(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • महान धावपटू फ्लाइंगसीख मिल्खासिंग

    महान धावपटू फ्लाइंगसीख मिल्खासिंग यांचा जन्म २० नोव्हेंबर १९२९ रोजी झाला.

    मिल्खा सिंग यांचा जन्म गोविंदपुरा स्थित शीख कुटुंबात झाला होता. मिल्खा सिंग यांनी आपल्या जीवनात ८० शर्यतीत भाग घेतला. त्यात ते ७७ वेळेस विजयी झाले. तीन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. १९५८ मधील कार्डिफ राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये मिल्खा सिंग यांनी 400 मीटरच्या शर्यतीत गोल्ड मेडल मिळवलं होतं. पण त्यांना सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली १९६० च्या रोम ओलिम्पिक स्पर्धेमुळे. त्या स्पर्धेत ४०० मीटरच्या शर्यतीत अगदीच सूक्ष्म फरकानं त्यांचं कांस्यपदक चुकलं होतं.

    रोम ऑलिम्पिकमध्ये मिल्खा सिंग यांनी ४०० मीटर शर्यत ४५.७३ सेकंदांमध्ये पूर्ण केली होती. जर्मनीचा धावपटू कार्ल कूफमॅनपेक्षा ते सेकंदाच्या १०० व्या भाग एवढ्या कमी फरकानं मागं राहिले होते. पण त्यांनी शर्यत पूर्ण केलेली ही वेळ त्यानंतर पुढचे ४० वर्षं राष्ट्रीय विक्रम म्हणून कायम होती.मिल्खा कॉमनवेल्थ खेळात वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारे स्वतंत्र भारतातील पहिले खेळाडू होते.१९५८ च्या टोकियो इथं झालेल्या आशियाई स्पर्धांमध्ये मिल्खा सिंग यांनी २०० मीटर आणि ४०० मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकलं होतं. तर १९६२ च्या जकार्ता आशियाई स्पर्धांमध्ये ४०० मीटर आणि ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीतही सुवर्ण पदक जिंकलं होतं.

    लष्करात जाण्याची मिल्खा सिंग यांची खूप इच्छा होती. त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला; मात्र तीन वेळा त्यांना अपयश आले. त्यामुळे त्यांनी लष्करात जाण्याचा विचार सोडला. मिल्खा सिंग यांना 'फ्लाइंग सीख' हे नाव पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आयुब खान यांनी १९६० मध्ये दिले होते. त्या वेळी मिल्खा यांनी पाकिस्तानचा सुवर्णपदक विजेता अब्दुल खालिकला पाकिस्तानातच हरवले होते. मिल्खा सिंगच्या आई-वडिलांचा मृत्यू फाळणीदरम्यानच्या दंगलीमध्ये झाला. मिल्खा यांचे लग्न भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाच्या माजी कर्णधार निर्मल कौरसोबत झाले. मिल्खा सिंग यांची पत्नी देखील एक खेळाडू होती. हे अनेक जणांना माहीत ही नसेल कदाचित. दोन महान खेळाडूंच्या मृत्यूमुळे क्रीडा जगतात शोककळा पसरली आहे. मिल्खा सिंह आणि त्यांची पत्नी निर्मला कौर यांची लव्हस्टोरी वेगळी आहे. मिल्खा सिंह हे पहिल्या नजरेतच निर्मला यांच्या प्रेमात पडले होते.

    मिल्खा सिंग आणि निर्मला कौर यांची पहिली नजर ही खेळाच्या मैदानावरच भिडली. तिथूनच त्यांच्या प्रेमाची गोष्ट सुरू झाली. मिल्खा सिंग यांचं अनेक मुलींसोबतच्या अफेअरच्या चर्चाही गाजल्या होत्या. एक दोन नव्हे तर तीन मुलींसोबत मिल्खा सिंह यांचं नाव जोडलं गेलं होतं. या मुलींसोबत प्रेमाचे किस्सेही चांगलेच रंगले होते. मात्र मिल्खा यांचा जीव जडला तो मैदानावरच्या हॉलीबॉल खेळणाऱ्या राणीवर.

    1955 मध्ये श्रीलंकेमध्ये मिल्खा सिंग आणि निर्मला कौर पहिली भेट झाली होती. याच ठिकाणी दोघांची एकमेकांशी ओळखही झाली. मिल्खा सिंग यांनी एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, ते पहिल्याच भेटीत निर्मला कौर यांच्या प्रेमात पडले होते. त्यावेळी कागद नसल्यानं निर्मला कौर यांच्या हातावर रुम नंबर लिहिला असल्याचा किस्साही फार गाजला आहे.
    पहिल्या भेटीनंतर 1958 मध्ये दोघांची भेट पुन्हा एकदा झाली. 1960 मध्ये दोघांची भेट पुन्हा एकदा दिल्लीतील नॅशनल स्टेडियममध्ये झाली. तेव्हा मिल्खा सिंग खेळातील मोठं नाव बनलं होतं. या काळात कॉफीसाठी एकत्र येताना त्यांचं प्रेम वाढत गेलं.

    दरम्यान या दोघांच्याही लग्नासाठी निर्मला कौर यांच्या घरातून मात्र विरोध होता. मिल्खा सिंग शिख असल्याने निर्मला कौर यांचे वडील दोघांच्या लग्नासाठी तयार नव्हते. त्यामुळे लग्नाच्या मार्गात अडथळा येत होता. अशावेळी पंजाबच्या तत्कालीन मुख्यमंत्री प्रताप सिंह कैरो यांना मध्यस्थी करावी लागली होती.

    १९६२ मध्ये मिल्खा आणि निर्मला या दोघांचं लग्न झालं. मिल्खा सिंग यांनी अनेकदा आपल्या पत्नीचे जाहीरपणे कौतुक केलं केलं होतं. ते आपल्या बायकोला स्वतःची सर्वात मोठी ताकद मानत असत.

    त्यांचा मुलगा जीव सिंग गोल्फचा प्रसिद्ध खेळाडू आहे. भारत सरकारने त्यांना अर्जून पुरस्कार आणि ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

    भाग 'मिल्खा भाग मिल्खा' हा चित्रपट मिल्खा सिंग यांच्या १९४६ ते १९६० पर्यंतच्या जीवनावर आधारित बायोपिक आहे. यात फरहान अख्तर यांनी मिल्खा सिंग यांचा अभिनय केला आहे. या वयात ही मिल्खा सिंग हे देशातल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम करत असत. यासाठी सरकारनंही त्यांना मदतीचा हात दिला होता. मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल मिल्खा सिंग यांचं १३ जून २०२१ कोरोनामुळं निधन झाले होते.

    मिल्खा सिंग यांचे १८ जून २०२१ रोजी निधन झाले.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

      June 18, 2022


  • (डॉ.) राजू मानकर

    लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाने गेल्या दोन दशकांच्या कालावधीत नेमकी काय कामगिरी केली, याची उच्चशिक्षणविश्वाला फारशी माहिती नाही. या विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्यासाठी अभियांत्रिकीच्या ‘सीईटी’त चढाओढ नसते, कोकणच्या भूमिपुत्रांनाही मुंबई-पुण्यातील संस्थांचीच भुरळ पडते. म्हणूनच या विद्यापीठाचे पाचवे कुलगुरू म्हणून कार्यभार स्वीकारताना डॉ. राजू मानकर यांच्यासमोर अपेक्षांचा ‘कोकणकडा’च सर करण्याचे आव्हान आहे! नागपूर विद्यापीठातून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये ‘एमटेक’ला सुवर्णपदक पटकावून त्यांनी जर्मनीतून ‘पीएच.डी.’ संपादन केली. त्यानंतर डॉ. मानकर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन, अध्यापन प्रकल्पांमध्ये सहभागी झाले.

    भारती विद्यापीठातून प्राध्यापकीला प्रारंभ केल्यानंतर लोणेरे तंत्रज्ञान विद्यापीठातच १९९२ ते २००५ या कालावधीत पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंगचे असिस्टंट प्रोफेसर म्हणून त्यांनी काम पाहिले. नागपूरच्या लक्ष्मीनारायण इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक म्हणून जबाबदारी सांभाळल्यानंतर आता ते कुलगुरू होत आहेत. साहजिकच, तंत्रज्ञान विद्यापीठाकडून समाजाला नेमकी कोणती अपेक्षा आहे, याची डॉ. मानकर यांना पूर्ण जाणीव आहे. ‘अभियांत्रिकी संशोधनाचा वेग व दर्जा वाढविण्याची किती गरज आहे, याची मला कल्पना असून, त्या दिशेनेच विद्यापीठातर्फे विविध प्रकल्प राबविण्यात येतील,’ असे डॉ. मानकर सांगतात.

      August 4, 2017


  • कोकणातील उभारता गायक कुणाल भिडे

    देवरूख येथील अक्षय पाटील याने बनवलेल्या ‘अजाण’या लघुपटाला कुणालने आपल्या मित्रांच्या सोबत संगीत दिले आहे. हा लघुपट नाशिक येथील फेस्टिव्हल मध्ये दाखवला गेला होता.

      June 7, 2022


  • भालचंद्र दिगंबर उर्फ आबासाहेब गरवारे

    आबासाहेब गरवारे यांना नक्कीच महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील एक प्रमुख शिल्पकार म्हणून मानले जाते. गरवारे उद्योगसमूहाचे ते संस्थापक होते. शून्यातून उद्योग सुरू करून त्यांनी गरवारे मोटर्स, गरवारे नायलॉन्स, गरवारे प्लॅस्टिक्स, गरवारे पेंट्स, गरवारे फिलामेंट कॉर्पोरेशन, गरवारे वॉल रोप्स अशा अनेक कंपन्या त्यांनी स्थापन केल्या.

      July 7, 2019


  • गझल किंग’ जगजित सिंह

    १९७६ मध्ये त्यांचा पहिला अल्बम ‘अनफरगेटेबल’ प्रकाशित झाला. त्यानंतर आजतागायत त्यांच्या नावावर ‘आईना’, ‘चिराग’, ‘कहकशॉं’ असे जवळपास ८० अल्बम आहेत. मेहंदी हसन, नूर जहॉं, बेगम अख्तर आणि तलत महमूद या गझलांच्या चमचमत्या दुनियेत ‘पत्ता पत्ता बुता बुता हाल हमारा जाने है’, ‘ओठोंसे छू लो तुम’ अशी अविस्मरणीय गझलांनी जगजीत सिंह यांनी आपले स्थान या क्षेत्रात बळकट केले.

      October 31, 2017


  • शाहरुख खान

    चाहत्यांतर्फे किंग खान ही उपाधी मिळालेला शाहरूख खान दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीचा विशिष्ट काळ गाजवणारा अभिनेता म्हणूनही ओळखला जातो. त्याचा जन्म २ नोव्हेंबर १९६५ रोजी झाला. वीसेक वर्षांपूर्वी "फौजी' नावाची मालिका दूरदर्शनवरून प्रसारित व्हायची. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या मालिकेतील नायकाने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळविले. रुपेरी पडद्याच्या दिशेने टाकलेले शाहरुख खानचे ते पहिले पाऊल होते. त्यानंतर "दिल दरिया', "दूसरा केवल', "सर्कस' अशा काही मालिकांमध्ये त्याने काम केले. "दीवाना' या चित्रपटानंतर त्याने टीव्हीसाठी काम थांबवले. चित्रपटांतच त्याला भरभरून यश मिळाले.

    आमीर खानने सोडलेला रोल शाहरुख खानने पटकावला आणि इथूनच यश चोप्रा-शाहरुख खान हे नवे कॉम्बिनेशन जन्मले. आमीर खानची चूक त्याच्यासाठी एक नवा प्रतिस्पर्धी निर्माण करून गेली. प्रत्येक सीनचा किस पाडणारा आमीर खान आणि कथा काय आहे, हेही न विचारणा शाहरुख खान या दोघांच्यात यश चोप्राने शाहरुख खानची निवड केली. शाहरुख खान सुपरस्टार झाला १९९२ मध्ये प्रदर्शित दीवाना या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. बाजीगर, डर या चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका त्याने साकारल्या.

    १९९५ सालच्या आदित्य चोप्रा दिग्दर्शित दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ह्या चित्रपटामध्ये प्रणय नायकाची भूमिका करून आपली पडद्यावरील प्रतिमा बदलली. त्यानंतर करण जोहर याच्या दिग्दर्शनाखाली कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम या चित्रपटांत त्याने भूमिका केल्या. पडद्यावरची त्याची व काजोलची गाजलेली लोकप्रिय जोडी आहे. शाहरूख खानने ५० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. त्याला १४ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले असून फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार आठ वेळा मिळवणारा तो दिलीप कुमारसह दुसराच अभिनेता आहे.

    २००५ साली त्याला भारत सरकारतर्फे पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. रेड चिलीज एंटरटेन्मेन्ट ह्या कंपनीचा तो सह-मालक आहे. भारतीय प्रिमीयर लीगमधील कोलकाता नाईट रायडर्स ह्या संघाचा देखील तो सह-मालक आहे. मात्र, सुपरस्टार झाला तरीही शाहरुखने टीव्हीबरोबर आपले नाते तोडले नाही. "कौन बनेगा करोडपती?', "क्या, आप पॉंचवी पास से तेज है?', "जोर का झटका- टोटल वाइप आउट' यासारखे "रिऍलिटी शो' तो आतापर्यंत करत आला. २००८ मध्ये न्यूजवीक साप्ताहिकाने शाहरूखला जगातील ५० सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये स्थान दिले तर २०११ मध्ये लॉस एंजेल्स टाइम्स वृत्तपत्राने त्याचा जगातील सर्वात यशस्वी चित्रपट अभिनेता ह्या शब्दांत गौरव केला. आज त्याची जी ‘रोमँटिक हिरो’ म्हणून ओळख आहे, त्यामागे त्याची अफाट मेहनत आहे ‘बादशहा‘ चित्रपटानंतर बॉलिवडूचा बादशहा म्हणून, तर कधी किंग खानला संबोधले जाते. भारताबरोबरच विदेशातही शाहरुखच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 11, 2017


  • राम फाटक

    पुणे आकाशवाणी केंद्रावर असतानाच ज्येष्ठ गायक आणि संगीतकार सुधीर फडके ह्यांच्याशी त्यांचा स्नेह जुळला. सुधीर फडक्यांच्या गीतरामायणामधील काही गाणी ते गायले. आकाशवाणीच्या पुणे केंद्रासाठी त्यांनी शास्त्रीय संगीत गायिका बेगम परवीन सुलताना यांच्याकडून काही मराठी भावगीते गाऊन घेतली.

      July 26, 2022


  • आंतरराष्ट्रीय पंच रोशन महानामा

    रोशन महानामा यांनी १९९७-९८ मध्ये कोलंबो येथे सनथ जयसूर्यासह दुसऱ्या विकेटसाठी ५७६ धावांची भागीदारी रचली. कसोटीत आजही हा विक्रम कायम आहे. दोन दिवस फलंदाजी करणारी ही पहिली जोडी ठरली. त्यांच्या या कामगिरीमुळे श्रीलंकेने ६ बाद ९५२ धावा केल्या. हाही एक विक्रम ठरला होता.

      May 31, 2022


  • नाटककार व साहित्यिक प्रा.दिलीप परदेशी

    प्रा. दिलीप परदेशी यांचा कथा लेखना पासून प्रवास सुरु झाला. प्रा. परदेशी हे विलिंग्डन महाविद्यालयात सुमारे तीन वर्षे प्राध्यापक होते. त्या नंतर त्यांनी प्रदीर्घ काळ पुण्यात फर्गसन्‌ व बृहन्‌ महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात अध्यापन केले. विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यांचे आजोबा पैलवान मारुतराव परदेशी सांगलीतील बडे असामी होते. साहित्याच्या वंशपरंपरेपासून दूर असलेल्या परदेशी यांनी मराठी नाटकात स्वतःचीच वाट तयार केली. त्यांनी सुमारे तीसहून अधिक नाटक व एकांकिका लिहिल्या.

    राज्य नाट्यस्पर्धेत त्यांनी सांगलीला वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवले. अखिल भारतीय नाट्यविद्या मंदिर समितीने त्यांची अनेक नाटके राज्य नाट्यस्पर्धेत सादर करताना पुरस्कार पटकावले. त्यांच्या "काळोख देत हुंकार' या नाटकाने राज्य नाट्य स्पर्धेत प्रचंड लोकप्रियता मिळवली. एक वर्ष तर असे होते, की त्यावर्षी अंतिम फेरीत महाराष्ट्रातील पाच नाट्य संस्थांनी नाटक सादर केले. चंदू पारखी, रिमा लागू, सदाशिव आमरापूरकर या यशस्वी कलावंताना त्यांच्या नाटकांमधून ब्रेक मिळाला. हिंदी चित्रपट अभिनेते देवानंद यांच्याशीही त्यांचा स्नेह होता. त्यांच्या "हम नौजवान' आणि "सच्चे का बोलबाला' या चित्रपटाचे संवाद लेखन त्यांनी केले.

    "सर्वमान्य नाटककार म्हणून प्रा. परदेशी यांनी महाराष्ट्रात लौकिक मिळवला. विदर्भात त्यांच्या नाटकांचा मोठा रसिकवर्ग होता. ते चांगले कवी होते, म्हणूनच नाटककार होऊ शकले. प्रयोगशीलता, व्यक्तीरेखेतील नेमकेपणा आणि प्रभावी संवाद लेखन ही त्यांच्या नाटकाची वैशिष्ट्ये होती. त्यांची ४५ नाटके व ३०० कविता, ४० कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. महाद्वार, फिनिक्स, मन पिंजर्याचे, काळाजपूर्वा ह्या एकांकिका व स्व्पन एका वाल्याचे, काळोख देते हुंकार,गोष्ट तशी जुनींच पण....,तळहातीच्या नाजूक रेषा,मन धुवाधार, निष्पाप,थेंब थेंब आभाळ, अश्या अनेक प्रोयोगीक व व्यवसाईक रंगभुमीवरील नाटकांनी त्यांना प्रसिध्दी मिळवुन दिली.

    देवआनंद साहेब व दिलीप परदेशी यांचा विशेष स्नेह होता. देव साहेबांच्या हम नौजवान,व सच्चे का बोलाबाला या चित्रपटांच्या कथा व संवाद लेखन प्रा. दिलीप परदेशी यांनी केले आहे. त्यांनी काही मराठी चित्रपटात भूमिका पण केल्या आहेत. शेक्सपियरचे "ज्युलीयस सिझर' नाटक त्यांना मराठीत वेगळ्या ढंगात आणायचे होते. नाटककार वसंत कानेटकर यांनी एका जाहीर समारंभात "मी तुम्हाला उद्याचा वसंत कानेटकर देतो' अशी शब्दात त्यांची ओळख करून दिली होती. प्रा.दिलीप परदेशी ४ नोव्हेंबर २०११ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

      November 7, 2017


  • मराठी चित्रकार जनार्दन दत्तात्रेय गोंधळेकर

    ज.द. गोंधळेकर हे टाइम्स ऑफ इंडियाचे कलादिग्दर्शक होते. ते चांगले शिक्षक, संस्थाचालक आणि दूरदृष्टी असलेले कलावंत होते. जर्मनी, बेल्जियम या देशांत आणि लॅटिन अमेरिकेत भरलेल्या अनेक चित्रप्रदर्शनांत गोंधळेकरांची चित्रे झळकली आहेत. गोंधळेकरांची ५०-६०चित्रे जगातील कलादालनांची शोभा वाढवत आहेत.

      April 22, 2022