(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बाल लेखीका इनिड ब्लायटन

    इनिड ब्लायटन ही बच्चेकंपनीला आवडणाऱ्या सुरस साहसकथांची लेखिका. त्यांचा जन्म ११ ऑगस्ट १८९७ रोजी डलीचमध्ये झाला. वडिलांच्या प्रोत्साहनामुळे तिने लहानपणापासूनच मासिकांमधून लिहायला सुरुवात केली होती. स्वतंत्र बाण्याच्या साहसी मुलामुलींच्या कथा, शाळा आणि बोर्डिंग हाउसमधले मुलांचे धमाल अनुभव आणि फँटसी जगतातल्या कथा हे तिचे आवडते विषय होते.

    तिने ८००हून अधिक पुस्तकं लिहिली आणि ती जगभर ९० भाषांमध्ये भाषांतरित झाली. तिची पुस्तकं कायमच ‘बेस्टसेलर्स’ यादीत असत आणि त्यांचा एकत्रित खप ६० कोटींच्या घरात जातो.

    लिटल नॉडी (२४ पुस्तकं), दी अॅडव्हेंचरस फोर (दोन पुस्तकं), फेमस फाइव्ह (२१ पुस्तकं), सिक्स कझिन्स (दोन पुस्तकं), सिक्रेट सेव्हन (१५ पुस्तकं), बार्नी मिस्टरीज (सहा पुस्तकं), दी विशिंग चेअर कलेक्शन (तीन पुस्तकं), दी मॅजिक फारअवे ट्री, दी आयलंड ऑफ अॅडव्हेंचर, सिक्रेट सीरिज (पाच पुस्तकं), नॉटिएस्ट गर्ल (तीन पुस्तकं), फाइव्ह फाइंडआउटर्स अँड डॉग मिस्टरी सीरिज (१५ पुस्तकं), सेंट क्लेअर्स (सहा पुस्तकं), मिस्टर गॅलिआनोज सर्कस (तीन पुस्तकं) आणि मॅलरी टॉवर्स (सहा पुस्तकं) अशी तिची पुस्तकं प्रमुख व्यक्तिरेखांवर आधारित आहेत आणि याशिवाय इतरही पुष्कळच! इनिड ब्लायटन यांचे २८ नोव्हेंबर १९६८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      August 11, 2021


  • माझ्या आठवणीतले बापूराव.

    आम्ही त्या वेळी विदर्भातील वर्धा या शहरी रहात होतो. माझे वडील वर्धा येथील गुरांच्या दवाखान्यात व्हेटरनरी डॉक्टर म्हणून नेमणुकीस होते. त्या वेळी माझे वय साधारण …..

      October 7, 2014


  • डॉ. आशुतोष कोतवाल

    डॉ. आशुतोष कोतवाल

    सध्या अमेरिकेत असलेल्या डॉ. आशुतोष कोतवाल यांनी 'हिग्ज बोसॅन' या मूलकणांच्या आकारमानाबाबत संशोधन केले आहे. त्याची दखल जगभरातील भौतिकशास्त्रज्ञांनी घेतली आहे...

    विश्वाची रचना आणि त्याच्या जडणघडणीचे रहस्य उकलण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ‘डब्ल्यू बोसॉन’ या मूलकणांचा शोध जगभरातील अनेक शास्त्रज्ञ घेत आहेत. या कणांना ‘दैवी कण’ (गॉड्ज पार्टिकल) असेही संबोधले जाते. त्यासाठी अब्जावधी डॉलर्स खर्च करून युरोपात जमिनीखाली तयार केलेल्या सर्न प्रयोगशाळेत अचाट आकाराचा ‘लार्ज ह्रेडॉन कोलायडर’ (एलएचसी) नावाचा प्रयोग हाती घेण्यात आला आहे. या कणांच्या वस्तुमानाबाबत मूळचा पुणेकर असलेल्या डॉ. आशुतोष कोतवाल या शास्त्रज्ञाने अनोखे संशोधन केले असून, त्याची जगभरातील भौतिकींमध्ये चर्चा आहे. डॉ. कोतवाल हे याबाबत अमेरिकेत संशोधन करतात.

    त्यांनी व त्यांच्या चमूने दैवी कणांचे (डब्ल्यू बोसॉन) मोजमाप करण्याचे तंत्र विकसित केले आहे. त्यांच्या तंत्रानुसार या दैवी कणांचे आतापर्यंतचे सर्वात अचूक वस्तुमान शोधण्यात यश आले आहे. त्याची अचूकता ०.०२ टक्के इतकी जवळ जाणारी आहे, असे अमेरिकेतील शिकागोजवळ असलेल्या ‘फर्मी नॅशनल अ‍ॅक्सीलरेटर लॅबोरेटरी’ या ख्यातनाम प्रयोगशाळेने जाहीर केले आहे. डॉ. कोतवाल यांच्या या यशामुळे गेली ४० वर्षे विविध शास्त्रज्ञांनी या कणांबाबत घेतलेला ध्यास एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. विशेष म्हणजे बोसॉन या मूलकणांचे अस्तित्व असल्याचा सिद्धांत प्रसिद्ध दिवंगत पदार्थशास्त्रज्ञ डॉ. सत्येंद्रनाथ बोस यांनी सर्वप्रथम मांडला होता. त्यावरून या कणांना ‘बोसॉन’ असे नाव देण्यात आले. आता याच कणांचे अचूक वस्तुमान शोधून त्यात भर टाकण्याचे कार्य कोतवाल यांच्या रूपाने एका भारतीयानेच केले आहे. डॉ. कोतवाल हे अमेरिकेतील नॉर्थ क्ररोलिना राज्यातील डय़ुक विद्यापीठात प्राध्यापक आहेत. त्यांनी अमेरिकेत अभियांत्रिकी व अर्थशास्त्र याविषयांची पदवी घेतली. त्यानंतर कोलंबिया विद्यापीठात पीएच.डी. करून त्यांनी शिकागोजवळील ‘फर्मी’ प्रयोगशाळेत संशोधनकार्य सुरू केले. ‘डब्ल्यू बोसॉन’ कणांच्या संशोधनाबरोबरच ‘टॉर क्वार्क’ या मूलकणांचे अचूक वस्तुमान शोधण्यातही त्यांनी यश मिळविले आहे. त्यांना अमेरिकेतील राष्ट्रीय स्तरावरील ‘आऊटस्टँडिंग इनव्हेस्टिगेटर अ‍ॅवॉर्ड’ व ‘स्कोन फेलोशिप’ हे प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले आहेत. पदार्थविज्ञानातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन अमेरिकन फिजिक्स सोसायटीने त्यांना विशेष फेलोशिप प्रदान केली आहे.

    डॉ. आशुतोष कोतवाल यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला ध्यास हा कणाकणाचा ! हा लेख पुढील पानावर वाचा.

    डॉ. आशुतोष कोतवाल यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला हा लेख वाचा.
    ध्यास हा कणाकणाचा !
    kotval-dr-ashutosh-modified


    MM-050; VV-0056

    <!--डॉ. आशुतोष कोतवाल यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला हा लेख वाचा. ध्यास हा कणाकणाचा ! -->

      August 26, 2015


  • भार्गवराम आचरेकर

    अत्यंत बिकट परिस्थितीतही धीरोदात्तपणा न सोडणारे, निगर्वी, सरळ, प्रेमळ अंत:करणाचे मा.भार्गवराम आचरेकर यांना नाट्य व्यवसायातील चारुदत्त असे संबोधिले जात असे.त्यांचा जन्म १० जुलै १९१० रोजी झाला. स्थानिक शाळेच्या मदतीसाठी केलेल्या शारदा नाटकाच्या प्रयोगात त्यांनी वल्लरीचे काम इतके अप्रतिम केले की त्याचा सर्वत्र बोलबाला झाला. त्यावेळी ललितकलादर्शचा मुक्काम मालवणला होता. बापूसाहेब पेंढारकरांच्या कानी या बालनटाची कीर्ती पडली. त्यांनी भार्गवरामांचे गाणे ऐकले आणि आपल्या संस्थेत दाखल करून घेतले. ललितकलादर्शन मधील १९२५ ते १९३७ ही बारा वर्षे म्हणजे भार्गवराम आचरेकरांच्या नाट्य जीवनाची चढती कमान होती. ललितकलादर्शच्या बापूसाहेब पेंढारकरांच्या मार्गदर्शनाखाली मा.भार्गवराम आचरेकर यांना विविध भूमिका करण्याचे भाग्य लाभले. ‘कुंजविहारी’ नाटकातील ‘कृष्ण’ ही भार्गवरामांची पहिली व्यावसायिक भूमिका. यानंतर ‘वधूपरीक्षा’, ‘शारदा’, ‘पुण्यप्रभाव’ इत्यादी अनेक नाटकांत ते भूमिका करू लागले. बापूसाहेब पेंढारकर आजारी पडल्यानंतर त्यांनी ‘मानापमाना’तील धैर्यधर, आणि ‘शिक्काकट्यार’ मधील ‘शाहू’ या अवघड संगीत भूमिका भार्गवरामांवरच सोपविल्या. ‘ललितकलादर्श’ मंडळीत पणशीकर बुवा, विष्णुपंत पागनीस, कागलकरबुवा, वझेबुवा आणि शिवरामबुवा वझे यांची तालीम मिळाल्याने त्यांची गायकी कसदार आणि दर्जेदार झाली होती. बापूसाहेबांनी भार्गवरामांच्या अभिनयाकडेही बारीक लक्ष पुरविले आणि म्हणूनच ‘सोन्याचा कळस’ या नाटकातील फटकळ पण सरळ स्वभावाच्या बिजलीची तडफदार तेजस्वी भूमिका भार्गवरामांनी अप्रतिम साकार केली. जणू त्यांना डोळ्यांसमोर ठेवूनच वरेरकरांनी ती भूमिका लिहिली होती. अभिनय, गायन आणि रूप यांचा त्रिवेणी संगम या तडफदार भूमिकेत झाला होता. बिजली म्हणजे भार्गवराम आणि भार्गवराम म्हणजे बिजली असे समीकरण त्याकाळी झाले होते. पुढे ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकातील भानुशंकरांच्या भूमिकेमुळे नव्या पिढीला भार्गवरामांचा नाट्याभिनय व गायनाची करामत ऐकण्याची संधी मिळाली. भार्गवराम नुसते नटच नव्हते तर चांगले ख्याल गायकही होते. साध्या आणि अनवट रागातील चीजांचे बरेच मोठे भांडार त्यांच्यापाशी होते. अशा या प्रसन्न वृत्तीच्या, निकोप प्रकृतीच्या, धार्मिक श्रद्धेच्या, नम्र स्वभावाच्या आणि निर्व्यसनी, निष्कलंक चारित्र्याच्या गुणशाली कलाकाराला नाट्य परिषदेने ‘बालगंधर्व पदक’ देऊन गौरविले होते. भार्गवराम आचरेकर यांचे २७ मार्च १९९७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      March 28, 2017


  • प्रसिद्ध बंगाली साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या महाश्वेता देवी

    महाश्वेता देवी यांचे वडील मनीष घटक एक कवी आणि कादंबरीकार होते. त्यांचा जन्म १४ जानेवारी १९२६ रोजी ढाक्यात झाला. महाश्वेतादेवी किशोरवयीन असतानाच त्यांचे कुटुंबीय पश्चिम बंगालमध्ये स्थायिक झाले. तिथेच त्यांनी आपले पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले. लहान वयातच त्यांनी लिखाणाला सुरुवात केली होती. इंग्रजी विषयातून पदव्युत्तर पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी शिक्षिका आणि पत्रकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. महाश्वेतादेवी यांच्या साहित्य व सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल त्यांना पद्मविभूषण, मॅगसेसे, साहित्य अकादमी आणि ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आले.

    साहित्य संपदा ज्ञानपीठ, साहित्य अकादमी हे साहित्य क्षेत्रातील मानाचे पुरस्कार मिळवणा-या महाश्वेता देवी यांनी बंगाली भाषेतून लघुकथा, कादंब-या असे विपुल लिखाण केले आहे. त्यांच्या ‘झाँसी की रानी’, हजार चौराशीर की माँ, रुदाली या कादंब-या मैलाचा दगड ठरल्या. इतर ग्रंथसंपदेत ‘अरण्यार अधिकार, अग्निगर्भ, सिद्धू कनहुर दाके आदी साहित्य वाचकांच्या पसंतीस उतरले. यापैकी हजार चौराशीर की माँ, या त्यांच्या बंगाली भाषेतील कादंबरीवर आधारित गोविंद निहलानी दिग्दर्शित सिनेमा १९९८ साली रुपेरी पडद्यावर झळकला होता. या कादंबरीद्वारे महाश्वेता देवी यांनी नक्षलवादी चळवळीशी जोडला गेलेला मुलगा व त्याची आई यांची संघर्षकथा मांडली.

    १९९३ साली कल्पना लाजमी यांनी महाश्वेता देवी यांच्या ‘रुदाली’ या कादंबरीवर आधारित चित्रपट बनवला होता. म्हादू हा मराठी चित्रपटही त्यांच्या कथेवर बनला आहे. महाश्वेता देवी यांचे २८ जुलै २०१६ रोजी निधन झाले. गुगलने ‎महाश्वेता देवी यांच्या स्मृतीदिना निमित्त डुडल केले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      January 15, 2018


  • मराठी नट, लेखक, दिग्दर्शक सुरेश विनायक खरे

    १९७२ साली मुंबईत दूरदर्शन सुरु झालं आणि कलाकारांसाठी एक दालन उघडलं गेलं. चित्रपट दिग्दर्शक वसंत जोगळेकर यांनी दूरदर्शन निर्माते विनायक चासकर यांच्याशी खरेंचा परिचय करुन दिला. “जानकी” या चित्रपटाचं ‘चित्रावलोकन’ हा चर्चात्मक समीक्षेचा कार्यक्रम हा खरेंचा दूरदर्शनवरील पहिला कार्यक्रम. ‘गजरा’ आणि ‘नाट्यावलोकन’ हे खरे यांचे दूरदर्शनवरील कार्यक्रम अतिशय गाजले आणि लोकप्रिय झाले. सूत्रसंचालक म्हणून खरे यांनी आपल्या खास शैलीचा ठसा या कार्यक्रमांवर उमटवला.

      January 25, 2018


  • वर्षा माडगूळकर

    दुर्गा नागरी सहकारी पतसंस्था, जिजामाता सहकारी बॅंक आणि जिजामाता महिला सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून वर्षा माडगूळकर यांनी महिलांना स्वावलंबी बनविले. सहकारातले आगळे उदाहरण उभे केले. सामान्य कुटुंबात जन्म घेऊन त्यांनी घेतेलेली बरारी चकित करणारी आहे...

    कर्तबगार पंखांची भरारी

      July 14, 2017


  • गोविंद वासुदेव कानिटकर

    महाराष्ट्र-प्रबोधनकाळातील एक महत्वाचे अनुवादक गोविंद वासुदेव कानिटकर हे कवीदेखील होते.

      July 27, 2017


  • श्रीलंकन क्रिकेटपटू मुथय्या मुरलीथरन

    मुरलीथरनचे नाव ऐकले तरी त्याचा संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीचा इतिहास डोळ्यासमोर उभा रहातो. मुरलीथरनने १३३ कसोटी सामन्यांमध्ये फक्त १,२५६ धावा केल्या आणि त्याची सर्वोच्च धावसंख्या होती ६७ . त्याने ८०० कसोटी विकेट्स घेतल्या त्या २२.७२ ह्या सरासरीने . त्याने ६७ वेळा ५ किंवा ५ पेक्षा जास्त खेळाडू एक इनिंगमध्ये बाद केले. तर २२ वेळा एका इनिंगमध्ये १० किंवा १० पेक्षा जास्त खेळाडू बाद केले. त्याने एक इनिंगमध्ये ५१ धावा देऊन ९ खेळाडू बाद केले तर ७२ झेल पकडले.

      April 17, 2021


  • कृष्णधवल सिनेमा काळातील अभिनेत्री व गायिका उमा देवी खत्री उर्फ टूनटून

    उमा देवी खत्री यांचा जन्म १ जानेवारी १९२३ रोजी झाला. टूनटून यांचे खरे नाव उमा देवी खत्री होते. १९४०-४५ चा काळ होता, रम्य अशा दिवसातली ती सकाळची वेळ होती, संगीकार नौशादजी आपल्या आशियाना या घरात हार्मोनियमवर गाण्याचे स्वर काळ्या पांढरीच्या शृंगारात बसवत होते. इतक्यात त्यांच्या दारावर थाप पडली. पाठोपाठ आणखी थापा पडल्या. डोअर बेल न वाजवता दारावर कोण सलग थापा मारतंय हे बघण्यासाठी त्यांनी दरवाजा उघडला आणि समोर कोणीच नव्हते, ते दार बंद करणार इतक्यात बाजूला लपलेली एक १२- १३ वर्षांची धिटूकली समोर आली. तिने त्यांच्या पायाला मिठीच मारली ! ते तिच्याशी बोलण्याआधी तिने भोकाड पसरले, ते तिला घरात घेऊन आले. तिची विचारपूस केली तेंव्हा ती बोलती झाली. ती म्हणाली, "मला तुम्ही गायनाची संधी दिली नाही तर मी इथल्याच समुद्रात जीव देईन !" गावात असताना रेडीओवर गाणी ऐकून ऐकून तिने एकलव्यी बाण्याने रियाझ केलेला, इतकीच काय ती तिची गायनाची तयारी पण तिचा आवाज मधुर असल्याने तिचा स्वतःवर विश्वास होता अन तिच्या डोक्यात सतत नौशादजींचे वेड असे. या शिदोरीवर तिने घर सोडून वयाच्या १३ व्या वर्षी थेट मुंबई गाठली होती. नौशाददेखील युपीच्या लखनौचेच असल्यामुळे त्यांना तिची काळजीही वाटत होती. नौशादजीनी तिच्या अशा या पार्श्वभूमीमुळे काही दिवस काम दिले नाही अन एके दिवशी तिची ऑडीशन घेतली आणि ते अचंबित झाले ! या मुलीचे नाव उमा देवी होय ....गाण्याचे वेड डोक्यात घेऊन आलेल्या उमादेवीच्या आयुष्यात पुढे अनेक चढउतार येऊन ती एक हसण्याजोगी बाब होणार आहे याचा तिला तिळमात्र अंदाज नव्हता. त्या दिवशी नौशादजींनी तिला ऐकले अन तिला पार्श्वगायनासाठी तत्काळ निवडले. तिची वर्णी इतरत्र लागू नये म्हणून नौशादजींनी ए. आर. कारदार यांना गळ घातली, नौशाद म्हणजे त्या काळाचे सर्वात मोठे संगीतकार असल्याने त्यांचा शब्व्द डावलणे अशक्य होते. तत्काळ उमादेवीची निवड शैलीदार सोनेरी आवाजाची गायिका म्हणून ए. आर.कारदार प्रॉडक्शन हाऊससाठी झाली, तिच्याशी करार केला गेला, तिचे मासिक वेतन ५०० रुपये ठरवले गेले. पण एक अट होती तिने ३ वर्षे दुसरया प्रॉडक्शन हाऊससाठी गायचे नाही. त्यांना गाण्यासाठी लगेच सिनेमे मिळाले दर्द, दिल्लगी, चांदनी रात, नाटक पैकी 'दर्द' मधील शकील बदायुनी यांनी लिहिलेलं' अफसाना लिख रही हुं' ने तिला रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आणले सुरैयाबरोबरचे 'बेताब है दिले दर्द' ने तिला आणखी प्रसिद्धी मिळाली. दर्द नंतर मेहबूब खानच्या 'अनोखी अदा' मधलं 'काहे जिया डोले' आणि 'दिल को लगाके हमने कुछ भी न हमने पाया. 'हे गाणंही हिट झालं. पण उमादेवी मात्र करारात बांधल्या गेल्या असल्यामुळे इतर संधींना मुकत गेल्या अन त्यांना हळूहळू गायकीसाठी इतर प्रॉडक्शन हाऊसची दारे जवळजवळ बंद झाली अन तिचे करारबद्ध प्रॉडक्शन हाऊसच शेवटी बंद पडले. अन उमा देवी गायिकेच्या भूमिकेतून स्ट्रगलरच्या फेऱ्यात अडकली. त्या कामासाठी फिरू लागल्या. त्या गव्हाळ वर्णाच्या, थोडीशी जाड अंगाची, किंचित बसक्या चणीची होत्या, दिसायला लाखात एक वगैरे अशी काही नव्हत्या पण ती अगदी जेमतेम सौंदर्यवती होती अशी बाब होती. गायकीत नाव झाले तरी हरकत नाही पण अपयशाचा शिक्का घेऊन गावाकडे तिला परत जायचे नव्हते. त्यामुळे गाण्यातील संधींनी तोंड फिरवल्यामुळे तिने अभिनयासाठी प्रयत्न सुरु केले, एखादा रोल मिळतो का यासाठी ती वेगवेगळ्या प्रॉडक्शन हाऊसचे उंबरठे झिझावू लागल्या. त्याचा गायकीचा प्रवास थांबला, नायिका होण्याचे स्वप्न भंगले अन ती बॉलीवूडची पहिली महिला कॉमेडीयन म्हणून नावारूपाला आली. १९५० मध्ये नौशाद यांचीच निर्मिती असलेला बाबुल हा सिनेमा सेट वर आला. या सिनेमातील नर्गिसच्या मैत्रिणीच्या - मुन्शीजीच्या मुलीच्या विनोदी भूमिकेसाठी तिला विचारणा झाली प्रेक्षकांनी या सिनेमातील उमादेवीच्या पात्रावरही प्रचंड कौतुकाचा वर्षाव केला, या पात्राचं नाव होतं टूनटून! हे नाव पुढे उमादेवीला आयुष्यभर चिकटले. त्यांची गायिका ही मूळ ओळख या सिनेमाने पुसून काढली अन टूनटून हे नाव जन्मास आले. जॉनी वॉकर, मेहमूद, धुमाळ, आगा, मुक्री, केष्टो मुखर्जी, भगवानदादा अशा अनेक कॉमेडीयन्स सोबत त्यांनी सिनेमे केले पण कधी कुणाशी नाव जोडू दिले नाही. टूनटून यांचा समाजावर इतका प्रभाव पडला की टूनटून या शब्दाचा अर्थच जाडी मुलगी असा होऊन गेला. टूनटूनने केलेल्या गुरुदत्तच्या आर-पार, मिस्टर और मिसेस फिफ्टी फाईव मधील आणि आबरू, एक राज, प्यासा, शराफत, दिल और मोहब्बत मधील भूमिका विशेष गाजल्या. १९५० ते १९६०च्या दशकातील ५० सिनेमात त्यांनी काम केलं. मा. उमादेवी उर्फ टूनटून यांचे २४ नोव्हेंबर २००३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. समीर गायकवाड / इंटरनेट

    उमादेवी उर्फ टूनटून यांनी गायलेली काही गाणी
    मेरी प्यारी पतंग
    अफसाना लिख रही हुं
    दिलवाले

      January 1, 2017