जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
(१२ ऑगस्ट १८९७ - २७ एप्रिल १९८०)
महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारीचे आद्य प्रवर्तक. अहमदनगर जिल्हयातील लोणी बुद्रुक या खेडयात एका शेतकरी कुंटूंबात जन्म. लोणी खुर्दच्या प्राथमिक शाळेत चौथीपर्यंत शिक्षण नंतर त्यांनी लहान वयातच शेतीला सुरुवात केली. त्याकाळी शेतकर्यांच्या जमिनी कर्जबाजारीपणामुळे सावकारांच्या घशात गेल्यामुळे ते कंगाल बनले होते, हे नेमके हेरुन त्यांनी व्यवहारबुध्दी, चातुर्य व काटकसरीने शेती केली. १९२३ मध्ये ‘लोणी बुद्रुक सहकारी पतपेढी‘ची स्थापना करुन ते सार्वजनिक जीवनातील सहकारी क्षेत्राकडे वळले. त्यांनी जिल्हयात सहकारी संस्थांचे जाळे निर्माण केले, तसेच गावातील पाथरवट-वडार मंडळींना एकत्र आणून ‘मजूर सहकारी सोसायटी‘ची स्थापना केली.
इंग्रज सरकारने मुंबई कौन्सिलमध्ये ‘तुकडे बंदी आणि तुकडे जोड‘ हे विधेयक आणले. या विधेयकामुळे शेतकर्यांच्या जमिनीचे तुकडे सावकारांच्या घशात जाऊन ते जमिनीला मुकणार होते. अशा वेळी इस्लामपूर येथे शाहू महारांनी घेतलेल्या शेतकरी परिषदेला विखे -पाटील नगर जिल्हयातील अनेक शेतकर्यांसह गेले व तेथे हजारो शेतकर्यांपुढे भाषण देऊन शेतकर्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्यातुनच त्यांच्या शेतकरी नेतृत्वाचा जन्म झाला. पुढे महाराष्ट्राच्या एक लाख शेतकर्यांनी याच प्रश्नासाठी पुण्याच्या कौन्सिल हॉलला वेढा घातला, त्यात विखे पाटील आघाडीवर होते. त्यांनी शेतकर्यांना त्यांच्या दैन्यावस्थेची जाणीव करुन देऊन, संघटित होण्याचे व त्यातून व्यक्तिगत व सामुदायिक विकास साधण्याचे महत्व पटवून दिले. विखे पाटील यांच्यावर सत्यशोधक चळवळीचा व डाव्या विचारसरणीचा प्रभाव होता. प्रसिध्द अर्थशास्त्रज्ञ धनंजयराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली बेलापूर रोड येथे १९४५ मध्ये पार पडलेल्या ‘डेक्कन कॅनॉल्स बायायतदार परिषदे‘त विखे पाटील यांनी सर्व शेतकर्यांनी एकत्र येऊन सहकारी पध्दतीने साखर कारखाना काढण्याचा ठराव मांडला या परिषदेचे अध्यक्ष डॉ. धनंजयराव गाडगीळ यांनी व उपस्थित शेतकर्यांनी या कारखान्याचे मुख्य प्रवर्तक म्हणून विखे पाटील यांच्यावरच जबाबदारी टाकली. त्यांनी ही जबाबदारी पार पाडण्यासाठी १९४५ ते १९५० या कालखंडात अतोनात कष्ट घेऊन, गावोगावी व दारोदारी भटकंती करुन भाग भांडवल जमविले, तसेच कारखान्याला शासनाकडून मंजूरी मिळविली कारखान्याच्या उभारणीसाठी त्यांनी केलेल्या भटकंतिकरिता शेतकर्यांचा एकही पैसा खर्च केला नाही. ‘परान्न घेणार नाही‘ अशी त्यांची प्रतिज्ञा होती, त्यामुळे आपली भाकरी ते नेहमी आपल्या कोटाच्या खिशात बाळगीत असत. विखे पाटील यांची साखर कारखाना काढण्याची कल्पना त्यावेळी हास्यास्पद ठरविली गेली. अशा सर्वस्वी प्रतिकूल पिरस्थितीला तोंड देत विखे पाटील यांनी प्रवरानगर येथे शेतकर्यांच्या पहिल्या ‘प्रवरा सहकारी साखर कारखान्यातून साखर उत्पादन सुरु झाले.
March 12, 2015
राजस्थान भाजपमध्ये एक नाव असं आहे, ज्याचा निर्णय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनाही मानावाच लागतो. हे नाव आहे महाराणी वसुंधरा राजे. मराठ्यांच्या ग्वालियर घराण्याची कन्या असलेल्या वसुंधरा यांचा विवाह राजस्थानमधील ढोलपूरचे महाराजा राणा हेमंत सिंग यांच्यासोबत झाला. पण लग्नानंतर काही दिवसातच ते वेगळे राहू लागले. वसुंधरा राजेंचा मुलगा दुष्यत सिंग खासदार आहे. तर त्यांची बहिण यशोमती राजे शिंदे मध्य प्रदेशमध्ये मंत्री होत्या. काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या त्या आत्या आहेत.
March 9, 2022
मराठी साहित्यामध्ये चरित्रात्मक लेखन हा प्रकार खुपचं जुना असला तरीपण, मराठी भाषेत चरित्रात्मक पध्दतीचे लेखन करणारे तज्ञ लेखक मात्र अभावाने आढळतात ! त्यातही प्रसिध्द असलेल्या लेखकांची यादी तर आणखीनच कमी आहे. पण या यादीत सर्वात अग्रभागी असणारे नाव जर कोणते असेल तर ते नक्कीच, अरविंद ताटके यांचं आहे . सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक, व्यावसायिक व वैज्ञानिक अशा वेगवेगळ्या पटलांवरती आपल्या कर्तुत्वाच्या व इच्छाशक्तीच्या जोरावर, उज्ज्वल भविष्याची नक्षी काढणार्या कितीतरी दिग्गज व्यक्तींची जीवनशिल्पे त्यांनी शब्दरूपांमध्ये साकारली आहेत. जीवनाकडे प्रेरणादायी व उत्स्फूर्तपणे बघायला शिकवणार्या त्यांच्या या मनोरंजनात्मक चरित्रांद्वारे, त्यांनी मराठी साहित्यखाणीला नव्या संस्कारांची व तत्त्वांची अमूल्य भेटच दिली आहे. प्रत्येक महान व्यक्तीने त्यांच्या आयुष्यात भोगलेल्या असंख्य यातना आणि सुखद प्रसंग, त्यांच्या जीवनातील ठळक घडामोडी, त्यांचे कार्य, इच्छाआकांक्षा, स्वप्ने, व भावना अशा अनेक आठवणींचा अचुक लेखाजोखा ते या चरित्रांमधून शब्द बध्द केले आहेत.अरविंद ताटके यांचा जन्म ३१ डिसेंबर १९२३ रोजी दादर येथे झाला. तर त्यांचे माध्यमिक शिक्षण ठाण्यातील बी. जे. हायस्कुलमधून पूर्ण झाले. आजपर्यंत अरविंद ताटकेंची सुमारे ५४ पुस्तके प्रकाशित झाली असून, त्यांच्या लेखनाचे पदार्पण धनुर्धारी मधून झाले. सर डॉन ब्रॅडमन, विजय मर्चंट, विनू मंकड, सर गॅरी रॉबर्स, खंडू रांगणेकर, यांसारख्या क्रीडारत्नांच्या कारकिर्दीतील विवीध पैलु अलगदपणे उलगडणारी पुस्तके ताटकेंनी लिहीली. महात्मा गांधी, गो. कृ. गोखले, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, वि. दा. सावरकर, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर अशा राजकीय व्यक्तिमत्वांची चरित्रे; तर ना. सी. फडके, ग.त्र्यं.माडखोलकर, पु. भा. भावे, आचार्य अत्रें सारख्या अजरामर साहित्यिकांच्या चरित्रांसोबतचं छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, नेपोलियन, विन्स्टन चर्चिल अशा ऐतिहासिक महापुरूषांची चरित्रे वैविध्य व वैशिष्टयपूर्ण लेखनाने अगदी तन्मयतेने पार केला. ही चरित्रे लिहिण्याअगोदर अरविंद ताटके स्वतः त्या व्यक्तित्वांना जगले होते, त्यांचे जीवनविषयक दृष्टीकोन, व जगण्याच्या पध्दतींविषयी त्यांनी खात्रीलायक स्त्रोतांकडून आवश्यक माहिती मिळविली होती. त्यामुळे संशोधन व विचापूर्वक लेखन व परीक्षण करून घेतलेला व्यक्तीवेध, हा त्यांच्या लेखनाला अचुकतेशी जोडणारा एक महत्त्वपूर्ण दुवा होता.
देश विदेशातील वेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रभुत्व गाजविलेल्या तज्ञ व्यक्तींची मराठी वाचकांना ओळख व्हावी या हेतुने त्यांनी पहिल्यांदा हातात धरलेली लेखणी, शेवटपर्यंत तशीच टिकून राहिली होती. “विडा रंगला” हा कथासंग्रह, “झिनी”, “हिरकणी” या कादंबर्या, तसेच पुस्तकांमधून त्यांनी कर्तबगार व्यक्तींचे उलगडलेले अंतरंग, सतत वाचकांच्या भेटीस येत राहिले. उत्कंठावर्धक शैली, व गोष्टी सांगण्या व रंगविण्यामधील त्यांची आत्मियता पाहून वाचकांच्या अंगावर शहारे येतात. एखाद्या व्यक्तीच्या नुसत्या वर्णनावरून तिच्या वर्तमानात शिरण्यासाठी, व वाचकांनाही तो संस्मरणीय अनुभव देण्यासाठी लागणारे कौशल्य त्यांना चांगलेच अवगत होते.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
January 3, 2015
अजय देवगणचे खरे नाव विशाल देवगण. अजय देवगणचे शिक्षण मुंबईत मिठीबाई कॉलेज मध्ये झाले. त्याचा जन्म २ एप्रिल १९६९ रोजी झाला.
अजय देवगण हा एक असा कलाकार आहे, ज्याने कोणाचीही मदत न घेता बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. अजयचे वडील विरु देवगण यांचे नाव बॉलिवूडमध्ये यशस्वी स्टंट डायरेक्टर म्हणून घेतले जाते. या व्यतिरिक्त अजयची आई वीना देवगण यांनी एक चित्रपट प्रोड्यूस केला आहे. भाऊ अनिल देवगण यांनी एक चित्रपट दिग्दर्शित केला आहे.
अजयने जेव्हा चित्रपटात काम करण्याची इच्छा वडिलांजवळ व्यक्त केली, तेव्हा ते अजयला महेश भट्टकडे घेऊन गेले. अजयच्या डोळ्यांकडे पाहून महेश भट्ट म्हणाले, याचे डोळे बोलतात आणि यामध्ये बरेच काही लपलेले आहे. फूल और काटे' या चित्रपटातून त्याने आपले करियर सुरू केले आणि बर्याचच चित्रपटात उल्लेखनीय अभिनय केला.
अजय देवगणने काजोलसोबत विवाह केला आहे. चित्रपट इंडस्ट्रीत येउन अजयला २२ पेक्षा जास्त वर्ष झाली असून, दिवसेंदिवस त्याची लोकप्रियता वाढत आहे. अजयचे आवडते कलाकार दिलीप कुमार असून त्यांच्यासोबत एकदा काम करण्याची अजयची इच्छा आहे. दिलजले ते अगदी गोलमालपर्यंत हटके सिनेमांमधून त्याने काम केलं आहे. "सिंघम' मुळे अजय देवगणचे मार्केट वाढले. आता माझी सटकली ही अजयचा मराठी डायलॉग खूप हिट झाला. सोलर एनर्जीच्या कंपनीचे काम, हॉटेल व्यवसाय, चित्रपटांचे वितरण असे अनेक अजय देवगणचे व्यवसाय आहेत. ओंकारा, द लीजेंड ऑफ भगतसिंग, हम दिल दे चुके सनम, जखम, दृष्यम, बोल बच्चन हे अजय देवगणचे काही चित्रपट.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
April 15, 2017
महाराष्ट्रातील आघाडीच्या “स्त्री पत्रकार” आणि “स्त्री विषयक लेखन” करणार्या शीतल करदेकर यांनी वार्ताहार, वृत्तमानस अशा वृत्तपत्रांमधून राजकीय चित्रपट तसंच नाटकांशी संबंधित सातत्याने लेख तसंच बातमीदारी केली आहे.
August 23, 2013
आपली पाळेमुळे असलेल्या भारताशी सहकार्य आणि हिंदी भाषा व साहित्याच्या प्रसारासाठी त्यांना पहिला प्रवासी भारतीय सन्मान मिळाला. दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने त्यांचा ‘पद्मविभूषण’ किताबाने सन्मान केला.
March 29, 2022
ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांना “सिंहासन” कादंबरीसाठी सुचलेली दिघू टिपणीसांची व्यक्तीरेखा ही रणदिवेंवरुनच सुचल्याचं अनेकजण अगदी ठामपणे सांगतात. दिनू रणदिवे यांच्या व्यक्तीमत्त्वानं प्रेरित होऊन अनेक ज्येष्ठ पत्रकार त्यांच्याविषयी आदरानं बोलतात व त्यांचे विचार व कार्य नवीन पिढीपर्यंत पोहोचवताना दिसतात.
June 18, 2013
फोर्ब्स मासिकाच्या यादीनुसार कुमार मंगलम बिर्ला २०१७ साली भारतातले आठवे सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होते. नोव्हेंबर २०२० नुसार दानशूरांच्या यादीत कुमार मंगलम बिर्ला चौथ्या स्थानावर आहेत. त्यांनी एका वर्षात २७६ कोटी रुपये सामाजिक कार्यासाठी दान केले आहेत.
June 14, 2022
समाजातील घटनांवर तिरकस कटाक्ष टाकत विनोदाची शैली हाताळणारा उमदा मराठी चित्रपट दिग्दर्शक म्हणजे उमेश कुलकर्णी. चाकोरीबाहेरचे काहीतरी करतानाच मनोरंजनाचा बाज न बिघडवता चित्रपट रंगवण्यात त्यांचा हातखंडा आहे.
September 25, 2019
निलेश चव्हाण हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष आहेत. १८ डिसेंबर २०१२ रोजी त्यांनी या पदाची सूत्रे स्विकारली. ते “महाराष्ट्र नवनिर्माण सेने”कडून ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार म्हणून महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीला उभे आहेत. माणसं जोडण्याची आवड आणि पारदर्शक व प्रामाणिक कामाची सवय या जोरावर त्यांनी लोकांमध्ये व पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आणले आणि “मनसेच्या ठाणे कार्यालयात गेल्यावर आपले काम होणारच” अशी भावना त्यांनी जनमानसात निर्माण केली. एका सामान्य, मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले निलेश चव्हाण हे व्यवसायाने स्थापत्य अभियंता (सिव्हील इंजिनिअर) आहेत त्यामुळे नागरी सुविधांच्या बाबतीत असलेला नियोजनाचा (प्लानिंग) अभाव त्यांना प्रकर्षाने जाणवतो.
October 10, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti