(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गायक उस्ताद बडे गुलामअली खान

    जेव्हा मोगले आझम या चित्रपटाकरता गाणे म्हणण्यासाठी जेव्हा संगीतकार नौशाद आणि दिग्दर्शक के असिफ यांनी पाचारण केले तेव्हा खासाहेबांनां गाण्याची इच्छा नव्हती म्हणून टाळण्याकरता त्यांनी ऐका गाण्याचे २५००० रुपये मानधन मागितले (त्याकाळात आघाडीचे गायक ३०० ते ५०० रुपये मानधन घेत असत) आणि असिफ यांनी ते देऊ केले.

      April 23, 2022


  • मराठी शाहीर व लोककलाकार विठ्ठल उमप

    मराठी शाहीर व लोककलाकार विठ्ठल उमप यांचा जन्म १५ जुलै १९३१ रोजी झाला. आपल्या भारूडाने समस्त मराठी रसिकांना वेड लावणा-या विठ्ठल उमप यांनी आपल्या बहुआयामी कलासाधनेने अवघ्या महाराष्ट्रावर मोहिनी घातली होती. राज्याच्या लोककलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यामध्ये लोकशाहीर विठ्ठल उमप यांचं मोठं योगदान आहे.
    विठ्ठल उमप यांचा मूळचा गळा विदर्भाचा असला, तरी नगर जिल्ह्यातील एका खेड्यात त्यांच्या घराण्याने भेदिकाची परंपरा सुरू ठेवली. विठ्ठल उमप यांचे वडील भेदिकाचे गायक पण उमप यांच्यावर भेदिकापेक्षा आंबेडकरी जलसा आणि सत्यशोधकी तमाशाचा विशेष प्रभाव पडला होता. मुंबईला उदरनिर्वाहासाठी आलेल्या उमप यांनी कामगार वस्तीत मेळ्यातून कामे केली. विठ्ठल उमप हे लोकशाहीर असले तरी त्यांना 'कवाल' म्हणूनच लोक पूर्वी ओळखत. पण नंतर मात्र त्यांनी वेगवेगळे प्रयोग करून, एक समर्थ लोककलावंत, अशी आपली ओळख निर्माण केली. लोकरंगभूमी, रंगभूमी, कव्वालीचे व्यासपीठ, काव्य संमेलने, रुपेरी पडदा, दूरचित्रवणीचा छोटा पडदा अशा अनेक माध्यमांमध्ये उमप यांचा सर्वत्र संचार होता.

    'आला कागुद कारभारणीचा' ही लावणी, 'ऐका मंडळी कान देऊनी तुम्हा सांगतो ठेचात कुडी आत्म्याचं भांडण झालं भारी जोरात', 'भूक लागलीया पाठी कशासाठी पोटासाठी', 'माझ्या आईचा गोंधळ', 'आईचा जोगवा', 'आरती श्रीगणेशा जगदीशा', 'वादळ वारा तुफान येऊ द्या', 'ये दादा आवर रे', 'फाटकी नोट मना घेवाची नाय', 'भाता मीठ नही टाक्या' अशा वेगवेगळ्या लोकगीतांच्या गायनाने विठ्ठल उमप यांनी आपला स्वतंत्र ठसा लोकगीताच्या क्षेत्रात उमटविला. 'माझी मैना गावाकडं राह्यली' या गाण्यानं तर अनेकांचे डोळे पाणावले.

    विठ्ठल उमपांनी अनेक कोळी गीते आणि भीम गीते रचली व गायली. त्यांनी लिहिलेल्या "जांभूळ आख्यान" या नाटकाचे आतापर्यंत ५०० हून अधिक प्रयोग झाले आहेत. १९८३ साली विठ्ठल उमप यांनी आयर्लंडमधील कॉर्क लोकोत्सव गाजविला होता. विठ्ठल उमप केवळ लोकगीत गायनापाशी थांबले नाहीत. त्यांनी लोकरंगभूमीसोबतच नागर रंगभूमीवर संचार ठेवला. 'अरे रे संसार', 'अबक दुबक', 'विठो रखुमाय', 'खंडोबाचं लगीन', 'जांभुळाख्यान' या चाकोरीबाहेरच्या नाटकांसोबतच 'हैदोस', 'बुद्धम्‌ शरणम्‌'सारखी नाटके त्यांनी वर्ज्य मानली नाहीत.

    विहीर, टिंग्या, सुंबरान,या चित्रपटांमध्ये व डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटातूनही त्यांनी काम केले होते.लोककलेच्या सेवेसाठी आयुष्य वेचणा-या शाहीर विठ्ठल उमप यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं.

    विठ्ठल उमप यांचे चिरंजीव आदेश, नंदेश आणि उदेश आता त्यांची परंपरा पुढे नेत आहेत. विठ्ठल उमप यांचे २६ नोव्हेंबर २०१० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      July 15, 2018


  • कृषी कर्मयोगी दादासाहेब बोडके

    सोलापुर जिल्ह्यातील अनगर गावातील दादासाहेब बोडके हे एक कर्तबगार शेतकरी आहेत. अल्पशिक्षित असले तरी शेतीच्या विद्यापीठात पीएच.डी शोभतील असे दादांचे कर्तृत्व आहे. त्यांनी आपल्या शेतीत असंख्य प्रयोग केले. अनेक पिकांची लागवड केली. शेडनेट, पॉलीहाऊस आदी तंत्रे आत्मसात केली.

      October 26, 2015


  • विनोदी बॉलिवूड कलाकार मोहम्मद उमर अली मुक्री

    मुक्री यांच्या वडिलांची उरण येथे मिठागरे होती. लहानपणापासूनच मुक्री यांना शिक्षण वगैरे क्षुल्लक गोष्टींचे फारसे आकर्षण नव्हते. त्याच्या हाडीमांसी सिनेमाच मुरलेला होता. त्यांचा जन्म ५ जानेवारी १९२२ रोजी झाला. एका मुलाखतीत मुक्री यांनी सांगितले होते `उरणमध्ये पूर्वी गल्लीबोळात सिनेमे दाखविले जात. अब्बाजींचा डोळा चुकवून मुक्री हे सिनेमे हटकून बघायचा. एक दिवस चोरी उघडकीस आली. बापाने चांगला मार दिला, पण मुक्री काही सुधारला नाही. वडिलांसमोर अभ्यासाचे नाटक करायचे आणी त्यांच्या माघारी चित्रपट बघायचे हा नेम त्याने काही चुकविला नाही.' वयाच्या दहाव्या वर्षी मुक्रीने घरातून एकदा पलायनच केले. बाप से बेटा सवाई हे अब्बाजींना कळून येताच त्यांनी मुक्रीची रवानगी आपल्या मोठ्या भावाकडे मुंबईला केली.

    शाळेच्या कोंडवा़ड्यापेक्षा बाहेरचे मुक्त जग मुक्रीला अधिक प्रिय होते. मुंबईत आल्यानंतर तर त्याला मोकळे रानच मिळाले. नाना हिकमती लढवून तो सिनेमे बघायचा. त्या विश्वात रंगून जायचा. याच मंतरलेल्या अवस्थेत मुक्रीला सिनेमात काम करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. बोरीबंदरच्या अंजुमन-ए-इस्लाम शाळेत शिकताना मुक्रीचा सहाध्यायी होता दिलीपकुमार. पुढे दोघेही सिनेमाक्षेत्रात स्थिरावले. दिलीपकुमारची प्रतिमा `लार्जर दॅन लाईफ' असलेल्या नायकाची झाली व मुक्री विनोदी नटाच्याच पायरीवर घुटमळला. पण दिलीपकुमार आपल्या या शाळुसोबत्याला कधीही विसरला नाही. दोघांच्या जिव्हाळ्यामध्ये कीर्ती, पैसा असे लौकिक अडथळेही कधी आले नाहीत. आपल्या अखेरच्या दिवसांतही मुक्री दिलीपकुमारच्या या मनमोकळेपणाचा आदराने उल्लेख करीत असे.

    कुठेतरी मुक्रीची आठवण प्रसिद्ध झाली आहे. चौथी इयत्तेत शिकणारे मुक्री नावाचे कार्टे सरोज मुव्हिटोनच्या मालकापुढे जाऊन उभे राहिले. मला चित्रपटात काम करायला द्या म्हणून त्याच्या खनपटी बसले. त्याकाळी चित्रपटात गाणार्या कलावंतांची परंपरा होती. स्टुडिओच्या म्युझिक रुममध्ये नसीर व झेबुन्निसा या त्यावेळच्या कलावंतांसमोर मुक्रीने अत्यंत भसाड्या आवाजात शिरी फरहाद चित्रपटातले गाणे म्हणायला सुरुवात केली. गाणे म्हणताना मुक्रीने असे काही विनोदी हावभाव केले की म्युझिक रुममधील सर्व मंडळी हसून लोटपोट झाली. खरं म्हणजे मुक्रीला गाणे बजावणे यापैकी काही म्हणजे काही येत नव्हते. पण कॅमेर्यासमोर उभी राहायची आस त्याला स्वस्थ बसू देईना. त्यामुळे तो चक्क खोटे बोलून सरोज मुव्हिटोनच्या म्युझिक रुममध्ये गायला उभा राहिला होता. पण खोट्याचेही खरे झाले. मुक्रीला विनोदी नट म्हणून महिना ७५ रुपये पगारावर सरोज मुव्हिटोनमध्ये नोकरी मिळाली.

    अंजुमन-ए-इस्लाम शाळेत शिकताना मुक्रीने दिलीपकुमारबरोबर अनेक नाटकांत भूमिका केल्या. त्या गाजविल्या. किमान शिक्षण पूर्ण करुन मुक्रीने पुन्हा चंदेरी दुनियेत पाय ठेवला. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याच्या कारकिर्दीने एक वळण घेतलेले होते.` नादान' चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक, निर्मिती व्यवस्थापक म्हणूनही त्याने काम केले. फुल चित्रपटासाठी सहाय्यक म्हणून काम करणार्या मुक्रीला देविकाराणीने हेरले. ठेंगण्याठुसक्या, भरगच्च गालांमधून हसतानाही दांत न दाखविण्याची किमया साधणार्या मुक्रीला देविकाराणीने `प्रतिमा' चित्रपटातील मालकिणीच्या विनोदी नोकराची भूमिका करण्यासाठी पाचारण केले. या चित्रपटातील दिलीपकुमार-मुक्री यांची जोडी पुढे अनेक चित्रपटांत कायम राहिली. कोहिनूर, आन, अमर, अनोखा प्यार, राम और श्याम या चित्रपटांत दिलीपकुमारसमवेत मुक्रीने आपल्या विनोदी आविष्काराने अक्षरश: धमाल उडवून दिली. याचवेळी स्टंटपटांचाही बराच बोलबाला होता.

    स्टंटपट हे तसे दुय्यम दर्जाचेच समजले जात. पण तिथेही मुक्रीने आपल्या अभिनयाची कमाल दाखविली. दणकट पहेलवान शेख मुख्तार याच्या जोडीने मंगू दादा, दिल्ली का दादा, उस्ताद पेद्रो, कैदी नं. ९११ अशा चित्रपटांमधून मुक्रीने बहार आणली. हिंदीतील अनेक आघाडीच्या नायकांचा विनोदी मित्र, सहचर अशा भूमिकांमध्ये मुक्री फिट बसले. त्याच्या भूमिकांना चरित्र भूमिका म्हणायचे की विनोदी भूमिका असा प्रश्न काही वेळेस निर्माण होतो. पण त्याने जे जे काम हाती घेतले त्याचे पडद्यावर सोने केले. शिवाय तो जमानाही कथिलाचा नव्हता. हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णयुगातील दिलीपकुमार, राज कपूर, देव आनंद या लिजंड्सबरोबर काम करताना मुक्री कधीही दुय्यम कलाकार वाटला नाही. देव आनंदबरोबर असली नकली, काला पानी, राज कपूरबरोबर चोरी चोरी असे काही चित्रपट त्याने केले. त्याकाळचे लोकप्रिय नायक सुनील दत्त, राजकुमार, मनोजकुमार यांच्या संगतीतही मुक्री पडद्यावर रमला.

    विनोदी भूमिका हे त्याचे पंचप्राण होते. तो त्यात जगला, त्याच प्रतिमेत मुक्रीचा श्वासही विरघळला. गोल्डन एरानंतर अँग्री यंग मॅनचे वादळ घोंघावू लागले. चित्रपटसृष्टीमध्ये होणार्या बदलांशी ज्यांनी जुळवून घेतले नाही, असे अनेक कलावंत नंतर मोडीत निघाले. पण या परिवर्तनात मुक्री लव्हाळ्याच्या स्थितप्रज्ञतेने टिकला.

    सुपरस्टार पदाची वस्त्रे राजेश खन्नाने खाली उतरविल्यानंतर आपला तमाम प्रेक्षकगण अमिताभच्या मनस्वी, प्रसंगी विखारी व्यक्तिरेखांमध्ये स्वत:चे प्रतिबिंब पाहू लागले. अमिताभच्या प्रतिमेला खुलविण्यासाठी मुक्रीनेही यथाशक्ती प्रयत्न केले. `बॉम्बे टू गोवा'पासून ते थेट `शराबी'पर्यंत अमिताभ व मुक्री यांच्यामधील विनोदी प्रसंग प्रेक्षकांच्या मनात अजूनही ताजे आहेत. `तय्यब अली प्यार का दुश्मन' हे गाणे फक्त त्याच्यासाठीच जन्माला आले होते. मुक्रीने तब्बल सव्वाशे चित्रपटांतून विविधढंगी भूमिका केल्या.

    चित्रपट कारकीर्दीच्या प्रारंभी तो सहाय्यक दिग्दर्शकाच्या भूमिकेत वावरला. जीवनाच्या अखेरीस मस्तान चित्रपटाचे दिग्दर्शन करुन हे वर्तुळ पूर्ण करण्याची तयारी मुक्रीने केलेली होती, पण त्याच्या निधनामुळे या वर्तुळालाच छेद गेली आहे. हिंदीतील अनेक आघाडीच्या नायकांचा विनोदी मित्र, सहचर अशा भूमिकांमध्ये मुक्री फिट बसला.

    त्याच्या भूमिकांना चरित्र भूमिका म्हणायचे की विनोदी भूमिका असा प्रश्न काही वेळेस निर्माण होतो. पण त्याने जे जे काम हाती घेतले त्याचे पडद्यावर सोने केले. मा.मुक्री यांचे ४ सप्टेंबर २००० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट/ समीर परांजपे

      January 5, 2018


  • जेष्ठ संगीतकार वसंत देसाई

    वसंत देसाई यांचा जन्म ९ जून १९१२ रोजी सोनवाड, सावंतवाडी येथे झाला. वसंत देसाई यांचे बालपण कोकणात गेले. काही तरी वेगळे करण्याची उर्मी त्यांना कोल्हापुरात घेऊन आली. कोल्हापुरात प्रभातमध्ये असतांना पडेल ते काम करीत असत. त्यांचे आयुष्य घडण्याला येथेच सुरुवात झाली. देवल क्लबमधे असतांना अल्लादियां खॉं व मंजी खॉं यांसारख्याचे गाणे ऐकून त्यांचे कान तयार झाले. अयोध्येचा राजा तील पहिली नांदी ही नाटकातल्या नांदीप्रमाणे होती. या नांदीमध्ये वसंत देसाईंचा आवाज होता. म्हणजेच बोलपटांची सुरुवात देसाईंच्या आवाजाने झाली असे म्हणता येईल. त्यांनी सुरुवातीला अनेक हिंदी चित्रपटांमध्ये गीते गायली. प्रभातमध्ये संगीत, पार्श्र्वसंगीत देण्यास सुरुवात झाली होती. संत ज्ञानेश्र्वरमधील गाडीवानाची भूमिका, संगीतासाठी बैलांचे खूर व बैलगाडीचा आवाज, विविध पक्ष्यांचे आवाज, ग्रामीण वाद्यांचा सुयोग्य वापर... मा.वसंत देसाई यांच्या कारकीर्दीतील अशा अनेक गोष्टी सांगता येतील. केशवराव भोळे, गोविंदराव टेंबे, मा. कृष्णराव हे प्रभातचे सुरुवातीचे संगीत दिग्दर्शक. त्यांच्या हाताखाली मा.वसंत देसाई तयार झाले. पुढे ते शांतारामबापूंबरोबर राजकमलमध्ये आले. त्यांच्या पहिला स्वतंत्रपणे संगीत दिलेला चित्रपट होता नायिका जयश्रीचा शकुंतला(हिंदी). राजकमलच्या ह्या शकुंतलाने उत्पन्नांचे सर्व रेकॉर्डस् मोडले. पहिला तमाशाप्रधान चित्रपट राम जोशी मधील ग. दि. माडगूळकरांनी लिहिलेल्या लावण्यांना वसंतरावांनी फक्कड चाली दिल्या. कवी होनाजी बाळा यांच्या जीवनावर काढलेल्या `अमरभूपाळी' ह्या चित्रपटातील घन:श्याम सुंदरा ही भूपाळी अप्रतिम स्वररचनेमुळे खरोखरच अमर झाली आहे.

    अभिजाततनेने ओतप्रोत भरलेल्या नृत्यांवर आधारित झनक झनक पायल बाजे चे संगीत वसंत देसाईंनी अजरामर केले आहे. त्यांनी त्यासाठी भारतांतील वेगवेगळ्या प्रांतांमधे प्रवास करून तेथील वैशिष्ट्यपूर्ण वाद्यांचा अभ्यास केला. पं. शिवकुमार शर्मा, पं. सामताप्रसाद, सुदर्शन, गोपीकृष्ण व मृदुंगवादक रामदास या सर्वांना त्यांनी राजकमलमध्ये पाचारण केले. झनक झनकने अफाट यश संपादन केले. त्यांची कीर्ती सगळीकडे झाली. आचार्य अत्रे यांनी १९५६ मध्ये काढलेल्या ‘श्यामची आई’ या चित्रपटाचे संगीत वसंत देसाईंचे होते. कवी यशवंत यांची आई ही अतिशय भावूक, करुण कविता त्यांनी स्वरबद्ध केली. श्यामची आई मध्ये ६ गाणी होती. मराठमोळे वातावरण निर्माण करणारे अप्रतिम पार्श्र्वसंगीत त्यांनी या चित्रपटास दिले. म्हणूनच या चित्रपटाच्या यशातील मोठा वाटा वसंतरावांकडे जातो. मा.वसंत देसाईंनी एकूण २० मराठी चित्रपटांना संगीत दिले. छोटा जवान मधील माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरू, जिंकू किंवा मरू हे गाणे किंवा मोलकरीण मधील देव जरी मज, दैव जाणिले कुणी ही गाणी सर्वश्रृत आहेत. इये मराठीचिये नगरीतील गीतांसाठीचे संगीतही प्रसंगानुरूप होते. त्यांनी पाठ्यपुस्तकांतील अनेक कवितांना या बाई या, देवा तुझे किती, माझ्या मामाची रंगीत गाडी, लेझिम चाले जोरात, घाल घाल पिंगा वार्या, आनंदी आनंद गडे इत्यादी कवितांना - सोप्या, सुंदर चाली दिल्या. शास्त्रीय रागांवर आधारीत असंख्य गाणी त्यांनी हिंदी -मराठीतून दिली.

    शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दिग्गजांना त्यांनी चित्रपट माध्यमात आणले. मा.वसंत देसाई यांनी ‘गुड्डी’ चित्रपटासाठी संगीतबद्ध केलेलं ‘हमको मनकी शक्ती देना’ हे प्रार्थना गीत गेली अनेक वर्षे देशभरातल्या शाळांमधून गायले जाते. वसंतरावांनी संगीतबद्ध केलेल्या ‘बोले रे पपीहरा’, ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी’, ‘सुखाचे हे सुख श्रीहरी मुख’, ‘काय माझा आता पाहतोसी अंत’ या गाण्यांमुळे मराठी घरांमध्ये वाणी जयराम प्रसिद्ध झाल्या. गूंज उठी शहनाई, दो आँखे बारह हाथ, गुड्डी, रामराज्य यातील गाण्यांचे अतिशय सुंदर असे रसास्वादन त्यात आहे. ‘अमर भूपाळी’मधील ‘तुझ्या प्रीतीचे..’ हे गाणे ‘अर्धागिनी’मध्ये ‘बडे भोले हो’ असे नवे शब्द घेऊन कसे वेगळेच झाले, याचीही आठवण आहे. समूहगानाच्या क्षेत्रात देसाई यांच्या अपूर्व योगदानाची आहे. ‘जब तक सूरज चंदा चमके, गंगा जमूना मे बहे पानी’ असे टिकणारे वसंत देसाई यांनी संगीत दिले आहे. जवळजवळ ६५ हिंदी-मराठी चित्रपटांचे ते संगीत दिग्दर्शक होते. चित्रपट-नाटकांशिवाय त्यांनी बालगीतांना आणि समरगीतांनाही संगीत दिले. त्यांच्या ’ए मालिक तेरे बंदे हम’ या गीताला पाकिस्तानात राष्ट्रगीताचा दर्जा मिळाला. १९६२ च्या चीन युद्धाच्या वेळचे ’जिंकू किंवा मरू’ या ग.दि. माडगुळकर यांच्या गीताला त्यांनीच चाल लावली होती. १९४२ ते १९७६ या कालावधीत मा.वसंत देसाई यांनी एकूण ४६ चित्रपटांना उत्कृष्ट संगीत दिले. भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. मा.वसंत देसाई हे १९७३ साली मुंबईत भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांनी काही चित्रपटांत भूमिकाही केल्या होत्या. हिंदी व मराठी चित्रपटांमधे स्वत: गायलेली उत्तम गाणी त्यांनी दिली. १९६० ते १९७५ मध्ये संगीत नाटकांचे पुनरुज्जीवन करून त्यांना संगीत दिले. त्यांनी १३ लघुपटांनाही संगीत दिले. www.vasntdesai.com या वेब साईटवर मा.वसंत देसाई यांची गाणी,माहिती व फोटो आहेत.

    वसंत देसाई- कम्पोजर पार एक्सलन्स’ या नावाने पुस्तक लिहून श्री.विश्वास नेरुरकर यांनी संगीतकार वसंत देसाई यांची संपूर्ण कारकीर्द रसिकांना उपलब्ध करून दिली आहे. मा.वसंत देसाई यांचे २२ डिसेंबर १९७५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट /ग्लोबल मराठी

      December 22, 2016


  • हिंदीतील लेखक आणि पटकथाकार मनोहर श्याम जोशी

    मनोहर श्याम जोशी हे हिंदी भाषेचे प्रख्यात पत्रकार, लेखक आणि पटकथाकार!
    मनोहर श्याम जोशी यांना ‘भारतीय दूरदर्शनच्या सोप ओपेराचे जनक’ म्हटलं जातं कारण ‘हम लोग’ आणि ‘बुनियाद’ या दूरदर्शनवरच्या पहिल्या महामालिका त्यांच्याच सिद्धहस्त लेखणीतून उतरल्या होत्या. त्यांचा जन्म ९ ऑगस्ट १९३३ रोजी अजमेर येथे झाला.

    भारतीय समाजाचं प्रतिबिंब असणाऱ्या त्या मालिकांनी दर्शकांना अनेक वर्षं बांधून ठेवलं होतं. याशिवाय त्यांनी लिहिलेल्या ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’,‘काकाजी कहीन’,‘हमराही’,‘जमीन आसमान’,‘गाथा’यांसारख्या मालिकाही लोकप्रिय झाल्या होत्या. त्यांची ‘कसप’ ही कादंबरी तर हिंदी भाषेतल्या सर्वोत्तम प्रेमकथांमध्ये अग्रेसर मानली जाते. मनोहर श्याम जोशी यांच्या 'क्याप' कादंबरी करता २००५ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. त्यांनी हे राम, अप्पू राजा, पापा कहते है आणि भ्रष्टाचार यांसारख्या सिनेमांसाठी पटकथा-संवादही लिहिले आहेत.

    मनोहर श्याम जोशी यांचे ३० मार्च २००६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      August 9, 2021


  • विष्णु नारायण भातखंडे

    शास्त्रीय संगीतातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व व स्वरलिपीचे जनक

      May 19, 2011


  • केरो लक्ष्मण छत्रे

    (१८२५-१८८४)

    जन्म-१६ मे १८२५
    मुळ नाव - विनायक लक्ष्मण
    महाराष्ट्राचे आद्य गणिती व अर्वाचीन भास्कराचार्य, गणिततज्ञ व खगोल शास्त्रज्ञ,
    १८४० साली वयाच्या १५ व्या वर्षी कुलाबा वेधशाळेतील या म्हणून नेमणुक.
    १८५९ डेक्कन मधे कायमची नौकरी, ३ वेळा हंगामी प्रिन्सीपल म्हणून नेमणूक.
    १९६२ साली अंकगणिताचे पहिले पुस्तक
    १८६५ शुध्द निरयन पंचांग सुरू, टिळक पंचागचे मुळ प्रर्वतक

      March 11, 2015


  • डॉ. कुप्पलि वेंकटप्पा पुटप्पा

    कवी, नाटककार, कादंबरीकार, समीक्षक, विचारक, प्राध्यापक,म्हैसूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. कुप्पलि वेंकटप्पा पुटप्पा यांचा जन्म २९ डिसेंबर १९०४ रोजी झाला. महाकवी, राष्ट्रकवी, कथाकार, कादंबरीकार, नाटककार, विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, तत्त्वचिंतक, समीक्षक, विज्ञाननिष्ठ अशा अनेक अंगांनी कुवेंपु यांचा कन्नड साहित्य आणि कर्नाटकावर प्रभाव पडलेला दिसून येतो.

    कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्य़ातील तीर्थहळ्ळी तालुक्यातील माळेनाड क्षेत्रातील कुप्पळ्ळा गावी एका प्रतिष्ठित, सुसंस्कृत कन्नड भाषिक घरात त्यांचा जन्म झाला. पुटप्पांचे व्यक्तिमत्त्व देखणे, प्रभावी होते. राहते घर, भरपूर शेतीवाडी, अशा सधन, समृद्ध कुटुंबात त्यांचा जन्म झाला. १९१८ मध्ये हायस्कूलच्या शिक्षणासाठी ते म्हैसूरला आले. या शहरी वातावरणात, शाळेपेक्षा ते सार्वजनिक वाचनालयातच जास्त वेळ रमत. इंग्रजी वाचनाने ते विलक्षण प्रभावित झाले. या काळातच त्यांनी शेक्सपीअरपासून टॉलस्टॉयपर्यंत, सगळ्या महान साहित्यकारांच्या साहित्याचे पारायण केले. रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद यांच्या जीवनाचाही परिचय झाला.

    वर्डस्वर्थ हा त्यांचा आवडता कवी. याच शालेय वर्षांमध्ये ‘कुवेंपु’ यांनी इंग्रजीत काव्यरचना करायला सुरुवात केली. इंग्रजीबरोबर कन्नड साहित्याचे अनेक ग्रंथ त्यांनी वाचायला सुरुवात केली. व्यासांचे ‘महाभारत’ त्यांच्या अत्यंत आवडीचे महाकाव्य होते. शालेय शिक्षणानंतर त्यांनी ऐच्छिक विषय म्हणून ‘विज्ञान’ घेतले आणि ‘तत्त्वज्ञान’ विषयात बी.ए. केले. एम.ए. झाल्यावर म्हैसूर विद्यापीठात ते कन्नड शिकवू लागले. १९५५-५६ मध्ये ते महाराजा कॉलेजचे प्राचार्य होते. १९५६-६० या कालावधीत ते म्हैसूर विद्यापीठाचे कुलगुरू होते. या सर्व शैक्षणिक प्रवासात त्यांचे काव्यलेखन सुरू होते.

    भारतीय ज्ञानपीठाचा १९६७ चा सर्वश्रेष्ठ साहित्य पुरस्कार डॉ. कुप्पलि वेंकटप्पा पुटप्पा यांना त्यांच्या ‘श्रीरामायण दर्शनम्’ या कन्नड महाकाव्यासाठी प्रदान करण्यात आला होता. १९३५ ते १९६० या कालावधीत भारतीय भाषेतील प्रकाशित सर्जनात्मक साहित्यातील सर्वश्रेष्ठ साहित्यकृतीबद्दल देण्यात आला. १९६७चा ज्ञानपीठ पुरस्कार, गुजराती लेखक उमाशंकर जोशी यांच्यासह विभागून देण्यात आला होता. कुप्पलि वेंकटप्पा पुटप्पा यांचे ११ नोव्हेंबर १९९४ साली निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      December 29, 2018


  • भागोजी बाळूजी कीर

    दादरच्या जडणघडणीत, विशेषतः तिथल्या सामाजिक घडणीत काही मंडळींचा वाटा आहे. त्यांत एक भागोजी कीर हे आहेत. आज भागोजी कीर असते तर त्यांचा उल्लेख ‘मॅनेजमेंट गुरू’ असा झाला असता. त्यांची पुस्तकं निघाली असती. आयआयएममध्ये त्यांना लेक्चर देण्यासाठी पाचारण केलं गेलं असतं.

      July 12, 2022