(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • बॉलीवूड मधील शुक्राची चांदणी मधुबाला

    मधुबाला म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेले स्वप्न. त्यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९३३ रोजी झाला. भारतीय सौंदर्याचा प्रवास मधुबाला यांच्याजवळ येऊन थांबतो. अत्यंत सुंदर रूप घेऊन जन्माला आलेल्या मधुबाला यांची कारकीर्द मात्र शापित ठरली. आपल्या मोहक हास्याने आणि अभिनयाने अनेकांना घायाळ करणारी हिदी चित्रपट अभिनेत्री मधुबाला यांचे खरे नाव मुमताज जहान बेगम दहलवी. लहानपणी बेबी मुमताज म्हणूनही त्या ओळखल्या जायच्या. बाबुराव पटेल आणि डॉ. सुशीलाराणी पटेल या दांपत्याचा मधुबालावर विशेष लोभ होता. डॉ. सुशीलाराणी पटेल यांनीच बेबी मुमताजचे 'मधुबाला' असे नामकरण केले होते. मधुबाला लौकिक अर्थाने शिकलेली नव्हती. मधुबाला यांनी इंग्रजी संभाषणाचे धडे सुशीलाराणी पटेल यांच्याकडून घेतले होते. त्यांना एकुण दहा बहीणभावंडे होती. मधुबाला आपल्या आईवडिलांची पाचवी मुलगी होती. बालवयातच काम करायला सुरुवात केल्यामुळे मधुबाला कधी शाळेत जाऊ शकली नव्हती. तिला उर्दू भाषा येत होती, परंतु इंग्रजीचा एकही शब्द तिला बोलता येत नव्हता. .मधुबालावर तिच्या वडिलांचा पगडा खूप जास्त होता. मा.मधुबाला खूप भावूक होत्या. वडिलांच्या कडक शिस्तीमुळे मधुबाला कधीही पार्टी, प्रीमिअरमध्ये दिसली नाही. 'अमर' सिनेमातील एका सीनमध्ये निम्मी यांनी दिलीप कुमार आणि मधुबाला यांना डान्स स्टेप्स शिकवले होते, परंतु मधुबाला यांची एक स्टेप चुकीची केली, त्यामुळे सर्वांनी त्यांची खिल्ली उडवली होती. खिल्ली जेव्हा गंभीर होत गेली तेव्हा मात्र निम्मी यांना मधुबाला यांची माफी मागावी लागली होती. मधुबाला यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, 'निम्मीने मेकअप रुममध्ये येऊन माझी माफी मागितली होती. १९४२ साली आलेल्या 'बसंत' या सिनेमाद्वारे त्यांनी बालकलाकाराच्या रुपात पहिल्यांदा पडद्यावर एन्ट्री घेतली. त्यावेळी त्यांचे वय होते अवघे नऊ वर्षे. तर अभिनेत्री म्हणून १९४७ मध्ये 'नीलकमल' या सिनेमात त्या पहिल्यांदा झळकली होत्या. याचवर्षी त्यांचा आणखी एक चित्रपट रिलीज झाला होता. 'दिल की रानी' हे दुस-या सिनेमाचे नाव. १९४८ मध्ये मधुबाला यांचा 'अमर प्रेम' हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सर्व सिनेमात मा.मधुबाला राज कपूर यांच्यासोबत झळकली होती. या सिनेमानंतर मधुबाला यांनी बॉम्बे टॉकीजच्या 'महल' सिनेमात काम केले होते. 'महल'ला मिळालेल्या यशानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्याकाळातील आघाडीच्या अभिनेत्यांसह मधुबालाने काम केले होते. अशोक कुमार, दिलीप कुमार, देवानंद या आघाडीच्या अभिनेत्यांसह मधुबालाने स्क्रिन स्पेस शेअर केली होती. आपल्या करिअरमध्ये त्यांनी एकुण ६६ सिनेमांमध्ये प्रमुख अभिनेत्री म्हणून काम केले होते. १९४४ मध्ये 'ज्वार भाटा' सिनेमाच्या सेटवर मधुबालाची भेट दिलीप कुमार यांच्यासोबत झाली. या काळात मधुबाला दिलीप कुमार यांच्यावर एकतर्फी प्रेम करु लागली होती. त्यावेळी तिचे वय १८ वर्षे तर दिलीप कुमार यांचे वय २९ वर्षे होते. 'मुगल-ए-आझम' हा सिनेमा तयार होण्याच्या नऊ वर्षांच्या काळात या दोघांचे प्रेम अधिक फुलले. दिलीप कुमार यांच्यासह लग्न करण्याची तिची इच्छा होती. मात्र दिलीप कुमार यांनी लग्नाला नकार दिला. त्यानंतर किशोर कुमार यांच्यासह मधुबालाचे लग्न झाले. मधुबाला किशोर कुमार यांची चौथी पत्नी होती. किशोरकुमार यांच्या बरोबरचे लग्न ही बाब दोघासाठी कसेतरी जगण्यासाठी केलेली तडजोड होती जिचे अंतिम रूप त्यांना माहित होते. मधुबालाला हृदयरोग होता आणि १९५० पासून तिच्या आजारावर उपचार चालू होता. परंतु तिने ही गोष्ट सर्वांपासून लपून ठेवली. ह्रदयविकारामुळे ती कधीही आई होऊ शकत नव्हती हे डॉक्टर्सनी सांगितल्यामुळे तो हर्ष देखील तिला कधीच मिळणार नव्हता. निम्मी, नादिरा आणि संगीतकार नौशाद अशी तीन चार मंडळीच तिला मित्र म्हणून लाभले होते. लग्नानंतर अंधेरी मध्ये केव्हातरी नौशाद यांच्या घरी ती ये-जा करायची. अशाच एके दिवशी नौशाद पतीपत्नींनी तिला नैराश्याने रडताना पाहिल्यावर किशोर बरोबर फारकत घेण्याचा सल्ला दिला व पुनश्च नव्या जोमाने चित्रपटात येण्याचा आग्रह केला, पण फुलात तो जोम आता राहिला नव्हता. नौशादना उत्तर म्हणून तिने फक्त एक "शेर" ऐकीवला :
    "जब कश्ती साबित-ओ-सालीम थी
    साहिल कि तमन्ना किसको थी ?
    अब ऐसी शिकस्त कश्ती में
    साहिल कि तमन्ना कौन करे ?..."
    हिंदी समीक्षक मधुबाला यांच्या अभिनय काळाला 'स्वर्णयुग' म्हणतात. नर्गिस यांच्या नंतर भारतीय टपाल खात्याने मधुबाला यांचे तिकीटा काढून मान दिला होता. मधुबाला यांचे निधन २३ फेब्रुवारी १९६९ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०७१३३
    संदर्भ.इंटरनेट

      February 14, 2017


  • शीलावती केतकर

    शीलावती केतकर (माहेरच्या इंडिथ व्हिक्टोरिया कोहन) यांनी 'मीच हे सांगितले पाहिजे' हे मराठीतील महत्वाचे आत्मचरित्र लिहिले.

    ज्ञानकोशकार केतकरांच्या त्या पत्नी होत्या.

    २२ नोव्हेंबर १९७९ साली शीलावती केतकर यांचे निधन झाले.

    ## Sheelavati Ketkar

      July 31, 2017


  • चौफेर काव्यलेखनाने रसिकांना आनंद देणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके

    चौफेर काव्यलेखनाने रसिकांना आनंद देणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९२२ रोजी झाला. शांता शेळके यांचा जन्म इंदापूरला, तर बालपण खेड मंचरच्या परिसरात गेले. पुण्याच्या हुजूरपागा शाळेतून शालेय शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातच सर परशुरामभाऊ महाविद्यालयात शांता शेळके यांनी पुढील शिक्षण घेतले. संस्कृत आणि मराठी भाषेतून एम. ए. करताना त्या मुंबई विद्यापीठात पहिल्या आल्या. त्यावेळी त्यांना न.चि. केळकर आणि चिपळूणकर पुरस्कार मिळाले होते. त्यानंतर मुंबई येथे अल्पकाळ आचार्य अत्रे यांच्या नवयुग साप्ताहिकात नोकरी केली. पुढे नागपूर आणि मुंबई येथील महाविद्यालयांतून मराठीचे अध्यापन केले.

    मराठी, संस्कृत आणि इंग्रजी या तिन्ही भाषांवर शांताबार्इंचं प्रभुत्व होतं. कथा-कादंबर्याा, स्तंभलेखन लिहणार्या , भाषांतर व अनुवाद करणार्या शांताबाई कवयित्री म्हणून अधिक लोकप्रिय झाल्या आणि मराठी माणसांच्या मनापर्यंत पोहोचल्या. एखाद्या गीतातून भावनाट्य चित्रीत करण्याचं शब्दकौशल्य त्यांच्या अनेक गीतांतून होते. विविध क्षणातील वेगवेगळे तरंग त्यांच्या तरलतेसह टिपणं त्यांना सहज जमायचं. गाण्यातलं मराठीपण त्यातल्या सुगंधासह जपण्यासाठी अस्सल ग्रामीण शब्द गाण्यात घालताना त्यांची प्रतिभा कचरली नाही. सखे, सये अशा संबोधनातून ते घरच वाहू लागयतं.

    उनाड मनाच्या अवखळ प्रियकराचा अल्लडपणा, त्याचं प्रेयसीला चिडवणं हे सगळं त्या मोठ्या मिश्कीलपणे कवितेत व्यक्त करत. त्यांनी अनेक गीतांतून स्त्रीमनाच्या छटा त्यातील स्वाभाविकतेसह व्यक्त केलेल्या आहेत. प्रियकराच्या मनातील विरह, प्रीती, धैर्य, बेछूटपणा यांचाही प्रत्यय देणारी त्यांची अनेक गाणी आहेत. कोणत्या तरी दाहक वेदनेचा चटका बसून संपूर्ण आयुष्यालाच एक रिक्तता यावी, अशी त्यांची गाणी आजही लोकप्रिय आहेत. शांताबार्इंची भाषाशैली आणि काव्यशैली पहिल्यापासूनच ओघवती, लालित्यपूर्ण; पण त्याचं सगळं श्रेय त्या आचार्य अत्रे यांना देत. ‘नवयुग’मध्ये नोकरी करत असताना प्र.के अत्रे एकदा त्यांना म्हणाले होते, ‘शांता, तुला शब्दांचा सोस फार आहे. लहान मुलं ज्याप्रमाणं रंगीबेरंगी खडे गोळा करतात त्याप्रमाणं तू शब्द गोळा करतेस. बोलण्यातला ओघ आपल्या लेखनात आला पाहिजे.’ अत्र्यांचं हे वाक्य त्यांनी लक्षात ठेवलं आणि आपली संस्कृतप्र्रचुर भाषाशैली बदलली.

    कविता, कथा, कादंबरी, व्यक्तिचित्रे, बालसाहित्य,चित्रपटगीते,समीक्षा, आत्मकथन, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत लेखन शांता शेळके केलेल्या वृतपत्र, संपादक तथापि कवयित्री आणि गीतकार म्हणून आजच्या पिढीतही विशेष प्रसिद्ध आहेत. बालसाहित्याच्या जगातही त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. अनेक नाटके, ध्वनी मुद्रिका, चित्रपटांसाठी त्यांनी विपुल गीतलेखन केले. ’तोच चंद्रमा’, ’कळ्यांचे दिवस फुलांच्या राती’, ’चित्रगीते’ ही त्यांची गीतसंकलने प्रसिद्ध आहेत. शांताबाईंनी हिंदी, इंग्रजी, संस्कृत या भाषांमधील साहित्याचे अत्यंत ओघवत्या शैलीत मराठी भाषांतर केलेले आहे. महाकवी कालिदासाचे ’मेघदूत’, ’चौघीजणी’ त्यांच्या कवितांबरोबरच त्यांचे गद्यलेखन सुद्धा खूप सुंदर आणि मनाला पकडून ठेवणारे आहे.

    वाचायला घेतले की सोडवत नाही त्यांची पुस्तके. त्यांचे गुलमोहोर, कावेरी, बासरी, इत्यादी कथासंग्रह तर ओढ, धर्म, अशा कादंब-या प्रसिद्ध आहेत. धूळपाटी नावाचे त्यांचे आत्मचरित्र सुद्धा खूप सुंदर आहे. स्वतःच्या लहानपणाबद्दलच्या त्यातील आठवणी तर आपल्याला हेवा करायला लावतात. तसेच ’पावसाआधीचा पाऊस’, ’आनंदाचे झाड’, ’वडीलधारी माणसे’ हे त्यांचे ललित लेख संग्रह खूपच गाजलेले आहेत. भाषांतर हे शांताबाईंच्या दृष्टीनी फक्त अर्थार्जनाचे साधन नव्हते तर स्वतःच्या भाषाभ्यासातील भर टाकणारेपण होते. त्यातील अत्यंत गाजलेले भाषांतर म्हणजे जपानी हायकुंचे. जपान मधील हा काव्यप्रकार त्यांनी अनुवादित करून मराठी रसिकांच्या पुढे ’पाण्यावरच्या पाकळ्या’ नावानी ठेवला आणि तो लोकांना इतका आपला वाटला की लोक आता मराठी हायकू असंच म्हणतात.

    जरी अनेक साहित्य प्रकार समर्थपणे हाताळले असले तरी, कविता लेखन हा शांताबाईंच्या विशेष आवडीचा साहित्य प्रकार. ’असेन मी नसेन मी’ , ’वर्ष’, ’रूपसी’, ’गोंदण’, ’अनोळख’, ’जन्माजान्हवी’ ही त्यांच्या कविता संग्रहांची काही नावे. ’मुक्ता आणि इतर गोष्टी’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह. ’स्वप्नतरंग’ ही त्यांची पहिली कादंबरी; तर ’शब्दांच्या दुनियेत’ हा त्यांचा पहिला ललितलेखसंग्रह. त्यांनी उत्तम अनुवादही केले. “मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश” सारखी भक्ती गीते लिहिली. “शूर आम्ही सरदार” आणि “मराठी पाऊल पडते पुढे” या सारख्या चित्रपट गाण्यांनी अनेकांना स्फुरण दिलंय. मा.शांता शेळके म्हणजे सगळ्या लहान मुलांच्या लाडक्या आजी. नातवंडांसाठी "किलबिल किलबिल पक्षी बोलती", "विहीणबाई विहीणबाई" अश्या अनेक छान छान कविता, बालगीतं लिहिणा-या.

    शांता शेळकेंनी साधेपणा आयुष्यभर जपला. निसर्गाविषयी मात्र त्यांना विलक्षण ओढ होती. निसर्गाच्या सांनिध्यात त्या तहानभूक विसरून तासन्तास बसत. निसर्ग हाच त्यांचा खरा सखा सोबती होता. निसर्गाच्या अनेक छटा त्यांनी त्यांच्या गीतांतून व्यक्त केल्यात. शांता शेळके यांनी अनेक वर्षे नाटक आणि चित्रपटांच्या सेन्सॉर बोर्डावर काम केले. आळंदी इथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान त्यांना मिळाला होता. मा.शांता शेळके यांचे ६ जून २००२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    शांता शेळके यांची काही गाणी
    https://www.youtube.com/watch?v=cjmmEnmf5IQ
    चुकवू नये अशा शांता शेळके यांच्या वरील नक्षत्रांचे देणे हा कार्यक्रमाची लिंक.
    https://www.youtube.com/watch…
    https://www.youtube.com/watch?v=nPvJrSERxXA
    https://www.youtube.com/watch?v=MYdiWHCAvUQ
    https://www.youtube.com/watch?v=g7MDSoFFJxQ
    https://www.youtube.com/watch?v=2xA9mMiEO6g
    https://www.youtube.com/watch?v=QJCggfj3gRs
    https://www.youtube.com/watch?v=XSUlZIQxPWI
    https://www.youtube.com/watch?v=ORaa2x980fY
    https://www.youtube.com/watch?v=6CF8BWBj5WI
    https://www.youtube.com/watch?v=5paqPYi6sM4
    https://www.youtube.com/watch?v=iSGWoHWcZmw

      November 10, 2017


  • “गंधर्व भूषण” जयराम शिलेदार

    जयराम शिलेदार म्हणजे संगीतनाट्य इतिहासातील सोनेरी पान. त्यांचा जन्म ६ डिसेंबर १९१६ रोजी झाला. चित्रपट आणि नाटक या दोन्ही क्षेत्रांत सारखीच चमकदार कामगिरी करणाऱ्या थोड्या कलावंतांमध्ये "गंधर्वभूषण‘ जयराम शिलेदार यांचे नाव आजही मोठ्या आदराने घेतले जाते. घरचा सराफीचा व्यवसाय चांगला चालत होता. आजोबांच्या हातून घडलेल्या तोडे, बाजूबंद, पैंजणादी अलंकारांना आजूबाजूच्या संस्थानांतील राजघराण्यांतून मागणी असे. संगीताच्या सुरांशी या घराचा काहीही संबंध नव्हता. पण तत्कालीन प्रथेप्रमाणं प्रतिष्ठेचा प्रघात म्हणून कर्णेवाला ग्रामोफोन आणि गाजलेल्या कलाकारांच्या ध्वनिमुद्रिका घरात आल्या. खोडकर जयराम सतत खेळत असे. पण ग्रामोफोनच्या कुतूहलाने जयरामाचे पाय घरात रेंगाळू लागले. रेकॉर्ड्स ऐकत त्यांचं अनुकरण करता करता छोटय़ा जयरामला सूर गवसला. निसर्गत: उत्तम आवाज, गळ्याला चांगली फिरत, प्रभावी आकलनशक्ती यामुळं त्याला संगीताचा चांगलाच नाद लागला. सर्वाना जयरामचे गाणे आवडू लागले. गल्लीतल्या गणेशोत्सवात हौशी मंडळींनी ‘स्वयंवर’ नाटक बसवायचा घाट घातला. गाणाऱ्यांची वानवा असल्याने पदं कटाप करून गद्य नाटक करायचं ठरलं. ग्रामीण बोलीमुळे ‘सयेंवर’ नाटक तुफान विनोदी वाटू लागलं. उपस्थित प्रेक्षक हुर्यो करू लागले की शिलेदारांच्या जयरामला रंगमंचावर ढकललं जाई.. ‘कंचंबी कृष्नाचं गान गाऊन सोड.’ पण नाटकाशी संबंध नसलेलं ‘राधेकृष्ण बोल मुखसे’ हे पद जयराम यांनी सुरू करताच उधळलेले प्रेक्षक शांत झाले आणि आवडीनं पद ऐकू लागत. त्यांनी टाळ्या व ‘वन्स मोअर’ने जयरामला डोक्यावर घेतले. बाल जयरामने गद्य ‘स्वयंवर’ संगीत करण्याची ही घटना म्हणजे भावी काळात संगीत रंगभूमीची धुरा वाहण्याचं अवघड कार्य त्यांच्या हातून होणार याची नांदी होती. .

    सातवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर जयराम शिलेदार यांना शाळेचा कंटाळा आला. लिहिता-वाचता आलं, हिशेब करता आला की शाळेत जायलाच पाहिजे हे बंधन सैल होई. वडिलोपार्जित सराफी व्यवसायात जयराम यांनी यावं असं आजोबांना वाटत असे. पण त्यात जयराम यांचं मन अजिबात रमलं नाही. मग एका वकिलाकडं कारकुनी करायला त्यांना पाठवलं गेलं. तिथंही त्यांचे गाणं गुणगुणणं चालूच होते. ‘सयेंवर’च्या चमत्कारानंतर आजोबांनाही वाटू लागलं, की हा पोरगा नाटकातच नाव काढील; तर आपणच त्याला नाटक मंडळीत भरती करू. त्या काळात ही गोष्ट आगळीच म्हणावी लागेल. बेळगावात मुक्कामाला आलेल्या रघुवीर सावकारांच्या रंगदेवता हिंदी-उर्दू-मराठी थिएट्रिकल कंपनीत आजोबांनी जयराम यांना दाखल केलं. पूर्वीच्या नाटक मंडळ्या म्हणजे नाटय़विद्यालयेच असत. भावी कलाकारांना संगीत आणि नाटय़ाचं पद्धतशीर शिक्षण देण्यात तिथं कसूर होत नसे. सुरुवातीचं नमन म्हणण्यासाठी स्त्रीवेश धारण करून हात जोडून उभं राहण्याचं काम त्यांनी सहा महिने केलं. मग छोटय़ा भूमिका करत एका वर्षांत जयराम यांनी धैर्यधराच्या भूमिकेपर्यंत झपाटय़ानं मजल मारली. त्यावेळी त्यांचं वय होतं अठरा र्वष. मूकपटाचं बोलपटात रूपांतर झाल्यावर नाटकाचा प्रेक्षक चित्रपटांकडं वळला. नाटक मंडळ्या बंद पडू लागल्या. रंगदेवता नाटक मंडळी बंद होताच त्यांनी ‘राजाराम संगीत मंडळी’, ‘नवजीवन संगीत नाटक मंडळी’ या संस्थांत कामं केली. राजाराम संगीत मंडळीत त्यांना चिंतुबुवा गुरव, गणपतराव बोडस यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. किर्लोस्कर मंडळीच्या पठडीचं शिक्षण मिळाल्याने जयराम यांची कामगिरी उठावदार होऊ लागली. नंतर त्यांना गंधर्व नाटक मंडळीचं बोलावणं आलं. त्यांच्या दृष्टीनं हा भाग्ययोग होता. बालगंधर्व म्हणजे त्यांचं परमदैवत. गंधर्वाच्या सुरांनी मोहून गंधर्व-गायकी आत्मसात करणारे अनेक होते, पण मा.जयराम शिलेदार वेगळेपण हे- की त्यांनी गंधर्ववृत्तीचं अनुसरण केलं. संगीत नाटक कसं पेश करावं, त्यासाठी जीवन कसं झोकून द्यावं, हे त्यांना गंधर्वाकडून शिकायला मिळालं. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी संगीत नाटकाची पताका फडकवीत ठेवली. वयाच्या १६ व्या वर्षी रंगदेवता रघुवीर सावकारांच्या कंपनीत त्यांनी नाट्यकलेचा श्रीगणेशा केला. नंतर गंधर्व नाटक मंडळींमध्ये नटसम्राट बालगंधर्वांबरोबर नायकाची भूमिका करण्याची संधी मिळाली. चित्रपटात ललिता पवार, सुमती गुप्ते, तर नाटकात हिराबाई बडोदेकर, शांता आपटे, मीनाक्षी, जयमाला शिलेदार यांच्याबरोबर त्यांची कारकीर्द गाजली. गणपतराव बोडस, चिंतामणराव कोल्हटकर, केशवराव दाते यांचे मार्गदर्शन मिळाले. पुढे "मराठी रंगभूमी‘सारखी संस्था उभी केली. ४५ हून अधिक संगीत नाटकांचे सहा हजारहून अधिक प्रयोग केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संगीत नाटकाची पताका फडकवत ठेवली.
    राम जोशी यांच्यात जीवनावर आधारीत व्हीठ. शांताराम आणि बाबुराव पेंटर यांनी दिग्द र्शीत केलेला 'लोक शाहीर राम जोशी' हा चित्रपट १९४७ साली प्रदर्शित झाला. त्या चित्रपटामध्यें जयराम शिलेदार यांनी राम जोशी यांची तर हंसा वाडकर यांनी बयाची भूमिका साकारली होती.

    'जिवाचा सखा'मधील त्यांची भूमिकाही विशेष गाजली. १९४७ मध्ये डॉ. भालेराव यांच्या नाटय़महोत्सवातील 'धरणीधर' या नाटकामध्ये त्यांनी जयराम शिलेदार यांच्यासमवेत जयमाला यांनी पहिल्यांदा काम केले. तर 'शाकुंतल' नाटकामध्ये त्या शिलेदार यांच्या नायिका होत्या. १० ऑक्टोबर १९४९ रोजी जयराम शिलेदार, नारायणराव जाधव आणि प्रमिला जाधव यांनी मराठी रंगभूमी संस्थेची स्थापना केली. २३ जानेवारी १९५० रोजी जयराम शिलेदार यांच्याशी विवाहबद्ध होऊन त्या जयमाला शिलेदार झाल्या. जयमाला आणि जयराम शिलेदार यांचा संगीत नाटक हाच प्राण आणि सर्वस्व होते. संगीत रंगभूमीसाठी त्यांनी अपार कष्ट केले, पण त्याचा गाजावाजा कधीही केला नाही. संगीत रंगभूमीची सेवा ही त्यांनी निर्मोहीपणे केलेली नटराजाची सेवा होती. संगीत सौभद्र, सुवर्ण तुला, संशय कल्लोळ, स्वयंवर, एकच प्याला, शाकुंतल, मृच्छकटिक, मानापमान, ही एककाळ लोकप्रियतेचा कळस गाठलेली नाटके या दोघांनी सातत्याने रंगभूमीवर सुरू ठेवली. नव्या युगात संगीत रंगभूमीचा प्रेक्षकवर्ग कमी झाल्यामुळे, ही नाटके चालणार नाहीत, हा समजही त्यांनी खोटा ठरवला. कोल्हापूर, सांगली, सोलापूर या शहरात संगीत रंगभूमीचे महोत्सव होत. काही महोत्सवाच्या सर्व नाटकांची तिकीट विक्री पूर्ण झाल्यावर, रसिकांना नाट्यगृहात बसायलाही जागा उरत नसे. तेव्हा अनेक रसिकांनी जमिनीवर बसून संगीत नाटकांचा आनंद लुटल्याच्या घटना घडल्या आहेत. संगीत नाटक रसिकांनी या दोन्ही शिलेदारांवर अफाट प्रेम केले. हे प्रेम आणि संगीत रसिकांचा प्रतिसाद हेच त्यांचे खरे भांडवल होते. रसिकांची प्रशंसा हाच आपला सन्मान, असे हे दोघेही कृतज्ञपणे सांगत असत. 'मराठी रंगभूमी' ही संगीतनाट्य संस्था स्थापन करून त्यांनी अनेकांची कारकीर्द घडविली. जयराम शिलेदार यांच्या निधनानंतर "गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्यसेवा ट्रस्ट' ही संस्था स्थापन करून मा.जयमालाबाईंनी कलावंतांना घडवायचे कार्य केले होते. जयराम शिलेदार यांचे ६ नोव्हेंबर १९९२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 6, 2017


  • देविदास दत्तात्रेय वाडेकर

    कोशकार आणि तत्त्वज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेले देविदास दत्तात्रेय वाडेकर यांचा जन्म २५ मे १९०२ साली सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात कुरोली या खेडेगावात झाला. त्यांचे वडील राहुरी येथे प्राथमिक शिक्षक होते. त्यामुळे प्राथमिक शिक्षण राहुरी येथे तर नगर येथे देविदास वाडेकर यांचे माध्यमिक शिक्षण झाले.

      February 4, 2010


  • ज्योतिषातील अनिष्ट प्रथा आणि अंधश्रद्धा

    पुण्यामध्ये एक 'आगळे वेगळे' ज्योतिषी आहेत. त्यांचे भविष्य कथन अचूक आणि सकारात्मक असते. पण त्यांच्या मते ज्योतिषामध्ये कांही अनीष्ट प्रथा आहेत. 'कर्मकांड' या नावाने या प्रथा आजही अस्तित्वात आहेत. शापित पत्रिका, कालसर्प योग, नारायण नागबळी, मंगळ दोष, ग्रह दोष, नक्षत्र दोष, साडेसाती, वास्तू दोष ही ती 'कर्मकांडे' आहेत. त्यांच्या मते प्रत्यक्षात अशी कोणतीही कर्मकांडे अस्तित्वात नाहीत. ही सर्व काल्पनिक किंवा मानव निर्मित आहेत.तसेच देवाची शांत, ग्रह शांत,नक्षत्र शांत यातील 'शांत' या शब्दाला त्यांचा विरोध आहे. त्यांच्या मते पृथ्वीवरील कोणीही माणूस एवढा महान किंवा शक्तिवान झालेला नाही की तो एखाद्या देवाची, ग्रहाची किंवा नक्षत्राची शांत करू शकेल.तो फार फार तर त्यांची 'पूजा' करू शकेल. त्यामुळे कुठलीही 'शांत' ही शेवटी एक 'पूजा' असते. अशा प्रकारच्या पूजांना किंवा धर्म कार्यांना त्यांचा विरोध नाही. पण कर्मकांडांना त्यांचा सक्त विरोध आहे. ही कर्मकांडे व शांती म्हणजे ज्योतिष शास्त्रातील अंध श्रद्धा आहे असे त्यांचे म्हणणे आहे. अनेक लोक अशी कर्मकांडे व शांती करण्यासाठी वारेमाप पैसे खर्च करीत असतात. पण त्याचा उपयोग होत नसतो. ही कर्मकांडे व शांती म्हणजे ज्योतिषांना व धर्म कार्य करणाऱ्या गुरुजींना पैसे मिळवून देण्याची साधने बनली आहेत. ज्योतिषातील या अनीष्ट प्रथा व अंध श्राधेविरुध्ध आवाज उठविण्याचे व जन जागृती करण्याचे काम त्यांनी सुरु केले आहे. हे प्रवाहाच्या विरुध्ध पोहाण्यासारखे आहे याची त्यांना जाणीव आहे.आपणही आपल्या परीने त्यांच्या या कार्याला हातभार लावायचा प्रयत्न करू या!

    या ज्योतिषाचे नाव नंदकिशोर जकातदार असे आहे.

    -- उल्हास हरी जोशी
    January 10, 2011

      January 10, 2011


  • अविका गौर

    मला 'मिस युनिव्हर्स' व्हायचे आहे आणि एक दिवस हा किताब मी नक्की पटकाविणार... हा आहे आत्मविश्वास अविका गौरचा. ही अविका कोण, हे आता कुणाला सांगण्याची गरज आहे, असे वाटत नाही. किमान, 'इडियट बॉक्स'ची पूजा करणाऱ्या कोट्यवधी रसिकांना तर नाहीच नाही! दोन वर्षांपूर्वी कलर्स वाहिनीवर 'बालिका वधू' ही मालि . झाली तेव्हा बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथांना प्रसिद्धीचे वलय प्राप्त करून दिले जात असल्याची ओरड केली जाऊ लागली. 'बालिका वधू'तील केंद्रभूत व्यक्तिरेखा ठरलेल्या 'आनंदी'ची भूमिका साकारणारी अविका काहीशी भांबावली. थोड्याच | दिवसांमध्ये मालिकेचा एकूण सूर लक्षात आला नि सुतावरून स्वर्ग काढणारे आक्रमण शमले. त्यानंतर मात्र 'आनंदी' केवळ 'बालिका वधू'च नाही, तर | दूरचित्रवाणीवरील संपूर्ण मालिकाविश्वाची लाडकी ठरली! 'आनंदी-जग्या' ही छोट्या पडद्यावरील 'हिट्' जोडी ठरू लागली. मालिकांमधून अभिनय करण्याचा आनंदीला (तिच्या व्यक्तिरेखेचा प्रभाव पाहा. अविकाऐवजी आनंदी असाच उल्लेख होतो!) पूर्वानुभव होता. पण, ती घराघरात पोचली 'आनंदी'मुळे. तिच्या शाळेतील मित्र-मैत्रिणींसह शिक्षकवर्गही आनंदी, बिंदनी, चुहिया, छोटी मिर्ची अशा टोपणनावांनीच तिला बोलावू लागले. अविकासुद्धा मिळू लागलेल्या प्रसिद्धीचा आनंद लुटू लागली. मात्र, तिने भान सोडले नाही. महत्त्वाचे अविव म्हणजे हे यश अविकाचे नसून 'आनंदी'चे आहे, हे जाणण्याएवढी परिपक्वता तिने लहान वयातच दाखवली. त्यामुळेच 'बालिका वधू'च्या यशामुळे ती हवेत गेली नाही! 'सकाळची शाळा. तेथूनच दुपारी दोन वाजता मालिकेच्या चित्रीकरणस्थळी. तीन वाजल्यापासून ‘शिफ्ट' सुरू. सर्वसाधारणपणे पाच ते सहा तासांचे चित्रीकरण. त्यानंतर घरी... असा दिनक्रम होता. चित्रीकरणाच्या ठिकाणीच गृहपाठ, टेस्ट वगैरे उरकून टाकायचे. प्रसंगी अर्धा-एक तास डुलकीदेखील काढून पुन्हा फ्रेश ! पुढील एक-दोन

    दिवसांच्या चित्रीकरणासाठीचे संवाद वगैरे आदल्या रात्रीच दिले जात होते. त्यामुळे ते पाठ करण्यासाठी वेळ भरपूर मिळत असे आणि चित्रीकरणाचा मुळीच ताण येत नव्हता,' असे अविका स्पष्ट करते. 'माझा स्वभाव खूप बडबडा. अविका नि आनंदी या दोन्हींमध्ये कमालीचे साम्य वाटले. त्यामुळेच 'आनंदी' जगताना फारसा त्रास झाला नाही,' असेही अविका सांगते. एव्हाना अविका स्टार झाली आहे. पोस्टर-वॉलपेपर्स, असंख्य छायाचित्रांच्या माध्यमातून ती इंटरनेटवर झळकते आहे. तसेच, 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळांद्वारे अविका 'चाहत्यां' शी मनमुक्त संवाद साधते. समवयीन चाहत्यांसाठी आविकाचे 'स्लॅम बुक' तयारच असते. स्वभावविशेष - निरागस, गोड आणि मेहनती. आवडते कार्यक्रम -शिनचॅन, टॉम अॅण्ड जेरी. आवडती सहकलावंत -दादीसा, म्हणजेच सुरेखा सिक्री. पण, त्यांची भीतीही खूप वाटते! 'बालिका वधू'तील अविकाचा अखेरचा भाग गेल्या आठवड्यात झाला. यापुढील कथानकात वापरता येतील, अशी ‘फ्लॅशबॅक'ची बरीच दृश्ये चित्रित केली गेली. आनंदी पाच वर्षांनी मोठी होऊन जमशेदपूरच्या प्रत्युषा बॅनर्जीच्या रूपातून ती पडद्यावर दिसेल. अविकाचा खरा अभिनयप्रवास आता सुरू झाला असून मॉर्निंग वॉक, पाठशाला अशा चित्रपटांसाठी ती यापूर्वीच करारबद्ध झाली आहे.

    नसिरुद्दीन शहा, शबाना आझमी यांच्यासारख्या कसलेल्या कलाकारांसमवेत काम करण्याची संधी. अविकाला मिळणार आहे. अनेकविध पुरस्कार सोहळ्यांसाठी तिला करारबद्ध केले जाईल नि स्मृती इराणीच्या 'तुलसी'नंतरची छोट्या पडद्यावरील सर्वांत लाडकी सून म्हणून अविकाचा यापुढेही उल्लेख होत राहील. मात्र, या चकाकत्या, मोहमयी दुनियेतच अडकून राहायचे, की खरोखरीच ‘मिस युनिव्हर्स'च्या निमित्ताने व्यक्तिमत्त्व, अनुभवाच्या कक्षा विश्वव्यापी करायच्या, याचे भान अविका आणि तिच्या कुटुंबीयांना नक्कीच आहे, असा विश्वास वाटतो. 'बालिका'चा निरोप घेताना अविका खास संदेशही देते - यापुढेही बालिका वधू पाहा नि बालविवाहाच्या विरोधात आवाज उठवा!

      July 31, 2015


  • वारकरी संप्रदायाचे सोनोपंत दांडेकर

    सोनोपंत दांडेकर महाराष्ट्रातील विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, सर परशुरामभाऊ महाविद्यालयात तत्त्वज्ञान-विषयाचे प्राचार्य, संत साहित्याचे अभ्यासक, व वारकरी संप्रदायाचे प्रवचनकार होते.

      July 29, 2021


  • प्रवीण अमरे

    सचिन तेंडुलकर, विनोद कांबळीप्रमाणेच रमाकांत आचरेकरांचा शिष्य असलेल्या अमरेंची कारकीर्द फार मोठी ठरली नाही. ११ कसोटीत एका शतकासह ४२५ धावा त्यांनी केल्या.

      July 8, 2022


  • ज्येष्ठ क्रिकेटपटू सर व्हिवियन रिचर्ड्‌स

    च्युइंगगम चघळत चघळत रिचर्ड्‌स नुसता मैदानात येताना दिसला की गोलंदाजांना धडकी भरायची. त्या च्युइंगगम चघळणार्या चेहेऱ्यावर एक कमालीचा थंडपणा असायचा. जंगलात सिंह जसा आजुबाजुला कोण आहे याची पर्वा न करता येतो तसा तो यायचा. तो त्या मैदानावरचा राजा असायचा. उगाचच नाही त्याला किंग म्हणायचे. त्याच्या चेहेऱ्यावर येताना कमालीचे तुच्छ भाव असायचे. तोंडातुन तो एक चकार शब्द नाही काढायचा

      March 9, 2022