सुमतीबाई सुकळीकर

बुढाणा जिल्ह्यातील मेहेकर या गावी सधन शेतकर्‍याच्या घरात जन्मलेल्या सुमती देशमुखच्या पुढे सुमती सकळीकर आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या लोकमाता असा त्यांचा प्रवास नक्कीच विलोभनीय आहे. त्यांचे वडिल मेहेकर हे संघाचे कार्यकर्ते होते, त्यामुळे सुमतीबाईंवर ही हिंदुत्ववादी विचारांचा संस्कार होत गेला.



बुढाणा जिल्ह्यातील मेहेकर या गावी सधन शेतकर्‍याच्या घरात जन्मलेल्या सुमती देशमुखच्या पुढे सुमती सकळीकर आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या लोकमाता असा त्यांचा प्रवास नक्कीच विलोभनीय आहे. त्यांचे वडिल मेहेकर हे संघाचे कार्यकर्ते होते, त्यामुळे सुमतीबाईंवर ही हिंदुत्ववादी विचारांचा संस्कार होत गेला. कालांतराने संघाचे विचार ही गडद होत गेल्याने, १९५१ जनसंघाची स्थापना करण्यात आली व १९५२ रोजी नागपुरात सुमितीबाईंनी जनसंघाचे सदस्यत्व स्वीकारले, त्यांची कामगिरी नेहमीच निर्णायक तरीही पायातील दगडासारखी अदृश्य राहिली. त्यांचे वकृत्व, नेतृत्व आणि आंदोलन करण्याची ताकद फारच मोठी होती, थेट काळजाला भिडणारी त्यांची भाषणं असल्याने त्यांच्या सभा नेहमीच चर्चेचा आणि औत्सुक्याचा विषय असायचा.

कच्छ कराराच्या विरोधात जनसंघाने राष्ट्रव्यापी आंदोलन केली, त्यावेळी फक्त २ व्यक्तींची भाषणं गाजली एकतर अटल बिहारी वाजपेयी यांचे व दुसरे सुमतीताई सुकळीकरांचे. आणि याच काळात “संघ परिवाराने” सुमतीबाईंना लोकमाता म्हणून दर्जा दिला. राजकीय विचाराने कट्टर हिंदूत्त्ववादी असणार्‍या सुमतीबाई शुद्धपणे अराजकीयच होत्या. राजकारणातून निवृत्ती घेतल्यावर ही सुमतीबाईंनी नानाजी देशमुख यांच्या आदेशाप्रमाणे “बालजगत” या प्रकल्पासाठी अक्षरश: झोकून दिला, ह्या संस्कार प्रकल्पांना उदयाला आणण्यात त्यांचा बहुमोल योगदान तर आहेच, पण राजकीय विषयाचा स्पर्श ही प्रकल्पाला झाला नाही हे विशेष. त्यांच्या निधनांन जनसंघ आणि वैदर्भीय जनमानसावर मातृहृदयी सावलीचे विरुन जाणे आहे.

Author