(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे

    डॉ. श्रीकांत शिंदे हे ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. ते लोकसभेत शिवसेनेचे प्रतिनिधित्व करतात.

    डॉ. श्रीकांत शिंदे हे ठाण्याचे आमदार आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या धडाडीच्या कार्यपद्धतीमुळे ते मतदारसंघात लोकप्रिय आहेत.

    त्यंचा जन्म ४ फेब्रुवारी १९८७ रोजी झाला. ते MS Orthopaedic आहेत. च्या केवळ २८ व्या वर्षी त्यांनी १६व्या लोकसभेचे खासदार म्हणून जबाबदारी स्विकारली.

    वेबसाईट : http://drshrikanteknathshinde.in/

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

      January 14, 2016


  • कवी ग्रेस

    कवी ग्रेस हे मराठी कवितेच्या प्रांतावर मौलिक ठसा उमटवून गेलेले कवी…’ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता’ या काव्याने घरोघरी पोहचलेले माणिक गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस. त्यांचा जन्म १० मे १९३७ रोजी झाला.

      May 10, 2019


  • पं.फिरोज दस्तूर

    किराणा घराण्याचे जेष्ठ गायक पं.फिरोज दस्तूर यांचा जन्म ३० सप्टेंबर १९१९ रोजी झाला.
    पं. फिरोज दस्तूर हे एक खूप मोठे पण तसे सर्वसामान्यांसमोर फारसे न आलेले कलावंत. १९३० च्या दरम्यान पं.फिरोज दस्तूर हे भारतीय चित्रपट सृष्टीत अभिनेते म्हणून काम करत होते.

      May 10, 2019


  • ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)

    निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. ते राष्ट्रीय सुरक्षा या विषयावरील तज्ज्ञ आहेत.

      July 16, 2017


  • प्रसिद्ध मराठी कवी व गायक संदीप खरे

    संदीप खरे यांनी इयत्ता चौथीत असताना पहिली कविता केली. अनेक शालेय स्पर्धांमध्ये त्याने कविता आणि कथा या विषयात अनेक पारितोषिके मिळवली आहेत. त्यांचा जन्म १३ मे १९७३ रोजी झाला. महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजलेल्या 'उमलते अंकुर' या कार्यक्रमात त्यांनी सादर केलेल्या कविता ही कवी म्हणून ओळख निर्माण होण्याच्या दृष्टीने महत्त्वाची घटना ठरली. ‘मौनाची भाषांतरे’, ‘नेणिवेची अक्षरे’, ‘तुझ्यावरच्या कविता’ आणि ‘अग्गोबाई ढग्गोबाई’ या त्याच्या कवितांसग्रहांची विक्रमी विक्री झाली आहे. त्याने स्वत: स्वरबद्ध केलेल्या तसेच सलिल कुलकर्णी आणि अन्य संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या सीडीही अपार लोकप्रियता लाभली आहे.

    सलग अनेक वर्षे हाऊसफुल्ल गर्दीत सुरू असलेला आणि १२०० प्रयोगांजवळ पोहोचलेला ‘आयुष्यावर बोलू काही’ हा कार्यक्रम तर मराठी भावसंगीतामध्ये एक इतिहास घडवतो आहे. या कार्यक्रमातील गीतांसोबत संदीप करीत असलेल्या गद्य कवितांचे सादरीकरण हे देखील या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले आहे. ‘मी मोर्चा काढला नाही, मी संपही केला नाही’.. ‘मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात’.. ‘लव्हलेटर लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे लव्हलेटर असतं’.. ‘दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला’.. ‘डिपाडी डिपांग’.. यांसारख्या कविता आणि लोकप्रिय गीतांमधून कवी संदीप खरे यांनी खरे मराठीत नाव कमवले आहे.
    संदीप खरे हे ‘मोबाइल अॅप’च्या माध्यमातून रसिकांच्या भेटत असतात. ‘संदीप खरे’ज वर्ल्ड या अॅपद्वारे रसिकांना संदीपच्या काही कविता विनाशुल्क तर काही कविता अल्बमच्या माध्यमातून सशुल्क उपलब्ध होणार असून मोबाइल अॅपच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचणारा संदीप खरे हे मराठीतील पहिलाच कवी ठरले आहे. जगभरातील मराठी रसिकांमध्ये आणि विशेषत: युवा पिढीमध्ये संदीप खरे यांच्या कविता अत्यंत लोकप्रिय आहेत. पायरसी आणि ‘संदीप खरे’ज वर्ल्ड – ‘गुगल प्ले स्टोअर’वरून हे अॅप विनाशुल्क ‘डाऊनलोड’ करता येऊ शकेल.

    https://play.google.com/store/apps/details…

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      May 13, 2019


  • जेष्ठ निरुपणकार दत्तात्रय नारायण धर्माधिकारी

    अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या घराण्यात चारशे वर्षेपासुन समाजप्रबोधनाच्या कार्याची वंशपरंपरा आहे. त्यांच्या घराण्याचे मूळचे आडनांव 'शेंडे'असे होते. त्यांच्या भूतकाळातल्या आठव्या पिढीतील पूर्वज गोविंद चिंतामण शांडिल्य ऊर्फ शेंडे हे धर्मजागृतीचे काम स्वेच्छेने करायचे. त्याकाळचे दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांनी त्यांना सन्मानाने 'धर्माधिकारी'अशी पदवी दिली. तेंव्हापासून आजतागायत त्यांचे घराणे धर्माधिकारी हे आडनांव लावत आले आहेत आणि त्याला समर्पक असे धर्मजागृतीचे काम करीत आले आहेत. अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आपल्या पित्याकडून प्रेरणा घेऊन सेवाव्रत घेतले आणि ते अव्याहतपणे चालवले आहे. त्यांचा जन्म १४ मे १९४६ रोजी झाला. त्यांचे पिता नारायण विष्णु धर्माधिकारी हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ व प्रसिद्ध समर्थ दासबोधाचे निरूपणकार, अध्यात्म, शिक्षण, आरोग्य, समाजप्रबोधन, व्यसनमुक्ती क्षेत्रात निरलसपणे कार्य करणारे नानासाहेब यांचे जगभरात लाखो अनुयायी आहेत.

    धर्माचरणाविषयी बोलतांना त्या अनुषंगाने अज्ञान, अंधश्रध्दा, भेदाभेद, व्यसनासक्ती, स्त्रियांवरील अत्याचार आदि दुष्ट प्रवृत्तींचे उच्चाटन करून समाजाला सन्मार्गाला लावण्याची शिकवण ते देत आले. आधुनिक संदर्भात दासबोधाच्या कमालीच्या सोप्या निरूपणातून विकारी मनांची मशागत करताना निर्व्यसनी समर्थ समाजाचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. या कामासाठी त्यांनी १९४५ साली रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे श्री समर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती स्थापन केली. या संस्थेद्वारे त्यांनी जगभरात अध्यात्माचा प्रसार केला. त्याच्या शाखा आज भारताबाहेरील अनेक देशांपर्यंत पसरल्या आहे.

    आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीही अथक परिश्रम घेऊन, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या सर्वांगीण पुरु षार्थाची ओळख त्यांनी, स्वत:ची ओळख विसरलेल्या समाजाला करून दिली. बैठकांच्या मौखिक निरूपणाच्या माध्यमातून त्यांनी आरोग्यसंपन्न समाजनिर्मितीची प्रक्रिया सुरू केली आहे. मा.अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाने त्यांना डी लिट पदवी बहाल दिली आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      May 15, 2017


  • भाजपाचे खासदार कपिल पाटील

    खासदार कपिल पाटील यांचा विकासात्मक दृष्टिकोन ठाणे जिल्ह्याच्या विकासासाठी फायदेशीर ठरणार आहे. कपिल पाटील यांच्या व्हिजनमुळे ठाणे जिल्ह्यात अनेक प्रकल्प मार्गी लागत आहेत. १२ पदरी ठाणे-भिवंडी बायपास, कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग, एमएमआरडीएने ग्रामीण भागासाठी दिलेला निधी, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो आदी कार्य ही कपिल पाटील यांच्या दूरदर्शीपणाची साक्ष आहे.

      March 16, 2022


  • हिंदी सिनेमांतील पहिली संगीतकार जोडी – हुस्नलाल-भगतराम पैकी हुस्नलाल

    हुस्नलाल व भगतराम हे दोघेही लाहोरच्या सुप्रसिद्ध संगीतकार पंडित अमरनाथ शर्मा यांचे धाकटे बंधू. त्यांचा जन्म १९१६ रोजी जालंधर येथे झाला. हुस्नलाल उत्कृष्ट व्हायोलिन वादक होते.

      December 28, 2017


  • ज्येष्ठ बल्लवाचार्य विष्णू मनोहर

    मार्च २०२१ मध्ये शेफ विष्णू मनोहर यांनी पुण्यात ७ तासात ७ हजार किलो मिसळ शिजवण्याचा आणि ३ तासात ३००० सामाजिक संस्थांमार्फत ३० हजार गोरगरिब, गरजू लोकांपर्यंत ही मिसळ पोहोचवण्याचा विश्वविक्रम केला गेला आहे.

      February 18, 2022


  • पं. त्र्यंबकराव जानोरीकर

    भेंडीबाजार घराण्याचे गायक पं. त्र्यंबकराव जानोरीकर यांचा जन्म १३ जुन १९२१ रोजी झाला. वयाच्या आठव्या वर्षी पं. त्र्यंबकराव जानोरीकर यांनी ग्वाल्हेर घराण्याचे प्रख्यात गायक पं. विनायकराव पटवर्धन यांचेकडे पुणे येथील गंधर्व महाविद्यालयात संगीत शिकण्यास सुरुवात केली. त्यापुढील बारा वर्षे त्यांनी प्रचंड मेहनत घेतली व संगीताचा कसून रियाझ केला. पटवर्धनबुवांच्या सांगण्यावरून ते तबला, हार्मोनियम व इतर वाद्येही शिकले. तसेच अहमदनगमध्ये व रत्नागिरीत संगीतप्रसार करण्याचा त्यांनी नेटाने प्रयत्न केला. १९४६ मध्ये त्यांनी मुंबई येथे भेंडीबाजार घराण्याचे पं. शिवकुमार शुक्ला यांचा कार्यक्रम ऐकला, आणि त्यांच्या सांगीतिक आयुष्याला वेगळेच वळण मिळाले.

    पं. शिवकुमारांच्या गाण्याने व भेंडीबाजार घराण्याच्या गायनशैलीने प्रभावित होऊन पं. जानोरीकर भेंडीबाजार घराण्याचे उस्ताद अमान अली खाँ यांचे गंडाधारी शागीर्द बनले. उस्तादांच्या निधनानंतर १९५३ मध्ये पं. जानोरीकरांनी त्याच घराण्याच्या प्रख्यात गायिका श्रीमती अंजनी मालपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपली संगीत साधना कायम ठेवली. या दोन्ही संगीत गुरूंच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करताना पं. जानोरीकरांच्या गायकीला वेगळेच पैलू प्राप्त झाले. पं. जानोरीकरांनी भारतभर आपले कार्यक्रम केले, तसेच संगीताचा अभ्यास करणाऱ्या नव्या पिढीलाही त्यांनी तयार केले. १९६० ते ७०च्या दशकात ही विशिष्ट गायकी नामशेष होण्याच्या मार्गावर असताना जानोरीकरांनी देशभर मैफिली करून ती सर्वदूर पोहोचवली आणि लोकप्रियही केली. कोलकाता येथील आयटीसी संगीत संशोधन अकादमीत १९८९ च्या नोव्हेंबरापासून इ.स. १९९१ च्या जूनपर्यंत त्यांनी संगीत गुरू म्हणून काम पाहिले. त्यांच्या भेंडीबाजार घराण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीविषयी सप्रात्यक्षिक व्याख्यानांसाठी ते विशेष लोकप्रिय होते.

    जानोरीकर बुवांचा वल्लभ संप्रदायाशी जवळचा संबंध होता. त्यांनी रचलेल्या बंदिशींमध्ये हिंदू देवी-देवतांची सुरेख वर्णने आढळतात. पंडित जानोरीकरांनी अनेक शिष्य तयार केले. डॉ. साधना जोशी, डॉ. सुहासिनी कोरटकर, शरद करमरकर, पद्माकर कुलकर्णी, श्रीकांत पारगावकर, अनुराधा कुबेर, किशोरी जानोरीकर, केदार बोडस, कुमुदिनी मुंडकर आणि अनुराधा मराठे ही त्यांतली काही ठळक नावे आहेत. त्यांच्या शिष्या किशोरी जानोरीकर या सध्याच्या पिढीतील प्रतिभावंत गायिका आहेत. पं.त्र्यंबकराव जानोरीकर यांचे २३ नोव्हेंबर २००६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      June 13, 2017