जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
December 15, 2010
आपल्या भारूडाने समस्त मराठी रसिकांना वेड लावणा-या विठ्ठल उमप यांनी आपल्या बहुआयामी कलासाधनेने अवघ्या महाराष्ट्रावर मोहिनी घातली होती. त्यांचा जन्म १५ जुलै १९३१ रोजी झाला. राज्याच्या लोककलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यामध्ये लोकशाहीर विठ्ठल उमप यांचं मोठं योगदान आहे.
विठ्ठल उमप यांचा मूळचा गळा विदर्भाचा असला, तरी नगर जिल्ह्यातील एका खेड्यात त्यांच्या घराण्याने भेदिकाची परंपरा सुरू ठेवली. विठ्ठल उमप यांचे वडील भेदिकाचे गायक पण उमप यांच्यावर भेदिकापेक्षा आंबेडकरी जलसा आणि सत्यशोधकी तमाशाचा विशेष प्रभाव पडला होता. मुंबईला उदरनिर्वाहासाठी आलेल्या उमप यांनी कामगार वस्तीत मेळ्यातून कामे केली. विठ्ठल उमप हे लोकशाहीर असले तरी त्यांना 'कवाल' म्हणूनच लोक पूर्वी ओळखत. पण नंतर मात्र त्यांनी वेगवेगळे प्रयोग करून, एक समर्थ लोककलावंत, अशी आपली ओळख निर्माण केली. लोकरंगभूमी, रंगभूमी, कव्वालीचे व्यासपीठ, काव्य संमेलने, रुपेरी पडदा, दूरचित्रवणीचा छोटा पडदा अशा अनेक माध्यमांमध्ये उमप यांचा सर्वत्र संचार होता. 'आला कागुद कारभारणीचा' ही लावणी, 'ऐका मंडळी कान देऊनी तुम्हा सांगतो ठेचात कुडी आत्म्याचं भांडण झालं भारी जोरात', 'भूक लागलीया पाठी कशासाठी पोटासाठी', 'माझ्या आईचा गोंधळ', 'आईचा जोगवा', 'आरती श्रीगणेशा जगदीशा', 'वादळ वारा तुफान येऊ द्या', 'ये दादा आवर रे', 'फाटकी नोट मना घेवाची नाय', 'भाता मीठ नही टाक्या' अशा वेगवेगळ्या लोकगीतांच्या गायनाने विठ्ठल उमप यांनी आपला स्वतंत्र ठसा लोकगीताच्या क्षेत्रात उमटविला. 'माझी मैना गावाकडं राह्यली' या गाण्यानं तर अनेकांचे डोळे पाणावले.
विठ्ठल उमपांनी अनेक कोळी गीते आणि भीम गीते रचली व गायली. त्यांनी लिहिलेल्या "जांभूळ आख्यान" या नाटकाचे आतापर्यंत ५०० हून अधिक प्रयोग झाले आहेत.
१९८३ साली विठ्ठल उमप यांनी आयर्लंडमधील कॉर्क लोकोत्सव गाजविला होता. विठ्ठल उमप केवळ लोकगीत गायनापाशी थांबले नाहीत. त्यांनी लोकरंगभूमीसोबतच नागर रंगभूमीवर संचार ठेवला. 'अरे रे संसार', 'अबक दुबक', 'विठो रखुमाय', 'खंडोबाचं लगीन', 'जांभुळाख्यान' या चाकोरीबाहेरच्या नाटकांसोबतच 'हैदोस', 'बुद्धम् शरणम्'सारखी नाटके त्यांनी वर्ज्य मानली नाहीत.
विहीर, टिंग्या, सुंबरान,या चित्रपटांमध्ये व डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटातूनही त्यांनी काम केले होते.लोककलेच्या सेवेसाठी आयुष्य वेचणा-या शाहीर विठ्ठल उमप यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. विठ्ठल उमप यांचे चिरंजीव आदेश, नंदेश आणि उदेश आता त्यांची परंपरा पुढे नेत आहेत.
विठ्ठल उमप यांचे २६ नोव्हेंबर २०१० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 26, 2018
तारा भवाळकर या लोकसाहित्याच्या अभ्यासक आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. लोकसंस्कृती आणि लोककला यांचा त्यांनी गाढा अभ्यास केला आहे. ‘मराठी पौराणिक नाटकांची जडणघडण’ या विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे. त्यांनी मराठी वाङ्मय कोश, तसंच मराठी विश्वकोशासाठी लेखन केलं आहे.तारा भवाळकर या लोकसाहित्याच्या अभ्यासक आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. लोकसंस्कृती आणि लोककला यांचा त्यांनी गाढा अभ्यास केला आहे. ‘मराठी पौराणिक नाटकांची जडणघडण’ या विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे. त्यांनी मराठी वाङ्मय कोश, तसंच मराठी विश्वकोशासाठी लेखन केलं आहे.
April 1, 2022
अनुताई वाघ ह्या आदिवासी क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्या व शिक्षणतज्ञ अशी ख्याती असलेल्या समाजसेविका.
त्या पुण्यातील हुजूरपागा शाळेत १३ वर्षे शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. महात्मा गांधीजींच्या “खेडयाकडे चला” या आदेशाने प्रेरित होऊन १९४५ साली ग्रामसेविकांच्या शिबिरात दाखल झाल्या. तेथे ज्येष्ठ शिक्षणतज्ञ ताराबाई मोडक यांच्याशी भेट झाली. बोर्डी येथे बालवाडीत शिक्षिका म्हणून अनुताईंनी काम केले. त्याकाळात बालवाडीत मुले येत नसल्यामुळे अनुताईंनीच मुलांच्या अंगणात जायचे ठरवले. त्यातूनच आंगणवाडी या संकल्पनेचा जन्म झाला.
१९५६ पासून त्यांनी ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथे शिक्षणकार्य केले. विशेष म्हणजे आजूबाजूच्या परिसराला जुळतील अशी बडबड गीते त्याचबरोबर “कोसबाडच्या टेकडीवरून” , “कुरणशाळा” , “टिल्लूची करामत”, अशी पुस्तके लिहिली. तसंच शिक्षण पत्रिका या मासिकाचे संपादन देखील केले.
अनुताई वाघ यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार, दलित मित्र, आदर्श माता, सावित्रीबाई फुले बालकल्याण राष्ट्रीय पुरस्कार, जमनालाल बजाज, दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा आशा भोसले पुरस्कार, रमाबाई केशव ठाकरे या पुरस्कारांसोबतच भारत सरकारच्या “पद्मश्री” या किताबाने देखील सनमानित करण्यात आले होते.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
January 3, 2015
ग्रामीण भागातील ‘रोजगार निर्मिती’ या क्षेत्रात देशातील इतर राज्यांना आदर्शकृत ठरलेल्या महाराष्ट्राच्या रोजगार हमी योजनेचे जनक आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापतिपद अठरा वर्षे सांभाळणारे ज्येष्ठ गांधीवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वचिंतक विठ्ठल सखाराम तथा वि. स. पागे यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू होते.
July 27, 2024
चित्रपट आणि नाटक या दोन्ही क्षेत्रांत सारखीच चमकदार कामगिरी करणाऱ्या थोड्या कलावंतांमध्ये "गंधर्वभूषण‘ जयराम शिलेदार यांचे नाव आजही मोठ्या आदराने घेतले जाते. गंधर्वभूषण जयराम शिलेदार यांचा जन्म ६ डिसेंबर १९१६ रोजी झाला. वयाच्या १६ व्या वर्षी रंगदेवता रघुवीर सावकारांच्या कंपनीत त्यांनी नाट्यकलेचा श्रीगणेशा केला. नंतर गंधर्व नाटक मंडळींमध्ये नटसम्राट बालगंधर्वांबरोबर नायकाची भूमिका करण्याची संधी मिळाली. चित्रपटात ललिता पवार, सुमती गुप्ते, तर नाटकात हिराबाई बडोदेकर, शांता आपटे, मीनाक्षी, जयमाला शिलेदार यांच्याबरोबर त्यांची कारकीर्द गाजली.
गणपतराव बोडस, चिंतामणराव कोल्हटकर, केशवराव दाते यांचे मार्गदर्शन मिळाले. अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी सुरू केलेल्या संगीत नाटकांना, बालगंधर्व, संगीतसूर्य केशवराव भोसले, मास्टर दिनानाथ यांच्यामुळे सोन्याचे दिवस दिसले. संगीत रंगभूमीने मराठी भूमीतल्या संगीत रसिकांना झपाटून टाकले. पण बोलपटांच्या युगाने संगीत रंगभूमीला उतरती कळा लागली. महाराष्ट्रातल्या बहुतांश संगीत नाटक संस्था हळूहळू बंद पडल्या.
राम जोशी या चित्रपटाने लोकप्रियतेचे शिखर गाठलेल्या जयराम शिलेदार जयमाला शिलेदार यांच्याशी विवाह केला. या दोघांनी मराठी संगीत रंगभूमीवर आपल्याच कर्तृत्वाने नवे युग सुरू केले. जयराम यांना चित्रपटांमुळे लोकप्रियता मिळाली होती तरी, त्यांचा जीव मात्र संगीत रंगभूमीवरच घुटमळत होता. जयमाला यांची साथ मिळताच त्यांनी चित्रपटसृष्टीकडे पाठ वळवली आणि संगीत रंगभूमीच्या पडत्या काळात, संगीत रंगभूमीला वाचवायसाठी पुढचे आयुष्य संगीत रंगभूमीसाठीच समर्पित केले.
संगीत रंगभूमीलाही ओहोटी लागली, तेव्हा जयराम आणि जयमाला शिलेदार यांनी "संगीत मराठी रंगभूमी' ही संस्था स्थापन करून, संगीत नाटकांची परंपरा पुनरूज्जीवित तर केलीच, पण पुन्हा संगीत रंगभूमीच्या वैभवी परंपरेचे दर्शनही संगीत रसिकांना घडवले. जयमाला आणि जयराम शिलेदार यांचा संगीत नाटक हाच प्राण आणि सर्वस्व होते. संगीत रंगभूमीसाठी त्यांनी अपार कष्ट केले, पण त्याचा गाजावाजा कधीही केला नाही.
संगीत रंगभूमीची सेवा ही त्यांनी निर्मोहीपणे केलेली नटराजाची सेवा होती. संगीत सौभद्र, सुवर्ण तुला, संशय कल्लोळ, स्वयंवर, एकच प्याला, शाकुंतल, मृच्छकटिक, मानापमान, ही एककाळ लोकप्रियतेचा कळस गाठलेली नाटके या दोघांनी सातत्याने रंगभूमीवर सुरू ठेवली. नव्या युगात संगीत रंगभूमीचा प्रेक्षकवर्ग कमी झाल्यामुळे, ही नाटके चालणार नाहीत, हा समजही त्यांनी खोटा ठरवला. कोल्हापूर, सांगली, सोलापूर या शहरात संगीत रंगभूमीचे महोत्सव होत. तेव्हा विदर्भ, मराठवाड्यातून आणि कर्नाटकातूनही संगीत नाट्य रसिक आवर्जून ही सारी नाटके पहायसाठी त्या शहरात मुक्काम ठोकून असत.
४५ हून अधिक संगीत नाटकांचे सहा हजारहून अधिक प्रयोग केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संगीत नाटकाची पताका फडकवत ठेवली. जयराम शिलेदार यांच्या निधनानंतर "गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्यसेवा ट्रस्ट' ही संस्था स्थापन जयमाला शिलेदार यांनी केली. २०१२ मध्ये जयराम शिलेदार यांचे आत्मचरित्र, "फोटो बायोग्रॉफी‘मधून लोकांसमोर आले.
जयराम शिलेदार यांचे ६ नोव्हेंबर १९९२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 10, 2019
अभ्यंकर कृष्णा दामोदर आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त खगोलभौतिकीतज्ञ, हैद्राबाद येथील उस्मानिया विद्यापीठामध्ये खगोलशास्त्र विभागप्रमुख.
December 15, 2010
राजकपूरने तिला पाहिले, त्यावेळी तो एका मुलीच्या शोधात होता बरसात या चित्रपटासाठी . त्याने निम्मीला तिचे नाव विचारले तेव्हा निम्मीने आपले नाव सांगितले नवाब बानो . आठ-दहा दिवसानी मेहबूब स्टुडिओंमधून बोलावणे आले , तयार रहा तुझी स्क्रीन टेस्ट घ्यायची आहे.
September 5, 2021
‘लगे रहो मुन्नाभाई’ मधील ‘खटय़ाळ म्हातारा’ प्रधानांनी रंगविला. भूमिका छोटीशीच असली तरी ते आपली छाप पाडून गेले. ‘जब वुई मेट’मधील त्यांच्या ‘स्टेशन मास्तर’ही प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. पण हिंदी चित्रपट आणि तेथील वातावरणात ते फारसे रमले नाहीत.
June 24, 2022
ते एक चांगले व्यवसायिक आहेतचं.. पण त्या पेक्षा ते नाशकात किंवा महाराष्ट्रात लोकप्रिय कवी आणि नाटकातल्या दिग्दर्शन-अभिनयाकरिता ओळखतात.
June 28, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti