(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सदाबहार गाण्यांचे संगीतकार हेमंत भोसले

    १९७० ते १९८५ या कालावधीत त्यांनी संगीतकार म्हणून संगीत क्षेत्रात मोलाची कामगिरी केली. अनपढ, दामाद, धरती आकाश, नजराना प्यार का, राजा योगी, टॅक्सीी टॅक्सीन, बॅरिस्टर, तेरी मेरी कहानी, आया रंगीला सावन अशा काही हिंदी चित्रपटांतील गाण्यांना त्यांनी संगीत दिले. "शारद सुंदर चंदेरी राती‘, "बाळा माझ्या नीज ना‘, "मी ही अशी भोळी कशी गं‘, "जा जा जा रे नको बोलू‘ ही त्यांची मराठीतील गाजलेली गाणी आहेत.

    "शारद सुंदर चंदेरी राती‘ हे गाणे आशाताईंनी गायले आहे. संगीतकार म्हणून हेमंत भोसले यांनी आपली छाप चांगली उमटवली होती. आशा भोसले यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव व लता दिदींचे भाचा..हेमंत भोसले यांचे २८ सप्टेंबर २०१५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.विकी पिडीया

    हेमंत भोसले यांनी संगीत दिलेली काही गाणी
    मीही अशी भोळी कशी ग ?
    भोळी खुळी !
    मी लाजले, जे मना वाटले-
    ते राहिले माझ्या

      September 28, 2017


  • आजीबाई वनारसे

    आजीबाई वनारसे

    लंडन मध्ये अस्सल मराठी जेवण मिळते हे कळल्यावर त्यांच्याकडे तिथे गेलेल्या मराठी मुलांची आणि कामाला गेलेल्या एकट्या बाप्यांची रीघ लागली, पुढे या बाईंनी कॉट बेसिस वर रहायला जागा द्यायला सुरवात केली, असे होता होता आजीबाईंची खानावळ इतकी प्रसिध्द झाली कि लंडन ला जाऊन त्यांच्याकडे न गेलेला मराठी माणूस मिळायचा नाही.

      June 8, 2017


  • टेनिस कोर्टच्या राण्या – विल्यम्स भगिनी

    गुंडांच्या वसाहतीत त्यांचे घर. घराच्या जवळ अतिशय प्राथमिक अवस्थेतील टेनिस कोर्ट आणि त्यावर सराव करणाऱ्या दोन लेकी आणि बाप. अचानक गोळीबार सुरू व्हायचा. या तिघांना लपायलाही जागा नसायची. अनेकदा तिघेही कोर्टवरच लोळण घेऊन आपला बचाव करायचे. गोळीबार, गरिबी, प्राथमिक सुविधांचा अभाव असे सर्व विरोधीच वातावरण आणि त्या सर्वांवर मात करणाऱ्या विल्यम्स भगिनी, त्यांचे वडील रिचर्ड यांनी अमेरिकेच्याच काय; पण महिला टेनिसविश्‍वात नवा अध्याय लिहिला. झोपडीवजा घर ते काही मिलियन डॉलरमधील कमाई असा त्यांचा प्रवास आजही सर्वांना अचंबित करून सोडणारा आहे. जगभरातील महिला टेनिसपटूंमध्ये नवा आत्मविश्‍वास निर्माण करणारा आहे.

    रिचर्ड विल्मस कृष्णवर्णीय. प्रगत अमेरिकेत सर्व प्रकारची अवहेलना सहन करून जगणारा. प्रसंगी चोऱ्या करणारा आणि जगणारा. त्याची ओरेन्सशी ओळख झाली. ओळखीचे प्रेमात रूपांतर. दोघेही गरिबीचे चटके सोसत मोठे झालेले. ओरेन्स तर तीन मुलांची आई. नवऱ्यापासून विभक्त झालेली. रिचर्ड दूरचित्रवाणी वाहिन्यांवर टेनिस बघतो. तेथील बक्षिसांची रक्कम पाहून अवाक्‌ होतो. ओरेन्सला म्हणतो, आपल्याला आणखी दोन अपत्ये हवी आहेत. मी, दोघांना विश्‍वविजेते घडवेन. मी उत्तम प्लॅनर आहे... त्याने बाजारात जाऊन टेनिसची काही जुनी पुस्तकेही विकत घेतली. दोघांनीही टेनिसचा अभ्यास सुरू केला.

    व्हीनसचा जन्म 17 जून 1980 चा. पुढील वर्षी सेरेनाचा. वयाच्या चौथ्या वर्षापासून रिचर्डने या दोघींच्या हाती रॅकेट सोपविली. रेल्वे ट्रॅकच्या बाजूला त्यांचे तीन खोल्यांचे झोपडीवजा घर. सारा परिसर गुंडगिरीने व्यापलेला. गोळीबार, हाणामाऱ्या, खून असे प्रकार नित्याचे. गुन्हेगारीच्या या चिखलात विल्यम्स नेटाने दोन कमळे फुलवित होता. कृष्णवर्णीय आणि गोरे अशा संघर्षाला प्रत्युत्तर देण्यासाठी आणि गरिबी हटविण्यासाठी. तासन्‌ तास सराव सुरू असायचा. प्रशिक्षक नव्हता. दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील सामने, काही सामन्यांच्या कॅसेट, मिळेल ती रॅकेट, अनवाणी आणि दुर्दम्य इच्छाशक्ती अशा आयुधांवर जग जिंकण्याचा हा प्रवास सुरू झाला.

    वयाच्या साडेचार वर्षापासून दोघींनी स्पर्धात्मक टेनिस खेळायला सुरवात केली. पुढील पाच वर्षांत दोघींनी अमेरिकेतील ज्युनिअर गटाच्या सर्व स्पर्धा जिंकल्या. दोघींचे वडीलच प्रशिक्षक. त्यांनी दोघींना अतिशय आक्रमक घडविले. फक्त "जिंका‘ हाच कानमंत्र दोघींना दिला. दोघीही उंचीने ताडमाड होत्या. व्हीनस तर वयाच्या अकराव्या वर्षीच सहा फूट उंचीची झाली होती. तिची उंचीच तिला प्रतिस्पर्धांवर मात करण्यासाठी मोठी मदत करीत होती. दोघींचा सर्व्हिसचा भन्नाट वेग पाहूनच दोघी टेनिसमधील आश्‍चर्य आहेत, असा गवगवा अमेरिकेत झाला होता आणि घडलेही तसेच. दोघीही आपला आक्रमक खेळ, वेगवान सर्व्हिस, दीर्घ व्हॉलीज करण्याची क्षमता यांवर जागतिक विजेत्या झाल्या. टेनिसच्या सम्राज्ञी झाल्या. ग्रॅंड स्लॅम जिंकणाऱ्या पहिल्या दोघी बहिणी म्हणून त्यांची इतिहासात नोंद झाली. पैसा आणि प्रसिद्धीने पायाशी लोळण घेतली. दोघीही अनेक सामन्यांतून आमने-सामने आल्या. एकमेकींविरोधात खेळतानाही त्यांनी आपल्यातील जिगर कायम ठेवली.

    सेरेना म्हणते, ""व्हीनस माझी आदर्श आहे. तिची प्रगती मला सतत प्रोत्साहित करते. तिचा पराभव मला चुकांमधून खूप काही शिकवून देतो. मी तिचा हात धरूनच मोठी झाले. माझे वडील आणि ती माझे पहिले गुरू आहेत.‘‘

    व्हीनस एका मुलाखतीत म्हणते, ""आमच्या प्रसिद्धीनंतर आमच्या वागणुकीत फरक पडला नव्हता; पण माध्यमातून उलटसुलट बातम्या येतात. आम्ही त्याला फारशी किंमत देत नाही. माझ्या कुटुंबाला माहीत आहे, की आम्ही कशा आहोत. अशा अफवा नंतर वाहूनही जातात आणि आता तसेच होते आहे.‘‘
    टेनिसशिवाय इंटेरिअर डिझाइनरचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व्हीनसने स्वतःची कंपनी उघडली आहे. त्याशिवाय तिने अभिनयाचा शौक अनेक मालिकांमधून पूर्ण करून घेतला आहे. ती म्हणते, ""मी टेनिसस्टार झाले नसते तर मोठी अभिनेत्री झाले असते. नाटक माझ्या अंगातच आहे.‘‘
    सेरेना विल्यम्स अधिक धार्मिक आहे. त्या संदर्भातील वाचन हा तिचा आवडीचा विषय आहे.

    -- दीपक गायकवाड

      March 12, 2017


  • सदाशिव पांडुरंग देशपांडे

    निवृत्त प्राध्यापक, भगुभाई मफतलाल पॉलिटेक्निक, विलेपार्ले

      December 15, 2010


  • मातृभूमीसाठी आपल्या प्राणांचे बलीदान करणारे अनंत लक्ष्मण कान्हेरे

    नाशिक येथील एका नाटकगृहामध्ये किर्लोंस्कर मंडळीच्या शारदा या नाटकाचा प्रयोग होता. त्याला कलेक्टर जॅक्सन यांना आमंत्रण होते व जॅक्सन यांनी ते स्वीकारले होते. ही बातमी सर्वत्र पसरली होती. लोकांमध्ये खूप उत्सुकता होती. अनंत कान्हेरे यांनी ही संधी साधण्याचे ठरवले. ठरल्याप्रमाणे जॅक्सन आले व त्यांच्या खास ठरविलेल्या राखीव खुर्चीवर बसले. अनंत कान्हेरे तेथे जवळच होते. क्षणार्धामध्ये त्यांनी आपले पिस्तूल काढले व जॅक्सन यांच्यावर सात आठ गोळयांच्या वर्षाव केला जॅक्सन जागेवरच ठार झाले. तो दिवस होता, २१ डिसेंबर १९०९.

      April 19, 2022


  • दिलीप पाडगावकर

    काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी काश्मीर कमिटीचे काम ते करत होते. जून महिन्यापासून धुमसत असलेल्या काश्मीर खोऱ्यात शांततेची फुंकर घालण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून राबवलेल्या आठ कलमी कार्यक्रमांतर्गत काश्मिरी जनतेशी संवाद साधण्यासाठी केंद्र सरकारचे संवादक म्हणून त्यांची अलिकडेच नियुक्ती करण्यात आली होती.

      June 30, 2022


  • सुमतीबाई सुकळीकर

    बुढाणा जिल्ह्यातील मेहेकर या गावी सधन शेतकर्‍याच्या घरात जन्मलेल्या सुमती देशमुखच्या पुढे सुमती सकळीकर आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या लोकमाता असा त्यांचा प्रवास नक्कीच विलोभनीय आहे. त्यांचे वडिल मेहेकर हे संघाचे कार्यकर्ते होते, त्यामुळे सुमतीबाईंवर ही हिंदुत्ववादी विचारांचा संस्कार होत गेला.

      June 25, 2013


  • ख्यातनाम उर्दू शायर आणि ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित शहरयार

    उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील आँवला गावात जन्मलेल्या अखलाक मुहम्मद खान ऊर्फ कवी शहरयार यांच्या कुटुंबात लष्करी सेवेची परंपरा होती. त्यांचा जन्म १६ जून १९३६ रोजी झाला. त्याचे वडिल पोलीस अधिकारी होते. त्यांच्या सतत बदल्या व्हायच्या. त्यामुळे त्याच्या प्राथमिक शिक्षणाचे काही दिवस वडिलांची पोस्टिंग असलेल्या ठिकाणी झालं. त्यानंतर हरदोईमध्ये काही वर्षे घातल्यानंतर त्यांना १९४८ मध्ये अलीगढला पाठवण्यात आलं. त्यावेळी त्यांना तिथल्या सरकारी शाळेत प्रवेश मिळाला नाही. म्हणून त्यांना सिटी स्कूलमध्ये प्रवेश घ्यावा लागला. आजवरचं त्याचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालं होतं, मात्र सरकारी शाळेत प्रवेश न मिळाल्यामुळे त्यांना उर्दू माध्यमातून शिकावं लागलं. त्यानंतर शालेय शिक्षण पूर्ण करून ते अलीगढ मुस्लीम विद्यापीठात पोहचले. त्यानंतर ते अलिगड मुस्लीम विद्यापीठात उर्दूचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथेच ते उर्दूचे विभागप्रमुख म्हणून सेवा निवृत्त झाले. जेव्हा उर्दू साहित्यात नवतेची आणि आधुनिकतेची लाट आली होती, त्याच काळात शहरयार यांनी उर्दू साहित्यलेखनात प्रवेश केला. त्यांचे अनेक समकालीन काळाच्या ओघात बाजूला पडले, पण शहरयार यांनी नव्या पिढीलाही आपल्या शायरीची भुरळ घातली. १९६५ साली शहरयार यांच्या पहिल्या काव्यसंग्रहाने त्यांच्याकडे लक्ष वेधले गेले होते. त्यातील ‘सीने में जलन आँखों में तूफान सा क्यूँ है, इस शहर में हर शख्स परेशान सा क्यूँ है’ सारख्या गझलेने अली सरदार जाफरी यांच्यासारख्या शायराकडून पोचपावती मिळाली. अर्थात ही गझल पुढे ‘गमन’ चित्रपटातून भारतभर पोचली. पुढच्या टप्प्यात त्यांचे आणखी संग्रह आले. ‘ख्वाब के द्वार बंद है’ सारख्या संग्रहाने नव्याने त्यांच्याकडे लक्ष गेले. साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.

    ‘उमराव जान’ चित्रपटातील गझलांनी त्यांना दर्दी चित्रपटप्रेमींच्या हृदयापर्यंत पोचवले. उमराव जान या चित्रपटासाठी त्यांनी लिहीलेल्या ‘दिल चीज क्या है आप मेरी...’, ‘यह क्या जगह है दोस्तो’, ‘इन आँखो की मस्ती में’ या गझला आजरामर ठरल्या. त्यांनी बॉलीवूडमध्ये गमन, अंजुमन यासह अनेक चित्रपटांसाठी गीतलेखन केले. त्यांच्या अभिजात दर्जामुळे चित्रपट गीतेही चिरस्मरणीय ठरली. ख्वाब का दर बंद है या काव्यसंग्रहासाठी त्यांना १९८७ साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यांचे इस्मे आजम, सातवाँ दर आणि हिज्र के मौसम हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. २००८ साली ख्वाब के दर बंद है या काव्यसंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले शहरयार यांचे निधन १३ फेब्रुवारी २०१२ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      June 16, 2018


  • ज्येष्ठ नाटककार विद्याधर गोखले

    ज्या काळात संगीत रंगभूमीला कठीण काळ आलेला होता त्यावेळी आपल्या संगीत नाटकांद्वारे रंगभूमीला पुनरूज्जीवन देणारे ज्येष्ठ नाटककार म्हणजे विद्याधर गोखले. त्यांचा जन्म ४ जानेवारी १९२४ रोजी झाला. पण ही त्यांची ओळख पुरेशी नाही. कारण पत्रकार आणि ज्येष्ठ संपादक म्हणूनही विद्याधर गोखले यांचा महाराष्ट्राला परिचय आहे.

    त्यांचे वडील संभाजीराव गोखले हे मध्यप्रदेशाच्या काँग्रेस प्रशासनात मंत्री होते. लहानपणी घरातून मिळालेल्या संस्कारांचा विद्याधर गोखले यांच्यावर प्रभाव होता. अमरावती येथे पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर १९४४ मध्ये ते मुंबईला आले. जनरल एज्युकेशन सोसायटीच्या कुर्ला येथील शाळेत इंग्रजी, मराठी आणि संस्कृत विषयाचे त्यांनी अध्यापन केले. एक विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून ते ओळखले जात. यानंतर विद्याधर गोखले यांनी दैनिक लोकसत्तामध्ये बरीच वर्षे पत्रकारिता केली व त्यानंतर पाच वर्ष त्यांनी संपादक म्हणूनही काम पाहिले. पत्रकारिता करीत असताना वृत्तपत्राबरोबरच त्यांची लेखणी नाटयलेखन करू लागली. संगीत नाटकांच्या परंपरेचा वारसा त्यांनी पुढे चालवला. विद्याधर गोखले यांनी एकूण १८ नाटके लिहिली. त्यापैकी काही ऐतिहासिक, पौराणिक तर सामाजिक विषयांवर आधारित आहेत.

    त्यांची संगीत नाटकं तर लोकप्रिय झालीच पण त्यातील पदांनी आजपर्यंत मराठी मनाला भुरळ घातली आहे. ‘संगीत सुवर्णतुला’, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘मंदारमाला’ , ‘जावयाचे बंड’, ‘चमकला ध्रुवाचा तारा’, ‘जयजय गौरीशंकर’ ही संगीत नाटकं लोकप्रिय झालीच पण ‘साक्षीदार’, ‘अमृत झाले जहराचे’, ‘मदनाची मंजिरी’, ‘स्वरसम्राज्ञी’ ही त्यांची पाश्चात्य कृतीवर आधारित असलेली संगीत नाटकं. तर ‘बावनखणी’ हे पेशवे काळावर लिहिलेले संगीत नाटक. ‘गझल सम्राट गालिब’, ‘शायरेआजम’, ‘शायरीचा शालिमार’ ही गालिबचे काव य आणि गालिबचे चरित्र यावरील पुस्तके आहेत. तर फार्सी, उर्दू, हिदी, मराठी आणि संस्कृत कवींच्या कथा सांगणारे ‘कविकथा’ हे त्यांचे पुस्तकही गाजले होते. ‘शंकर सुखकर हो’ हा नाट्यविषयक संदर्भांचा संग्रह नाटकाबद्दल एक वेगळीच ष्टी देऊन जातो.

    विद्याधर गोखले यांची लेखणी राजस, रसिकतेची साक्ष देणारी विविधांगी आणि प्रतिभावान अशीच होती. लोकसत्तेतले त्यांचे अग्रलेख हा उत्कृष्ट संपादनाचा, लेखनाचा एकेक नमुना होता. ‘रंगशारदा’ ही संगीत नाटकांना प्राधान्य देणारी नाट्यसंस्था त्यांनी स्थापन केली. नाटकात नृत्ये योजण्याचा उपक्रमही त्यांनीच सुरू केला. विद्याधर गोखले २६ सप्टेंबर १९९६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      September 26, 2017


  • रामनाथ मोते

    नाशिक जिल्ह्यातील कुंभारी गावी जन्मलेल्या रामनाथ मोते यांनी ठाणे जिल्ह्यात उदरनिर्वाहासाठी येवून नावलौकिक मिळविले. आभ्यासवृत्ती, परिश्रम, व शिक्षण विकासाच्या आंतरिक तळमळीमुळे मोतेंनी दोन वेळा कोकण विभागाच्या शिक्षक मतदार संघाची निवडणूक प्रचंड मतधिक्याने जिंकली. कोकण विभागातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. शिक्षकाची समस्या, व वेदना ती आपली वेदना असे मानून तश्या भावनेने व तीव्रतेने वागण्याचे संस्कार त्यांच्यावर महाराष्ट्र शिक्षक परिषदेने केले.

    पहिल्या टर्ममध्ये मोतेंनी अनेक शिक्षकहिताचे प्रलंबित प्रश्न अत्यंत कल्पकतेने मार्गी लावले होते. शिक्षण क्षेत्रातील शासन स्तरावर असा एकही प्रश्न राहिलेला नाही, की ज्यांना त्यांचा परिसस्पर्श लागायचा राहिला आहे. कायम विनाअनुदानित धोरणातील कायम शब्द काढण्यासाठी शिक्षक परिषदेच्या माध्यमातून तसेच विधी मंडळात त्यांनी केलेले प्रयत्न सर्वश्रुत आहेत; ज्यामध्ये मागासवर्गीयांच्या आरक्षणात वाढ करणे, अल्पसंख्यांकांसाठीच्या सोयी सवलती मिळवून देणे, शिक्षक-शिक्षकेतरांना ६ वा वेतन आयोगातील त्रुटी दूर करून तो तत्काळ लागू करणे, त्रिस्तरीय वेतनश्रेणी, अनुकंपा तत्वावरील नेमणूका करणे, वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीमध्ये सुधारणा करणे, शिक्षकांना दिली जाणारी सगळी अशैक्षणिक कामे बंद करावीत, अंध अपंगांना शाळा, तसेच तंत्रशिक्षण संस्था व त्यातील कर्मचारांच्या समस्यांबाबत, आश्रमशाळा कर्मचार्‍यांवर होणारे अन्याय, शालेय विद्यार्थ्यांना मिळाणार्‍या शिष्यवृत्तीधारकांच्या संख्येत वाढ करणे, शिक्षण विभागातील अधिकार्‍यांकडून होणार्‍या भ्रष्टाचाराला आळा घालणे अशा सर्वच विषयांबाबत ते जागृत राहिले असून विधीमंडळामध्ये त्यांनी या समस्यांना वारंवार वाचा फोडून सरकारला त्याबाबतीत काही ठोस योजना व धोरणे आखण्यास प्रवृत्त केले आहे.

    त्यांच्या या कामांचे अहवाल सात खंड निवडणूकी दरम्यान शिक्षक परिषदेने प्रकाशित केलेले आहेत. या कामाशिवाय पत्रकारांना सुरक्षितता, पोलिस कर्मचार्‍यांचे प्रश्न, प्रदुषण, दुरचित्रवाणी वाहिन्यांवरून प्रक्षेपित होणार्‍या अश्लिल व हिंसाचारी कार्यक्रमांवर बंदी घालणे, बेरोजगारी, भ्रष्टाचार, गुन्हेगारी अनाधिकृत बांधकामे असे अनेक समाजहिताचे विषयही विधीमंडळामध्ये उपस्थित करून त्यावर चर्चा घडवून त्यावर उपाययोजनाही सुचविल्या आहेत. राष्ट्रकुल मंडळाने महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवाचे औचित्य साधून त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते विधीमंडळातील उत्कृष्ठ आमदार हा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे.

    दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित

      January 3, 2015