(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ‘द’त्तू ‘फ’डकर : ‘द’मदार ‘फ’र्जंद

    कपिलदेव हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातला सर्वोत्कृष्ट महान अष्टपैलू खेळाडू मानला जातो, आणि त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली कामगिरी ही मान्यता सिद्धही करते. परंतु कपिलच्या ३० वर्षं आधी भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर असा एक तारा चमकून गेला, ज्याने काही काळ आपल्या जबरदस्त अष्टपैलू कामगिरीने क्रिकेटजगताला आपली नोंद घ्यायला लावली. हा मराठमोळा तारा म्हणजे १२ डिसेंबर १९२५ ला जन्मलेला कोल्हापूरचा रांगडा गडी ‘दत्तात्रय गजानन ‘उर्फ’ दत्तू फडकर’.

      December 11, 2025


  • गझल सम्राट – मदन मोहन

    हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णयुगात  एस डी बर्मन, नौशाद, ओ पी नय्यर, शंकर जयकिशन, रोशन, रवी, सी रामचंद्र,खय्याम आदि अनेक मातब्बर संगीतकार आपल्या एका पेक्षा एक सुंदर आणि श्रवणीय रचनांनी रसिकांना तृप्त करीत होते. अशा स्पर्धेच्या  काळात हिंदी चित्रपट संगीत क्षेत्रात आपल्या अनोख्या संगीताचा ठसा उमटवणे सोपे नव्हते. अशा स्पर्धेच्या युगात मदन मोहन यांनी आपली संगीतकाराची कारकीर्द सुरु केली आणि अल्पावधीतच त्यांनी आपल्या अनोख्या अशा  संगीत रचनांनी रसिकांचे लक्ष वेधून घेतले. एक प्रथितयश संगीतकार म्हणून अल्पावधीत त्याचं नाव मोठ्या आदराने घेतलं जाऊ लागलं…..

      June 22, 2020


  • संगीतकार रवींद्रनाथ टागोर

    ब्राह्मो पंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म ७ मे १८६१ रोजी झाला.

    रवींद्रनाथ टागोर यांना गुरुदेव असे ही संबोधले जाते, १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात व २०व्या शतकाच्या प्रारंभी रवींद्रनाथाच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व बंगाली संगितात एक आमूलाग्र बदल घडून आला. रवींद्रनाथ हे भारताचे व आशियाचे पहिले नोबेल विजेते होत.

    बंगाली साहित्याची रवींद्रपूर्व व रवींद्रोत्तर अशी विभागणी करण्यात येते; यावरून बंगाली साहित्यावरील रवीन्द्रनाथांचा प्रभाव लक्षात आपल्याला लक्षात येतो. कोलकात्याच्या पिराली ब्राह्मण कुटुंबात जन्म झालेल्या रवीन्द्रनाथांनी प्रथम कविता वयाच्या ८ व्या वर्षी लिहिली.

    वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी भानुसिंह या टोपणनावाने ब-याचशा कविता लिहिल्या. शांतीनिकेतनाची उभारणी, विस्तृत व उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती व रवीन्द्रसंगीताचे सृजन हे रवीन्द्रनाथांचे प्रमुख जीवनकार्य होय. रवीन्द्रनाथांनी रचलेली जन गण मन व आमार शोनार बांग्ला ह्या रचना अनुक्रमे भारत व बांगलादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत.

    दोन राष्ट्रगीतांचे जनकत्व असलेले रवीन्द्रनाथ हे जगातील वरील एकमेव कवी आहेत. पारंपारिक शिक्षण केवळ पोपटपंची शिकवते या विचारातून शांतिनिकेतनाचा क्रांतिकारक प्रयोग त्यांनी राबवला. रविंद्रनाथकालीन भारतामध्ये सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक चळवळींचे प्रमुख केन्द्रांपैकी एक असलेल्या महाराष्ट्राचा प्रभाव रवींद्रनाथांवरही पडला होता. संत तुकारामांच्या साहित्याचा त्यांनी अभ्यास केला होता.

    संत तुकारामांचे काही अभंग त्यांनी बंगाली भाषेत अनुवादित केले आहेत. ७ ऑगस्ट १९४१ रोजी रवींद्रनाथांचे निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

      August 7, 2021


  • संत ब्रम्हानंद

    महाराष्ट्राच्या सन्त परंपरेला महाराष्ट्रेतर प्रदेशचं वावडं नव्हतं, हे आपल्याला संत नामदेवांच्या काळापासून माहित आहे. विश्वात्मकता हे सन्तांच्या विचारसरणीचं अधिष्ठान होतं व त्यांच्या तत्त्वज्ञानानून व साहित्यातून तीच प्रतिबिम्बित झाली आहे.

    महाराष्ट्रातील नागेश सम्प्रदायाची सन्त परंपरा केवळ महाराष्ट्रात आढळत नाही तर ती कर्नाटकातही आढळते. बेळगावच्या वाटेवरील हत्तरगी हे गाव कर्नाटकात आहे. तेथील आधुनिक संत हरिकाका गोसावी ह्यांची परंपरा संत एकनाथांपासून आहे. रामदास स्वामींच्या संप्रदायाची व शिष्यांची परंपरा केवळ महाराष्ट्रा आढळत नाही तर मध्य भारतात व दक्षिण भारतातही आढळते. संतांना नि त्यांच्या परंपरेला भूगोलाच्या सीमा रेषांचं कसं असेल ?

    गोंदवलेकरांच्या शिष्यपरंपरेचा फारसा विचार महाराष्ट्राच्या वाड्मयेतिहासात झाला नाही. तो करुन देणं अगत्याचं असल्यानं त्यांच्या शिष्यपरंपरेचा साहित्याचं स्वरुप दर्शन या लेखात हेतुत: घडवून दिलं आहे.

    ब्रम्हानंद महाराजांचा जन्म भारताच्या १८५७ च्या स्वातंत्र्यसमराच्या आगेमागे झाला त्याचा मास व तिथी माघ वद्य दशमी अशी नोंदविली असून इसवी सनानुसार त्यांचं जन्मवर्ष १८५९ हे आहे.

    त्याचं घराणं कर्नाटकातील जालीहाळ गावाचं. भक्तीची परंपरा त्यांच्या घराण्यात असून हे गाडगोळी घराणं त्या भागात वेदविद्या पारंगत म्हणून प्रसिद्ध होतं. त्यांचे वडील वाळंभट्ट हे वेदशास्त्र संपन्न पंडित होते. असं असलं तरी त्यांचे पुत्र अनंत (हे ब्रम्हानंदमहाराजांचं सन्यासग्रहणापूर्वीचं नाव) मात्र तसे नव्हते त्यांचे बालपण वेदोध्ययानात न जाता खेळण्याबागडण्यात उनाडकीत जाऊ लागलं. तु कुलर्दपक नसून कुळाला काळिमा फासणारा आहेस, असं बाळंभट्टांनी कंटाळून नि अत्यंत त्रस्त होऊन म्हटल्या वर अनंताला पश्चाताप झाला व परतीही झाली. मुळगुंदच्या पंडित रघुनाथ शास्त्रींकडे त्यांनी वेदाध्ययन केलं. शास्त्री बुवांच्या सत्संगाचा योग्य तो परिणाम झाला व अनंतानं वेदाध्ययन पूर्ण केलं एवढंच नव्हे तर ते भागवत ही सांगू लागले अनंताच्या जीवनातील हा कायापालटच होता. ब्रम्हचैतन्य हेच आपले गुरु आहेत असा दृष्टान्त झाल्यावर ते गोंदवल्यास आले नि त्यांनी ब्रम्हचैतन्यांचा अनुग्रह घेतला.

    ब्रम्हानंदमहाराजांनी आपल्या गुरुचा महिमा आपल्या अनेक अभंगातून अत्यंत श्रद्धेने व्यक्त केला आहे.गुरुर्ब्रह्मा या सूत्राची प्रचीती त्यांच्या या अभंगातून येते, त्यातील गुरुराव माझे ब्रम्हची साकार या मध्यवर्ती संकल्पनेवरुन त्यांच्या गुरुभक्तीची सहज कल्पना येईल.

    साष्टांग वंदूनी सदगुरुरायासी । चिंतावी मानसीं गुरुमूर्ति ।।
    गुरुराव माझे ब्रम्हचि साकार । केला उपकार धरुनी देह ।।
    नाहीं निराकार नाही हो साकार । ऐसा गुरुवर माझा आहे ।।
    निर्वाच्य ब्रम्ह चैनत्यसि आलें । दुष्टहि तरले दर्शनयोगें ।।४।।
    सकल निगमागम नेणती महिमा । नाहीं दुजी उपमा सदगुरुसी ।।५।।
    दीन ब्रम्हानंद प्रार्थीतसे भावें । मन लय व्हावें रामरुपीं ।।६।।

    कधी ते आपल्या गुरुला रामस्वरुप मानतात तर कधी तो मारुतीचा अवतार आहे, असंही मानतात.

    गुरुच्या वात्सल्याची ते मातेच्या वात्सल्याची तुलना करतात म्हणूनच ते आपल्या गुरुला 'सद्गुरुआई' असंही म्हणतात. या संदर्भातील त्यांचा अभंग असा आहे.

    ऐसे करीं सद्गुरुआई । आपुलें स्मरण वसो ह्दयी ।।१।।
    नावडो हे विषयध्यान । रामनामी लागो मन ।।२।।
    देहबुद्धि उकरुन । लावीं रोप समाधान ।।३।।
    पळवी माझी दुजी भ्रांति । वासना जाळुनि देई शांति ।।४।।
    बहु बळकट चिज्जडग्रंथी । सोडुनि दावा दाशरथि ।।५।।
    ब्रम्हानंदी अशा फार । करीं दीनाचा उद्धार ।।६।।

    आपण परमार्थमार्गाला लागन शक्यच नव्हतं कारण ते आपल्या प्रारब्धात नव्हतं तरीही गुरुकृपेमुळं आपल भाग्य उजळलं आणि आपण परमार्थमार्गाला लागलो यामूळं आपला गुरु हेच आपलं वैकुंठ आहे आणि तोच आपला कैलास आहे. तेच आपलं ब्रम्हज्ञान आहे. आणि तोच आपला मोक्ष आहे, असं ब्रम्हानंदमहाराज म्हणतात. अशा गुरुची अखंड सेवा करण्याचं भाग्य आपल्याला लाभो अशा विनवणीही ते परमेश्वराजवळ करतात.

    परमार्थाची रेषा नाही कपाळांत । करवी सदगुरुनाथ अपुले सत्ते ।।१।।
    आपले सत्तेने तोडी कर्मफांसा । माझा सदगुरु ऐसा कृपानिधी ।।२।।
    कृपानिधी एक धरिला असे भावें । काय तें करावें वैकुंठासी ।।३।।
    वैकुंठ कैलास आम्हां सदगुरुप्राय । चुकती अपाय तेणें सर्व ।।४।।
    हाचि माझा मोक्ष, हेंचि ब्रम्हज्ञान । नाम मुखीं चरणसेवा करुं ।।५।।
    सेवा अखंडित राहो माझे चित्ती । हरीची विनंती पायापाशीं ।।६।।

    आणि केवळ असं सांगूनच ब्रम्हानंदमहाराज थांबत नाहीत तर ते आयुष्यभर आपल्या गुरुची अत्यंत निष्ठेनं सेवाही करतात.

    संदर्भ - डॉ.यू.म.पठाण यांचा 'महान्यूज'मधील लेख.

      May 25, 2010


  • गायक अभिनेते प्रकाश घांग्रेकर

    प्रकाश घांग्रेकर मराठी संगीत रंगभूमीवरील गायकनट होते. प्रकाश घांग्रेकर मुळचे पुण्याचे.संगीत नाटकाची कारकीर्द घडवण्यासाठी १९६० साली मुंबईला आले.धारदार आवाज,देखणे व्यक्तिमत्व पल्लेदार ताना घेण्याची कसब या मुळे त्यांच्या भूमीका प्रभावी होत.देवियाच्या द्वारी या नाटकातून त्यांची कारकीर्दची सुरवात झाली.

    मानिनी त्यांनी संगीत सौभद्र, सुवर्णतुला, मदनाची मंजिरी, गोरा कुंभार, कट्यार काळजात घुसली या नाटकांत भूमिका केल्या. मानिनी सोडतुझा अभिमान, मजला नसे निवारा, घेई छंद मकरंद , सुरत पियाबिन या नाट्यपदांवर प्रकाश घांग्रेकर यांनी आपला ठसा उमटवला होता. गीत गाती ज्ञानेश्वर या नाटकातील भूमिका वाखाण्याजोगी होती. या नाटकातील एक तत्व नाम हे पद त्यांनी गाजवले होते. त्यांना बालगंधर्व पुस्कार व संगीत नाट्य स्पर्धेत रौप्य पदक मिळाले. प्रकाश घांग्रेकर यांचे १ एप्रिल २००३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    प्रकाश घांग्रेकर यांची गाणी.
    अवघे गर्जे पंढरपूर, कटु योजना ही, केशवाचे भेटी लागलेंसे कांता वंचिता निज पतिता, तूंचि दिव्यांगना, ब्रह्म मूर्तिमंत, मानिनी सोड तुझा अभिमान, रमणि मजसि निजधाम लहरी अता सुखाच्या, सदा कलहाविना, सुखमय आशा, ही बहु चपल वारांगना, हो तनय काल

    https://www.youtube.com/watch?v=uNz8x7vFNg4

      April 14, 2017


  • बापूजी आत्माराम मोकाशी

    पेणच्या मांगरुळ गावच्या इनामदारांपैकी एक. सन १९०८ साळी श्री.धारकर यांच्या बंगल्यावरील हत्यारे चोरुन नेण्याचा आरोप त्यांचे बंधू दामोदर आत्माराम मोकाशी व प्रभू समाजांतील इतर तरुणांवर आला होता.

      June 1, 2010


  • अंजना ठमके

    चीनमधील नानजिंगमध्ये नुकत्याच झालेल्या आशियाई युवा क्रिडा स्पर्धेत नाशिकच्या अंजना ठमके हिने ८०० मीटरच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावले. नाशिकच्या आदिवासीबहुल गणेशगावातून आलेल्या अंजनाची ही धाव सोन्यासारखी लकाकती ठरली आहे.

    अंजनाचा सुवर्णवेध

      July 24, 2015


  • महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे

    आपल्या वक्तृत्वानच्या जोरावर लाखो चाहत्यां मध्ये लोकप्रिय असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या भाषणामुळे नेहमी चर्चेत असतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केल्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाचे धोरण महाराष्ट्र व मराठीभाषा या भोवतीच प्रामुख्याने केंद्रित ठेवले आहे. राज ठाकरे यांनी २००८ मध्ये केलेल्या अनेक आंदोलनात मुंबई व परिसरात नव्याने येत असलेल्या बिहारी व उत्तरप्रदेशी लोकांच्या लोंढाला आपल्या टीकेचे लक्ष्य बनवले, त्यामुळे राज ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कायम वादाच्या भोवऱ्यात राहिले.

      June 14, 2021


  • आत्माराम रावजी देशपांडे (कवी अनिल)

    आत्माराम रावजी देशपांडे (कवी अनिल)

    आत्माराम रावजी देशपांडे हे मराठी कवी होते. ते कवी अनिल या टोपण नावाने प्रसिद्ध होते. कवि अनिलांना मुक्तछंद ह्या काव्यप्रकाराचे प्रवर्तक समजले जाते. तसेच दशपदी – १० चरणांची कविता – हा काव्यप्रकार अनिलांनी सुरू केला.

      June 8, 2011


  • ख्यातनाम शास्त्रीय गायक उस्ताद अब्दुल राशिद खान

    ज्या ग्वाल्हेर घराण्याची परंपरा ख्यातनाम शास्त्रीय गायक उस्ताद अब्दुल राशीद खाँ यांनी चालवली, ते घराणे म्हणजे गायन सादर करण्याची शैली ही भारतीय अभिजात संगीतातील नोंद असलेली पहिली शैली. अनेक प्रतिभावंतांनी त्या शैलीमध्ये मोलाची भर घातली, ती प्रवाही ठेवली आणि तिचे अस्तित्व कायम ठेवण्यास मदत केली.

      February 18, 2018