जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
माया खुटेगावकर… अस्सल लावण्यवती नर्तिका… आई–बहिणीच्या मायेच्या पंखाखाली तिची लावणीबहरली…
अस्सल खानदानी लावणी सादर करण्यात मधू कांबीकर यांचा हातखंडा मानला जात असे. मधू कांबीकरांच्या लावणी समूहात रुक्मिणीबाई अंधारे या गायन, अभिनय आणि नृत्य सादर करीत. मधू कांबीकरांप्रमाणेच आपल्या मुलींनीही नावलौकिक मिळवावा, अभिनय, नृत्य अन् गायन क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवावा असं रुक्मिणीबाई यांना नेहमीच वाटत असे. गायन क्षेत्रात विजया तर नृत्यात छाया आणि माया यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आणि अल्पावधीतच विजया-छाया-माया हे नाव लावणी वर्तुळात अदबीनं घेण्यास भाग पडलं.
लातूर गावातल्या खुटेगाव या छोटय़ाशा खेडय़ातून सुरू झालेला हा लावणीचा प्रवास पुढे सातासमुद्रापारही जाऊन पोहचला. आपल्या गावाचं नाव पुढे जगाच्या इतिहासात कोरलं जाईल हे हेरून रुक्मिणीबाईंनी आधीपासूनच आपल्या मुलींची ओळख अंधारे या आडनावाने न करता खुटेगावकर या नावाने करून दिली आणि पुढे विजयासोबतच छाया-माया खुटेगावकर या नावानं त्या जगप्रसिद्ध झाल्या.
छाया खुटेगावकरांचा लावणीचा हा प्रवास फार आधीच सुरू झाला होता, मात्र माया खुटेगावकर ही वयाच्या चौदा वर्षांपर्यंत यापासून वंचित राहिली होती. माया कुटुंबात सर्वात लहान आणि म्हणूनच लावणीपासून तिला दूर ठेवत शिक्षणासाठी पुण्यातील कर्वेनगर इथल्या हॉस्टेलला वेगळं ठेवण्यात आलं होतं. याउलट आपल्या आई आणि बहिणीप्रमाणेच आपणही या क्षेत्रात यावं असं मायाला वाटत असे. अखेर नववीपर्यंत शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिचा या क्षेत्रात अपघातानेच श्रीगणेशा झाला. अपघाताने होण्याचं कारण म्हणजे मुंबईत षण्मुखानंद हॉलला लावणीचा एक कार्यक्रम आयोजित केला गेला होता आणि या कार्यक्रमाला एक नृत्यांगना काही कारणास्तव येऊ शिकली नाही. या मुलीची जागा भरून काढण्यासाठी मायाला या कार्यक्रमात घेण्यात आलं आणि इथेच मायाची नाळ लावणीशी जोडली गेली.
छाया आणि मायाचे फोटो काढण्याची संधी मला अनेकदा मिळाली. कालांतराने छायाच्या गुडघ्याच्या दुखण्याने डोकं वर काढलं आणि तिचा नृत्यप्रवासाचा वेग मंदावला. त्यातच ती मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांना लावणी विषयाचे धडे देण्यात गुंग झाली. छाया-माया ही जोडी पुढे तुटली. यानंतर मग केवळ मायाचे फोटो काढण्याची संधी वारंवार मिळू लागली. पुणे, सातारा या ठिकाणी मायाचे अनेक कार्यक्रम सातत्याने होऊ लागले. त्यातच ‘नाद करायचा नाय’ या कार्यक्रमाला रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. याच कार्यक्रमात मायाचे बॅकस्टेजला काही फोटो मला टिपता आले. मायाचे फोटो काढताना ती फार कमी बोलते. तिला बोलतं केल्यानंतर तिने तिचा जीवनप्रवास हळूहळू उलगडून सांगितला. ‘‘माझे वडील माळकरी होते. त्यांना आईने या क्षेत्रात यावं असं अजिबात वाटत नव्हतं. त्यांचा विरोध झुगारून आईने तिचा प्रवास सुरूच ठेवला. शेवटी आई घर सोडून आम्हा तिघा बहिणींना घेऊन निघून आली.’ माया सांगत होती.
पारंपरिक लावणी सादर करण्यासाठी माया ओळखली जाते. तसंच बैठकीची लावणी, अदाकारीच्या लावणीसाठीही ती प्रसिद्ध आहे. तिच्या कलेला कॅमेराबद्ध करण्यासाठी मी महाराष्ट्रात विविध ठिकाणी तिचे कार्यक्रमात फोटो टिपले. कार्यक्रम, ठिकाण आणि तिच्या सादरीकरणावर यानुसार मायाच्या पेहरावात, शृंगारात बदल झालेला दिसला. बैठकीची लावणीसाठी पांढऱया रंगाची साडी, अदाकारीची लावणीसाठी हिरव्या, निळ्या, केशरी रंगाची तर विशेष कार्यक्रमात लाल, गुलाबी रंगाची साडी ती सहसा परिधान करत असल्याचं मला लक्षात आलं. त्यानुसार त्यावरचे दागिने आणि मेकअप, हेअर देखील बदलल्याचं लक्षात आलं. तिच्या याच विविध रूपांना कॅमेराबद्ध करण्यासाठी मी अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावली.
मायाचे या क्षेत्रातले नेमके गुरू कोण असं तिला विचारलं असता ती सांगते, ‘‘षण्मुखानंद हॉलला झालेल्या कार्यक्रमानंतर छायाताईने अभिनय आणि नृत्य यांचे धडे मला दिले, तर माझ्या आईने आणि पेटीवाले शंकर जावळकर यांनी गायनाचे धडे मला दिले. यानंतर याचं औपचारिक शिक्षण मला मिळावं म्हणून मला आईने साताऱयात एका शिबिरात घातलं. इथे भामिनाबाई आणि इतर गुरूंनी माझ्यावर संस्कार केले. सुरुवातीला छोटय़ा कार्यक्रमातून माझी सुरुवात झाली. नंतर हा प्रवास वेगाने सुरू झाला. या प्रवासात अनेक चढउतार मी पहिले. माझ्या आई आणि बहिणींमुळे मला दुःखाची झळ सोसावी लागली नसली तरीही त्यांच्यामुळे मला याची जाणीव कायम राहिली. आता छायाताई आजारामुळे या क्षेत्रात नाही तर विजयाताई सात वर्षांपूर्वी हे जग सोडून गेली. याचं दुःख सांगावं तेवढं कमीच.’’
माया बोलता बोलता भावुक झाली. कलेने मायाला भरभरून दिलं असलं तरीही तिच्या मनाच्या कोपऱयात तिच्या आई आणि बहिणींसाठीची ‘माया’ कायमच असल्याचं तिच्या बोलण्यात दिसून येतं. अनेक भावना मनात दाटल्या असतानाही त्याचा मागमूसही लागू न देता माया तिच्या कंठानं अन् नृत्यानं नेहमीच रसिकमन जिंकत आल्याचं आजवरच्या तिच्या या प्रवासात पाहायला मिळालं आहे.
धनेश पाटील
dhanauimages@gmail.com
January 28, 2019
चाळीस एक वर्षांपूर्वी नाटककार सुरेश खरे यांनी ‘आरोप’ नाटक लिहिले होते. त्यांचा जन्म २९ जून १९३४ रोजी झाला. त्यात लालन सारंग आणि जयराम हर्डीकर यांच्या भूमिका होत्या. मराठी प्रमाणे गुजराती रंगभूमीवरही याचे प्रयोग झाले. कमलाकर सारंग यांनी ‘आरोप’ नाटक दिमाखात रंगभूमीवर आणले होते. त्यांनी दिग्दर्शिन केलेली घरटे आमुचे छान, बेबी व जंगली कबूतर इत्यादी नाटके गाजली. मराठी नाट्यअभिनेत्री मा.लालन सारंग या यांच्या पत्नी होत. सखाराम बाइंडर इत्यादी नाटकांतील या दोघांचा अभिनय विशेष नावाजला गेला.
विजय तेंडुलकर लिखित 'सखाराम बाइंडर हे नाटक प्रचंड वादग्रस्त व वादळी ठरले. लालन सारंग यांनी 'चंपा' आणि निळू फुले यांनी 'सखाराम' या भूमिका केल्या होत्या. या नाटकाने इतिहास घडविला. या नाटकाविरुद्ध दिग्दर्शक कमलाकर सारंग यांना लढा द्यावा लागला. नाटकाविरुद्ध खटला भरला गेला. हे नाटक म्हणजे 'विवाह संस्था' संकटात सापडण्याचे भय आहे, असा आक्षेप घेण्यात आला होता. या संदर्भात लालन सारंग यांनी आपल्या लिखाणात म्हटलंय, ''सखाराम सुरू झालं आणि तेरा प्रयोगांतच नाटक अश्लील आहे, अशी बोंब उठली आणि ३३ कटसकट नाटक सेन्सॉर झालं. त्यानंतर त्यावर बंदी आली. आम्ही सेन्सॉर बोर्डाविरुद्ध कोर्टात गेलो.
सहा महिने लढल्यावर नाटक एकही कट न करता हायकोर्टातून सुटलं आणि पुन्हा दिमाखानं प्रयोग सुरू झाले. पुन्हा तीन महिन्यांतच पुण्यातल्या 'लिंग निर्मूलन समितीनं' तेंडुलकरांच्या नाटकांवर बंदी म्हणून 'घाशीराम कोतवाल' व 'सखाराम बाइंडर' ही नाटके होऊ द्यायची नाहीत, असा फतवा काढला. पुन्हा एकदा लढा देऊन त्यातूनही आम्ही बाहेर पडलो.. या सगळ्यांतून जाताना मी व सारंग कळत-नकळत धीट होत गेलो.'' त्या म्हणतात, ''स्वत:चं सॉफिस्टिकेटेड व्यक्तिमत्त्व पूर्ण बदलून एक गावरान, रांगडी, बिनधास्त चंपा उभी करताना खूप विचार करावा लागला होता.'' कमलाकर सारंगानी सखाराम बाइंडर नाटकाच्या वेळच्या आठवणींवर "बाइंडरचे दिवस" नावाचे पुस्तक लिहिले. सखाराम बाइंडर या नाटकाचा हा भन्नाट प्रवास कमलाकर सारंग यांनी 'बाइंडरचे दिवस' या पुस्तकात शब्दबद्ध केला आहे. कमलाकर सारंग यांचे २५ सप्टेंबर १९९८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
September 25, 2017
प्रिया मराठे… विविध मराठी, हिंदी मालिकांमधून सातत्याने दिसणारा देखणा चेहरा… आकर्षक बांधा… ही प्रियाची वैशिष्टय़ं..
आपला दमदार अभिनय सादर करत ‘या सुखांनो या’ ते ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ व्हाया ‘पवित्र रिश्ता’ आणि ‘साथ निभाना साथिया’ असा मराठी आणि हिंदी छोटय़ा पडद्यावरचा प्रवास गेली दशकभर सातत्याने करणारी अभिनेत्री म्हणजे प्रिया मराठे. छोटय़ा पडद्यावरून घराघरांत पोहचलेल्या प्रियाने रुपेरी पडद्यावरही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. सडपातळ बांधा, मात्र हसऱया चेहऱयाच्या, बोलक्या डोळ्यांच्या आणि मनमिळावू स्वभावाच्या प्रियाने अल्पावधीतच मराठी आणि हिंदी सिने इंडस्ट्रीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.
लहानपणापासून प्रियाने शिक्षणाची स्वप्नं रंगवली. इतर मुलांप्रमाणेच तिलाही इंजिनीअर, डॉक्टर व्हायचं होतं खरं, मात्र अभिनय क्षेत्राकडे तिची कधी पावलं वळतील अशी कल्पनाही तिला त्या काळी नव्हती. शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिचा आणि अभिनयाचा तसा काहीच संबंध नव्हता. ठाणा कॉलेजला प्रवेश घेतल्यानंतर अकरावीत असतानाच तिने महाविद्यालयातल्या एकांकिका स्पर्धा, नाटय़स्पर्धा, तसंच तालमी पाहिल्या होत्या आणि याच काळात ती अभिनय क्षेत्राकडे आकर्षित झाली. अकरावीत असल्यापासून अभ्यासाच्या जोडीने अभिनयाचा वेगळा प्रवास तिचा सुरू झाला. पुढे एफवायला असताना तिची आणि याच महाविद्यालयातल्या इतर नाटय़प्रेमींची ओळख झाली आणि तिच्या प्रवासाला वेगळी गती मिळाली. दिग्दर्शक रवी करमरकर, विजू माने, संतोष सराफ, लेखक शिरीष लाटकर या दिग्गजांचं त्या काळी तिला मार्गदर्शन मिळालं.
प्रियाने ‘या सुखांनो या’ या मालिकेतून छोटय़ा पडद्यावर प्रवेश मिळवला. 2005 साली मराठी मालिकेतून आपल्या व्यावसायिक अभिनयाचा श्रीगणेशा केलेल्या प्रियाने नंतर कधी मागे वळूनच पाहिलं नाही. 2007 साली तिने हिंदी इंडस्ट्रीत प्रवेश केला तो ‘कसम से’ मालिकेतून. मराठी मालिकांसोबतच हिंदी मालिकांमध्येही तिचा चांगलाच बोलबाला निर्माण झाला. मालिकांचा हा प्रवास सुरू असतानाच ‘तू तिथे मी’ या मालिकेत तिला निगेटिव्ह शेड असलेली भूमिका करण्याची संधी चालून आली आणि मिळालेल्या संधीचं सोनं केलं. ‘पवित्र रिश्ता’ आणि ‘तू तिथे मी’ या दोन्ही मालिका समांतर सुरू असल्याने तिची यासाठी वेळेची गणितं मांडताना तारेवरची कसरत होत होती. सरतेशेवटी ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून आपला काढता पाय घेत तिने ‘तू तिथे मी’ याच मालिकेला प्राधान्य देत तिने आपला सकस अभिनय सादर केला. ‘विघ्नहर्ता महागणपती’, ‘किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी’, ‘1234’ आणि ‘ती आणि इतर’ या सिनेमांत तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.
प्रियाचं फोटोशूट करण्याची संधी मला मिळाली होती. प्रिया मराठे हा चेहरा तिच्या मालिकांमधील अभिनयामुळे घराघरात पोहचला होता आणि म्हणूनच सुरुवातीला तिचं फोटोशूट हे तिच्या तेव्हा सुरू असलेल्या मालिकांतील भूमिकेला धरून करण्याचं निश्चित करण्यात आलं. यासाठी मॉडर्न साडीतला तिचा लूक लक्षात घेण्यात आला होता. यानुसार मेकअप, हेअर हे देखील लक्षात घेण्यात आलं. यावर साजेसे दिसतील असे दागिने आणि बांगडय़ा, कानातले दागिने हे देखील निवडण्यात आले. या शूटनंतर तिच्या मालिकांमध्ये असलेल्या नेहमीच्या इमेजला तडा देत तिचं वेस्टर्न आऊटफिटमधलं वेगळं फोटोशूट करायचं आम्ही ठरवलं. खरं तरं प्रिया जशी आहे, तिचं राहणीमान जसं आहे त्या सगळ्याला समोर ठेवून तिच्यासाठीचे कपडे निवडण्यात आले आणि मग फॅशनचा एक टच देऊन तिचा मेकअप आणि हेअर करण्यात आला. प्रियाचा चेहरा लक्षात घेऊन तिच्या मेकअपची शेड ठरवण्यात आली. मेकओव्हर केलेली प्रिया या फॅशनेबल लूकमध्ये फारच खुलून दिसत होती. भूमिकेतील तिची एकरूपता आणि तिने प्रत्येक भूमिकेला दिलेला समान न्याय हा मी देखील एकाच दिवशी करण्यात आलेल्या या दोन वेगवेगळ्या फोटोशूटमधून अनुभवाला आणि इथेच प्रियातला लपलेला उत्तम कलाकार मला कॅमेराबद्ध करता आल्याचा वेगळा आनंद मिळाला.
धनेश पाटील
April 1, 2019
दिनकर केशव बेडेकर हे एक महान साहित्यिक, विचारवंत, तत्वचिंतक व समिक्षक होते. महाराष्ट्रामध्ये वाहणार्या हजारो सामाजिक, राजकीय, साहित्यीक, तार्किक, धार्मिक, व तात्वज्ञानिक विचारप्रवाहांना व मतधारांना जोडणारा पुल त्यांनी आपल्या सिध्दहस्त लेखणीच्या माध्यमातून साकारण्याची अनोखी कसरत केल्यामुळे त्यांच्या नावाभोवती प्रसिध्दीचे एक वेगळे वलय निर्माण झाले. “किर्लोस्कर”, “स्त्री”, “नवभारत” अश्या विविध नियतकालिकांमधून त्यांनी अनेक वर्षे विपूल लेखन करत, विविध संवेदनशील विचारांना स्पर्श केला. निर्भीड व पारदर्शी लेखांप्रमाणेच त्यांनी केलेली साहित्य समिक्षा देखील आज त्या विषयांसाठी मार्गदर्शक मानली जाते.
"नवकाव्य","नवकथा","सौंदर्यमीमांसा","अस्तित्ववाद","चित्रकलेतील नवप्रवाह" अशा वेगवेगळ्या विचारप्रणालींचे उत्खनन करून त्यात आपल्या बुध्दीचा व तात्विक निकषांचा अर्क टाकून त्याचा अर्थ सुध्दा रसिकां पर्यंत पोहोचविला. दिनकर बेडेकरांच्या लेखणीने त्यांच्या नियमित वाचकांच्या मनातील प्रगल्भ विचारांची दालने उघडण्याचा सदैव प्रयत्न केला, असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही.
भारताच्या राजकीय, सामाजिक व तार्किक सक्षमीकरणाचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून, बेडेकरांनी तब्बल ६०० च्या वर लेख लिहिले. “आधुनिक मराठी काव्यः उदय, विकास, आणि भवितव्य” तसेच “अस्तित्ववादाची ओळख” ही स्वतंत्र पुस्तकेदेखील दिनकर बेडेकरांनी लिहिली आहेत.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
January 3, 2015
डिकी बर्ड उजव्या हाताने गोलंदाजी करत असत. ते राईट आर्म ऑफ ब्रेक गोलंदाज होते. १९५६-५९ यॉर्कशायर कडून ते पहिला प्रथम श्रेणीचा सामना खेळले. १२ ऑगस्ट १९६४ रोजी अखेरचा प्रथम श्रेणी सामना खेळले. १९७० मध्ये अंपायर म्हणून त्यांनी आपले करिअर सुरु केले. डिकी बर्ड हे क्रिकेटचा एवढ्या वर्षांचा काळ बघितलेला एकमेव जिवंत माणूस असावेत.
April 19, 2022
सुलभा देशपांडे या माहेरच्या सुलभा कामेरकर. मुंबईतच लहानाच्या मोठय़ा झालेल्या सुलभा देशपांडे यांनी सिद्धार्थ महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर शिक्षिका म्हणून छबिलदास हायस्कूलमध्ये कारकीर्दीची सरुवात करणाऱ्या सुलभाताईंचे रंगभूमीशी इतक्या सहजतने धागे जुळले की पुढे याच छबिलदास हायस्कूलमध्ये ‘अविष्कार’च्या रुपाने त्यांनी नाटय़चळवळीचे कार्य उभारले.
April 29, 2024
मद्रासमधल्या त्या कसोटीत पहिल्या दिवशीच्या उपाहारापर्यंतच्या खेळातच टिकाकारांची तोंडे गप्प झाली होती. दिलिप सरदेसाईसोबत फारुख इंजिनिअर सलामीला आला होता आणी सलामीच्या पहिल्याच डावात त्याने वेस्ली हॉल, चार्ली ग्रिफिथ, दस्तुरखुद्द सोबर्स आणी लान्स गिब्ज ह्यांचे डोळे पांढरे केले होते. उपाहारावेळी तो ९४ धावांवर नाबाद होता आणी संघाच्या धावा होत्या बिनबाद १२५.
February 25, 2022
दाजींच्या दुर्दैवाने पुढे मराठी संगीत रंगभूमीला उतरती कळा लागली. संभाषणात नाटकी अभिनिवेशाने बोलण्याच्या जागी वास्तव शैलीने बोलायची पद्धत पडू लागली. मग दाजींनी आपला मोहरा संगीत रंगभूमीकडे वळवला.
June 28, 2022
पानसे, मुरलीधर गजानन - 0354
२२ ऑगस्ट १९७०
१९७०> लेखक व मराठी भाषा अणि संस्कृतीचे अभ्यासक मुरलीधर गजानन पानसे यांचे निधन. “यादवकालीन महाराष्ट्र” हा ग्रंथ त्यांनी लिहिला, तर “भाषा : अंत:सूत्र आणि व्यवहार” तसेच “ज्योतिष रत्नमाला (मूळ संस्कृत, मराठी टीकांसह)” या ग्रंथांचे संपादन त्यांनी केले.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पानसे, मुरलीधर गजानन - 0469
९ सप्टेंबर १९१८
१९१८> मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे अभ्यासक मुरलीधर गजानन पानसे यांचा जन्म. ज्ञानेश्वरीच्या भाषावैशिष्ट्यांवरील प्रबंध, “यादवकालीन महाराष्ट्र” हे पुस्तक, तसेच “भाषा : अंत:सूत्रे आणि व्यवहार” आणि श्रीपतीभट्टाची “ज्योतिषरत्नमाला” व त्यावरील मराठी टीकांचे संपादन, ही त्यांची कामगिरी.
mss
August 2, 2017
भारतीय संस्कृतीचा एवढा प्रभाव त्यांच्यावर होता, की ते स्वत: शाकाहारी झाले आणि तसे इतरांनीही व्हावे यासाठी ते लोकांना आवाहन करत. चांगला समाज घडवायचा असेल आणि समाजात परिवर्तन घडवून आणावयाचे असेल तर समाजातील प्रत्येक व्यक्तीने सकारात्मकरीत्या बदलले पाहिजे यावर त्यांचा ठाम विश्वास होता.
September 9, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti