जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
ज्या काळात महिला घराबाहेर सुद्धा फारशा पडत नसत. गायन आणि संगीत यांचं वास्तव्य फक्त माडीवरच असत, अशा संगीताच्या कोंडलेल्या काळात हिराबाईंनी संगीत माडीवरून माजघरात आणलं. त्यांचा जन्म ६ जानेवारी १९२८ रोजी झाला. त्यावेळी समाजाचा तीव्र रोष पत्करून सुद्धा आपल्या शांतवृत्तीनी त्यांनी संगीताला आणि विशेष म्हणजे स्त्रियांच्या गायनाला समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली. त्याकाळी हिराबाईंच्या रूपाने स्त्रियांसाठी एक नवी वाट मोकळी झाली म्हणजेच आपल्या गायकीनी त्यांनी त्यावेळी क्रांती घडवून आणली. बालगंधर्वांनी सुद्धा हिराबाईंच्या गाण्याला, त्यांच्या सात्विक सूराला गौरविले होते.
हिराबाई बडोदेकर ख्याल, ठुमरी, मराठी नाट्य संगीत, भजन मध्ये तज्ञ होत्या. त्यांना लोकांमध्ये हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत लोकप्रिय करण्याचे श्रेय जाते. त्यांच्या मैफिली अतिशय लोकप्रिय होत असत. त्यांचा गोड आणि नाजूक आवाज खूप लोकप्रिय होते. हिराबाई बडोदेकर यांनी किराणा घराण्याला अधिक लोकप्रिय करण्याचे काम केले. हिराबाई बडोदेकर यांनी "सुवर्णा मंदिर", " प्रतिभा ", " जनाबाई " अशा अनेक चित्रपटात अभिनय केला. संगीत शिकवण्यासाठी संगीत विद्यालय, नूतन संगीत विद्यालय नावाने सुरू केले. हिराबाई ह्या फार लवकरच्या कारकिर्दीत रेकॉर्डिंग कलाकार झाल्या. ध्वनिमुद्रिकांच्या द्वारे आणि रेडिओवर नित्यनियमाने होणा-या कार्यक्रमांमुळे हिराबाई खूपच लोकप्रिय झाल्या.
नाटयसंगीताच्या हिराबाईंच्या सुमारे ४८ ध्वनिमुद्रिका प्रसिध्द झाल्या, चित्रपटसंगीताच्या अवघ्या तीनच ध्वनिमुद्रिका निघाल्या. शास्त्रीय संगीताच्या सुमारे चाळीस ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या. तसेच 'राधेकृष्ण बोल', 'गिरीधर गोपाला',(खमाज), 'पायोरे मैने' दुर्ग), 'चाकर राखोजी', यासारखी भजने आहेत. पाच ठुम-या आहेत तर, 'किस कदर है', 'या आकर हुआ मेहमान', या गझला आहेत. हिराबाईंचा भैरवी हा आवडता राग होता. १९७० पर्यंत हिराबाईंच्या सुमारे १७५ ध्वनिमुद्रिका प्रसिध्द झाल्या. मा.हिराबाई रेडिओवर प्रथम गायल्या ते १९२९ मध्ये तेव्हा रेडिओ सुरू होऊन त्यावेळी अवघी दोन वर्षे झाली होती. त्यानंतर त्यांचे कार्यक्रम सातत्याने रेडिओवर होऊ लागले. १९२९ पासून ते १९७३ मध्ये हिराबाई गायनातून निवृत्त हाईपर्यंत, म्हणजे जवळ जवळ ४५ वर्षे त्या रेडिओवरून गायल्या. ध्वनीमुद्रिका आणि आकाशवाणी ही दोन प्रभावी माध्यमे उपलब्ध झाल्यामुळे हिराबाईंच्या सुरेल गीतांचा सुगंध दुरवर तर पसरलाच परंतू आजच्या पिढीत त्यांची गाणी रसिक आवर्जून ऐकतात. हिराबाई बडोदेकर यांचे २० नोव्हेंबर १९८९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
May 20, 2017
बाबासाहेब आंबेडकरांच्या चवदार तळ्याच्या मोहिमेत ते सहभागी होते. केशवराव व शंकरराव मोरे हे १९३० नंतर देशाच्या राजकीय चळवळीच्या मुख्य प्रवाहात आले. लोकमान्य टिळकांनंतर पुण्यातून जेधे यांनीच कॉंग्रेसला संजीवनी दिली.
November 12, 2021
अनूप कुमार यांनी १९५० साली आलेल्या ‘गौना’ चित्रपटात अभिनेता म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांचे मोठे भाऊ अशोक कुमार आणि धाकटा भाऊ किशोर कुमार होत.
January 26, 2022
लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजेल ह्या काळजीमुळे प्रत्येक रयत रयतेतील प्रत्येक जण महाराजांवर जीव ओवाळून टाकीत होता त्यातीलच एक म्हणजे हिरोजी फर्जंद
मिर्झा राजे जयसिंग यांबरोबर झालेल्या कराराच्या ओझ्यामुळे महाराजांना पातशहाच्या भेटीसाठी आग्र्यास जाणे भाग पडले औरंगजेबाचा पन्नासाव्या वाढदिवसाला महाराज त्या औरंग्याच्या दरबारात हजर होते येथे मात्र महाराजांचा अपमान करण्यात आला आणी नंतर महाराजांना डांबून ठेवण्यात आले हफ्सी मुराज खान, फौलाद्खन जातीने पहारा देत. नंतर हे पहारे ढील्ले पढले
युक्ती लढवली गेली तसेच झाले. महाराज दि. १७ ऑगस्टला संध्याकाळी पसार झाले. त्यावेळी त्यांच्या शामियान्यात हिरोजी फर्जंद स्वतः हा शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांची अंगठी दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपल्याचे नाटक करीत पांघरून घेऊन झोपला झोपला.
(मागें दिल्लीमध्ये हिरोजी फरजंद पलंगावरी निजला होता. तो चार प्रहर रात्र व तीन प्रहर दिवस तैसाच निजला.चौकीचे पोलादखानाचे लोक कोठडीत येऊन पाहतात {तो} राजे शेला पांघरून निजले.पोर पाय रगडित होता. पोरास लोक पुसतात की राजे आज फार वेळ निजले? पोर म्हणतो की 'शीर दुखते'ऐसे पाहोन लोक जातात. तैसाच तीन प्रहर रोज हिरोजी निजला होता. तों प्रहर दिवस असतां हिरोजी उठोन , आपलीं पांघरुणे, चोळणा, मुंडासे घालून पोर बरोबरी घेऊन, बाहेर आला चौकीदारांनी पुसिले त्यांस हिरोजीने सांगितले की शीर दुखते, कोणी कोठडीत जाऊ लागेल त्यास मन करणे. आपण औषध घेऊन येतो " म्हणून चौकीदारास सांगून दोघे बाहेर गेले. रामसिंगाचे गोटास जाऊन त्यास एकांती वर्तमान सांगोन आपण तेथून निघोन देशाचा मार्ग धरीला ) कंसातील लेखन - सभासदाची बखर
दुसरा दिवस उजाडला आणि बोभाटा झाला.एकच कल्लोळ उसळला. फौलादखानाला तंबूत चिटपाखरूही दिसले नाही. पलंगावर एक गाठोडे , एक लोड आणि दोन जोडे शालीखाली गाढ झोपलेले आढळले. ते पाहून फुलादखानाची काय अवस्था झाली असेल ? तो विरघळला की गोठला ? त्याला शिवाजीराजांचा आणि औरंगजेबाचाही चेहरा आलटून पालटून दिसू लागला असेल का ? आपण जिवंत असूनही ठार झालेलो आहोत याचा साक्षात्कार झाला असेल का ? केवढी फजिती!
एवढ्या प्रचंड पहाऱ्यातून अखेर तो सीवा आपली थट्टा करून पसार झाला तेही साऱ्या मावळ्यांना सुरक्षित घेऊन . आता त्या औरंगजेबापुढे जायचे तरी कसे ? त्याला सांगायचे तरी काय ? काय अवस्था झाली असेल फुलादखानची ?
केवढी ही स्वामीनिष्ठा केवढा हा त्याग स्वताच्या जीवावर खेळून पर मुलखातुन आपल्या धन्याला सुखरूप राजगडी न्हेणारे असे हे हिरोजी फर्जंद
December 3, 2016
‘सिंहासन’ या सिनेमात अरूण सरनाईक, श्रीराम लागू, निळू फुले, मधुकर तोरडमल, मोहन आगाशे, दत्ता भट, सतीष दुभाषी, रिमा लागू, लालन सारंग, जयराम हर्डीकर, नाना पाटेकर या आणि अशा अनेक दिग्गज कलाकारांच्या भूमिका होत्या. मराठी सिनेसृष्टीतला ‘मास्टरपीस’ म्हणून या सिनेमाकडे आजही पाहिले जाते. ३० वर्ष त्यांनी पत्रकारिता केली.
June 18, 2022
शर्मन जोशीने आपल्या करियर ची सुरुवात थिएटर पासून केली. त्या वेळी तो वर्षभरात ५५० प्रयोग करत असे. हिंदी सिनेमात त्यांचा पहिला चित्रपट गॉडमदर होता. ३ इडियट्स मुळे शरमन जोशी यांना बॉलीवूड मध्ये ओळख मिळाली.
March 17, 2022
हृदयशारदा, अश्विनी, आकाशगंगा, युधिष्ठिर, स्त्री जीवनविषयक काही प्रश्न, स्त्री जीवनाची नवी क्षितिजे, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.
June 10, 2022
‘मूडस्’ हा त्यांचा कविता संग्रह १९७६ साली प्रसिद्ध झाला. ‘कर्फ्यू आणि इतर कथा’, ‘संदर्भ’ हे दोन कथासंग्रह त्यानंतर प्रकाशित झाले. ‘कवीची गोष्ट’ आणि ‘सावित्रीचा निर्णय’ हे दीर्घकथा संग्रह सुद्धा गाजले.
March 29, 2022
शुभांगी यांनी रेडिओ स्टेशन वर तसेच टेलिव्हिजन वाहिन्यांसाठीही काम केले आहे. गेल्या त्या काही वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अशोक पत्कीची संगीत कार्यशाळा घेत असतात. शिवाय शुभांगी यांनी अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेली काही नवीन गाणीही गायली आहेत.
June 16, 2022
सर्वपक्षीय राजकारण्यांपासून ते राजकारणात रस नसणाऱ्या सामान्य माणसापर्यंत भारतीय जनतेच्या हृदयात त्यांना आजही मोठ्या प्रेमाने दिलेले मानाचे आयर्न लेडीचे स्थान कायम आहे. पोलादी व्यक्तीमत्व भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
November 26, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti