(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मोहन दाते

    १९९५ साली धुंडीराजशास्त्रींचे निधन झाल्यानंतर ‘दाते पंचांग’ चालविण्याची जबाबदारी मोहनराव दाते यांच्यावर पडली. तेव्हापासून आतापर्यंत मोहनराव ती जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत हे दाते पंचांगाच्या लोकप्रियतेवरून दिसून येतच आहे.

      July 19, 2022


  • इंग्लंडचे महान क्रिकेटपटू डब्ल्यू जी ग्रेस

    द डॉक्टर, डब्ल्यूजी, डॉक अशा अनेक टोपणनावांनी ते ओळखले जात.आक्रमक फलंदाज, उपयुक्त अष्टपैलू असलेल्या ग्रेस यांच्या नावावर अनेक डोमेस्टिक आणि कसोटी क्रिकेट विक्रम आहेत.

      October 23, 2021


  • देखणी – प्रिया मराठे

    प्रिया मराठे… विविध मराठी, हिंदी मालिकांमधून सातत्याने दिसणारा देखणा चेहरा… आकर्षक बांधा… ही प्रियाची वैशिष्टय़ं..

    आपला दमदार अभिनय सादर करत ‘या सुखांनो या’ ते ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ व्हाया ‘पवित्र रिश्ता’ आणि ‘साथ निभाना साथिया’ असा मराठी आणि हिंदी छोटय़ा पडद्यावरचा प्रवास गेली दशकभर सातत्याने करणारी अभिनेत्री म्हणजे प्रिया मराठे. छोटय़ा पडद्यावरून घराघरांत पोहचलेल्या प्रियाने रुपेरी पडद्यावरही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. सडपातळ बांधा, मात्र हसऱया चेहऱयाच्या, बोलक्या डोळ्यांच्या आणि मनमिळावू स्वभावाच्या प्रियाने अल्पावधीतच मराठी आणि हिंदी सिने इंडस्ट्रीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.

    लहानपणापासून प्रियाने शिक्षणाची स्वप्नं रंगवली. इतर मुलांप्रमाणेच तिलाही इंजिनीअर, डॉक्टर व्हायचं होतं खरं, मात्र अभिनय क्षेत्राकडे तिची कधी पावलं वळतील अशी कल्पनाही तिला त्या काळी नव्हती. शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत तिचा आणि अभिनयाचा तसा काहीच संबंध नव्हता. ठाणा कॉलेजला प्रवेश घेतल्यानंतर अकरावीत असतानाच तिने महाविद्यालयातल्या एकांकिका स्पर्धा, नाटय़स्पर्धा, तसंच तालमी पाहिल्या होत्या आणि याच काळात ती अभिनय क्षेत्राकडे आकर्षित झाली. अकरावीत असल्यापासून अभ्यासाच्या जोडीने अभिनयाचा वेगळा प्रवास तिचा सुरू झाला. पुढे एफवायला असताना तिची आणि याच महाविद्यालयातल्या इतर नाटय़प्रेमींची ओळख झाली आणि तिच्या प्रवासाला वेगळी गती मिळाली. दिग्दर्शक रवी करमरकर, विजू माने, संतोष सराफ, लेखक शिरीष लाटकर या दिग्गजांचं त्या काळी तिला मार्गदर्शन मिळालं.

    प्रियाने ‘या सुखांनो या’ या मालिकेतून छोटय़ा पडद्यावर प्रवेश मिळवला. 2005 साली मराठी मालिकेतून आपल्या व्यावसायिक अभिनयाचा श्रीगणेशा केलेल्या प्रियाने नंतर कधी मागे वळूनच पाहिलं नाही. 2007 साली तिने हिंदी इंडस्ट्रीत प्रवेश केला तो ‘कसम से’ मालिकेतून. मराठी मालिकांसोबतच हिंदी मालिकांमध्येही तिचा चांगलाच बोलबाला निर्माण झाला. मालिकांचा हा प्रवास सुरू असतानाच ‘तू तिथे मी’ या मालिकेत तिला निगेटिव्ह शेड असलेली भूमिका करण्याची संधी चालून आली आणि मिळालेल्या संधीचं सोनं केलं. ‘पवित्र रिश्ता’ आणि ‘तू तिथे मी’ या दोन्ही मालिका समांतर सुरू असल्याने तिची यासाठी वेळेची गणितं मांडताना तारेवरची कसरत होत होती. सरतेशेवटी ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून आपला काढता पाय घेत तिने ‘तू तिथे मी’ याच मालिकेला प्राधान्य देत तिने आपला सकस अभिनय सादर केला. ‘विघ्नहर्ता महागणपती’, ‘किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी’, ‘1234’ आणि ‘ती आणि इतर’ या सिनेमांत तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली.

    प्रियाचं फोटोशूट करण्याची संधी मला मिळाली होती. प्रिया मराठे हा चेहरा तिच्या मालिकांमधील अभिनयामुळे घराघरात पोहचला होता आणि म्हणूनच सुरुवातीला तिचं फोटोशूट हे तिच्या तेव्हा सुरू असलेल्या मालिकांतील भूमिकेला धरून करण्याचं निश्चित करण्यात आलं. यासाठी मॉडर्न साडीतला तिचा लूक लक्षात घेण्यात आला होता. यानुसार मेकअप, हेअर हे देखील लक्षात घेण्यात आलं. यावर साजेसे दिसतील असे दागिने आणि बांगडय़ा, कानातले दागिने हे देखील निवडण्यात आले. या शूटनंतर तिच्या मालिकांमध्ये असलेल्या नेहमीच्या इमेजला तडा देत तिचं वेस्टर्न आऊटफिटमधलं वेगळं फोटोशूट करायचं आम्ही ठरवलं. खरं तरं प्रिया जशी आहे, तिचं राहणीमान जसं आहे त्या सगळ्याला समोर ठेवून तिच्यासाठीचे कपडे निवडण्यात आले आणि मग फॅशनचा एक टच देऊन तिचा मेकअप आणि हेअर करण्यात आला. प्रियाचा चेहरा लक्षात घेऊन तिच्या मेकअपची शेड ठरवण्यात आली. मेकओव्हर केलेली प्रिया या फॅशनेबल लूकमध्ये फारच खुलून दिसत होती. भूमिकेतील तिची एकरूपता आणि तिने प्रत्येक भूमिकेला दिलेला समान न्याय हा मी देखील एकाच दिवशी करण्यात आलेल्या या दोन वेगवेगळ्या फोटोशूटमधून अनुभवाला आणि इथेच प्रियातला लपलेला उत्तम कलाकार मला कॅमेराबद्ध करता आल्याचा वेगळा आनंद मिळाला.

    धनेश पाटील

      April 1, 2019


  • प्रसिद्ध अभिनेत्री मौसमी चॅटर्जी

    मौसमी चॅटर्जी यांचे खरे नाव इंदिरा. त्यांचा जन्म ६ एप्रिल १९४८ रोजी झाला. १९६७ मध्ये बंगाली दिग्दर्शक तरुण मजुमदार यांच्या बालिका वधू या सिनेमाद्वारे त्यांनी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर १९७२ मध्ये रिलीज झालेल्या 'अनुराग' या सिनेमाद्वारे मौसमी यांच्या बॉलिवूड करिअरला सुरुवात झाली. 'कच्चे धागे', 'जहरीला इंसान', 'स्वर्ग नरक', 'फूल खिले हैं गुलशन गुलशन', 'मांग भरो सजना', 'दासी', 'अंगूर', 'घर एक मंदिर', 'जल्लाद' हे त्यांचे काही निवडक गाजलेले सिनेमे आहेत. मौसमी आणि विनोद मेहरा यांच्या जोडीला प्रेक्षकांनी विशेष पसंत केले. याशिवाय जितेंद्र, संजीव कुमार, राजेश खन्ना, शशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबतही मौसमी यांनी काम केले. मा.मौसमी चॅटर्जी या प्रसिद्ध गायक हेमंत कुमार यांच्या सुनबाई. मौसमी चॅटर्जी यांच्याविषयी म्हटले जाते की, रडण्याचे दृश्य त्या अगदी सहज करायच्या. यासाठी त्यांना ग्लिसरीनची आवश्यकता भासत नव्हती. याविषयी त्या एका मुलाखतीत म्हणतात, ''होय हे खरं आहे. हे देवाने दिलेले एक वरदान आहे. जेव्हाही मी रडण्याचे दृश्य करायची, तेव्हा ती घटना आपल्यासोबत प्रत्यक्षात घडतेय असं मला वाटायचं, त्यामुळे आपोआप डोळ्यात अश्रू तरळायचे.'' मौसमी चॅटर्जी यांची मुलगी मेघा चॅटर्जीही रुपेरी पडद्यावर आली आहे. 'रुसलान' या चित्रपटाद्वारे ती हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      April 26, 2017


  • भाऊराव दातार

    भाऊराव दातार आपल्या अभिनेता करीयर नंतर मेकअप आर्टीस्ट म्हणून काम केले. नंतर ते दादा दातार नावाने ओळखले. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये मेकअप मास्टर म्हणून सेवा केली.

      July 12, 2022


  • गायक महेश काळे

    कुठल्याही प्रकारांतलं गाणं असो, शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भक्तिसंगीत, भावगीत, गजल, कव्वाली किंवा एखादं पाश्चिमात्य गाणे प्रत्येक प्रकार संपूर्ण ताकदीने, तो ऊर्जेने परिपूर्ण असतो.

      January 12, 2022


  • भावकवी कृ. ब. निकुंब

    भावकवी कृ. ब. निकुंब

    कृ.ब.निकुंब यांची ‘घाल घाल पिंगा वाऱ्या’ ही कविता तिच्या वेगळेपणामुळे आणि रसाळ काव्यआशया मुळे उठून दिसते. थेट काळजाला हात घालणारे शब्द अन भावविभोर झालेल्या सासूरवाशिणीचे हृदयंगम प्रकटन जणू आपण अनुभवत आहोत असा भास या कवितेतून होतो.

      June 30, 2017


  • ज्ञानेश्वर गणपत नाडकर्णी

    वयाच्या नवव्या वर्षापासून अखंड वाचन आणि वयाच्या अठराव्या वर्षापासून अखंड लेखन अशी साधना करणारे लेखक आणि कलासमीक्षक ज्ञानेश्वर गणपत नाडकर्णी. कलासमीक्षा, साहित्यसमीक्षा आणि स्वत:चे लेखन यासाठी अठराव्या वर्षी हाती घेतलेली लेखणी नाडकर्णींनी ६४ वर्षे खाली ठेवली नाही.

      June 1, 2011


  • ज्येष्ठ गायक, संगीतज्ञ आणि लेखक पं.सत्यशील देशपांडे

    शास्त्रीय संगीतात आपल्या अनोख्या आणि स्वयंभू गायकीने उच्चस्थान निर्माण करणारे पं. कुमार गंधर्व हे पं.सत्यशील देशपांडे यांचे गुरू!
    त्यांचा जन्म ९ जानेवारी १९५१ रोजी झाला. लहान मुले खेळताना भिंतीआडून डोकावणाऱ्या एखाद्या भिडूला ज्या सहजतेने आपल्या खेळात समाविष्ट करून घेतात, तेवढय़ाच सहजतेने एखाद्या रागातील एखाद्या वज्र्य स्वराला हळूवार कुरवाळणाऱ्या पं. कुमार गंधर्व यांची संगीताकडे पाहण्याची दृष्टीच वेगळी आणि उदात्त होती. हाच उदात्त दृष्टिकोन आपल्या जीवनाचे साध्य बनवून संगीताची आराधना करणाऱ्या पं. सत्यशील देशपांडे यांनी ख्याल गायकीचे अक्षरश: झाड फुलवले. विशेष म्हणजे, मा.कुमारजींप्रमाणेच मा.पं.सत्यशील देशपांडेही संगीताच्या बाबतीत कोणत्याही बंधनात अडकून पडले नाहीत. भारतीय शास्त्रीय संगीतातील ख्याल गायकी हा प्रकार लोकप्रिय असला, तरी कलाकारांसाठी तो साधनेचा विषय आहे. मा.पं. सत्यशील देशपांडे यांनी ख्याल गायकी साधनेने आत्मसात केली. त्यांनी ज्या सहजतेने आणि तन्मयतेने ख्याल गायकी गायली, त्याच तन्मयतेने त्यांनी ‘लेकीन’ किंवा ‘विजेता’ अशा चित्रपटांमधील गाणीही गायली. ख्याल गायकी सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रफुल्ल डहाणूकर आर्ट फाऊंडेशनसाठी ‘पाच मिनिटांचे शास्त्रीय संगीत’ असा एक पाच मिनिटांचा तुकडा तयार केला होता. संगीताकडे वेगळ्याच दृष्टीने पाहणारा हा सुरांचा गुरू शास्त्रीय संगीत हा फक्त ऐकण्याचा किंवा गाण्याचा विषय नसुन अनुभवण्याचा देखील विषय आहे हे मा.पं.सत्यशील देशपांडे जेव्हा सांगतात ते रसिकांना नक्की पटत असेल. हा अनुभव स्वत: घेण्यासाठी व लुटण्यासाठी सत्यशीलजींनी आयुष्यभर अक्षरशः जीवाचं रान केलं. मुख्य म्हणजे त्यांचे गुरु कुमारजी नेहमीच आधी कुठलीही गोष्ट करुन दाखवायचे व मग त्यावर भाष्य करायचे. कुमारजींच्या ह्या आगळ्यावेगळ्या शिष्याचीही तीच पद्धत आहे. नुसत्या समीक्षेपेक्षा हे वेगळं व अवघड काम आहे. एखादी नवीन बंदिश बसवणं म्हणजे काय असतं ते गवयांना चांगलेच माहितेय. मग प्रत्येक रागातील पाचपन्नास बंदिशी नुसत्या बसवुनच नाही तर त्यातील सौष्ठव व सौंदर्यासहित स्वत: गाऊन अनुभवण्याचा वसा त्यांनी घेतला व अजुनही तो चालुच ठेवलाय. तसेच त्या बंदिशीचे पोषण कुठल्या गायकिने चांगले होते ही सौंदर्य दृष्टी सुद्धा त्यांच्याकडे आहे. त्यासाठी त्यांनी विविध गायकींचा अभ्यास करुन त्या आत्मसात केल्यायत. त्यामुळे वेगवेगळ्या गायकींचा तुलनात्मक आभास करणं त्यांना शक्य झालंय. टोकाचा व्यासंग, तल्लख बुद्धी व उत्तम प्रतिभा हा त्रिवेणी संगम सत्यशीलजींपाशी आहे.

    तरुण संगीतकार कौशल इनामदार हे पं.सत्यशील देशपांडे यांचे शिष्य.

    कौशल इनामदार आपल्या गुरु बद्दल सांगताना म्हणतात, गुरु अंतर्दृष्टी देतो ती फक्त कलेकडे पाहण्याची नाही तर जगण्याकडे पाहण्याची. त्यांनी गाण्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन दिला. ते स्वतः कुमारजींचे शिष्य. तरीही त्यांच्या गाण्यात कुमारजींची नक्कल नाही. कुमारजींनीपण त्यांना सांगितलं होतं की तुमचे खड्डे तुम्ही खणा! थोडक्यात काय तर अगदी गुरूचीसुद्धा नक्कल न करता स्वतःचं वेगळेपण स्वतः सिद्ध करा. त्यामुळे मी विचार करताना कधीही सत्यशील देशपांडे यांच्यासारखा करत नाही. मी माझ्या सारखा विचार करतो. मला वाटतं की आपल्यासमोर वाट असतेच, ती आपण शोधत जातो. गुरु आपल्याला जाणीव करून देतो की तुमची वाट तुम्ही शोधा. त्यासाठी आवश्यक त्या गोष्टी गुरु पुरवतात. मी गाण्याचा विचार माझ्यासारखा करतो कारण मी त्यांचा शिष्य आहे. एखादी चाल फसली तर ते सांगतात की त्यात काय करता येईल. त्यातलं एक सूत्र सांगतात ज्यामुळे अनेक गोष्टी स्पष्ट होतात. मी संगीत द्यायला लागल्यापासून माझ्या चालींवर त्यांचा एक वेगळ्या प्रकारचा प्रभाव आहे. ते स्वतः उत्तम संगीतकार आहेत. त्यांना संगीतातले बारकावे अचूक कळतात. त्यांनी दाखवलेलं प्रतिबिंब इतकं स्वच्छ असतं की ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट’ अशी काहीशी स्थिती होते! त्यामुळे असं म्हणायला हवं की गुरु म्हणजे वाटाडय़ा नाही. तो सतत तुमच्याबरोबर राहत नाही. वेगवेगळे मार्ग ते तुम्हाला सांगतात. तिथे जाताना तुम्हाला प्रश्न पडतात. माझ्या गुरुचं वेगळेपण हेच की त्यांनी आम्हाला असे प्रश्न पाडले. आज जवळजवळ १६ वर्ष मी त्यांच्याकडे शिकतोय पण जाऊन त्यांच्याकडे शिकायला बसलोय असं कधीच झालं नाही. मी कधीही त्यांना भेटायला जातो आणि शिक्षण सुरु होतं. त्यांनी मला अगदी मुलासारखं वाढवलं आहे. सध्या ‘अजिंठा’ या चित्रपटासाठी ते माझ्याकडे गातायत. मला वाटतंय ‘हे गीत जीवनाचे’ नंतर पहिल्यांदाच ते चित्रपटासाठी गातायत. त्यांनी माझ्याकडून चाल समजून घेतली, त्यावर मी जेवढा विचार केला नसेल तेवढा त्यांनी केलाय, त्याच्या शंभरेक तालमीसुद्धा केल्यात! ते नुसते गायक किंवा संगीतकार नाहीत तर एक विचारवंत, लेखकसुद्धा आहेत. त्यांचा भाषेचा सेन्स अतिशय उत्तम आहे. होतं.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      January 11, 2017


  • कमलाबाई ओगले

    कमलाबाई ओगले

    दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणार्‍या कमलाबाई ओगले यांचा जन्म १६ सप्टेंबर १९१३ रोजी झाला.

    कमलाबाई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा ‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले॰ हे पुस्तक किर्लोस्करांनी प्रकाशित केले॰ या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली॰

    केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले॰ मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले॰

    त्यांनी पृथ्वीची ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका अशी दोन्ही टोके गाठली॰ ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली.

    कमलाबाई ओगलेंवरील संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

    दोन लाख सुनांची आई - कमलाबाई ओगले

    ## Kamalabai Ogle

      June 7, 2017