(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सदगुरू वामनराव पै

    वयाच्या २५ व्या वर्षी पै यांना त्याच्या गुरुंनी म्हणजे नाना महाराज शिरगावकर यांनी त्यांना अध्यात्माची प्रेरणा दिली.

      October 21, 2021


  • सर्जन डॉ.नित्यानंद उर्फ नितु मांडके

    त्यांची काम करण्याची उरक व अचुकता पाहून त्यांना ‘सुपरफास्ट’ हे नाव पडले. डॉक्टर नितु मांडके हे अतिशय कार्यक्षम सेवातत्पर प्रसंगावधानी व सर्वच रूग्णांबद्दल समान आत्मीयता व तळमळ असलेले जणु देवदुतच होते. अनेक जणांना त्यांनी मृत्युच्या दाढेतुन बाहेर काढले आहे.

      January 31, 2022


  • ज्येष्ठ नाटककार, पत्रकार आणि ज्येष्ठ संपादक विद्याधर गोखले

    ज्या काळात संगीत रंगभूमीला कठीण काळ आलेला होता त्यावेळी आपल्या संगीत नाटकांद्वारे रंगभूमीला पुनरूज्जीवन देणारे ज्येष्ठ नाटककार म्हणजे विद्याधर गोखले. त्यांचा जन्म ४ जानेवारी १९२४ रोजी झाला.पण ही त्यांची ओळख पुरेशी नाही. कारण पत्रकार आणि ज्येष्ठ संपादक म्हणूनही विद्याधर गोखले यांचा महाराष्ट्राला परिचय आहे. त्यांचे वडील संभाजीराव गोखले हे मध्यप्रदेशाच्या काँग्रेस प्रशासनात मंत्री होते. लहानपणी घरातून मिळालेल्या संस्कारांचा विद्याधर गोखले यांच्यावर प्रभाव होता. अमरावती येथे पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर १९४४ मध्ये ते मुंबईला आले. जनरल एज्युकेशन सोसायटीच्या कुर्ला येथील शाळेत इंग्रजी, मराठी आणि संस्कृत विषयाचे त्यांनी अध्यापन केले. एक विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ते ओळखले जात. यानंतर विद्याधर गोखले यांनी दैनिक लोकसत्तामध्ये बरीच वर्षे पत्रकारिता केली व त्यानंतर पाच वर्ष त्यांनी संपादक म्हणूनही काम पाहिले. पत्रकारिता करीत असताना वृत्तपत्राबरोबरच त्यांची लेखणी नाटयलेखन करू लागली. संगीत नाटकांच्या परंपरेचा वारसा त्यांनी पुढे चालवला. गोखले यांनी एकूण १८ नाटके लिहिली.

    त्यापैकी काही ऐतिहासिक, पौराणिक तर सामाजिक विषयांवर आधारित आहेत. त्यांची संगीत नाटकं तर लोकप्रिय झालीच पण त्यातील पदांनी आजपर्यंत मराठी मनाला भुरळ घातली आहे. संगीत सुवर्णतुला, पंडितराज जगन्नाथ, मंदारमाला , जावयाचे बंड, चमकला ध्रुवाचा तारा, जयजय गौरीशंकर ही संगीत नाटकं लोकप्रिय झालीच पण साक्षीदार, अमृत झाले जहराचे, मदनाची मंजिरी, स्वरसम्राज्ञी ही त्यांची पाश्चात्य कृतीवर आधारित असलेली संगीत नाटकं. तर बावनखणी हे पेशवे काळावर लिहिलेले संगीत नाटक. गझलसम्राट गालिब, शायरेआजम, शायरीचा शालिमार ही गालिबचे काव्य आणि गालिबचे चरित्र यावरील पुस्तके आहेत. तर फार्सी, उर्दू, हिदी, मराठी आणि संस्कृत कवींच्या कथा सांगणारे कविकथा हे त्यांचे पुस्तकही गाजले होते. शंकर सुखकर हो हा नाट्यविषयक संदर्भांचा संग्रह नाटकाबद्दल एक वेगळीच दृष्टी देऊन जातो. गोखले यांची लेखणी राजस, रसिकतेची साक्ष देणारी विविधांगी आणि प्रतिभावान अशीच होती. लोकसत्तेतले त्यांचे अग्रलेख हा उत्कृष्ट संपादनाचा, लेखनाचा एकेक नमुना होता. रंगशारदा ही संगीत नाटकांना प्राधान्य देणारी नाट्यसंस्था त्यांनी स्थापन केली. नाटकात नृत्ये योजण्याचा उपक्रमही त्यांनीच सुरू केला. मा.विद्याधर गोखले यांचे २६ सप्टेंबर १९९६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट/ ग्लोबल मराठी

      January 4, 2018


  • धनंजय कुलकर्णी

    बहुभाषिक धनंजय कुलकर्णी हे एक व्युत्पन्न लेखक होते. पेशाने ते इंग्लीशचे प्राध्यापक. अवघ्या दोन वर्षांपूर्वीच ते हैदराबाद येथील ' आचार्य नरेंद्र देव हिंदी ओरिएन्टल कॉलेज ' चे प्राचार्य म्हणून निवृत्त झाले होते. मात्र निवृत्तीनंतरही त्यांच्या वाचन आणि लेखनामध्ये जराही खंड पडला नाही.

    प्रदीर्घकाळ हैदराबादमध्ये वास्तव्य असणार्‍या कुलकर्णी यांचा मूळ पिंड हा साहित्यप्रेमीचा. मराठी ही त्यांची मातृभाषा, परंतु इंग्लीश हा त्यांचा कायमच
    अध्ययनाचा आणि अध्यापनाचा विषय होता. या दोन भाषांशिवाय त्यांना हिंदी, तेलुगु आणि कन्नड या भाषा चांगल्याप्रकारे अवगत होत्या. तेलुगुमधून त्यांनी काही कथा आणि एक कादंबरी असे लेखनही केलेच ; परंतु तेलुगुतील उत्तमोत्तम साहित्याचा मराठी वाचकांना परिचय करून देण्यासाठी त्या त्या साहित्यकृतींचा अतिशय समर्थ असा अनुवादही त्यांनी केला.

    हैदराबादमधील मराठी साहित्य परिषद, आंध्र प्रदेश या संस्थेशी त्यांचे जवळचे नाते होते. त्या संस्थेतर्फे प्रकाशित होत असलेल्या ' पंचधारा ' या त्रैमासिकाच्या संपादनात ते मनापासून भाग घेत. त्यांनी केलेल्या तेलुगुतील काही साहित्यकृतींचे अनुवाद ' पंचधारा ' मध्येच प्रकाशित झाले. अनेकवेळा ते माहितीपर अशी स्फूटेही त्या त्रैमासिकात लिहीत. हैदराबादमध्ये राहणार्‍या कुलकर्णी यांना मराठी भाषा आणि मराठी साहित्य याबाबत कमालीचे प्रेम होते. नव्याने प्रसिद्ध होणारे मराठी साहित्य ते आवर्जुन वाचत. त्यातल्या काही लेखकांशी त्यांचा पत्रव्यवहारही होता. आवडलेल्या साहित्यकृतीला मनमोकळी दाद देण्याचा उमदेपणा त्यांच्याकडे होता. त्यांचा बालपणातला काही काळ महाराष्ट्रात गेला होता. काही कथा किंवा लेख वाचल्यानंतर त्यांच्या मनातल्या बालपणातल्या रम्य आठवणी जाग्या होत आणि मग त्या आपल्याला का आठवल्या याचे कारण सांगत त्या आठवणींचा पट आपल्या पत्रातून अलगदपणं उलगडत त्या त्या लेखाचे किंवा कथेचे कौतुक करत. मराठी दैनिकंही ते बारकाई वाचत आणि नियमितपणं ताज्या घडामोडींवर अत्यंत सखोल असं लेखन करत.

    इंग्लीश आणि फिलॉसॉफी या दोन विषयांत एम.ए. आणि एम.फील. असणार्‍या कुलकर्णींच्या वागण्यात कमालीचा साधेपणा होता. निजामाच्या इतिहासाबद्दल त्यांना अदम्य कुतूहल होते. त्याचे चपखल संदर्भ त्यांच्या लेखनातून डोकावत. आंध्र प्रदेशमधील राजकारण, त्या राज्याचा इतिहास आणि तेथील संस्कृती या विषयांना धरून त्यांनी विपुल असे लेखन केले. अलीकडेच त्यांचे ' हैदराबादची चित्तर कथा ' हे पुस्तक मौज प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाले. ' महाराष्ट्र टाइम्स ' मध्ये त्यांनी सातत्याने लेखन केले.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


      August 8, 2017


  • मीनाक्षी शिरोडकर

    आचार्य अत्रेंनी त्यांचं ‘रतन’ हे नाव बदलून ‘मीनाक्षी’ केलं. अभिनेत्री नम्रता शिरोडकर आणि शिल्पा शिरोडकर या त्यांच्या नाती आहेत.

      July 23, 2017


  • संत कान्होपात्रा

    मंगळवेढे येथील शामा नायकिणीचे पोटी हिचा जन्म झाला, सौंदर्य व गोड गळा यामुळे आपला व्यवसाय मुलगी आणखी पुढे नेईल असे तिच्या आईला वाटे. पण कान्होपात्राचा ओढा ईश्वरभक्तीकडे होता. विठ्ठल भजनात ती रंगून जात असे. तिने रचलेले अभंग प्रसिद्ध आहेत. कान्होपात्राच्या सौंदर्यामुळे तिच्यावर संकटे आली पण दरवेळी विठ्ठलकृपेने ती बचावली.

    शेवटी बिदरच्या बादशहाकडून बोलावणे आल्यावर पांडुरंगाच्या चरणी देह ठेवून आपली इहलोकीची यात्रा संपवली.
    ## Sant Kanhopatra

      May 25, 2010


  • शंकर आत्माराम आपटे

    ठाणे येथील एक समाजसेवक. अनेक पुरस्कारांचे मानकरी …

      August 21, 2010


  • अभिनेता ओमी वैद्य

    अभिनेता ओमी वैद्य यांचा जन्म १० जानेवारी १९८२ रोजी युका व्हॅली, कॅलिफोर्निया, अमेरिका येथे झाला.

    ओमी वैद्य यांनी लॉस एंजेलिस काउंटी हायस्कूल फॉर आर्ट्समधून पदवी प्राप्त केली आणि नंतर कॅलिफोर्निया विद्यापीठ, सांताक्रूझ येथे शिक्षण केले. ओम वैद्य यांनी आपल्या कारकिर्दीत अभिनेता, दिग्दर्शक, संपादक, लेखक, दूरदर्शन प्रस्तुतकर्ता म्हणून काम केले आहे.

    3 इडियट्स या चित्रपटासाठी त्यांना स्टार डेब्यू मेल ऑफ द इयर पुरस्कार मिळाला. त्याला 3 इडियट्ससाठी 2010 चा लायन्स गोल्ड अवॉर्डही मिळाला होता. २०१० मध्ये त्यांना 3 इडियट्स या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकाराचा पुरस्कार मिळाला होता. 3 इडियट्स या चित्रपटा नंतर ओमी यांची लोकप्रियता प्रचंड वाढली. चतुर रामलिंगम हे पात्र रसिकांच्या प्रचंड पसंतीस पात्र ठरले होते.

    अरेस्टेड डेव्हलपमेंट, द ऑफिस, दिल तो बच्चा है जी, देसी बॉईज यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये ओमीने उत्कृष्ट भूमिका साकारल्या.

    सिनेमाच नाही तर ओमी वैद्य जाहिरातींमधूनही झळकत असतो. जाहीरातक्षेत्रातही ओमी फार लोकप्रियत बनला आहे.

    ओमी वैद्य यांनी ऑगस्ट २००९ मध्ये मीनल पटेल सोबत लग्न केले.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

      January 10, 2022


  • भेंडीबाजार घराण्याच्या सुप्रसिध्द गायिका अंजनीबाई मालपेकर

    अंजनीबाई मालपेकर भेंडीबाजार घराण्याच्या सुप्रसिध्द गायिका होत्या. त्यांचा जन्म २२ एप्रिल १८८३ रोजी झाला. अंजनीबाई मालपेकर यांनी नजीरखाँ व खादिमा, हुसेनखाँ या तीन भावांच्या कडून संगीताचे शिक्षण घेतले. राग `यमन’ हा भेंडीबाजार घराण्याच्या उस्ताद नजीरखाँनी अंजनीबाईंना शिकवलेला पहिला राग. त्याची तालीम साडेतीन वर्ष चालली होती. अंजनीबाईंचा `मध्यम’ स्वर एखाद्या ज्योतीसारखा कसा प्रज्वलित व्हायचा याचं वर्णन खुद्द कुमार गंधर्वांनी करून ठेवलं आहे. कुमार गंधर्व म्हणत असत, “देवधर मास्तरांच्या सांगण्यावरून अंजनीबाई मला शिकवायला तयार झाल्या. त्यावेळी त्यांचा प्रत्येक सूर चैतन्यानं पुलकित होऊन समोर येई. सुरांचं हे सामर्थ्य मी यापूर्वी कधी बघितलं नव्हतं.” अंजनीबाई मालपेकर ह्याचे शब्दलालित्य, सुंदर सांगीतिक आशय आणि लयीची गंमत यासाठी या घराण्यातील चिजा प्रसिद्ध होते. त्या बंदिश धृपद अंगाने म्हणत. खानेपुरी, मुखविलास, आलापी, बोल भरणे, खुलाबंद बोल, उचकसमेट, मींड, कणस्वर, लयीच्या अंगाने सुंदर सरगम करणे इ. त्यांचे गानविशेष म्हणता येतील. हेमराज नावाच्या कर्नाटकातील विख्यात वाद्यनिर्मात्यानं संपूर्ण आयुष्यात बारा-तेराच तंबोरे केले. पैकी एक तंबोरा त्यांनी अब्दुल करीम खाँना भेट दिला आणि दुसरा अंजनीबाईंना. अंजनीबाईंना कोणी भेटायला आलं की यमन रागातील चिज गुणगुणून त्या पाहुण्यांचं स्वागत करीत. भेंडीबाजार घराण्याचा खरा उत्कर्ष झाला तो अंजनीबाई मालपेकर आणि उस्ताद अमान अली खाँ यांच्या काळात. अंजनीबाईकडे बेगम अख्तर, नैनादेवी, कुमार गंधर्व, किशोरी आमोणकर यांच्यासारख्या अनेक मान्यवरांनी संगीताचे धडे घेतले. विदुषी अंजनीबाई मालपेकर यांनी आपल्या अतीव सुरेल स्वरलगावाने आणि लयीच्या समझदारीतून ही गायकी पेश केली. विदुषी अंजनीबाई यांची आग्रा-परंतु मुलायम गमक असलेल्या अशा-गायकीची दुर्दैवाने कुणीच दखल घेतली नाही.अंजनीबाई मालपेकर यांचे ७ ऑगस्ट १९७४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

      August 7, 2021


  • उदयराज गोडबोले

    गोडबोले, उदयराज
    भारतीय सांस्कृतिक जगतात १९३१ साली बोलणाऱ्या आणि ‘गाणाऱ्या’ चित्रपटांनी प्रवेश केल्यानंतर मराठी संगीत नाटकाच्या लोकप्रियतेला ओहोटी लागणे ही स्वाभाविक प्रतिक्रिया होती. बालगंधर्वासारख्या रसिकांच्या गळय़ातील ताईत बनलेल्या कलावंतालाही चित्रपटात भूमिका करणे क्रमप्राप्त ठरले होते. संगीत नाटक महाराष्ट्राच्या सांस्कृतिकतेचे एक व्यवच्छेदक लक्षण बनले असताना चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेने या नाटकांची आर्थिक स्थिती हलाखीची होणेही स्वाभाविक होते.

    नेमक्या याच काळात म्हणजे १९२५ साली उदयराज गोडबोले यांचा जन्म झाला. आयुष्यभर नाटकच करीन, अशी जणू प्रतिज्ञाच त्यांनी तारुण्यात घेतली आणि तिचे पालन करण्यासाठी येणाऱ्या सगळय़ा संधी नाकारत उदयराजांनी फक्त संगीत नाटकांतच भूमिका केल्या. त्यांच्या निधनाने संगीत रंगभूमीवरील एका ज्येष्ठ आणि तपस्वी कलावंताचा अंत झाला आहे. रंगभूमीच्या पडत्या काळात तिला पुन्हा सोनेरी दिवस यावेत, यासाठी प्रयत्न करणाऱ्या कलावंतांमध्ये गोडबोले यांचे स्थान महत्त्वाचे होते. चित्रपटांच्या झंझावातापुढेही संगीत रंगभूमी टिकवून ठेवण्यासाठी छोटागंधर्व, जयराम-जयमाला शिलेदार, चित्तरंजन कोल्हटकर, वसंतराव देशपांडे यांच्यासारखे बिनीचे कलावंत अथक प्रयत्न करीत होते. त्यांच्या या प्रयत्नांना रसिकांकडून पुरेसा प्रतिसादही मिळत होता. उदयराजांना संगीताचे बाळकडू घरातूनच मिळाले, कारण त्यांचे वडील दिनकर रामचंद्र गोडबोले सांगलीच्या संस्थानात दरबारी गायक होते. त्यांनी संगीताची विद्या अब्दुल करीम खाँ यांचे शिष्य जाधवबुवा यांच्याकडून घेतली होती. असे घराणेदार संस्कार असतानाही उदयराजांचे मन मात्र संगीत रंगभूमीकडेच जास्त होते. त्यामुळेच सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी छोटागंधर्वानी अजरामर केलेल्या ‘देवमाणूस’ या नाटकाचा प्रयोग केला आणि जाणकारांची शाबासकी मिळवली. त्याचमुळे असेल कदाचित, पण संगीत रंगभूमीवरील ठेकेदार पंडितराव तरटे यांनी त्यांना नाटकात भूमिका करण्याचे निमंत्रण दिले. उदयराजांच्या दृष्टीने जे हवे होते, तेच घडत होते. घरातूनही त्यांच्या या साहसाला विरोध झाला नाही. त्याच काळात त्यांना एका विमा कंपनीत नोकरी ‘चालून’ आली होती. पण गोडबोले यांचा निर्धार पक्का होता आणि त्यांनी रंगभूमीवरचे पाऊल मागे न घेण्याचे ठरवले. नागेश जोशी यांचे ‘फुलपाखरे’ हे त्यांचे पहिले नाटक. पण ते खऱ्या अर्थाने रसिकमान्य झाले, ते आचार्य अत्रे यांच्या ‘प्रीतिसंगम’ या नाटकामुळे! त्या नाटकातील त्यांची गोविंदबुवाची भूमिका खूपच गाजली. त्याच नाटकात त्यांनी गायलेल्या ‘देह देवाचे मंदिर’ या गाण्याने त्यांचे नाव सर्वतोपरी झाले. त्या नाटकातील गीतांच्या ध्वनिमुद्रिका एवढय़ा गाजल्या की, उदयराज गोडबोले म्हणजे ‘देह देवाचे मंदिर’ असे जणू समीकरणच झाले. ‘अशी बायको हवी’ हे त्यांचे नाटकही गाजले. त्याच वेळी चित्तरंजन कोल्हटकर, रेखा, चंद्रकांत गोखले यांच्यासारख्या कलावंतांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या नटराज थिएटर्सतर्फे ‘संगीत भावबंधन’चे प्रयोग सुरू झाले. उदयराजांना कशाचीच उसंत मिळेना. तरीही त्यांच्या मनात अभिजात शास्त्रीय संगीत शिकण्याची जिद्द होतीच. गाणे शिकायचे तर ते किराणा घराण्याचेच आणि त्यातील तेव्हाचे दिग्गज होते, पंडित भीमसेन जोशी. गोडबोले यांनी गुरुजींना विचारणा केली आणि त्यांचा गंडाच बांधला. त्या गंडाबंधनाच्या कार्यक्रमालाही कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे यांच्यासारखे अनेक मोठे कलावंत आवर्जून उपस्थित होते. भीमसेनजी आणि उदयराज या दोघांनाही सततचे दौरे असायचे. त्यामुळे उदयराजांना प्रत्यक्ष गाणे शिकण्याची संधीच मिळाली नाही. आपल्या विनोदी स्वभावाने उदयराजांनी आयुष्यात अनेक मित्र मिळविले. कोणत्याही कठीण प्रसंगाला धैर्याने तोंड देण्याची त्यांची क्षमता होती. कुणापुढेही आयुष्यात हात पसरायचे नाहीत, हे त्यांच्या जीवनाचे ब्रीदच होते. अशा ज्येष्ठ आणि लोकप्रिय कलावंताच्या निधनामुळे संगीताची आणि संगीत रंगभूमीचीही मोठी हानी झाली आहे.

      August 5, 2017