जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
राज कपूरने तिच्या १३ व्या वर्षीच तिच्यातील अभिनय गुणांची दखल घेतली, आणि १९७३ मध्ये प्रदर्शित झालेल्या बॉबी सिनेमात एका तरुण युगुल प्रेमकथेत अभिनेत्री म्हणून जगासमोर आणले. त्यांचा जन्म ८ जून १९५७ रोजी झाला. तिने बॉबी ब्रिगेंझा नावाच्या मध्यमवर्गीय अँग्लो इंडियन मुलीची भूमिका केली होती, ऋषीकपूरची प्रमुख भूमिका असणारा हा पहिलाच चित्रपट होता."बॉबी" हा एक व्यावसायिकदृष्ट्या गाजलेला आणि टिकाकारांनी नावाजलेला चित्रपट होता. डिंपलच्या अभिनयाची विशेष दखल घेतली गेली आणि त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार डिंपलला जया भादुरीसोबत अभिमान चित्रपटासाठी विभागून दिला गेला. बॉबीच्या यशापाठोपाठ डिंपल तरूण वर्गाची एक फॅशन आयकॉन बनली. बॉबी प्रदर्शित होईपर्यंत डिंपलचा राजेश खन्ना बरोबर वयाच्या १६ व्या वर्षीच विवाह झाला होता आणि नंतर मुलांच्या संगोपनासाठी ती चित्रपटांपासून दूर गेली. राजेश खन्नापासून १९८२ मध्ये विभक्त झाल्यानंतर, तिने चित्रपट सृष्टीत परत येण्याचा विचार केला. पण या वेळी तिच्या अभिनयाचा कस लागणार होता.
१९८४ मध्ये प्रदर्शित झालेल्या रमेश सिप्पी यांच्या "सागर" मध्ये काम केले. सिप्पींच्या एका मित्राने डिंपल पुन्हा काम करण्यास उत्सुक असल्याचे त्यांना सांगितले. त्यांनी तिला स्क्रिन टेस्टसाठी बोलावले आणि ती पुन्हा अकदा रिशी कपूरसोबत रूपेरी पडद्यावर झळकली. "सागर" चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. डिंपलने आपल्या अभिनयातील विविधता सिद्ध करण्यासाठी आपल्या चित्रपट निवडित अधिक चोखंदळता दाखवली. ती कालांतराने अधिक गंभीर भूमिकेंमध्ये प्रेक्षकांसमोर आली आणि समांतर सिनेमांकडे वळली. "काश", "द्रिष्टी", "लेकिन" आणि "रुदाली" या समांतर सिनेमांमधील तिच्या भूमिकांसाठी तिची विशेष नोंद घेतली गेली. रुदालीसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा समिक्षक फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. गर्दिश मधील तिची सहाय्यक भूमिका लक्षणिय ठरली आणि "क्रांतीवीर" मधील तिच्या भूमिकेसाठी तिला चौथा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. डिंपलने १९९० आणि २००० च्या दशकांत अधूनमधून काही चित्रपटांमधून अभिनय केला. "दिल चाहता है" आणि अमेरिकन निर्मिती असणाऱ्या लीला चित्रपटात महत्वाच्या भूमिकेंमध्ये दिसली. त्यानंतर "हम कौन है","प्यार मे ट्विस्ट, "फिर कभी", "तुम मिलो तो सही", "बिईँग सायरस","लक बाय चान्स","दबंग", "पटियाला हाऊस" आणि "कॉकटेल" मध्ये सहाय्यक भूमिकेत दिसली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
June 8, 2017
पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी होते. पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी हे अर्धे शहाणे समजले जात. त्यांचा जन्म १२ फेब्रुवारी १७४२ रोजी सातारा येथे झाला. नाना फडणवीस यांचे मूळ घराणे कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील होते. बालवयातच नानासाहेब पेशव्यांच्या सान्निध्यात आल्यामुळे राज्यकारभाराचे शिक्षण त्यांना मिळाले. वयाच्या २० व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणिशीची वस्त्रे मिळाली. एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मुत्सद्दीपणाने सांभाळले. आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी बसवलीच होती पण त्यांची कामाची तडफ, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा या बरोबरच पेशवाई आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारासुद्धा त्यांनी वाढवला. इंग्रजांचा पाडाव करण्यातही ते यशस्वी झाले. थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पेशवाईची विस्कटलेली घडी महादजी शिंद्यांच्या मदतीने त्यांनी पुन्हा रूळावर आणली आणि दक्षिणेतील मराठी सत्तेचं वर्चस्व टिकवून ठेवले. पुण्याचे वैभव वाढवले. सवाई माधवराव पेशव्यांच्या अपघाती निधनानंतर सात-आठ महिने नानांनी तुरुंगवासही भोगला. वाई येथे नाना फडणीसांचा वाडा आजही आहे.
नाना फडणवीस यांची नऊ लग्ने झाली होती. नानांचे पहिले लग्न दहाव्या वर्षी झाले होते या स्त्रीचे नाव यशोदाबाई. नानांच्या नऊ बायकांपैकी सात त्यांच्या हयातीत वारल्या. नाना फडणवीस यांचे १३ मार्च १८०० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
February 12, 2019
आज १४ ऑक्टोबर
आज इटावा घराण्याचे आंतरराष्ट्रीय सतार वादक उस्ताद शाहिद परवेझ यांचा वाढदिवस.
जन्म: १४ ऑक्टोबर १९५८
ते इटावा घराण्याचे सातव्या पिढीचे प्रतिनिधीत्व करतात. ते भारतात सर्वात सुप्रसिद्ध तरुण सतार वादक, मानले जातात. मुंबईत जन्मलेले शाहिद परवेझ यांचे वडील अजीज खान हे सुद्धा इटावा घराण्याचे प्रतिनिधित्व करत असत. शाहिद परवेझ यांचे आजोबा सतार आणि सूरबहार वादक उस्ताद मा.वहीद खान. अजीज खान यांनी शाहिद परवेझ यांना पहिले अनेक वर्ष आधी तबला प्रशिक्षण दिले व नंतर सतारीचे प्रशिक्षण. शाहिद परवेझ यांनी देशात आणि अमेरिका, युरोप, युएसएसआर, कॅनडा, आफ्रिका, मध्य-पूर्व आणि ऑस्ट्रेलिया मध्ये अनेक मैफिली केल्या आहेत. भारत सरकारने शाहिद परवेझ यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले आहे. आपल्या समूहाकडून मा.शाहिद परवेझ यांना शुभेच्छा
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
October 23, 2016
उदय गंगाधर सप्रे हे व्यवसायाने तांत्रिक बाजूंवर काम करणारे अभियांत्रिक असले तरी आयुष्यभर विवीध कलांमध्ये बेधुंदपणे रमणारा, व हौशीपणाने प्रत्येक कलेमधील सुप्त सौंदर्याचा रसास्वाद घेणारा प्रतिभावंत कलाकार त्यांचा नेहमीच कानोसा घेत आलाय. बी. ई. केमिकल, व डीप्लोमा इन इंटेरिअर डिझाईन अँड डेकोरेशन ह्या पदव्या संपादन करणार्या सप्रे यांना लहानपणापासूनच विविध कलाकौशल्यांमध्ये झळकायची, व त्यांना पुर्णपणे आत्मसात करण्याची खुमखुमी होती. चित्रकला व उत्तम रंगसंगतींची जाण तसेच कुठलीही गोष्ट सुबक, रेखीव व उठावदार होण्यासाठी काय करावे लागते, याचे अचुक, उपजत ज्ञान त्यांच्यात मुबलक असल्यामुळे इंटेरिअर डिझाईनिंग व डेकोरेशन या वेगळ्या वाटेकडे वळण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला व तो यशस्वीही करून दाखविला.
August 29, 2011
पत्रकार, केसरीचे संपादक, लेखक अनंत जनार्दन करंदीकर यांचा जन्म ३० डिसेंबर १९०१ रोजी झाला.
वैदिक आर्याचे ज्योतिर्विज्ञान आणि वैदिक देवतांचे पुनदर्शन, गांधी-मुस्लीम कौन्स्पिरन्सी, दुसरे महायुध्द पूर्वार्ध हे ग्रंथ तसेच क्रांतिवादी टिळक या नावाने टिळकांचे चरित्र लिहिले.
## Anant Janardan Karandikar
July 27, 2017
कादंबर्या, नाटके, कथा आदी लिहून पुढे समीक्षेत लौकिक मिळवणारे संपादक व समीक्षक विष्णू बापूजी आंबेकर
January 4, 2021
शालेय जीवनात म्हणजे पुण्याच्या भावे स्कूलमध्ये ऐनवेळेस रणदुंदुंभी नाटकातील शिशुपाल आणि साष्टांग नमस्कार या नाटकातील भद्रायु भाटकर ही पात्र त्यांनी अतिशय सुंदर रीतीने रंगविली होती. त्यांचा जन्म १ नोव्हेंबर १९१९ रोजी झाला. इथूनच त्यांच्या रंगभूमीच्या प्रवासाला सुरुवात झाली. छापील संसार नावाच्या पहिल्या व्यावसायिक नाटकात त्यांनी काम केले. हा अभिनयाचा छंद जोपासत असतांना त्यांनी मिलीटरी अकौंटस् मध्ये नोकरी केली. त्यावेळेस त्यांचे शिक्षणही सुरू होते. विनोदी अभिनेता म्हणून त्यांनी केलेला पहिला चित्रपट होता माझा मुलगा. तिथून सुरू झालेला विनोदी अभिनेत्याचा प्रवास शेवटपर्यंत सुरूच होता. नाट्य आणि चित्रपट दोन्ही क्षेत्रात त्यांनी आपल्या अभिनयाचा प्रभाव पाडला होता.
बालगंधर्वांसारख्या नटश्रेष्ठाबरोबर एकच प्यालातील रंगवलेली तळीरामाची भूमिका बालगंधर्वांच्या शाबासकीला पात्र ठरली. लग्नाची बेडी या नाटकातला गोकर्ण शरद तळवलकरांनी आपल्या ठसकेबाज शैलीत रंगवून अविस्मरणीय केला. पुणे आकाशवाणी केंद्रावर नाट्यनिर्माते म्हणून केलेले त्यांचे कार्य मोलाचे होते. त्यांच्या काळातील नभोनाट्ये हा श्रोत्यांच्या आवडीचा विषय होता. कलाकार ही नाट्यसंस्था त्यांनी उभारली. भावबंधन मधील कामण्णा, अपराध मीच केला मधील गुप्तेकाका, दिवा जळू दे मधील गोळे मास्तर अशा अनेक नाटकांमधील अनेक भूमिका संस्मरणीय ठरल्या. अप्पाजींची सेक्रेटरी आणि सखी शेजारीण या नाटकांतील त्यांच्या भूमिका हलक्या फुलक्या पण सबंध नाटक पेलून धरणार्या दमदार अशाच होत्या.
अतिशय बोलक्या चेहऱ्याचा हा विनोदी कलावंत ज्याला नाट्यसृष्टीत मानाचा समजला जाणारा विष्णुदास भावे पुरस्काराने गौरविले गेले. मा.शरद तळवलकर हे नाव मराठी चित्रपटसृष्टीशी निगडित असले तरी त्यांचे स्वतःचे नाट्यवेड हे प्रख्यात होते. नाटकाप्रमाणे चित्रपटातदेखील शरद तळवलकरांनी महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, तुळस तुझ्या अंगणी, रंगल्या रात्री अशा अखेर जमलं, वाट चुकलेले नवरे, बायको माहेरी जाते, मुंबईचा जावई आणि एकटी अशा कितीतरी गाजलेल्या चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या. जावई विकत घेणे मधील म्हातार्याच्या भूमिकेचे आणि एकटीतील भूमिकेबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक मिळाले होते. शरद तळवलकर हे १९९२ मध्ये वाशी येथे भरलेल्या ७२ व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते. शरद तळवलकर यांचे निधन २१ ऑगस्ट २००१ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 12, 2017
मनोज जोशी यांनी सर्फरोश या चित्रपटातून बॉलीवूड मध्ये पदार्पण केले. सरफरोश, चांदनी बार, हंगामा, देवदास, हलचल, पेज 3, फिर हेरा फेरी से, चुप चुप के, गरम मसाला, गोलमाल, भागम भाग, भूलभुलैया, मेरे बाप पहले आप, बिल्लू, दे दना दन खट्टा-मीठा हे त्यांचे काही हिंदी चित्रपट होत.
July 14, 2022
अमित देशमुख लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.
March 28, 2013
भिंगरी’ चित्रपटात त्यांनी साकारलेला खलनायक अविस्मरणीयच. मराठीत यापूर्वी खलनायक रूबाबदार असू शकतो ही संकल्पनाच नव्हती. रमेश देव यांनी खलनायकी भूमिकेला ग्लॅमर मिळवून दिले.तरीही त्यांनी स्वतला विशिष्ट परिघात अडकवून न घेता चौफेर मुशाफिरी केली. त्यांनी नायक, सहनायक, चरित्र अभिनेता ते खलनायक अशा सर्वच भूमिका केल्या.
February 3, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti