जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
कुमार गंधर्व यांचा बेळगावजवळच्या सुळेभावी खेड्यात कानडी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म ८ एप्रिल १९२४ रोजी झाला. त्यांचे मूळ नाव शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकली. लहान वयातच त्यांनी आपल्या गायकीची चमक दाखवली. आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीने त्यांनी रसिकांवर अक्षरशः गारुड केले. घराणेशाहीच्या चौकटीत बंदिस्त व्हायला त्यांनी साफ नकार दिला. त्याऐवजी आपली स्वतःची गानशैली जनमानसात रुढ केली.
१९३० आणि १९४० च्या दशकात पंडित बी. आर. देवधर यांचे शिष्यत्व त्यांनी स्वीकारले. त्यावेळीच मा.कुमार जींच्या नावाचा दबदबा भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रात निर्माण झाला. एप्रिल १९४७ मध्ये भानुमती कंस यांच्याशी कुमार जींचा विवाह झाला आणि ते मध्य प्रदेशातील देवासमध्ये स्थायिक झाले. त्याचवेळी काळाने त्यांच्यावर आकस्मिक आघात केला. त्यांना टीबीची बाधा झाली. या दुखण्याने त्यांची फुफ्फुसे खालसा केली. असं म्हणतात की, या दुखण्यात त्यांचं एक फुफ्फुस कायमस्वरुपी निकामी झालं. पत्नी मा.भानुमती यांनी याकाळात त्यांची सेवाशुश्रुषा केली. त्या आधी देवधरबुवांकडे आणि नंतर मा.कुमारजींकडेच गाण्याचे शिक्षण घेत होत्या. त्यांच्याच मदतीने पंडितजी आजारातून बरे झाले आणि १९५३ मध्ये आजारानंतरची त्यांची पहिली मैफल रंगली. परंतु या दुखण्याने त्यांच्या स्वरराज्याला चांगलाच हादरा दिला होता. १९६१ मध्ये बाळंतपणात पत्नी भानुमतीचे निधन झाले. त्यानंतर कुमार जींनी वसुंधरा श्रीखंडे यांच्याशी विवाह केला. त्याही देवधरबुवांच्या शिष्या होत्या.
कुमार जी आणि वसुंधराबाईंची कन्या कलापिनी ही अनेकदा गाण्याच्यावेळी तानपु-यावर त्यांना साथ द्यायची. माळव्याची लोकगीतं, निर्गुणी भजन, नवरागनिर्मिती यांवर कुमारजींचा मोठा व्यासंग होता. मा.कुमारजींची लोकप्रियता अफाट होती. संगीतातील जाणकार मंडळी त्यांच्या गायकीवर जीव ओवाळून टाकायची. त्यामध्ये महाराष्ट्रीय मंडळींची संख्या मोठी होती. पुणे आणि मुंबईच्या उपनगरातील रसिकांच्या हृदयावर कुमार जींनी अधिराज्य गाजवले. याचठिकाणी त्यांच्या गाण्याच्या मैफली रंगायच्या.
चेंबूरसारख्या परिसरात शाळांमध्ये त्यांच्या मैफली व्हायच्या. अगदी फुकट. खरेखुरे संगीताचे दर्दी या मैफलींना हजेरी लावायचे आणि कुमार जींच्या गाण्याची हरएक तान कानात जपून ठेवायचे. कुमार गंधर्वांची गायकी चित्रित करण्यासाठी एकदा मा.जब्बार पटेल कॅमेरा घेऊन आले. मा.मधु लिमये आणि ज्येष्ठ साहित्यिक मा.विंदा करंदीकर त्यावेळी उपस्थित होते. मैफलीत कॅमेरा पाहून मा.कुमारजींना आश्चर्य वाटले.
पंडितजींनी जब्बारना विचारले, कॅमेरात किती मोठा रोल आहे ? थोडक्यात किती वेळाचे गाणे चित्रित करायचे आहे ? जब्बार यांनी सांगितले, पावणे चार मिनिटे. एका चीजेसाठी पावणे चार मिनिट म्हणजे फारच अवघड काम. पण पंडितजींनी घड्याळ लावले आणि सांगितले सुरू करा चित्रीकरण. त्यांनी तराणा सुरू केला. समा बांधली आणि बरोबर २२५ सेकंदात समेवर येऊन गाणे संपविले. १९९० साली कुमार गंधर्व यांचा पद्म विभूषण पुरस्कार देऊन भारत सरकारने गौरव केला. कुमार गंधर्व यांचे १२ जानेवारी १९९२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
कुमार गंधर्व यांचे ऋणानु बंधाच्या
https://www.youtube.com/watch?v=K0CXNZyGVeU
कुमार गंधर्व यांचे रागदारी
https://www.youtube.com/watch?v=PCpMcvWkNy4
कुमार गंधर्व यांची निरगुणी भजन
https://www.youtube.com/watch?v=6CAFRYsNXXM
January 12, 2019
जुन्या काळातील चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक विजयशंकर जग्नेश्वर तथा विजय भट यांचा जन्म १२ मे १९०७ रोजी झाला. विजय भट्ट यांची प्रकाश पिक्चर्स व एव्हरग्रीन पिक्चर्स नावाची सिनेवितरण कंपनी होती. विजय भट यांचे रामराज्य (१९४३), बैजू बावरा (१९५२), गूंज उठी शहनाई (१९५९), हिमालय की गोद में (१९६५) हे चित्रपट खूप गाजले. गिरगाव, ग्रॅण्ट रोड येथील सुपर टॉकीज मध्ये १९४३ मध्ये विजय भट्ट यांच्या एव्हरग्रीन पिक्चर्स या कंपनीने सुपर थिएटर चालविण्यास घेतले आणि हे थिएटर नावलौकिकास आणले.
विजय भट्ट यांच्या प्रकाश पिक्चर्सचा ‘रामराज्य’ इथे सलग १०२ आठवडे चालला. हा हिंदी व मराठी या दोन्ही भाषांत काढला होता. रोज मराठीत एक आणि हिंदीत असे दोन खेळ इथे होत असत. विजय भट्ट यांनी महात्मा गांधीं यांना ‘रामराज्य’ दाखवायला सुपरला घेऊन आले होते, पण राम रामासारखा दिसत नाही आणि सीता ही सीतेसारखी वाटत नाही म्हणत एक-दोन रिळे पाहून गांधीजी निघून गेले. महात्मा गांधींनी आयुष्यात पाहिलेला हा एकमेव चित्रपट म्हणून ‘रामराज्य’ची खूप पब्लिसिटी झाली.
सीतेच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या धोबिणीची भूमिका पाश्र्वगायिका अभिनेत्री अमीरबाई कर्नाटकीने केली होती. विजय भट्ट हे ’फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडिया’ या संस्थेचे संस्थापक सदस्य होते. विजय भट यांचे निधन १७ आक्टोबर १९९३ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 3, 2017
मंदार परब हे सध्या ‘झी चोवीस तास’ या प्रादेशिक बातम्या देणार्या, व मराठी भाषिकांचे जग व त्यांच्या जीवनांत घडलेल्या विवीध घडामोडी उलगडुन दाखविणार्या लोकप्रिय वाहिनीचे संपादक आहेत. त्यांनी संपादकस्थान स्वीकारल्यापासुन या वाहिनीचा अंतरबाह्य कायापालट झाला आहे. या वाहिनीच्या अंतररुपात व बाह्यररूपांत जे अमुलाग्र बदल घडले आहेत, त्यालादेखील मंदार यांची आभ्यासु व नव्या तंत्रज्ञानांना कवटाळण्याची वृत्ती जबाबदार आहे.
August 16, 2011
१९५२ साली दत्ता धर्माधिकारी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘ अखेर जमलं ‘ ह्या चित्रपटामध्ये ‘ बेबी जीवनकला ‘ म्ह्णून काम केले ह्या चित्रपटामध्ये सूर्यकांत, बेबी शकुंतला , वसंत शिंदे , राजा गोसावी , शरद तळवलकर यांनी भूमिका केल्या होत्या.
August 28, 2021
विद्याधर ठाणेकर हे साहित्य, कला, शिक्षण, क्रीडा, नाट्य, चित्रपट या क्षेत्रातील ठाण्यातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व आहे.
June 6, 2010
आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या डॉ. दीपक अमरापूरकर यांचा ज्या प्रकारे मृत्यू झाला ते अत्यंत खेदकारक आहे. तो धक्कादायक म्हणावा लागेल. त्यांचे व्यक्तीमत्व, तज्ज्ञता असूनही साधेपणाने जगण्याची वृत्ती आणि माणूसकी मात्र कायमच स्मरणात राहील.
September 19, 2017
पिटसबर्ग काही मराठी तरूणांनी मराठी अस्मिता, बाणा, व हितसंबंध जोपासण्यासाठी व सर्व मराठी कलावंताना, प्रतिभावंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी मराठी मंडळाची स्थापना केली. गिरीष ठक्कर हे या मराठी मंडळाचे अध्यक्ष.
July 27, 2011
दूरदर्शनवर त्यांनी ‘माध्यम चित्रवाणी’ नावाचे पुस्तक लिहिले. या पुस्तकाला राज्य सरकारचा सवरेत्कृष्ट पुरस्कारही मिळाला. त्याचबरोबर बालसाहित्यिक म्हणून त्यांची वेगळी ओळख होती. त्यांनी मुलांसाठी सुमारे ३०० पुस्तके लिहिली.
June 21, 2022
उत्कृष्ट वक्त्या व कथाकथनकार असणाऱ्या जोगळेकरांचा विद्यार्थ्यांमध्ये साहित्याविषयी रुची निर्माण करण्यात हातखंडा होता. संध्याकाळचा चेहरा व रंग अमेरिकेचे प्रवासिनी आदी त्यांची माहित्यकृती मराठी रसिकांच्या मनांत घर करून राहिली. ‘संध्याकाळचा चेहरा’ या कादंबरीला राज्य शासनाचे कथासंग्रहासाठीचे प्रथम पारितोषिक मिळाले. ‘लोकसत्ता’ मध्ये त्यांनी प्रवासवर्णनावर आधारीत ‘प्रवासिनी’ या लेखमालिकेचे लेखन केले होते. तुकारामांचे फ्रेंचमधील अभ्यासक फादर दलरी यांचे चरित्रही लिहीले.
March 31, 2022
ते उत्तम चित्रकार ही आहेत. बेधुंद, ‘मी बाप’, ‘मेड इन चायना ‘ आणि ‘साने गुरुजी’ या चित्रपटात त्यांचा उत्कृष्ठ अभिनय बघायला मिळाला.
April 22, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti