(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • प्राजक्ता कैलास टिपाले

    वयाच्या ११ व्या वर्षापासून प्राजक्ताने खेळायला सुरुवात केली आणि १२ व्या वर्षी पहिले राज्यस्तरीय अजिंक्यपद पटकावले, १७ व्या वर्षी राष्ट्रस्तरीय स्पर्धा जिंकली.

      May 16, 2014


  • पंकज झारेकर

    निसर्ग प्रेम माणसाला कुठवर घेवुन जावु शकत याच मुर्तिमंत उदाहरण म्हणजे पंकज झारेकर. फोटोग्राफीचा कुठलाही शैक्षणिक किंवा व्यावसायिक अनुभव गाठीशी नसताना या निसर्गवेड्या कलंदराने निसर्गाच्या विवीध ॠतुंनुसार बदलणार्‍या गहिर्‍या रंगांना व रूपांना ज्या सौंदर्यपुर्ण शैलीमध्ये कैद केले आहे, त्याबद्दल् त्याला साक्षात निसर्गदेवतेची दुवादेखील मिळाली असेल. पंकज हा चारचौघांसारखा दिसणारा, वागणारा परंतु चाकोरीबाहेरच्या स्वप्नांना अभिमानाने मिरवणारा, सर्व कलांचा प्रेमी असा स्वछंदी तरूण. ही स्वच्छंदीपणाची देणगी पण, त्याला बेधुंद करणार्‍या निसर्गाकडूनच मिळाली.

      August 16, 2011


  • अभिनेत्री जीवनकला

    १९५२ साली दत्ता धर्माधिकारी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘ अखेर जमलं ‘ ह्या चित्रपटामध्ये ‘ बेबी जीवनकला ‘ म्ह्णून काम केले ह्या चित्रपटामध्ये सूर्यकांत, बेबी शकुंतला , वसंत शिंदे , राजा गोसावी , शरद तळवलकर यांनी भूमिका केल्या होत्या.

      August 28, 2021


  • नाटककार बन्याबापू (नरहरी गणेश कमतनूरकर)

    मराठी कवी, गीतकार आणि नाटककार नरहरी गणेश कमतनूरकर ऊर्फ बन्याबापू यांचा जन्म २८ मे १८९६ रोजी सांगली येथे झाला.

    नरहरी गणेश कमतनूरकर हे लेखक राम गणेश गडकरी यांचे विद्यार्थी. पुण्यात आल्यावर कमतनूरकर गडकऱ्यांच्या पावलावर पाऊल टाकून नाटके लिहू लागले. कमतनूरकरांच्या नाटकांतील पदे बहुधा त्यांनी स्वतःच लिहिलेली असत. ’श्री’ या नावाचे एक संगीत नाटक कमतनूकरांनी १९२२ साली लिहिले. घोड्यांच्या रेसच्या नादावा दुष्परिणाम हा नाटकाचा विषय होता. ’ललित कलादर्श’ या नाट्यसंस्थेने हे नाटक १९२४ साली रंगभूमीवर आणले, पण तत्कालीन व्यावसायिक रंगभूमीवर मात्र काही दिवसातच ते अपयशी ठरले. तरीही, कमतनूकरांनी लिहिलेल्या संवादांचा नूर काही औरच आहे हे समीक्षकांच्या नजरेस आले, आणि कमतनूकर हे नाट्यसृष्टीतील एक प्रतिभावंत लेखक आहेत, हे सिद्ध झाले. नाटकाची संहिता राम गणेश गडकरी यांच्या खटकेबाज संवादांची आठवण करून देणारी आहे.

    ’श्री’चे ५०-६० प्रयोग झाल्यानंतर 'ललित कलादर्श’ने प्रयोग करणे थांबवले. मात्र, ललित कलादर्शच्या शतक महोत्सवात हे नाटक परत रंगभूमीवर आणायचे असे डोंबिवलीकरांनी ठरवले. आणि त्याप्रमाणे ४ जानेवारी २००८ रोजी या नाटकाचा प्रयोग ’डोंबिवली भूषण’ शं.ना. नवरे यांच्या उपस्थितीत झाला.

    ’श्री’ नाटकाची मूळ संहिता २५० पानांची होती, ती ६० पानांवर आणली गेली. अप्पासाहेब रावबहादुर, त्यांचा जुगारापायी बिघडलेला मुलगा कुसुमाकर, त्यांची तरुण मुलगी श्री व घरजावई श्रीकांत, कुसुमाकर याची पत्नीस कात्यायनी व कुटुंबाला पूर्णपणे बरबाद करणारा अप्पासाहेबांचा मित्र व खलनायक विश्राम आणि रेसचा बुकी सत्यवान सत्यवादी अशी मोजकी सात-आठ पात्रे नाटकात आहेत. नाटकातल्या ’सत्यवान सत्यवादी’ नावाच्या इरसाल पात्राची भूमिका सुहास नवरे यांनी व्यावसायिक अंदाजाने खुलवली होती. श्रीकांतला घोड्याच्या रेसचा नाद सत्यवान आणि विश्राम हे दोघे लावतात; पण गांजेकस असलेला सत्यवान मनाने चांगला आहे. त्यामुळे त्याच्या भूमिकेला अनेक कंगोरे आहेत.

    विश्रामची भूमिका डोंबवलीकर विवेक जोशी यांनी, अप्पासाहेबांची सुरेश ताम्हाने यांनी आणि ’श्री’ची प्रज्ञा देवस्थळे यांनी रंगविली होती नाटकातल्या पदांना विलास हर्षे यांनी चाली बसवून दिल्या होत्या. हे नाटक वेलणकर यांच्या ’सार्थक’ या संस्थेने रंगभूमीवर सादर केले होते. बापूराव पेंढारकार जेव्हा हे ’श्री’ नावाचे नाटक रंगभूमीवर सादर करायचे, तेव्हा पडद्यावर कॅमेराच्या साहाय्याने ते घोड्यांची शर्यत दाखवायचे. लोकांसाठी तो सर्वाधिक आकर्षणाचा मामला होता. २००८ साली डोंबिवलीत झालेया प्रयोगात मात्र पडद्यावर शर्यती दाखवणे शक्य झाले नव्हते.

    नरहरी गणेश कमतनूरकर यांचे निधन १३ डिसेंबर १९६९ रोजी झाले.

    अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

    #BanyaBapu #NarhariGaneshKamatnurkar

      May 4, 2022


  • रामचंद्र हुलावळे

    मुंबईमधील जेष्ठ कामगार नेते व राष्ट्रिय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस रामचंद्र हुलावळे हे कामगारांच्या आयुष्यातील सदैव तेवणार्‍या दीपस्तंभासारखे होते. मुंबई मधील गिराणी कामगार व त्यांच्या हजारो कुटुंबियांच्या व्यथा, वेदना, सुख, दुःख, व आकांक्षा ते प्रत्यक्ष जगले. १९७५ साली रामचंद्र हुलावळेंनी मुंबईतील घोडपदेव प्रभागाचे नगरसेवक म्हणून प्रतिनिधीत्व केले होते. हुलावळेंचा गेली पन्नास वर्षे कामगार चळवळीला फुलविण्यात व स्वयंपूर्ण बनविण्यात मोलाचा सहभाग होता. १९५५ च्या सुमारास “रिव्हॉल्युशनरी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया” च्या चळवळीत त्यांनी सक्रीय सहभाग घेतला होता. गोवा मुक्ती आंदोलनातही त्यांच्या निडर व ताठ कण्याची, तसेच स्पष्टवक्तेपणाची प्रचिती सर्वांना आली होती. नंतर १९६२ साली रामचंद्र हुलावळेंनी ग. द. आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी राष्ट्रीय मिल मजदूर संघात प्रवेश केला होता.

    दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित

      January 3, 2015


  • हुतात्मा बाबू गेनू

    १९३० साली वडाळा येथे झालेल्या सत्याग्रहात यांना सक्तमजुरीची शिक्षा झाली. पुढे शिक्षा भोगून परतताच मुंबईत विदेशी कपड्याच्या बंदीची चळवळीत ते सक्रीय झाले. त्यांचे लौकीक अर्थाने फारसे शिक्षण झालेले नसले तरी देशप्रेमाची मशाल मात्र त्यांच्या मनात सतत धगधगत होती.

      December 12, 2021


  • सुप्रसिद्ध लेखक व. पु. काळे

    व. पु. काळे यांनी शेकडो कथाकथनाचे कार्यक्रम सर्वत्र केले त्याला तरुण वर्गाकडूनच नव्हे तर सर्व स्तरावरून प्रचंड प्रतिसाद मिळत असे. आजही त्याच्या कथाकथनाच्या कॅसेट्स , पुस्तके प्रचंड लोकप्रिय आहेत. वपुच्या कथांमध्ये जो शेवटचा परिच्छेद असतो तो तरुण पिढीला जास्त आवडतो असे अनेकवेळा दिसून आले आहे , त्याचप्रमाणे लेखातील किंवा कथेतील मधली काही वाक्ये अनेकांवर विशेषतः तरुण पिढीवर खूप चांगला परिणाम करून जातात.

      December 10, 2021


  • नरहर विष्णू गाडगीळ उर्फ काकासाहेब गाडगीळ

    पिंपरीमध्ये हिंदुस्थान अॅन्टिबायोटिक आणण्यामध्येही काकासाहेब गाडगीळ यांचा महत्त्वाचा वाटा होता. केंद्रीय बांधकाम मंत्री या नात्याने काकासाहेब गाडगीळ यांनी उत्तर भारतातील सीमेवरच्या रस्त्यांचे जे बांधकाम केले ते ६२-६५च्या युद्धात फायदेशीर ठरल्याचे तत्कालीन लष्करी अधिकाऱ्यांनीही मान्य केले होते. भाकरा नांगल व कोयना धरण उभारण्यातही काकांचे योगदान मोठे आहे.

      June 30, 2022


  • बाळ कुडतरकर

    पूर्वीच्या काळी विविध उत्पादनांच्या जाहिराती, चित्रपटगृहात चित्रपट सुरू होण्यापूर्वी दाखविले जाणारे माहितीपट, शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या जाहिराती, आकाशवाणीवरील कार्यक्रम असो किंवा चित्रपटाचे डबिंग असो. या सर्व ठिकाणी बाळ कुडतरकर यांनी आपल्या भारदस्त आणि दमदार आवाजाच्या जोरावर जगावर राज्य निर्माण केले.

      July 11, 2022


  • याहू’ स्टार शमशेरराज ऊर्फ शम्मी कपूर

    शम्मी कपूर यांनी स्वत:ला कधी चिरतरुण म्हणवून घेतले नाही; पण जीवनावर उदंड प्रेम करणार्यास या आनंदी कलाकाराकडे ऊर्जेचा अखंड स्रोत होता. त्यांची जीवनाबद्दलची आसक्ती ही आयुष्याचा आनंद घेण्याची होती. त्यांनी आपले आयुष्य मनसोक्त उपभोगले. धसमुसळा,रांगडा प्रणय,नायिकांना थकविणारी भन्नाट नृत्यशैली ही शम्मी कपूर यांची खासियत होती.

      October 31, 2017