(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अटल बिहारी वाजपेयी

    अटल बिहारी वाजपेयींचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी झाला. अटलबिहारी वाजपेयी यांनी कानपूरमधून राज्यशास्त्रात एम.ए.ची पदवी मिळविल्यानंतर वाजपेयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ता झाले. त्यांनी राष्ट्रधर्म, वीर अर्जुन आणि पांचजन्य या नियतकालिकांत पत्रकारिता केली. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रमाताही ते सहभागी झाले. त्यांची राजकीय कारकीर्द म. गांधींच्या ‘चले जाव’ चळवळीपासून सुरु झाली. स्वातंत्र्यानंतर १९५१ मध्ये स्थापन झालेल्या ‘भारतीय जनसंघ’ या पक्षाच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाट होता. पक्षाचे संस्थापक नेते डॉ. शायामाप्रसाद मुखर्जी यांचे अटलबिहारी वाजपेयी विश्वासू सहकारी होते. मा.अटलबिहारी वाजपेयी १९५७ साली प्रथमच संसदेत लोकसभेत निवडून आले. त्यानंतर तब्बल नऊ वेळा ते लोकसभेत निवडून गेले आहेत. पक्षाध्यक्ष पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या दुर्देवी मृत्यूनंतर पक्षाची धुरा वाजपेयींच्या खांद्यावर आली. ते १९६८ मध्ये प्रथमच पक्षाध्यक्ष झाले. पंतप्रधान इंदिरा गांधींनी १९७५ साली भारतावर लादलेल्या देशांतर्गत आणीबाणीमध्ये त्यांना दोन वर्षे कारावासात काढावी लागली.

    आणीबाणीनंतर आपल्या सहकाऱ्यांसह, संपूर्ण पक्षच वाजपेयी यांनी १९७७ साली जनता पार्टीत विलीन केला. पण त्यानंतर अवघ्या काही महिन्यातच १९८० मध्ये वाजपेयी यांनी मुंबईत नव्या भारतीय जनता पार्टीची घोषणा केली. जनता पार्टीच्या ,मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनतापार्टीच्या सरकारमध्ये वाजपेयी परराष्ट्रमंत्री होते. ते १९९६ साली प्रथमच पंतप्रधान बनले. परंतु तेरा दिवसात हे सरकार कोसळले. त्यानंतर १९९८ साली लोकसभा निवडणुकीनंतर भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरल्याने वाजपेयी पुन्हा एकदा पंतप्रधान बनले. हेय सरकार तेरा महिनेच टिकले. पण याच काळात भारताने अणुस्फोट घडून आणला. आणि आपले सामाजिक- वैज्ञानिक श्रेष्ठत्व सिद्ध केले. त्याचप्रमाणे वाजपेयी यांच्या सरकारने पारंपारिक शत्रू असलेल्या पाकिस्तानाशी शांतता – समझोता करण्याचा प्रयत्न केला. कारगिलचे युद्ध ही घटनासुद्धा याच काळातील. वाजपेयी १९९९ मध्ये तिसऱ्या वेळी पंतप्रधान झाले. हे मंत्रिमंडळ पूर्ण पाच वर्ष टिकले. विविध विकास कामे करून देखील २०४४ च्या लोकसभा निवडणुकांत भाजपा सत्तेवर येऊ शकत नाही. त्यानानातर २००५ साली वाजपेयी यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली. वाजपेयी यांच्या कुशल नेतृत्वाखालील भारताने हलाहल देखील पचविले. आणि भारताची तसेच भाजपचीही प्रतिष्ठा उंचावली. अटल बिहारी वाजपेयी ज्येष्ठ राजकीय नेते आणि भारताचे पहिलेच बिगर कॉंग्रेसी पंतप्रधान आहेत. एवढेच नव्हे तर १९९६ ते २००४ या आठ वर्षाच्या कालखंडात वाजपेयी यांनी तीन वेळा भारताचे पंतप्रधानपद भूषविले. वाजपेयी यांची आजवर सुमारे ४० पुस्तके प्रकाशित झाली असून पद्मविभूषण आणि उत्कृष्ट संसदपटू सारखे विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट / भा.ज.प

    अटल बिहारी यांची कविता आओ फिर से दिया जलाएँ
    आओ फिर से दिया जलाएँ
    भरी दुपहरी में अंधियारा
    सूरज परछाई से हारा
    अंतरतम का नेह निचोड़ें-
    बुझी हुई बाती सुलगाएँ।

    आओ फिर से दिया जलाएँ
    हम पड़ाव को समझे मंज़िल
    लक्ष्य हुआ आंखों से ओझल
    वतर्मान के मोहजाल में-
    आने वाला कल न भुलाएँ।
    आओ फिर से दिया जलाएँ।

    आहुति बाकी यज्ञ अधूरा
    अपनों के विघ्नों ने घेरा
    अंतिम जय का वज़्र बनाने-
    नव दधीचि हड्डियां गलाएँ।
    आओ फिर से दिया जलाएँ

      January 7, 2017


  • राम फाटक

    पुणे आकाशवाणी केंद्रावर असतानाच ज्येष्ठ गायक आणि संगीतकार सुधीर फडके ह्यांच्याशी त्यांचा स्नेह जुळला. सुधीर फडक्यांच्या गीतरामायणामधील काही गाणी ते गायले. आकाशवाणीच्या पुणे केंद्रासाठी त्यांनी शास्त्रीय संगीत गायिका बेगम परवीन सुलताना यांच्याकडून काही मराठी भावगीते गाऊन घेतली.

      July 26, 2022


  • ज्येष्ठ सतारवादक उस्ताद हलिम जाफर खान

    ‘मधुबन मे राधिका नाचे रे’, ‘ये जिंदगी उसी की हैं’ या अजरामर गाण्यातील सतारीचे सुर, ‘मुगल-ए-आझम’, ‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटांसाठीच्या सतार वादनासाठी सतारवादक उस्ताद अब्दुल हलिम जाफर खान यांचे नाव लक्षात राहील.
    उस्ताद अब्दुल हलिम जाफर खान यांचे नाव पं. रवीशंकर, उस्ताद विलायतखान यांच्या जोडीने घेतले जात असे. त्यांनी सतारवादनात स्वत:चा ‘जाफरखानी’ बाज निर्माण केला. इंदौर घराण्याचे असलेल्या जाफर खान यांनी सतार वादनाची स्वतंत्र शैली निर्माण केली होती. संगीत नाटक अकादमी, ‘पद्मभूषण’ आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

    हिंदी चित्रपटसृष्टीतील फिरोज निजामी, अनिल-विश्वास, शंकर जयकिशन, मदनमोहन, सी. रामचंद्र, नौशाद, वसंत देसाई आदी दिग्गज संगीतकारांबरोबर काम केले होते. हलिम अकादमी ऑफ म्युझिक या संस्थेचे ते संस्थापक होते. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना सतारवादन शिकविले. जुनेन खान, राजेंद्र वर्मन, हरीशंकर भट्टाचार्य, रवींद्र चारी, झुबेर शेख आदी शिष्य परिवारातील काही ठळक नावे आहेत.

    ज्येष्ठ सतारवादक हलिम जाफर खान यांचे ४ जानेवारी २०१६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      January 4, 2017


  • वाणी जयराम

    आज ३० नोव्हेंबर
    आज मा.वाणी जयराम यांचा वाढदिवस
    जन्म:- ३० नोव्हेंबर १९४५
    वाणी जयराम या दक्षिणच्या एक प्रतिभाशाली गायिका आहेत. त्यांनी तमिळ, तेलुगू , कन्नड, मल्याळम हिंदी आणि मराठी , गाणी गायली आहेत आहेत. त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारने तीन वेळा सन्मानित केले गेले आहे. त्याचे पार्श्वगायना मध्ये खूप योगदान आहे. वयाच्या ८ व्या वर्षी त्यानी आकाशवाणी वर गायन केले. कर्नाटक और हिंदुस्तानी शैली त्या शिकल्या नाहीत तर त्यांनी विशेष अभ्यास केला. लग्नानंतर मुंबईत आल्यावर प्रथम ब्रेक मिळाला तो संगीतकार वसंत देसाई यांनी १९७१ मध्ये 'गुड्डी' चित्रपटासाठी ३ गाणी गाऊन घेतली तेव्हा. वाणी जयराम यांनी गायलेल्या "बोल रे पपीहरा" या गाण्याने त्यांना एका रात्रीत प्रसिद्धी मिळाली. या गाण्याला त्यांना तानसेन सन्मान मिळाला. सन १९८० साली 'मीरा' या चित्रपटा साठी फ़िल्म-फ़ेयर पुरस्कार मिळाला. दाक्षिणात्य कलाकार असूनही गायिका मा.वाणी जयराम यांचे मराठी नाटय़संगीत आणि भावगीतांमधील योगदान मोठे आहे.`संगीतकार वसंत देसाई यांना त्यांच्या आवाजातील व्याकुळता आणि पोत आवडला आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तिची सुरुवातीची वाटचाल इथे सुरू झाली. केवळ मा.वसंत देसाई यांनी आपल्या आवाजावर आणि सांगितिक प्रतिभेवर घेतलेल्या परिश्रमांमुळे आपली कारकीर्द यशस्वी ठरली अशा शब्दांत वाणी जयराम याही कृतज्ञता व्यक्त करतात. ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी’ हे एकमेव नाटय़पद सोडले तर वाणी जयराम यांची बाकी सर्व गाणी ही भाव आणि चित्रपट गीते आहेत. ‘प्रेम पिसे भरले अंगी’ यातून ईश्वराविषयी वाटणारी उत्कटता संत नामदेवांनी आपल्या या अभंगातून साकारली आहे. ‘टाळ मृदुंग उत्तरेकडे, आम्ही गातो दक्षिणेकडे’ असे या गीतांत नामदेव म्हणून जातात. उत्तर ही भोगाची दिशा आहे तर पश्चिम ही मुक्ती देणारी दिशा आहे. आध्यात्मात रंगलेल्या या संताला साहजिकच भोगाऐवजी मुक्तीची आस लागली आहे. कोरसमध्ये या गीताची मोहिनी काही विलक्षणच आहे. ‘प्रियतम दर्शन देई, तुजविण करमत नाही ‘पाहिलं का कुणी पाहिलं का’, देवाचे घर कुणी पाहिलं का? ‘दूर जाते ही वाट रात्र अंधारी दाट, अरे कान्हा रे मला जाऊ दे घरी’ हे उच्च पट्टीत त्यांनी बांधलेले गीत वाणी जयराम पुन्हा झकास रंगवून गेल्या आहेत. ‘यशोदा’ या चित्रपटातील ‘माळते मी माळते, केसात पावसाची फुले मी माळते’ आणि ‘जिवलग माझा नाही आला’ (परिवर्तन) ही संगीतकार दत्ता डावजेकर यांची गाणी आहेत, तर संगीतकार राम कदम यांची ‘उठा उठा हो सूर्यनारायणा’ ‘माठ पाण्यात बुडाला’ आणि ‘थांब जोडीदारा’ ‘माठ पाण्यात बुडला’ हे ‘भोळी भाबडी’ चित्रपटातील गीत.‘भोळी मात्र त्यातले ‘टाळ बोले चिपळीला, नाच माझ्या संगे’ हे रामभाऊंचे गाणे अधिक लोकप्रिय झाले होते. ‘जसा पाऊस उन्हात न्हाला’ आणि ‘झाले बेजार गर्दी ही दाटली’ दोन गाणीही चांगली गाजली होती. मा.वाणी जयराम यांची ही सर्व गाणी आता ती सहसा ऐकायला मिळत नाहीत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट.

      December 6, 2016


  • पी.सावळाराम

    शरद पवारांनी सांगितलेला पी.सावळाराम ठाणे नगरपालिकेत जेव्हा निवडून आले होते त्या वेळेचा किस्सा.

    १९६८ साली पी.सावळाराम ठाणे नगरपालिकेत निवडून आले होते, शरदरावजी पवार त्यावेळेस विधानसभा सदस्य व कॉंग्रेस पक्षाचे सेक्रेटरी होते, मा.गदिमा त्यावेळी साहित्यिकांचे प्रतिनिधि म्हणून विधान परिषदेचे नामनियुक्त सदस्य (आमदार) होते. मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनी शरद पवारांना बोलावून घेतले,त्यावेळी गदिमा तेथे उपस्थित होते, नाईकांनी पवारांना सांगितले, "सावळाराम नगरपालिकेत निवडून आले आहेत, त्यांना नगराध्यक्ष करायचे आहे पण आपले येथे बहुमत नाहीये, दोन मते कमी पडत आहेत, काहीही कर पण त्यांना निवडून आण". बहुदा गदिमांनी आपल्या मित्राला हे पद मिळावे अशी गळ मुख्यमंत्र्यांना घातली असणार किंवा पी.सावळाराम यांनी गदिमांचा राजकारणी नेत्यांमधला दरारा पाहून तसे सुचवले असेल.

    शरद पवार तेथे दोन दिवस जाऊन राहीले (मा.शरद पवार म्हणतात .... "मते कमी पडली की याला हाताशी धरा अशी माझी ख्याती त्यावेळेपासूनच होती!"), त्यांच्यापरीने जे राजकारणी डावपेच खेळावे लागतात ते सर्व खेळून त्यांनी शेवटी 'पी.सावळाराम' यांना ठाण्याच्या नगराध्यक्षपदी निवडू आणले. मा.शरद पवारांनी 'पी.सावळाराम' यांना गाडीत घातले व मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर घेऊन गेले, तेथे मुख्यमंत्र्यांबरोबर मा.गदिमाही उपस्थित होते, शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की पी.सावळाराम निवडून आले, नगराध्यक्ष झाले. मा.गदिमा ते ऐकत होते,ते जागचे उठले व शरद पवारांजवळ गेले,त्यांच्या पाठीवर एक जोरात थाप मारली व म्हणाले...

    "बहाद्दरा काय काम केलस!,येडयाचा पाटील ठाण्याचा अध्यक्ष केलास!....."
    त्यावेळी ठाणे हे मेंटल हॉस्पीटल साठी प्रसिद्ध होते, कोणी वेड्यासारखे वागत असेल तर लोक त्यावेळी गंमत करताना "याला ठाण्याला पाठवा रे" असे नित्यनियमाने म्हणत असत, त्याचा रेफरंन्स व 'येडेमच्छींद्र' हे पी.सावळाराम यांचे गाव व सावळाराम पाटील हे नाव याचे गदिमांनी 'येडयाचा पाटील' केले. "बहाद्दरा काय काम केलस!, येडयाचा पाटील ठाण्याचा अध्यक्ष केलास!....." , तेथे उपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांची हसून पुरेवाट लागली असेल!.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      December 21, 2017


  • (प्रा.) अभय करंदीकर

    करंदीकर, (प्रा.) अभय
    संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पदवी, पदव्युत्तर पदवी शिवाय पीएच.डी. मिळालेली व्यक्ती सर्वसाधारणपणे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एखाद्या नामांकित कंपनीमध्ये अतिवरिष्ठ पदावर गडगंज पगारनिशी रूजू होते. मग काही वर्षांतच सीइओपदापर्यंत पोहोचते किंवा स्वतची कंपनी सुरू करते. या सर्व गोष्टी प्रा. अभय करंदीकर यांनी सहज शक्य होत्या. मात्र त्या मार्गाने न जाण्याचा निर्णय त्यांनी जाणीवपूर्वक घेतला. मूळ शिक्षणामध्येच त्यांना अधिक रस होता.

    कालच घोषित झालेल्या भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी प्रदान केल्या जाणाऱ्या मानाच्या डॉ. विक्रम साराभाई पुरस्कारातील पाच मान्यवरांमध्ये प्रा. अभय करंदीकर यांचा समावेश आहे. स्वत:ची शैक्षणिक आवड जोपासतानाच ज्ञानदानाचे पवित्र कार्य करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतला. शालेय शिक्षण ग्वाल्हेरला झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते बाहेर पडले. कानपूर आयआयटीमधून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग (१९८६) पूर्ण केले. नंतर एम.टेक (१९८८) व पीएच.डी.ही (१९९५) पूर्ण केली. मध्यंतरीचा काही काळ त्यांनी पुण्याला सी-डॅकमध्येही काम केले. सी-डॅकमध्ये असताना हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग ग्रुपचे मुख्य समन्वयक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. सध्या ते आयआयटी पवईमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअिरग विभागात प्राध्यापक असून टाटा टेलिसव्‍‌र्हिसेसच्या निधीतून साकारलेल्या सेंटर फॉर एक्सलन्स इन टेलिकॉमचे समन्वयक आहेत. त्यापूर्वी एम. टेक पूर्ण केल्यानंतर ते भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (इस्रो) रूजू झाले होते. इस्रोच्या अहमदाबाद येथील पीआरएलमध्ये त्यांनी काम पाहिले. माहिती तंत्रज्ञान विषयातील या पीएच.डी.नंतर मात्र त्यांच्या कामाला अधिक आयाम मिळाले. सध्या ते एकाच वेळेस सहा महत्त्वाच्या विषयांवर प्रगत संशोधन करीत आहेत. वायरलेस नेटवर्कमधील कंट्रोल आणि परफॉर्मन्स मॉडेिलग, वायर्ड आणि वायरलेस नेटवर्क मधील रिसोर्स अ‍ॅलोकेशन आणि सेवेतील दर्जा, नेक्स्ट जनरेशन वायरलेस नेटवर्क, को-ऑपरेटिव्ह रीले आणि सेल्फ ऑर्गनायझिंग नेटवर्क, करियर इथरनेट आणि मोबाईल बॅकहॉल, ग्रामीण भागातील वायरलेस नेटवर्क असे हे संशोधनाचे प्रमुख सहा विषय आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयआयटीच्या विद्यार्थ्यांचा एक चमू या विषयांवर काम करतो आहे. ग्रामीण भागातील वायरलेस नेटवर्क हा विषय सर्वाधिक महत्त्वाचा आहे. कारण भारतासारख्या देशांत दूरसंवाद क्रांती खऱ्या अर्थाने तळागाळात पोहोचवायची असेल तर त्यासाठी आपल्याला वायरलेस नेटवर्कवर भर द्यावा लागणार आहे. सध्या त्यांचे डिजिटल कम्युनिकेशन थिअरीवरही प्रगत संशोधन सुरू आहे. करंदीकर व त्यांच्या चमूने केलेल्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली गेली. इन्स्टिटय़ूट ऑफ इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रिकल इंजिनिअर्स ही महत्त्वाची संस्था डिजिटल नेटवर्किंग आणि इतर संबंधित बाबींमधील प्रमाणके ठरविण्याचे काम करते. करंदीकर यांच्या नेतृत्त्वाखालील चमूने यातील एक महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय प्रमाणक निश्चित करण्याची महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रा. करंदीकर प्रमुख असलेल्या सेंटरमध्ये टेलिकॉम क्षेत्रातील महत्त्वपूर्ण संशोधन सुरू आहे. संशोधनाचेही दोन प्रमुख प्रकार असतात. एक पूर्णपणे शक्षणिक स्वरूपाचे आणि दुसरे प्रयोगात्मक प्रत्यक्षात येणारे. प्रा. करंदीकर यांचा विशेष म्हणजे त्यांना शक्षणिक संशोधनाबरोबरच प्रत्यक्षातील त्याच्या उपाययोजनांमधील संशोधनामध्येही तेवढाच रस आहे. आयआयटीतील प्राध्यापकांचा विशेष म्हणजे अनेक महत्त्वाच्या स्टार्ट-अप कंपन्यांच्या स्थापकांमध्ये त्यांचा समावेश असतो. ही बाब प्रा. करंदीकर यांनाही लागू आहे. इसोडस नेटवर्क्‍सच्या उभारणीत त्यांचा मोलाचा सहभाग आहे. ही कंपनी आपल्या देशात तसेच एशिया- पॅसिफिक परिक्षेत्रात मेट्रो इथरनेटच्या क्षेत्रात कार्यरत आहे. आता जाहीर झालेला डॉ. साराभाई संशोधन पुरस्कार म्हणजे त्यांच्या आजवरच्या संशोधनावर उमटलेली राष्ट्रीय मोहोरच आहे.

      August 5, 2017


  • चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व लेखक संजय लीला भन्साळी

    भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेचा माजी विद्यार्थी असलेल्या संजय भन्साळी यांनी विधू विनोद चोप्राचा साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काही चित्रपटांमध्ये भाग घेतला. त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९६३ रोजी झाला.१९९६ साली त्यांनी स्वत: प्रमुख दिग्दर्शक बनून खामोशी ह्या चित्रपटाची निर्मिती केली. तेव्हापासून त्यांनी अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांना आजवर फिल्मफेअर पुरस्कारासह अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत. आज बॉलीवूडमध्ये संजय लीला भन्साळी यांचे मोठे नाव आहे. ऐतिहासिक चित्रपट बनविण्यात त्यांचे नाव आघाडीवर घेतले जाते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      February 25, 2017


  • लहू (काळू) खाडे

    लहू (काळू) खाडे

    लहू संभाजी खाडे, अर्थात मराठी वगनाट्यांत गाजलेल्या काळू-बाळू जोडीतील काळू यांचा जन्म १६ मे १९३३ या दिवशी झाला होता. लहू खाडेंनी मराठी तमाशा कलावंत, अभिनेते म्हणून आपली छाप रसिक मनांवर उमटवलीच! पण ते स्वत:तमाशा फडाचे मालक होते. घरात तीन पिढ्यांची तमाशा परंपरा होती व तीच परंपरा त्यांनी पुढे सुरू ठेवली. दरवर्षी ठिकठिकाणच्या यात्रा-जत्रांमधून ते तंबू लावून तमाशा फड गाजवायचे.

      May 24, 2014


  • ज्येष्ठ संपादक राम पटवर्धन

    पु. ल. देशपांडे, न. र. फाटक, श्री. पु. भागवत वगैरे शिक्षकांमुळे राम पटवर्धन यांची वाङ्मयीन जाण चौफेर होत गेली. त्यांनी स्वत:देखील चेकॉव्हच्या काही कथांचे अनुवाद केले आणि ‘नाइन फिफ्टीन टू फ्रीडम’ ही कादंबरीही मराठीत आणली आहे. त्यामुळे ‘मौज’ साप्ताहिक आणि सत्यकथा हे मासिक मराठीतील सर्व नव्या लेखकांचे नव्या प्रयोगांचे केंद्र म्हणून मान्यता पावले.

      March 21, 2022


  • नीलम प्रभू अर्थात करुणा देव

    नीलम प्रभू या अनेक वर्षे आकाशवाणीत कार्यरत होत्या. १९६० च्या दशकात रेडिओ हे मनोरंजनाचे एकमेव साधन असताना त्यांनी आकाशवाणीवर नभोनाट्यातून आपले संवादकौशल्य सादर करायला सुरुवात केली.त्यांचा सहभाग असलेली ‘प्रपंच’ ही कौटुंबिक श्रुतिका महाराष्ट्रात चांगलीच गाजली होती. त्यात त्यांनी मीना वहिनी अर्थात टेकाडे वहिनींची भूमिका केली होती. लहान मुलीची भूमिका असो की मध्यमवयीन गृहिणीची भूमिका असो, की वृद्ध महिलेची असो प्रत्येक भूमिकेला देव या त्या पट्टीचा आवाज देत. ‘आम्ही तिघी’ या नाट्यात त्यांनी आपल्या आवाजाचा करीश्मा दाखवला होता.

      July 1, 2022