जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
मंदार फणसे हे राष्ट्रीय स्तरावर त्यांच्या नैसर्गिक शैलीमुळे व बहारदार व्यक्तिमत्वामुळे प्रसिध्द पावलेले एक अनुभवी व तरूण पत्रकार आहेत. हिंदी व मराठी वृत्त देणारे डेस्कवरचे पत्रकार व प्रादेशिक जबाबदार्यांची सुत्रे सांभाळण्याची सुत्रे त्यांच्या अखत्या पत्रकारिता या क्षेत्रातील त्यांचा अनुभव दांडगा असून शिक्षण क्षेत्रातले त्यांचे विशेष कौशल्य, व संशोधक तसेच चौकस वृत्ती सर्वज्ञात आहे.
August 16, 2011
लेखक, समीक्षक, भाषाभ्यासक वसंत कृष्ण वर्हाडपांडे
July 26, 2017
काही माणसांच्या लोकप्रियतेचे रहस्य त्यांच्या कामाइतकेच व्यक्तिमत्त्वातही असते. ते किशोर कदम यांच्यातपण आहे. किशोर कदम यांना महाराष्ट्राचा लाडका कवी आणि नट म्हणता येईल. संवेदनशील कलावंत म्हणून सुद्धा किशोर कदम यांनी रसिकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. ‘गारवा’ या अल्बमसाठी त्यांनी लिहिलेल्या कविता विशेष गाजल्या. ‘गारवा’ची लोकप्रियता हा एक विक्रम आहे आणि तो कोणीच मोडू शकलेला नाही.
प्रेम आणि पाऊस या कवी सौमित्र यांच्या कवितेतील खास बाबी आहेत. त्याने गुलजार यांच्या अनेक कविता हिंदीतून मराठीत आणल्या. गुलजार यांनीदेखील त्याच्या कविता हिंदीत नेल्या. ते सध्या गुलजारांवरील ‘बात पश्मिनेकी’ हा कार्यक्रम सादर करतात. किशोर कदम यांचे नाव मराठी चित्रपटसृष्टीत ज्येष्ठतेच्या यादीत घेतले जात आहे. नटरंग, जोगवा, फॅण्ड्री अशा अनेक चित्रपटांत उत्कृष्ट अभिनेता म्हणून त्यांनी पुरस्कार मिळविले आहेत.
अधिक माहितीसाठी खालील लिंक्स क्लिक करा.
मराठी काव्यविश्वात मनसोक्त मुशाफिरी करणारे कवी सौमित्र (9-Nov-2016)
कवी सौमित्र उर्फ किशोर कदम (15-Nov-2017)
मराठी कवी सौमित्र उर्फ किशोर कदम (12-Jun-2019)
कवी सौमित्र उर्फ किशोर कदम (9-Nov-2021)
# Kadam, Kishor
June 4, 2017
आज ६ डिसेंबर
आज "गंधर्वभूषण‘ जयराम शिलेदार यांची जयंती
जन्म. ६ डिसेंबर १९१६
चित्रपट आणि नाटक या दोन्ही क्षेत्रांत सारखीच चमकदार कामगिरी करणाऱ्या थोड्या कलावंतांमध्ये "गंधर्वभूषण‘ जयराम शिलेदार यांचे नाव आजही मोठ्या आदराने घेतले जाते. वयाच्या १६ व्या वर्षी रंगदेवता रघुवीर सावकारांच्या कंपनीत त्यांनी नाट्यकलेचा श्रीगणेशा केला. नंतर गंधर्व नाटक मंडळींमध्ये नटसम्राट बालगंधर्वांबरोबर नायकाची भूमिका करण्याची संधी मिळाली. चित्रपटात ललिता पवार, सुमती गुप्ते, तर नाटकात हिराबाई बडोदेकर, शांता आपटे, मीनाक्षी, जयमाला शिलेदार यांच्याबरोबर त्यांची कारकीर्द गाजली. गणपतराव बोडस, चिंतामणराव कोल्हटकर, केशवराव दाते यांचे मार्गदर्शन मिळाले. अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी सुरू केलेल्या संगीत नाटकांना, बालगंधर्व, संगीतसूर्य केशवराव भोसले, मास्टर दिनानाथ यांच्यामुळे सोन्याचे दिवस दिसले. संगीत रंगभूमीने मराठी भूमीतल्या संगीत रसिकांना झपाटून टाकले. पण बोलपटांच्या युगाने संगीत रंगभूमीला उतरती कळा लागली. महाराष्ट्रातल्या बहुतांश संगीत नाटक संस्था हळूहळू बंद पडल्या. राम जोशी या चित्रपटाने लोकप्रियतेचे शिखर गाठलेल्या जयराम शिलेदार जयमाला शिलेदार यांच्याशी विवाह केला. या दोघांनी मराठी संगीत रंगभूमीवर आपल्याच कर्तृत्वाने नवे युग सुरू केले. जयराम यांना चित्रपटांमुळे लोकप्रियता मिळाली होती तरी, त्यांचा जीव मात्र संगीत रंगभूमीवरच घुटमळत होता. जयमाला यांची साथ मिळताच त्यांनी चित्रपटसृष्टीकडे पाठ वळवली आणि संगीत रंगभूमीच्या पडत्या काळात, संगीत रंगभूमीला वाचवायसाठी पुढचे आयुष्य संगीत रंगभूमीसाठीच समर्पित केले. संगीत रंगभूमीलाही ओहोटी लागली, तेव्हा जयराम आणि जयमाला शिलेदार यांनी "संगीत मराठी रंगभूमी' ही संस्था स्थापन करून, संगीत नाटकांची परंपरा पुनरूज्जीवित तर केलीच, पण पुन्हा संगीत रंगभूमीच्या वैभवी परंपरेचे दर्शनही संगीत रसिकांना घडवले. जयमाला आणि जयराम शिलेदार यांचा संगीत नाटक हाच प्राण आणि सर्वस्व होते. संगीत रंगभूमीसाठी त्यांनी अपार कष्ट केले, पण त्याचा गाजावाजा कधीही केला नाही. संगीत रंगभूमीची सेवा ही त्यांनी निर्मोहीपणे केलेली नटराजाची सेवा होती. संगीत सौभद्र, सुवर्ण तुला, संशय कल्लोळ, स्वयंवर, एकच प्याला, शाकुंतल, मृच्छकटिक, मानापमान, ही एककाळ लोकप्रियतेचा कळस गाठलेली नाटके या दोघांनी सातत्याने रंगभूमीवर सुरू ठेवली. नव्या युगात संगीत रंगभूमीचा प्रेक्षकवर्ग कमी झाल्यामुळे, ही नाटके चालणार नाहीत, हा समजही त्यांनी खोटा ठरवला. कोल्हापूर, सांगली, सोलापूर या शहरात संगीत रंगभूमीचे महोत्सव होत. तेव्हा विदर्भ, मराठवाड्यातून आणि कर्नाटकातूनही संगीत नाट्य रसिक आवर्जून ही सारी नाटके पहायसाठी त्या शहरात मुक्काम ठोकून असत. ४५ हून अधिक संगीत नाटकांचे सहा हजारहून अधिक प्रयोग केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संगीत नाटकाची पताका फडकवत ठेवली. मा.जयराम शिलेदार यांच्या निधनानंतर "गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्यसेवा ट्रस्ट' ही संस्था स्थापन मा.जयमाला शिलेदार यांनी केली. २०१२ मध्ये जयराम शिलेदार यांचे आत्मचरित्र, "फोटो योग्रॉफी‘मधून लोकांसमोर आले.
जयराम शिलेदार यांचे ६ नोव्हेंबर १९९२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
December 6, 2016
आज इंटरनेटवरील सर्वात महत्त्वाची संकेतस्थळे कोणती, असे जागतिक सर्वेक्षण कोणी केलेच, तर त्यात विकिपीडियाचे नाव नक्कीच पहिल्या दहा संकेतस्थळांत असेल. त्यांचा जन्म ७ ऑगस्ट १९६६ रोजी अलाबामा राज्यातील हंट्सव्हिल येथे झाला.
जिमी वेल्स हे मूळचे अमेरिकन. त्यांचे वडील एका वाणसामानाच्या दुकानाचे व्यवस्थापक होते. एका खासगी शाळेत ते शिकले. तेथेच त्यांना विश्वकोश वाचण्याचा छंद जडला. विकिपीडिया निर्मितीची प्रेरणा त्यातच कुठे तरी असावी. या शिवाय लहानपणापासूनच त्यांना संगणकाची ओढ होती. तासन् तास संगणकावर खेळ खेळणे, कॉम्प्युटर कोड तयार करणे हा त्यांचा आवडता उद्योग होता. त्यातूनच त्यांना या माध्यमाची महती लक्षात आली. पुढे त्यांनी अर्थशास्त्रात पीएच.डी. संपादन केली.
अलाबामा आणि इंडियाना विद्यापीठात काही काळ प्राध्यापकीही केली. १९९६ मध्ये मात्र त्यांनी संगणक क्षेत्रातच करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि दोन सहकाऱ्यांसह बोमीस हे वेबपोर्टल तयार केले. ते अश्लील मजकुराचे, छायाचित्रांचे पोर्टल होते. पण त्याचेही एक वैशिष्टय़ म्हणजे त्यावर सर्वसामान्य संगणक वापरकर्ता आपली छायाचित्रे अपलोड करू शकत असत. मात्र त्यांचा तो प्रयोग सपशेल फसला आणि जिमी वेल्स ऑनलाइन विश्वकोश निर्मितीकडे वळले. २००० साली त्यांनी ‘नूपीडिया’ हा ऑनलाइन विश्वकोश सुरू केला. तत्पूर्वी त्यांची लॅरी सँगर या तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांशी ओळख झाली होती. १९९०च्या सुमारास वेल्स एक ऑनलाइन ग्रुप चालवत होते. त्यात आयन रँड या तत्त्ववेत्त्या लेखिकेच्या ऑब्जेक्टिव्हिजम या तत्त्वज्ञानाची चर्चा होत असे. त्यातूनच त्यांचा सँगर यांच्याशी परिचय झाला होता. या दोघांनी मिळून नूपीडिया चालवताना येत असलेल्या अडचणींचा वेध घेऊन, त्यात सुधारणा करून, १५ जानेवारी २००१ रोजी लॅरी सॅंगर ह्यांच्या सोबतीने ‘विकिपीडिया’ हे संकेतस्थळ सुरू केले.
विकिपीडिया हे साईटचं विकी हे नाव एका सर्वर प्रोग्रॅममधून आलंय. विकी हा शब्द सुरवातीला एका कॉम्प्युटर प्रोग्रॅममधे वापरला गेला होता. १९९५ मधे वार्ड कॅनिंगहॅम यांच्यामुळे तो प्रचारात आला. त्यावेळेस 'विकी विकी वेब डॉट विकी' हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आलं. लोकांनी आपणांस हव्या त्या विषयावरील माहिती या संकेतस्थळावर अपलोड करावी. उपलब्ध माहितीत भर घालावी, ती संपादित करावी, असे या संकेतस्थळाचे स्वरूप आहे. आज इंग्रजी विकिपीडियामध्ये असे सुमारे ४८ लाखाहून अधिक लेख आहेत. असे माहितीपूर्ण लेख एकाच ठिकाणी असणे ही काही साधी गोष्ट नाही. कसलीही माहिती हवी असेल तर आपल्याकडे आता एक सोप्पा मार्ग उपलब्ध झालाय. गुगलवर आपल्याला हव्या असलेल्या माहितीचा की वर्ड सर्च केला की पहिला पर्याय येतो तो विकिपीडियाचा. विकिपीडियावर सगळ्या गोष्टींची बेसिक पण डिटेल माहिती उपलब्ध असते.
आणि विशेष म्हणजे ही माहिती मोफत आणि सर्वांसाठी खुली असते. ही सगळी माहिती 'ओपन सोर्स लायसन्स'प्रमाणे उपयोगात आणली जाते. त्यामुळेच विकिपीडियाला एनसायक्लोपीडिया म्हणजेच विश्वकोश म्हणतात. लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालविलेला विश्वकोश असे त्याबद्दल म्हणता येईल.
ही सगळी माहिती किती महत्त्वाची आहे याचा प्रत्यय तसा प्रत्येकालाच - एखाद्या विषयावर लेख लिहिताना, प्रोजेक्ट तयार करताना, निबंध लिहिताना, शाळेचा गृहपाठ करताना जेव्हा आपण विकिपीडियाकडे धाव घेतो तेव्हा - येत असतो!
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
August 7, 2021
आज नागपंचमी....
महाराष्ट्रभूषण श्री.बाबासाहेब पुरंदरेंचा तिथीने जन्म दिवस....
बाबासाहेब...तुम्हांस देवी तुळजा भवानी उदंड आयुष्य देवो...तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होवोत....
बाबासाहेब
"छत्रपती शिवाजी महाराज किती वाजता बसले हो बाबासाहेब सिंहासनावर राज्याभिशेकाच्या दिवशी ?
नाहीतरी आपण शिवाजी महाराजांचे नाव या आपल्या प्रदर्शनाच्या माध्यमाने जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवत आहोत तर महाराज सिंहासनावर विराजमान झाले, ठीक त्यावेळीच आपण आपल्या या 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड' प्रदर्शनाचे उद्घाटन करूया.
कशी आहे कल्पना बाबासाहेब.?"
"छानच आहे कल्पना मिलिंदराव....
पहाटे ५ वाजता महाराज सिंहासनाधिष्ठीत झाले. म्हणजे बाकी सगळे विधी आधीपासूनच सुरु झाले होते पण प्रत्यक्ष सिंहासनावर महाराज पहाटे ठीक ५ वाजता बसले.....
आणि राज्याभिषेक झाला." बाबासाहेब उत्तरले.
पहाटे ५ वाजता म्हटल्यावर अंग शहारलं माझ...
माझ गिनीज बुक साठीच छायाचित्र प्रदर्शन आणि महाराजांचं नाव पहिल्यांदाच गिनीज बुक मध्ये कोरल जाण्याचा सुवर्णक्षण....
पण पहाटे ५ वाजता उद्घाटन...?
कसं होणार ?
कोण येणार ?
पण लगेच विचार केला, नाहीतरी आपण प्रदर्शनाच्या उद्घाटनाचा दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचाच निवडला आहे ना....
मग...
जे काही असेल ते असेल महाराज ५ वाजता बसले ना सिंहासनावर, आपण ही आपल्या प्रदर्शनाच उद्घाटन पहाटे ५ वाजताच करायचं बाबासाहेबांच्या आशीर्वादाने.
"मस्त कल्पना आहे न बाबासाहेब?
तुम्हाला जमेल का पहाटे ५ वाजता यायला ?
राजसाहेबांना मी विनंती करतो.
ते नक्की येतील."
मी दबकत दबकत विचारलं.
विलक्षण चपळाईने बाबासाहेब उद्गरले,"नक्कीच...मी येतो ४.४५ वाजता ठीक. राजसाहेबांना फोन लावता का? बोलून घेऊ त्यांच्याशी लगेचच."
मी श्री. राज ठाकरेंना फोन लावला त्यांच्या सेलफोनवर...
श्री. राज ठाकरे सुद्धा क्षणाचाही विलंब न लावता तयार झाले...
२८ जून २००७....
पहाटे घड्याळात ठीक ४.४४ वाजले आणि बाबासाहेब पोचले गणेश कला क्रीडा केंद्रात....
त्यांच्या शिरस्त्याप्रमाणे...घड्याळाच्या ठोक्यावर...
एका अदभूत ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार होण्यासाठी.........
तुडुंब ओसंडून वहात होत गणेश कला क्रीडा केंद्र तेव्हा पहाटे ५ वाजता सुद्धा...
मुंगीलाही शिरायला जागा नव्हती शब्दशः...
शेकडो जण बाहेर उभे राहिले होते...
किमान ४ वाहिन्यांच्या ओबी vans आल्या होत्या हा सोहळा जगाला लाइव्ह दाखवण्यासाठी...
बाबासाहेब आणि माझा परिचय होता आधीपासूनच पण २००० साली निनादराव बेडेकर यांच्या सोबत रायगडावर गेलो होतो तेव्हा बाबासाहेब खूप जवळून पहिले...
अनुभवले...
ऐकले...
आणि नंतर आम्ही एकत्र काम करत असलेल्या प्रोजेक्टमुळे बाबासाहेबांसोबत असंख्य अगणित वेळा भेट झाली...असंख्य वेळा , अनेक प्रसंगी मनमोकळ्या गप्पा झाल्या...
काही माणसांना तुम्ही ऐकता,
काही माणसांना पाहता...
पण काही थोर माणसे ऐकण्या-पाहण्या पलीकडे महान असतात...
अश्या विभूतींना पंचप्राण एकवटून अनुभवावे लागते...
त्यांच्या आपल्या पाठीवर पडलेल्या आशीर्वचनाच्या थापेने मोहरून जायचे असते...
थरारून उठायचे असते....
प्रेरित व्हायचे असते....
आणि त्या विभूतींच्या आशीर्वादाने कामाला लागायचे असते...
श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे अशीच एक थोर विभूती आहे..........
विलक्षण सामर्थ्यवान आणि दैवी व्यक्तिमत्व आहे...
आज नागपंचमी....
महाराष्ट्रभूषण श्री.बाबासाहेबांचा तिथीने जन्म दिवस....
बाबासाहेब...तुम्हांस देवी तुळजा भवानी उदंड आयुष्य देवो...तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होवोत....
आणि त्या आदिशक्ती तुळजा भवानी चरणी एकच प्रार्थना...
बाबासाहेबांचा तो खणखणीत पहाडी धारदार आवाज शिवचरित्र सांगण्यासाठी पुन्हा एकदा तसाच्या सप्त-सप्तकांत तसाच तेजस्वी लागू दे...
बाबासाहेबांचे ते तेज:पुंज शब्दभांडार कानावर आदळणारा तो हजारोंचा जनसमुदाय हल्लकल्लोळ करत तसाच थरारून उठू दे...
आमच्या डोळ्यांतून यथार्थतेच्या अथांग अथक घळाघळा अश्रुंचे पाट वाहू दे....
आमच्या थिजलेल्या, मरगळलेल्या, विस्कळीतलेल्या मनांना महाराजांच्या चिरंतन प्रेरणेचे अदभूत अंकुर फुलू दे....
आमचे कानच नव्हे तर अंग-प्रत्यंग पुन्हा एकदा चेतून पेटू दे...
हे तुळजा भवानी आदिशक्ती माते.......
हा एक आशीर्वाद आज तू या उभ्या महाराष्ट्राला देच...देच...देच.....
-- मिलिंद वेर्लेकर
August 19, 2015
आसाम-ईशान्येचा अशांत परिसर, वहीतल्या नोंदी, करुणेचा कलाम, अलकनंदा, हाकुमी, तांदळा, वर्तमान, कोहम्, एकशे अकरावी दुरुस्ती, राजधर्म, सारी माझीच माणसे, मन्वंतर समूहाकडून स्वतःकडे, सडेतोड, सेंटर पेज तारांगण, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.
February 28, 2022
जॉनीभाई म्हणतात विनोदी नटासाठी तीन गोष्टी आवश्यक असतात एक म्हणजे उत्तम स्क्रिप्ट लेखक दुसरे म्हणजे टायमिंग आणि तिसरे म्हणजे कलाकार कसा स्वतःच्या बुद्धिमतेनुसारं इम्पप्रूव्ह होतो हे आवश्यक असते आणि त्यासाठी भाषा अत्यंत महत्वाची असते, तिच्यावर ताबा असणे आवश्यक असते. त्यांच्या दृष्टीने त्यांना अब्रार अल्वी यांच्याकडे काम करताना मजा येत असे.
June 22, 2021
डॉ. प्रभाकर माचवे यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. अमेरिकेतील अनेक विद्यापीठांत त्यांनी भारतीय साहित्य, धर्म आणि संस्कृती, तत्वज्ञान, गांधीवाद शिकवले. त्यांना जर्मनी, रशिया, श्रीलंका, मॉरिशस, जपान आणि थायलंड इत्यादी देशांच्या व्याख्यानमालेसाठी आमंत्रित केले गेले होते.
June 17, 2022
डॉक्टर म्हणून झोपडपट्टीत दवाखाना चालविताना उपचारासाठी येणाऱ्या स्त्रियांचे वास्तव दर्शन त्यांना झाले आणि त्यांचे शब्द कवितेतून प्रकटले आहेत.
June 28, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti