जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
श्रीकांत ठाकरे यांची ओळख महाराष्ट्राला संगीतकार म्हणून तर होतेच; पण ते स्वत: उत्तम व्यंगचित्रकार, लेखक, समीक्षक, पत्रकार आणि आयुर्वेदाचे अभ्यासक देखील होते. संगीत क्षेत्राच्या व्यतिरिक्त पत्रकारिता आणि चित्रपट संबंधी लेखन श्रीकांतजींनी केलं, यामध्ये नवीन चित्रपटांची समीक्षा असेल किंवा वैविध्यपूर्ण लेखन, त्यामध्येखास “ठाकरे टच” असायचा “परखड”, “सत्यता” आणि “वैचारिक” पैलू त्यांच्या लिखाणाच्या माध्यमातून मांडलेले दिसत;“मार्मिक” या मासिकात ६० व ७० च्या दशकात “शुद्ध निषाद” या नावाने “सिनेमाची समीक्षा” करणारे सदर लोकप्रिय ठरले.
January 23, 2017
लीलावती भागवत या माहेरच्या लीला पोतदार. त्यांचा जन्म ५ सप्टेंबर, १९२० रोजी झाला.मराठी आणि हिंदी भाषांवर प्रभुत्व असलेल्या लीलावती भागवत यांनी काही काळ शिक्षिका म्हणून काम केले. आकाशवाणी मुंबई केंद्रामध्ये त्यांनी वनिता मंडळ हा कार्यक्रम यशस्वी केला. या वनिता मंडळामुळे अनेक प्रतिभावंत स्त्रियांचा समाजाला परिचय झाला. आहारशास्त्रावर बोलण्यासाठी लीलावती पुष्कळदा वसुमती धुरू यांना बोलवायच्या. त्यांतूनच वसुमती धुरू या पुढे मराठीतील पाकशास्त्राच्या नामवंत लेखिका म्हणून पुढे आल्या. लीला पोतदार यांचा विवाह भा.रा. भागवत यांच्याशी ९ मे १९४०रोजी झाला, आणि त्या लीलावती भागवत झाल्या. बालमित्र या मुलांसाठीच्या मासिकामध्ये त्यांनी त्यांच्या पतींसमवेत समवेत काम केले.
भा. रा. भागवत आणि लीलाताई या दोघांनी मिळून १९५१ मध्ये जेव्हा हे मासिक सुरू केले. त्यावेळी बँकेत त्यांच्या नावावर फक्त ३५० रुपये होते. वेळ आल्यास दागिने मोडू, परंतु मुलांसाठीचा हा उपक्रम चालू ठेवू, असा निर्धार लीलाताईंनी दाखविला. त्या काळात मुलांसाठी विशेष मासिके नव्हती. मुलांसाठी मासिके विकत घेण्याची पालकांची मनोवृत्तीही नव्हती. तरीही मुलांच्या वाचनाची भूक भागविण्यासाठी त्यांनी हे मासिक चालू ठेवले. नामवंत लेखकांचे लेखन व द.ग. गोडसे यांची चित्रे यांमुळे 'बालमित्र' खरोखरीच मुलांचा बालमित्र बनले. मात्र आर्थिक नुकसान वाढत गेल्याने नाईलाजाने ते मासिक बंद करावे लागले. मासिक बंद झाले तरी लीलावती आणि त्यांचे पती यांचे लेखन चालूच राहिले आणि बहराला येत गेले. पुढे भा.रा. भागवत यांच्या साहित्याचे संपादन लीलाताईंनी 'भाराभार गवत' या पुस्तकाद्वारे केले. अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्थेच्या उभारणीत लीलावती भागवतांनी मोठा वाटा उचलला.
साहित्याबरोबरच संस्थात्मक कार्यातही त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. आपल्या वयाच्या नव्वदी नंतर सुद्धा त्या सक्रिय होत्या. त्या वयात त्यांचे 'मुलांसाठी दासबोध' हे पुस्तक प्रकाशित झाले. लीलावती भागवत यांचे २५ नोव्हेंबर २०१३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. विकी पिडीया
September 5, 2017
सुर्यकांत दाणेकर हे किर्ती प्रकाशन, या प्रसिध्द संस्थेचे संपादक म्हणून कार्यरत आहेत. नवोदित लेखक व कवींना आपल्या प्रतिभेचे अविष्कार रसिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी ही प्रकाशन संस्था नेहमी तत्पर असते. आजपर्यंत प्रख्यात लेखिका अनुराधा वैद्य, रेखा बैजल यासारख्या अनेक हौशी व अनुभवी लेखकांचे साहित्य त्यांनी आपल्या निखळ साहित्यप्रेमापोटी आग्रहाने प्रकाशित केले. व्यक्तिशः हिंडून फिरून आपल्या पुस्तकांचे वितरण करणार्या काही मोजक्या संपादकांपैकी ते त्यांचे नाव प्रथम घ्यायला हवे. साहित्य निवडण्यातील त्यांच्या चोखंदळपणामुळे त्यांनी आपल्या वाचकवर्गाला नेहमीच दर्जेदार वाड्मय प्रदान केले आहे.
January 12, 2015
रामकृष्णबुवांना लहानपणापासून गायक होण्याचाच ध्यास होता. त्यांच्या आईनेही मुलाला गायकीचे शिक्षण देण्यासाठी काबाडकष्ट घेतले. त्यांचा जन्म २८ नोव्हेंबर १८७४ रोजी झाला. लहान वयातच बुवांचा संगीताकडील ओढा स्पष्ट झाल्यावर त्यांनी संस्थानातील राजगायकांकडे संगीत शिकण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे दोन वर्षे गाणे शिकल्यावर ते मालवण येथे पुढील संगीत शिक्षणासाठी गेले. घर सोडल्यानंतर रामकृष्णबुवा आधी पुण्याला गेले. तेथून संगीत शिक्षणासाठी मुंबई, इंदूर, उज्जैन, वाराणसी असा त्यांचा प्रवास चालू राहिला. ग्वाल्हेर येथे उस्ताद निसार हुसेन खाँ यांचे शिष्यत्व पत्करल्यानंतर त्यांच्या कारकीर्दीला खरे वळण मिळाले. त्यांनी काही काळ जयपूर येथे मनरंग परंपरेतील मुहम्मद अली खान यांच्याकडूनही शिक्षण घेतले. जयपूर येथे त्यांची गाठ पुन्हा निसार हुसेन खाँ यांच्याशी पडली. ह्या खेपेस खाँसाहेबांनी वझेबुवांना कसून तालीम दिली. वाराणसी येथे त्यांना स्वामी विवेकानंदांच्या सहवासात १५ दिवस राहण्याची संधी मिळाली. नेपाळमध्ये दरबारगायक म्हणून त्यांनी वर्षभर सेवा केली. गायक नट कै. केशवराव भोसले यांच्या आग्रहावरून बुवांनी ललितकलादर्श या कंपनीच्या नाटकांना चाली दिल्या.
स्वातंत्रवीर सावरकर लिखित रणदुंदुभी आणि सन्यस्त खड्ग ह्या संगीत नाटकातली पदे वझे बुवांनी स्वरबद्ध केली होती. वधुपरीक्षा, संन्यासाचा संसार, शहा शिवाजी, श्री, रणदुंदुभी, नेकजात मराठा, सोन्याचा कळस अशा अनेक नाटकांतील त्यांनी संगीत दिलेली पदे लोकांच्या विशेष पसंतीस उतरली. त्यांनी देशभर भ्रमंती करून अनेक मैफली गाजविल्या. त्यांनी तयार केलेल्या गायकीचा 'वझेबुवांची गायकी' म्हणून खास गौरव झाला. दुर्मिळ संगीत रागांमधील दुर्मिळ चीजांचे त्यांनी संकलन केले होते, ते 'संगीत कला प्रकाश' या शीर्षकाखाली प्रकाशित झाले. गायनावर निस्सीम प्रेम केलेल्या या थोर गायकाने गाणे हे श्रोत्यांसाठी आहे असे सतत मानले. गोव्यात तसेच महाराष्ट्रात दीनानाथ मंगेशकर, केसरबाई केरकर, व्ही.ए. कागलकरबुवा, तानीबाई, केशवराव भोसले, भास्करराव जोशी, बापुराव पेंढारकर, भार्गवराम आचरेकर, हरिभाऊ घांग्रेकर, भालचंद पेंढारकर, गुरुराव देशपांडे, दिनकरपंत फाटक, गजाननबुवा जोशी, शिवरामबुवा वझे, लक्ष्मणराव वझे, मोहनबुवा कर्वे, विनायकराव पटवर्धन अशा पुढे नावारूपाला आलेल्या कलाकारांना रामकृष्णबुवांनी गायनाचे शिक्षण दिले. रामकृष्णबुवा वझे यांचे निधन ५ मे १९४५ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
May 8, 2017
स्त्रियांच्या विशेषतः पतिता व विधवांच्या सर्वांगीण उध्दाराकरिता समर्पित भावनेने कार्यरत राहिलेली महाराष्ट्रीय विदुषी.
लक्ष्मीबाई ऊर्फ अंबाबाई आणि अनंतशास्त्री डोंगरे हे त्यांचे माता पिता तेव्हाच्या म्हैसूर संस्थानातील मंगलोर जवळ माहेरंजी येथे राहणार्या हया चित्तपावन ब्राम्हण दांपत्याच्या पोटी माळहेरंजी जवळील गंगामूळ नावाच्या डोंगरावरील वस्तीत रमाबाईच्या जन्म झाला. अनंत शास्त्री हे त्या काळी स्त्रियांच्या बाबतीत पुरोगामी विचारांचे होते. स्त्रियांना शिक्षण द्यावे या मताचे ते होते. लक्ष्मीबाई व रमाबाईस त्यांनी वेदादींचे शिक्षण दिले. रमाबाई नऊ वर्षाच्या झाल्या, तरी त्यांचे लग्न करुन दिले नाही म्हणून ज्ञातिबांधवांनी त्यांना वाळीत टाकले.
बालविवाह, पुनर्विवाहास बंदी इ. घातक चालीरीती व दुष्ट रुढी यांतून समाजास मुक्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी प्रथम पुणे येथे व नंतर अहमदनगर, सोलापूर, ठाणे, मुंबई, पंढरपूर, बार्शी इ. ठिकाणी ‘आर्य महिला समाजा‘ची स्थापना केली. स्त्रीधर्मनिती हे पुस्तक त्यांनी याच साली लिहिले. १८८३ साली सरकारी विद्याविषयक हंटर आयोगासमोर त्यांनी प्रभावी साक्ष दिली. मे १८८३ मध्ये स्त्रियांच्या उध्दाराकरिता अधिक प्रभावी कार्य करता यावे, म्हणून इंग्रजी भाषा व वैद्यक या विषयांच्या शिक्षणाकरिता त्या कन्या मनोरमेसह इंग्लंडला गेल्या. हा प्रवास खर्च त्यांनी स्त्रीधर्मनीती हया पुस्तकाताच्या विक्रीतून केला. इंग्लंडमध्ये त्या वॉटिंज गावच्या सेंट मेरी या मठात राहिल्या. येशू ख्रिस्ताच्या पतित स्त्रियांबाबतच्या दृष्टीकोनामुळे तसेच भूतदया व प्रेमाचे शिकवणीने त्या ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित झाल्या. परिणामतः २९ संप्टेंबर १८८३ रोजी वॉटिज येथील चर्चमध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला.
आपल्या आश्रमातील स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, म्हणून रमाबाईनी शारीरीक श्रमाचे महत्व पटवून आश्रमातील स्त्रियांना शेती, विणकाम, मुद्रणकाम इ. कामे शिकविली. मुक्तिसदना'त धान्य, भाजीपाला, फळफळावळ यांचे उत्पन्न मुलींच्या साहयाने काढण्यात येई. दुर्बल व आजारी लोकांकरिता सायं घरकुलाची व्यवस्था त्यांनी केली. १९१९ साली रमाबाईना त्यांच्या हया कार्याबद्दल कैसर ई हिंद हे सुवर्ण पदक मिळाले.
जन्म : २३ एप्रिल १८५८
मृत्यू : ५ एप्रिल १९२२
बाह्य दुवे :
November 30, 2015
पी. जयराज यांनी हिंदी, मराठी, गुजराथी चित्रपटात कामे केली बोलपटाच्या काळात त्यांनी उर्दू आणि इंग्रजी भाषेमधील चित्रपटात कामे केली. त्यांचा जन्म २८ सप्टेंबर १९०९ रोजी झाला. पी. जयराज यांनी १७० हून अधिक चित्रपट मध्ये कामे केली.
व्ही.शांताराम, पृथ्वीराज कपूर, मोतीलाल यांच्या बरोबर पी. जयराज यांनी कामे केली. त्यांनी मोहर, माला, प्रतिमा,राजघर,सागर अशा चित्रपटांचे दिग्दर्शन पण केले. १९८० साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पी.जयराज यांचे निधन ११ ऑगस्ट २००० रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
August 11, 2017
सरोजिनींनी द गोल्डन थ्रेशोल्डनंतर द बर्ड ऑफ टाइम व द ब्रोकन विंग हे काव्यसंग्रह प्रसिद्ध केले. हिंदी महिलेने सुरेख इंग्रजीत लिहिलेल्या या कविता स्वरमाधुर्य, राष्ट्रीय दृष्टिकोण, प्रेमाचा पुरस्कार व क्रांतिकारक राष्ट्रवादी विचार इ. वैशिष्ट्यांनी लोकप्रिय झाल्या.
February 13, 2022
मुळचे वर्धा जिल्ह्यातील असणारे डॉ.डी.एच. तांबेकर सुक्ष्मजीव शास्त्रज्ञ व त्यातील संशोधन करणारे वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध आहेत. उच्च शिक्षण नागपूर विद्यापीठातनं पूर्ण झालं असून, मध्य प्रदेशातील सागर विद्यापीठातून त्यांनी “आचार्य” ही पदवी संपादन केली.
July 3, 2013
(1884 - 1937)
महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचं अवजड -अवघड कार्य केतकरांनी पूर्ण केलं, हे त्यांचं ठळक योगदान म्हणायला हवं. पण याशिवाय केतकर समाजशास्त्रज्ञ, इतिहाससंशोधक आणि कादंबरीकार होते.
इ.स. 1911 साली अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठांची पदवी त्यांनी मिळवली. `द हिस्टरी ऑफ कास्ट इन इंडिया` ही त्याची पदवी त्यांनी मिळवली. `द हिस्टरी ऑफ कास्ट इन इंडिया हा त्यांचा विषय होता. यात या विषयावरचे अनेक मूलभूत विचार त्यांनी मांडले आहेत. भारतीय सर्थशास्त्र आणि कायदा याचाही त्यांचा अभ्यास होता.
1915 साली तेवीस भागांच्या ज्ञानकोशाचं काम त्यांनी हाती घेतलं विशेष आर्थिक पाठबळ नसताना, आणि इतर संशोधकलेखकांची मदत नसतानाही हे मोठं कार्य त्यांनी चौदा वर्षात पूर्ण केलं. या कोशाच्या लिखाणापासून ते छापून घेण्यापर्यंत अनेक अडथळे आले. अखेरीस स्वतचाच छापखाना काढून त्यांनी ज्ञानकोश छापून घेतला. छापखान्यासाठी `लिमिटेड कंपनी`चा अभिनव प्रयोग केतकरांनी केला. या सार्या खटाटोपांचं वर्णन `माझे बारा वर्षाचे काम ऊर्फ ज्ञानकोश मंडळांचा इतिहास` यात त्यांनी केलं आहे.
`गोंडवनातील प्रियंवदा`, `ब्राम्हणकन्या` या त्यांच्या काही कादंबर्या आहेत. `महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण` यात वाड्गमयीन तर निशस्त्रांचे राजकारण`, `व्हिक्टोरिअस इंडिया` या दोन गंथांत राजकीय मतं प्रगट केली आहेत.
साहित्यातून त्यांनी सुधारणावादी विचार मांडला. त्यांचं वैयक्तिक जीवनही इतर चारचौघांपेक्षा निरांळ होतं. एका जर्मन ज्यू स्त्रीला विधिवत हिंदू धर्मात आणून तिच्याशी केतकरांनी विवाह केला होता. अपत्य नसल्यामुळे दोन अनाथ मुलांनाही सांभाळलं.
कोणतीही अत्याधुनिक साधनं. मदत हाताशी नसताना फक्त चौदा वर्षात ज्ञानकोश पूर्ण करणारे केतकर `ज्ञानकोशकार` म्हणूनच प्रामुख्याने प्रसिध्द आहेत.
March 11, 2015
अमोल मुजुमदार हा मुंबई, आसाम व आंध्र प्रदेश या संघांकडून प्रथमश्रेणी क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. रणजी करंडक स्पर्धेत कारकिर्दीत सर्वाधिक धावा जमविणार्या खेळाडूंपैकी तो एक आहे. प्रथम श्रेणीच्या सामन्यातील अनेक विक्रम अमोलच्या खात्यावर जमा आहेत.
April 2, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti