(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • नवनाथ काशिनाथ वहाळ

    नवनाथ काशिनाथ वहाळ हे शिक्षक, समाजसेवक, विचारवंत व महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासामध्ये विशेष प्राविण्य मिळविलेले गाढे अभ्यासक अशा विविध भुमिकांमध्ये सारख्याच तन्मयतेने व तज्ञपणे वावरणारे, एक चार चौघांपेक्षा वेगळे वाटणारे व्यक्तिमत्व आहे. इतिहास हा अगदी लहानपणापासुन त्यांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय होता व या इतिहासाला गौरवशाली पराक्रमांची व अंगावर रोमांच उभे करणार्‍या लढायांची झालर प्राप्त करून देणार्‍या सुभेदार मल्हारराव, अहिल्याबाई व वीरभैरवी होळकर आदी सेनानिंशी त्यांच्या मनाच्या तारा केव्हाच जोडल्या गेल्या होत्या.

      August 29, 2011


  • डॉ. दुर्गाप्रसाद गांगोडकर

    देशातील नामवंत इंजिनीअर्स व मॅनेजर्स घडविणार्‍या देहरादून च्या ग्राफिक एरा युनिव्हर्सिटीच्या इंटरनॅशनल अफेअर्सच्या अधिष्ठातापदाची जबाबदारी अवघ्या ४० व्या वर्षी डॉ. दुर्गाप्रसाद गांगोडकर यांच्याकडे आली आहे. बेळगावात जन्मलेले डॉ. गांगोडकर यांनी बीई. एमटेकचे शिक्षण घेतल्यानंतर आयआयटी-रुरकितून पीएचडी मिळवली, संशोधनावर हुकुमत असुनही उद्योगात फार काळ न रमता पुढे मात्र त्यांनी अध्यापनासाठी आपल्याला वाहून घेतले.

    डॉ. दुर्गाप्रसाद गांगोडकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला देहरादूनची आंतरराष्ट्रीय धुरा हा लेख पुढील पानावर वाचा.

    डॉ. दुर्गाप्रसाद गांगोडकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला देहरादूनची आंतरराष्ट्रीय धुरा हा लेख वाचा.

    gangodkar-durgaprasad-modified

      September 9, 2015


  • राजन भिसे

    दिग्दर्शक मंगेश कदम यांचे नाटक ‘अधांतर’. जयंत पवार यांचे ‘माझं घर’, प्रशांत दळवी यांचं ‘सेलिब्रेशन’ हे नाटक ‘लग्नाची बेडी’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘ढोलताशे’ अशी अनेक नाटके त्यांनी केली आहेत. अभिनय व नेपथ्य या बरोबरच सध्या अखिल भारतीय नाट्य परिषदेचे काम राजन भिसे बघत आहेत.

      July 25, 2022


  • गायिका धोंडूताई कुलकर्णी

    धोंडुताई यांनी सुरवातीला जयपूर घराण्याचे उस्ताद अल्लदिया ख़ाँ साहेब यांचे भाचे नथ्थन ख़ाँ यांच्याकडे तीन वर्ष शिकल्या. त्यानंतर याच घराण्याची तालीम त्यांनी आयुष्यभर घेतली.

      August 5, 2021


  • हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे गायक पं. विजय कोपरकर

    विजय कोपरकर संगीतातील नावाजलेले व अवघ्या महाराष्ट्राला माहिती असलेले व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९६२ रोजी झाला. वडील कीर्तनकार असल्यामुळे,विजय कोपरकर यांच्यावर लहानपणापासून गाण्याचे संस्कार झाले. वयाच्या आठव्या वर्षापासून गायनाला सुरुवात करून सुरवातीला मधुसूदन पटवर्धन त्यानंतर सुमारे पाच वर्षे डॉ. वसंतराव देशपांडे आणि मग पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे सात वर्षे त्यांनी गायनाचे शिक्षण घेतलं.विजय कोपरकर एका मुलाखतीत म्हणतात डॉ. वसंतराव देशपांडे सांगायचे, ""गुरूकडे शिक्षण घेतलं, तरी अभ्यासू नजरेने स्वतःच्या स्वतंत्र विचाराला पर्याय नाही, तरच ते गाणं त्या गायकाचं होतं. ‘‘ हीच वाट चालणारे, भरपूर विद्या मिळवून स्वतंत्र विचाराने स्वतःचं स्थान निर्माण करणारे आजचे प्रतिभावंत गायक म्हणजे मा.विजय कोपरकर. ते गेल्या चाळीस वर्षापासून स्वरसाधना करीत आहे. दिवसातील किमान सात ते आठ तास तंबोऱ्यासह रियाज असतो. त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तीन वर्षे तू आता फक्त रियाज कर, असे सांगणारी माझी आई ग्रेट आहे, असे आपल्या आईबद्दल सांगतात. बुद्धिमान, व्यासंगी आणि मैफलीचे बादशहा शोभतील अशा दोन गानगुरूंचा सहवास आणि स्वतःचा रियाज, चिंतन यांनी विजय कोपरकर यांनी आपलं गाणं वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. अस्तु या मराठी चित्रपटातील 'कोहम' हे संस्कृत भाषेतलं गाणं विजय कोपरकर यांनी गायलं आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      February 14, 2017


  • अरुणा इराणी

    साठ च्या दशकात गंगा जमुना या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणा-या अरुणा इराणी यांनी तीनशेहून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. त्यांचा जन्म ३ मे १९५२ रोजी झाला. १९६१ मध्ये गंगा जमुना या सिनेमात काम करणा-या अरुणा यांचे त्यावेळी वय केवळ नऊ वर्षे होते. 'जहां आरा', 'फर्ज', 'उपकार', 'आया सावन झूम के', 'कारवां' यांसारख्या हिट सिनेमांमध्ये मा.अरुणा इराणी यांनी काम केले. कारवां या सिनेमातील मा.अरुणा इराणी यांच्या कामाचे विशेष कौतुक झाले. या सिनेमातील 'चढ़ती जवानी मेरी चाल मस्तानी', आणि 'दिलबर दिल से प्यारे' ही गाणी अरुणाच्या डान्समुळे लोकप्रिय झाली. १९७२ मध्ये मा.अरुणा यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह 'बॉम्बे टू गोवा' या सिनेमात स्क्रिन शेअर केली. या सिनेमात महमूदसुद्धा होते.

    अरुणा यांचे नाव त्याकाळी महमूद यांच्यासोबत जुळले होते. त्यांनी महमूद यांच्यासह 'औलाद', 'हमजोली', 'नया जमाना', 'गरम मसाला' आणि 'दो फूल' या सिनेमांमध्ये काम केले.
    'थोड़ा रेशम लगता है', 'चढ़ती जवानी मेरी चाल मस्तानी', 'दिलबर दिल से प्यारे', 'मैं शायर तो नहीं' हे ही जी सुपरहिट गाणी आहेत, ती मा.अरुणा इराणी यांच्या डान्समुळे आणखीनच प्रसिद्ध झाली. मा.अरुणा यांनी इंडस्ट्रीत येणा-या नवोदित अभिनेता-अभिनेत्रींना खूप मदत केली. हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या काही कलाकारांच्या बाबतीत अरुणा इराणी खूप ‘लकी’ ठरल्या आहेत. ज्यांनी आपल्या पदार्पणातील चित्रपटात अरुणा इराणी यांच्यासोबत काम केले ते पुढे ‘स्टार’ झाले आहेत. जीतेंद्र (फर्ज), ऋषी कपूर व डिम्पल कपाडिया (बॉबी), शबाना आझमी (फकिरा), जयाप्रदा (सरगम), कुमार गौरव (लव्हस्टोरी), संजय दत्त (रॉकी). या सर्व चित्रपटात अरुणा इराणी यांनी काम केले होते. त्यांनी 'फर्ज'मध्ये जितेंद्र, 'बॉबी'मध्ये ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया, 'सरगम'मध्ये जयाप्रदा, 'लवस्टोरी'मध्ये कुमार गौरव आणि 'रॉकी'मध्ये संजय दत्तची बरीच मदत केली. मात्र हे सर्व सुपरस्टार बनले आणि दुर्दैवाने अरुणा इराणी या सहायक अभिनेत्रीच राहिल्या. 'पेट प्यार और पाप' आणि 'बेटा' या सिनेमातील उत्कृष्ट अभिनयासाठी अरुणा यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहायक अभिनत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. आपल्या करिअरमध्ये अरुणा यांनी मराठी सिनेमांमध्येही अभिनय केला. शिवाय छोट्या पडद्यावरही त्यांचे दर्शन घडले. १९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चंगूमंगू’मध्ये अरुणा इराणी यांनी काम केले होते. २००० साली 'जमाना बदल गया' या मालिकेद्वारे त्यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      May 3, 2017


  • ज्येष्ठ सिनेपत्रकार दिलीप ठाकूर

    ज्येष्ठ सिनेपत्रकार दिलीप ठाकूर यांनी ऐशी आणि नव्वदच्या दशकात त्यांनी खूपच मोठ्या प्रमाणावर अनेक दैनिके आणि साप्ताहिकात विविध टोपणनावाने चित्रपटविषयक सदर लेखन केले. राजा दिलीप, स्पॉटबॉय, पिक्चरवाला, सिनेमावाला, राजा चौलकर, राजा फिल्मीस्तानी वगैरे वगैरे टोपणनावानी खूपच मोठ्या प्रमाणावर लेखन केले.

      April 22, 2021


  • गंगाधर महांबरे

    बालसाहित्यकार, कवी, गीतकार आणि नाटककार गंगाधर मनमोहन महांबरे यांचा जन्म कोकणातील मालवण येथे ३१ जानेवारी १९३१ रोजी झाला.

      January 30, 2010


  • प्रसिद्ध मराठी कवी व गायक संदीप खरे

    संदीप खरे यांनी इयत्ता चौथीत असताना पहिली कविता केली. अनेक शालेय स्पर्धांमध्ये त्याने कविता आणि कथा या विषयात अनेक पारितोषिके मिळवली आहेत. त्यांचा जन्म १३ मे १९७३ रोजी झाला. महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजलेल्या 'उमलते अंकुर' या कार्यक्रमात त्यांनी सादर केलेल्या कविता ही कवी म्हणून ओळख निर्माण होण्याच्या दृष्टीने महत्त्वाची घटना ठरली. ‘मौनाची भाषांतरे’, ‘नेणिवेची अक्षरे’, ‘तुझ्यावरच्या कविता’ आणि ‘अग्गोबाई ढग्गोबाई’ या त्याच्या कवितांसग्रहांची विक्रमी विक्री झाली आहे. त्याने स्वत: स्वरबद्ध केलेल्या तसेच सलिल कुलकर्णी आणि अन्य संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या सीडीही अपार लोकप्रियता लाभली आहे.

    सलग अनेक वर्षे हाऊसफुल्ल गर्दीत सुरू असलेला आणि १२०० प्रयोगांजवळ पोहोचलेला ‘आयुष्यावर बोलू काही’ हा कार्यक्रम तर मराठी भावसंगीतामध्ये एक इतिहास घडवतो आहे. या कार्यक्रमातील गीतांसोबत संदीप करीत असलेल्या गद्य कवितांचे सादरीकरण हे देखील या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले आहे. ‘मी मोर्चा काढला नाही, मी संपही केला नाही’.. ‘मन तळ्यात मळ्यात जाईच्या कळ्यात’.. ‘लव्हलेटर लव्हलेटर लव्हलेटर म्हणजे लव्हलेटर असतं’.. ‘दमलेल्या बाबाची ही कहाणी तुला’.. ‘डिपाडी डिपांग’.. यांसारख्या कविता आणि लोकप्रिय गीतांमधून कवी संदीप खरे यांनी खरे मराठीत नाव कमवले आहे.
    संदीप खरे हे ‘मोबाइल अॅप’च्या माध्यमातून रसिकांच्या भेटत असतात. ‘संदीप खरे’ज वर्ल्ड या अॅपद्वारे रसिकांना संदीपच्या काही कविता विनाशुल्क तर काही कविता अल्बमच्या माध्यमातून सशुल्क उपलब्ध होणार असून मोबाइल अॅपच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचणारा संदीप खरे हे मराठीतील पहिलाच कवी ठरले आहे. जगभरातील मराठी रसिकांमध्ये आणि विशेषत: युवा पिढीमध्ये संदीप खरे यांच्या कविता अत्यंत लोकप्रिय आहेत. पायरसी आणि ‘संदीप खरे’ज वर्ल्ड – ‘गुगल प्ले स्टोअर’वरून हे अॅप विनाशुल्क ‘डाऊनलोड’ करता येऊ शकेल.

    https://play.google.com/store/apps/details…

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      May 13, 2019


  • बॉम्बे टू गोवा चित्रपटाला ४६ वर्षे पूर्ण

    एखाद्या ठिकाणी सहलीला जायचं असल्यास प्रवास हा आलाचं. या प्रवासाची साधनं वेगळी असू शकतात, परंतु एक बाब मात्र सामायिक असते. ती म्हणजे पिकनिकला जाताना लागणारी गाणी. उडत्या चालीची गाणी गाऊन सहलीतील प्रवासाचा शीण घालवण्याकडे सर्वांचाच कल असतो. या पिकनिकमधील गाण्यात आवर्जून म्हटलं जाणार गाणं म्हणजे ‘बॉम्बे टू गोवा’ या चित्रपटातील ‘देखा ना हाय रे सोचा ना हाय रे’ हे गाणं.

      March 5, 2018