‘रिपब्लिकन पक्षाला गटातटांमुळे भवितव्य नाही.. आता दलित पँथरसारखी चळवळ महिलांमधून उभी राहायला हवी,’ असे बरोबर वर्षभरापूर्वी, गेल्या एप्रिलमध्ये सम्यक साहित्य संमेलनात झालेल्या सत्काराला उत्तर देताना बेबीताई कांबळे म्हणाल्या होत्या. बेबीताई तेव्हाही खंगल्या होत्या, पण पँथरने जो आत्मविश्वास आणि बेधडकपणे वास्तवाला भिडण्याची वृत्ती युवकांच्या अंगी बाणवली, तसा एल्गार पुन्हा सुधारित स्वरूपात यायचा असेल तर तो महिलांमधून यावयास हवा, असे स्वप्न पाहात होत्या.
बेबीताईंना ओळखले जाते ते ‘जिणं अमुचं’ या आत्मचरित्राच्या लेखिका म्हणून. प्रा. डॉ. माया पंडित यांनी त्याचा इंग्रजी अनुवाद ‘प्रिझन्स वुइ ब्रोक’ या नावाने केला आणि पुढे फ्रेंचसारख्या अन्य भाषांतही बेबीताई कांबळे यांचे नाव पोहोचले. दलित मुलगी, युवती- स्त्री स्वतंत्र विचार कसा करू शकते, याचा हे पुस्तक म्हणजे एक उत्तम नमुना. ‘आमुचं जिणं’ सांगताना हे प्रातिनिधिक आत्मचरित्र आहे, याचे भान बेबीताईंना आहे. बाबासाहेब गावात आले म्हणून बालपणी आपणा भावंडांना केवढा आनंद झाला होता, यांसारख्या वर्णनांतून तर ते समाजाचेच चरित्र होते. डॉ. आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न कसा केला, हे सांगताना त्यात आलेले अडथळे किती वास्तव होते, याचेही भान बेबीताईंना असते. या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळाचा पुरस्कार मिळाला, त्यानंतर अनेकांनी बेबीताईंनी पुढेही लिहिते राहावे, लेखिका म्हणून नाव कमवावे, अशा भाबडय़ा अपेक्षा ठेवल्या होत्या! मुळात बेबीताई कार्यकर्त्यां. मिळालेल्या मानातून त्यांनी भटक्या- विमुक्तांसाठी आश्रमशाळा फलटणजवळ काढली आणि वाढवली. सत्कार पुढेही होत राहिले, तो पैसाही बेबीताईंनी या कार्यासाठी वापरला. गेले काही महिने त्या खंगल्या व थकल्या होत्या. पुण्यातील खासगी रुग्णालयात शनिवारी (२१ एप्रिल) त्यांचे निधन झाल्याची वार्ता कळल्यावर, स्त्रीवादी आणि दलित साहित्याने एक आधार गमावला, याचे वाईट अनेकांना वाटले. आश्रमशाळेतील मुलींना मात्र आप्तवियोगाचे दु:ख झाले.
दलित चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या आणि लेखिका श्रीमती बेबीताई कांबळे.
दलित आत्मचरित्रांच्या प्रदीर्घ आणि उज्ज्वल परंपरेत ज्या मोजक्या महिला आत्मचरित्रांचा समावेश आहे, त्यात बेबीताई कांबळे यांच्या 'जिणं आमचं' या आत्मकथनाचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. त्यांचे "जिणं आमचं' या आत्मचरित्राचे सात भाषांमधून भाषांतर झालेले आहे. राज्य शासनाने त्यांना दलितमित्र पुरस्काराने गौरविले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून थेट प्रेरणा घेतलेले विविध क्षेत्रांमधले जे धडाडीचे कार्यकर्ते आजही कार्यरत होते, त्यात बेबीताईंचा समावेश होता. १९३० च्या दशकात जेजुरीच्या जत्रेत बाबासाहेबांनी ओजस्वी भाषण करून 'पोरांना शिकविल्याशिवाय आपली या नरकातून सुटका होणार नाही' असे बजावले होते. ते ऐकून बेबीताईंच्या वडिलांनी त्यांना सातारा जिल्ह्यातल्या फलटण येथे शाळेत घातले आणि बेबीताईंचे जीवनच बदलले. त्यांचे आजोबा इंग्रज साहेबांचे बटलर; तर वडील ठेकेदार होते. असे असूनही 'महारवाड्या'तले कष्टाचे, रोगराईचे, अज्ञानाचे जिणे सगळ्यांप्रमाणेच त्यांनाही जवळून पाहायला लागलेच.
पुढे अनेक वर्षांनी हे जीवन शब्दबद्ध करताना बेबीताईंनी 'बिनशेपटाच्या जनावराचं जिणं' असे त्याचे मामिर्क वर्णन केले होते. हे आपले आत्मकथन नाही, तर त्या पिढीचे, समाजातल्या दबून गेलेल्या वर्गाचे ते प्रातिनिधिक प्रकटन आहे, असे बेबीताई म्हणत. त्यांचे आत्मकथन हा बहुमोल सामाजिक दस्तावेज आहे. त्यामुळेच, माया पंडित यांनी त्याचा 'प्रिझन्स वुई ब्रोक' असा अनुवाद केला, तेव्हा जगभरच्या वाचकांना दलित समाजाचे अस्सल दर्शन घडू शकले. हे कथन नंतर फ्रेंच व इतर भाषांमध्येही गेले.
'तुम्ही आणखी लिहा' असा आग्रह बेबीताईंना होई, तेव्हा आपण कार्यकर्त्या आहोत, लेखन हे आपले साधन आहे, असे त्या म्हणत. त्यामुळेच, फलटणला काढलेल्या भटक्या-विमुक्तांच्या आश्रमशाळेची त्यांना अधिक चिंता असे. दलित संघटित होत नाहीत, याची त्यांना काळजी वाटे. 'गटातटांच्या राजकारणाने रिपब्लिकन पक्षाला फारसे भवितव्य उरलेले नाही' असे कठोरपणे सांगतानाच आता दलित महिलांनीच 'दलित पँथर'सारखी आक्रमक संघटना उभारली पाहिजे, असे बेबीताई आवर्जून सांगत. हा त्यांचा स्त्रीशक्तीवरचा विश्वास होता.
बेबीताई कांबळे यांनी अत्यंत गरीब परिस्थितीला तोंड देत साहित्याची सेवा केली. अल्पशिक्षित असलेल्या बेबीताई विवाहानंतर फलटणमधील मंगळवार पेठेमध्ये दुकान चालवीत होत्या. दुकानात येणारे रद्दीचे कागद व वह्यांचे कागद यातील अक्षर ओळखीने त्यांना साहित्याची आवड निर्माण केली आणि हळूहळू जमेल तसे त्या कोऱ्या कागदावर लिहीत गेल्या. त्यातूनच दलित साहित्यिक म्हणून त्यांची ओळख होत गेली. श्रीमती बेबीताई यांनी दलित बांधवांची दु:ख अत्यंत जवळून अनुभवली आणि त्याचबरोबर स्वत:ही त्या परिस्थितीला तोंड देत राहिल्या. त्यातूनच त्यांच्या "जिणं आमचं' या आत्मचरित्राचा जन्म झाला. त्यांच्या आत्मचरित्राची मराठी, हिंदी, फ्रेंच, पंजाबी, बंगाली या भाषांत भाषांतरे झाली. इंग्रजी भाषेमध्ये या साहित्यकृतीचे भाषांतर झाल्यानंतर त्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा हैदराबाद येथे झाला होता.
बेबीताई कांबळे यांच्या "जिणं आमचं' या पुस्तकावर पुणे विद्यापीठात पीएचडी करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील कवितासंग्रह (भीमगीते) त्यांनी लिहिला असून, केवळ साहित्य सेवा करताना चळवळीतून दलित बांधवांना प्रगतीचे, शिक्षणाचे विचार देण्याबाबत त्या नेहमी अग्रेसर राहिल्या. त्यांनी केलेल्या सामाजिक व दलित चळवळीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने त्यांना दलितमित्र पुरस्कार देऊन गौरविले होते. फलटण भूषण पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले आहे. राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत त्यांनी निंभोरे (ता. फलटण) येथे भटक्या जमातीतील मुलांसाठी काढलेली आश्रमशाळा गेली २० वर्षे त्या चालवीत होत्या. याच परिसरामध्ये संविधान भवन बांधण्याच्या कामाला त्यांनी प्राधान्य दिले होते. फलटण तालुक्यासह जिल्ह्यातील दलित चळवळ व साहित्यामध्ये त्यांचा एक वेगळा दबदबा होता.
दलित साहित्यात स्त्रीवादाचा जोमदार प्रवाह वाहू शकला नाही. मात्र, स्त्रीवाद व दलित चळवळ यांचे जे अभिन्न, अतूट नाते आहे, त्याची नेमकी जाण बेबीताईंना होती. त्यामुळे त्या ज्याला 'भीमाचं वारं' म्हणत, ते वारे प्रत्येक घरातल्या मुलीच्या मनात शिरायला हवे, ही त्यांची तळमळ असे. म्हणूनच, बाबासाहेब शहरांत रुजले, आता ते खेड्यापाड्यांमध्ये रुजायला हवेत, यासाठी त्या अखेरपर्यंत धडपडल्या. २१ एप्रिल २०१२ रोजी वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांचे पुणे येथे एका खाजगी रुग्णालयात निधन झाले.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12904269.cms - बेबीताई कांबळे यांच्या निधनानंतर लिहिलेले महाराष्ट्र टाईम्समधील संपादकीय...
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर आणि विविध वर्तमानपत्रांतील लेख)
कांबळे, बेबीताई
‘रिपब्लिकन पक्षाला गटातटांमुळे भवितव्य नाही.. आता दलित पँथरसारखी चळवळ महिलांमधून उभी राहायला हवी,’ असे बरोबर वर्षभरापूर्वी, गेल्या एप्रिलमध्ये सम्यक साहित्य संमेलनात झालेल्या सत्काराला उत्तर देताना बेबीताई कांबळे म्हणाल्या होत्या. बेबीताई तेव्हाही खंगल्या होत्या, पण पँथरने जो आत्मविश्वास आणि बेधडकपणे वास्तवाला भिडण्याची वृत्ती युवकांच्या अंगी बाणवली, तसा एल्गार पुन्हा सुधारित स्वरूपात यायचा असेल तर तो महिलांमधून यावयास हवा, असे स्वप्न पाहात होत्या.
बेबीताईंना ओळखले जाते ते ‘जिणं अमुचं’ या आत्मचरित्राच्या लेखिका म्हणून. प्रा. डॉ. माया पंडित यांनी त्याचा इंग्रजी अनुवाद ‘प्रिझन्स वुइ ब्रोक’ या नावाने केला आणि पुढे फ्रेंचसारख्या अन्य भाषांतही बेबीताई कांबळे यांचे नाव पोहोचले. दलित मुलगी, युवती- स्त्री स्वतंत्र विचार कसा करू शकते, याचा हे पुस्तक म्हणजे एक उत्तम नमुना. ‘आमुचं जिणं’ सांगताना हे प्रातिनिधिक आत्मचरित्र आहे, याचे भान बेबीताईंना आहे. बाबासाहेब गावात आले म्हणून बालपणी आपणा भावंडांना केवढा आनंद झाला होता, यांसारख्या वर्णनांतून तर ते समाजाचेच चरित्र होते. डॉ. आंबेडकरांनी दाखवलेल्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न कसा केला, हे सांगताना त्यात आलेले अडथळे किती वास्तव होते, याचेही भान बेबीताईंना असते. या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळाचा पुरस्कार मिळाला, त्यानंतर अनेकांनी बेबीताईंनी पुढेही लिहिते राहावे, लेखिका म्हणून नाव कमवावे, अशा भाबडय़ा अपेक्षा ठेवल्या होत्या! मुळात बेबीताई कार्यकर्त्यां. मिळालेल्या मानातून त्यांनी भटक्या- विमुक्तांसाठी आश्रमशाळा फलटणजवळ काढली आणि वाढवली. सत्कार पुढेही होत राहिले, तो पैसाही बेबीताईंनी या कार्यासाठी वापरला. गेले काही महिने त्या खंगल्या व थकल्या होत्या. पुण्यातील खासगी रुग्णालयात शनिवारी (२१ एप्रिल) त्यांचे निधन झाल्याची वार्ता कळल्यावर, स्त्रीवादी आणि दलित साहित्याने एक आधार गमावला, याचे वाईट अनेकांना वाटले. आश्रमशाळेतील मुलींना मात्र आप्तवियोगाचे दु:ख झाले.
——————————————————-
कांबळे, बेबीताई
दलित चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या आणि लेखिका श्रीमती बेबीताई कांबळे.
दलित आत्मचरित्रांच्या प्रदीर्घ आणि उज्ज्वल परंपरेत ज्या मोजक्या महिला आत्मचरित्रांचा समावेश आहे, त्यात बेबीताई कांबळे यांच्या ‘जिणं आमचं’ या आत्मकथनाचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. त्यांचे “जिणं आमचं’ या आत्मचरित्राचे सात भाषांमधून भाषांतर झालेले आहे. राज्य शासनाने त्यांना दलितमित्र पुरस्काराने गौरविले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून थेट प्रेरणा घेतलेले विविध क्षेत्रांमधले जे धडाडीचे कार्यकर्ते आजही कार्यरत होते, त्यात बेबीताईंचा समावेश होता. १९३० च्या दशकात जेजुरीच्या जत्रेत बाबासाहेबांनी ओजस्वी भाषण करून ‘पोरांना शिकविल्याशिवाय आपली या नरकातून सुटका होणार नाही’ असे बजावले होते. ते ऐकून बेबीताईंच्या वडिलांनी त्यांना सातारा जिल्ह्यातल्या फलटण येथे शाळेत घातले आणि बेबीताईंचे जीवनच बदलले. त्यांचे आजोबा इंग्रज साहेबांचे बटलर; तर वडील ठेकेदार होते. असे असूनही ‘महारवाड्या’तले कष्टाचे, रोगराईचे, अज्ञानाचे जिणे सगळ्यांप्रमाणेच त्यांनाही जवळून पाहायला लागलेच.
पुढे अनेक वर्षांनी हे जीवन शब्दबद्ध करताना बेबीताईंनी ‘बिनशेपटाच्या जनावराचं जिणं’ असे त्याचे मामिर्क वर्णन केले होते. हे आपले आत्मकथन नाही, तर त्या पिढीचे, समाजातल्या दबून गेलेल्या वर्गाचे ते प्रातिनिधिक प्रकटन आहे, असे बेबीताई म्हणत. त्यांचे आत्मकथन हा बहुमोल सामाजिक दस्तावेज आहे. त्यामुळेच, माया पंडित यांनी त्याचा ‘प्रिझन्स वुई ब्रोक’ असा अनुवाद केला, तेव्हा जगभरच्या वाचकांना दलित समाजाचे अस्सल दर्शन घडू शकले. हे कथन नंतर फ्रेंच व इतर भाषांमध्येही गेले.
‘तुम्ही आणखी लिहा’ असा आग्रह बेबीताईंना होई, तेव्हा आपण कार्यकर्त्या आहोत, लेखन हे आपले साधन आहे, असे त्या म्हणत. त्यामुळेच, फलटणला काढलेल्या भटक्या-विमुक्तांच्या आश्रमशाळेची त्यांना अधिक चिंता असे. दलित संघटित होत नाहीत, याची त्यांना काळजी वाटे. ‘गटातटांच्या राजकारणाने रिपब्लिकन पक्षाला फारसे भवितव्य उरलेले नाही’ असे कठोरपणे सांगतानाच आता दलित महिलांनीच ‘दलित पँथर’सारखी आक्रमक संघटना उभारली पाहिजे, असे बेबीताई आवर्जून सांगत. हा त्यांचा स्त्रीशक्तीवरचा विश्वास होता.
बेबीताई कांबळे यांनी अत्यंत गरीब परिस्थितीला तोंड देत साहित्याची सेवा केली. अल्पशिक्षित असलेल्या बेबीताई विवाहानंतर फलटणमधील मंगळवार पेठेमध्ये दुकान चालवीत होत्या. दुकानात येणारे रद्दीचे कागद व वह्यांचे कागद यातील अक्षर ओळखीने त्यांना साहित्याची आवड निर्माण केली आणि हळूहळू जमेल तसे त्या कोऱ्या कागदावर लिहीत गेल्या. त्यातूनच दलित साहित्यिक म्हणून त्यांची ओळख होत गेली. श्रीमती बेबीताई यांनी दलित बांधवांची दु:ख अत्यंत जवळून अनुभवली आणि त्याचबरोबर स्वत:ही त्या परिस्थितीला तोंड देत राहिल्या. त्यातूनच त्यांच्या “जिणं आमचं’ या आत्मचरित्राचा जन्म झाला. त्यांच्या आत्मचरित्राची मराठी, हिंदी, फ्रेंच, पंजाबी, बंगाली या भाषांत भाषांतरे झाली. इंग्रजी भाषेमध्ये या साहित्यकृतीचे भाषांतर झाल्यानंतर त्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा हैदराबाद येथे झाला होता.
बेबीताई कांबळे यांच्या “जिणं आमचं’ या पुस्तकावर पुणे विद्यापीठात पीएचडी करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील कवितासंग्रह (भीमगीते) त्यांनी लिहिला असून, केवळ साहित्य सेवा करताना चळवळीतून दलित बांधवांना प्रगतीचे, शिक्षणाचे विचार देण्याबाबत त्या नेहमी अग्रेसर राहिल्या. त्यांनी केलेल्या सामाजिक व दलित चळवळीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने त्यांना दलितमित्र पुरस्कार देऊन गौरविले होते. फलटण भूषण पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले आहे. राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत त्यांनी निंभोरे (ता. फलटण) येथे भटक्या जमातीतील मुलांसाठी काढलेली आश्रमशाळा गेली २० वर्षे त्या चालवीत होत्या. याच परिसरामध्ये संविधान भवन बांधण्याच्या कामाला त्यांनी प्राधान्य दिले होते. फलटण तालुक्यासह जिल्ह्यातील दलित चळवळ व साहित्यामध्ये त्यांचा एक वेगळा दबदबा होता.
दलित साहित्यात स्त्रीवादाचा जोमदार प्रवाह वाहू शकला नाही. मात्र, स्त्रीवाद व दलित चळवळ यांचे जे अभिन्न, अतूट नाते आहे, त्याची नेमकी जाण बेबीताईंना होती. त्यामुळे त्या ज्याला ‘भीमाचं वारं’ म्हणत, ते वारे प्रत्येक घरातल्या मुलीच्या मनात शिरायला हवे, ही त्यांची तळमळ असे. म्हणूनच, बाबासाहेब शहरांत रुजले, आता ते खेड्यापाड्यांमध्ये रुजायला हवेत, यासाठी त्या अखेरपर्यंत धडपडल्या. २१ एप्रिल २०१२ रोजी वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांचे पुणे येथे एका खाजगी रुग्णालयात निधन झाले.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/12904269.cms – बेबीताई कांबळे यांच्या निधनानंतर लिहिलेले महाराष्ट्र टाईम्समधील संपादकीय…
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर आणि विविध वर्तमानपत्रांतील लेख)