(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मराठी अभिनेत्री, लेखिका प्रिया तेंडुलकर

    प्रिया तेंडुलकरांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वेट्रेसची नोकरी करून केली. ती नोकरी सोडून देऊन त्या नाट्यसृष्टीमध्ये शिरल्या. त्यांनी गिधाडे, ती फुलराणी, एक हट्टी मुलगी या नाटकांमध्ये काम केले होते. त्यांनी त्यांचा पहिला चित्रपट इ.स. १९७३ साली आलेला दिग्दर्शक शाम बेनेगल यांचा अंकुर हा हिंदी चित्रपट. यांव्यतिरिक्त त्यांनी गोंधळात गोंधळ, धाकटी जाऊ आणि तूच माझी राणी यासारख्या मराठी चित्रपटांमध्येही काम केले होते.

    प्रिया तेंडुलकर ह्या भारतातील पहिल्या टीव्ही-स्टार म्हणून ओळखल्या जातात. त्यांची 'रजनी' ही मालिका खूपच गाजली. त्यांच्या इतर मालिकांमध्ये प्रिया तेंडुलकर शो, ज़िम्मेनदार कौन, किस्से मियाँ बीवी के, हम पांच या हिंदी, तर 'दामिनी' या मराठी मालिकेचा समावेश होतो. त्या लेखिकाही होत्या. त्यांनी अनेक लघुकथा लिहिल्या आहेत. त्यांचे 'ज्याचा त्याचा प्रश्न' हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

    नाटककार विजय तेंडुलकर हे त्यांचे वडील.

    प्रिया तेंडुलकरांनी यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९५४ रोजी झाला . त्यांचे १९ सप्टेंबर २००२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      September 19, 2017


  • कमलाकर सारंग

    विजय तेंडुलकर लिखित ‘सखाराम बाइंडर हे नाटक प्रचंड वादग्रस्त व वादळी ठरले. या नाटकाविरुद्ध दिग्दर्शक कमलाकर सारंग यांना लढा द्यावा लागला. नाटकाविरुद्ध खटला भरला गेला. हे नाटक म्हणजे ‘विवाह संस्था’ संकटात सापडण्याचे भय आहे, असा आक्षेप घेण्यात आला होता. सहा महिने लढल्यावर नाटक एकही कट न करता हायकोर्टातून सुटलं आणि पुन्हा दिमाखानं प्रयोग सुरू झाले.

      June 12, 2022


  • मंदार भारद

    “आमच्याकडे विमान भाडेतत्त्वावर मिळेल” अशी पाटी एखादा मराठी माणसाने लावावी व त्याला प्रचंड प्रतिसाद मिळून हा व्यवसाय यशाच्या शिखरावर जावा. हे सर्व स्वप्नवत वाटतं ना! परंतु मंदार भारदे नावाच्या स्वप्नाळू तरुणाने हे शक्य करुन दाखवले. आज ते बॉलिवूड स्टार्स, पर्यटक तसेच परदेशी व्यावसायिकांना मुंबईसह अनेक शहरांचे विहंगम दृश्य दाखविण्यासाठी विमान, हेलिकॉप्टर घेऊन नेहमीच सज्ज असतात. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी “एअरक्राफ्ट मेन्टेनन्स” हा नवा अध्याय सुरु केला असून तो नाशिकमध्ये रुजविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

    तुम्हासाठी सजली वारी विमानाची

      July 24, 2015


  • ’संगीतभूषण’ पं. राम मराठे

    ’संगीतभूषण’ पं. राम मराठे

    राम मराठे हे पं. मनोहर बर्वे, पं. यशवंतबुवा मिराशी, मास्तर कृष्णराव, आग्रा घराण्याचे उस्ताद विलायत हुसेन खाँ व पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत शिकले. त्यांचा जन्म २३ आक्टोबर १९२४ रोजी झाला. पं गजाननबुवा जोशी यांच्या गायकीचाही त्यांच्यावर प्रभाव पडला. राम मराठे यांचे मंदारमाला हे नाटक पं. भीमसेन जोशी, लता मंगेशकर, आशा भोसले, जयंतराव साळगावकर, गुणिदास, सी. आर. व्यास, मन्नाडे, जयदेव, नौशादअली, पं. जसराज, पं. जितेंद्र अभिषेकी, डॉ. वसंतराव देशपांडे, किशोरीताई आमोणकर, कुसुमाग्रज अशा अनेक मान्यवरांनी पुनःपुन्हा पाहिलं असून, नाटकावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला आहे.

    मंदारमाला म्हणजे ‘कल्पवृक्ष!’ आणि म्हणूनच ‘मंदार’च्या भूमिकेतील बाबांची गायकी आणि संगीत दिग्दर्शन हाच रसिकांच्या मनावर ‘संगीतरूपी कल्पवृक्ष’ कोरला गेला आहे आणि त्यांचे ‘नादब्रह्मी सूर’ चिरंतन स्मरणात राहतील. एके काळी नाटय़पदे गाणाऱ्या गायकाकडे काहीशा तुच्छतेने पाहिले जात होते. मात्र, शास्त्रीय गायन श्रेष्ठ आणि संगीत नाटकातील गायन कनिष्ठ असा भेद असू नये ही शिकवण पं. राम मराठे यांनी दिली. जन्मभर अथकपणे अक्षरशः अगणित मैफिली, नाट्यप्रयोगांतून मायबाप रसिकांना ज्यांची "सूरगंगा मंगला '' रिझवत राहिली...भिजवत राहिली. पं.राम मराठे प्रखर राष्ट्रभक्त होते. म्हणूनच आपल्या नाटकाच्या प्रयोगानंतर आणि गाण्याच्या बैठकीत भैरवीनंतर ते संपूर्ण 'वंदे मातरम् ' म्हणत. पं.राम मराठे यांचे निधन ४ आक्टोबर १९८९ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    पं.राम मराठे यांची संगीत संपदा
    अगा वैकुंठीच्या राया
    कशि नाचे छमाछ्म्
    कोण अससि तू न कळे
    कांता मजसि तूचि
    गुरु सुरस गोकुळीं
    जय शंकरा गंगाधरा
    जयोस्तु ते हे उषादेवते
    तारिल हा तुज गिरिजाशंकर
    ती सुंदरा गिरिजा
    दुनियेच्या अंधेर नगरीचा
    दे चरणि आसरा
    धनसंपदा न लगे मला ती
    निराकार ओंकार साकार
    नुरले मानस उदास
    बसंत की बहार आयी
    विश्वनाट्य सूत्रधार
    सप्तवसूर झंकारित बोले
    सूख संचारक पवन
    सूरगंगा मंगला
    हरिहरा ओंकार मनोहर
    हरी मेरो जीवनप्राण-अधार
    हे सागरा नीलांबरा

      October 23, 2017


  • माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह

    चौधरी चरणसिंह ३ एप्रिल १९६७ साली उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री बनले. २५ फेब्रुवारी १९६८ साली त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. नंतरच्या निवडणुकीत चांगले यश मिळाल्यानंतर १७ फेब्रुवारी १९७० साली ते पुन्हा मुख्यमंत्री बनले.

      August 3, 2025


  • बॅरिस्टर बाबासाहेब भोसले

    विद्यार्थी दशेपासूनच स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय असलेले बॅरिस्टर बाबासाहेब भोसले हे प्रखर बुद्धिमत्ता आणि तल्लख विनोदबुद्धी असलेले बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते.

      August 30, 2010


  • मराठी साहित्यिक सुभाष भेंडे

    गोव्यातील बोरी हे मा.सुभाष भेंडे यांचे गाव. त्यांचा जन्म १४ ऑक्टोबर १९३६ रोजी झाला. त्यांचे शिक्षण सांगली व पुण्यात झाले होते. त्यांनी अर्थशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळवली होती. ते मुंबईच्या कीर्ती महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. गोवा मुक्तिसंग्रामानंतर प्रकाशझोतात आलेल्या साहित्यिकांपैकी ते एक होते.

    २००३ साली कराड, महाराष्ट्र येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसेच वळवयी येथे झालेल्या २१ व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते. प्रा. सुभाष भेंडे यांनी आपल्या अमेरिकावारीनंतर ’गड्या आपुला गाव बरा’ या शीर्षकाचा एक लेख लिहिला होता.

    तो महाराष्ट्रातील बारावीच्या पाठ्यपुस्तकासाठी निवडला गेला. सुभाष भेंडे यांचे २० डिसेंबर २०१० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 7, 2017


  • अंजनीबाई मालपेकर

    अंजनीबाई मालपेकर

    अंजनीबाईकडे बेगम अख्तर, नैनादेवी, कुमार गंधर्व, किशोरी आमोणकर यांच्यासारख्या अनेक मान्यवरांनी संगीताचे धडे घेतले.

      June 9, 2022


  • विजय राजेंद्रप्रसाद गुप्ता

    जन्माने मराठी नसूनही महाराष्ट्राच्या मातीत मिसळून गेलेल्या काही उद्योजकांपैकी एक नाव, श्री विजय राजेंद्रप्रसाद गुप्ता.

      October 8, 2010


  • चार्ली चॅप्लिन

    चार्ली चॅप्लिन यांनी जगभरच्या प्रेक्षकांवर राज्य केलं. त्यांचा जन्म १६ एप्रिल १८८९ रोजी झाला. जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या माणसावर तो गारुड करू शकला. भाषेच्या बंधना विना पडद्यावरून तो कुठल्याही प्रेक्षकाशी संवाद साधू शकला. त्यासाठी त्यानं वापरलेली साधनं होती, भरपूर हासू आणि थोडेसे आसू! एका निराधार बाळाचं पोटच्या मायेनं संगोपन करतो तो. पोत्याची झोळी करून त्यात त्या बाळाला ठेवतो. किटलीच्या नळीने दूध पाजतो. जुनी खुर्ची मध्यभागी फाडून बाळाची ‘पॉटी’ म्हणून वापरात आणतो. मोठय़ा पडद्यावर या सगळ्या गोष्टी घडत असताना धमाल उडत असते. पण तो हे सगळं पोटतिडकीनं करत असतो. त्याच्यातली आई आणि ते बाळ यांची नाळ अदृश्य स्वरूपात जुळलेली असते. खरं तर, तो त्या बाळाचा कुणीही नसतो, पण त्यांच्यातली माया आपणा प्रेक्षकांनाही अस्वस्थ करून जाते. त्याचा ‘द किड्’ हा चित्रपट आपल्याला भारावून सोडतो. चार्ली चॅप्लिनने त्याच्या चित्रपटांमधून आपल्याला गडाबडा लोळायला लावून हसवलं, पण त्याचबरोबर त्यानं डोळ्यात टचकन् पाणी आणून रडवलंही. विचार करायला लावलं. जागतिक पटलावर एक महानायक म्हणून वावरला! स्वत:तल्या आत्मविश्वासामुळे अनेक वैशिष्टय़पूर्ण युक्त्या तो पडद्यावर साकारू शकला.

    पडद्यावरच्या मस्तमौला चार्लीचं आगळंवेगळं रूप होतं, ‘एक टाइट कोट, बॅगी पॅन्ट, छोटी हॅट आणि मोठे शूज, आणि हो, चेहऱ्यावरची त्याची ती छोटीशी मिशी.’ त्याने त्याचं हे रूप समजून उमजूनच ठरवलं होतं. त्याला त्याचं बाह्य़रूप संपूर्णपणे विरोधाभासी हवं होतं. ती छोटीशी मिशी त्याच्या व्यक्तिमत्त्वाला, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव न लपवता वयातला मोठेपणा, परिपक्वता देऊ शकेल हा त्याचा अंदाज होता आणि त्याचं हे बाह्य़रूप त्याची ओळखच ठरलं. या व्यक्तिरेखेबद्दल त्याचं म्हणणं होतं, ‘‘ज्या क्षणी मी तो पोशाख केला, मेकअप केला, त्या क्षणी मी ते व्यक्तिमत्त्व अनुभवू लागायचो. मी त्याला ओळखायचो आणि रंगमंचावर असेपर्यंत तो माझ्यात भिनलेला असायचा.’’ आयुष्याचं सार त्यानं पडद्यावर अनेक तऱ्हेनं जगापुढे मांडलं. खिल्ली उडवण्यासाठी दु:ख हे कारण असतं. खिल्ली उडवणे म्हणजे प्रतिकार करणे. निसर्गाच्या शक्तीपुढे स्वत:च्या हतबलतेतही आपण हसत राहिलं पाहिजे. प्रतिकूलतेचा हसत हसत सामना केला पाहिजे, नाही तर मानसिकरीत्या खचून जाल. म्हणूनच त्याच्या आयुष्याच्या जवळचा चित्रपट ‘द किड्’ याचं ओपिनग टायटल होतं, ‘‘अ पिक्चर विथ अ स्माइल अँड परहॅप्स अ टिअर.’’ जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या माणसावर तो गारुड करू शकला. भाषेच्या बंधनाविना पडद्यावरून तो कुठल्याही प्रेक्षकाशी संवाद साधू शकला. त्यासाठी त्यानं वापरलेली साधनं होती, भरपूर हासू आणि थोडेसे आसू! चार्ली चॅप्लिन यांचे २५ डिसेंबर १९७७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      December 26, 2017