दादा गावकर

गावकर, दादा
लोकसंस्कृतीमध्ये अश्वत्थाचा पट नावाचं एक व्रत आहे. पिंपळाच्या पाच प्रकारच्या पानांचं पूजन या व्रतात केलं जातं. त्यातलं हिरवं पान असतं सौंदर्यासाठी, कोवळं पान असतं नवजात पुत्रासाठी, पिकलेलं पान असतं पतीच्या दीर्घायुष्यासाठी, वाळलेलं पान असतं सुख-समृद्धीच्या वृद्धीसाठी आणि फाटलेलं पान असतं अमर्याद संपत्तीसाठी. आपल्या कार्याप्रती अविचल निष्ठा असणाऱ्या आणि संघसंस्कारांनी भारल्या गेलेल्या भिवा केशव तथा दादा गावकर नावाच्या गिरणगाववासीयानं गेल्या साठ-पासष्ट वर्षांत हे व्रत कधी केलं असावं अशी शक्यताच नाही,

पण त्यानं ऐकलेली ‘पिंपळपानांची सळसळ’ मात्र आयुष्याच्या प्रवासाची धगधगती आणि रोमांचकारी कथानकं रेखाटती ठरली. कोकणच्या लाल मातीत जन्माला आलेला हा मुलगा आपल्या वाटय़ाला आलेलं आयुष्य जगत असताना दुसऱ्याच्या आयुष्याचाच विचार करीत राहिला, त्याला जगण्याची दिशा आणि बळही देत राहिला. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीनं म्हणूूनच गोखले न्यासाच्या वतीनं दिला जाणारा एक लाख रुपयांचा अंत्योदय पुरस्कार देऊन गावकरांच्या कार्याला समुचित अभिवादन केलं आहे. दादा गावकर वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी शिक्षणासाठी मुंबईत आले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याशी त्यांची नाळ जुळली आणि आयुष्याला नवी दिशाच मिळाली. गिरणगावातलं तेव्हाचं वातावरण पोरांच्या टवाळखोऱ्या, गुंडांच्या मारामाऱ्या यासाठी प्रसिद्ध होतं, संघ जीवनात आला नसता तर माझ्या हातात कदाचित पत्ते आले असते, दारूची बाटली आली असती, खिशात रामपुरी आला असता आणि मीही सातरस्त्यावरच्या पोरांसारखा भाईगिरी करताना दिसलो असतो हे ‘पिंपळपानांची सळसळ’मधलं गावकरांचं वाक्य त्यांच्या आयुष्याला मिळालेली दिशा दर्शविणारं आहे. गिरणगावातील विद्यार्थ्यांभोवतीचीप्रतिकूल परिस्थिती त्यांना अस्वस्थ करीत होतीच. त्यांच्याच उत्कर्षांसाठी त्यांनी अवघ्या विसाव्या वर्षी विद्यार्थी उत्कर्ष मंडळ स्थापन केलं. गेली पंचावन्न र्वष ते अविरत कार्यरत आहे. या मंडळानं सुरू केलेली विवेकानंद व्याख्यानमाला महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे, नव्हे एक ज्ञानतीर्थ म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तिकिटं लावून व्याख्यानमाला आयोजित करण्याचा धाडसी उपक्रम मंडळानं मुंबईतल्या गिरणगावासारख्या वस्तीत प्रथमच सुरू केला आणि त्याचा सुवर्णमहोत्सवही गेल्या वर्षी पार पडला. गावकरांनी विद्यार्थी क्षेत्रात तर डोंगराएवढं काम केलंच, पण त्याशिवाय सामाजिक, धार्मिक आणि काही अंशी राजकीय क्षेत्रातही त्यांनी काम केलं. त्यांच्या एकसष्टीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात त्यांना जो निधी अर्पण करण्यात आला, त्यात तेवढीच स्वत:ची रक्कम घालून गावकरांनी एक प्रतिष्ठान स्थापन केलं. समाजात काम करणाऱ्या आणि प्रसिद्धीपासून चार हात दूर राहणाऱ्या गुणवंत कार्यकर्त्यांचा सत्कार आणि गिरणगावातील महापालिका शाळांतील तसंच खाजगी शाळांमधील हुशार विद्यार्थ्यांचं कौतुक करण्याचा या प्रतिष्ठानचा उपक्रम वाखाणला गेला आहे. गावकर फारसे शिकले नाहीत, पण त्यांनी जो सहकाऱ्यांचा-सोबत्यांचा परिवार उभा केला त्याचं वर्णन करताना डॉ. शिवाजीराव भोसले यांनाही गावकर हे चालतंबोलतं विद्यापीठच आहे, समाजसेवेची ती एक सांस्कृतिक मुद्रा आहे असं म्हणावंसं वाटलं. गावकरांनी सव्‍‌र्हेलन्स इन्स्पेक्टर म्हणून सातपुडय़ासारख्या आदिवासी भागात तीन र्वष नोकरीही केली. आदिवासी जनजीवन, त्यांच्या चालीरीती, त्यांच्यात वावरताना आलेले प्रत्ययकारी अनुभव याचं वर्णन ‘पिंपळपानांची सळसळ’मध्ये आलं आहे. त्याचा मोठा वाटा त्यांच्या जीवनातील यशाच्या आरेखनात आहे. यश काही सहजासहजी प्रत्येकाच्या वाटय़ाला येत नाही, त्यासाठी परिस्थितीशी झुंजावं लागतं, परीक्षांचे पत्थर फोडावे लागतात. शून्यातून विश्व उभं करण्याची महत्वाकांक्षा उरी बाळगावी लागते. गावकर हा असा एक समाज-विश्व उभा करणारा शिल्पी आहे, कोकणी काव्‍‌र्हर आहे. सामाजिक क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांसाठीचं चालतंबोलतं पाठय़पुस्तक आहे. पिंपळ हा पुण्यवृक्ष मानला जातो. आदिवासी समाज तर याला राज्याचा द्वाररक्षक मानतात. गावकर हा असा पिंपळवृक्ष आहे, त्याला मिळालेल्या पुरस्कारासाठी मन:पूर्वक अभिनंदन.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →