जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
दिलीप वेंगसरकर यांचा जन्म ६ एप्रिल १९५६ रोजी महाराष्ट्र राज्यात राजापूर येथे झाला. भारतीय क्रिकेट खेळाडू आणि व्यवस्थापक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांच्या काळात अतिशय वैशिष्ट्यपूर्ण शैली असलेले फलंदाज म्हणून ते प्रसिद्ध होते. अतिशय तडाखेदार आणि उत्तम फटके मारणारे फलंदाज म्हणून ते गौरविले गेले होते.
February 4, 2010
प्रसिद्ध हिंदी गीतकार मा. हसरत जयपुरी यांचे खरे नाव इक्बाल हुसेन होते. हसरत जयपुरी हे जयपुरचे. त्यांचा जन्म १५ एप्रिल १९१८ रोजी झाला. कॉलेज मधे असताना शेरोशायरी चा जबरदस्त नाद लागला आणि हसरत जयपुरी या टोपण नावाने प्रसिध्द झाले.
हसरत जयपुरी हे जयपुरहून मुंबईत आल्यावर उदर निर्वाहासाठी बेस्टमधे कंडक्टर ची नोकरी स्विकारली. ते ऑपेरा हाऊस समोर खेळणी विकत असत. एके दिवशी म्युनिसीपालटीने त्यांची गाडी जप्त केली. अश्या अनेक अडचणीला तोंड देत असताना हिम्मत हारली नाही. कवी संमेलन, मुशायरा यात भाग घेतच राहीले. असाच एक मुशायरा असताना त्या ठिकाणी पृथ्वीराज आणि राजकपूर आले होते. हसरत यांची शायरी ऐकून प्रभावित झालेल्या पृथ्वीराज कपूर यांनी आपल्या नाटक कंपनीत यायचे आमंत्रण दिले. इथे त्यांचे राजकपूर बरोबर सूर जुळले. राजकपूरच्या पहिल्या सिनेमात आग मधे त्यांना गाणे लिहायला मिळाले नाही. पण बरसात मधे त्यांची गाणी सर्वप्रथम सिनेमात आली. त्याचे पहिले गाणे जीया बेकरार है रेकॉर्ड झाले तेव्हा ते सुपर सिनेमात बुकिंग क्लँर्क होते. बरसात पासून शैलेंद्र, हसरत, शंकर, जयकिशन अशी विलक्षण चौकट जमली आणि राजकपूर चा परिस स्पर्श लाभला आणि ही चौकट रसिकांच्या मनात घट्ट बसली. बरसात ते कल आज और कल पर्यंत आर.के.फिल्म च्या प्रवासात शैलेंद्र आणि हसरत यांची घनीष्ट मैत्री शैलेंद्र च्या जाण्यापर्यंत अतूट होती. शंकर जयकिशन ते राहूल देव बर्मन पर्यैत असंख्य रोमँन्टीक रचना त्यांनी केल्या .त्यांचे सुपुत्र अख्तर जन्मल्यावर त्यांना पहायला गेले असताना अख्तर च्या डोळ्याकडे पाहून त्यांना सुचलेले तेरी प्यारी प्यारी सुरतको कितीतरी वर्षे रसिकांच्या ओठावर होते. त्यांच्या बहिणीचे लग्न ठरवताना आलेल्या अडचणी मुळे तिला नैराश्य आले. तिला यातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी लिहीले सुनो छोटीसी गुडियाकी लंबी कहानी, कॉलेज मधे असताना राधा नावाच्या हिंदू प्रेयसीला लिहीलेले यह मेरा प्रेमपत्र पढकर गीत संगम मधे आले. मा. हसरत जयपुरी यांनी ६५ पेक्षा अधिक संगीतकारांबरोबर काम केले. मा. हसरत जयपुरी यांनी सगळ्यात जास्त गाणी संगीतकार शंकर जयकिशन यांच्या साठी केली. बहारों फूल बरसाओ मेरा महबूब आया है' व में 'जिंदगी एक सफर है सुहाना' या गाण्यांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला
हसरत जयपुरी यांनी आपल्या कारकिर्दीत ३०० हून अधिक चित्रपटात २००० पेक्षा जास्त गीते लिहिली. जयकिशन आणि गीतकार हसरत जयपुरी यांची अभेद्य जोडी होती. हसरतसाहेबांच्या लेखणीतून प्रणयी गीतांचा जणू ओघच चालू असायचा आणि जयकिशन त्या गीतांना अशा काही आकर्षक चाली लावीत, की ऐकणारा बाकीचे सगळे विसरून गीत ऐकत बसत असे याचा. जयकिशन यांच्या कन्या आणि मुंबईच्या अग्रगण्य फॅशन डिझायनर भैरवी जयकिशन यांनी आपल्या वडिलांचे वर्णन करताना म्हटले आहे की, माझे वडील ज्या पद्धतीने जीवन जगले त्याच्याच आधारे हसरत जयपुरींनी ‘अंदाज’मधील (१९७१) ‘जिंदगी एक सफर है सुहाना, यहा कल क्या हो किसने जाना’ हे शीर्षकगीत लिहिले.
हसरत जयपुरी यांचे १७ सप्टेंबर १९९९ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
हसरत जयपुरी यांची काही गाणी
https://www.youtube.com/watch?v=6yruKPUqlno&vl=hi
https://www.youtube.com/watch?v=obQogKMYn0c
https://www.youtube.com/watch?v=CmK-CaDdQRI
April 17, 2017
शंकरबापू आपेगावकर यांचा जन्म अंबाजोगाई तालुक्यातल्या आपेगाव या छोट्या गावात झाला. लहानपणापासूनच त्यांना पखवाज वाजवायचा नाद होता. शंकरबापू आपेगावकर हे राष्ट्रीय ख्यातीचे पखवाजवादक होते. ते वारकरी प्रकारचे सुद्धा पखवाजवादन करीत. त्यांचा १९८६ मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला होता. शंकरबापू आपेगावकर यांचे मूळ नाव शंकर शिंदे होते.
शंकरबापू आपेगावकर यांचा मुलगा उद्धवबापू आपेगावकर हे ही पखवाजवादक आहे. शंकरबापू आपेगावकर यांचे निधन ९ जानेवारी २००४ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 9, 2019
दांडेकर, दिलीप
मराठी उद्यमशीलता वाढविण्या-जोपासणाऱ्या महाराष्ट्रातील मोजक्या कुटुंबांमध्ये दांडेकरांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. स्वदेशी चळवळीतून प्रेरणा घेऊन काकासाहेब दांडेकरांनी गिरगावातील एका छोटय़ा खोलीत ‘उंट’ छाप शाई तयार करण्याच्या व्याप सुरू केला. १९३० सालचा काळ. महिन्याकाठी ४५ ते ५० रुपये मिळत. आज त्यांनी लावलेले हे रोपटे ४०० कोटी रुपयांची उलाढाल करणाऱ्या आणि बहुराष्ट्रीय पसारा असलेल्या उद्योगवृक्षाच्या रूपात फोफावले आहे.शालोपयोगी स्टेशनरी आणि रंगसाहित्याची विविध २००० उत्पादने आणि देशभरात ५० हजाराहून अधिक विक्रेत्यांचे जाळे असलेल्या आजच्या ‘कॅम्लिन’चा भार अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक या नात्याने दिलीप दांडेकर सांभाळत आहेत.
औद्योगिक संस्कृतीची उपासना करताना गुणवत्ता, प्रामाणिकता, पारदर्शकता, नम्रता अशा सुसंस्कृतपणाची जपणूक करणे, असा मेळ आजच्या उद्योगसंस्कृतीत विरळाच आढळतो. उद्योगजगताची शिखर संघटना इंडियन मर्चंट्स चेंबरच्या अध्यक्षपदी त्यांची झालेली निवड म्हणजे त्यांच्या उद्योजकीय कर्तबगारीबरोबरीच त्यांच्या संयमी व शांत नेतृत्वगुणाची घेतली गेलेली स्वाभाविक दखल होय. घरचा उद्योग असतानाही दिलीप दांडेकर यांनी कॅम्लिनमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून नोकरी करीत आपली कारकीर्द सुरू केली. त्यांनाही इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे महिन्याकाठी त्याच श्रेणीचे वेतन मिळत असे. कॅम्लिनच्या सर्व विभागांमध्ये अशा तऱ्हेने रीतसर प्रशिक्षण पूर्ण करून, कामाचे बारकावे शिकून मगच अधिकारपदाची सूत्रे हाती घेतली, असे ते अभिमानाने सांगतात. दिलीप दांडेकर यांनी कंपनीचा मार्केटिंग विभाग सांभाळायला घेतला आणि कॅम्लिन या ब्रॅण्डला खऱ्या अर्थाने बहर आला. नवनवीन उत्पादने, तीही बडय़ा बहुराष्ट्रीयकंपन्यांशी स्पर्धा करीत बाजारात आणणे आणि विविध उपक्रमांद्वारे ग्राहकांच्या नजरेसमोर सतत भिरभिरत राहणे ही कॅम्लिनच्या यशाची गुरुकिल्ली त्यांच्याच कल्पकतेतून पुढे आली. बालचित्रकारांपासून, व्यावसायिक चित्रकारांपर्यंत सर्वांपर्यंत पोहचता येईल अशी कमावलेली सर्वसमावेशक ब्रॅण्ड इक्विटी मग कार्यशाळा, स्पर्धा, प्रदर्शने या माध्यमातून उत्तरोत्तर वृद्धिंगत होत गेली. आर्थिक उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या झंझावातात स्पर्धेचे आव्हान ज्यांना पेलता आले ते टिकून राहिले. अन्यथा अनेक नावाजलेले उद्योग आणि ब्रॅण्ड्स पाल्यापाचोळ्यासारखे उडून गेले. अनेकांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांशी हातमिळवणी केली. स्पर्धेत मारले जाण्यापेक्षा मोठय़ा प्रवाहात सामील होऊन जिवंत राहण्याचा हा पर्याय कॅम्लिनपुढेही आला होता. पण खुल्या आर्थिक धोरणाने निर्माण केलेल्या स्पर्धेला आव्हान नव्हे तर संधी मानून दिलीप दांडेकर यांनी वाटचाल सुरू ठेवली. कॅम्लिनशी स्पर्धेत उतरलेल्या बडय़ा बहुराष्ट्रीय कंपन्यांना त्यांच्याच देशात जाऊन आव्हान निर्माण करणारा आक्रमक बाणाही त्यांनी दाखविला. आज कॅम्लिनच्या उत्पादनांची निर्यात युरोप-अमेरिकेत सातत्याने वाढत आहे, तर देशांतर्गत बाजारातही किंमत व गुणवत्तेत ती बिनतोड ठरली आहेत. चीन आणि कोरियातून २० टक्के कमी खर्चात उत्पादने घेऊन बाजारपेठेत टिकाव धरून राहण्याची किमया खुलीकरणाच्या धोरणामुळेच शक्य झाली, असे तेच सांगतात. पिढीजात उद्योगाची धुरा वाहत असताना, काळानुरूप बदल वेळच्या वेळी स्वीकारणे किती आवश्यक आहे, याचा वस्तुपाठच त्यांनी दिला आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, फिक्की, इंडियन र्मचट्स चेंबर आणि अन्य अनेक उद्योगसंघटनांच्या व्यासपीठांवरून काम करताना, त्यांनी नवउद्योजकांना प्रेरक असा उद्योगशीलतेचा कानमंत्र दिला आहे. वाळवंटातही अथक प्रवास करणे हा उंटाचा गुणधर्म, आपल्या उत्पादनांसाठी उंट छाप निवडताना काकासाहेबांनी डोळ्यासमोर ठेवला होता. भरपूर मेहनत, सचोटीचा व्यवहार आणि प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगण्याची निश्चयी वृत्ती या पायावर दांडेकर कुटुंबीयांच्या प्रत्येक पिढीने हा व्यवसाय वाढवीत नेला. भविष्यातही कॅम्लिनच्या विस्ताराच्या योजना तयार आहेत, दांडेकर कुटुंबाची तिसरी पिढी राजीव, दीपक, श्रीराम व आशीष त्या साकारायला समर्थ आहे.
August 5, 2017
अणुचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा असे ठाम मत संयुक्त राष्ट्रच्या सभेत मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक. डॉ. भाभा यांनी पाया रचला म्हणूनच भारताने अनेक ठिकाणी अणु भट्या सुरू करून त्यांचा विज निर्मितीसाठी उपयोग केला तसेच १८ मे १९७४ रोजी भारताने पोखरण येथे पहिला अणुस्फोट घडवून आणला.
October 30, 2021
मराठी चित्रपटातील खाष्ट सासू आणि करारी स्त्री, थोडी आधुनिक तर कधी हेखेखोर अशा भूमिकांची आठवण होताच डोळ्यासमोर नाव उभं रहातं ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे.
दया डोंगरे यांचा जन्म ११ मार्च १९४० रोजी झाला.
मा.दया डोंगरे यांना गायिका व्हायचे होते. नागेशबुवा खळीकर यांच्याकडे काही काळ शास्त्रीय संगीत तर मा.हरिभाऊ देशपांडे यांच्याकडे त्या नाटय़संगीतही शिकल्या. त्या अवघ्या १२ वर्षांच्या असताना आकाशवाणी धारवाड केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात खास त्यांचे गाणे सादर झाले होते. आकाशवाणीने आयोजित केलेल्या अखिल भारतीय सुगम संगीत स्पर्धेत त्यांचा प्रथम क्रमांक आला. या पुरस्काराचे वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले त्या वेळी त्या १९ वर्षांच्या होत्या. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. अभिनयाने त्यांच्या गाण्यावर मात केली आणि गाणे मागे पडले. तसे झाले नसते तर आज कदाचित मा.दया डोंगरे यांचे नाव ज्येष्ठ गायिका म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित झाले असते.
दया डोंगरे आजही दररोज सकाळी अर्धा ते पाऊण तास रियाज करतात. आपल्या वडिलांच्या बदलीच्या नोकरीमुळे मा. दया डोंगरे यांचे शिक्षण काही काळ धारवाड, त्यानंतर पुणे व दिल्ली येथे झाले. शाळेच्या स्नेहसंमेलनात त्या उत्साहाने भाग घेत असत, पण ते तेवढंच. अभिनयाचा वारसा त्यांना आपल्या आई मा.यमुताई मोडक यांच्या कडून मिळाला. मा.यमुताई मोडक यांनी त्या काळात हौशी रंगभूमीवर ‘किचकवध’, हाच मुलाचा बाप’ आदी नाटकातून काम केले होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मा. दया डोंगरे यांची आत्या मा.शांता मोडक या त्या काळच्या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांनी बालगंधर्वाच्या नाटक कंपनीत त्यांना नाटकातून काम केले होते. मा.शांता मोडक यांना त्या काळी दामुअण्णा मालवणकर यांनी एक हजार रुपये पगार दिला होता. त्यांचा वारसा चालवायची संधी मा.दया डोंगरे यांना होती. पण त्यांनी आत्याच्या ओळखीचा कधी शिडी म्हणून वापर केला नाही. महाविद्यालयीन जीवनात मा.दया डोंगरे यांनी विशेष चमक दाखविली. सरकारी नाट्यस्पर्धेत मो. ग. रांगणेकर लिखित "रंभा' या नाटकात त्यांनी इतके अप्रतिम काम केले की त्यांना त्यासाठी प्रशस्तिपत्र मिळाले. पुण्यात आल्या नंतर मग मॉडर्न हायस्कूल व फर्ग्युसन महाविद्यालय येथे त्यांचे शिक्षण झाले. त्याच काळात त्यांनी पुरुषोत्तम करंडक स्पर्धाही गाजवल्या होती. अर्थातच महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्या दिल्लीत "एनएसडी'मध्ये नाटकाचे उच्च शिक्षण घेण्यासाठी दाखल झाल्या, पण त्या वेळी त्यांनी संसारातही प्रवेश केल्याने त्यांना आपले शिक्षण एका वर्षातच आटोपते घ्यावे लागले. याच काळात सई परांजपे, सुधा शिवपुरी आणि विनायक चासकर ही मंडळी "एनएसडी'मध्ये दाखल झाली होती. तेथील शिक्षणानंतर सई परांजपे आणि अरुण जोगळेकर यांनी नाट्यद्वयी या संस्थेमार्फत विविध नाटकांचे प्रयोग सुरू केले. त्यात मा.दया डोंगरे काम करत असत. तुझी माझी जोडी जमली रे, नांदा सौख्य भरे, याचसाठी केला होता अट्टहास, इडा पिडा टळो यांसारख्या नाटकांत दया डोंगरे यांनी आपली चमक दाखवली होती.
दया डोंगरे यांच्या घरात त्यांच्या वडिलांना गायन-वादनाची हौस होती. त्यांचे पणजोबा कीर्तनकार होते. १९६९ च्या सुमारास त्या मुंबईला आल्या आणि मग त्यांची व्यावसायिक रंगभूमीवर घोडदौड सुरू झाली. नाट्यमंदिर या संस्थेने विद्याधर पुंडलिकाचे "माता द्रौपदी' हे नाटक रंगमंचावर आणले होते. यातील द्रौपदीची भूमिका विजया मेहता करत, तर गांधारीची भूमिका दया डोंगरे. दोन कसलेल्या अभिनेत्रींची ही झुंज पाहण्यासारखी असे. दुर्दैवाने या नाटकाचे फारसे प्रयोग झाले नाहीत. पण त्यानंतर आलेल्या "लेकुरे उदंड झाली' या नाटकाने मात्र दया डोंगरे यांचा चाहता वर्ग वाढला आणि त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. श्रीकांत मोघे यांच्याबरोबर त्या यामध्ये काम करत. त्यानंतर आले ते "संकेत मीलनाचा' हे वेगळ्या विषयावरची परकीय संकल्पनेवरचे नाटक तेही गाजले. मा.दया डोंगरे यांनी नाटक सुरू असतानाच दूरदर्शनवर काम करणे सुरू केले. त्या वेळी आजच्या इतक्याग वाहिन्या नव्हत्या. मात्र दिल्ली दूरदर्शनवरही त्यांनी हिंदी मालिकांमध्ये काम केले होते. मुंबईत आल्यावर नाटकांची घोडदौड सुरू झाली होतीच, पण त्या वेळी मुंबई दूरदर्शनची सुरवात होती. मा.दया डोंगरे यांच्या अभिनयप्रवासात मुंबई दूरदर्शनवरील ‘गजरा’ या कार्यक्रमाला विशेष स्थान आहे. मा.सुरेश खरे यांचे लेखन आणि दया डोंगरे यांचे निवेदन त्यात असायचे. या कार्यक्रमानेही खूप प्रसिद्धी मिळवून दिल्याचे त्या सांगतात. मराठी प्रेक्षकांबरोबरच अमराठी लोकांमध्येही हा कार्यक्रम लोकप्रिय होता. निखळ विनोद आणि करमणूक असे त्याचे स्वरूप होते. या कार्यक्रमामुळे ‘गजरा क्वीन’ अशी त्यांना ओळख मिळाली. याबाबतची एक आठवण सांगताना त्या म्हणतात, एकदा ग्रॅण्ट रोड येथे जाण्यासाठी मी माटुंगा रोड स्थानकात आले. स्थानकातील पादचारी पूल उतरत असतानाच गाडी सुटली. मला ती गाडी मिळणे शक्यच नव्हते. पण काही क्षणातच गाडी थांबली आणि मला त्याच गाडीत चढायला मिळाले. ही किमया ‘गजरा’ कार्यक्रमाने घडविली होती. धावतपळत उतरूनही मला गाडी पकडता आली नाही हे गाडीच्या मोटरमनने पाहिले. त्या अमराठी मोटरमनला ‘गजरा’ कार्यक्रमामुळे मी परिचित होते. केवळ त्या ओळखीमुळे त्यांनी सुरू झालेली गाडी काही क्षण पुन्हा थांबविली आणि ‘मॅडम मैं आपका प्रोग्रॅम देखता हूँ, हमें अच्छा लगता हैं’अशी त्यांची दादही मिळाली. मा.ललिता पवार यांच्यानंतर महाराष्ट्रात ‘सासू’ म्हणून दया डोंगरे यांचेच नाव घेतले जाते. दया डोंगरे म्हणजे ‘खाष्ट सासू’ असे समीकरण तयार झाले. सचिन पिळगावकर यांच्या ‘मायबाप’ या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा ‘सासू’ साकारली. ‘खटय़ाळ सासू नाठाळ सून’ किंवा दूरदर्शनवरील ‘आव्हान’ या मालिकेतील त्यांची ‘सासू’ गाजली. करडा आवाज, डोळ्यांतील जरब आणि अभिनयकौशल्याच्या जोरावर सर्वसामान्य प्रेक्षकांना मनात आपल्याविषयी भीती, तिरस्कार निर्माण करण्यात त्या यशस्वी ठरल्या. ती त्यांच्या अभिनयाला मिळालेली पावती होती. ‘सासू’ साकारताना माझ्या डोळ्यांपुढे कोणीही नव्हते किंवा मी कोणाचे अनुकरणही केले नाही. मी माझ्या पद्धतीने ‘सासू’ साकारली, असे त्या आपल्या मुलाखतीत सांगतात. अभिनेता चिन्मय मांडलेकर याने ‘मी लहान असताना मला तुमच्या डोळ्यांची खूप भीती वाटायची’ असे सांगितल्याची आठवण त्या सांगतात. ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘उंबराठा’, ‘कुलदीपक’, ‘आत्मविश्वास’ हे त्यांचे आणखी काही चित्रपट. दूरदर्शनवरच अधिकारीबंधूंच्या ‘बंदिनी’ मालिकेत तसेच ‘वेडय़ांचा बाजार’मध्ये मी वृद्ध स्त्रीची भूमिका केली. आजवर रंगविलेल्या खाष्ट, दुष्ट आणि कजाग ‘सासू’पेक्षा या भूमिका वेगळ्या होत्या. कोणतीही भूमिका करताना कलाकाराला त्या भूमिकेत शिरण्याबरोबरच बाहेरही पडता आले पाहिजे. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींच्या निरीक्षणातून मी माझ्या ‘भूमिका’ रंगविल्या असे त्या म्हणतात. दूरदर्शनवरच्या ‘स्वामी’ मालिकेत त्यांनी साकारलेल्या ‘गोपिकाबाई’ आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे मार्गदर्शन आणि गजानन जहागीरदार यांचे दिग्दर्शन यातून एक छान मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळाली. मराठीप्रमाणेच हिंदीत त्यांनी काम केले. जब्बार पटेल यांच्या ‘सुबह’ (मराठीतील उंबराठा), अमोल पालेकर यांच्या ‘आश्रय’मध्ये त्या होत्या. "मायबाप' चित्रपट असो, की "खट्याळ सासू नाठाळ सून' असो किंवा "उंबरठा'सारखा वेगळा चित्रपट असो या सगळ्यात दयाबाईंची भूमिका छोटी असो की मोठी त्या लक्षात राहायच्याच. तेच तर त्यांचे वैशिष्ट्य होते. सचिन दिग्दर्शित "आत्मविश्वाचस' चित्रपटात तर त्या वेगळ्या भूमिकेत होत्याच, पण त्याच्या आधीच्या "नवरी मिळे नवऱ्याला' या चित्रपटातील करारी स्त्रीचे त्यांचे रूप अनेकांच्या आजही स्मरणात आहे. गजानन जहागीरदार यांना दिग्दर्शित केलेल्या "स्वामी' मालिकेत त्यांनी माधवरावांच्या आई गोपिकाबाईंचे काम केले होते. त्यातील त्यांचा करारीपणा अनेकांना आवडला होता. ‘नकाब’ चित्रपटात ऋषी कपूरच्या तर ‘दौलत की जंग’ चित्रपटात आमिर खानच्या आईची भूमिका त्यांनी केली. पण हिंदीत त्या विशेष रमल्या नाहीत. नाटक चित्रपट आणि मालिका यामधून त्यांनी लीलया काम केले असले तरी त्या रमल्या खऱ्या रंगभूमीवरच. वसंत कानेटकरांच्या "माणसाला डंख मातीचा' या नाटकात त्यांनी सुप्रियाची भूमिका साकारली होती. ही अवघड भूमिका त्यांनी इतक्याट प्रभावीपणे केली, की खुद्द कानेटकरांनी माझ्या डोक्याातलं सुप्रियाचं पात्र तुम्ही सही सही उभं केलंत अशी पावती दिली. नाटकककाराने अशी पावती देणं हे सन्मानाचंच, दया डोंगरे यांनी असा सन्मान खूप वेळा मिळवला होता. कारण त्यांच्या अभिनयाची तेवढी ताकद आणि त्यांची तितकी गुणवत्ता आहे. आजच्या पिढीला मा.दया डोंगरे यांची ओळख आहे ती त्यांनी साकारलेल्या सासूच्या भूमिकेचीच. खाष्ट सासू किंवा करारी स्त्री अशाच भूमिका त्यांच्याकडे त्या काळात आल्या. खरं तर त्यांच्या अभिनयाची रेंज ही तेवढ्यापुरती मर्यादित नव्हती, तर विविध व्यक्तिरेखा समर्थपणे करणाऱ्या या अभिनेत्रीचे चीज मराठी चित्र आणि नाट्यसृष्टीने केले नाही. त्यांना मायबापमधील भूमिकेसाठी महाराष्ट्र शासनाचा विशेष अभिनेत्रीचा पुरस्कार, तसेच नाट्यदर्पण प्रतिष्ठानचा विशेष पुरस्कार मिळाला होता. १९९० मध्ये ‘चार दिवस सासूचे’ हा त्यांनी केलेला शेवटचा चित्रपट. ‘एण्ड्रोपियॉन’ या डोळ्यांच्या आजारामुळे त्यांना सक्तीची निवृत्ती पत्करावी लागली. बसमधून एकदा प्रवास करताना बसच्या वाहकाने, ‘लेकुरे उदंड जाली’ हे नाटक मी २५ वेळा पाहिले’ किंवा ‘काय दुष्ट बाई आहे ही, अशा बाईच्या घरात कोण मुलगी आपली सून म्हणून देईल,’ अशी पुण्यातील एका नाटय़प्रयोगाच्या वेळी मिळालेली प्रतिक्रिया त्यांना अधिक मोलाची वाटते. माझ्या सुदैवाने मला चांगले नाटककार, दिग्दर्शक आणि सहकलाकार मिळाले, याचाही त्या आवर्जून उल्लेख करतात.
‘मंतरलेली चैत्रवेल’ या नाटकाचा विषय निघाला की त्या आजही हळव्या होतात. सातारा येथील नाटकाचा प्रयोग आटोपून सर्व मंडळी कोल्हापूरला पुढील प्रयोगाठी बसने जात होती. या बसला भीषण अपघात झाला. अपघातातून दया डोंगरे वाचल्या पण त्यांचे सहकलाकार जयराम हर्डीकर आणि शांता जोग यांचा त्या अपघातात मृत्यू झाला. ही आठवण व तो प्रसंग आजही त्यांच्या अंगावर काटा आणतो.
दया डोंगरे यांना दोन विवाहित कन्या. संगीता व अमृता.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
दया डोंगरे यांची नाटके व चित्रपट - मंतरलेली चैत्रवेल, रंभा, वैदेही, लेकुरे उदंड झाली, संकेत मीलनाचा, चिं. सौ. कां. चंपा गोवेकर, अमानुष,
चित्रपट- नवरी मिळे नवऱ्याला, मायबाप, उंबरठा, आश्रय, जुम्बीष,
March 12, 2017
‘पहाटगाणी’, ‘अक्षयगाणी’ ‘एक धागा सुखाचा’ ‘गीत रामायण’ ‘तो राजहंस एक’ आणि ‘शब्दस्वरांचे इंद्रधनुष्य’ हे त्यांचे कार्यक्रम विशेष गाजले आहेत.
July 4, 2022
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १९४० साली भेटून पुढे त्यांच्या काही सभांमध्ये गाण्याची संधी वामनदादांना मिळाली होती.
July 27, 2017
हिंदी चित्रपटांमध्ये अभिनयाची तहज़ीब आणि तरक्की असलेले अभिनेते म्हणजे दिलीपकुमार. त्यांचा जन्म ११ डिसेंबर १९२२ रोजी मध्ये पेशावर येथे झाला. पेशावरमधील किस्सा खवानी बाजारात एका फळविक्रेत्या पठाण कुटुंबात जन्माला आलेल्या युसूफ खान यांनी कधीही हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनय करण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. वडिलांनी व्यवसायाचे बस्तान बसविल्यानंतर इतर कुटुंबीयांसोबत मुंबईला आल्यावरही किशोरवयीन युसूफच्या तसे मनातही कधी आले नव्हते.
उलट लवकरात लवकर स्वत:च्या पायावर उभे राहून बारा मुले, इतर नातेवाईक आणि पै-पाहुण्यांचे करता करता थकून गेलेल्या अम्मीचे कष्ट काही प्रमाणात कमी करता यावेत यासाठी लवकरात लवकर कमावता होणे याच एका उद्देशाने झपाटलेल्या युसूफने एकदा वडिलांशी उडालेला खटका मनाला लावून घेत तिरमिरीत घर सोडून थेट पुणे गाठले. तिथे लष्करी कॅन्टीनमध्ये मॅनेजरचा साहाय्यक म्हणून केलेल्या नोकरीने त्यांना आपणही पैसे कमवू शकतो, हा आत्मविश्वास मिळवून दिला.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लष्करी कॅन्टीनचे व्यवस्थापन बदलले आणि युसूफ खान जमा केलेले पाच हजार रुपये घेऊन घरी परतले. नोकरी करावी की परंपरागत व्यवसाय, या द्विधा मन:स्थितीत दादर येथे एका परिचिताकडे निघालेल्या युसूफ खान यांना चर्चगेट स्थानकात डॉ. मसानी हे स्नेही भेटले. ख्यालीखुशालीच्या चौकशीत युसूफ नोकरीच्या शोधात असल्याचे समजल्यावर डॉ. मसानी यांनी त्यांना माहीम येथे सोबत येण्याची गळ घातली. युसूफही त्यांच्या आग्रहाखातर माहीम येथील बॉम्बे टॉकीज स्टुडिओत दाखल होऊन देविकाराणीसमोर उभे राहिले. देविकाराणीने राजबिंडे व्यक्तिमत्त्व आणि उर्दूवरील प्रभुत्व या भांडवलावर युसूफ खान यांना महिना बाराशे रुपये पगारावर बॉम्बे टॉकीजच्या चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची ऑफर दिली.
युसूफ आणि डॉ. मसानी या दोघांनाही हे अनपेक्षित होते. देविकाराणींच्या सूचनेवरूनच दिलीपकुमार या टोपण नावाने ‘ज्वार भाटा’ या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर त्यांचे १९४४ मध्ये पदार्पण झाले. १९४४ साली आलेल्या ‘ज्वार भाटा’ चित्रपटापासून दिलीप कुमार यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली होती. मा.दिलीप कुमार यांनी त्यांच्या सहा दशकाच्या अभिनय कारकिर्दीत अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या. त्यातील ‘अंदाज’, आन, ‘देवदास’, ‘आजाद’, ‘मुगल-ए-आजम’ और सामाजिक विषयावर आधारित चित्रपट ‘गंगा जमुना’ यांसारख्या चित्रपटात अभिनय केला. १९५७ मध्ये दिलीप कुमार व वैजयंती माला यांच्यावर चित्रित झालेल्या 'माँग के साथ तुम्हारा मैने माँग लिया संसार...' या गीतातील शब्दांनी तरुणाईला भारून टाकले होते.
१९७६ मधील तिहेरी भूमिका असलेला ‘बैराग’ हा नायक म्हणून दिलीपकुमार यांचा अखेरचा चित्रपट. त्यानंतर पाच वर्षे चित्रपटसृष्टीपासून दूर राहिलेल्या दिलीपकुमार यांनी मनोज कुमार यांच्या ‘क्रांति’ पासून चरित्र अभिनेता म्हणून काम करण्यास सुरुवात केली. ‘शक्ति’, ‘विधाता’, ‘मजदूर’, ‘दुनिया’, ‘मशाल’, ‘कर्मा’, ‘सौदागर’ अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपल्या उत्तुंग अभिनयाचे दर्शन घडवले. दिलीप कुमार यांनी १९९८ साली किला या चित्रपटात शेवटची भूमिका साकारली.
भारत सरकारने त्यांना पद्मभुषण, दादासाहेब फाळके, पद्मविभूषण पुरस्काराने गौरविले. पाकिस्तान सरकारनेही त्यांना १९९७ साली सर्वोच्च नागरिक पुरस्कार निशान-ए-इम्तियाजनेही सन्मानित केले गेले. ‘मुघल-ए-आझम’चे चित्रीकरण चालू असताना दिलीपकुमार आणि मधुबाला एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते, सायरा बानूशी झालेला विवाह हे विधिलिखित होते. हे वैवाहिक जीवन प्रदीर्घ काळ टिकले, असा दिलीपकुमार यांचा विश्वास होता.
दिलीपकुमार आणि अभिनेत्री सायरा बानू यांचेही लग्न त्या काळी गाजले. कारण लग्नाच्या वेळी दिलीपकुमार पेक्षा सायरा बानूचे वय खूपच कमी होते.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
December 11, 2017
अभिनेता हा चितनशील विचारवंत असला पाहिजे हे शंभू मित्रा यांचे मत डॉ. श्रीराम लागू यांना तंतोतंत लागू पडते. १६ नोव्हेंबर १९२७ ला सातारा येथे त्यांचा जन्म झाला. एम. बी. बी. एस. झाल्यावर वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. परंतु शालेय जीवनापासून त्यांचा नाटकाकडे ओढा होता.
January 22, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti