेरे घर के सामने’ असो वा ‘दिल का भंवर करे पुकार’ असो पडद्यावर गाणे कसे सजवायचे हे देव आनंद यांनी दाखवून दिले. अर्थात नूतन यांनीही तितक्याच ताकदीने योगदान दिले आहे.
५. तेरे मेरे सपने (दिग्दर्शक विजय आनंद )
सायकलवरचे एक मैने कसम ली असो अथवा जीवन की बगियाँ महकेगी असो मुमताजसोबतची देव यांची जोडी मस्त जमली. गाण्यातून दिसणारा देव आनंद हा देखील त्यांच्या व्यक्तीमत्त्व व अभिनयाच्या शैलीचाच प्रकार.
६. हरे राम हरे कृष्ण (दिग्दर्शक देव आनंद)
देवने प्रेम पुजारी पासून दिग्दर्शनात पाऊल टाकले, पण ठसा मात्र हिप्पी संस्कृतीवरील हरे राम..मध्येच उमटला. झीनत अमानची हिप्पी गर्ल खूपच धाडसी. काठमांडूच्या परिसराने विषय प्रवाभी ठरला.
७. देस परदेस (दिग्दर्शक देव आनंद)
विदेशात विशेषत: इंग्लंडमध्ये रोजगारासाठी जाणाऱया भारतीयांच्या वाट्याला नेमके काय येते? या विषयाची ‘देव’ शैलीत मांडणी.
८. हम दोनो (दिग्दर्शक अमरजीत)
देव आनंदची दुहेरी भूमिका. जोडीला साधना व नंदा, तर जयदेवच्या संगीतामुळे आणखी आकर्षण वाढले. मूळचा हा कृष्णधवल चित्रपट कालांतराने रंगीत स्वरुपात आला. देवने आपण नवीन चित्रपटाच्या तयारीत गुंतलो आहोत हा व्यक्त केलेला आशावाद सतत पुढेच पाहायचे ही त्याची वृत्ती दर्शवणारा होता.
९. वॉरंट (दिग्दर्शक प्रमोद चक्रवर्ती)
सत्तरच्या दशकातील तद्दन मसालापट. त्यात पन्नाशीपार देव आनंदचा झीनत अमानला उद्देशून केलेला ‘रुक रुक..रुक झाला हमसे दो बाते करके जाना, यह मौसम हे दिवाना’ हा आग्रह त्यालाच शोभला व देव आनंद यांनी रौप्य महोत्सवी यश संपादन केले.
१०. फंटूश (दिग्दर्शक चेतन आनंद)
दूखी मन मेरे सून मेरा कहना जहाँ नही चैना वहा नही रहना.. देवची भावूक मुद्रा व्यक्त करणारे हे सर्वकालीन लोकप्रीय गीत. याच चित्रपटात ‘ए मेरी टोपी पलट के आ’ गात सवयीने तो मोकळेपणाने वावरलाही. शैला रामाणी या चित्रपटात नायिका होत्या.
देव आनंद यांची रुपेरी वाटचाल खूपच मोठी आहे. प्रभातच्या हम एक है (१९४६) पासून नवकेतनच्या ‘जाना जा दिलसे दूर’पर्यंत (२०१० हा चित्रपट अप्रकाशीत) देव आनंद सतत खुलला. फुलला.
चार्जशीट(२०११) हा त्यांनी दिग्दर्शित केलेला व प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट..
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.लोकसत्ता
October 3, 2017
त्यांनी हृषीकेश मुखर्जी यांच्या १९७९ साली आलेल्या ‘गोलमाल’ या चित्रपटात्यांनी अमोल पालेकर यांच्या लहान बहिणीची भूमिका केली होती. पुढे या अभिनेत्री-निर्मात्याने नंतर अनेक टीव्ही मालिका तयार केल्या ज्यांनी तिला लोकप्रिय टीव्ही सेलिब्रिटी म्हणून प्रसिद्धी मिळवून दिली.
April 16, 2022
श्रीराम भिकाजी वेलणकर हे भारतीय टपालखात्याच्या ‘पिन कोड’ प्रणालीचे जनक होते.
April 14, 2017
अप्पा पेंडसे हे लाला लजपत राय यांच्या स्काउट दलात होते, भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या मुक्तेश्वर दलात १९३० मधे ते सामील झाले. १९३२ मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आले.
August 17, 2021
सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सुभाष गुप्ते हे कसोटी क्रिकेटमधील एक सर्वोत्कृष्ट लेग स्पिनर होते.
April 21, 2010
(1827 -1876)
यांचे मूळ गाव सातारा जिल्हयातील वाई जवळील बावधन. मुंबईच्या `इंदु प्रकाश` साप्ताहीकाच्या मराठी विभागाच्या संपादनाशी यांचे नाव निगडीत होते. तत्कालिन समाजातील कर्मठ, जूनाट, चालीरीतीं विरुध्द त्यांनी आपली मते निर्भिडपणे मांडली. बालविवाह, केशवपन, विधवापुनर्विवाह या विषयावर त्यांनी व्यक्त केलेल्या मतांनी खळबळ उडवुन दिली. ईश्वरचंद विद्यासागर यांच्या विधवा विवाह या ग्रंथाचा त्यांनी मराठी अनुवाद केला. आपल्या पहिल्या पत्नीच्या मृत्युनंतर त्यांनी 1874 मध्ये एका विधवेशी पुनर्विवाह केला होता.
March 11, 2015
त्यांनी दैवत कोशांची निर्मिती केली. जीवनसंग्राम, ताई अन् भाऊ, वटपत्र, राष्ट्रसेवकाची शिदोरी, राम बंधू त्याग सिंधू, उक्तीविशेष, साहित्य सरिता, अज्ञाताची वचने, वंदे मातरम, किशोर मित्रांनो, देवादिकांच्या गोष्टी, हनुमान कोश, श्रीराम कोश, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
June 25, 2022
(25 जुलै 1922 ते 27 सप्टेंबर 2002)
प्रा. वसंत बापट यांचा जन्म 1922 रोजी सातारा जिल्हयातील कह्राड येथे झाला. तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या स.प. महाविद्यालयात झाले. त्यानंतर `नॅशनल कॉलेज आणि `रामनारायण रूईया कॉलेज` हया महाविद्यायलयातुन मराठी व संस्कृत हया विषयाचे प्राध्यापक होते. 1974 पासून मुंबई विद्यापिठातील गुरूदेव रविंद्र टागोर अध्यासनाचे प्राध्यापक होते. साहित्य अकादमीचे सदस्य होते. प्रा. वसंत बापट हे स्वांतत्र्य चळवळीतही सहभागी झाले होते. 1942 च्या चलेजाव चळवळीत त्यांनी महत्त्वपूर्ण भुमिका बजावली होती. ऑगस्ट 1943 ते जानेवारी 1945 पर्यंत ते तुरूगांत होते. 1947 ते 1982 ते पर्यंत ते मुंबई विद्यापिठात ते प्राध्यापक होते. 1983 ते 1988 ते साधनाचे संपादक होते. राष्ट्रसेवा दलाशी ते सलंग्न होते. 1972 साली मुंबईत भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
लहानपणापासून बापटांवर राष्ट्रसेवा दलाचे आणि सानेगुरूजींच्या सहवासाचे संस्कार झाले. `बिजली` हया पहिल्या काव्यसंग्रहावर हया संस्काराचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. `अकरावी दिशा` , `सकीना` आणि `मानसी` हे त्यांचे बिजली नंतरचे काव्यसंग्रह होते. त्यांनी लहान मुलांसाठीही कविता लिहील्या.
प्रा. वसंत बापट यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.
मराठी कवी वसंत बापट (29-Jul-2017)
मराठीतील कवी वसंत बापट (17-Sep-2017)
ज्येष्ठ कवी वसंत बापट (17-Sep-2021)
June 8, 2015
गायिका पद्मा वाडकर यांचा जन्म १९ जून १९७२ रोजी झाला.
पद्मा वाडकर या मुळच्या केरळच्या आहेत. त्यांनीही अनेक गाणी गायली आहे. दहा वर्षाच्या असताना पद्मा या आचार्य जियालाल वसंत (सुरेशजी यांचे गुरु) यांच्या कडे गाणे शिकत होत्या. १९८५ मध्ये गुरुजींचे निधन झाल्यावर त्या सुरेशजींच्या संपर्कात आल्या. रूपारेल कॉलेज शिकत असताना कॉलेजला दांडी मारून त्या सुरेशजींच्या रियाझाला जात असत. त्या काळात त्या दोघांचे प्रेम जमले व सुरेश वाडकर यांनी १९८८ मध्ये पद्मजा वाडकर यांच्यासोबत लग्न केले.
या वाडकर दाम्प्त्याला दोन मुली असून जिया आणि अनन्या अशी त्यांची नावे आहेत.
पद्मा वाडकर यांचा 'मोरे पिया' अल्बम प्रसिद्ध आहे. यामध्ये सुरेश वाडकर आणि सोनू निगम यांचा सहभाग आहे.
झी टीव्हीवर प्रसारित झालेल्या ‘सा रे गा मा पा लिटिल चॅम्प्स’या प्रसिद्ध गायन रिॲलिटी स्पर्धेत त्यांनी परीक्षक म्हणून काम केले आहे.
त्या एक संगीत शिक्षिका असून आणि सुरेश वाडकर यांच्या अकादमीची सर्व धुरा सांभाळ आहेत त्या या अकादमीच्या उपप्राचार्य आहेत.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
June 21, 2022
अजीत हे हिंदी चित्रपट सृष्टीतील जुन्या पिढीतील प्रसिद्ध खलनायक अभिनेता होते. त्यांचे खरे नाव हामिद अली खान असे होते.
आज २२ आक्टोबर. प्रसिद्ध बॉलिवूड खलनायक अभिनेता अजीत यांची पुण्यतिथी. अजित यांचा जन्म २७ जानेवारी १९२२ रोजी झाला.
अजीत यांनी जंजीर सिनेमात सेठ धरम दयाल तेजा हे पात्र साकारले होते. अजीत या सिनेमातील मुख्य खलनायक होते. 'जंजीर'नंतर अजीत यांना खलनायकाच्या रुपात वेगळी ओळख मिळाली. खरं तर त्यांनी सिनेसृष्टीतील त्यांची एन्ट्री ही हीरोच्या रुपात झाली होती.
अजित यांचे अनेक डॉयलॉग प्रसिध्द आहेत.
मोना डार्लिंग, सारा शहर मुझे 'लायन' के नामसे जनता है, वाटस युवर प्रॉब्लम?, आई लास्ट मई ग्लासेस, स्मार्ट बॉय , हव वैरी इंटरेस्टिंग...
लिली डोंट बी सिली, मोना लूटलो सोना,
अजित यांचा कालीचरण मधील डायलॉग तर खूप गाजला होता.,तो म्हणजे "मै तुम्हे लिक्वीड ऑक्सीडजनमे रखुंगा. लिक्वीड तुम्हे जीने नही देगा, ऑक्सीतजन तुम्हे मरने नही देगा‘.
अजीत यांचे २२ ऑक्टोबर १९९८ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
October 22, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti