जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
आदित्य हा एक नावाजलेला जलतरणपटू आहे ज्याने आशियाई स्तरावर भारतासाठी १ सुवर्ण व १ कांस्य पदक संपादित केले आहे.
May 3, 2014
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक चार
जगण्यासाठी औषधं काम करत नाही - अंतिम भाग बारा
आयुर्वेदात एवढी ताकद आहे तर काही रोग कायमस्वरुपी का बरे होत नाहीत ? या आयुर्वेद शास्त्राच्या मर्यादा नव्हेत काय ? असं काही जणांच्या मनात येतं.
औषधालासुद्धा काही मर्यादा असतात. म्हणून तर सर्व रोग औषधाने बरे होत नाहीत. पण कोणते रोग कायमस्वरुपी बरे होत नाहीत, याचे सविस्तर वर्णन देखील ग्रंथकारानी करून ठेवले आहे.
ज्या ठिकाणी आपल्या, किंवा आपल्या शास्त्राच्या मर्यादा संपतात, ती वेळ पेशंटला, दुसऱ्या शास्त्राकडे " रेफर " करण्याची असते, हे ज्या वैद्याला किंवा डाॅक्टरला समजते, तो यशस्वी !
ज्याला आपल्या मर्यादा समजतात, ते शास्त्र महान असे मला वाटते.
केवळ औषधांनीच रोग बरे होत नाहीत, ही दृष्टी शिकवणाऱ्या आयुर्वेद शास्त्राला त्रिवार वंदन !!!
लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे, ती म्हणजे इथे औषधांच्या मर्यादा शास्त्रकारांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत. जे व्याधी औषधांनी बरे होत नाहीत तिथे क्षारकर्म, अग्निकर्म, शस्त्रकर्म करावे लागते. चरकाचार्य देखील स्पष्टपणे म्हणतात, इति नास्ति मम अधिकारः । शस्त्राधिकारः ।। अमुक व्याधी हा केवळ औषधांनी बरा होणारा नाही.
प्रमेहासारखा आजारच घ्या ना ! त्याचे एकुण वीस प्रकार. त्यातील कफापासून होणारे दहा प्रकार सहज साध्य सांगितले आहेत. पित्तामुळे होणारे सहा प्रकार औषध घेतलं तर साध्य, याला याप्य असा शब्द ग्रंथकार वापरतात. तर वातामुळे निर्माण होणारे चार प्रकार, किंवा पहिल्या वर्णन केलेल्या सोळा प्रकारांकडे वेळीच लक्ष दिले नाही तर होणारे मधुमेहासारखे व्याधी औषध घेतले तरी सुद्धा पूर्ण नष्ट होत नाहीत. त्यांना असाध्य म्हणतात.
आयुर्वेदात शस्त्रसाध्य व्याधी, ग्रहचिकित्सा वर्णन केल्या आहेत, कारण औषधांच्या मर्यादा ग्रंथकाराना माहिती होत्या. मोतीबिंदूचे शस्त्रकर्म, अॅपेंडिक्स, हर्निया यांची शस्त्रकर्मे एवढेच नव्हे तर ह्रदयाच्या शस्त्रकर्मामधे उपयोगी ठरणारे, आणि तर्जनी या बोटावर टोपीसारखे बसणारे, एक अति सूक्ष्म यंत्र देखील ग्रंथात वर्णन केलेले आहे, जे आजही अगदी तसेच, तेवढ्याच कामासाठी सर्जनमंडळी वापरतात.
मध्यंतरीच्या कालावधीत यवनांनी केलेल्या प्रचंड विध्वंसामुळे, केलेल्या जाळपोळीमुळे, राजकीय अनास्थेमुळे, अहिंसात्मक जीवनाचा अतिरेक झाल्यामुळे, आयुर्वेदातील काही महत्त्वपूर्ण विषयाच्या अभ्यासापासून, पुढील काही पिढ्या वंचित राहिल्या, हे सत्य आहे.
औषधाला जसा गुण आहे, तसाच अवगुण पण त्याच्यातच दडलेला असतो, याचाही अभ्यास देखील ग्रंथकार सांगतात, ( वैद्याला याची जाण असते, बोगस डाॅक्टरला नसते. ) यासाठी औषध देणारा वैद्य हा ज्ञानी, अभ्यासू, दृष्टकर्मा, हवा. केवळ पुस्तकी किडा नको. आणि धनाभिसर पण नको. (ग्रंथात वैद्यांचे दोन प्रकार सांगितलेले आहेत, एक रोगाभिसर म्हणजे रोगाला दूर करणारा, आणि दुसरा प्राणाभिसर, म्हणजे प्राणाला दूर नेणारा, म्हणजे अज्ञानाने चुकीची औषधे वापरून, रोगापेक्षा प्राण हरण करणारा, म्हणून प्राणाभिसर ! ) तिसरा धनाभिसर हा नवीन प्रकार आज अस्तित्वात दिसतो.
आज स्टिराॅईड सारखी औषधे जास्त काल घेतल्याने त्याचे प्रचंड दोष उत्पन्न ( आजच्या भाषेत "साईडइफेक्ट" ) होतात. हे माहिती असून सुद्धा ती वापरली जातात.
आयुर्वेदात देखील क्षारांसारखी काही औषधे काही कालावधीनंतर बंद करावीत, हे स्पष्टपणे लिहिलेले आहे.
म्हणजे आयुर्वेदीय औषधांना पण साईड इफेक्ट असतात ?
हो असतातच !
अहो,
ज्या औषधांना "इफेक्ट" आहे, त्याला "साईडइफेक्ट" असणारच ना !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
30.04.2017
May 2, 2017
बाळकृष्ण प्रधान आणि दादर येथील इंडियन एज्युकेशन सोसायटी यांचे नाते अतूट असे होते. इतके की प्रधान सर म्हणजे इंडियन एज्युकेशन सोसायटीचा चालता बोलता इतिहासच होते.
२९ मार्च १९१८ रोजी जन्मलेल्या प्रधानांचे प्राथमिक शिक्षण जुन्या जंजिरा संस्थानातील बोरली पंचायतन इथे, तर माध्यमिक शिक्षण ठाण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. वयाच्या १९ व्या वर्षी ते मॅट्रिक, तर १९४१ सालात राम नारायण लोहिया कॉलेजातून बी.एससी. झाले.
सुरुवातीचा काही काळ त्यांनी इंडिया युनायटेड मिल आणि दिल्ली केमिकल क्लॉथमध्ये केमिस्ट म्हणून काम केले. परंतु त्यांचा स्वाभाविक ओढा शिक्षणक्षेत्राकडे होता. त्यामुळे १९४८ सालापासून त्यांनी अध्यापनाचे काम केले.
विज्ञान आणि गणित हे विषय ते अतिशय तळमळीने शिकवित असत. वांद्रे येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या वाशी येथील न्यू बॉम्बे हायस्कूलमध्ये त्यांनी प्राचार्य म्हणून काम केले. बहुआयामी व्यकिमत्त्व असलेले प्रधान सर हाडाचे शिक्षक होते. तळमळीने आपला विषय शिकविणे हा त्यांचा सहजस्वभाव होता. विज्ञान आणि गणित यांबाबत आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होण्यासाठी धडपडणार्या प्रधान सरांनी अखिल भारतीय शिक्षण परिषदांमध्ये एक तपाहून अधिक काळ सक्रिय सहभाग घेतला. तर १९५० ते १९६५ या काळात त्यांनी 'एज्युकेशन फॉर इंटरनॅशनल अंडरस्टँडिंग' या विषयावरील चर्चासत्रांमध्ये सातत्याने भाग घेतला.
एस.एस.सी. मंडळाच्या विभागीय आणि राज्यस्तरावरील अभ्यासक्रम समितीतही त्यांनी काम केले. १९७२ सालाच्या सुमारास महाराष्ट्रात विज्ञान व गणित या विषायांच्या अभ्यासक्रमात क्रांतिकारक बदल सुचविण्यात आले. त्यावेळेस गणिताच्या अभ्यासक्रमातील बदलांच्या संकल्पना प्रधान सरांनी उचलून धरल्या आणि त्याबाबतच्या चर्चांमध्येही त्यांनी भाग घेतला. शालेय पातळीवरील विज्ञान-गणित या विषयांतील बदल हे बदलत्या काळानुरूप होत आहेत आणि त्याच्या तपशिलाबाबत मतभेद असले तरी तत्त्व म्हणून आपण ते बदल स्वीकारले पाहिजेत, असे प्रधान सरांचे म्हणणे होते. आपली ही मते त्यांनी १९७६ साली झालेल्या 'नॅशनल फोरम ऑफ टिचर सेमिनार ऑन प्रॉब्लेम्स ऑफ एज्युकेशन' या विषयावरील सेमिनारमध्ये मांडली.
त्यांच्या शिक्षणविषयक दृष्टिकोनाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. त्यांच्या शिक्षणसेवेचे कौतुक करण्यात आले. 'निर्मळ बुद्धीत ओलावा असतो आणि निर्मळ हृदयात बुद्धीचा प्रकाश असतो' असे आपल्या विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणार्या प्रधान सरांनी तत्त्वनिष्ठ आणि शाश्वत मूल्यांची आयुष्यभर जोपासना केली. असा हा शिक्षणव्रती १९ जानेवारीला काळाच्या पडद्याआड गेला आणि शिक्षणक्षेत्रातले एक नामवंत व्यक्तिमत्व हरपले.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
August 9, 2017
सुधीर फडके हे ख्यातनाम गायक व संगीतकार होते. चित्रपटसंगीत, भावगीते, अभंग यासाठी ते खास प्रसिद्ध आहेत. बाबूजी या टोपणनावाने ते परिचित होते. त्यांनी जवळपास ५० वर्षे मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केले. महाकवी गदिमांच्या गीतरामायण या महाकाव्याचे संगीत आणि सादरीकरण अजूनही मराठी संगीतरसिकांच्या मनात घर करुन आहे.
April 20, 2011
रँग्लर परांजपे यांची नात तर शकुंतला परांजपे यांची कन्या असलेल्या सई परांजपें यांना साहित्याचा आणि लेखनाचा वारसा घरातूनच मिळाला. त्यांचा जन्म १९ मार्च १९३८ रोजी झाला.त्या शाळेत शिकत असतानाच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. मुलांचा मेवा हे त्यांचे पुस्तक १९४४ साली त्यांच्या वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षी प्रसिद्ध झाले. त्यानंतर त्यांचं बरचसं लेखन हे लहान मुलांसाठी लिहिलेलं आहे. त्यांची बालनाट्येही अतिशय गाजली. अनेक बालनाट्यांना पुरस्कारही लाभले. लहान मुलांच्या मनाच्या पातळीवर येऊन त्यातील बाल्य हेरून त्या बाल्याचे सहज रूप रंगभूमीवर उभे करून आणि त्यात बालप्रेक्षकांना गुंगवून ठेवणे हे काम दिसतं तेवढं सोपं नाही त्यासाठी सिद्धहस्त लेखक आणि जातिवंत कलावंत असण्याची नितांत आवश्यकता आहे आणि ही भूमिका आयुष्यभर मा.सई परांजपे यांनी उत्कृष्टपणे साकार केली. त्यांच्या काही बालनाट्याची नावं जरी वाचली तरी आपले बाल्य आपल्या डोळ्यापुढे उभे राहते. शेपटीचा शाप, जादूचा शंख, झाली काय गंमत, पत्तेनगरी, भटक्यांचे भविष्य, हरवलेल्या खेळण्यांचे राज्य, जास्वंदी, माझा खेळ मांडू दे ही त्यांची काही गाजलेली बालनाट्य. याबरोबरच चित्रपट दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही त्यांना चांगलेच यश मिळाले. जादू का शंख आणि सिकंदर हे दोन बालचित्रपट चांगलेच गाजले. तर बालचित्रपटाव्यतिरिक्त त्यांनी दिग्दर्शित केलेले चष्मेबद्दूर, स्पर्श आणि कथा हे चित्रपटही त्यांचा प्रभाव दाखवून गेले. याही चित्रपटात त्यांनी सहजतेतून सौंदर्य साधले होते आणि त्यामुळे एक कलात्मक चित्रपट म्हणून ते प्रेक्षकांना आवडून गेले. हिंदी सिनेसृष्टीतील एक क्लासिक सिनेमा म्हणजे 'चष्मे बद्दूर'. सई परांजपे यांचं दिग्दर्शन, फारूख शेख, दीप्ती नवल यांचा सहज सुंदर अभिनय, यामुळे हा सिनेमा सिनेरसिकांच्या 'ऑल टाईम फेव्हरेट कलेक्शन'मध्ये आजही गणला जातो. त्यांच्या स्पर्श या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार लाभले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
सई परांजपे यांचे चित्रपट, कथा
https://youtu.be/nLos9zq0FhQ
चष्मेबहादुर
https://youtu.be/BsHd1EGA46A
साझ
https://youtu.be/zc9rozVQQ4I
March 21, 2017
श्री के क्षी’. या नावाने प्रसिद्ध समीक्षक मराठी लेखक विचारवंत प्रा. श्री. के. क्षीरसागर हे शायरीचे अभ्यासक होते. टीकाकार म्हणूनही ते परिचित होते, तसेच ते ‘ज्ञानकोश’कार केतकरांचे समविचारी म्हणूनही प्रसिद्ध होते.
April 16, 2019
आपल्या कॅमेऱ्याने सिनेतारे-तारकांना ग्लॅमर मिळवून देणारे, कलाकारांना नवा चेहरा देणारे असे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांचा जन्म १६ सप्टेंबर १९५० रोजी झाला.
व्यक्तिचित्रण प्रकारातल्या प्रकाशचित्रांसाठी ते विशेष नावाजले जात असत. आपल्या मितभाषी स्वभावाने, मृदू वाणीने आणि व्यक्तीतील मित्रत्वाचा शोध घेणाऱ्या दृष्टीने त्यांनी केवळ सिनेजगतातीलच नव्हे तर समाजाच्या विविध प्रांगणातील व्यक्तींना आपल्या मित्रपरिवारात सामावून घेतले होते.
गौतम राजाध्यक्ष यांना छायाचित्रणासह कलेच्या विविध प्रांतात आवड होती. १९७७ मध्ये त्यांचा संबंध लिंटाजशी आला आणि त्यांना तिथेच नोकरीची संधी मिळाली. फोटोग्राफीेचे तंत्र ते लिंटाजमध्येच शिकले. या काळात त्यांनी लिंटाज इंडियामध्ये मानाच्या जागाही मिळविल्या होत्या. पुढे १९८० पासून १९८७ पर्यंत फॅशन फोटोग्राफर म्हणूनही काम पाहिले. त्यानंतर त्यांनी स्वतंत्र काम केले.
छायाचित्र काढताना ज्यांचे छायाचित्र काढायचे त्यांचे व्यक्तिमत्त्व त्या छायाचित्रात आणण्याचा त्यांचा कसोशीचा प्रयत्न असायचा. म्हणून त्यांची छायाचित्रे बोलकी असत. १९९७ मध्ये त्यांचे ‘फेसेस’ हे छायाचित्रांचे पुस्तक प्रसिद्ध झाले. यात त्यांनी दुर्गा खोटे, साधना समर्थपासून ऐश्वर्या रायपर्यंतच्या ४५ भावमुद्रा टिपल्या आहेत. दोन वर्षांपूर्वीच त्यांचे ‘चेहरे’ या कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन लता मंगेशकर यांच्या हस्ते झाले होते. त्यांच्या छायाचित्रांची प्रदर्शनेही रसिकांच्या चांगल्याच स्मरणात आहेत.
छायाचित्राबरोबरच स्टील फोटोग्राफीचे कामही त्यांच्याकडे आले. अनेक चित्रपटांची त्यांनी स्टील फोटोग्राफी केली आहे.
गौतम राजाध्यक्ष यांचे १३ सप्टेंबर २०११ रोजी निधन झाले.
मराठीसृष्टीवरील गौतम राजाध्यक्ष यांचा लेख.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 26, 2021
लोकोत्तर पुरुषांच्या पश्चात त्यांच्या वंशजांवर काळाचा दबाव नकळत निर्माण होत असतो. विशेषत: बौद्धिक क्षेत्रातील अशा महान व्यक्तींच्या पुढील पिढय़ांना ती क्षमता टिकवून ठेवता येतेच असे नाही. परंतु अशाही स्थितीत आपण स्वकर्तृत्वाने अपवाद ठरावे, असे बहुधा डॉ. सदानंद मोरे यांनी ठरवले असावे. महाराष्ट्राच्या तार्किक आणि बौद्धिक परंपरेतील मुकुटमणी असलेल्या संत तुकाराम महाराज यांच्या घराण्यात जन्मलेल्या डॉ. मोरे यांनी गेल्या पस्तीस वर्षांमध्ये संतपरंपरेचा अभ्यास करून जो अन्वयार्थ लावला, तो त्यांच्यातील अभ्यासकाचे दर्शन घडवणारा आहे.
महाराष्ट्रातील लोकव्यवहाराचा त्यांचा अभ्यास केवळ तत्त्वज्ञान आणि अध्यात्माच्या अंगाने केलेला नाही. राजकारण, समाजकारण आणि संस्कृतीकारण या क्षेत्राचीही जोड त्यांच्या अभ्यासाला मिळाल्यामुळे तो अनेकांगी आणि परिपूर्णतेकडे जाणारा ठरला आहे. ‘लोकमान्य ते महात्मा’ या त्यांच्या ग्रंथातून त्यांचा हा अभ्यास जसा लक्षात येतो, तसाच ‘ज्ञानोबा तुकाराम’, ‘पालखी सोहळा-उगम आणि विकास’, ‘अमृतानुभवाची वासुदेवी टीका’, ‘तुकाराम गाथेची देहू प्रत’ , ‘मंथन’, ‘त्रयोदशी’ या सारख्या लिखित आणि संपादित ग्रंथांमुळे लोकव्यवहारातील गुंतागुंत अधिक सोपी करून सांगण्याचा त्यांचा प्रयत्नही अभ्यासकांच्या मनात ठसतो. तत्त्वज्ञान विषयाचे गेली ३५ वर्षे अध्यापन करणारे डॉ. मोरे हे पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानदेव व संत तुकाराम अध्यासनांचे प्रमुख होते. अध्यापन हा जरी त्यांचा धर्म असला तरीही सतत चिंतन आणि त्याचे विश्लेषण हा त्यांचा स्वभाव आहे. नाशिक येथे या आठवडय़ात होत असलेल्या संत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची झालेली निवड म्हणजे त्यांच्या आजवरच्या विविधांगी अभ्यासाचा गौरव आहे, असे म्हटले पाहिजे. मराठी माणसांचा देशपातळीवरील पहिला जनसमुदाय म्हणून महाराष्ट्राचा जो उल्लेख होतो, त्याचे कारण महाराष्ट्रातल्या संतपरंपरेने येथील जनतेला आत्मभान आणि राष्ट्रभान दिले हे आहे, त्यामुळेच संत नामदेव पंजाबपर्यंत जाऊ शकले आणि मराठय़ांनी पानिपतापर्यंत विस्तार करण्याचे स्वप्न पाहिले, असे मत डॉ. मोरे आवर्जून मांडतात. मोरे यांच्या निवडीमुळे संतसाहित्याच्या अभ्यासाला नवी दिशा मिळू शकेल, यात शंका नाही.
--------------------------------------------------------------------------
MSS - 0042
मोरे, (डॉ.) सदानंद श्रीधर
२५ जून १९५२
१९५२ > लेखक, गाढे अभ्यासक आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज डॉ. सदानंद श्रीधर मोरे यांचा जन्म. त्यांच्या अभ्यासाची साक्ष देणार्या अनेक पुस्तकांपैकी ‘मंथन’ हे पहिले तर ‘त्रयोदशी’ हे ज्ञानेश्वरांविषयीचे. ‘तुकाराम दर्शन’ या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. ‘लोकमान्य ते महात्मा’, ‘कृष्ण : द मॅन अॅंड हिज मिशन’ ही इंग्रजी पुस्तकं, तीन काव्यसंग्रह अशी त्यांची ग्रंथसंपदा.
August 5, 2017
उत्तर हिंदुस्थानी गायकी ज्यांनी सर्वप्रथम दख्खनमध्ये किंवा महाराष्ट्रात आणली ते पं बाळकृष्णबुवा इचलकरजीकर. त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १८७२ रोजी झाला. विष्णू दिगंबर पलुसकर हे त्यांचेच शिष्य होते.
विष्णू दिगंबर पलुसकरांचे ग्वाल्हेर गायकीवर प्रभूत्व होते. त्यांचा शिष्यवर्गही बराच होता. पं यशवंतबुवा मिराशी, पं विनायकबुवा पटवर्धन ही काही त्यांच्या शिष्यांची नावे. हिंदुस्थानी संगीताच्या प्रचाराकरता आणि प्रसाराकरता पलुसकरांचे खूपच मोठे योगदान केले आहे. त्यांनी संगीतविषयक अनेक क्रमिक पुस्तके लिहिली. स्वरलिपी तयार केली जी 'पलुसकर-पद्धती' म्हणून ओळखली जाते..
"गंधर्व महाविद्यालयाची" १९०१ साली "लाहोर" येथे झालेली स्थापना त्यांच्या तपश्चर्याचे फळ होय.हिन्दुस्तनि रागसंगीताचा प्रसार-प्रचार व्हावा, ते शिकण्याची सोय व्हावी या हेतूने त्यांनी संपूर्ण भारतात ठिकठिकाणी आखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयांची स्थापना केली. विष्णु दिगंबर पलुसकर हे निःसीम राम भक्त होते."गंधर्व महाविद्यालयाची" स्थापना करून त्यानी रामाच्या चरणी,थेट नाशिक येथे आपली कर्मभूमी निवडली.
१९२१ साली त्यांनी काळा राम मंदिरासमोर पंचवटी "श्री रामनाम आधारश्रम" म्हणून स्थापन केलेली वस्तू आजही अस्तीतवात आहे. ग्वाल्हेर परंपरेचेच लोकप्रिय गायक पं दत्तात्रेय विष्णू तथा बापूराव पलुसकर हे त्यांचे सुपुत्र होत. पंडित विष्णु दिगंबर पलुसकर यांचे निधन २१ ऑगस्ट १९३१ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:-इंटरनेट
August 18, 2017
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे (सीएसआयआर) १९९५-२००६ या काळातील महासंचालक. देशातील आघाडीचे वैज्ञानिक. रासायनिक अभियंते असलेल्या माशेलकरांनी नॉन न्यूटोनियम लिक्विड्स या विषयात मौलिक संशोधन केले आहे. पेटंट साक्षरतेची मोहीम रुजवून संशोधन करून ज्ञाननिर्मितीद्वारे पेटंट घेण्यासाठी शास्त्रज्ञांना प्रवृत्त करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले.
हळदीची पूड औषधी उपयोगासाठी वापरण्यासंबंधी अमेरिकेला दिलेल्या पेटंटविरुद्ध यशस्वी लढा देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ते अनेक पुरस्कारांचे मानकरी असून त्यातील पद्मविभूषण आणि फेलो ऑफ रॉयल सोसायटी हे प्रमुख आहेत. सध्या ते राष्ट्रीय इनोव्हेशन प्रतिष्ठान आणि ग्लोबल रिसर्च अलायन्सचे अध्यक्ष आहेत.
(जन्म १९४३)
माहितीस्त्रोत - (म.वि.प.चा.) विज्ञानतंत्रज्ञान कोष
December 15, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti