जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
भोवताल जंगली श्वापदांचा वावर, शहरी माणसांना बघून दूर पळणारे आदिवासी आणि मूलभूत सुविधांचा प्रचंड अभाव अशा परिस्थितील नुकतेच एम.बी.बी.एस झालेला प्रकाश आमटे नावाचा तरुण आपल्या मंदा आमटे नावाच्या सहचारिणीसह हेमलकस्यात दाखल झाला. तेव्हापासून ते आजगायत या दाम्पत्याची लोकसेवा अखंडितपणे सुरु आहे.
September 25, 2019
भारतीय शास्त्रीय नृत्य हा एक वेगळा उपक्रम अभ्यासक्रमात यावा व विद्यार्थ्यांना त्यामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेता यावे. शास्त्रीय नृत्याकडे जनसामान्यांनी सन्मानाने पाहावे. या विषयातसुद्धा आपण पदवी प्रदान करू शकतो याकरिता केरळमधील मोहिनी अट्टम या अभिजात नृत्याचा प्रसार करणाऱ्या डॉ. कनक रेळे यांनी मुंबई विद्यापीठाच्या सहाय्याने १९६६ मध्ये नालंदा नृत्य कला महाविद्यालय सुरू केले.
June 15, 2022
मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील एक लोकप्रिय अभिनेते होते
July 14, 2011
कवी ग्रेस हे मराठी कवितेच्या प्रांतावर मौलिक ठसा उमटवून गेलेले कवी...'ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता' या काव्याने घरोघरी पोहचलेले माणिक गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस. त्यांचा जन्म १० मे १९३७ रोजी झाला.
माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस यांची मर्ढेकरोत्तर नव कवींच्या दुसऱ्या पिढीतील प्रमुख कवींमध्ये गणना होते. ग्रेस मूळचे नागपूरचे. त्यांचे वडील सैन्यात होते. नागपुरातील कर्नल बाग परिसरात त्यांचं बालपण हलाखीच्या परिस्थितीत गेलं. आईच्या अकाली निधनामुळे नोकरी व शिक्षण यांच्यात मेळ साधत त्यांना आपली प्रतिभा जपावी लागली. १९६६ मध्ये ते नागपूर विद्यापीठातून मराठीमध्ये एम.ए. झाले. त्यानंतर दोन वर्षं त्यांनी धनवटे नॅशनल कॉलेजमधे अधिव्याख्याता म्हणून नोकरी केली. १९६८ पासून १९९७ साली निवृत्त होईपर्यंत ते नागपूरमधील वसंतराव नाईक समाजविज्ञान संस्थेत (मॉरिस कॉलेज) मराठीचे प्राध्यापक होते. निवृत्तीनंतर काही काळ ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या मराठी विभागात सौंदर्यशास्त्र या विषयाचं अध्यापनही करत होते. ग्रेस यांच्या लिखाणाला सुरुवात झाली १९५५ सालापासून. 'छंद', 'सत्यकथा' या नियतकालिकांमधून त्यांच्या कविता सुरुवातीला प्रसिद्ध झाल्या. १९६७ साली त्यांचा पहिला काव्यसंग्रह 'संध्याकाळच्या कविता' प्रसिद्ध झाला. त्यांचं समकालीन कवितेत असलेलं वेगळेपण या कविता संग्रहामुळे अधोरेखित झालं. मुक्तछंदाचा प्रभाव असणाऱ्या या काळात ग्रेस यांनी निष्ठेने वृत्तबद्ध आणि नादानुसारी लयविभोर काव्यरचना केली.त्यामुळे त्यांची कविता सौंदर्यवादी असूनही तिला अभिजाततेची वैशिष्ट्यं प्राप्त झाली. यानंतर प्रसिद्ध झालेल्या राजपुत्र आणि डार्लिंग (१९७४), चंद्रमाधवीचे प्रदेश (१९७७), सांध्यपर्वातील वैष्णवी (१९९५), सांजभयाच्या साजणी (२००६) आदी संग्रहांमधून त्यांची कविता अधिक गूढ आणि व्यामिश्र होत गेलेली जाणवते. मा.ग्रेस हे विलक्षण आत्ममग्न कवी होते. ग्रेस एक बेट आहे आणि या बेटाला समजून घेण्यासाठी त्या बेटावरच यावे लागते असे मा.ग्रेस वारंवार म्हणायचे. मा.ग्रेस यांचे मराठीसोबत इंग्रजी व उर्दू भाषांवर प्रभुत्व होतं. त्यांच्या कवितांमधून याचा प्रत्यय येतोच, पण त्यांच्या व्याख्यानांमधे व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासोबत त्यांनी केलेल्या कार्यक्रमांमधूनही त्यांच्या प्रखर वाणीचा अनुभव रसिकांना येत असे. मा.ग्रेस यांच्या काव्याइतकीच मोहिनी त्यांच्या ललित लेखनानेही वाचकांच्या मनावर घातली आहे. 'चर्चबेल' हा त्यांचा पहिला ललित लेख संग्रह १९७४ मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर 'मितवा', 'संध्यामग्न पुरुषाची लक्षणे', 'मृगजळाचे बांधकाम', 'वाऱ्याने हलते रान', 'ओल्या वेळूची बासरी' हे त्यांचे ललित लेख संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. " मा.माणिक गोडघाटे यांनी कवी म्हणून 'ग्रेस' हे नाव धारण करण्यामागे कारण ठरली ती लोकप्रिय पाश्चात्त्य अभिनेत्री इन्ग्रीड बर्गमन. 'द इन ऑफ द सिक्स्थ हॅपिनेस' या चित्रपटात इन्ग्रीडसंबंधी 'शी इज इन ग्रेस' असं वाक्य उच्चारलं जातं. हे वाक्य ऐकल्यानंतर आपल्या आत्म्यावरची धूळ उडाली आणि आपल्याला प्रतिभेचा पहिला साक्षात्कार झाला, असं ग्रेस यांनी म्हटलं आहे. इन्ग्रीडचे ऋण आठवणीत राहावं यासाठी त्यांनी कायमस्वरूपी 'ग्रेस' हेच नाव लावलं. स्वतःला त्यांनी दुःखाच्या स्वाधीन केले होते. त्याबाबतीत त्यांनी म्हटलेले आहे, "मी महाकवी दुःखाचा म्हणत, दुःखाचा धागा विणताना, दगडाचे माझ्या हाती, वेगाने फूल होते'. मा.ग्रेस यांच्या ‘ती आई होती म्हणुनि...’ या गीताबद्दल, मा.ग्रेस यांच्या आईचे जेव्हा निधन झाले, त्यांना ही कविता सुचली. त्यांच्या विषण्ण मनाने ही कविता लिहिली. ग्रेस यांच्या कवितेतल्या शब्दांना हृदयनाथ मंगेशकरांच्या सुरांनी साद घातली आणि एक अजरामर गीत जन्माला आलं...
ती गेली तेव्हा रिमझिम
पाऊस निनादत होता
मेघात अडकली किरणे
हा सूर्य सोडवीत होता...
पावसाचा रिमझिम निनाद दु:खाचा सांगावा घेऊन येणारा...आई गेल्यानंतरचं पोरकेपण सांगणारा...जाणारी ती आई होती म्हणून घनव्याकूळ करणारा... हृदयनाथ मंगेशकरांच्या स्वरांमधून ग्रेस यांची ही कविता ऐकताना आपल्या मनाची अवस्था कशी होते हे सांगण्यासाठी शब्द बापुडे होतात. पावसाच्या प्रत्येक थेंबात दु:ख ठिबकत राहावं ना, अगदी तसच वाटत राहतं. त्यांच्या इतर ''भय इथले संपत नाही'',घर थकलेले संन्यासी '',पाऊस कधीच पडतो''अशा या सुंदर कवितांना ही हृदयनाथ यांनी आपल्या सुरेल स्वरांच्या कोंदणात बसवून अजरामर केले आहे. ग्रेस यांच्या ''संध्याकाळच्या कविता''या संग्रहाला १९६८ मध्ये महाराष्ट्र सरकारचे ''कवी केशवसुत''पारितोषिक मिळाले .त्यांच्या ''वाऱ्याने हलते रान'' या ललितबंध संग्रहाला २०१२ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.२०१२ साली ''युनिक फीचर्स ''ने आयोजित केलेल्या ''दुसऱ्या मराठी ई साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद त्यांनी भूषविले होते. हिंदी चित्रपटसृष्टीतील अतिशय गुणी व प्रतिभाशाली संगीतकार रोशन हे ग्रेस यांचे आवडते संगीतकार. 'चर्चबेल' या ललित गद्याच्या पुस्तकात ग्रेस यांचा 'रोशनची गाणी' या शीर्षकाचा अतिशय सुंदर लेख आहे. त्यात सुरवातीलाच ग्रेस म्हणतात, 'मी रोशनचे छायाचित्र पाहिले आहे, पण त्याला भेटू शकलो नाही. भेटायची खूप इच्छा होती. अशा ब-याच गोष्टी राहून गेल्या आहेत; राहून जातात. मृत्यू असं काही करुन जातो.' ग्रेसनी, रोशन यांनी संगीतबद्ध केलेल्या 'बहुबेगम' चित्रपटातील कव्वालीतील वाकिफ़ हूं खूब इश्क की तर्जे-बयां से मैं, ऐसे में तुझको ढूंढके लाऊं कहां से मैं! या ओळी उद़्धृत करुन, रोशनना आदरांजली वाहिली होती. ग्रेस यांचे २६ मार्च २०१२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
ग्रेस यांचे कवितासंग्रह
संध्याकाळच्या कविता (१९६७)
राजपुत्र आणि डार्लिंग (१९७४)
चंद्रमाधवीचे प्रदेश (१९७७)
सांध्यपर्वातील वैष्णवी (१९९५)
सांजभयाच्या साजणी (२००६)
बाई! जोगिया पुरुष (२०१२)
ललितबंध संग्रह
चर्चबेल (१९७४)
मितवा (१९८७)
संध्यामग्न पुरुषाची लक्षणे (२०००)
मृगजळाचे बांधकाम (२००३)
वाऱ्याने हलते रान (२००८)
कावळे उडाले स्वामी (२०१०)
ओल्या वेळूची बासरी (२०१२)
ती गेली तेंव्हा रिमझिम पाऊस होता
https://youtu.be/pM3eOOP786w
भय इथले संपत नाही.
https://youtu.be/x88r7JI4ljU
तुला पाहिलें मी नदीच्या किनारीं
https://youtu.be/e_-9GiAMInY
May 10, 2017
लिझ टेलरचे सौदर्य हाही एक चमत्कार म्हणा किंवा त्यावेळी चर्चेचा विषय होता. ‘ ‘ क्लियोपात्रा ‘ मधील गालिच्यांमधून होणारी तिची ‘ एन्ट्री ‘ आजही कोणीही जाणकार विसरू शकत नाही.
July 25, 2021
मूळच्या महाराष्ट्रीय व मराठी असलेल्या भानुमती अण्णासाहेब राजोपाध्ये आणि सध्या भानू अथय्या या नावाने ओळखल्या जाणार्यार प्रसिद्ध महिला वेशभूषाकार. त्यांचा जन्म २८ एप्रिल १९२९ रोजी कोल्हापुर येथे झाला.कोल्हापूर येथे जन्मलेल्या लहानपणापासूनच रेखाचित्र काढण्याची प्रचंड आवड होती. त्या मुळे त्यांनी मुंबई येथील जे. जे. स्कूल ऑफ़ आर्ट्स मध्ये प्रवेश घेतला व गोल्ड मेडल घेऊन पदवी प्राप्त केली. हिन्दी चित्रपटाचे गीतकार व कवि सत्येन्द्र अथय्या यांच्या बरोबर लग्न झाले व त्या भानुमती राजोपाध्येच्या भानू अथय्या झाल्या. त्यांना लहानपणापासूनच गांधीजींचे रेखाचित्र काढण्याची प्रचंड आवड होती. त्यामुळेच त्यांना रिचर्ड अॅडटनबरो यांच्या 'गांधी' (१९८२) या आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी कॉश्चूम डिझाईन करण्याची संधी मिळाली.
देशाला पहिला ऑस्कर मिळवून देणाऱ्या भानू अथय्या यांचा ऑस्कर प्रवास थक्क करणारा आहे. भानू अथय्या या १९५१ पासून भारतीय चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. त्यांनी कामिनी कौशल या अभिनेत्रीसाठी पहिला कॉश्चूम डिझाइन केला होता. 'श्री ४२०' मधील अभिनेत्री नादिरा यांच्या साठी "मुड़-मुड़ के ना देख..." या गाण्यासाठी केलेला गाऊन ने नवीन ओळख दिली. अभिनेत्रा साधना यांच्या सलवार-कमीजचे डिजाईन हे भानु अथय्या यांचे असायचे.ज्याची जादू ७० च्या दशकात फॅशन म्हणून ओळखली गेली. भानु अथय्या या अश्या ड्रेस डिजाइनर आहेत की, ज्याचे कपडे त्या पात्रात च्या भूमिकेत जातात.
भानु अथय्या यांनी १३० हून अधिक चित्रपटात गुरुदत्त, यश चोपड़ा, राज कपूर, आशुतोष गोवारिकर, कॉनरेड रूक्स और रिचर्ड एटेनबरो यांच्याबरोबर काम केले आहे. 'सी.आई.डी.' , 'प्यासा' , 'चौदहवी का चाँद', और 'साहब बीबी और ग़ुलाम' ,'रेशमा और शेरा' या चित्रपटानी भानु अथय्या यांना एक नवीन ओळख मिळाली. मा.भानु अथय्या यांनी 'गाइड' मध्ये वहीदा रहमान, 'ब्रह्मचारी' मध्ये मुमताज', सत्यम् शिवम् सुंदरम्' या चित्रपटातील झीनत अमान हिचाही कॉश्चूम भानू यांनीच डिझाइन केला होता. गुलज़ार यांच्या 'लेकिन' या चित्रपटासाठी भानू अथय्या सर्वोच्च ड्रेस डिजाइनर अवार्ड मिळाले होते. भानु अथय्या यांनी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या चित्रपटासाठी पण ड्रेस डिजाइन केले आहे. भानु अथय्या यांनी’ सीरियल्स व नाटकासाठी पण ड्रेस डिजाइन केले आहे. भानु अथय्या यांनी आपल्या जीवनावर 'द आर्ट ऑफ़ कॉस्ट्यूम डिज़ाइन' या नावाने एक पुस्तक पण लिहिले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
श्री ४२० मधील गाणे.
https://www.youtube.com/watch?v=R3D3YNmg-Ak
गाईड मधील गाणे.
https://www.youtube.com/watch?v=_i493uN6YHk
सत्यम् शिवम् सुंदरम् मधील गाणे.
https://www.youtube.com/watch?v=BdU3qP5EYoY
April 28, 2017
“असावा सुंदर चॉकलेटचा बंगला”, “कोणास ठाऊक कसा”… या बालगीतांचे व ६० हून अधिक पुस्तकांचे कर्ते. साने गुरुजींचे चरित्रकार म्हणून त्यांची ओळख
August 22, 2017
गोळवलकर गुरुजींच्या निधनानंतर १९७३ साली त्यांनी संघाचे नेतृत्व स्वीकारले. त्यांच्या सरसंघचालक पदाच्या कारकिर्दीत संघाला एक नवी दिशा मिळाली आणि संघाने पूर्वांचल राज्यातून वनवासी क्षेत्रांतून सेवाकार्याला सुरुवात केली. त्यांनी २१ वर्ष सरसंघचालकपद भूषविले.
June 17, 2022
बालमृत्यूच्या प्रश्नावर त्यांनी शोधलेले घरोघरी नवजात बालसेवा हे मॉडेल जगभरातील अविकसित देशांमध्ये व भारतात ९ लाख आशांव्दारे बालमृत्यू कमी करण्यासाठी वापरले जाते. त्यांच्या सर्च संस्थेचे कार्य व कार्यपध्दती जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असून विद्यार्थ्यांना ‘केस स्टडी’ म्हणून शिकवले जाते.
June 8, 2022
चाळीस वर्षांवरील गायकांसाठीच्या झी सारेगमपच्या पर्वाच्या उपविजेत्या अनुजा वर्तक या ठाणे शहराला अभिमान वाटणार्या व्यक्तींमधील एक ! कल्याण गायन समाज येथे पं. वसंतराव गोसावी यांच्याकडे वर्तक यांनी शास्त्रीय संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले.
May 29, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti