जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
नाना पाटेकर लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत
December 15, 2010
डॉ. आंबेडकर म्हणजे तळागळातील लोकांना बौद्धिक व समाजिक गुलामगिरीतून मुक्त करुन त्यांना मंत्र देणारे एक पथदर्शक होते. शिकल्याशिवाय आपल्यावरील न्याय, अन्याय, आपले हक्क ही आपल्याला कळत नाही अशा प्रकारे त्यांनी सामाजिक क्रांतीचे रणशिंग समाजात फुंकले.
April 14, 2022
मुनगंटीवार, सुधीर
सुधीर मुनगंटीवार यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी झालेली निवड म्हणजे भाजपच्या महाराष्ट्रातील महाजन-मुंडे यांच्या एकछत्री वर्चस्वाची अखेर, असाच स्पष्ट संकेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी दिला आहे. नितीन गडकरी यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली त्याच दिवशी सुधीर मुनगंटीवार यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्याचे संकेत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून स्पष्टपणे मिळालेले होते. त्यामुळे प्रसार माध्यमात जेव्हा प्रदेशाध्यक्षपदी ‘मुनगंटीवार की, देवेंद्र फडणवीस की, विनोद तावडे’, अशा बातम्या प्रकाशित होत होत्या तेव्हा या जाणत्यांची चांगलीच करमणूक होत होती.
आता सुधीर मुनगंटीवार आणि पुढील विधानसभा, तसेच लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होईल तेव्हा विनोद तावडे प्रदेशाध्यक्ष होतील, हे या जाणकारांना चांगले ठाऊक होते. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचे नुसतेच हाकारे काही रिकामटेकडे राजकारणी पिटत असताना महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी सुधीर मुनगंटीवार यांची निवड, हा काही केवळ राजकीय योगायोग नव्हता. या हाकाटीपासून मुनगंटीवार यांनी स्वत:ला कटाक्षाने दूर ठेवले आणि जेव्हा स्वतंत्र विदर्भाच्या संदर्भात मतप्रदर्शन करण्याची वेळ आली तेव्हा आक्रस्ताळेपणा दाखवला नाही की वचावचा वक्तव्येही केली नाहीत. हे जे राजकीय भान आणि सामंजस्य सुधीर मुनगंटीवार यांनी गेली साडेतीन-चार महिने सातत्याने दाखवले त्यामुळेच पुन्हा एखादा वैदर्भीयच प्रदेशाध्यक्षपदी आरूढ होण्याचा मार्गही आणखी सुकर झाला. केवळ याच एका कारणावरून देवेंद्र फडणवीस यांचे नाव मागे पडले आणि सुधीर मुनगंटीवार नावाच्या धडपडय़ा, कष्टाळू आणि वयाच्या पन्नाशीच्या उंबरठय़ावर असलेल्या, विलक्षण राजकीय आकलन असणाऱ्या अशा या नितीन गडकरींच्या विश्वासू कार्यकर्त्यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडली. व्यवस्थापनशास्त्रासह तीन पदव्या तसेच, तीन पदव्युत्तर पदव्या, अशी झळझळीत शैक्षणिक पाश्र्वभूमी असलेल्या आणि महाराष्ट्राच्या एका टोकावर असलेल्या चंद्रपूरसारख्या आदिवासी भागातला प्रसंगावधानी आणि राजकीय महत्त्वाकांक्षा असणारा कार्यकर्ता म्हणून सुधीर मुनगंटीवार यांची संपूर्ण विदर्भाला आणि बहुतांश महाराष्ट्राला ओळख आहे. विद्याथीदशेपासूनच चळवळीत असणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनी १९८१ मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश करून स्थानिक नेत्यांनी दिले ते काम अतिशय नेटाने सांभाळले. या निष्ठेने काम करण्याचे फळ म्हणून त्यांना १९८९ आणि ९१ अशा दोन लोकसभा निवडणुकींत उमेदवारीही मिळाली. काँग्रेसच्या ज्या शांताराम पोटदुखेंसारख्या तुल्यबळ उमेदवारांसमोर या दोन्ही निवडणुकींत मुनगंटीवार यांना पराभव स्वीकारावा लागला तेच शांताराम पोटदुखे आज सुधीर मुनगंटीवार यांच्या राजकीय कर्तृत्वाचे कौतुक मुक्तकंठाने करतात. हे जसे पोटदुखे यांचे मोठेपण आहे, तसेच राजकारणापुरते राजकारण आणि विकासाबाबत व्यापक दृष्टिकोन, वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठांबद्दल आदर, या मुनगंटीवार यांच्या कामाच्या त्रिसूत्रीचे हे यश आहे. या गुणांसोबत व्यापक जनसंपर्क, त्याला प्रभावी वक्तृत्वाची जोड आणि विकासाची तळमळ, असे अनेक पदरही लाभलेले आहेत. मतदारसंघातली कामे करत असताना केवळ आर्थिकदृष्टय़ा बडय़ा किंवा मध्यमवर्गीय मतदारांवरच मुनगंटीवार यांनी लक्ष केंद्रित केले नाही. धडधाकटांसोबतच अंध, अपंग, दीनदुबळय़ांना सुधीर मुनगंटीवार हक्काचा आधार वाटतात. त्यामुळेच मुनगंटीवारांचे वाहन चंद्रपुरातून जात असले की, ‘सुधीरभाऊ’ अशी हाक गल्लीच्या कोणत्याही कोपऱ्यातून हक्काने येते आणि मुनगंटीवार रस्त्यात थांबून त्या माणसाला दिलासा देतात, असे मतदारांशी मुनगंटीवारांचे प्रामाणिक नाते आहे. १९९५ पासून सलग चार विधानसभा निवडणुकींत सुधीर मुनगंटीवार विजयी झाले. मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांशी जोडली गेलेली नाळ किती अतूट आहे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुनगंटीवार यांचे हे सलग चार विजय आहेत. प्रदेशाध्यक्षपद म्हणजे आजवरच्या स्वच्छ आणि निष्ठापूर्वक केलेल्या कामाचे मुनगंटीवार यांना मिळालेले फळ आहे.
August 5, 2017
मुंबई महापालिकेत नगरसेवक ते महापौर…… पुढे विरोधी पक्षनेता ते थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री….नंतर खासदार, केंद्रिय मंत्री आणि उल्लेखनीय म्हणजे लोकसभा अध्यक्ष. यशाची अशी सतत चढती कमान असलेले मनोहर जोशी हे एक कल्पक नेतृ़त्व.
September 3, 2010
प्रसाद सावकार यांचा जन्म १४ डिसेंबर १९२८ बडोदे येथे झाला.
प्रसाद सावकार यांचे पूर्ण नाव सांबप्रसाद रघुवीर सावकार. गोमंतकीय संगीत रंगभूमीवरील नामवंत सावकार घराण्यात त्यांचे वडील रघुवीर सावकार हे स्त्रीभूमिकांसाठी प्रसिद्घ असलेले गायक-नट होते व ते ‘रंगदेवता’ या पदवीने ओळखले जात.
वडिलांच्या ‘रंगबोधेच्छु नाट्यसमाज’ या नाट्यसंस्थेत प्रसाद सावकारांचा बालपणापासूनच वावर असल्याने त्यांच्यावर लहानवयातच नाटक प्रसाद सावकार व संगीत यांचे संस्कार होत गेले. गायन-अभिनयाचे प्राथमिक धडे त्यांना वडिलांकडूनच मिळाले. संशयकल्लोळ नाटकात त्यांनी वडिलांबरोबर कृत्तिकेची भूमिका केली. एवढेच नव्हे, तर ह्याच नाटकात कृत्तिका, साधू, जलशातील गायक व वैशाख शेठ अशा चार भूमिका एकाच वेळी करून त्यांनी एक विक्रमच केला. गोपीनाथ सावकारांच्या ‘कलामंदिर’ संस्थेच्या सौभद्र, मृच्छकटिक, विद्याहरण, मानापमान अशा नाटकांतून त्यांनी सुरुवातीला काही भूमिका केल्या, तसेच हौशी रंगभूमीवर करीन ती पूर्व इ. नाटकांतूनही कामे केली. मो. ग. रांगणेकरांच्या ‘नाट्यनिकेतन’ संस्थेच्या रंभा कुलवधू, कोणे एके काळी, एक होता म्हातारा या नाटकांतून त्यांनी विविध भूमिका साकारल्या. लग्नाची बेडी या नाटकातील त्यांची ‘गोकर्णा’ची भूमिका उल्लेखनीय होती. पेडगावचे शहाणे, गोरा कुंभार अशा मोजक्या चित्रपटांतूनही त्यांनी भूमिका केल्या.
१९६० ते १९७२ या काळात मराठी रंगभूमीवर संगीत नाटक परंपरेचे पुनरुज्जीवन घडून आले. या काळात नाट्यसंगीताला नवसंजीवन देणाऱ्या प्रमुख गायक-नटांमध्ये प्रसाद सावकार हे अग्रणी होते. १९६० मध्ये विद्याधर गोखले यांची दोन संगीत नाटके–पंडितराज जगन्नाथ व सुवर्णतुला लागोपाठ रंगभूमीवर आली. या दोन नाटकांनी मराठी संगीत रंगभूमीचे नवे पर्व सुरू झाले आणि प्रसाद सावकारांनी गायिलेली त्या नाटकांतील पदे संस्मरणीय ठरली. विशेषतः पंडितराज जगन्नाथ या नाटकातील वसंत देसाईंच्या संगीत-दिग्दर्शनाखाली प्रसाद सावकारांनी (भूमिका पं. जमनलाल) गायिलेली ‘जय गंगे भागिरथी’ व ‘सावन घन गरजे’ ही नाट्यपदे खूपच लोकप्रिय झाली. ‘जय गंगे’ने तर लोकप्रियतेचा कळस गाठला व प्रसाद सावकारांना श्रेष्ठ गायक-नट असा लौकिक मिळवून दिला. त्यांनी सुवर्णतुला नाटकात कृष्णाची भूमिका केली आणि ‘रतिहून सुंदर’ व ‘रागिणी मुख’ ही पदे गायिली. यानंतर विद्याधर गोखले यांच्या मंदारमाला नाटकात त्यांनी ‘मदनगोपाळ’ ही व्यक्तिरेखा साकारली व राम मराठे यांच्याबरोबर ‘बसंत की बहार’ ही जुगलबंदी गायिली. तसेच विद्याधर गोखले यांच्या जय जय गौरीशंकर या नाटकात ‘ श्रृंगी’ची भूमिका केली. त्यातील त्यांनी गायिलेली ‘ भरे मनात सुंदरा’ व ‘नारायणा रमारमणा’ ही नाट्यपदेही लोकप्रिय झाली. यानंतर त्यांनी पुरुषोत्तम दारव्हेकरांच्या कट्यार काळजात घुसली या नाटकात ‘सदाशिव’ची भूमिका साकारून पं. जितेंद्र अभिषेकींसमवेत ‘घेई छंद’ हे पद गायिले. पुरुषोत्तम दारव्हेकरांच्या घनश्याम नयनी आला या नाटकात त्यांनी गायिलेल्या दोन गीतांची ध्वनिमुद्रिका निघाली. मधुसूदन कालेलकरांच्या तो राजहंस एक या नाटकात त्यांनी कृष्णाची भूमिका साकारली. अमृत मोहिनी, अवघा रंग एकची रंग ही त्यांच्या भूमिका असलेली अखेरची नाटके होत. त्यांचा आवाज भरदार व श्रवणमधुर, वाणी स्वच्छ व शुद्ध आणि गायकीत आवश्यक त्या करामती, ताना व हरकती असल्याने त्यांच्या गाण्यांची श्रोत्यांवर सहज छाप पडते. छोटा गंधर्व यांना त्यांनी श्रवणगुरू मानले.
त्यांना अनेक मानसन्मान लाभले: पद्मश्री, अ. भा. मराठी नाट्यपरिषदेचे बालगंधर्व सुवर्णपदक, संगीतभूषण राम मराठे स्मृतिपुरस्कार, गोवा शासनाचा कलावंत पुरस्कार, दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, गोमंतक मराठी अकादेमीच्या दीनानाथ स्मृतिप्रतिष्ठानतर्फे लता मंगेशकर पुरस्कार इत्यादीचा त्यात समावेश होतो.
आपल्या समुहा तर्फे. प्रसाद सावकार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
December 14, 2021
खाँसाहेब कधीकधी फिरायला जाताना भाऊंना घेऊन जात. फिरता फिरता त्यांचे काही अनुभव, कधी उपदेश, कधी त्या दिवशी भाऊंचा ऐकलेला रियाज यावर टिप्पणी करून खाँसाहेब सूचना करीत. ते दिवस भाऊंनी हृदयात जपून ठेवले होते. खाँसाहेब आणि त्यांचं कुटुंब हे भाऊंनी जन्मभर पुण्य मानलं.
July 2, 2022
ठाण्याचे माजी महापौर पुढे अनेक महत्त्वाच्या पदांवर आणि खासदार असा सतिश प्रधान यांचा आजवरचा राजकीय प्रवास झाला आहे. १९६६ साली शिवसेना या पक्षाची स्थापना झाल्यापासून सतिश प्रधान संघटनेत सक्रिय होते. १९६७ साली ठाण्यात भगवा फडकल्यानंतर नगराध्यक्षपदावर वसंतराव मराठे यांची निवड झाली. पण काही कारणास्तव मराठे पक्षापासून बाजूला झाल्यानंतर प्रधानांची वर्णी नगराध्यक्षपदावर झाली. त्याच काळात संघटना बळकड व संपूर्ण जिल्ह्यात रुजविण्यासाठी प्रधानांनी प्रचंड मेहनत घेतली. तलासरी, जव्हार, मोखाडा या भागातल्या कम्युनिस्टांशी शिवसेनेने अनेकदा दोन हात केले. पूर्वी राज्य सरकारचे सर्व जीआर इंग्रजीतून पाठविले जात. १९७४ साली प्रधानांनी या इंग्रजी जीआरला कडाडून विरोध करत ते मराठीत पाठवा नाही तर उग्र आंदोलन करू असा इशारा सरकारला दिला. त्यानंतर नमलेल्या राज्य सरकारने मराठीत जीआर काढण्यास सुरवात केली. १९८२ साली ठाणे महापालिकेची स्थापना झाल्यानंतर प्रधान ठाण्याचे पहिले महापौर झाले. त्या दिवसापासून या जिल्ह्याच्या सांस्कृतिक पालटाला खर्या अर्थाने सुरूवात झाली. प्रत्येक गोष्टीचे प्रगतीशील परिवर्तन करणे हा त्यांचा खाक्या होता. सतिश प्रधानांनी ठाण्याला नवे बदल स्वीकारण्यास प्रवृत्त केले होते व त्यासाठी आवश्यक असलेल्या प्रशस्त वास्तूंची निर्मिती झाली. गडकरी रंगायतन व दादोजी कोंडदेव क्रीडा सभागृह ही त्याची बोलकी उदाहरणे आहेत. सांस्कृतिक विकासाद्वारेच त्यांनी लहान मुलांवर मैदानी संस्कार करण्याच्या हेतुने, ठाणे मॅरॅथॉन स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली. विधानसभेच्या निवडणूकीत पराभव पदरी पडल्यानंतर शिवसेनेने त्यांना दोन वेळा राज्यसभेवर पाठविले होते.
२००४ विधानसभा निवडणुकीत आमदारकीची निवडणुक न लढऊ दिल्यामुळे, प्रधानांनी शिवसेनेला कायम जय महाराष्ट्र करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये ही मान मिळेनासा झाल्याने प्रधानांनी मनसेची वाट धरली.
या पक्षातले सर्वात जेष्ठ नेता असल्याने राज त्यांना मानाने वागवत होते. परंतु, पुन्हा विधानसभा निवडणूक लढविण्याच्या आशेने त्यांचा घात केला. राजन राजेंना तिकिट मिळाल्याने नाराज झालेल्या प्रधानांनी मनसेलाही सोडचिठ्ठी दिली.
January 12, 2015
चिमोटे, (पं.) मनोहर
भारतीय संगीतात वाद्यसंगीताचे एक स्वतंत्र आणि समृद्ध असे दालन आहे. वाद्यांमधून अभिजात संगीताचा संपन्न अनुभव देऊ शकणाऱ्या प्रतिभासंपन्न कलावंतांची खाणच भारतात गेल्या काही शतकांमध्ये निर्माण होत आलेली आहे. भारतीय संगीताच्या अभिव्यक्तीसाठीच्या वाद्यांबरोबरच परदेशातून आलेल्या रीड ऑर्गन (पायपेटी) किंवा हार्मोनिअम या वाद्यांनी भारतीय संगीतात गेल्या दोन शतकांच्या काळात भरीव कामगिरी केली आहे.
ब्रिटिश राजवटीत आलेल्या या वाद्यांचे भारतीयीकरण करून त्यांना आपल्या संगीतात इतक्या सहजपणे मिसळवून टाकण्याची किमया येथील कलावंतांनी अशी काही करून दाखवली, की परदेशीयांना हे वाद्य आपलेच आहे काय, अशी शंका यावी. पंडित मनोहर चिमोटे हे असे एक अव्वल दर्जाचे हार्मोनियम वादक होते. हार्मोनियम या मूळ वाद्याची जवळीक अॅकॉर्डियन, ऑर्गन या वाद्यांशी असली, तरीही तिची निर्मिती भारतीय संगीतासाठी नव्हती. चिमोटे यांनी पन्नास वर्षांपूर्वी तिला भारतीय रुपडे चढवले आणि तिला येथील संगीताच्या दरबारात मानाचे स्थान मिळवून दिले. हार्मोनियमचे आगमन होण्यापूर्वीच्या काळात गायनाची संगत करण्यासाठी सारंगी हे तंतुवाद्य उपयोगात येत असे. वादकांच्या कर्तृत्वाने हार्मोनियमने गायनाच्या साथीचे वाद्य म्हणून प्रवेश केला आणि आता ते वाद्य भारतीय संगीताच्या मैफलीतील एक अविभाज्य घटक बनले आहे. पंडित चिमोटे यांनी परदेशी बनावटीच्या स्वर निर्माण करणाऱ्या स्वरपट्टय़ांवर भारतीय स्वरांचे केलेले आरोपण फारच यशस्वी झाले. गंधार हा स्वर भारतीय संगीतातील एक स्वयंभू स्वर समजला जातो. गंधाराच्या स्वरावर आधारित त्यांनी तयार केलेल्या हार्मोनियमचे नावही आपोआप ‘संवादिनी’ असे झाले आणि मग ती भारतीयच होऊन गेली. चिमोटे यांचा जन्म नागपूरचा आणि कर्मभूमी मुंबई. लहानपणी पंडित भीष्मदेव वेदी या प्रख्यात वादकाकडून त्यांनी हार्मोनियम वादनाचे धडे घेतले आणि मग त्यावर स्वप्रतिभेने नवनवीन प्रयोग केले. भारतातील अनेक दिग्गज कलावंतांबरोबर त्यांनी मैफलींमध्ये साथ केली होती. जेव्हा हे वाद्य स्वतंत्रपणे संगीत निर्माण करू शकते असा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला, तेव्हा त्यांनी साथ करणे बंद केले आणि त्यानंतर केवळ स्वतंत्रपणे संवादिनीचे एकलवादन करण्यासाठीच आपले आयुष्य व्यतीत केले. मैफलीत गायकाच्या बाजूला असणारे हे वाद्य तिच्या मध्यभागी आणण्याचे श्रेय पंडित चिमोटे यांना द्यायला हवे. भारतातल्या सगळ्या संगीत महोत्सवात त्यांच्या संवादिनी वादनाने रसिकांची वाहवा मिळवली. ‘सूरमणी’, राज्य शासनाचा पुरस्कार, आदर्श संगीत शिक्षक पुरस्काराने त्यांना सन्मानित केले गेले. त्यांनी विद्यादानाचे जे मोठे कार्य केले, त्यामुळे अनेक युवक संवादिनी वादनाकडे वळू लागले. व्हायोलिन, सतार, बासरी या वाद्यांबरोबर संवादिनीची जुगलबंदी घडवणारे चिमोटे हे एकमेव कलाकार होते. त्यांच्या निधनाने संगीताच्या क्षेत्रात स्वकर्तृत्वाने झळाळणाऱ्या एका विद्वान कलावंताचा अस्त झाला आहे.
पंडित मनोहर चिमोटे
भारतीय संगीतात वाद्यसंगीताचे एक स्वतंत्र आणि समृद्ध असे दालन आहे. वाद्यांमधून अभिजात संगीताचा संपन्न अनुभव देऊ शकणाऱ्या प्रतिभासंपन्न कलावंतांची खाणच भारतात गेल्या काही शतकांमध्ये निर्माण होत आलेली आहे. भारतीय संगीताच्या अभिव्यक्तीसाठीच्या वाद्यांबरोबरच परदेशातून आलेल्या रीड ऑर्गन (पायपेटी) किंवा हार्मोनिअम या वाद्यांनी भारतीय संगीतात गेल्या दोन शतकांच्या काळात भरीव कामगिरी केली आहे.
ब्रिटिश राजवटीत आलेल्या या वाद्यांचे भारतीयीकरण करून त्यांना आपल्या संगीतात इतक्या सहजपणे मिसळवून टाकण्याची किमया येथील कलावंतांनी अशी काही करून दाखवली, की परदेशीयांना हे वाद्य आपलेच आहे काय, अशी शंका यावी. पंडित मनोहर चिमोटे हे असे एक अव्वल दर्जाचे हार्मोनियम वादक होते. हार्मोनियम या मूळ वाद्याची जवळीक अॅकॉर्डियन, ऑर्गन या वाद्यांशी असली, तरीही तिची निर्मिती भारतीय संगीतासाठी नव्हती. चिमोटे यांनी पन्नास वर्षांपूर्वी तिला भारतीय रुपडे चढवले आणि तिला येथील संगीताच्या दरबारात मानाचे स्थान मिळवून दिले. हार्मोनियमचे आगमन होण्यापूर्वीच्या काळात गायनाची संगत करण्यासाठी सारंगी हे तंतुवाद्य उपयोगात येत असे. वादकांच्या कर्तृत्वाने हार्मोनियमने गायनाच्या साथीचे वाद्य म्हणून प्रवेश केला आणि आता ते वाद्य भारतीय संगीताच्या मैफलीतील एक अविभाज्य घटक बनले आहे. पंडित चिमोटे यांनी परदेशी बनावटीच्या स्वर निर्माण करणाऱ्या स्वरपट्टय़ांवर भारतीय स्वरांचे केलेले आरोपण फारच यशस्वी झाले. गंधार हा स्वर भारतीय संगीतातील एक स्वयंभू स्वर समजला जातो. गंधाराच्या स्वरावर आधारित त्यांनी तयार केलेल्या हार्मोनियमचे नावही आपोआप ‘संवादिनी’ असे झाले आणि मग ती भारतीयच होऊन गेली. चिमोटे यांचा जन्म नागपूरचा आणि कर्मभूमी मुंबई. लहानपणी पंडित भीष्मदेव वेदी या प्रख्यात वादकाकडून त्यांनी हार्मोनियम वादनाचे धडे घेतले आणि मग त्यावर स्वप्रतिभेने नवनवीन प्रयोग केले. भारतातील अनेक दिग्गज कलावंतांबरोबर त्यांनी मैफलींमध्ये साथ केली होती. जेव्हा हे वाद्य स्वतंत्रपणे संगीत निर्माण करू शकते असा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला, तेव्हा त्यांनी साथ करणे बंद केले आणि त्यानंतर केवळ स्वतंत्रपणे संवादिनीचे एकलवादन करण्यासाठीच आपले आयुष्य व्यतीत केले. मैफलीत गायकाच्या बाजूला असणारे हे वाद्य तिच्या मध्यभागी आणण्याचे श्रेय पंडित चिमोटे यांना द्यायला हवे. भारतातल्या सगळ्या संगीत महोत्सवात त्यांच्या संवादिनी वादनाने रसिकांची वाहवा मिळवली. ‘सूरमणी’, राज्य शासनाचा पुरस्कार, आदर्श संगीत शिक्षक पुरस्काराने त्यांना सन्मानित केले गेले. त्यांनी विद्यादानाचे जे मोठे कार्य केले, त्यामुळे अनेक युवक संवादिनी वादनाकडे वळू लागले. व्हायोलिन, सतार, बासरी या वाद्यांबरोबर संवादिनीची जुगलबंदी घडवणारे चिमोटे हे एकमेव कलाकार होते. त्यांच्या निधनाने संगीताच्या क्षेत्रात स्वकर्तृत्वाने झळाळणाऱ्या एका विद्वान कलावंताचा अस्त झाला आहे.
August 5, 2017
कुमार गंधर्व नावाची ही जादूच अशी आगळीवेगळी होती. त्यांचे मूळ नाव शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकली. त्यांचा जन्म ८ एप्रिल १९२४ साली बेळगावजवळच्या सुळेभावी खेड्यात कानडी कुटुंबात झाला. लहान वयातच त्यांनी आपल्या गायकीची चमक दाखवली. आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीने त्यांनी रसिकांवर अक्षरशः गारुड केले. घराणेशाहीच्या चौकटीत बंदिस्त व्हायला त्यांनी साफ नकार दिला. त्याऐवजी आपली स्वतःची गानशैली जनमानसात रुढ केली. ‘कुमार गंधर्व’ ही पदवी गुरुकल्ल मठाचे स्वामी यांनी त्यांना वयाच्या सातव्या वर्षी दिली. त्यांचे वडीलही गायक होते. जन्मापासून रुजत असलेल्या संस्कारांमुळे वयाच्या सहाव्या वर्षी एकदम गाऊच लागले.
१९३६ सालच्या अलाहाबादच्या अखिल भारतीय संगीत परिषदेतील गायनाने एकदम प्रसिद्धी मिळून त्यांच्यावर बक्षिसे व पदके यांचा वर्षाव झाला. १९४० च्या दशकात पंडित बी. आर. देवधर यांचे शिष्यत्व त्यांनी स्वीकारले. त्यावेळीच कुमारजींच्या नावाचा दबदबा भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रात निर्माण झाला. एप्रिल १९४७ मध्ये भानुमती कंस यांच्याशी कुमारजींचा विवाह झाला आणि ते मध्य प्रदेशातील देवासमध्ये स्थायिक झाले. त्याचवेळी काळाने त्यांच्यावर आकस्मिक आघात केला. त्यांना टीबीची बाधा झाली. या दुखण्याने त्यांची फुफ्फुसे खालसा केली. असं म्हणतात की, या दुखण्यात त्यांचं एक फुफ्फुस कायमस्वरुपी निकामी झालं. पत्नी भानुमती यांनी याकाळात त्यांची सेवाशुश्रुषा केली. त्या आधी देवधरबुवांकडे आणि नंतर कुमारजींकडेच गाण्याचे शिक्षण घेत होत्या. त्यांच्याच मदतीने पंडितजी आजारातून बरे झाले आणि १९५३ मध्ये आजारानंतरची त्यांची पहिली मैफल रंगली. परंतु या दुखण्याने त्यांच्या स्वरराज्याला चांगलाच हादरा दिला होता.
१९६१ मध्ये बाळंतपणात पत्नी भानुमतीचे निधन झाले. त्यानंतर कुमारजींनी वसुंधरा श्रीखंडे यांच्याशी विवाह केला. त्याही देवधरबुवांच्या शिष्या होत्या. कुमारजी आणि वसुंधराबाईंची कन्या कलापिनी ही अनेकदा गाण्याच्यावेळी तानपु-यावर त्यांना साथ द्यायची. माळव्याची लोकगीतं, निर्गुणी भजन , नवरागनिर्मिती यांवर कुमारजींचा मोठा व्यासंग होता. कुमारजींची लोकप्रियता अफाट होती. संगीतातील जाणकार मंडळी त्यांच्या गायकीवर जीव ओवाळून टाकायची. त्यामध्ये महाराष्ट्रीय मंडळींची संख्या मोठी होती. पुणे आणि मुंबईच्या उपनगरातील रसिकांच्या हृदयावर कुमारजींनी अधिराज्य गाजवले. याचठिकाणी त्यांच्या गाण्याच्या मैफली रंगायच्या. चेंबूरसारख्या परिसरात शाळांमध्ये त्यांच्या मैफली व्हायच्या. अगदी फुकट. खरेखुरे संगीताचे दर्दी या मैफलींना हजेरी लावायचे आणि कुमारजींच्या गाण्याची हरएक तान कानात जपून ठेवायचे. कुमार गंधर्वांनी ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर, भेंडीबाजार वगैरे सर्व घराण्यांचे सार काढून नवीनच गायकी निर्माण केली.
माळवी लोकगीतांचा विशेष अभ्यास करून त्यांवर आधारित असे ‘गीत वर्षा’, ‘गीत हेमंत’, ‘गीत वसंत’ इ. कार्यक्रम सादर केले व संगीताला एक नवीनच क्षेत्र उपलब्ध करून दिले. १९६५ साली अनुपरागविलास हा नव्या- जुन्या रागांत स्वत: बांधलेल्या बंदिशींचा संग्रह प्रसिद्ध केला. सूरदास, कबीर, मीराबाई यांच्या पदांच्या गायनाचे कार्यक्रम व खास माळवी लोकगीतांच्या मैफली त्यांनी केल्या.
कुमार गंधर्वांची गायकी चित्रित करण्यासाठी एकदा जब्बार पटेल कॅमेरा घेऊन आले. मधु लिमये आणि ज्येष्ठ साहित्यिक विंदा करंदीकर त्यावेळी उपस्थित होते. मैफलीत कॅमेरा पाहून कुमारजींना आश्चर्य वाटले. पंडितजींनी जब्बारना विचारले , कॅमेरात किती मोठा रोल आहे ? थोडक्यात किती वेळाचे गाणे चित्रित करायचे आहे ? जब्बार यांनी सांगितले , पावणे चार मिनिटे. एका चीजेसाठी पावणे चार मिनिट म्हणजे फारच अवघड काम. पण पंडितजींनी घड्याळ लावले आणि सांगितले सुरू करा चित्रीकरण. त्यांनी तराणा सुरू केला. समा बांधली आणि बरोबर २२५ सेकंदात समेवर येऊन गाणे संपविले. भारत सरकारने १९९० साली कुमारजींना पद्म विभूषण पुरस्कार देऊन गौरव केला होता. त्यांचे पुत्र मुकुल शिवपुत्र आणि कन्या कलापिनी कोमकली हे दोघेही गायक आहेत. त्यांच्या कन्या कलापिनी कोमकली आणि रेखा इनामदार-साने यांनी संपादित केलेल्या 'कालजयी कुमार गंधर्व' या ग्रंथात कुमार गंधर्व यांची प्रयोगशीलता आणि वैचारिकता यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पहिला खंड मराठीमध्ये असून, दुसरा खंड हिंदी आणि इंग्रजी असा द्वैभाषिक आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या ४५ मान्यवरांचे लेख, कविता आणि मुलाखतींचा या ग्रंथात समावेश आहे. प्रसिद्ध गायक आणि विश्लेषकांनी कुमार गायकीचं मर्म उलगडून दाखवलं आहे. प्रसिद्ध छायाचित्रकार रघु राय, अविनाश पसरिचा आणि कोमकली कुटुंबियांच्या संग्रहातील दुर्मिळ छायाचित्रंही ग्रंथाच्या दोन्ही खंडात समाविष्ट करण्यात आली आहेत. मा.कुमार गंधर्व यांचे १२ जानेवारी १९९२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 12, 2018
दत्तो वामन पोतदार हे मराठी इतिहासकार, लेखक व वक्ते होते.
December 15, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti