जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
पोलीस कचेरीतील कारकुनाची नोकरी १९५० मध्ये सोडून देऊन पिराजीरावांनी पूर्ण वेळ शाहिरीला वाहून घेतले. छ. शहाजी महाराजांनी त्यांना ‘शाहीर विशारद’ हा किताब व तहहयात मानधन दिले.
July 6, 2022
भारतीय समाजाचं प्रतिबिंब असणाऱ्या त्या मालिकांनी दर्शकांना अनेक वर्षं बांधून ठेवलं होतं. याशिवाय त्यांनी लिहिलेल्या ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’,‘काकाजी कहीन’,‘हमराही’,‘जमीन आसमान’,‘गाथा’यांसारख्या मालिकाही लोकप्रिय झाल्या होत्या.
July 14, 2022
भीमसेन जोशींचे वडील शिक्षक होते. भीमसेन यांचा संगीताकडे असलेला ओढा त्यांना पसंत नव्हता. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९२२ रोजी झाला. भीमसेना यांनी वैद्यकीय अथवा अभियांत्रिकी शिक्षण घ्यावे असा त्यांचा आग्रह होता. या मतभेदांमुळे अखेर भीमसेनांनी घर सोडण्याचे आणि त्याकाळी शास्त्रीय संगीतासाठी ख्यातनाम असलेल्या ग्वाल्हेर, लखनौ, रामपूर या शहरांपैकी एका ठिकाणी जाण्याचे ठरविले. व १९३३ साली वयाच्या अकराव्या वर्षी घर सोडले आणि ते ग्वाल्हेरात दाखल झाले. उस्ताद अब्दुल करीम खाँ, वझेबुवा, केसरबाई केरकर, उस्ताद बिसमिल्ला खाँ, वगैरेंचे गायन-वादन त्यांनी ऐकले. सुरुवातीला ते इनायत खाँ यांचे शिष्य जनाप्पा कुर्तकोटी यांच्याकडे गायन शिकले. त्यानंतर जालंदर येथे पंडित मंगतराम यांच्याकडे व ग्वाल्हेर येथे राजाभय्या पूंछवाले यांच्याकडेही गाण्याचे शिक्षण घेतले. त्यानंतर ते रामपूर येथे मुश्ताक हुसेन खाँ यांच्याकडे काही काळ शिकले. अशा प्रकारे काही वर्षे ग्वाल्हेर, लखनौ, रामपूर येथे व्यतीत केल्यानंतर त्यांचा शोध घेत असलेल्या वडिलांशी त्यांची भेट झाली आणि भीमसेन पुन्हा घरी परत आले.
भीमसेनांचा संगीतासाठीचा तीव्र ओढा पाहून त्यांचे वडील भीमसेनांना जवळच असलेल्या कुंदगोळ गावातील रामभाऊ कुंदगोळकर यांच्याकडे घेऊन गेले आणि रामभाऊंनी भीमसेनांना त्यांचे शिष्यत्व दिले. रामभाऊ ’सवाई गंधर्व’ म्हणून ख्यातनाम होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, भीमसेनांनी हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. रामभाऊ हे किराणा घराण्याच्या पद्धतीचे गायक होते. त्या काळातील परंपरेनुसार भीमसेनांनी गुरुगृही राहून कष्टपूर्वक गायनाचे धडे घेतले. रामभाऊ त्यांच्याकडून तोडी, पुरिया, मुलतानी वगैरे रागांवर रोज सुमारे आठ तास मेहनत करवून घेत. आणि त्यांच्याकडून भीमसेनांनी १९३६ ते १९४१ पर्यंतच्या काळात शक्य तेवढे ज्ञान आत्मसात केले. त्यावेळी आणि त्यानंतरही ते रोज सोळा तासांचा रियाज करण्याचा स्वतःचा दंडक पाळीत. त्यानंतर गुरू रामभाऊंच्या आज्ञेनुसार भीमसेनांनी त्यांचा निरोप घेतला आणि ते पुणे येथे आले.
भीमसेनांनी त्यांची पहिली संगीत मैफिल १९४२ साली वयाच्या केवळ एकोणविसाव्या वर्षी पुण्यातील हिराबागेत घेतली. सवाई गंधर्वांच्या षष्ट्यब्दी सोहळ्यानिमित्त त्यांनी गायन केले आणि महाराष्ट्राला त्यांची पहिली नीट ओळख झाली. भीमसेन जोशींना हिंदुस्थानी शास्त्रीय गायन पद्धतीचे ख्याल गायक म्हणत असले तरी ते ठुमरीही अतिशय छान गात. भारतात शास्त्रीय गायनाच्या हिंदुस्थानी आणि कर्नाटकी या दोन प्रमुख शाखा मानल्या जातात. भीमसेन जोशींचे वैशिष्ट्य असे की ते दक्षिणी भारतात प्रचलित असलेल्या कर्नाटकी गायनातल्या चीजा हिंदुस्थानी पद्धतीने गाऊन दाखवीत. त्यामुळे त्यांचे गायन कर्नाटकी संगीताची परंपरा असलेल्या दक्षिणी भारतातही, विशेषतः तरुण पिढीमध्ये लोकप्रिय झाले. आपल्या स्वरांची नदी जगाच्या दहा दिशांना अथांग वाहणार्याी संगीतसम्राट तसेच ख्याल गायकीसाठी सर्वश्रृत असलेल्या पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली भजने देखील प्रसिद्ध आहेत. शास्त्रीय संगीत व भजन यासह त्यांनी अनेक चित्रपटगीते, ठुमरी देखील वेगळ्या शैलीत गायल्यामुळे प्रसिद्ध आहे. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
केवळ मराठीच नाही, तर संपूर्ण देशासह विदेशातील रसिक भीमसेन जोशी यांच्या आवाजाने संगीत मैफल सुरू असताना जागेवरच खिळवून ठेवत होते. आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करून त्यांच्यावर भुरळ घातली होती. त्यांच्या त्या काळी वारंवार होणार्यास विमान प्रवासांमुळे, त्यांना पु.ल.देशपांडे यांनी गमतीने 'हवाईगंधर्व' ही पदवी बहाल केली होती. भीमसेन जोशी यांनी, त्यांचे गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ १९५२ सालापासून पुणे येथे दरवर्षी होणारा सवाई गंधर्व संगीत महोत्सव सुरू केला. महान गायक मा. भीमसेन जोशीं यांचे २४ जानेवारी २०११ निधन रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 24, 2018
मराठी साहित्य आणि साहित्यकारांना तसेच रसिकांना माहीत नसलेल्या हजारो कविता प्रा.बापटांनी मुखोद्गत केल्या आहेत. विविध वयोगटातील रसिक प्रेक्षकांना आनंद मिळेल याचे भान ठेवून प्रा.बापटांनी ह्या दुर्मिळ कवितांवर स्वरसाज चढविला.
April 1, 2022
December 15, 2010
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे जन्मलेल्या महाबळेश्वर मोरजे यांचे प्राथमिक शिक्षण वेंगुर्ला, हुबळी आणि पार्ल्यातील पार्ले टिळक विद्यालयात झाले. चर्चगेट येथील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून ते १९६४ मध्ये एल.एल.एम. झाले. याशिवाय एम.कॉम. (कॉस्टिंग) ही पदवीही त्यांनी संपादन केली होती. त्यांनी लंडनच्या इन्शुरन्स व चार्टर्ड सेक्रेटरी या पदविका घेतल्या होत्या. ज्येष्ठ वकील आर. सी. बेलोसे, रामराव आदिक व न्या. जी. एन. वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वकिली व्यवसायाचे धडे घेतले. त्यांनी मुंबई, मराठवाडा आणि शिवाजी विद्यापीठांत अध्यापनाचे काम केले. जगभरातील फ्लॅटओनर्स व रेंट अॅक्ट याच्या शोधनिबंधाबद्दल त्यांना १९६७ मध्ये पुरस्कार मिळाला. त्यांनी कायद्याच्या अभ्यासानिमित्त लंडन, अमेरिका येथे दौरे केले. १९७८ मध्ये ते सरकारी वकील; तर १९८७ मध्ये बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा याचे सदस्य होते. 'आय लव्ह मुंबई' या समितीचे ते ट्रस्टी होते.
मुंबईचे माजी शेरीफ नाना चुडासामा व तत्कालिन राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी स्वच्छ मुंबई व तिच्या सुशोभीकरणासाठी प्रयत्न केले. पर्यावरण व वृक्षारोपण कामाबद्दलही त्यांचा गौरव झाला होता. महाराष्ट्र विधानसभा बरखास्ती, इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान आणि आणीबाणीच्या काळातील खटल्यांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. हाऊसिंग पॉलिसी ऑफ इंडिया, पंचायत राज, एन्व्हायर्नमेंट लॉ आदी पुस्तके त्यांनी लिहिली. इंग्रजी-मराठी वृत्तपत्रांतून त्यांनी कायदेविषयक विपुल लेखन केले. जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या सुकथणकर कमिटीचे ते सदस्य होते.
मुंबईतील जुन्या चाळींचा प्रश्न व फ्लॅटओनर्सच्या समस्या हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. सामान्य माणसाचे फ्लॅटचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी १९८३ मध्ये फ्लॅट ओनर्स असोएशिनची स्थापना केली. सामान्यांची फसवणूक करणार्या बिल्डर व डेव्हलपर यांच्यावर महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅटओनर्स अॅक्टअंतर्गत कारवाई करण्यासाठी सरकारला कायदेविषयक मार्गदर्शन केले. मुंबईतील पार्किंगच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते. मुंबईकरांच्या न संपणार्या समस्यांचा कायद्याच्या दृष्टीने अभ्यास करणार्या या ज्येष्ठ कायदेतज्ज्ञाला मुंबई हायकोर्टाने त्यांच्या कर्तृत्वाचा बहुमान म्हणून सिनीअर कौन्सिलचा सन्मानही दिला होता.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
August 9, 2017
सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड या महान क्रिकेटपटूंची कारकिर्द घडवण्यात त्यांचे खूप मोठे मोलाचे योगदान होते.
November 21, 2021
आपल्या या ऑपरेटिंग सिस्टमला तोरवाल्ड्स यांनी फ्रीक्स असे नाव द्यायचे ठरविले होते. हा शब्द इंग्रजी शब्द फ्री (विनामूल्य), फ्रिक (विचित्र) आणि उनिक्स या दुसऱया ऑपरेटिंग सिस्टममधला एक्स हे अक्षर वापरून करण्यात आला होता.
December 28, 2021
डॉ. श्रीकांत राजे हे ठाणे येथील सुप्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट – क्ष-किरण तज्ज्ञ (Radiologist) आहेत.
September 12, 2011
आपण नेहमी ऐकतो ती गाणी केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, ते नयन बोलले, पाहुनी पाहुनी रघुनंदन सावळा, लाजली सीता स्वयंवराला ही सर्व रमेश अणावकर यांनी लिहली आहेत.
सुरेल व अवीट गाणी देणारे रमेश अणावकर ह्यांची गाणी लताजी, आशाजी, अशा अनेक गायक, गायकानी गायली, व महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात पोहचली. आपण लहान पणापासून ऐकत असलेले हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट, सांग चेडवा दिसता कसा खंडाळ्याचो घाट हे गाणेही रमेशजीचे आहे.
रमेश अणावकर यांनी मालवणी भाषेतही अनेक गाणी लिहली आहेत. रमेश अणावकर यांचे ३० जानेवारी २००४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
रमेश अणावकर यांनी लिहिलेली काही गाणी
हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट
असा मी काय गुन्हा केला
आले मनात माझ्या
केशवा माधवा तुझ्या
गुपित मनिचे राया
ते गीत कोकिळे गा
ते नयन बोलले काहितरी
दिनरात तुला मी किती
नकळत सारे घडले
नाम घेता तुझे गोविंद
निरोप तुज देता ऊर्मिला मी
पत्र तुझे ते येतां अवचित
प्रभाती सूर नभी रंगती
बोले स्वर बासरिचा
मज सांग सखे तू सांग
मस्त ही हवा नभी
मी एकला वेड्यापरी
मी मनात हसता प्रीत
मुकुंदा रुसू नको इतुका
मृदुल करांनी छेडित तारा
रविकिरणांची झारी घेउनी
रंग तुझा सावळा दे मला
लाजली सीता स्वयंवराला
लाजवी मला हे नाव गडे
वार्यामवरती घेत लकेरी
सजणा तू सांग कधी
January 31, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti