जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात काही अशा युती झाल्या ज्यांनी सिनेमाचा इतिहास कायमचा बदलून टाकला. अशीच एक अभूतपूर्व जुळणी म्हणजे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि दिग्गज संगीतकार जोडी कल्याणजी-आनंदजी. १९७० आणि १९८० च्या दशकात जेव्हा अमिताभ बच्चन चित्रपटसृष्टीत संघर्ष करत होते आणि नंतर जेव्हा त्यांनी सुपरस्टारपद गाजवले, तेव्हा त्यांच्या पडद्यावरील व्यक्तिमत्त्वाला संगीताची खरी ताकद कल्याणजी-आनंदजी यांनीच दिली. आनंदजी आणि अमिताभ बच्चन यांच्यात केवळ व्यावसायिक संबंध नव्हते, तर अतिशय कौटुंबिक आणि आदराचे नाते होते. अमिताभ बच्चन जेव्हा जेव्हा गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी जात, तेव्हा ते सर्वात आधी आनंदजींच्या पत्नीचे पाय छूकर आशीर्वाद घेत असत, इतकी आपुलकी त्यांच्यात होती.
August 2, 2026
मराठी कथाविश्वाला जळजळीत वास्तवदर्शी संकल्पनांचा स्पर्श देवून वाचकांना त्यांनी कधी स्वप्नातही ज्याची कल्पना केली नसेल, अशा भयाण परंतु भारतात अनेक ठिकाणी अस्तित्वात असलेल्या विश्वाची सैर, प्रत्यक्ष अनुभवायला कोणी लावली असेल तर ती चारूता सागर ह्यांनीच. गरीब लोकांचे जीवन, त्यांच्या व्यथा, वेदना, अपेक्षा, व माणुस म्हणून इतरांकडून त्यांना किमान मानाची वागणूक मिळावी, अशी त्यांची रास्त आशा जेव्हा पुर्ण झाली नाही तेव्हा, चारूता सागरांची कथा जन्माला आली.
August 18, 2011
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेता अतुल कुलकर्णीचे नाव मराठी चित्रपटसृष्टीत आदराने घेतले जाते. आत्तापर्यंत ७ भाषांमधून ६० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलेल्या अतुलने अनेक मानसन्मान प्राप्त केले. हा संवेदनशील अभिनेता सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर आपल्या लेखांद्वारे आणि मुलाखतींमध्ये रोखठोक मते मांडतांना पाहायला मिळतो. ‘हे राम’, ‘चांदनी बार’, ‘खाकी’, ‘पेज ३’, ‘रंग दे बसंती’, ‘वळू’, ‘नटरंग’, ‘पोपट’, ‘एका प्रेमाची गोष्ट’सारख्या चित्रपटांमधून त्याने लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत.
September 10, 2017
ख्यातनाम कादंबरीकार, कथालेखक नारायण हरी आपटे. त्यांचे लघुकथासंग्रह आणि वैचारिक लेखनही प्रकाशित झाले आहे. त्यांची एकूण ग्रंथसंख्या सुमारे ७५ इतकी आहे.
October 27, 2016
भावपूर्ण आणि लाघवी चेहरा, बोलके डोळे, उंच तसंच शिडशिडीत बांधा असंच काहीसं वर्णन इंदूमती पैंगिणकर यांच्या व्यक्तिमत्वाचं करता येईल. अभिनयासोबतच लेखिका म्हणून त्यांनी मिळवलेली ओळख ही सुद्धा त्यांचा महत्वाचा पैलू असल्याचं सांगते.
March 28, 2013
पॉंडेचरीमधील स्पर्धेत दिव्या देशमुख या नागपूरच्या चिमुरडीने सात वर्षांखालील विद्यार्थ्यांच्या बुद्धिबळ स्पर्धेत राष्ट्रीय जेतेपद पटकावले आणि तिची विजयी घोडदौड सुरु झाली. त्यानंतर अवघ्या दोन वर्षांत जगातील सर्वांत कमी वयाची वुमन फिडे मास्टर हा किताब तिच्या नावावर नोंदला गेला आहे. नुकत्याच चेन्नई येथे झालेल्या नऊ वर्षांखालील मुलींच्या २७ व्या राष्ट्रीय स्पर्धेत दिव्याने विजेतेपद पटकावले.
दिव्या देशमुख यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला 'दिव्य' त्वाची जेथ प्रचीती हा लेख पुढील पानावर वाचा.
दिव्या देशमुख यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला 'दिव्य' त्वाची जेथ प्रचीती हा लेख वाचा.
September 8, 2015
गोमंतक भूमीचे जग प्रसिद्ध चित्रकार.त्यांचा जन्म १८ एप्रिल १९१० रोजी झाला.विश्वनाथ नागेशकर, हे कोल्हापूरचे चित्रकार. त्यांच्या चित्रांमधून भारतीय आणि पाश्चीमात्य चित्र परंपरेचा सुरेख संगम दिसत असे. विश्वनाथ नागेशकर यांचे फोंडा, गोवा नजीकच्या नागेशी या निसर्गरम्य व श्री नागेशाचे वरदहस्त लाभलेल्या गावात बालपण गेले. त्यांनी कोल्हापूरचे कलाप्रेमी छत्रपती मा.शाहू महाराजांच्या मदतीने मुंबईच्या प्रसिद्ध जे.जे. स्कूल ऑफ आर्टसमध्ये प्रवेश घेतला. तेथे डिप्लोमा घेतल्यानंतर १९३५ साली उच्चशिक्षणासाठी ते जर्मनीला गेले. पॅरिसच्या एकोल नॅशनल स्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. जर्मनीतील म्युनिच आर्ट स्कूलमध्ये २ वर्षाचा चित्रकलेचा कोर्स पूर्ण केला. शिक्षण पूर्ण करताना सन्माननीय अलेक्झांडर वॉन, हॅम्बोल्टची स्कॉलरशीप मिळवली. त्यानंतर बर्लिन अकादमीच्या भव्य आर्ट स्कूलमध्ये प्रवेश घेतला. सतत कलासाधनेत मग्न असा भारतीय हुशार व प्रामाणिक विद्यार्थी म्हणून ओळख. प्रो. स्टुब यांचे उत्तम मार्गदर्शन मिळाले. जर्मन कलाजगतात चांगली ओळख निर्माण झाली. प्रो. स्टुब आर्ट गॅलरीतील प्रदर्शनात त्यांची चित्रे पाठवत. म्यूरल्स हा खास आवडीचा विषय त्यामुळे युरोपात बदलत गेलेल्या शिल्पकलेचाही अभ्यास केला. दुसऱ्या महायुद्धात स्वतःचे घर, स्टुडिओ, पेटिंग्ज बेचिराख होताना पाहिले. नाझींच्या त्रासातून लंडनला जावे लागले. एडना नावाच्या जर्मनीशी त्यांनी विवाह केला. एकना यांनी मा.विश्वनाथ नागेशकर यांना आणि त्यांच्या चित्रकलेला आयुष्यभर जपले. या दोघांच्या जीवनप्रवासाची, कलाप्रवासाची ही कहाणी आहे. आपल्या कुंचल्याच्या सामर्थ्याने निर्माण केलेल्या चित्रकृतींमुळे नागेशकरांनी परदेशात अभूतपूर्व यश व किर्ती मिळवली. भारत सोडून जर्मनीत स्थायिक होणारे नागेशकर हे स्वातंत्र्यपूर्व काळातील भारताच्या कलाक्षेत्रातील खरे धाडसी चित्रकार. लंडनचा निरोप घेतल्यावर संपूर्ण युरोपचा प्रवास, म्युझियम, कलादालन पटात राहिले. १९५५ नंतर पुन्हा जर्मनीला स्थायिक. एडना व त्यानंतर विश्वनाथ नागेशकरांच्या मृत्यूनंतर त्यांची सर्व उपलब्ध चित्रे व त्यांच्या वापरातील वस्तू कोल्हापूरला मा.जयसिंग नागेशकर यांच्याकडे पाठवल्या. त्यांनी पुढाकार घेवून या पुस्तकाची लेखनाची जबाबदारी माधवीताई देसाई व प्रकाशनाची जबाबदारी मुक्ता पब्लिशिंग हाऊसवर सोपविली. तसेच मुंबई, पुणे, गोवा, सांगली येथे चित्र प्रदर्शने भरविली. अशा प्रकारे देशी व परदेशी चित्रकलेतील विविध प्रकारांचे ज्ञान आत्मसात करुन आपल्या कलेच्या सामर्थ्यावर तेथेच स्थायिक झालेल्या दुसऱ्या महायुद्धात सर्वस्व गमाहूनही त्याचा परिणाम आपल्या चित्रकृतींवर न होवू देता आपल्या असंख्य कलाकृतींनी जागतिक कीर्ती संपादन केली. मा.विश्वनाथ नागेशकर यांचे १८ मार्च २००१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आपल्या मातृभूमीशी परिवाराशी जीवनभर नाते जपणाऱ्या या जगविख्यात चित्रकाराचे जीवन, कार्य, कर्तृत्व यावर विश्वरंग नावाचे पुस्तक आहे. पुस्तकात त्यांची १६ रंगीत चित्रे दिली आहेत.
http://www.discountpandit.com/products/Rohtak/books/Vishwarang-Paperback-Marathi-price-in-
india-NzUxNzI=.html
विश्वनाथ नागेशकर यांची वेबसाईट.
http://www.nageshkarart.com/
March 21, 2017
लता मंगेशकर
December 15, 2010
किराणा घराण्याच्या गौरवास्पद अशा माळेतील आणखी एक लखलखता मोती, म्हणून माननीय पंडित श्रीकांत देशपांडे यांनी मराठी रसिकांच्या हृद्यसिंहासनावर गेली कित्येक वर्षे आपल्या दैवी आवाजाने अधिराज्य केले आहे. ते पंडित सवाई गंधर्वांचे नातू होते. त्या अर्थाने त्यांच्या धमन्यांमधून संगीताचे मंगल स्वर वाहत असणारच.
July 26, 2011
सुप्रसिध्द मराठी संगीतकार श्रीनिवास खळे यांचा जन्म ३० एप्रिल १९२६ रोजी बडोदा येथे झाला होता;खळे यांनी भावपूर्ण गीतांनी मराठी रसिकांना सहा दशकांहून अधिक काळ संगीतमोहिनी घातली. बडोदा आकाशवाणीत संगीतकार म्हणून काही वर्षे नोकरी केल्यानंतर श्रीनिवास खळेंनी मुंबई गाठली. पण त्यांना काम मिळेना.
April 24, 2014
Copyright © 2025 | Marathisrushti