(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गोड चेहऱ्याचा अभिनेता अरविंद स्वामी

    कधीच प्रसिद्धीसाठी काम न करणारा अभिनेता म्हणून अरविंद स्वामी यांचे नाव घेतले जाते. त्यांचा जन्म १७ जून १९७० रोजी झाला. कॉलेज करताना पॉकेटमनी म्हणून मॉडेलिंग करत असताना मणीरत्नम यांची नजर अरविंद स्वामी यांच्यावर पडली. मणिरत्नमच्या रोजा चित्रपटाच्या माध्यमातून अरविंद स्वामीने १९९२ मध्ये बॉलीवूडमध्ये प्रवेश केला होता. आणि एका रात्रीत अरविंद स्वामी स्टार बनले.

    १९९५ मध्ये त्यांनी केलेल्या बॉम्बे चित्रपटानेही तुफान कमाई केली. यानंतरही त्यांनी चित्रपटाची वाट न धरता शिक्षण पूर्ण केले. चित्रपटात येण्याचे कधी ठरवले नसल्याने अरविंद पुढील शिक्षणासाठी विदेशात निघून गेले. अरविंद स्वामी यांनी २००० साली आलेला राजा को रानी से प्यार हो गया हा शेवटचा चित्रपट केला त्यानंतर २००८ पर्यंत अरविंद स्वामी यांनी एकही चित्रपट साईनही केला नाही.

    मणीरत्नम यांनी अरविंदला पून्हा चित्रपचटात खेचून आणले आणि २०१३ मध्ये एक चित्रपट बनविला २०१५ साली मोहन राजा यांच्या थनी ओरुवन या चित्रपटात अरविंदने खलनायकाची भूमिका केली. अरविंद स्वामी यांनी १५ वर्षानंतर बॉलीवूडमध्ये दिग्दर्शक तनुज भरमार यांच्या 'डीअर डॅड' चित्रपटातून पुनरागमन केले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      June 17, 2019


  • मिनार पिंपळे

    मिनार पिंपळे यांनी त्यांच बी. एस. डब्ल्यू. व एम. एस. डब्ल्यू चं शिक्षण चर्चगेटमधील निर्मला निकेतन या कॉलेजमध्ये पुर्ण केलं. लहानपणापासूनच त्यांना झोपडपट्यांमधील रहिवाश्यांसाठी काहीतरी भव्य, चांगले काम करण्याची मनी प्रचंड हुरहूर होती. पदव्योत्तर शिक्षण झाल्यानंतर त्यांनी युवा या संघटनेची स्थापना केली. मुंबईमधील झोपडपट्टयांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी अनेक उपाय योजना सुचवल्या व प्रत्यक्ष अंमलात सुध्दा आणल्या. परंतु या योजना अंमलात आणण्यासाठी त्यांनी स्थानिक बेरोजगार तरूणांची मदत घेतली. त्यांच्याशी जिव्हाळ्याच नात निर्माण करून त्यांना संघटित केलं. आज त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे व इतक्या वर्षांच्या साधनेमुळे आज अनेक झोपडपट्टयांमध्ये धडाडीच्या तरूणांची पथके उभी राहिली आहेत. हे तरूण स्वतःच या वस्त्यांच्या विकासासाठी अनेक उपाय योजना राबवीत आहेत. त्यांच्या बाहुंना बळ व पाठीला कणा देण्याचे काम मात्र युवाचे स्वयंसेवक करीत आहेत. अनेक तरूणांना गुन्हेगारी मार्गांपासून परावृत्त करून समाजाच्या आदर्श पुर्नरचनेसाठी त्यांना मानसिक व शारिरीक खाद्य पुरविण्यात या संघटनेचा मोलाचा वाटा आहे

      July 27, 2011


  • प्रसिद्ध अभिनेत्री बेबी नंदा

    भावुक डोळे, साधारण सौंदर्य व ओठांखाली असलेला तीळ, ठेंगणी मुर्ती असं व्यक्तीमत्व असलेल्या व आपल्या उत्साहाने भारलेल्या मा.बेबी नंदा यांनी अनेक दशकं चित्रपट सृष्टी गाजवली. त्यांचा जन्म ८ जानेवारी १९४१ रोजी कोल्हापूर येथे झाला. बेबी नंदा या मराठी चित्रपट सृष्टीतले एकेकाळचे आघाडीचे दिग्दर्शक निर्माते असलेल्या मास्टर विनायक यांच्या कन्या. मा.बेबी नंदा यांचे मूळचे नाव रेणुका विनायक कर्नाटकी. मास्टर विनायक यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्यावर घराची जबाबदारी आली. त्यासाठी त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून काम सुरू केले. १९५० सालाच्या आसपास आलेल्या ‘जग्गु’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले. बालपण संपल्यानंतर त्यांनी बहिणीच्या वगैरे भूमिका केल्या. त्यांचा या पर्वातला त्यांचा पहिला चित्रपट होता ‘तुफान और दिया’. यात बहिण भावाच्या नात्याची एक विलक्षण कथा व्ही शांताराम यांनी मांडली होती. यातल्या बहिणीच्या भूमिकेने सर्वांचेच लक्ष बेबी नंदा यांच्याकडे गेले. त्या पाठोपाठ १९५७ साली आलेल्या ‘भाभी’ या चित्रपटामधली त्यांची भूमिकाही विशेष गाजली. या भूमिकेसाठी त्यांना पहिल्यांदाच सहाय्यक अभिनेत्रीसाठीचे फिल्मफेअर पुरस्काराचे नामांकन मिळाले होते. ‘काला बाजार’ या देवआनंद यांच्या चित्रपटातली त्यांची भूमिकाही अशीच गाजली होती. त्या पाठोपाठ आलेल्या ‘धूल का फुल’ या चित्रपटातही त्यांनी एक लहान भूमिका केली होती. नायिका म्हणून बेबी नंदा यांचा पहिला चित्रपट होता तो एल व्ही प्रसाद यांचा ‘छोटी बहन’. हा चित्रपट तुफान गाजला. या चित्रपटाने त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत नायिका म्हणून लगेच प्रस्थापित केले. त्याच वर्षी ‘हम दोनो’ या चित्रपटात त्यांनी देव आनंद यांच्या पत्नीची भूमिका केली. ‘अल्ला तेरो नाम..’ या गाण्याच्या वेळचा तिचा अभिनय आजही अनेकांना आठवत असेल. १९६० साली आलेल्या ‘आचल’ या चित्रपटासाठी बेबी नंदा यांना पहिल्यांदाच फिल्मफेअरचा सहाय्यक अभिनेत्रीसाठीचे नामांकन मिळाले होते. बेबी नंदा यांनी अनेक अभिनेत्यांबरोबर काम केले असले तरी शशी कपूर बरोबरची त्यांची जोडी विशेष गाजली. ‘चार दिवारी’ व ‘मेंहदी लगी मेरे हाथ’ या त्यांच्या चित्रपटांना बॉक्स ऑफीसवर चांगलेच यश मिळाले. त्य़ांच्या काही चित्रपटांना प्रेक्षकांनी स्विकारलेले नसले तरी १९६५ साली आलेल्या ‘जब जब फुल खिले’ या चित्रपटाने या जोडीला मोठं यश मिळवून दिलं. बेबी नंदा यांची काश्मिरी वेषातली छबी अनेक रसिकांच्या मनात घर करुन गेली. या सिनेमातली सगळी गाणी गाजली असली तरी ‘ये समा..’ या गाण्यातला त्य़ांचा अभिनय विशेष गाजला. याच वर्षी आलेल्या ‘गुमनाम’ या चित्रपटातला बेबी नंदा यांचा अभिनयही विशेष गाजला. ‘इत्तेफाक’ या कोणतेही गाणे नसलेल्या चित्रपटातली राजेश खन्ना बरोबरची त्यांची भूमिकाही चांगलीच गाजली. मनोज कुमार यांचा ‘शोर’ या चित्रपटात त्यांनी भूमिका केली. त्यानंतर त्यांनी नायिका म्हणून ‘छलिया’, ‘नया नशा’ अशा काही चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. या चित्रपटांना योग्य प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी नायिका म्हणून काम करणे थांबवले. ‘आहिस्ता आहिस्ता’ या चित्रपटात पद्ममिनी कोल्हापुरे च्या आईच्या भूमिकेत त्यांनी चरित्रभूमिकांद्वारे पुनरागमन केले. ‘मजदूर’ व ‘प्रेमरोग’ या चित्रपटातल्या भूमिकांनंतर त्यांनी चित्रपट संन्यास घेतला. १९९२ साली दिग्दर्शक मनमोहन देसाई यांच्याशी नंदा यांचा साखरपुडा झाला. मात्र, त्यानंतर मनमोहन देसाई यांचे अपघाती निधन झाले. नंदा आयुष्यभर अविवाहितच राहिल्या. नंदा यांचे निधन २५ मार्च २०१४ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      March 27, 2017


  • सॉफ्ट कॉन्टेक्ट लेन्सचे जनक ओटो विक्टरले

    सॉफ्ट कॉन्टेक्ट लेन्सचा शोध लावणारे ओटो विक्टरले हे स्वतः चष्मा वापरत होते आणि त्यांनी त्यावर उपाय म्हणून आधुनिक सॉफ्ट कॉन्टॅक्ट लेन्सचा शोध लावला.

      May 11, 2023


  • मराठी अभिनेत्री, लेखिका प्रिया तेंडुलकर

    प्रिया तेंडुलकरांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वेट्रेसची नोकरी करून केली. ती नोकरी सोडून देऊन त्या नाट्यसृष्टीमध्ये शिरल्या. त्यांनी गिधाडे, ती फुलराणी, एक हट्टी मुलगी या नाटकांमध्ये काम केले होते. त्यांनी त्यांचा पहिला चित्रपट इ.स. १९७३ साली आलेला दिग्दर्शक शाम बेनेगल यांचा अंकुर हा हिंदी चित्रपट. यांव्यतिरिक्त त्यांनी गोंधळात गोंधळ, धाकटी जाऊ आणि तूच माझी राणी यासारख्या मराठी चित्रपटांमध्येही काम केले होते.

    प्रिया तेंडुलकर ह्या भारतातील पहिल्या टीव्ही-स्टार म्हणून ओळखल्या जातात. त्यांची 'रजनी' ही मालिका खूपच गाजली. त्यांच्या इतर मालिकांमध्ये प्रिया तेंडुलकर शो, ज़िम्मेनदार कौन, किस्से मियाँ बीवी के, हम पांच या हिंदी, तर 'दामिनी' या मराठी मालिकेचा समावेश होतो. त्या लेखिकाही होत्या. त्यांनी अनेक लघुकथा लिहिल्या आहेत. त्यांचे 'ज्याचा त्याचा प्रश्न' हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

    नाटककार विजय तेंडुलकर हे त्यांचे वडील.

    प्रिया तेंडुलकरांनी यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९५४ रोजी झाला . त्यांचे १९ सप्टेंबर २००२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      September 19, 2017


  • हितेंद्र ठाकूर

    महाराष्ट्र विधानसभेतील विद्यमान आमदार महाराष्ट्रातील बहुजन विकास आघाडी ह्या राजकीय पक्षाचे अध्यक्ष असलेल्या हितेंद्र ठाकूर यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९६१ साली झाला. १९८८ साली वसई तालुका युवक कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदावर आरूढ होऊन आपल्या राजकीय कारकिर्दाची सुरुवात केली. प्रतिकूल परिस्थितीत १९९० मध्ये कॉंग्रेसने त्यांना विधानसभेचे तिकीट दिले व ते सर्वात तरुण आमदार म्हणून बहूमतांनी निवडून आले. पुढे आपल्या कार्यकर्तुत्वाने सतत चौथ्यांदा आणि मोठ्या मताधिक्याने निवडून आले. कालांतराने हितेंद्र ठाकूर यांनी “बहुजन विकास आघाडी”ची पक्षची स्थापना केली.सध्या तालुका पंचायत समिती, चारही नगर पालिका व बहुसंख्य ग्रामपंचायतीवर त्यांच्या वसई विकास मंडळाचे वर्चस्व आहे. ठाणे जिल्हा परिषद व ठाणे जिल्हा सहकरी बॅंकेच्या पदाधिकारी निवडीत त्यांच्ये मत निर्णायक असते विधान परिषदेचे उपसभापती वसंतराव डावखरे यांना विधान परिषदेवर तीनदा निवडून आणण्यात सिंहाचा वाटा आहे तसंच अभिनेते गोविंद आहुजा उर्फ गोविंदा यांना लोकसभेवर निवडून आणण्यात देखील त्यांचा खारीचा वाटा होता.

    वि.वा ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट, या संस्थेमार्फत उत्कर्ष विद्यालय (मराठी व इंग्रजी माध्यम), कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, वि. वा. ठाकूर पदवी महाविद्यालय सुरू केले. वि.वा.चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्य तपासणी, नेत्राचिकिटसा, रक्तदान ,ज्येष्ठ नागरिकानसाठी ओळखपत्रे, अपंगांसाठी उपकरणांचे वाटप कार्यक्रमांचे आयोजन; झोपडपट्टी धारकाना स्वंयंपाक गॅसची वाटप.त्याचप्रमाणे वसई-विरार भागात अनेक सामाजिक व सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजन हितेंद्र ठाकूर यांच्याकडून होत असते यांचे विधायक व सामाजिक काम व सर्वसमावेशक बेरजेच्या राजकारणामुळे वसई तालुक्यांतील विविध पक्ष्यांचे अनेक नेते त्यांचे नेतृत्व मान्य करतात.

      January 12, 2015


  • ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा

    ध्येयाने झपाटलेल्या रतन टाटा यांनी अमेरिकेतील आपल्या दहा वर्षांच्या मुक्कामामध्ये हॉटेलमध्ये भांडी घासण्यापासून ते कारकुनाच्या नोकरीपर्यंत सर्व काही केले.

      December 28, 2021


  • दर्जेदार सतारवादक पं. रविशंकर

    ‘भारताचे सांस्कृतिक राजदूत’ म्हणून जगभरातील अनेक देशांनी पाचारण केलेले पं. रविशंकर हे जगभरातील सर्वाधिक पुरस्कार व सन्मान मिळवलेले भारतीय कलाकार असावेत! ‘डॉक्टर ऑॅफ फाइन आटर्स’ (कॅलिफोर्निया विद्यापीठाकडून, १९६८), तीन वेळा ‘ग्रॅमी’ अवॉर्ड (१९६७, १९७० व १९७३ : हा सन्मान मिळवणारे पहिले भारतीय), ‘युनिसेफ’ सन्मान (१९८०), मेरीलॅण्ड व बाल्टीमोर राज्यांचे सन्माननीय नागरिकत्व (१९८४), फ्रान्स सरकारचा कलाविषयक सर्वोच्च नागरी सन्मान (१९८५), ‘फुकोओका एशियन कल्चरल प्राइझ’ (जपान १९९१), ‘रामोन मॅग्सॅसे’ पुरस्कार (फिलिपाइन्स, १९९२), ‘महात्मा गांधी’ सन्मान (लंडन, १९९२), हार्वर्ड व न्यू इंग्लंड विद्यापीठाकडून सन्माननीय डॉक्टरेट (१९९३), ब्रिटीश कोलंबियातील व्हिक्टोरिआ विद्यापीठाकडून सन्माननीय डॉक्टरेट (१९९४), ‘प्रीमियम इंपीरिअल’ सन्मान (जपान आर्ट असोसिएशन, १९९७), ‘पोलर म्युझिक’ अवॉर्ड (नोबेल सन्मानाची प्रतिष्ठा असणारे, १९९८), ब्रिटीश सरकारकडून ‘नाइटहूड’ हा नागरी सन्मान (२००१) असे जगभरातील अनेक सन्मान त्यांना दिले गेले. अमेरिकेतील ह्यूस्टन नगरपालिकेने १९८३ साली ४ व ५ जून हे दोन दिवस ‘रविशंकर दिन’ म्हणून साजरे केले!

      April 7, 2022


  • करण चाफेकर

    आज भारतात इतक्या वर्षांनंतरही ३ डी प्रिंटर ही संकल्पना रुजू शकत नाही जी प्रदेशात अनेक वर्षे आधी रुजली आहे . याचे एकमेव कारण म्हणजे आपले पुस्तकी ज्ञान. बटन दाबले की यंत्र चालू झाले पाहिजे ही भावना अगदी खोलवर रुजली आहे ती नष्ट झाली पाहिजे यासाठी प्रॅक्टिकल ज्ञान असणे आवश्यक असते. ३ D प्रिंटर झाल्यानंतर करण राजभवनाला ए . पी . जे . अब्दुल कलाम यांची भेटला होता.

      April 11, 2021


  • नाटय़समीक्षक डॉ.वि.भा. देशपांडे

    नाट्यसमीक्षक विश्वनाथ भालचंद्र देशपांडे उर्फ डॉ.वि.भा. देशपांडे हे पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अनेक वर्षे पदाधिकारी होते.

      March 12, 2017