जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
भारत आणि इस्रायल यांच्या संयुक्त भागीदारीतून फिनोलेक्स प्लॅसन लि. ही कंपनी त्यांनी स्थापन केली. इस्रायलबरोबर उद्योगाची भागीदारी करणारी फिनोलेक्स ही देशातील पहिली कंपनी ठरली.
March 12, 2022
शास्त्रीय संगीतावर आधारित गीते म्हणण्याविषयी कुशल अशी प्रसिद्धी असूनही मन्ना डे यांची अवखळ गीतेही तितकीच प्रसिद्ध झाली.
October 24, 2016
आजही महाराष्ट्रातल्या न्यायालयात जेव्हा एखाद्या मराठी शब्दाचा अर्थ लावण्याची वेळ येते तेव्हा मोल्सवर्थने दिलेला अर्थ न्यायाधीश प्रमाण मानतात.
June 15, 2022
संभाजी राजांची पराक्रमी, संकटाला धीरोदात्तपणे तोंड देणारी, धोरणी, मुत्सद्दी अशी तेजस्वी प्रतिमा लोकांसमोर आणण्याचं श्रेय बेंद्रे यांचंच. तसंच संभाजीराजांची वढू गावाची समाधीसुद्धा त्यांनीच शोधून जगासमोर आणली होती.
February 13, 2022
चंद्रसेन (हॅम्लेट), झुंझारराव (ऑथेल्लो), मानाजीराव (मॅक्बेथ) आणि प्रतापराव (टेमिंग ऑफ द श्रू ) या त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या. अत्यंत सुरेल व असाधारण तेजस्वी आवाज हे गणपतरावांच्या अभिनयाचे प्रमुख वैशिष्ट्य होते.
June 25, 2022
कथा,कदंबरी,प्रवासवर्णन,ललित असे विविध साहित्य प्रकार हाता़ळणारे,विविधांगी लेखन करुन आपल्या प्रतिभेचा साक्षात्कार करुन देणारे प्रख्यात शैलीदार ललित लेखक रवींद्र पिंगे यांनी ‘प्राजक्ताची फांदी’,’मोकळ आकाश’,’मुंबईचं फुलपाखरु’,’आनंदपर्व’, ‘आनंदाच्या दाही दिशा’ देवाघरचा पाऊस’ असे ३२ पुस्तकांचे लेखन त्यांनी केले होते.
July 20, 2022
लोकसेवा व विकास संस्थेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा कस्तुरबा गांधी पुरस्कार यंदा गंगूबाई वर्धने यांना जाहीर झाला आहे. अत्यंत विपरीत परिस्थितीतून मार्ग काढणारी तेजस्वी प्रकाश शलाका म्हणजे गंगूबाई वर्धने, अशी त्यांची ओळख आहे. वर्धा जिल्ह्यातील देवळी हे त्यांचे जन्मगाव. वयाच्या तिसर्या वर्षी वडिलांचे व नवव्या वर्षी आईचे निधन झाल्यावर अंगावर गरिबीची कुर्हाड कोसळुनसुध्दा गंगूबाईंनी अतिशय धैर्याने व स्वत:च्या पायावर उभे राहून बहीण-भावांचा सांभाळ केला.
July 26, 2011
१९२६ साला पासून या जोडीनी खरी धमाल सुरू केली. त्यांचा जन्म १६ जुन १८९० रोजी झाला. लॉरेल हा सडपातळ, काहीसा कुरकु-या आणि हार्डी लठ्ठ नि मस्तमौला. दोघांची एकमेकांवर चाललेली कुरघोडी, त्यांचा एकत्र गोंधळ आणि मस्ती यावर प्रेक्षक तुडूंब प्रसन्न होते. सा-या जगभर या जाड्या-रड्याचा धुमाकूळ चालू होता. जगातल्या सुमारे वीस भाषांमध्ये हे लघु-चित्रपट अनुवादित झाले आणि पुन:पुन्हा पाहिले गेले. स्टॅन लॉरेल आणि ऑलिव्हर हार्डी या जोडीनं हॉलिवूडमध्ये तब्बल १०७ चित्रपट केले. ही संख्या त्यांच्या एकत्र असलेल्या चित्रपटांची आहे. यात एकूण ३२ मूक-लघुपट, ४० लघुपट आणि २३ पूर्ण लांबीचे चित्रपट आहेत. शिवाय १२ चित्रपटांमध्ये त्यांनी पाहुण्या कलाकारांची भूमिका केली होती. त्यापूर्वी म्हणजे त्यांची जोडी होण्यापूर्वीच लॉरेलनं ५० आणि हार्डीनं तर चक्क २५० चित्रपटांमधून भूमिका केल्या होत्या.
१९२१ मध्ये ‘द लकी डॉग’ हा त्यांचा एकत्र असा चित्रपट आला होता, पण तो ‘लॉरेल-हार्डी’ जोडीचा चित्रपट म्हणून ओळखला जात नाही. तेव्हाच त्यांची जोडी करायला हवी होती, पण त्यांना नंतर एकत्र आणलं हाल रोच या निर्मात्यानं. हे साल होतं १९२६. ‘लॉरेल-हार्डी’ आणि ‘अवर गँग’ या हाल रोच यानं जगाला बहाल केलेल्या दोन लघुपट मालिका आहेत. पैकी लॉरेल हार्डीचं यश प्रचंड मोठं होतं. पुटींग पँट्स ऑन फिलिप’ हा लॉरेल-हार्डीचा एकत्र असा पहिला लघुपट आला १९२७ मध्ये. हा मूकपट होता.
१९४० पर्यंत ते ‘हाल रोच स्टुडिओज्’ बरोबर होते. त्यानंतर पाच वर्षं त्यांनी ‘ट्वेंटीएथ सेंच्युरी फॉक्स’ आणि ‘एमजीएम’ बरोबर एकूण आठ चित्रपट केलेत. आपला शेवटचा चित्रपट ‘अॅ टॉल के’ केल्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीतून रीतसर निवृत्ती घेतली. ‘द म्युझिक बॉक्स’ हा त्यांचा सगळ्यात गाजलेला चित्रपट, ‘द म्युझिक बॉक्स’ या चित्रपटाला पहिलं ऑस्कर मिळालं होतं आणि १९६० मध्ये स्टॅन लॉरेल यांना अॅ केडेमीचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला होता. स्टॅन लॉरेल यांचे २३ फेब्रुवारी १९६५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ प्रसाद नामजोशी
लॉरेल हार्डी चे चित्रपट
https://www.youtube.com/watch?v=YLXjxu1VWZ4
https://www.youtube.com/watch?v=ftYjyEi7dpQ
https://www.youtube.com/watch?v=YzqPoeuGwsE
https://www.youtube.com/watch?v=zTAPZTfIXVE
June 23, 2018
केशवराव यांचे वडील वैद्यकी करत. कोल्हापुरात भोसले वैद्य म्हणून ते परिचित होते. त्यांचा जन्म ९ ऑगस्ट १८९० रोजी कोल्हापूर येथे झाला. पण लहानपणीच वडील वारले आणि घराचं घरपण नाहीसं झालं. चार चिमण्या जिवांची जबाबदारी आईवर पडली. दत्तू, केशव, नारायण आणि एक अगदी छोटी लहान बहीण. त्यांच्या आईला मोलमजुरीसाठी घराबाहेर पडणं भाग पडलं. त्यावेळी ‘स्वदेशी हितचिंतक’ नाटक कंपनीचा मुक्काम कोल्हापुरातच होता. ‘विद्याविलास’कार शंकरशास्त्री गोखले यांच्या मध्यस्थीने, त्यांची आई घरकामासाठी कंपनीत जाऊ लागली.
आईबरोबर दत्तू आणि केशवही होतेच. दोन्ही मुलगे मोठे चुणचुणीत होते. कंपनीचे मालक जनुभाऊ निमकर यांनी त्या दोघांना वरकामासाठी कंपनीत ठेवून घेतले. त्यावेळी दत्तू नऊ वर्षांचा आणि केशव अवघा चार वर्षांचा होता.
‘स्वदेशी हितचिंतक’ नाटक मंडळी हे एक मोठं कुटुंबच होतं. कुटुंब प्रमुख जनुभाऊ मोठे व्यवहार कुशल आणि करड्या शिस्तीचे होते. व्यवसाय नाटकाचा असला तरी कंपनीचं वातावरण अगदी घरगुती होतं. कुठे नाटकाची तालीम सुरू आहे, कुणी आपली नक्कल पाठ करतो आहे, कुणी तंबोरा जुळवून रियाज करतो आहे, कोणी ताला-सुरात आपलं गाणं पक्क करतो आहे. अशा अनोख्या पण आवडत्या वातावरणात दत्तू आणि केशव तिथे रंगून जात होते.
कंपनीतल्या मुलांना गाणं शिकवण्यासाठी दत्तूबुवा जांभेकर होते. दत्तूबुवा जांभेकर हे केशवरावांचे गानगुरू आणि जनुभाऊ निमकर हे नाट्यगुरू. इतर मुलांबरोबर केशव कंपनीत गाणं शिकू लागला. त्याची गाण्यातली चमक लक्षात यायला बुवाना वेळ लागला नाही. ‘हे पाणी काही वेगळं आहे’ अशी बुवांची खात्री पटली आणि बुवा त्याच्याकडे अधिक लक्ष देऊ लागले.
बालकलाकार म्हणून केशव हळूहळू रंगभूमीवर वावरू लागला. कधी त्याला स्त्री पात्राची भूमिका करावी लागत असे. तो प्रेक्षकांच्या प्रथम नजरेत भरला तो ‘शारदा’ नाटकातल्या ‘वल्लरी’च्या मिष्किल भूमिकेत. ते काम तो मोठ्या ठसक्यात करी. त्याचं कौतुकही होऊ लागलं.
कंपनीचा मुक्काम पंढरपूरला होता. खेळ चालू होते. शनिवारचा कंपनीचा पेटंट खेळ ‘शारदा’ जाहीर झाला होता. गुरूवारपासून तिकीट विक्री चालू झाली होती. पण नाटकात ‘शारदे’ची भूमिका करणारा कृष्णा देवळी हा अचानक आजारी पडला. तो तापाने फणफणत होता. शनिवारचा खेळ रद्द करावा अशी बोलणी सुरू झाली. इतक्यात छोटा केशव जनुभाऊंसमोर येऊन धीटपणे म्हणाला, ‘खेळ बदलू नका, मी करतो शारदा! माझी नक्कल पाठ आहे.
गाणी तयार आहेत! घ्या म्हणून हवी तर...’ तो एका दमात भराभर बोलत होता. मालक जनुभाऊ म्हणाले, ‘अरे वेड्या, एवढं मोठं काम तुला एकदम कसं झेपेल?’ त्यावर तो ताडकन म्हणाला, ‘मी खरंच करीन! एकदा पहा तर खरं! माझं काही चुकलं तर थोबाडीत मारा!’ जनुभाऊ कौतुकानं त्याच्याकडे बघू लागले आणि त्यांना एकदम काय वाटलं कुणास ठाऊक? मॅनेजर म्हैसकरना ते म्हणाले, ‘यादीत ‘शारदे’साठी केशवचं नाव टाका!
दोन दिवस कसून तालमी झाल्या.केशव आनंदाने फुलून आला होता.
शनिवार उजाडला. रात्री नाटकाचा पडदा वर गेला. जनुभाऊंच्या पायावर डोकं ठेवून केशव रंगभूमीवर गेला. स्टेजवर तो असा वावरत होता की जसं काही तो नेहमीच रोजचंच काम करत होता. शारदेच्या भूमिकेत तो सुरेल गायला आणि सुंदर दिसत होता. ‘मूर्तिमंत भीती उभी’ हे पद असं गायला की प्रेक्षकांतून ‘वन्समोअर’ वर ‘वन्समोअर’ मिळत होते. प्रेक्षक शारदेला रंगभूमीवरून आत जायलाच देत नव्हते. शेवटी जनूभाऊ स्टेजवर आले आणि केशवला जवळ घेऊन प्रेक्षकांना म्हणाले, ‘‘पोरगं लहान आहे, दमलं आहे. सांभाळून घ्या. क्षमा करा!’’ जनुभाऊंचे आणि प्रेक्षकांचेही डोळे अश्रूंनी भरून आले होते. त्या दिवसांपासून केशव ‘हितचिंतक’ ‘रंगशारदा’ ठरला. वय होतं फक्त दहा वर्षे! साल होतं, १९०१!
‘शारदे’चं अपरंपार कौतुक झालं. प्रयोग रंगू लागले. पैशांचा पाऊस पडू लागला. उभ्या महाराष्ट्रात केशवरावांचं नाव झालं. सौभद्र, मृच्छकटिक, इत्यादी खेळ रंगू लागले. सुभद्रा, वसंतसेना केशवरावांकडेच आल्या. प्रेक्षक खेळांना गर्दी करू लागले. साहजिकच आपल्यामुळेच उत्पन्न भरपूर मिळतं. हे दत्तोबा आणि केशवराव यांच्या मनात यायला वेळ लागला नाही. कौतुक होत होतं. पण त्यांच्या हातात पैसे अधिक पडत नव्हते. आईला आता जास्त पैसे पाठवावेत, असं त्यांना वाटत होतं. पण ते जमत नव्हतं. जनुभाऊंकडे विषय काढला तरी ते लक्ष देत नव्हते. खूप धीर धरला, पण शेवटी एक दिवस सगळ्या मित्र मंडळींनी उचल खाल्ली आणि सगळेजण कंपनी सोडून बाहेर पडले.
‘जो पगार घेणार नाही तो मालक’ या तत्त्वावर नवीन कंपनी सुरू करण्याचं ठरलं. नोकरांपेक्षा मालकच जास्त! सुरूवातीला वीस-एकवीस मालक होते, पण कंपनी सुरू झाली तेव्हा दत्तोबा आणि केशवराव हे दोघे भाऊ, आणि वीरकर बेडेकर असे स्नेही मिळून सात आठ मालक झाले. कंपनीची स्थापना हुबळी मुक्कामी, सिद्धरूढ स्वामींच्या शुभाशीर्वादाने झाली. कंपनीचं नाव केशवरावांनी सुचवलं. ‘ललित कलादर्श नाटक मंडळी’ तो दिवस होता. एक जानेवारी १९१० आणि तेव्हा केशवराव होते अवघे अठरा वर्षाचे! त्या काळातली ‘ललित कलादर्श’ ही एकमेव नाटक मंडळी आज शंभर वर्षानंतरही भालचंद्र पेंढारकर यांच्या रूपाने कार्यरत आहे.
सौभद्र, शारदा, गोपीचंद असे खेळ संस्था करत होती. पण कंपनीचा जम बस नव्हता. सावकार तगादा लावत होते. केशवराव जीव तोडून आपल्या भूमिका करत होते. कंपनी उत्तम चालवत होते, पण वर्षा, दोन वर्षातच, एकेका मालकाने अंग काढून घेतले आणि कंपनीची जबाबदारी दोघा भोसले बंधूंवर पडली.
केशवराव नव्या नाटकाच्या शोधात होते. त्यांनी आ. रा. दोंदे यांचं ‘मदालसा’ आणि हिराबाई पेडणेकर यांचं ‘दामिनी’ अशी दोन नाटकं बाहेर काढली. पण, त्यांनी दम धरला नाही. हिराबाई या तत्कालीन ‘अकुलिना स्त्री’चं नाटक रंगभूमीवर आणून त्यांनी तत्कालीन सामाजिक प्रतिष्ठेचा आशयही साकार केला. याच सुमाराला त्यांनी वीर वामनराव जोशी यांचं ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’ हे नाटक मिळवलं.
२० सप्टेंबर १९१३ रोजी मुंबईत बॉम्बे थिएटरमध्ये या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. नाटकाचा विषय, आशय, याला पूरक असं सुसंग नेपथ्य, सिद्धहस्त कलाकार आनंद मेस्त्री यांनी दिलं होतं. प्रथमच इथे मराठी रंगभूमीला मखमली पडदा मिळाला. या नाटकातील केशवरावांच्या ‘मृणालिनी’च्या भूमिकेने आणि तेजस्वी गायनाने रसिक दिपून गेले. कंपनीवर पैशांचा पाऊस पडला. कर्ज तर फिटलेच पण गाठीशी पैसाही खूप आला. यावेळी मुंबई रसिकांनी आणि मित्र परिवाराने केशवरावांचा भव्य नागरी सत्कार करून त्यांना एक थैली अर्पण केली होती. या समारंभाला केशवरावांचे गुरू दत्तोपंत जांभेकर मुद्दाम आले होते. केशवरावांनी कृतज्ञतापूर्वक नम्रपणे त्यांना मिळालेली थैली गुरूचरणी अर्पण केली.
तिथून पुढे केशवराव कंपनी घेऊन विदर्भाच्या दौऱ्यावर गेले, तेही स्पेशल ट्रेन घेऊन. ट्रेनवर फलक झळकत होता, ‘ललित कलादर्श नाटक मंडळी.’ त्याकाळी नाटक कंपन्या संस्थानिकांच्या राजे राजवाड्यांच्या आश्रयावर, सहाय्यावर चालायच्या. पण केशवराव आपल्या कंपनीचा उल्लेख, खास लोकाश्रयाखालील असा मोठ्या अभिमानाने करीत होते.
‘राक्षसी महत्त्वाकांक्षे’च्या जोडीला दुसरं नवं नाटक आणण्याच्या विचारात केशवराव होते. इतक्यात त्यांना ‘मानापमान’ नाटकाच्या प्रयोगाचे हक्क मिळाले. याच वेळी बापूराव पेंढारकर त्यांना मिळाले. ‘मानापमान’ च्या तालमी जोरात सुरू झाल्या आणि ‘मानापमान’चा पहिला प्रयोग त्यांनी मुंबईत डिसेंबर १९१५ मध्ये बॉम्बे थिएटरमध्ये सादर केला. धैर्यधर (केशवराव) भामिनी (बापूराव पेंढारकर) आणि लक्ष्मीधर (दत्तोपंत भोसले)! खुद्द काकासाहेब खाडिलकर यांनी, ‘मला तुमचा धैर्यधर खूप आवडला!’ असं केशवरावांचं कौतुक केलं.
‘कर्ज फिटेपर्यंत कपाळाला गंध लावणार नाही’ असा केशवरावांनी पण केला होता. म्हणून ते गंध लावत नसत. ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’ आणि ‘मानापमान’ च्या अपूर्व यशानंतर ते नरसोबावाडीला गेले. दत्त हे त्यांचं दैवत. तिथे षोडशोपचारे पूजा केली. सहस्त्रभोजन घातलं आणि मंत्रघोषात आशीर्वाद घेऊन कपाळी केशरी गंध लावलं आणि मग पुण्याला परतले.
पुढचा मुक्काम होता कोल्हापूर. वयाच्या चौथ्या वर्षी घर सोडल्यापासून जन्मभूमीत ते प्रथमच पाऊल टाकत होते. दोन महिन्याच्या मुक्कामात सौभद्र, शारदा, राक्षसी महत्त्वाकांक्षा, मानापमान अशा खेळांनी कोल्हापूर दुमदुमून गेलं. उत्पन्नही अफाट मिळालं. मिळालेला सारा पैसा त्यांनी दानधर्मात खर्च केला. आई अंबाबाईच्या मंदिराच्या कळसाला सोन्याचा मुलामा चढवला. अनेक संस्थांना देणग्या दिल्या. कोल्हापूरला मिळालेला पैसा कोल्हापूर वेशीच्या बाहेर नेला नाही.
मामा वरेकर हे नवे नाटककार आता ललित कलेला लाभले होते. त्यांची ‘हाच मुलाचा बाप’ आणि ‘संन्याशाचा संसार’ ही दोन नवी सामाजिक नाटके केशवरावांनी रंगभूमीवर आणली आणि त्यातून हुंडा आणि पतित परिवर्तन, अशा सामाजिक विषयांना त्यांनी कलारूप साकार केलं. याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘हाच मुलाचा बाप’ या नाटकात पशू डॉक्टरचं काम, दामू अण्णा मालवणकर यांनी केलं होतं. प्रेक्षक त्यांच्यावर बेहद्द खूष झाले होते.
गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे यांच्याबद्दल केशवरावांच्या मनात अतिव आदर होता. ललितकला नाट्य कंपनीचे ते गुरू! वझेबुवांची गायकी आक्रमक होती. त्यांना केशवरावांसारखा तडफदार आवाजाचा शिष्य लाभला.
१९२१ हे ललितकलाचं वैभवाचं वर्ष होतं. केशवरावांच्या कारकीर्दीचं ते सोनेरी वर्ष होतं. पुण्यात किर्लोस्कर थिएटरमध्ये तेव्हाचं नाट्यसंमेलन भरलं होतं. या नाट्य संमेलनाचं यजमानपद ललितकलेकडे होतं. संमेलनाचा सर्व खर्च त्यावेळी केशवरावांनी केला होता. जमलेले सर्व रसिक संमेलनात, केशवरावांचं मनापासून कौतुक करीत होते.
याच वर्षी, आप्पासाहेब टिपणीस यांचं ‘शहाशिवाजी’ हे नाटक केशवरावांनी १४ मे १९२१ रोजी रंगभूमीवर आणलं. शिवाजी महाराज प्रथम गायले ते याच नाटकात. केशवरावांचा ‘संगीत शिवाजी’ प्रेक्षकांना इतका पसंत पडला की खरा शिवाजी असाच दणदणीत गात असला पाहिजे, असे प्रेक्षकांना वाटू लागले.
१९२० साली लो. टिळकांचं निधन झालं आणि देशाने गांधीजीचं नेतृत्व स्वीकारलं. गांधीजींनी लोकमान्य स्वराज्य फंडासाठी एक कोटी रूपयांचा संकल्प सोडला होता. या संकल्पामुळेच रंगभूमीवर एक अभूतपूर्व प्रयोग घडला. तो म्हणजे संयुक्त ‘मानापमान’चा! यात केशवराव धैर्यधर होते, तर बालगंधर्व भामिनी, इतर पात्रांची विभागणी करताना गणपतराव बोडस म्हणाले, ‘केशवराव, शिपाई ललितकलेतले आणा, चोर गंधर्व कंपनीत आहेत.’
या प्रयोगाला त्यावेळी पहिले तिकीट होते १०० रूपये आणि पिटातले तिकीट होते पाच रूपये. प्रयोग केव्हाच हाऊसफुल्ल झाला होता. केशवरावांच्या तेजस्वी ताना आणि बालगंधर्वांच्या गळ्यातील गोडवा, यांनी रसिकांची मने तृप्त झाली. या प्रयोगानंतर रसिकांच्या पसंतीची टाळी केशवरावांच्या गाण्याकडे झुकलेली होती असे इतिहास सांगतो.
या प्रयोगात खर्च जाऊन प्रत्येकी साडेचार हजार रूपये आले. कर्जबाजारी झालेल्या बालगंधर्वांना केशवराव म्हणाले, ‘दादा, कर्ज—कर्ज काय घेऊन बसलात? मनात आणलं तर असे प्रयोग करून कर्जाचे डोंगर आपण फेकून देऊ!’
प्रयोगाच्या वेळी ‘संदेश’कार अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी सर्वप्रथम केशवरावांचा उल्लेख ‘संगीतसूर्य’ असा केला. ललित कलादर्श नाट्य संस्थेच्या रूपाने रसिकांचे ऋण मान्य करणे, मखमली पडद्याचे वास्तव नेपथ्य सुरू करणे आणि आपल्या मालकीची, आपण निर्माण केलेली, वाजती, गाजती आपली नाट्यसंस्था आपल्या कलेच्या वारसदाराकडे बापूराव पेंढारकरांकडे सोपवणं हे करायला मन केवढं मोठं असावं लागतं. कौटुंबिक वारसांचा विचारसुद्धा त्यांच्या मनाला शिवला नाही. इथे ओढ होती ती रक्ताचं पाणी करून उभ्या केलेल्या संस्थेच्या भवितव्याची!
मराठी रंगभूमीवरच्या अनेक मूलभूत उपक्रमांचे केशवराव धनी होते.आणखी एक महत्त्वाचा केशवरावांनी राबवलेला उपक्रम म्हणजे नाटक ठरल्यावेळी घड्याळाच्या ठोक्याला सुरू करण्याचा. केशवरावांच्या ललितकलाच्या नाटकाच्या तिकिटावर ‘रात्री नऊ’चा आकडा छापलेला असे. याचा अर्थ, नाटक रात्री नऊच्या ठोक्यालाच सुरू होणार.
यासंबंधी एक आठवण सांगितली जाते. एकदा एका संस्थानात ललितकलाच्या नाटकाचा प्रयोग होता. वाड्यावरून निरोप आला की, ‘राजेसाहेब नाटकाला येणार आहेत, तेव्हा प्रयोग अर्धातास उशिरा म्हणजे साडेनऊला सुरू करावा.’ केशवरावांनी ठरल्या वेळी नऊ वाजता तिसरी घंटा दिली आणि नांदी सुरू केली. केशवरावांच्या तेजस्वी तडफदार आवाजात प्रेक्षकांना त्या दिवशी अर्धातास नांदी ऐकायला मिळाली.
महाराज साडेनऊला आले. तोपर्यंत नांदी चालू होती आणि नांदी संपल्यानंतर साडेनऊला नाटक सुरू झाले.
पुढे ‘माझा सूर ज्या क्षणी कमी होईल, त्याक्षणी मला मृत्यू यावा’ असा संकल्प केशवरावांनी केला आणि त्यांना ताप येऊ लागला. त्याही अवस्थेत त्यांनी बालगंधर्वासोबत ‘सौभद्र’ नाटक केलं पण ताप त्यांचा पिच्छा सोडेना. अखेर तो टायफॉईड ठरला आणि ४ ऑक्टोबर १९२१ रोजी या केशव भोसले नावाच्या संगीतसूर्याचा अस्त झाला. केशवराव नावाचं तुफान शांत झालं.
वामन काळे
संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
August 9, 2021
पुरुषप्रधान संस्कृतीवर हल्ला चढविणार्या अनेक महिला आपल्या पाहण्यात येतात. परंतु ही रुळलेली वाट सोडून महिलांइतकाच पुरुषांचाही अभ्यास करुन समान सामाजिक व्यवस्थेसाठी मधू चौगावकर देशभरात काम करीत आहेत. स्त्री-पुरुष समानता खर्या अर्थाने प्रत्यक्षात यावी, यासाठी त्या स्वत:च्या घरापासूनच प्रयत्नशील झाल्या आहेत. युनिसेफच्या जेन्डर एम्पॉवरमेन्ट विषयीच्या कोअर समितीच्या त्या सदस्य आहेत.
स्त्री-पुरुष समानतेसाठी
July 14, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti