जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
‘किंगडम ऑफ ड्रीम्स’ या थिएटरच्या एका नाटकात त्याला मुख्य भूमिका मिळाली आणि तिचं त्याच्या पहिल्या व्यावसाईक कामाची सुरुवात होती. नॉट इन फोकस, बिनकामाचे संवाद, ड्रीम्स ऑफ तालीम आणि अमर फोटो स्टुडीओ ही त्याने केलेली नाटके.
April 22, 2022
विलास वसंत खोले हे समीक्षक व “शोध” या संस्थेचे संस्थापक-संचालक आहेत.
January 4, 2021
डॉ. श्रीराम अभ्यंकर हे प्रख्यात गणितज्ञ होते. ते उत्तम शिक्षक, मराठी भाषाप्रेमी आणि भास्कराचार्य प्रतिष्ठानचे संस्थापक होते.
December 15, 2010
अलाहाबाद विद्यापीठात अध्यापनशास्त्र आणि इंग्रजी मध्ये एम.ए केले. १९५३ मध्ये नरेंद्र शर्मा यांनी आकाशवाणीत नोकरी सुरु केली. त्यांचा जन्म २८ फेब्रुवारी १९१३ रोजी उत्तर प्रदेशतील जहागीरपूर येथे झाला.१९४७ साली जेव्हा भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले तेव्हा ’ऑल इंडिया रेडिओ’ नावाचा स्वतंत्र विभाग माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापन करण्यात आला. ’ऑल इंडिया रेडिओ’चे अधिकृतरीत्या ’आकाशवाणी’ हे नाव १९५७ साली ठरविण्यात आले. ते नरेंद्र शर्मा यांनी सुचविले होते. आज जे आपण ‘आकाशवाणी’ नाव ऐकतो ते १९५७ मध्ये नरेंद्र शर्मा यांनी ‘आकाशवाणी’ हे नवे आकर्षक नाव ऑल इंडिया रेडीओला सुचविले. या नावामुळे भारतीय जनता, रसिक श्रोत्यांमध्ये एक आपुलकीची भावना निर्माण झाली, व लोक रेडिओ ऐकू लागले. १९३१ मध्ये पंडित नरेंद्र शर्मा यांची पहिली कविता 'चांद' या मासिकात आली होती. विविध भारतीची सुरुवात २ ऑक्टोबर, १९५७ रोजी झाली. १९५७ साली आकाशवाणीचे तेव्हाचे महानिर्देशक गिरिजाकुमार माथुर यांनी एक असा रेडिओ चालू करण्याची कल्पना मांडली की ज्यात विविधता असावी. त्यामुळे या रेडिओचे नाव विविध भारती पडले. नरेंद्र शर्मा व गोपालदास यांनी त्यांना सहयोग दिले. विविध भारतीवर पहिल्या गाण्याची सुरुवात संगीतकार अनिल विश्वाशस यांनी नरेंद्र शर्मा यांनी लिहिलेल्या गाण्याने झाली. ज्या नरेंद्र शर्मा यांनी ज्योती कलश छलके हे गाणे लिहिले त्याच नरेंद्र शर्मा यांनी सत्यम शिवम सुन्दरम या चित्रपटातील सत्यम शिवम सुन्दरम हे गाणं लिहिले होते. नरेन्द्र शर्मा यांनी लिहिलेलं स्वागतम हे गाणं १९८२ च्या एशियाड मध्ये स्वागत गीत म्हणून निवडलेले होते. याचे संगीत रविशंकर यांनी दिले होते. पं.नरेंद्र शर्मा यांनी लोकमानसात आपले आगळे स्थान निर्माण केले होते. मुंबई टॉकीज आणि देविका राणी युसूफ खान पठाण, (दिलीप कुमार) यांचा ‘ज्वार-भाटा’ चा नायक म्हणून विचार करत होते. तेव्हा नरेश शर्मा यांनी युसूफ खान पठाण हे नाव दिलीप कुमार नाव सुचवले. पं. नरेंद्र शर्मा, यांनी लोकमानसात आपले आगळे स्थान निर्माण केले होते. पंडीत नरेंद्र शर्मा यांना लता मंगेशकर या आपले संगीत गुरू मानत. पंडित नरेंद्र शर्मा यांचे ११ फेब्रुवारी १९८९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ : इंटरनेट
नरेंद्र शर्मा यांची दोन गाणी
स्वागतम शुभ स्वागतम
आनंद मंगल मंगलम
नित प्रियम भारत भारतम
नित्य निरंतरता नवता
मानवता समता ममता
सारथि साथ मनोरथ का
जो अनिवार नहीं थमता
संकल्प अविजित अभिमतम
आनंद मंगल मंगलम
नित प्रियम भारत भारतम
कुसुमित नई कामनाएँ
सुरभित नई साधनाएँ
मैत्री मति कीडांगन में
प्रमुदित बन्धु भावनाएँ
शाश्वत सुविकसित इति शुभम
आनंद मंगल मंगलम
नित प्रियम भारत भारतम
"ज्योति कलश छलके'
ज्योति कलश छलके, ज्योति कलश छलके
हुए गुलाबी लाल सुनहरे, रंग दल बादल के
ज्योति कलश छलके..
घर आंगन वन उपवन उपवन, करती ज्योति अमृतसे सिंचन
मंगल घट ढलके, मंगल घट ढलके
ज्योति कलश छलके..
अंबर कुंकुम फल बरसाए, फूल पँखुडिया पर मुसकाए
बिंदू तू ही न जलके, बिंदू तू ही न जलके
ज्योति कलश छलके..
पात पात बिरवा हरियाला, धरती का मुख हुआ उजाला
सच सपने कलके, सच सपने कलके
ज्योति कलश छलके..
उषा ने आँचल फैलाया, फैली सुखकी शीतल छाया
नीचे आँचल के, नीचे आँचल के
ज्योति कलश छलके..
ज्योति यशोदा धरती गय्या, नील गगन गोपाल कन्हैया
श्यामल छबि झलके, श्यामल छबि झलके
ज्योति कलश छलके..
February 13, 2017
मेहबूब हुसेन पटेल हे त्यांचे मूळ नाव. त्यांचा जन्म २० ऑक्टोबर १९१६ रोजी झाला. बार्शी येथील गरीब मुसलमान कुटुंबात जन्मलेल्या या मुलाला विलक्षण पल्लेदार, पहाडी आवाजाची निसर्गदत्त देणगी तसेच मराठी लोकगीतांचा समृद्ध वारसा आईकडून लाभला होता. गरिबीमुळे कधी बसचालकाबरोबर क्लीनर म्हणून, तर कधी गिरणीकामगार म्हणून त्यांना काम करावे लागले. गिरणी संपात पुढाकार घेतल्यामुळे त्यांना विसापूरच्या तुरूंगातही जावे लागले. तेथे भेटलेल्या कॉम्रेड रघुनाथ कऱ्हाडकर यांच्या प्रभावामुळे ते कम्युनिस्ट झाले. पोलिसांचा ससेमिराचुकवत ते कोल्हापूरला आले व मास्टरविनायकांच्या स्टुडिओत काम करू लागले. येथेच त्यांचे मित्रांनी ‘ अमर शेख’ असे नामकरण केले.
राष्ट्रीय चळवळीत ते १९३०-३२ च्या सुमारास सामील झाले. पुढे ज्योती म्हणजे पूर्वाश्रमीच्या कुसुम शामराव जयकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला.स्वतः एक श्रमिक म्हणून सर्वसामान्यांच्या उत्थानाचे स्वप्न त्यांनी पाहिले. आपल्या रचना रसाळपणे बुलंद आवाजात गात त्यांनी युक्त महाराष्ट्र चळवळीचा यशस्वी प्रचार केला. स्वरचित आणि इतरांचीही कवने ते प्रभावीपणे पेश करीत. गोवामुक्ति-आंदोलनातही त्यांनी मोठे योगदान दिले. चिनी व पाकिस्तानी आक्रमणांच्या वेळी आपल्या शाहिरीने त्यांनी लाखो रूपयांचा निधी देशासाठी गोळा केला. उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी वाणी, लेखणीचा यज्ञ त्यांनी मांडला. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते, लोकनाट्ये इत्यादींचा समावेश होता.
जनसमुदायाला भारून टाकण्याचे प्रभावी अंगभूत कौशल्य त्यांच्याजवळ होते. त्यांची लेखणी जिवंत, ज्वलंत आणि हृदये प्रदीप्त करणारी होती. प्रसार आणि प्रचारकार्यात या गुणांचा त्यांनी पुरेपूर उपयोग केला. त्यांच्या या गुणांचा वारसा त्यांच्या कन्या प्रेरणा आणि मलिका यांच्यातही दिसून येतो. कवितेची अंतर्लय व रचना यमकप्रचुर करण्याची अमर शेख यांची प्रवृत्ती होती. रौद्र रसाचा आविष्कारही त्यांच्या काही कवनांतून त्यांनी घडविला. त्यांच्या बऱ्याचशा रचना प्रासंगिक असल्या, तरी त्यांत विचारभावनांचे थरारते चैतन्य जाणवते. ते नुसतेच मनस्वी कवी नव्हते, तर जनस्वी लोकशाहीर होते. त्यांची कविता जनतेच्या ओठांवर रूजली, फुलली आणि ती लोकगंगेने जगविली. प्र. के. अत्रे, मं. वि. राजाध्यक्ष यांनी मुक्तकंठाने या शाहिराचा गौरव केला आहे. अत्रे त्यांना ‘ महाराष्ट्राचा मायकोव्ह्स्की ’ म्हणत. त्यांना सर्वांत प्रिय असलेली पदवी होती लोकशाहीर; कारण आपले सारे आयुष्यच त्यांनी जनताजनार्दनाला अर्पण केले होते. कविता हा या लोकशाहिराचा बहिश्चर प्राण होता आणि सामान्यांतल्या सामान्याचे उत्थान हा त्यांच्या आत्म्याचा आवाज होता.
कलश (१९५८) आणि धरतीमाता (१९६३) हे त्यांचे काव्यसंग्रह, अमरगीत (१९५१) हा गीतसंग्रह आणि पहिला बळी (१९५१) हे त्यांनी लिहिलेले नाटक. त्यांनी रचलेल्या पोवाड्यांत छ. शिवाजी महाराज, होळकर आणि उधमसिंग यांच्या पोवाड्यांचा समावेश आहे. युगदीप व वख्त की आवाज ह्या मासिकांचे त्यांनी संपादन केले. प्रपंच आणि महात्मा ज्योतिबा फुले ह्या चित्रपटांतून आणि झगडा या नाटकातून त्यांनी प्रभावी आणि ढंगदार भूमिका केल्या. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात साम्यवादी पक्षाशी झालेल्या मतभेदांच्या भोवऱ्यात सापडल्याने त्यांनी तो पक्ष सोडला. लोककलांचे जतन, संवर्धन व संशोधन व्हावे तसेच शाहिरी व लोक-कलेचा वारसा वृद्घिंगत व्हावा या उद्देशांनी मुंबई विदयापीठात त्यांच्या सन्मानार्थ ‘शाहीर अमर शेख ’ अध्यासन सुरू करण्यात आले आहे. अमर शेख यांचे २९ ऑगस्ट १९६९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.मराठी विश्वकोश
August 29, 2017
१९२८ च्या सुमारास भास्करबुवा बखले यांनी त्यांना महाराष्ट्रात आणले. त्यानंतरची दहा वर्षे ते गंधर्व नाटक मंडळीत होते. बालगंधर्वाचा सुरेल आवाज आणि तिरखवाँची भावनाकूल अशी सुसंवादी साथ यांमुळे नाटकातील पदे रंगून जात.
January 13, 2022
सावंतवाडी येथे १९९४ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. शंकर सारडा हे २००१-२००३ यादरम्यान ते ‘लोकमत’ रविवार पुरवणीचे संपादक होते.
January 28, 2022
अनिकेत केळकर हा मराठी चित्रपट , नाट्य आणि मालिका सृष्टीत कार्यरत असलेला एक अभिनेता. त्याने हिंदी सृष्टीतही काही प्रोजेक्ट्स केलेली आहेत.
August 8, 2020
अनिल मोहिलेंवर लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतल्या प्यारेलाल शर्मा, शंकर-जयकिशन यांचे म्युझिक अरेंजर सॅबेस्टियन, कल्याणजी आनंदजी यांचे अरेंजर बाळ पार्टे आणि मदनमोहन यांचे अरेंजर सोनिक मास्तर यांचा प्रभाव होता.संगीतकार म्हणून त्यांनी स्वतंत्रपणे तसेच अरुण पौडवाल यांच्या साथीने अनेक चित्रपटांना संगीत दिले. मराठी चित्रपट सृष्टीत अनिल अरुण या जोडीने अष्टविनायक या चित्रपटाला दिलेल्या संगीतामुळे त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली.
March 15, 2014
‘लिटिल चॅम्प’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली मुग्धा वैशंपायनने लिटिल चॅम्प या कार्यक्रमात आपल्या आवाजाने प्रेक्षकांना अक्षरशः मोहून टाकले होते. या कार्यक्रमात मुग्धा सर्वात तरुण सदस्य होती आणि सर्वांनी त्याला ‘लिटल मॉनिटर’ म्हणून संबोधले होते.
April 5, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti