जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
त्यांच्या लेखनाचे विषय प्रामुख्याने भारतातील अधिसूचित जनजाती, आदिवासी , दलित , वंचित समुदाय हे होते.
August 6, 2021
“अधिकारयोग” हे पुस्तक तसेच पाच नाटके, समुद्र ही काव्यरचना व १७२६ श्लोकांचे “यशवंतराय” हे महाकाव्य, असा त्यांचा ग्रंथसंभार होता. त्यांनी दोन नाटके लिहिली व “यशवंतराय” या खंडकाव्यासह काही पद्यरचनाही केल्या.
November 7, 2017
जावेद अख्तर यांचं नाव लहानपणी ‘जादू’ असं होतं. त्यांचा जन्म १७ जानेवारी १९४५ रोजी ग्वाल्हेर येथे झाला. शायरीचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला आहे आणि वडिलांनी लिहिलेल्या उर्दू शेरमधील एका वाक्यातून त्यांचं नाव निवडलं गेलं होतं. गीतकार म्हणून त्यांची कारकीर्द त्यांनी आजवर जपली असली तरी ‘पटकथाकार’ म्हणून एकेकाळी हरएक चित्रपटामागे असलेलं त्यांचं नाव गेल्या कित्येक वर्षांत पडद्यावर उमटलेलंच नाही.
जुन्या लोकप्रिय गीतांच्या निवडक गीतकारांच्या यादीतील अव्वल नाव अख्तर यांचे आहे. गीते व पटकथा लेखनापलीकडे सामाजिक कार्यकर्ता व विद्रोही विचार मांडणारे लेखक अशीही त्यांची ख्याती आहे. ‘लावा’, ‘तरकश’ त्यांच्या या गाजलेल्या पुस्तकांच्या अन्य भारतीय भाषांमध्ये आवृत्त्याही निघाल्या आहेत. आजवरच्या या लिखाणातून त्यांनी भारतीय तरुण मनांना अनोखी ऊर्जा दिली आहे. धार्मिक गुंतागुंत मानवाला पुढे जाण्यापासून रोखत असल्यानेच त्यांनी निरिश्वरवादाचा वेळोवेळी पुरस्कार केला आहे. मा.जावेद अख्तर यांची अशी विशेष ओळख आहे. १९७० ते १९८० च्या दशकात सलीम खान-जावेद अख्तर या जोडीने अनेक दर्जेदार चित्रपट रसिकांना दिले. ‘अंदाज’, ‘सीता और गीता’, ‘शोले’, ‘जंजीर’, ‘दीवार’ आणि ‘डॉन’ या त्यांच्या चित्रपटांना सिनेरसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले, एका वादानंतर हा इतिहास घडवणारे दोन्ही पटकथाकार बाजूला पडले ते आजतागायत. १९९३ साली जावेद अख्तर यांनी ‘रूप की रानी चोरों का राजा’ या चित्रपटासाठी स्वतंत्रपणे शेवटची पटकथा लिहिली होती. ‘सिलसिला’ चित्रपटापासून अलीकडच्या ‘दिल चाहता है’ चित्रपटामधील गीतांनी युवापिढीचे भावविश्व भारून टाकले. आज चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कारकिर्दीला पन्नास पेक्षा जास्त वर्ष पूर्ण झाली आहेत. सध्या हिंदी चित्रपटक्षेत्रात अख्तरांचे गीतकार म्हणून मोठे नाव आहे. एक प्रभावशाली गीतकार म्हणून त्यांना स्वत:ला हिंदी चित्रपटांमधील कुठली गाणी आवडतात, असे विचारल्यावर साठ आणि सत्तरचे दशक हे चित्रपट संगीताच्या दृष्टीने फार महत्त्वाचे होते असे ते सांगतात. सत्तरच्या दशकांमधली चित्रपटांसाठी लिहिलेली गाणी, त्यांचे बोल, त्यांचं संगीत, त्यांचं दिग्दर्शन आणि ज्या कलाकारांवर ती चित्रित केली गेली ते कलाकार अशा अनेक गोष्टी अनमोल होत्या. मा.जावेद अख्तर यांना ‘पद्मभूषण’, उर्दूतील उत्तम काव्य लेखनासाठी ‘साहित्य अकादमी’ पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या अनेक गाण्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत.अभिनेत्री शबाना आझमी जावेद यांच्या दुसरी पत्नी आहेत.जावेद विवाहित असून दोन मुलांचे(फरहान आणि जोया)वडील होते.तरीदेखील शबाना यांचा जावेद यांचा जीव जडला होता.शबाना यांचे कुटुंबीय यांच्या लग्नाच्या विरोधात होते.परंतु त्यांनी ठाम निश्चय केला होता आणि जावेद यांच्याशी लग्न केले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
January 17, 2017
‘वग’, ‘गौळणी’, ‘पदे’, ‘कटाव’, ‘सवालजवाब’ आणि तमाशाचा फड’ यासाठी ज्यांनी एक काळ गाजवला ते श्रीधर कृष्णाजी कुळकर्णी तथा पठ्ठे बापूराव. पठ्ठे बापूरावांचा जन्म सांगली जिल्ह्यात वाळवे तालुक्यात हरणाक्ष रेठरे या गावी झाला. औंधच्या महाराजांच्या आश्रयाखाली इंग्रजी पाचव्या इयत्तेपर्यंत त्यांचे शिक्षण झाले.
January 30, 2010
चंद्रकांत गिरी हे शिक्षण क्षेत्रात झळकलेले, मराठी तरूणाचे नाव असून ते सध्या सी. एस. कॉर्डिनेटर या पदावर काम करीत आहेत. इंग्रजी संभाषण कौशल्यावर प्रभुत्व कसं मिळवायच याचं साध्या व रोचक भाषेत सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांना सविस्तर व शास्त्रशुध्द ज्ञान देणारा व मुंबई विद्यापीठाने अनिवार्य केलेला हा विषय आहे व या विषयाशी निगडीत असलेल्या प्रत्येक गोष्टींमध्ये व वस्तूंमध्ये सुसुत्रता आणण्याचे काम ते त्यांच्या पदाच्या व अधिकारांच्या अख्त्यारित राहून मोठ्या प्रामाणिकपणे करीत असतात.
August 18, 2011
पं. फिरोज दस्तूर यांचा जन्म ३० सप्टेंबर १९१९ रोजी झाला. पं. फिरोज दस्तूर हे पं. भीमसेन जोशी आणि डॉ. गंगूबाई हनगळ यांचे गुरुबंधू होते.
पं. फिरोज दस्तूर हे फार मोठे गायक होते.एका अतिशय प्रतिभावान, प्रेमळ कलाकाराची ओळख पं. दस्तूर हे एक खूप मोठे पण तसे सर्वसामान्यांसमोर फारसे न आलेले कलावंत. पारशी समाजात 'आंग्ल' प्रभाव जास्त असून सुद्धा ते अभिजात हिंदुस्तानी संगिता कडे वळले, उस्ताद अब्दुल करीमखां ह्या त्यांच्या (किराणा)घराण्याच्या अध्वर्युची आठवण व्हावी असेच फिरोजजींचे गायन आहे. सवाईगंधर्व महोत्सवात शेवटच्या दिवशी पहाटे गंगूबाई हनगल, दस्तुरबुवा आणि शेवटी अण्णा हा गाण्याचा क्रम गेली अनेक वर्ष होता.
'गोपाला मेरी करूना' ही अब्दुल करिमखा साहेबांची ठुमरी आणि दस्तुरबुवांचं काय अजब नातं होतं देवच जाणे! सवाईगंधर्व महोत्सवात त्यांना दरवर्षी न चुकता 'गोपाला...' गाण्याची फर्माईश व्हायची आणि दस्तुरबुवही अगदी आवडीने ते गात! फारच अप्रतिम गायचे! साक्षात अब्दुल करीमखा साहेबच डोळ्यासमोर उभे करायचे! पं. भीमसेन जोशी आणि दस्तुर! दोघेही सवाईगंधर्वांचे शिष्य. त्या अर्थाने दोघेही एकमेकांचे गुरुबंधू होते. आणि तसंच त्यांचं अगदी सख्ख्या भावासारखंच एकमेकांवर प्रेमही होतं! सवाई महोत्सवात एके वर्षी दस्तुर गुरुजींनी कोमल रिषभ आसावरी तोडी इतका अफाट जमवला की तो ऐकून अण्णा दस्तुरांना म्हणाले, "फ्रेडी, आज मला गाणं मुश्किल आहे. आज तुमचेच सूर कानी साठवून मी घरी जाणार!" मा.पं. भीमसेन जोशी नेहमी प्रेमाने दस्तुरांना 'फ्रेडी' या नावाने हाक मारायचे!
पं. फिरोज दस्तूर यांचे ९ मे २००८ रोजी निधन झाले. पं.फिरोज दस्तूर यांना आदरांजली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- तात्या अभ्यंकर
पं फिरोज दस्तूर -। राग मल्हार और ठुमरी
https://www.youtube.com/watch?v=ZoH5gPNElUg
'गोपाला मेरी करूना'
https://www.youtube.com/watch?v=ZZmyWYqA2wo
May 9, 2017
डॉ.वि.भा.देशपांडे यांनी मॉडर्न महाविद्यालय तसेच पुणे विद्यापीठात मराठी आणि नाट्यशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांचा जन्म ३१ मे १९३८ रोजी झाला. नाट्यसमीक्षक विश्वनाथ भालचंद्र देशपांडे उर्फ डॉ.वि.भा. देशपांडे हे पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अनेक वर्षे पदाधिकारी होते. डॉ. वि. भा. देशपांडे हे पाच दशकांहून अधिक काळ सांस्कृतिक क्षेत्रात, त्यातही विशेषतः नाट्यक्षेत्रात वावरत होते. डॉ. वि. भा. देशपांडे यांनी मराठी नाट्यकोश या जवळजवळ १२०० पानी ग्रंथाचे लिखाण व संपादन करून मराठी कोशवाङ्मयात एक मोलाची भर टाकली आहे. त्यांची २०१५ सालापर्यंत ५१ पुस्तके प्रकाशित झाली होती. डॉ.वि.भांचे बहुतांशी लिखाण मराठी नाट्यसृष्टीबद्दल आहे.
‘नाटकातली माणसं’, ‘गाजलेल्या भूमिका’, ‘नाटक नावाचं बेट’ , ‘निळू फुले ‘,‘निवडक नाट्यप्रवेश: पौराणिक’ , ‘वारसा रंगभूमीचा’, ‘आचार्य अत्रे प्रतिभा आणि प्रतिमा’ ही त्यांनी लिहिलेली काही प्रसिद्ध पुस्तके आहेत. नाटक, साहित्य, संगीत या गोष्टींवर नितांत प्रेम करणाऱ्या विभांना आजवरच्या प्रवासात भेटलेली माणसे आणि त्यांच्याकडून आलेल्या अनुभवावर त्यांनी पुस्तक लिहिले 'नाट्यभ्रमणगाथा'. नाटके पाहण्यासाठी, नाटकांशी संबंधित माणसांना भेटण्यासाठी अनेक प्रांतांमध्ये त्यांनी भ्रमंती केली, त्याचीच ही भ्रमणगाथा. नाट्य-साहित्य क्षेत्रातल्या दिग्गजांना त्यांना जवळून पाहता आले. अनेकांशी त्यांचा स्नेह, मैत्र जुळले. वि. वा. शिरवाडकर, पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर, जयवंत दळवी, निळू फुले, विजया मेहता, ज्योत्सना भोळे, भीमसेन जोशी, कमलाकर सारंग अशी अनेक मंडळी आहेत. त्यांची नाटके, त्यांचे प्रयोग, त्यांच्या कलेची आणि व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये वि. भा. देशपांडे यांनी ओघवत्या शैलीत लिहिली आहेत. रंगभूमीच्या इतिहासातील अनेक घटना-प्रसंगही त्यातून उलगडले आहेत. डॉ. वि. भा. देशपांडे यांच्या आई वडिलांच्या स्मरणार्थ दर वर्षी एका चांगल्या ग्रंथाला ‘इंदिरा-भालचंद्र पुरस्कार’ देण्यात येतो. २०१६ साली हा पुरस्कार रत्नाीकर मतकरी यांना त्यांच्या ‘माझे रंगप्रयोग’ या पुस्तकासाठी देण्यात आला. याआधी विजया मेहता (झिम्मा), डॉ. अजय वैद्य (मास्टर दत्ताराम नाट्यवीर) व मोहन जोशी (नट-खट) यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. डॉ. वि.भा.देशपांडे यांचे ९ मार्च २०१७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
वि.भा.देशपांडे यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान
आचार्य अत्रे प्रतिमा आणि प्रतिभा, कालचक्र : एक अभ्यास, नटसम्राट : एक आकलन, नाटककार खानोलकर, नाट्यभ्रमणगाथा, नाट्यरंग (कलावंतांच्या मुलाखती), नाट्यव्यक्तिरेखाटन, पौराणिक-ऐतिहासिक, नाट्यसंवाद रचना कौशल्य, नाट्यस्पंदने (नाट्यविषयक लेख), निवडक नाट्य मनोगते,मराठी नाटक पहिले शतक, मराठी रंगभूमी - स्वातंत्र्यपूर्व मराठी नाटक व स्वातंत्र्योत्तर काळ - रंगभूमीचा इतिहास (दोन खंड), माझा नाट्यलेखन-दिग्दर्शनाचा प्रवास, यक्षगान लोकनाटक, रायगडाला जेव्हा जाग येते : एक सिंहावलोकन, स्वातंत्र्योत्तर मराठी नाटक,
वि.भा.देशपांडे यांना मिळालेले पुरस्कार/सन्मान
उत्कृष्ट संपादनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कॉसमॉस पुरस्कार, जयवंतराव टिळक गौरव पुरस्कार, नाट्यगौरव पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार, माधव मनोहर पुरस्कार, रंगत-संगत सन्मान,राजा मंत्री पुरस्कार, वत्सलाबाई अंबाडे साहित्य निर्मिती पुरस्कार, वि.स. खांडेकर नाट्यसमीक्षक पुरस्कार, इंदिरा-भालचंद्र पुरस्कार.
June 1, 2017
पारंपरिक पुस्तकी शब्दकोशाच्या मर्यादा तंत्रज्ञानाच्या आधारे होता होईतो कमी करायच्या आणि त्याचा लाभ अधिकाधिक जणांपर्यंत पोहचवायचा संकल्प नाशिकच्या सुनील खांडबहाले याने वयाच्या अवघ्या तिशीतच पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे जगात प्रथमच कॉम्प्युटरवर ‘मराठी डिक्शनरी’, पहिली ‘ऑनलाइन मराठी डिक्शनरी’ व आता पुन्हा एकदा सर्वप्रथम भारतीय भाषेतील ‘मोबाइल डिक्शनरी’ प्रत्यक्षात आणणारा सुनील आजही आपल्या गावातल्या मातीशी निष्ठेने इमान राखून आहे.
आपल्या अभिनव आणि वैविध्यपूर्ण उपक्रमांमुळे आजमितीस दररोज लाखभराहून अधिक जणांना आपल्या वेबसाइटकडे आकर्षित करणाऱ्या सुनीलची पाश्र्वभूमी अत्यंत सामान्य.
नाशिकजवळच्या महिरावणी या खेडेगावात टिपिकल जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेल्या सुनीलने पहिल्यांदा नाशिक पाहिले ते दहावीच्या परीक्षेसाठी आणि प्रथम मुंबई पाहिली तीदेखील एकविसाव्या शतकातच. जात्याच बुद्धिमान असणारा सुनील कोश वाङ्मयासारख्या अत्यंत किचकट क्षेत्राशी बांधला गेला तो जीवनाची गरज म्हणून. दहावीला चांगले मार्क मिळविल्यावर त्याने अहमदनगरच्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये इन्स्ट्रमेंटल इंजिनीअरिंगसाठी प्रवेश घेतला, पण खेडय़ातल्या मराठी शाळेत झालेल्या शिक्षणामुळे त्याला तेथे माध्यमाची आणि भाषेची चांगलीच अडचण जाणवू लागली. अगोदरच मराठीऐवजी इंग्रजी माध्यम आणि त्यातही संपूर्ण अपरिचित अशा तांत्रिक शब्दांचा भरणा. कुणाला विचारण्याची सोय नाही.
अशा वातावरणात सगळा अभ्यास त्याच्या डोक्यावरून जाऊ लागला. त्याने मग वर्गात न समजलेले इंग्रजी शब्द वहीत उतरवून घ्यायचे आणि रूमवर आल्यावर त्याचे ‘डिक्शनरी मिनिंग’ जाणून घ्यायचे, असा परिपाठ सुरू केला. त्यामुळे त्याची ‘व्होकॅबिलिटी’ समृद्ध होऊ लागली आणि प्रथम वर्षांला ६० पैकी जे केवळ चौघे उत्तीर्ण झाले, त्यातही अव्वल म्हणून स्थान पटकावत त्याने बाजी मारली. तीन वर्षांंत त्याच्याकडे तब्बल २० हजार शब्द जमले. त्याचा आपल्याला फायदा झाला, तसाच हजारो-लाखो तरुणांनाही तो व्हावा आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्याच्या वापरात सुलभता यावी, या उद्देशाने सुनीलने याच क्षेत्रात काम करायचे ठरवले. अनेकांची मदत व मार्गदर्शन घेत अत्यंत चिकाटीने त्याने वर उल्लेखलेले एक-एक उपक्रम अथक मेहनतीने पूर्ण केले.
सुनीलच्या घरची पाश्र्वभूमी शिक्षणाची अजिबातच नाही. वडील केवळ चौथीपर्यंत शिकलेले, तर आई निरक्षरच. सुनील आणि त्याच्या भावांनी आईला चांगली अक्षर ओळख करून दिल्याने ती वाचू लागली आहे. नाशिकच्या महात्मानगर परिसरात त्याने सध्या आपले कार्यालय सुरू केले असले तरी आजदेखील त्याचे वास्तव्य आहे ते महिरावणी गावातील शेतातल्या घरातच. त्यामुळेच त्याच्या सामाजिक जाणिवा अजूनही घट्ट आहेत. तो गावाकडच्या मुलांनी तंत्रज्ञान आत्मसात करावे, यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. हजारो रुपये फी भरण्याची ऐपत नसल्याने संगणकाच्या अधिकृत अभ्यासक्रमापासून आपल्याला वंचित राहावे लागले, तसे इतरांना लागू नये, ही त्याची मनस्वी इच्छा आहे. त्यातूनच त्याने ‘मराठी मोबाइल डिक्शनरी’ विकसित केल्यावर आपल्या गावातील मुलांवर एक प्रयोग केला. अर्धवट शाळा सोडावी लागलेल्या वा शिक्षण थांबवून शेतीकडे वळलेल्या काही तरुणांच्या मोबाइलवर त्याने ही डिक्शनरी लोड करून दिली व महिन्याभराने त्यांच्या इंग्रजी शब्दसंग्रहाची चाचणी केली. यामध्ये त्याला सकारात्मक प्रतिसाद आला आणि मग हुरूप वाढवून त्याने हा उपक्रम तडीस नेला. आता अन्य भारतीय भाषांवरही त्याचे अशाच स्वरूपाचे काम सुरू आहे.
शिवसेनेचे नाशिक महानगरप्रमुख अजय बोरसे यांनी सुनीलच्या ‘मराठी मोबाइल डिक्शनरी’चा उपक्रम उचलून धरत तरुणांसाठी अशा पाच हजार डिक्शनरी पुरस्कृत केल्या आहेत. त्याला अर्थातच उत्तम प्रतिसाद मिळतोय, पण शासनस्तरावरून मात्र या बाबतीत अजूनही ‘सारे कसे शांत शांत’ अशीच स्थिती आहे.
August 4, 2017
चौफेर काव्यलेखनाने रसिकांना आनंद देणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९२२ रोजी झाला. शांता शेळके यांचा जन्म इंदापूरला, तर बालपण खेड मंचरच्या परिसरात गेले. पुण्याच्या हुजूरपागा शाळेतून शालेय शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातच सर परशुरामभाऊ महाविद्यालयात शांता शेळके यांनी पुढील शिक्षण घेतले. संस्कृत आणि मराठी भाषेतून एम. ए. करताना त्या मुंबई विद्यापीठात पहिल्या आल्या. त्यावेळी त्यांना न.चि. केळकर आणि चिपळूणकर पुरस्कार मिळाले होते. त्यानंतर मुंबई येथे अल्पकाळ आचार्य अत्रे यांच्या नवयुग साप्ताहिकात नोकरी केली. पुढे नागपूर आणि मुंबई येथील महाविद्यालयांतून मराठीचे अध्यापन केले.
मराठी, संस्कृत आणि इंग्रजी या तिन्ही भाषांवर शांताबार्इंचं प्रभुत्व होतं. कथा-कादंबर्याा, स्तंभलेखन लिहणार्या , भाषांतर व अनुवाद करणार्या शांताबाई कवयित्री म्हणून अधिक लोकप्रिय झाल्या आणि मराठी माणसांच्या मनापर्यंत पोहोचल्या. एखाद्या गीतातून भावनाट्य चित्रीत करण्याचं शब्दकौशल्य त्यांच्या अनेक गीतांतून होते. विविध क्षणातील वेगवेगळे तरंग त्यांच्या तरलतेसह टिपणं त्यांना सहज जमायचं. गाण्यातलं मराठीपण त्यातल्या सुगंधासह जपण्यासाठी अस्सल ग्रामीण शब्द गाण्यात घालताना त्यांची प्रतिभा कचरली नाही. सखे, सये अशा संबोधनातून ते घरच वाहू लागयतं.
उनाड मनाच्या अवखळ प्रियकराचा अल्लडपणा, त्याचं प्रेयसीला चिडवणं हे सगळं त्या मोठ्या मिश्कीलपणे कवितेत व्यक्त करत. त्यांनी अनेक गीतांतून स्त्रीमनाच्या छटा त्यातील स्वाभाविकतेसह व्यक्त केलेल्या आहेत. प्रियकराच्या मनातील विरह, प्रीती, धैर्य, बेछूटपणा यांचाही प्रत्यय देणारी त्यांची अनेक गाणी आहेत. कोणत्या तरी दाहक वेदनेचा चटका बसून संपूर्ण आयुष्यालाच एक रिक्तता यावी, अशी त्यांची गाणी आजही लोकप्रिय आहेत. शांताबार्इंची भाषाशैली आणि काव्यशैली पहिल्यापासूनच ओघवती, लालित्यपूर्ण; पण त्याचं सगळं श्रेय त्या आचार्य अत्रे यांना देत. ‘नवयुग’मध्ये नोकरी करत असताना प्र.के अत्रे एकदा त्यांना म्हणाले होते, ‘शांता, तुला शब्दांचा सोस फार आहे. लहान मुलं ज्याप्रमाणं रंगीबेरंगी खडे गोळा करतात त्याप्रमाणं तू शब्द गोळा करतेस. बोलण्यातला ओघ आपल्या लेखनात आला पाहिजे.’ अत्र्यांचं हे वाक्य त्यांनी लक्षात ठेवलं आणि आपली संस्कृतप्र्रचुर भाषाशैली बदलली.
कविता, कथा, कादंबरी, व्यक्तिचित्रे, बालसाहित्य,चित्रपटगीते,समीक्षा, आत्मकथन, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत लेखन शांता शेळके केलेल्या वृतपत्र, संपादक तथापि कवयित्री आणि गीतकार म्हणून आजच्या पिढीतही विशेष प्रसिद्ध आहेत. बालसाहित्याच्या जगातही त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. अनेक नाटके, ध्वनी मुद्रिका, चित्रपटांसाठी त्यांनी विपुल गीतलेखन केले. ’तोच चंद्रमा’, ’कळ्यांचे दिवस फुलांच्या राती’, ’चित्रगीते’ ही त्यांची गीतसंकलने प्रसिद्ध आहेत. शांताबाईंनी हिंदी, इंग्रजी, संस्कृत या भाषांमधील साहित्याचे अत्यंत ओघवत्या शैलीत मराठी भाषांतर केलेले आहे. महाकवी कालिदासाचे ’मेघदूत’, ’चौघीजणी’ त्यांच्या कवितांबरोबरच त्यांचे गद्यलेखन सुद्धा खूप सुंदर आणि मनाला पकडून ठेवणारे आहे.
वाचायला घेतले की सोडवत नाही त्यांची पुस्तके. त्यांचे गुलमोहोर, कावेरी, बासरी, इत्यादी कथासंग्रह तर ओढ, धर्म, अशा कादंब-या प्रसिद्ध आहेत. धूळपाटी नावाचे त्यांचे आत्मचरित्र सुद्धा खूप सुंदर आहे. स्वतःच्या लहानपणाबद्दलच्या त्यातील आठवणी तर आपल्याला हेवा करायला लावतात. तसेच ’पावसाआधीचा पाऊस’, ’आनंदाचे झाड’, ’वडीलधारी माणसे’ हे त्यांचे ललित लेख संग्रह खूपच गाजलेले आहेत. भाषांतर हे शांताबाईंच्या दृष्टीनी फक्त अर्थार्जनाचे साधन नव्हते तर स्वतःच्या भाषाभ्यासातील भर टाकणारेपण होते. त्यातील अत्यंत गाजलेले भाषांतर म्हणजे जपानी हायकुंचे. जपान मधील हा काव्यप्रकार त्यांनी अनुवादित करून मराठी रसिकांच्या पुढे ’पाण्यावरच्या पाकळ्या’ नावानी ठेवला आणि तो लोकांना इतका आपला वाटला की लोक आता मराठी हायकू असंच म्हणतात.
जरी अनेक साहित्य प्रकार समर्थपणे हाताळले असले तरी, कविता लेखन हा शांताबाईंच्या विशेष आवडीचा साहित्य प्रकार. ’असेन मी नसेन मी’ , ’वर्ष’, ’रूपसी’, ’गोंदण’, ’अनोळख’, ’जन्माजान्हवी’ ही त्यांच्या कविता संग्रहांची काही नावे. ’मुक्ता आणि इतर गोष्टी’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह. ’स्वप्नतरंग’ ही त्यांची पहिली कादंबरी; तर ’शब्दांच्या दुनियेत’ हा त्यांचा पहिला ललितलेखसंग्रह. त्यांनी उत्तम अनुवादही केले. “मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश” सारखी भक्ती गीते लिहिली. “शूर आम्ही सरदार” आणि “मराठी पाऊल पडते पुढे” या सारख्या चित्रपट गाण्यांनी अनेकांना स्फुरण दिलंय. मा.शांता शेळके म्हणजे सगळ्या लहान मुलांच्या लाडक्या आजी. नातवंडांसाठी "किलबिल किलबिल पक्षी बोलती", "विहीणबाई विहीणबाई" अश्या अनेक छान छान कविता, बालगीतं लिहिणा-या.
शांता शेळकेंनी साधेपणा आयुष्यभर जपला. निसर्गाविषयी मात्र त्यांना विलक्षण ओढ होती. निसर्गाच्या सांनिध्यात त्या तहानभूक विसरून तासन्तास बसत. निसर्ग हाच त्यांचा खरा सखा सोबती होता. निसर्गाच्या अनेक छटा त्यांनी त्यांच्या गीतांतून व्यक्त केल्यात. शांता शेळके यांनी अनेक वर्षे नाटक आणि चित्रपटांच्या सेन्सॉर बोर्डावर काम केले. आळंदी इथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना मिळाला होता. मा.शांता शेळके यांचे ६ जून २००२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
शांता शेळके यांची काही गाणी
https://www.youtube.com/watch?v=cjmmEnmf5IQ
चुकवू नये अशा शांता शेळके यांच्या वरील नक्षत्रांचे देणे हा कार्यक्रमाची लिंक.
https://www.youtube.com/watch…
https://www.youtube.com/watch?v=nPvJrSERxXA
https://www.youtube.com/watch?v=MYdiWHCAvUQ
https://www.youtube.com/watch?v=g7MDSoFFJxQ
https://www.youtube.com/watch?v=2xA9mMiEO6g
https://www.youtube.com/watch?v=QJCggfj3gRs
https://www.youtube.com/watch?v=XSUlZIQxPWI
https://www.youtube.com/watch?v=ORaa2x980fY
https://www.youtube.com/watch?v=6CF8BWBj5WI
https://www.youtube.com/watch?v=5paqPYi6sM4
https://www.youtube.com/watch?v=iSGWoHWcZmw
November 10, 2017
एकनाथ रेंदाळकरांनी आंग्ल कवी टेनिसनच्या ‘एनॉक आर्डन’ काव्याने ‘सारजा’ ह्या नावाने रूपांतर केले. इंग्रजीबरोबर काही संस्कृत, बंगाली, गुजराती काव्यरचनाही त्यांनी मराठीत आणल्या.
July 4, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti