जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
संन्यास घेण्याअगोदर ते पत्रकार होते. बेचाळीसच्या स्वातंत्र्यलढ्यातही त्यांनी भाग घेतला होता. तुरुंगवासही भोगला होता. स्वातंत्र्यानंतर २७ वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लिखाण प्रसिद्ध होत होते. त्यांनी लिहिलेली अडीचशेवर पुस्तके याचीच साक्ष देतात.
November 18, 2021
त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तीन वर्षे तू आता फक्त रियाज कर, असे सांगणारी माझी आई ग्रेट आहे, असे आपल्या आईबद्दल सांगतात.
July 2, 2022
मराठी रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावर तसेच एकूणच भारतीय कलेच्या प्रांगणात विनोदी नटांची आणि लेखकांची तशी कमतरता नाही. आजपर्यंत अनेक पुरुष विनोदी नटांनी आपल्याला पोट धरुन हसायला लावलंय. पण विनोदी स्त्री कलाकारांची उणीव ही आजही कुठेतरी जाणवतेय, अगदी सर्वच माध्यमांमध्ये.
March 28, 2013
मराठीतील सुप्रसिद्ध रहस्यकथा लेखक.
बाबुराव अर्नाळकरांप्रमाणेच त्यांनीही शेकडो रहस्यमय कादंबऱ्या लिहील्या. त्यांच्या रहस्यकथांनी एकेकाळी संपूर्ण पिढीला वेड लावले होते.
दर महिन्याला ते सरासरी शंभर पानांच्या ७-८ कादंबऱ्या ते सहज लिहित. प्रत्येक कादंबरीच्या चार ते पाच हजार प्रति खपत असत.
१९७० ते १९८२ या काळात त्यांनी ७२४ रहस्य व गूढकथा लिहिल्या. यात सैनिकी जीवनावरील २५० शिलेदार कादंबऱ्या आहेत.
गोलंदाज ही काल्पनिक व्यक्तिरेखा तसेच कॅप्टन दीप, मेजर भोसले ही त्यांची पात्रे रहस्यकथा वाचणाऱ्या वाचकांच्या मनात घर करून बसली आहेत.
# Gurunath Naik
February 9, 2017
राहुल देशपांडे हा मराठी शास्त्रीय संगीतसृष्टी मधील एक ताजा व भावपुर्ण आवाज.
July 27, 2011
१९२४ पासून त्यांनी अनेक मूकपटांत भूमिका केल्या तसेच काही मूकपटांचे दिग्दर्शनही केले. त्यांचा जन्म १४ सप्टेंबर १८९८ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील खारेपाटण येथे झाला. ‘इंपिरियल’, ‘सरस्वती सिनेटोन’ ‘रणजित’ ‘नटराज फिल्म्स’ इ. चित्रपट संस्थांमधून नट व दिग्दर्शक म्हणून त्यांनी कामे केली. अनेक हिंदी, मराठी तसेच कन्नड व तमिळ बोलपटांचेही त्यांनी दिग्दर्शक या नात्याने काम केले. रेझिसाँर (दिग्दर्शक/ नाट्यव्यवस्थापक) आळतेकरांनी नंदू खोटे यांच्या ‘रेडिओ स्टार्स’ (१९३२) या नाट्यसंस्थेत सहभागी होऊन, तिच्याद्वारा श्री. न. बेंडे यांची बेबी व चाली, टिपणीस यांचे स्वस्तिक बँक व ठाकरे यांचे खरा ब्राह्मण ही नाटके रंगभूमीवर आणली.
कालांतराने ‘रेडिओ स्टार्स’ ही संस्था सोडून आळतेकरांनी ‘नाट्यमन्वंतर’ या संस्थेत नट व सहकारी अशा नात्यांनी नाट्यविषयक मौलिक कार्य केले. पुढे त्यांनी ‘नॅशनल थिएटर अॅतकॅडमी’ ही नाट्याभिनयाचे व आवाज जोपासण्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण देणारी संस्था चालविली. याच संस्थेतील काही विद्यार्थ्यांच्या सहकार्याने त्यांनी इंग्लं डमधील ‘लिट्ल थिएटर्स’ व अमेरिकेतील ‘कम्युनिटी थिएटर्स’ यांच्या धर्तीवर ‘लिट्ल थिएटर’ ही संस्था स्थापून (१९४१) तिच्यातर्फे माझ्या कलेसाठी (१९४२),सारस्वत (१९४२) यांसारखी वरेरकरांची काही नाटके रंगभूमीवर आणली.
रंगभूमीवरील त्यांच्या गाजलेल्या भूमिकांमध्ये ‘अण्णासाहेब’ (आंधळ्यांची शाळा), ‘रामशास्त्री’ (भाऊबंदकी),‘बापूसाहेब’ (रंभा) वगैरेंचा उल्लेख करता येईल. आधुनिक पाश्चात्य नाट्यप्रणालींचे मराठी रंगभूमीवर प्रयोग करण्याचे आणि अभिनय व दिग्दर्शन यांत अभिनवता आणण्याचे श्रेय आळतेकरांस आहे. आळतेकरांच्या स्मरणार्थ ‘अभिनय’ या संस्थेमार्फत मुंबईच्या परिसरातील हौशी नाट्यसंस्थांसाठी १९६४ पासून नाट्यस्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. पार्श्वनाथ आळतेकर यांचे कोल्हापूर येथे २२ नोव्हेंबर १९५९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 22, 2018
जन्म : १८९३ कलकत्ता
कृष्ण चंद्र डे उर्फ के सी डे हे बंगाली अभिनेते, गायक, संगीत दिग्दर्शक व संगीत शिक्षक होते. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी त्यांनी आपली दृष्टी गमावली व ते पुर्णपणे अंध झाले तरी सुद्धा त्यांनी हिंदी बंगाली उर्दू भाषेत जवळपास साह्शे-गाणी रेकॉर्ड केली. १९३२ ते १९४० पर्यंत संगीत दिग्दर्शक व अभिनेत्याचे काम केले त्यानी अनेक चित्रपट कंपन्यासाठी काम केले पण कलकत्याला कलकत्ता थिएटर साठी जास्त काम केले. त्यांनी कुंदनलाल सैगल यांची काही गाणीपण संगीतबद्ध केली होती. ते एस. डी. बर्मन यांचे गुरु. जेष्ठ गायक मन्ना डे हे त्यांचे पुतणे होते. त्यांनी आपल्या काकांनाच गुरु मानलं होतं. मन्ना डे कारकीर्दीची सुरुवात तमन्ना या चित्रपटापासून झाली होती. या चित्रपटाचे संगीत कृष्णचंद्र डे यांचेच होते के सी डे यांचे २८ नोव्हेंबर १९६२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 28, 2018
प्रसिद्ध तबलावादक पं. सामताप्रसाद हे बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक.
June 20, 2018
महाराष्ट्रातील अत्यंत आक्रमक आणि सर्वाधिक लोकाधार असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख
March 26, 2013
पळसुले, बाळ
बाळ पळसुले यांच्या ठसकेबाज चाली ऐकल्या की अचंबित व्हावे लागायचे. मराठी चित्रपट संगीतात त्यांनी केलेल्या कामगिरीचा त्यांच्या हयातीत तसा सन्मान झाला नसला, तरीही रुपेरी पडद्याच्या इतिहासात त्यांच्या नावे एक पान राखीव राहील, यात शंका नाही. अनेकदा कानावरून गेलेली गाणी त्यांच्या नावावर आहेत हे जेव्हा लक्षात येते, तेव्हा कौतुकमिश्रित आदर वाटू लागतो. कोल्हापूर, सांगली परिसरातील वातावरणात रमलेल्या पळसुले यांच्या रोमारोमात तमाशातला ठसका याच परिसरात भिनला.
१९६५ पासून सुमारे तीन दशके मराठी चित्रपटांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावलेल्या या संगीतकाराला चिमुरडय़ा पोरीने बसस्थानकाबाहेर त्यांचेच गाणे ऐकवले, तेव्हा खिशातली दहा रुपयांची नोट तिच्या पदरात टाकणाऱ्या पळसुले यांना तेव्हा झालेला आनंद अवर्णनीय वाटत होता. सहज गुणगुणता येणारी आणि कानात राहणारी चाल बांधणे हे पळसुले यांचे वैशिष्टय़. ‘कुठं कुठं जायाचं हनिमूनला’ सारखं उडत्या चालीचे गाणे असो, की ‘विठ्ठलनामाची शाळा भरली’ हे सर्वतोपरी झालेले भक्तिगीत असो; पळसुले यांचे वेगळेपण त्या रचनेमध्ये सहजपणे लक्षात यायचे. लावणीतला ठसकादेखील सुंदरपणे व्यक्त करण्याचे त्यांचे कसब होते. चित्रपटासारख्या दुनियेत त्यांच्या बालपणीचा कलापथकातील अनुभव त्यांना उपयोगी पडला, कारण सर्वाच्या ओठात सहज राहतील, अशा रचना करण्याचे शिक्षण त्यांना त्या संस्कारातून मिळाले होते. ‘फटाकडी’, ‘भन्नाट भानू’, ‘भिंगरी’, ‘तेवढं सोडून बोला’,‘रणरागिणी’,‘पंढरीची वारी’ , ‘राजा पंढरीचा’ यासारख्या चित्रपटातील गीते तेव्हा महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि शहरी रसिकांची अतिशय आवडती झाली होती. त्यांच्या संगीतामुळे चित्रपटांनाही एक वेगळा नखरेल रंग प्राप्त झाला. यशाने हुरळून जाण्याची पळसुले यांची वृत्ती नव्हती. अंगठय़ांनी भरलेली त्यांची बोटे पेटीवर फिरायला लागली की समोर बसलेले सारे जण एका वेगळ्या विश्वात पोहोचत असत. साधेपणाने संगीताला भिडण्याची त्यांची वृत्ती त्यांच्या स्वभावातून आली होती. चित्रपट मिळावेत, यासाठी कधी कुणाच्या दारापुढे तोंड वेंगाडण्याची त्यांच्यावर वेळच आली नाही, कारण त्यांचे नाणे बावनकशी होते. त्यांच्या निधनाने मराठीतील एक उत्तम संगीतकार काळाच्या पडद्याआड गेला आहे.
August 5, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti