(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • तुकडोजी महाराज

    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मूळ नाव माणिक बंडोजी ठाकूर (ब्रह्यभट)

    जन्मस्थळ: यावली-जिल्हा अमरावती तिसरी पर्यंत शिक्षण. ईश्वरभक्तीकडे ओढा, भजनांची आवड, आकडोजी महाराज नाथपंथीय-त्यांना गुरूस्थानी. त्यानी त्यांचे नाव तुकडोजी ठेवले. भजन व कीर्तनाव्दारे राष्ट्रीय वृत्ती जागविणे. गोरगरिबांची सेवा हिच ईश्वरसेवा. ग्रामसुधारणेवर भर, ग्रामगीता ग्रंथ, अनुभव सागर, भजनावली ग्रंथ, जीवन जागृती भजनावली, राष्ट्रीय भजनावली, आदेश रचना, १९३५ ला मोझरी येथे गुरूकुंज आश्रमाची स्थापना, जनसेवेचे केंद्र बनविणे. बावनकाशी सुबोध रत्नाकर काव्यसंग्रह.

    जनसेवा नि राष्ट्रसेवा हीच खरी ईश्वरसेवा असा दिव्य संदेश देणारे कर्ते समाजसुधारक म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. त्यांचे जन्मगाव माणिक पण त्यांचे गुरू अडकुजी महाराज त्यांना प्रेमभरानं ‘तुकडा‘ म्हणून हाक मारीत. शाळेत अन गुरूंबरोबर गोड आवाजात भजने गाणारा. ‘तुकडा, पुढे खंजिरीच्या तालावर राष्ट्रीय कीर्तन करणारा महान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून ख्यातनाम झाला. अल्पवयातच त्यांना दारिद्र्य, भटकंती नि सामाजिक छळाच्या अग्निदिव्यातून पार पडावे लागले. गुरूमाऊलीच्या कृपेने आत्मसाक्षात्कार होऊन परमात्म्याशी सायुज्जीकरण झाले. ध्रुव प्रल्हादचा आदर्श समोर ठेवीत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण झाली. याविषयी त्यांनी म्हटलंय ‘धरावया एकान्ती मुद्राध्यान झाली परिस्थिती कारण.

    आपले साहित्य, भजन, कीर्तन अन प्रवचनातून सर्वांगीण लोकप्रबोधन करणारे तुकडोजी महाराज जनसामान्यांचे चालते बोलते लोकविद्यापीठच होते. गावोगावी फिरून त्यांनी समाज जागृती केली. विवाह पध्दती, महिलोन्नती, रूढी निर्दालन, अंत्यविधी, शिक्षण पध्दती, प्रपंचपरमार्थ वर्णव्यवस्था, संघटना सामर्थ्य, आदर्श ग्रामराज्य आदी विषयांवर सुधारणावादी, क्रांतीकारक विचार मांडले. भोळ्याभाबडा जनतेला बोधामृत पाजलं, मरगळलेल्या मनात चैतन्य निर्माण केलं. सामाजिक सुधारणेची, देशभक्तीची, सर्वधर्म समभावाची शिकवण दिली. ग्रामोध्दार नि विधायक कार्याची प्रेरणा दिली. समाजदोषांवर कठोर कोरडे ओढले.

    दारूबंदी नि व्यसनमुक्ततेचा हिरिरीने प्रचार केला. हरिजनांसाठी मंदिर खुली केली. जनमानसात खोलवर रूजलेल्या धर्म अन भक्ती भावनेला न दुखवता समाज सुधारणा नि राष्ट्रधर्माचे मर्म लोकांच्या गळी उतरवले. खंजिरीवर ‘गायिलेली त्यांची जोषपूर्ण भजने आणि गीत महाराष्ट्राच्या गावागावंतून, कोपर्‍याकोपर्‍यांतून गाजली, मनामनात रूजली, निःहृदयात ठसली.

    लोकजीवनात ती विलक्षण लोकप्रिय झाली. ‘पत्थर बनेंगे बॉम्ब, लोक बनेंगे सेना‘ यासारखी त्यांची वीरश्रीयुक्त गाणी आजही अंगावर रोमांच उभे करतात. सबके लिये खुला है* मंदिर ये हमारा* मतभेद को भुला है मंदिर यह हमारा..हे स्वर श्रोत्यांना भावविभोर करतात.

    मूळ साहित्यिक पिंड असलेल्या तुकडोजींनी वयाच्या सोळाव्या वर्षीच ‘आंनदामृत‘ या ग्रंथांची रचना केली. पुढे आणखीही ग्रंथ लिहिले. पण त्या सर्वात उत्कृष्ट आहे ‘ग्रामगीत‘. जणू लोकवेदच. खेडापाडातील लोकांना सहज समजेल अशा सोप्या सुबोध भाषेत अवतरलेली ‘ग्रामगीता‘ म्हणजे सतत तेवणारा नंदादीपच. ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी, रामदासांचा दासबोध अन तुकडोजींची ग्रामगीता यामध्ये एक प्रकारचे विलक्षण साम्य आढळते.

    ‘जनसामान्यांच्या उध्दाराची तळमळ या तिन्ही ग्रंथामागील प्रेरणा आहे. ग्रामीण जीवनाशी समरस झालेल्या तुकडोजींनी ग्रामअगीतेतून ग्रामोध्दाराचा महामंत्र दिला. त्यांचा हा आदर्श साकार झालाय मोझरी जि. अहमदनगर येथील ‘गुरूकुंज‘
    आश्रमाच्या रूपानं. ग्रामविकासावर भर देताना ते म्हणतात ‘गावांगावासी जागव* भेदभावा समूळ मिटवा* उजळा ग्रामोन्नतीचा दिवा**‘ या संदर्भात महाराष्ट्र शासनाने त्यांच्या नावे सुरू केलेले ‘ग्राम स्वच्छता अभियान खरोखरीच सार्थ वाटते. ते म्हणतात, ‘कलेनेच माणसाची ओळख* एरव्ही कोण पुसतो ‘ ग्रामगीतेतील त्यांचे विश्वकुटुंब नि मानव धर्माचे विचार धर्मांधाच्या डोळ्यात अंजन घालणारे आहेत. ग्रामगीतेतील ‘महिलोन्नती या भागात त्यांनी स्त्रीजीवनाच्या बारीक सारीक समस्यांचा उहापोह केलेला आहे. त्यातून त्यांचे ‘स्त्री शिक्षण व स्त्री सबलीकरणाविषयीचे द्रष्टेपण सिध्द होते.

    आपल्या जीवित काळात त्यांनी वेळोवेळी, राष्ट्रीय, सामाजिक, सांस्कृतिक आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला. गांधीजींच्या मार्गदर्शनाखाली चिमूर सत्याग्रहात तसेच ‘चलेजाव‘च्या स्वातंत्र्य लढात त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. गुरूदेव मुद्रणालय, अन सेवामंडळ स्थापन करून त्यांनी गुरूदेव मासिकाचे प्रकाशन सुरू केले. त्यांच्या महान कार्य कर्तृत्वाचा गौरव म्हणून भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते त्यांना ‘राष्ट्रसंत‘ हा किताब देऊन सन्मानित करण्यात आले. ३ जुलै. ११४९ रोजी त्यांनी पंढरपूर येथे आयोजित केले. विश्वधर्मपरिषद अन विश्वशांती संमेलनात ‘हर देशमे तू, हर वेशमे तू* तेरे नाम अनेक तू एकही है* हे त्यांचे प्रख्यात भजन गाऊन त्यांनी सर्वांना आकर्षित केले. भारत-चीन, भारत-पाक युध्दाच्या वेळीस सीमेवर जाऊन आपल्या देशभक्तीपर गीतांनी जवानांचे मनोधैर्य वाढवले. २२ ऑक्टोबर, १९६८ रोजी ही महान विभूती अनंतात विलीन झाली.

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

      March 11, 2015


  • छाया दिग्दर्शक चारुदत्त दुखंडे

    हमलोग या दूरदर्शनवरील पहिल्या मालिके बरोबरच कमांडर, तू तू मै मै, स्वामी, आख्यान, हॅलो इन्स्पेक्टर, अशा ७५ मालिकांचे १२५ चित्रपटांचे आणि शंभरच्या वर माहितीपटांचे छाया दिग्दर्शन चारूदत्त दुखंडे यांनी केले होते.

      March 28, 2022


  • रिझर्व बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर सी डी देशमुख

    कोलकाता विश्वविद्यालयाने ‘ डॉक्टर ऑफ सायन्स ‘ ही पदवी त्यांना १९५७ मध्ये दिली. १९५९ साली रेमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला १९७५ साली सी. डी. देशमुख आणि दुर्गाबाई देशमुख या दोघा पती-पत्नींना एकाच वेळी , ” पद्म-विभूषण ” किताब देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला.

      October 2, 2021


  • प्रदीप निफाडकर

    ‘द हिंदू’ या निष्पक्ष दैनिकाने ज्यांचा उल्लेख ‘गझलसम्राट सुरेश भट यांची मशाल घेऊन पथदर्शक बनलेले गझलकार,’ असा केला, झी चोवीस तास या वाहिनीचे व झी मराठी दिशा या आठवडापत्राचे मुख्य संपादक विजयजी कुवळेकर ज्यांना ‘भट यांचे अंतरंग शिष्य’ म्हणाले, ते गझलकार प्रदीप निफाडकर. निफाडकर यांचा पहिला गझलसंग्रह होता- स्वप्नमेणा. ज्याची आता तिसरी आवृत्ती संपली आहे. त्यांनी ‘गझल’ या काव्यप्रकाराची साद्यंत माहिती देणारे पुस्तक लिहिले; ज्याचे नाव ‘गझलदीप’ आहे. त्याचीही पहिली आवृत्ती संपली आहे.

      July 7, 2022


  • चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते सोहराब मेहेरबानजी मोदी

    सोहराब मोदी यांनी चित्रपटांतही अभिनय केला आहे. दिग्दर्शन आणि निर्मितीमध्येही त्यांनी प्रयत्न केले होते. त्यांचा जन्म २ नोव्हेंबर १८९७ रोजी झाला. आपल्या ’मिनर्व्हा मुव्हीटोन’तर्फे त्यांनी चाळीसहून अधिक चित्रपट निर्माण केले. १९३५ मध्ये आलेला त्यांचा खून का खून हा चित्रपट शेक्सुपिअरच्या हॅमलेटवर आधारित होता. सोहराब मोदी यांनी १९५६ मध्ये 'झाँसी की रानी' नावाचा भव्य हिंदी चित्रपट काढला होता. त्यात झाशीच्या राणीचे काम मोदी यांची पत्नी मेहताब हिने केले होते. हा भारतात बनलेला पहिला रंगीत चित्रपट होता.त्याचबरोबर पृथ्वीे वल्लेभ, , मिर्झा गालिब, जेलर या चित्रपटांतही त्यांनी काम केले होते. त्यांच्या चित्रपटांमध्ये नेहमीच सामाजिक आणि राष्ट्रीय विषयाचा समावेश असायचा. भारत सरकारतर्फे १९७९ साली मा.सोहराब मोदी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला. सोहराब मोदी यांचे निधन २८ जानेवारी १९८४ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 11, 2017


  • लेखक अच्युत गोडबोले

    अर्थशात्र, संगीत, साहित्य, राजकारण, समाजशास्त्र आणि कम्प्युटरसारख्या क्षेत्रात सहजपणे मुशाफिरी करणारे अच्युत गोडबोले यांचा जन्म १५ ऑगस्ट १९५० रोजी अंमळनेर येथे झाला.

    अच्युत गोडबोले यांनी विज्ञान, संगणक तंत्रज्ञान आणि व्यवसाय या विषयांवर त्यांनी प्रामुख्याने लेखन केले आहे. अच्युत गोडबोले यांचे बालपण प्रमुख्याने सोलापूर शहरात गेले. शाळेत असताच त्यांनी विज्ञान आणि गणितात मोठे प्राविण्य मिळवले. दहावीच्या परीक्षेत ते बोर्डात सोळावे आले. त्यांच्यावर लहानपणापासून त्यांच्या श्रीराम पुजारी सरांचा विलक्षण प्रभाव होता.

    गंमत म्हणजे ते शाळा-कॉलेजमधले शिक्षक नव्हते; पण आयुष्यात जगावं कसं आणि समृद्ध कसं व्हावं हे गोडबोले त्यांच्याकडून शिकले. मराठी आणि विशेषतः इंग्लिश पुस्तकं, शास्त्रीय गायन, विविध खेळ, कविता, गाणी या साऱ्यांची ओळख पुजारी सरांमुळे झाली आणि गोडबोले यांचं आयुष्यच बदलून गेलं आणि तिथपासून ते चौफेर वाचू, ऐकू लागले. त्याचाच फायदा त्यांना पुढे प्रचंड लेखन करताना झाला.

    पुढे भारतीय तंत्रज्ञान संस्थेतून (आयआयटी) त्यांनी रसायन अभियांत्रिकीची पदवी मिळविली. चमकदार शैक्षणिक पार्श्वभूमीनंतर गोडबोले यांनी समाजसेवेत आपला काळ व्यतित केला. आदिवासींना हक्क मिळवून देण्याच्या लढ्यात त्यांनी मुख्य भूमिका बजावली. अच्युत गोडबोले यांनी मराठीतून वृत्तपत्रे नियतकालिकांसाठी विपुल प्रमाणात लेखन व स्तंभलेखन केले आहे.

    अच्युत गोडबोले यांच्याकडे आयटी उद्योगाचा ३५ हून अधिक वर्षाचा अनुभव आहे आणि ते पटनी कॉम्प्युटर सिस्टिम्स, सिंटेल, एलएन्डटी इन्फोटेक, अपार आणि दिशा या कंपन्यांचे व्यवस्थापक राहिलेले आहेत. गोडबोले मराठी व इंग्रजी भाषेतील लेखनासाठी प्रसिद्ध आहेत. ते सर्व शैलीतील विपुल लेखनकार आहेत आणि त्यांनी अनेक भाषांतील संकल्पनांचे मराठीत रुपांतर केले आहे.

    अच्युत गोडबोले यांचे संगणकावरील ‘संगणकयुग’, संगीतावरील ‘नादवेध’, व्यवस्थापनावरील ‘बोर्डरूम’, विज्ञानावरील ‘किमयागार’, अर्थशास्त्रावरील ‘अर्थात’, गुलामगिरीवरील ‘गुलाम’, नॅनोटेक्नॉलॉजीवरील ‘नॅनोदय’, स्टीव्ह जॉब्ज या तंत्रज्ञाचे आत्मचरित्र ‘स्टीव्ह जॉब्ज’, मानसशास्त्रावरील ‘मनात’, चंगळवादावरील ‘चंगळवादाचे थैमान’, गणितावरील ‘गणिती’ आणि त्यांचे आत्मचरित्र ‘मुसाफिर’ अशी अनेक पुस्तकं गाजली आहेत. अच्युत गोडबोले यांच्या कारकिर्दीचा वेध त्यांनी या पुस्तकात घेतला आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
    https://www.youtube.com/watch?v=ebFe4p-i4WE
    https://www.youtube.com/watch?v=ADxWkMyaN-Y
    https://www.youtube.com/watch?v=ASIHzaE5o3Y

      August 15, 2021


  • ‘चित्रपटसृष्टीचा विश्वकोश’ श्रीराम ताम्रकर

    श्रीराम ताम्रकर हे त्यांच्या चाहत्यांमध्ये ‘चित्रपटसृष्टीचा विश्वकोश’ म्हणून लोकप्रिय होते. मध्य प्रदेश सरकारच्या सांस्कृतिक विभागाने २०१० मध्ये दादासाहेब फाळके अकादमीचा ‘ज्येष्ठ चित्रपट पत्रकार पुरस्कार’ आणि ‘बेस्ट फिल्म क्रिटिक’ पुरस्कार यांच्यासह त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

      December 14, 2021


  • वॉल्टर एलिआस डिस्नी

    अमेरिकन चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथालेखक, अभिनेता, रेखाचित्रकार आणि उद्योजक वॉल्टर एलिआस डिस्नी यांचा जन्म ५ डिसेंबर १९०१ रोजी झाला.

    वॉल्टर उर्फ वॉल्ट डिस्ने यांचा जन्म शेतकऱ्याच्या कुटुंबातला, अनेक भावंडातला वॉल्टर लहानपणापासूनच कलाकार होता. वयाच्या सातव्या वर्षीच चित्रे काढून शेजाऱ्याना विकून तो काही पैसेही तेव्हापासून मिळवत असे. एका ट्रेनच्या प्रवासात त्याला 'मिकी माऊस' गवसला असे म्हणतात. पुढे वयाच्या सोळाव्या वर्षीच सैन्यात भरती होण्यास तो गेला पण त्याला प्रवेश नाकारला गेला. मग त्याने रेडक्रॉसमध्ये काम सुरु केले. म्हणजे निसर्गदत्त कलाकार व त्यातही व्यंगचित्र काढण्याची त्याची हातोटी असूनही सुरुवातीला त्याने अगदी विपरीत जीवनकार्य निवडण्याचा प्रयत्न केला. हे असे अनेकांच्या बाबतीत होते. ‘मी कोण’ आहे ‘कोऽहम’ हा तसा सनातन, चिरंतन प्रश्न.

    ‘मी ब्रह्म आहे’ असे त्याचे अंतिम व आदिम उत्तर. पण त्यामध्ये मी सध्या कोण आहे? या जन्मात माझ्या आत अशा काय क्षमता आहेत की ज्या फक्त व फक्त माझ्यातच आहेत हा शोध महत्त्वाचा आहे. आपला ‘स्व’ कळणे- ‘स्वभाव’ कळणे हे अपरिहार्य आहे. अन्यथा अर्धे आयुष्य किंवा कधीकधी पूर्ण आयुष्यही न आवडणार्या , न कळणार्याय कामात अडकून पडते. वॉल्टर रेडक्रॉसच्या कामासाठी फ्रान्सला गेला, तिथे त्याला अॅम्ब्युलन्स चालवण्याचे काम होते. पण त्याच्या आतला कलाकार गप्प बसेना. असे म्हणतात त्याची अॅम्ब्युलन्स नेहमी गच्च भरलेली असे. पण वैद्यकीय गोष्टींनी नाही तर त्याने काढलेल्या असंख्य कार्टून्सनी! वर्षभरातच वॉल्टर परत आला. त्याने कमर्शियल आर्टमध्येच करिअर करायचे ठरवले. कान्सासमधे स्थानिक व्यवसायांसाठी त्याने अॅनिमेटेड फिल्म्स बनवण्यास सुरुवात केली.

    ‘The Alice Comedies’ ही फिल्म त्याने बनवली. तो कफल्लक झाला. त्याची कंपनी कर्जबाजारी झाली. पण त्याने निराश न होता सुटकेस भरली. अॅलिसची अपूर्ण फिल्म घेऊन त्याने तडक हॉलिवूड गाठले. वॉल्टर त्यावेळेस जेमतेम २२ वर्षाचा होता. भावाचे अडीचशे डॉलर, अधिक काही ५००-६०० डॉलर्सचे कर्ज यातून एका गॅरेजमधे काम सुरू झाले. १९२५ साली वॉल्ट डिस्नी यांचा विवाह व्यंगचित्रकार लिलियन बाऊण्ड्स यांच्याशी झाला. डिस्नी दांपत्य आणि आयवर्क्स यांनी नव्या जोमाने आपल्या स्टुडिओत पुन्हा कामाला सुरूवात केली. वॉल्ट यांनी कॅन्सास स्टुडिओत सहज म्हणून काढलेले उंदराचे चित्र घेऊन त्यावर आयवर्क्सने नवे साज चढविले. या चित्राला आढी मॉर्टिमर असे नाव देण्यात आले. पण लिलियनला ते नाव आवडले नाही. म्हणून मग तिनेच सुचविलेले मिकी माउस हे नाव त्या चित्राला देण्यात आले. मॉर्टीमर नाव पुढे एका खलनायकाच्या चित्रासाठी दिले.

    मिकीचा आवाज स्वतः वॉल्ट डिस्नी यांचाच आवाज होता. मिकीचा पहिला मूक चित्रपट Plane Crazy तयार झाला. (१९२८). या काळापर्यंत मूकपटांची मागणी कमी होत गेली होती, प्लेन क्रेझी सपशेल आपटला. १९३७ सालची Snow white & the Seven Dwarfs ही पूर्ण लांबीची, प्रचंड खर्चाची पण सदाबहार अॅनिमेटेड फिल्म त्याने केली. मग डिस्ने स्टुडीओने अनेकानेक क्लासिक्सची निर्मिती केली. विनोदनिर्मितीतून करमणूक करतानाही निरागसता जपणारा चार्ली चॅपलीन हा लहानपणापासून त्याचा आदर्श होता. Pinocchio, Fantasa, Dumbo, Bambi ते Junglebook ह्या सगळ्या फिल्म्स त्याची साक्ष देतात. टेक्नीकलरचे पेटंट त्याने घेतल्याने काही वर्षं कलर फिल्म बनवण्याचा हक्क फक्त त्यांनाच मिळाला. १९३२ च्या फ्लॉवर्स अॅण्ड ट्रीजने त्याला पहिला अॅकेडमी अॅवार्ड मिळवून दिला.

    वॉल्ट डिस्नेज फिल्मोग्राफी या शीर्षकाखाली निर्माता म्हणून जवळजवळ ५७६, दिग्दर्शक म्हणून जवळजवळ ११२ व अभिनेता म्हणूनही १०-१२ फिल्म्सची नावे दिसतात. ही प्रचंड क्रिएटिव्हिटी, Animation या माध्यमातही सतत केलेली नवनिर्मिती ही थक्क करणारी आहे. असंख्य मुलांचे बालपण खुलवणारा, मोठ्यांनाही छोटं करणारा, भाषा, प्रांत, संस्कृती, इतिहास या साऱ्या सीमारेषा पुसून आनंदाचे अपराजित साम्राज्य उभे करणार्याठ वॉल्ट डिस्नेच्या अफाट सृजनशीलतेला व नवनिर्मितीच्या क्षमतेला सांष्टांग दंडवत घालावा असे वाटते.

    मिकी, मिनी, डोनाल्ड, मोगली, गुफी, टॉम अॅण्ड जेरी, लायन किंग ही पात्रे आपल्या सर्वांच्या भावविश्वात कायमचे घर करून आहेत. जंगल बुक १९६७ साली सुपरहिट होता, २०१६ सालीही सुपरहिटच आहे. त्या कथेवर TV सिरिअल्सचे असंख्य भाग पाहूनही पुन्हा थिएटरकडे गर्दी होते. तीच गोष्ट टारझन, सिंड्रेला, रॉबिनहूड, अॅलिस यांची. यामागे आनंद वाटण्याची अमर्याद ओढ, तंत्रज्ञानावरची हुकुमत व नवनवीन तंत्रेही सर्वात आधी आत्मसात करण्याची तत्परता या सर्व गोष्टी आहेत. १९९० साली डिस्नेचा २९ वा पूर्ण लांबीचा चित्रपट The Little Mermaid आला.

    वॉल्ट डिस्ने यांची कार्टून फिल्म सलग २० वर्षे एबीसी अॅ ण्ड एबीसीसारख्या मोठ्या चॅनलवर प्रसारित होत होती. वॉल्ट डिस्नेने जे पैसे कमावले तेच त्यांनी आपल्या ड्रीम प्रोजेक्ट डिस्नेलँडमध्ये गुंतवले. 1१७ जुलै १९५५ रोजी कॅलिफोर्नियामध्ये शेकडो एकर जमिनीवर डिस्नेलँड तयार करताना वॉल्ट डिस्नेने सांगितले होते की, मनोरंजन आणि कुतूहल असलेल्या या जागेला तोपर्यंत पूर्णत्व येणार नाही जोपर्यंत लोकांमध्ये कल्पनाशक्ती आहे. कॅलिफोर्निया, आरलँडो, पॅरिस, टोकियो आदी ठिकाणी तयार करण्यात आलेले डिस्नेलँड खरोखर परीकथेतील कल्पनेप्रमाणे आहे. त्यांनी जन्माला घातलेले कार्टून, डिस्नेलँड आणि अॅटम्युझमेंट पार्क आजही मनोरंजन जगात सर्वोच्च पदावर विराजमान झालेले आहेत. त्यानंतर त्यांनी हाताने चित्र काढणे व रंगवणे ह्या अत्यंत कष्टप्राय तंत्रातून संगणकीय चित्रांच्या नव्या तंत्राकडे झेप घेतली ती आजतागायत उंच उंच जातच आहे.

    लहानपणी वॉल्टला प्राणी, पक्षी, निसर्गाचे खूप कुतूहल होते. त्यांचे चेहरे, लकबी, रंग यांना तो कागदावर आणी पण आपल्या खास शैलीत. त्या कुतूहलातून एक प्रतिसृष्टी निर्माण झाली आणि अजूनही होतच आहे.
    वॉल्ट डिस्ने यांचे निधन १५ डिसेंबर १९६६ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 17, 2019


  • मूर्तिकार दत्तात्रेय श्रीधर खटावकर

    पदरमोड करून त्यांनी अनेक गरीब आणि गरजू मुलांना कलाशिक्षण दिले. ज्या तुळशीबागेमध्ये बालपणापासून वास्तव्य होते त्या गणरायाची मूर्ती खटावकर यांच्या कसबी हातांनीच घडली आहे.

      January 23, 2022


  • बंगाली चित्रपटातील ‘ग्रेटा गार्बो’ – अभिनेत्री सुचित्रा सेन

    किमान तीन दशके तरी आपल्या सौंदर्याबरोबरच, सशक्त अभिनयाने सुचित्रा सेन या बंगाली चित्रपटाच्या सुवर्णयुगातील एक महत्त्वाच्या साक्षीदार ठरल्या. कन्नन देवी यांच्यानंतर बंगालमधील एकाही अभिनेत्रीला सुचित्रा सेन यांच्याइतके चाहते मिळाले नाहीत. त्यांची लोकप्रियता इतकी होती, की दुर्गापूजेच्या वेळी दुर्गा, लक्ष्मी व सरस्वती यांच्या प्रतिमा सुचित्रा सेन यांच्या चेहऱ्यावर बेतल्या जात असत.

      January 18, 2018