(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ठसकेबाज ‘वच्छी आत्या’ – वर्षा दांदळे

    वर्षाचे आजवरचे अनेक फोटो मी पहिले होते. वर्षातल्या अभिनेत्रीसोबतच तिच्यातल्या शिक्षिकेची बाजू एकाच छायाचित्रात मांडण्यासाठी हा फोटो महत्त्वाचा ठरणार होता. फोटो काढताना वर्षाला मी पूर्वकल्पना न देता केवळ या बोर्डाच्या बाजूला शिक्षिकेच्या पात्रात तुम्ही असाल तर कसे हावभाव असतील असं विचारून मी त्यांचे हे भाव टिपत होतो.

      March 25, 2019


  • मराठी नाट्यसंगीतातील गायक-अभिनेते छोटा गंधर्व

    ‘माझ्या आवाजाला शोभेल असं स्वत:चं गाणं मी बनवलंय. मी रंगभूमीवर कुणाचीही नक्कल करीत नाही. आय काण्ट इमिटेट एनी बडी बट आय फॉलो बालगंधर्व. त्यांचा जन्म १० मार्च १९१८ रोजी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे झाला.माझं गाणं माझ्या चिंतनातून आलं आहे. असा हा आध्यात्मिक प्रवृत्तीचा, कवी मनाचा, प्रसिद्धीपासून दूर असलेला आणि साधी राहणी असलेला अत्यंत मोठा कलाकार म्हणजे मा.छोटा गंधर्व! मा.छोटा गंधर्व यांचे खरे नाव सौदागर नागनाथ गोरे. बालगंधर्व यांच्यानंतर पुण्यस्मरण करावे असे रंगभूमीवरील व्यक्तिमत्त्व म्हणजे मा.छोटा गंधर्व. गोड आवाजाची निसर्गदत्त देणगी त्यांना मिळाली होती. मा.छोटा गंधर्व यांचे शिक्षण फारसे झाले नव्हते. बालनटांची नाट्यसंस्था म्हणून प्रसिध्द असलेल्या बालमोहन संगीत मंडळीचे मालक मा.दामूअण्णा जोशी हे गोड गळ्याच्या मुलांच्या शोधात असताना त्यांना सौदागरांची माहिती मिळाली आणि त्यांच्या आईवडिलांची समजूत घालून त्यांनी लहान मा.छोटा गंधर्वना, तसेच त्यांचा धाकटा भाऊ पीतांबर ह्याला आपल्या कंपनीत आणले. 'बालमोहन संगीत मंडळी'ने रंगभूमीवर आणलेल्या प्राणप्रतिष्ठा ह्या पहिल्याच नाटकात सौदागरांना त्यांची पहिली भूमिका मिळाली आणि तीही नायिकेची. पुण्याच्या विजयानंद नाट्यगृहात हा प्रयोग झाला. सौदागरांच्या सुरेल आवाजाने आणि गाण्याच्या आकर्षक मांडणीने प्रेक्षकांची मने जिंकली. 'बालमोहन'च्या अन्य काही नाटकांत कामे केल्यानंतर, ह्या संस्थेने सादर केलेल्या संशयकल्लोळ ह्या नाटकातल्या नायिकेची-रेवतीची त्यांनी केलेली भूमिका अतिशय गाजली. त्यांनी गायिलेल्या अनेक पदांना प्रेक्षकांकडून 'वन्स मोअर' मिळत. संगीतकलेत सौदागरांची अधिकाधिक प्रगती व्हावी म्हणून दामूअण्णांनी मा.छोटा गंधर्वना उत्तमोत्तम गायकांची तालीम मिळेल, अशी व्यवस्था केली. वसंतराव गोइत्रीकर, दत्तुबुवा बागलकोटकर, नरहरबुवा पाटणकर, धुळे येथील गायनशिक्षक पाध्येबुवा ह्यांनी त्यांना आरंभी गाणे शिकवले. सवाई गंधर्वांचीही थोडीशी तालीम मिळाली. कृष्णराव गोरे, कृष्णराव शेंडे, मा. दीनानाथ ह्यांचाही काही सहवास आणि मार्गदर्शन त्यांना मिळाले. मात्र १९३९ साली ग्वाल्हेर घराण्याचे गायक सेंदेखाँ ह्यांचा गंडा बांधून सौदागर त्यांच्याकडे शिकू लागले. हे लाहोरकडचे उत्कृष्ट गवई तेव्हा मुंबईत राहत होते. पुढे १९४४-४५ साली ते कोल्हापूरला असताना भूर्जीखाँ यांच्याकडे गाणे शिकले. अनेकांच्या गायकीचे अनुभव व संस्कार लाभल्यामुळे जेथे जे चांगले गवसेल, ते घेऊन आपल्या स्वतःच्या गायकीचे सुंदर रसायन त्यांना घडविता आले. नाटकाच्या व्यवसायाला १९३२-३३ च्या सुमारास वाईट दिवस आले होते आणि 'बालमोहन संगीत मंडळी'लाही ह्या परिस्थितीची झळ लागू लागली होती. तथापि आचार्य अत्र्यांसारखा प्रभावी नाटककार ह्या संस्थेच्या मागे उभा राहिल्यामुळे ही संस्था त्या आपत्तीतून बचावली. अत्र्यांचे पहिले नाटक साष्टांग नमस्कार 'बालमोहन'ने १९३३ साली रंगभूमीवर आणले. त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. ह्या नाटकात सौदागरांनी नायिकेची-त्रिपुरीची- भूमिका केली. त्यानंतरच्या घराबाहेर ह्या अत्रेकृत नाटकातील पन्दाभाच्या भूमिकेपासून त्यांनी स्त्रीभूमिका करणे सोडून देऊन नायकाच्या भूमिका करावयास आरंभ केला. साष्टांग नमस्कार आणि घराबाहेर नंतर भ्रमाचा भोपळा, लग्नाची बेडी, उद्याचा संसार, वंदे मातरम्, मी उभा आहे अशी नाटके 'बालमोहन'ने रंगभूमीवर आणली. ह्यात संस्थेला आर्थिक लाभाबरोबरच जी कीर्ती आणि प्रतिष्ठा मिळाली, ती मिळविण्यात सौदागरांचा वाटा मोठा होता. तथापि मी उभा आहे या नाटकानंतर अत्रे अन्य क्षेत्रांत मग्न झाल्यामुळे 'बालमोहन'चा एक मोठा आधार तुटला आणि संस्था चालवणे दिवसेंदिवस अवघड होऊ लागले. त्यामुळे 'बालमोहन'मधल्या काही प्रमुख नटांनी १९४३ मध्ये 'कला-विकास' ही नवी संस्था काढली. त्यांच्यांत सौदागरही होते. ह्या संस्थेतर्फे नाटककार नागेश जोशी ह्यांची फुलपाखरे, मैलाचा दगड, देवमाणूस, विजय ही नाटके सादर केली जाऊ लागली. त्यांतील मुख्य भूमिकांची आणि संगीताची बाजूही त्यांनी सांभाळली. ह्या संस्थेच्या नाटकांची पदेही देवमाणूस पासून सौदागर स्वतः लिहू लागले. ह्या नाटकातील 'चांद माझा हा हसरा' हे गाणे खूप लोकप्रिय झाले. 'कला-विकास' ही कालांतराने बंद पडल्यानंतर 'भारत नाट्यकला' ह्या संस्थेच्या सौभद्र (कृष्ण), विद्याहरण (कच), मानापमान (धैर्यधर) ह्या नाटकांतून त्यांनी नायकाच्या भूमिका केल्या. त्यांची कृष्णाची भूमिका सर्वाधिक लोकप्रिय ठरली. १९५१ नंतर ते ठेकेदारांनी करविलेल्या नाट्यप्रयोगांतून 'नाइट'वर कामे करू लागले. नाइट म्हणजे नटाला दर प्रयोगाला दिले जाणारे मानधन. त्या काळात छोटा गंधर्व संगीत नाटकाकरिता सर्वांत जास्त म्हणजे रु. १०००/- नाइट घेत असत. सौभद्र, विद्याहरण, मानापमान, मृच्छकटिक आणि संशयकल्लोळ ह्या नाटकांतूनच त्यांनी पंचविसांहून अधिक वर्षे प्रमुख भूमिका केल्या. सुरेल मुलायम आवाज, स्वच्छ दाणेदार ताना, सुंदर आणि स्पष्ट हरकती, मुरक्या, मिंड, सुरांचा प्रभावी लगाव, कमावलेला दमसास, मंद्रात खर्जापर्यंत जाणे ही त्यांच्या गायनाची प्रमुख वैशिष्ट्ये होत. त्यांच्या असामान्य गानकौशल्यामुळे 'स्वरराज छोटा गंधर्व' हे मानाभिधान त्यांना लाभले. मा.अनंत हरी गद्रे ह्या समाजसुधारकाने मधुर गळ्याच्या सौदागरला 'छोटा गंधर्व' हा किताब बहाल केला. निर्भीड या वृत्तपत्रात त्यांचा सर्वप्रथम छोटा गंधर्व असा उल्लेख केल्याचे आढळते. विद्याधर गोखले ह्यांच्या सुवर्णतुला ह्या नाटकात त्यांनी काम केले होते आणि त्यातील पदांना संगीतही दिले होते. नाट्यसंगीतासाठी शास्त्रीय संगीताची बैठक आवश्यक असून संगीतातील सर्व प्रकारचे सौंदर्य नेमकेपणाने टिपता आले पाहिजे; नाटकातील पदाचा आरंभ आणि त्याची अखेर आकर्षक असली पाहिजे; नाट्यसंगीतासाठी क्लिष्ट रागांची योजना करू नये; प्रेक्षकांच्या अंतःकरणापर्यंत सहजपणे भिडतील अशा संगीतरचना कराव्या, अशी त्यांची मते होती. त्यांच्याबरोबर संशयकल्लोळमध्ये रेवतीची भूमिका करणाऱ्या मा.इंदू मुळपुळे ह्यांच्याशी त्यांनी १९३७ साली विवाह केला. आवाज खराब असेल तर थेट नाट्यप्रयोग रद्द करणार्या या अवलियाला आपला उतारवयातला आवाज प्रेक्षकांना ऐकू नये असे वाटत होते. म्हणूनच १९७८ मध्ये स्वरवैभवाच्या शिखरावर असताना, छोटा गंधर्व यांनी नाट्यसंन्यास स्वीकारला. मुंबईत १९८० साली झालेल्या साठाव्या नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही त्यांना देण्यात आला होता.

    छोटा गंधर्व यांचे ३१ डिसेंबर १९९७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट
    मा.छोटा गंधर्व यांची काही गाणी
    अति कोपयुक्त होय परि
    आनंदें नटती
    कोण तुजसम सांग
    गणराजाला करू मुजरा
    गोविंद गोविंद
    चांद माझा हा हासरा
    छळि जीवा दैवगती अती
    जगाचे बंध कोणाला
    जलधर संगे नभ
    तू माझी माउली
    दिलरुबा मधुर हा दिलाचा
    दे हाता या शरणागता
    नच सुंदरि करूं कोपा

    https://www.youtube.com/shared?ci=fukcp9oRPyE

    https://www.youtube.com/shared?ci=DWuG-HiEEqI

      March 10, 2017


  • अभिराम भडकमकर

    पछाडलेला या चित्रपटा मध्ये “समीर” ची भूमिका अभिराम ने साकारलेली आहे.

      June 20, 2022


  • डॉ. एम.ए. वाहूळ

    एखाद्या माशाच्या शरीरात परोपजीवी घटक त्याला आतून खात असेल तर? तर या माशांची संख्या कमी होईलच, पण त्यावर अवलंबून असणारी अन्नसाखळीही रोडावेल. प्राणीशास्त्राचे संशोधक डॉ.एम.ए. वाहूळ यांचे संशोधन यादृष्टीने महत्त्वाचे आहे...

    डॉ.एम.ए. वाहूळ यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला माशांचा डॉक्टर हा लेख पुढील पानावर वाचा.

    डॉ.एम.ए. वाहूळ यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला माशांचा डॉक्टर हा लेख वाचा.

    wahul-dr-m-a-modified

      September 11, 2015


  • सर्वाधिक वयाचे निवृत्त हयात पोलीस अधिकारी विश्वेश्वर चटर्जी

    इंडियन पोलीस सर्व्हिस हे नावही ज्या काळात 'पोलीस सेवेला दिलं गेलं नव्हतं, त्या काळात पोलीस सेवेत वरिष्ठ पदावर रूजू झालेले आणि निवृत्त हयात पोलीस अधिकाऱ्यांमधले देशभरातले सर्वाधिक वयाचे ज्येष्ठतम पोलीस अधिकारी म्हणून गणले जाणारे विश्वेश्वर चटर्जी रविवारी काळाच्या पडद्याआड गेले. चटर्जी ब्रिटीश सत्ताकाळात पोलीस सेवेत दाखल झालेले १९४० च्या बॅचचे अधिकारी. त्या बॅचच्या अधिकाऱ्यांपैकी ९१ वर्षे वयाचे रणजीत गुप्ता हयात आहेत. बंगालमधल्या सेरामपूरमध्ये गुप्तांनी चटर्जीनंतर सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर म्हणून काम केले.

    स्वाभाविकपणेच चटर्जी गेल्याचे कळताच त्यांच्या आठवणी जागवल्या त्या गुप्तांनी. चटर्जी मूळचे अविभक्त बंगालचे. कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून पदवीधर झाल्यानंतर चटर्जी पोलीस सेवेत दाखल झाले. स्वातंत्र्यप्राप्तीच्या सुमारास चटर्जी कोलकाता पोलीस दलात उपायुक्त पदावर होते. हाझरातील अॅलेंबरी कंपनीतील कामगार आंदोलन हाताळण्याची जबाबदारी चटर्जीवर होती. चटर्जीनी ते आंदोलन कौशल्याने हाताळलेच, पण गुप्तचर खात्यात काम करीत असताना आपल्यातील अंगभूत नेतृत्वाची, राजकीय विश्लेषणाची आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांच्या चिकित्सक अभ्यासाची चुणूकही राज्यकर्त्यांना दाखवून दिली.

    १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर भारत-चीन सीमावर्ती भागासाठी स्वतंत्र रक्षक दल स्थापन करण्याचा विचार केंद्र सरकारने केला तेव्हा स्वाभाविकपणेच चटर्जीची निवड त्या दलाच्या प्रमुखपदासाठी करण्यात आली. हा सीमावर्ती भाग सव्वा दोन हजार किलोमीटरचा. त्याचं रक्षण करण्यासाठी लागणारं दल खरं तर कितीतरी मोठ्या संख्येचं. पण प्रारंभी अवघ्या चार बटालियन्सच्या जोरावर दलाचं काम सुरू झालं.

    आज लडाखमधल्या काराकोरम खिंडीपासून अरूणाचल प्रदेशातल्या दिफू ला पर्यंत या दलाचं कार्यक्षेत्र विस्तारलं आहे. माऊंटेनिअरिंग, डिझास्टर मॅनेजमेंटबरोबरच न्यूक्लिअर, बायॉलॉजिकल आणि केमिकल डिझास्टर्स हाताळण्याचं काम हे दल करतं. प्रारंभीच्या काळात इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दल नावानं ओळखल्या जाणाऱ्या या दलासाठी स्वंत्र महासंचालक नव्हताच. चटर्जीनी पहिलं दशकभर दलाचे महानिरिक्षक र चटर्जी म्हणून काम पाहिलं, पण या काळात आणि त्यानंतर त्यांनी इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलाला जो आकार दिला, जी दिशा दिली, तिनं भारताच्या सर्व सुरक्षा दलांमधलं मानाचं दल म्हणून इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दल ओळखलं जाऊ लागलं. १९६४ मध्ये एलिंट नावाचं एक गुप्तवार्ता अभियान चालवण्यात आलं. एलिंटचा अर्थ होता, 'इलेक्ट्रॉनिक इंटरसेप्ट अॅण्ड अॅनॅलिसिस ऑफ इंटेलिजन्स'. १६ ऑक्टोबर १९६४ ला चीननं आपल्या पहिल्या अण्वस्त्र उपकरणाची चाचणी केली. चीनची अण्वस्त्रक्षमता मोठ्या प्रमाणावर वाढल्याची धास्ती त्या घटनेनंतरच अमेरिका आणि भारताच्या मनात उत्पन्न झाली. चीननं ज्या ठिकाणी ही चाचणी केली ते ठिकाण इतकं सुदूर आणि आडबाजूला होतं की गुप्तचरांकडून त्याविषयीची माहिती सहजासहजी मिळणं शक्यच नव्हतं. सीआयएनं रॉ आणि एव्हिएशन रिसर्च सेंटरच्या सहकार्यानं 'एलिंट' हे शोध अभियान हाती घेतलं ते त्यासाठी. नंदादेवी शिखर मोहीमेच्या नावाखाली एम. एस. कोहली या गिर्यारोहकानं त्या शिखरावर एक शोध-उपकरण बसवायचा प्रयत्न केला. ते उपकरण बसलंही, पण पाठोपाठ हिमवादळ आलं आणि मोहीम अर्धवट सोडून तुकडीला परत यावं लागलं. पुन्हा एकदा तीच मोहीम हाती घेण्यात आली, पण उपकरण जे हरवलं ते हरवलंच. १९७४ मध्ये चटर्जी निवृत्त झाले. निवृत्तीनंतरचा बराचसा काळ त्यांनी सामाजिक सेवांसाठी घालवला. दक्षिण दिल्लीतील सत्यनारायण मंदिराचे ते संस्थापक होतेच पण रायसीना बंगाली स्कूलचेही ते तीन दशकांहून अधिक काळ अध्यक्ष होते. इंडियन माऊंटेनिअरिंग फाऊंडेशनशी त्यांचे निकटचे संबंध तेव्हापासून राहिले ते अखेरपर्यंत!

      July 27, 2010


  • पांडुरंग सदाशिव साने तथा साने गुरुजी

    साहित्यिक, समाजवादी नेते, समाजसुधारक पांडुरंग सदाशिव तथा साने गुरुजी यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी झाला.

    कला म्हणजे काय?, मानव जातीची कथा, राष्ट्रीय हिंदूधर्म, दिल्ली डायरी, ना खंत ना खेद याशिवाय भारताचा शोध, अनेक चरित्रपुस्तके, गोड गोष्टी, १४ अनुवादित ग्रंथ, भारतीय संस्कृती हा लेखसंग्रह. सुंदर पत्रे, पत्री तसेच श्यामची आई हे इतिहास घडवणारे पुस्तक, अशी त्यांची ग्रंथसंपदा.

    ११ जून १९५० रोजी त्यांचे निधन झाले.

    पांडुरंग सदाशिव साने तथा साने गुरुजी यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.

    पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी (3-Jan-2017)

    मराठी साहित्यिक पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी (11-Jun-2017)

    पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी (26-Dec-2017)

    Pandurang Sadashiv Sane alias Sane Guruji

      November 7, 2017


  • अभिनेते अंशुमन विचारे

    अंशुमन विचारे यांनी खुप कमी वेळात आपल्या अभिनयाच्या जोरावर आपली वेगळी ओळख बनवली आहे. त्यांचा जन्म १३ नोव्हेंबर रोजी झाला. ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘फू बाई फू’ अशा कार्यक्रमांतून छोटा पडदा गाजविणारा, तसेच अनेक चित्रपट, मालिका व नाटकांतून विविध प्रकारच्या भूमिका साकारणारा अभिनेता अंशुमन विचारे दूरदर्शन वरील "चालता बोलता" आणि जी मराठी वरील "फु बाई फु" या कार्यक्रमातून तो घरा घरात पोहचला. "फु बाई फु" च्या एका पर्वाचे तो विजेते ठरला होता. त्यांनी "हंगामा", "स्वराज्य - मराठी पाऊल पडते पुढे", "संघर्ष", "पोस्टर बॉयज" आणि "परतु" या चित्रपटातून अभिनय केला आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 13, 2018


  • माजी पंतप्रधान गुलजारीलाल नंदा

    गुलजारीलाल नंदा मुंबई विधानसभा मतदारसंघाचे सन १९३७ ते १९३९ व १९४७ ते १९५० या काळात आमदार राहिले. त्यांनी श्रम आणि आवास मंत्रालयाचा कार्यभारदेखील सांभाळला. नॅशनल ट्रेड युनियनची स्थापनाही त्यांनी केली.

      July 20, 2025


  • पद्मा चव्हाण

    अभिनयासाठी आवश्यक असलेले बोलके डोळे, क्षणाक्षणाला चेहऱ्यावरती बदलणारे भाव व आकर्षक व्यक्तीमत्व हे सर्व गुण त्यांना लाभले होते. १९५९ मध्ये भालजी पेंढारकर यांनी ‘आकाशगंगा’ नामक चित्रपट तयार केला होता. त्या चित्रपटात त्यांना भूमिका मिळाली आणि त्यांचा चंदेरी दुनियेत प्रवेश झाला.

      July 23, 2017


  • अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर

    मराठी नाटकांमध्ये अभिनय करत असताना असताना इंग्लिश चित्रपट हिंदी मध्ये डबिंग करण्याची संधी मिळाली. त्यामध्ये फ्रोझन या इंग्लिश अनिमेटेड चित्रपटाला ‘ॲ‍ना’ या पात्राला आवाज देण्याची संधी मिळाली. या चित्रपटानंतर त्यांनी ‘बिग हिरो 6’ या चित्रपटातील एका पात्रा ला सुद्धा आवाज दिलेला आहे.

      June 21, 2022