जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
प्रभुदेवा सुंदरम याचा उर्फ प्रभूदेवा यांनी आपले करिअर एक डान्सर आणि अभिनेता म्हणून सुरू केले. त्यांचा जन्म ३ एप्रिल १९७३ रोजी म्हैसूर येथे झाला.मात्र त्याला अभिनयात फार यश गाठता आले नाही. मात्र एक डान्सर आणि कोरिओग्राफर म्हणून त्याने मोठे नाव कमवले. एक यशस्वी दिग्दर्शक म्हणूनही आज ते प्रसिद्ध आहेत. ‘भारताचा मायकल जॅक्सन’म्हणून ओळखला प्रभुदेवा यांना ओळखले जाते. आपल्या नृत्याने त्याने भारतातील कोट्यवधी नृत्यवेड्यांना जणू वेड लावले. प्रभुदेवा लहानपणापासून पित्याच्या नृत्यामुळे प्रभावित होते. त्याचे वडील साऊथ इंडियन फिल्म्समध्ये डान्स मास्टर होते. पित्याकडून प्रभुदेवा भरतनाट्यम आणि वेस्टर्न डान्स शिकला.प्रभुदेवाचे दोन्ही भाऊ राजू सुंदरम आणि नागेन्द्र प्रसाद दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत कोरिओग्राफर म्हणून कार्यरत आहेत. खरे तर प्रभुदेवाला अॅपक्टर व्हायचे होते. प्रभुदेवाने आपले करिअर एक डान्सर आणि अभिनेता म्हणून सुरू केले. मात्र अभिनयात त्याला फार यश गाठता आले नाही. प्रभुदेवाने आपल्या करिअरची सुरुवात डान्स कोरिओग्राफर म्हणून केली होती. मात्र नंतर त्याला अभिनय खुणावू लागला. प्रभुदेवा यांनी १०० हून अधिक चित्रपटाना नृत्य दिग्दर्शन केले आहे. अभिनेता म्हणून प्रभुदेवा यांनी अभिनेत्री रोजा के साथ इंदू या चित्रपटाने केली.
प्रभुदेवाने आपल्या फिल्मी करिअरमध्ये तामिळ, तेलगू, कन्नड, हिंदी अशा अनेक चित्रपटांत काम केले. नृत्यदिग्दर्शनासाठी प्रभुदेवा यांना दोनदा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. प्रभुदेवा यांनी प्रामुख्याने तमिळ , तेलगू, बॉलीवूड, मल्याळम आणि कन्नड चित्रपटात काम केले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
https://www.youtube.com/watch?v=Cg3oH5X-n3E
https://www.youtube.com/watch?v=KKqrCTgouEk
April 15, 2017
पुरातत्त्व शास्त्राची मुहूर्तमेढ रोवणारे आणि या क्षेत्रातील अभ्यासकांसाठी पितामह असलेले प्रा. डॉ. मधुकर केशव
ढवळीकर यांना यावर्षी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला.
प्रा. ढवळीकर यांचा जन्म १९३०चा. त्या काळात पुरातत्त्वशास्त्र अगदीच दुर्लक्षित होते. अर्थात आजही त्याबाबत सरकारी पातळीवर उदासीनता आहेच. त्यामुळे पदवी-शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतीय पुरातत्त्व विभागामध्ये १९५३ पासून टेक्निकल असिस्टंट म्हणून कामाला सुरुवात करून ढवळीकर यांना वेगळी दिशा पकडली. प्रा. ढवळीकर यांची अभ्यास, चिकाटी आणि विषयाचा चारी बाजूंनी विचार करण्याची वृत्ती यामुळे त्यांनी या शास्त्राच्या संशोधनात मूलभूत स्वरूपाचे कार्य केले.
July 26, 2011
निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, पद्मश्री व्ही.शांताराम यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९०१ रोजी कोल्हापूर येथे झाला. शांताराम राजाराम वणकुद्रे उर्फ व्ही. शांताराम हे भारतीय चित्रपट सृष्टीतलं सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलेलं नाव. शांताराम बापू या नावानं ते ओळखले जात. निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता अशा तिन्ही क्षेत्रांत त्यांनी आपला खोल ठसा उमटवला. दिग्दर्शक म्हणून अनेक नवीन संकल्पना त्यांनी पहिल्यांदा भारतीय चित्रपटसृष्टीत वापरल्या. जवळजवळ सहा दशकं ते चित्रपटसृष्टीत कार्यरत होते. त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली ती कोल्हापुरातील बाबुराव पेंटर यांच्या मालकीच्या `महाराष्ट्र फिल्म कंपनी'पासून. कंपनीत पडेल ते काम करता करता १९२१ साली निर्माण झालेल्या `सुरेखा हरण' या मूकपटात छोटीशी भूमिका केली. येथून त्यांची घोडदौड सुरू झाली.
१९२५ साली निर्माण झालेल्या `सावकारी पाश' या सामाजिक चित्रपटात त्यांनी एका तरुण शेतकर्यााची भूमिका केली आणि १९२७ साली त्यांनी `नेताजी पालकर' हा पहिला मूकपट दिग्दर्शित केला.बाबुराव पेंटर यांच्याकडे नऊ वर्षं नोकरी केल्यानंतर त्यांनी श्री. दामले, श्री. फत्तेलाल, श्री. धायबर आणि श्री. कुलकर्णी यांच्या भागीदारीत कोल्हापुरात `प्रभात फिल्म्स'ची स्थापना केली. तेथे शांताराम बापूंना आपली कला विकसित करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य मिळालं. `गोपाळ कृष्ण', `राणी साहेबा', `खुनी खंजर', `उदयकाल' असे एकापेक्षा एक सरस चित्रपट त्यांनी दिले.`प्रभात'चा पहिला मराठी बोलपट `अयोध्येचा राजा' १९३२ साली प्रदर्शित झाला. १९३३ साली त्यांनी `सैरंध्री' हा भारतातला पहिला रंगीत चित्रपट काढण्याचं धाडस केलं. पण चित्रपटाच्या प्रिंट्स नीट डेव्हलप न झाल्यामुळे हा प्रयत्न फसला. `प्रभात'ला खूप मोठे नुकसान सहन करावे लागले. पण त्यातून डगमगून न जाता शांताराम यांनी `अमृतमंथन'ची निर्मिती केली. हा चित्रपट तुफान यशस्वी ठरला. त्यानंतरचा १९३७ साली निर्मिलेला `संत तुकाराम' हा बोलपट भारतीय चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरला.
भारतात-विशेषत: महाराष्ट्रात-हा चित्रपट धो धो चालला. त्याची कीर्ती सातासमुद्रापार गेली. व्हेनीस चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखविण्यात आला. जरठ विवाहावर टीका करणारा `कुंकू' (दुनिया ना माने), वेश्येच्या पुनरुज्जीवनावर भाष्य करणारा `माणूस'(आदमी) आणि हिंदू-मुस्लीम दंग्यांच्या पार्श्वभूमीवर मैत्रीचा संदेश देणारा शेजारी (पडोसी) हे सामाजिक चित्रपट अफाट गाजले.शांताराम बापूंनी १९४२ साली प्रभात फिल्म कंपनी सोडली. त्यांनी मुंबईत येऊन `राजकमल कला मंदिर' या स्वत:च्या संस्थेची स्थापना केली.
`राजकमल'च्या माध्यमातूनही त्यांनी दर्जेदार चित्रपटांची मालिका सुरू ठेवली. `राजकमल'ने १९४६ साली डॉ. कोटणीसांच्या जीवनावर आधारीत `डॉ. कोटणीस की अमर कहानी', १९५१ सालचा होनाजी बाळांचा `अमर भूपाळी', १९५५ सालचा रंगीत `झनक झनक पायल बाजे', १९५७चा १९५९चा `नवरंग' हे चित्रपट विशेष उल्लेखनीय ठरले. `डॉ. कोटणीस' आणि `दो आँखे' या चित्रपटांमध्ये त्यांनी स्वत: नायकाची भूमिका केली होती. १९७२चा `पिंजरा' या चित्रपटाने मराठी चित्रपटांच्या लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मागे टाकले. `पिंजरा' मराठीतला पहिला संपूर्ण रंगीत चित्रपट होता.शांताराम बापूंना चित्रपट माध्यमाची भाषा उत्तमपणे अवगत होती.
बॉलिवूडचे सुप्रसिद्ध निर्माता-निर्देशक-नट चार्ली चॅप्लीन यांनी शांताराम बापू यांच्या दिग्दर्शनाचं कौतुक केलं होतं. शांताराम बापूंना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले. महाराष्ट्राचं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या आचार्य प्र. के. अत्रेंनी शांताराम बापूंना `चित्रपती' ही पदवी दिली. चित्रपट माध्यमातील व्यक्तींना दिला जाणारा भारतातला सर्वोच्य पुरस्कार `दादासाहेब फाळके पुरस्कार' १९८५ साली मा.शांताराम बापूंना प्रदान करण्यात आला, तर १९९२ साली भारत सरकारने त्यांना `पद्मविभूषण' पुरस्कार देऊन सन्मानीत केले.चित्रपटासाठीच्या विषयाची निवड, त्याचा आशय, कॅमेर्यामचे तंत्र, संकलन या सर्व बाबतीत बापूंचे चित्रपट काळाच्या पुढे असत.
चित्रपट हे कलेचं आणि मनोरंजनाचं माध्यम तर आहेच, पण यातून समाजाला योग्य तो संदेशही प्रभावीपणे देता येतो हे त्यांनी जाणले होते. शांताराम बापू अतिशय कडक शिस्तीचे होते. कलाकार आणि तंत्रज्ञांवर त्यांचा वचक असे. भारतीय चित्रपटात पहिल्यांदा ऍनिमेशनचा वापर केला तोही शांताराम बापूंनी. `बॅक लिट' प्रोजेक्शनचा वापर करणारे ते पहिले दिग्दर्शक. शांताराम बापूंनी तीन विवाह केले. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव विमल, दुसरी जयश्री आणि तिसरी संध्या. जयश्रीला किरण हा मुलगा आणि राजश्री ही मुलगी तर संध्या यांना प्रभात कुमार हा मुलगा आणि मधुरा पंडित ही मुलगी अशी अपत्ये आहेत.
`शांताराम' हे त्यांचं आत्मवृत्त मराठी आणि हिंदीमध्ये १९८६ साली प्रकाशित झालं आहे. आहे. व्ही.शांताराम यांचे ३० ऑक्टोबर १९९० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०७१३३
संदर्भ. इंटरनेट
November 18, 2018
साने गुरुजींनी लिहिलेल्या “श्यामची आई”वर प्र.के. अत्र्यांनी श्यामची आई चित्रपट बनवला. त्यात श्यामच्या आईची मुख्य व्यक्तिरेखा वनमालाबाईंनी साकारली. हा चित्रपट आणि त्यातील त्यांनी रंगवलेली आईची व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय ठरली. या भूमिकेसाठी त्यांना १९५३ सालचा भारतातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रपती पुरस्कार लाभला.
July 23, 2017
हा माणूस डॉक्टर होता, तो वकिलही होता, तो आयपीएस म्हणजे जिल्हा पोलिस प्रमुख दर्जाचा अधिकारी तसंच आयएएस म्हणजे कलेक्टर दर्जाचा अधिकारी होता. याशिवाय तो पत्रकारही होता. इतकंच नाही तो किर्तनकार, आमदार, खासदार आणि मंत्रीही होता. इतक्या पदव्या मिळवणारा ज्ञानयोगी म्हणजे श्रीकांत जिचकार होय. श्रीकांत जिचकार यांची भारतातील सर्वात शिक्षित व्यक्तींच्या पक्तिंत गणती होते.
June 2, 2021
इतिहासाबद्दल प्रेम असणाऱ्या आणि इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांना पुस्तकी किडे म्हणण्याची एक पद्धत आहे. प्रत्यक्षात इतिहासाचा मागोवा घेणाऱ्या प्रत्येकाला ज्या दिव्यातून जावे लागते, ते दिव्य करायला आपल्यापैकी कुणीही सहसा तयार होणार नाही. उपलब्ध कागदपत्रांचे विश्लेषण करून त्याची संगती लावणे, हे काम अतिशय अवघड आणि कौशल्याचे असते. एखाद्या कागदाचा खरेपणा तपासणे आणि अन्य उपलब्ध सामग्रीतून या कागदातील आशयाचे तथ्य जाणणे हे ज्ञान संपादन करण्याएवढेच कठीण असते.
पुण्यातील एक ज्येष्ठ इतिहास संशोधक वा. द. दिवेकर यांच्या निधनामुळे अशा ज्ञानमार्गातील एका यात्रिकाचा शेवट झाला आहे. अर्थशास्त्र आणि इतिहास हे दिवेकरांचे लाडके विषय. दोन्हीमध्ये त्यांना गती! इतिहासाबद्दलचा जिव्हाळा सांभाळतानाच अर्थशास्त्रासारख्या विषयाचाही लळा लागावा, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.
१८५७ च्या स्वातंत्र्यलढय़ाचा मागोवा घेण्यासाठी ते वर्षभर इंग्लंडमध्ये राहिले. याच काळात तेथील ग्रंथालयांमध्ये मिळालेल्या लोकमान्य टिळकांवरील कागदपत्रांचाही त्यांनी अभ्यास केला. जयंतराव टिळक यांच्या पुढाकाराने टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने हा मोठा प्रकल्प हाती घेण्यात आला, कारण या लढय़ाबाबतचा बराच तपशील मिळणे बाकी होते. दिवेकर यांनी त्याबाबत संशोधन करून ‘साऊथ इंडिया इन १८५७, द वॉर ऑफ इंडिपेन्डन्स’ या शीर्षकाचा ग्रंथ त्यांनी इंग्रजीतून सिद्ध केला. १८५७ च्या लढय़ात भाग घेणाऱ्या मुशाईसिंग यांची त्यांनी मिळवलेली माहिती थक्क करून सोडणारी होती. हाच ग्रंथ हिंदी आणि मराठीतूनही प्रसिद्ध झाला.
इंग्लंडमधील वास्तव्यात त्यांनी अभ्यास केलेल्या लोकमान्य टिळकांशी संबंधित कागदपत्रांच्या आधारे ‘टिळक इन लंडन’ हाही ग्रंथ समग्र टिळक या ग्रंथमालेतील नववा भाग म्हणून प्रसिद्ध करण्यात आला. इतिहासाची अर्थशास्त्राशी सांगड घालताना दिवेकर यांनी महाराष्ट्र आणि भारताच्या आर्थिक घडामोडींच्या इतिहासावर लक्ष केंद्रित केले. जगात आर्थिक विषयावरील संशोधनासाठी नावाजलेल्या पुण्यातील गोखले अर्थशास्त्र संस्थेत ग्रंथालयात काम करत असताना त्यांना या विषयाची गोडी लागणे स्वाभाविक होते. संस्थेत सुरू असलेल्या या विषयावरील संशोधनात त्यांचा वाटा होता.
गोखले अर्थशास्त्र संस्थेतून निवृत्त झाल्यानंतर भारत इतिहास संशोधन मंडळात त्यांनी संशोधनकार्यासाठी वाहून घेतले. स्वातंत्र्यलढय़ात अंदमान येथे कारावास भोगलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची माहिती संकलित करण्याचे कामही दिवेकर यांनी आत्मीयतेने केले. हे काम करीत असताना जे सैनिक हयात असल्याचे लक्षात आले, अशांचा शोध घेऊन त्यांचा मेळावाही त्यांच्या पुढाकाराने पुण्यामध्ये आयोजित करण्यात आला होता. आयुष्यभर संशोधनात मग्न असणाऱ्या दिवेकर यांनी आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात ठाणे जिल्ह्य़ातील विक्रमगड येथे आदिवासींसाठीच्या शैक्षणिक कार्यात रस घेतला.
दिवेकर पती-पत्नींनी आदिवासी मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांच्या अंगी अध्यापन कौशल्ये बाणवण्यासाठी खूप प्रयत्न केले. आदिवासी मुलांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारावा, यासाठी त्यांचे हे प्रयत्न खूप मोलाचे होते. आयुष्यात लौकिक अर्थाने काय मिळवायचे, अशा विवंचनेत असणाऱ्या अनेकांना दिवेकर यांचे आयुष्य म्हणजे एक आदर्श वाटावा असे होते. इतिहासातून जे काही शिकायचे, ते भविष्यासाठी उपयोगात आणायचे, याचे भान अनेकांना राहात नाही. हे भान येण्यासाठी नुसता अभ्यास किंवा संशोधन उपयोगाचे नसते. त्यासाठी आपल्या आयुष्याचा अर्थ लावण्याचीही गरज असते.
वा. द. दिवेकर यांनी आयुष्यभर नेमके हेच केले. त्यामुळेच गोखले अर्थशास्त्र संस्थेच्या ग्रंथालयात काम करत असताना, त्यांना ग्रंथांचा जो सहभाग मिळाला, तो त्यांचे आयुष्य घडवणारा ठरला. त्यांचे अलीकडेच पुण्यामध्ये ८३ व्या वर्षी निधन झाले.
August 5, 2017
निवृत्त संशोधक-भाभा अणु संशोधन केंद्र, निवृत्त संचालक, विज्ञान लेखक
December 15, 2010
१९६४ रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतलेल्या शास्त्रींनी अल्पावधीतच भारतीय राजकारणावर आपला ठसा उमटविला. १९६५ च्या पाकशी झालेल्या युद्धात देशास खंबीर नेतृत्व दिले आणि देशाची प्रतिमा उजळून टाकली. ‘जय जवान, जय किसान’ या त्यांच्या मंत्राने अवघा देश भारावून गेला.
January 11, 2022
(जन्म १९४२)
जागतिक कीर्तीचे पर्यावरण शास्त्रज्ञ. मुंबईच्या विज्ञान संस्थेमधून १९६५ मध्ये एम.एस्सी. आणि हार्वर्ड विद्यापीठाची १९६९ मध्ये पीएच.डी. पश्चिम घाट, राजस्थान, हिमालय, पनामा, पूर्व आफ्रिका, अमेरिका इथल्या पर्यावरणाचा प्रत्यक्ष अभ्यास. भारतांतील बायोस्फिअर रिझर्व्ह यांच्या कक्षा ठरवून त्यांचे नियम करण्यासाठी व निलगिरी बायोस्फिअर रिझर्व्हच्या घाटीत प्रत्यक्ष फिरून धोरण आखण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. सस्तन प्राण्यांची वागणूक पद्धती, आदिवासी जमातींच्या पर्यावरणाला अनुकूल जीवनपद्धती आणि वा. द. वर्तक यांचेबरोबर अभ्यासलेले देवरायांचे महत्त्व, हे त्यांचे संशोधन जगप्रसिद्ध आहे. माधव गाडगीळ यांना भटनागर पुरस्कार, भारतातील वैज्ञानिक संस्थांचे सदस्यत्व, भारत सरकारची पद्मश्री इत्यादी सन्मानप्राप्त झालेले आहेत. बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथून निवृत्त झाल्यावर ते पुण्यात स्थायिक झाले आहेत. १९८३ साली लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे भरलेल्या मराठी विज्ञान संमेलनाचे ते अध्यक्ष हते.
माहितीस्त्रोत - (म.वि.प.चा.) विज्ञानतंत्रज्ञान कोष
December 15, 2010
पठ्ठे बापूरावांचे खरे नांव श्रीधर कृष्ण कुलकर्णी. त्यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८८६ रोजी रेठरे हरणाक्ष ता. वाळवा, जि. सांगली येथे झाला. ग्रामीण भागात गायल्या जाणार्याी जात्यावरच्या ओव्यां ऐकूनऐकून पठ्ठे बापूराव यांनी त्यात ही नवे बदल केले. त्यांनाही `श्रीधरची गाणी ` लोकप्रियता मिळाली. त्याचा परिणाम औंधच्या राजांनी दखल घेऊन पठ्ठे बापूराव यांना आपल्याकडे बोलवून घेतले. पठ्ठे बापूराव यांचे पुढील शिक्षण औंध येथे झाले. गावी घरासमोर असलेल्या वाड्यातच तमाशाचा फड चालायचा.
ब्राह्मण आणि कुलकर्णीपद त्यामुळे रात्री पटकन उठून तमाशाला जाऊन बसायचे धाडस त्यांना होईना. मनातली तळमळही त्यांना गप्प बसू देईना. बापू चोरुन तमाशाला जाऊ लागले. तमासगीरांना त्यांनी अनेक लावण्या लिहून दिल्या. तमाशात बापूरावाच्या लावण्या आणि कवने गायली जाऊ लागली. `श्रेष्ठवर्ण मी ब्राह्मण असूनी ! सोवळे ठेवले घालूनी घडी !! मशाल धरली हाती तमाशाची लाज लावली देशोधडी !! ` ह्या जिद्दीने `कुबेराला लाजवील असे वैभव तमाशाच्या जोरावर पायाशी लोळवीन `हा संकल्प करुनच बापूराव घराबाहेर पडले. गावोगावी तमाशाचा फड उभे राहू लागे. त्यातून श्रीधरची वाहवा मिळता मिळता `पठ्ठेबापूराव ` म्हणून ते प्रसिद्धीला आले.
नंतर हे शाहीर, मुंबईत आले, बटाट्याच्या चाळीत राहू लागले. तिथेही तमाशाच्या फडात जाऊन त्यांना लावण्या रचून देण्याचे काम त्यांनी काही दिवस केले. याच काळात त्यांना नामा धुळवडकरांच्या फडातील पवळा, नामचंद पवळा भेटली. तिला काहीजण `मस्तानी ` ची उपमा द्यायचे. बापूरावांची काव्य प्रतिभा पवळाच्या सान्निध्यात बहरली. बापूरावांचे काव्य अन पवळा बाईच्या गोड गळ्याने व ठसकेबाज नृत्याने ती रसिकांच्यासमोर सादर केली बापूराव आणि पवळा यांची कीर्ती महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातत पसरली. १९०८-०९ साली छ. शाहू महाराजांसमोर त्यांनी `मिठाराणी' चा वग पठ्ठे बापूरावनी सादर केला. पुढे त्या दोघांवर सर्वांनी बहिष्कार टाकला. तमाशाचा फड बंद पडला. आर्थिक कोंडी झाली. त्यामुळे बापूराव व पवळा या जोडीने स्वत:ला ९०० रुपयांचा करार करून स्वत:चा लिलाव केला.
मुंबईच्या अबू शेठनी लिलाव घेतला. मुंबईच्या एल्फिस्टन थिएटरवर पवळा पठ्ठे बापूराव यांना पाहण्यासाठी तिकीट लावले. पण पुढे पवळा बेबनावामुळे पठ्ठे बापूरावांचा फड सोडून निघून गेली. पठ्ठे बापूरावांनी दुसर्याप स्त्रीला घेऊन त्यांनी तमाशाचा फड चालू ठेवण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आले नाही. पठ्ठे बापूराव यांचे २२ डिसेंबर १९४५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 16, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti