जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
कृ.ब.निकुंब यांची ‘घाल घाल पिंगा वाऱ्या’ ही कविता तिच्या वेगळेपणामुळे आणि रसाळ काव्यआशया मुळे उठून दिसते. थेट काळजाला हात घालणारे शब्द अन भावविभोर झालेल्या सासूरवाशिणीचे हृदयंगम प्रकटन जणू आपण अनुभवत आहोत असा भास या कवितेतून होतो.
June 30, 2017
आज १७ ऑक्टोबर... आज अव्वल इंग्रजीतील मराठी व्याकरणकार, ग्रंथकार आणि कळकळीचे धर्मसुधारक मा.पांडुरंग दादोबा तर्खडकर यांची पुण्यतिथी.
त्यांचा जन्म ९ मे १८१४ रोजी झाला. प्राथमिक शिक्षण घरी वडिलांजवळ तसेच खाजगी शाळांतून आणि माध्यमिक शिक्षण ‘बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’ च्या शाळेत झाले. गुजराती व फार्सी भाषा त्यांना अवगत होत्या. सरकारी नोकरीत शिक्षक, अधीक्षक, उपजिल्हाधिकारी अशा विविध हुद्यांवर त्यांनी काम केले, सेवानिवृत्तिनंतर अल्पकाळ ओरिएंटल ट्रान्स्लेटरच्या हुद्यावर ते होते.
संस्कृत व इंग्रजी भाषांच्या व्याकरणाचे अध्ययन करून आणि मराठी भाषेच्या रूपविचाराची स्वतंत्र प्रज्ञेने व्यवस्था लावून मराठी भाषेचे व्याकरण (१८३६) त्यांनी सिद्ध केले. ह्या व्याकरणाच्या अनेक आवृत्या निघाल्या. १८८१ मध्ये दादोबांनी आपल्या व्याकरणाच्या सातव्या आवृत्तीची पूरणिकाही प्रसिद्ध केली. विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी लघुव्याकरणही (१८६५) त्यांनी लिहीले. त्याच्याही अनेक आवृत्या निघाल्या. मोरोपंतांच्या केकावलीवर यशोदापांडुरंगी (१८६५) ही गद्य टीका त्यांनी लिहिली. तीतून दादोबांची सहृदयता प्रत्ययास येते. ह्या टीकेस इंग्रजी आणि मराठी अशा दोन प्रस्तावना त्यांनी जोडल्या. त्यांपैकी मराठी प्रस्तावनेत त्यांचे वाङ्मयविषयक विविध विचार आलेले आहेत. त्यांचे १८४६ पर्यंतचे आत्मचरित्र (१९४७, संपा. अ. का. प्रियोळकर) महत्त्वाचे आहे. अव्वल इंग्रजीतील जवळजवळ एकमेव आत्मचरित्र म्हणून दादोबांच्या आत्मचरित्राचे महत्त्व आहेच. तथापि त्यांच्या काळातील धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय स्थितीचे त्यात पडलेले प्रतिबिंबही अभ्यासकांच्या दृष्टीने मोलाचे आहे. स्वतः दादोबांचे जीवन अशा काही चळवळींशी वेगवेगळ्या प्रकारे निगडित झालेले असले, तरी त्यांच्या आत्मचरित्रातून त्या चळवळींबरोबरच दादोबांचे व्यक्तिमत्त्वही स्पष्टपणे प्रत्ययास येते. साधी भाषाशैली आणि प्रांजळ निवेदन ही ह्या आत्मचरित्राची काही उल्लेखनीय वैशिष्ठ्ये.
यांशिवाय मराठी नकाशांचे पुस्तक (१८३६), इंग्रजी व्याकरणाची पूर्वपीठिका (१८६०), धर्मविवेचन (१८६८), पारमहंसिक ब्राह्मधर्म (१८८०) आणि शिशुबोध (१८८४) अशी विविध प्रकारची त्यांची ग्रंथरचना आहे, तसेच काही मराठी आणि इंग्रजी स्फुट निबंधही त्यांनी लिहिले. विधवापुनर्विवाहाचे समर्थन करण्यासाठी त्यांनी लिहिलेला ‘विधवाश्रुमार्जन’ हा संस्कृत निबंध बाबा पदमनजी ह्यांच्या यमुनापर्यटन ह्या कादंबरीत अंतर्भूत करण्यात आला होता. विख्यात स्वीडिश तत्वज्ञ स्वीडनबॉर्ग ह्याच्या ग्रंथावर त्यांनी लिहिलेल्या अ हिंदू जंटलमन्स रिफ्लेक्शन्स रिस्पेक्टिंग द वर्क्स ऑफ एमानुएल स्वीडनबॉर्ग (१८७८) ह्या ग्रंथाची यूरोपात प्रशंसा झाली होती. दादोबांच्या साहित्यात साधेपणा आणि विचारप्रवर्तकता आहे. त्यांचे मराठी व्याकरणविषयक कार्य अग्रेसर महत्त्वाचे असून त्यायोगे मराठी गद्याला प्रमाणरूप प्राप्त झाले असल्याने ‘मराठी भाषेचे पाणिनी’ हे रास्त बिरुद त्यांना लावले जाते.
ग्रंथलेखनाप्रमाणेच समाजसुधारणेचे कार्यही दादोबांनी केले. सरकारी नोकरी करीत असतानाच लोकहिताच्या कार्यात त्यांनी भाग घेतला. दुर्गाराम मनसाराम मेहेता यांनी सुरतला स्थापन केलेली मानवधर्मसभा (१८४४) आणि राम बाळकृष्ण जयकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली परमहंस सभा (सु. १८४८) या धर्मसुधारक संस्थांमागे दादोबांची प्रेरणा होती. यांशिवाय मराठी ज्ञानप्रसारक सभा, मुंबई विद्यापीठ, पुनर्विवाहोत्तेजक सभा, बॉम्बे असोसिएशन इ. संस्थांच्या कार्यातही त्यांचा सहभाग असे.
भिल्लांचा बंडखोर पुढारी पटाजी नाईक याचे बंड त्यांनी १८५७ साली मोडून काढले व सरकारने रावबहादुर ही पदवी त्यांना बहाल केली. मा.पांडुरंग दादोबा तर्खडकर यांचे १७ ऑक्टोबर १८८२ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.मराठी विश्वकोश/ मालशे, स. गं.
October 17, 2016
पाच वेळा विधान परिषद सदस्यत्व मिळविण्याचे रेकॉर्ड एकमेव विनायक मेटे याच्या नावावर आहे.
June 30, 2022
गौरी यांची शैली अतिशय आक्रमक होती. त्यांच्या लेखनात प्रसंगी बेधडकपणा होता व त्या सरळ आरोप करत असत.त्यांनी २००२ साली धार्मिक सलोखा निर्माण व्हावा यासाठी ‘फोरम फॉर कम्युनल हार्मनी’ ही संस्था स्थापन केली होती.
January 29, 2022
वसंतराव देशपांडे म्हटले की अनेक नाट्यगीते , ठुमरी आणि शास्त्रीय संगीतातील अनेक प्रकार आठवतात. याबरोबर आठवते ते त्यांचे ‘ कट्यार काळजात घुसली ‘ हे नाटक आणि त्यांनी केलेली खासाहेबांची अविस्मरणिय भूमिका.
August 8, 2021
वसंतराव नाईक यांची मुख्यमंत्री म्हणून एक तपाची कारकीर्द स्थैर्य व गतिमान विकास यासाठी उल्लेखनीय ठरली. दोन युद्धे, तीन मोठी राज्यव्यापी अवर्षण यासारख्या संकटांना तोंड देतानाच त्यांनी शेतीचा अमूलाग्र विकास करुन महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत जवळजवळ स्वयंपूर्ण बनविला; म्हणूनच त्यांना महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे प्रणेते मानले जाते.
August 30, 2010
कुमार गंधर्वाचे कलाक्षेत्रातील बहुमोल योगदान लक्षात घेऊन भारत सरकारने त्यांना ‘पद्मविभूषण‘ किताबाने गौरविलं तसेच गांधर्व महाविद्यालय , विक्रम विश्वविद्यालय , भारत भवन , मध्यप्रदेश कला अकादमी व संगीत नाटक अकादमी या संस्थांनीही कुमारांना सन्मानित केलं.
March 11, 2015
सायनाइडपेक्षा पाचशे पटींनी घातक असलेल्या 'सरीन' सारख्या वायूचा वापर करुन रासायनिक अस्त्रे बनवले जाण्याचा धोका जगाला भेडसावत आहे. या वायूचे अस्तित्व शोधणारे सेन्सर डॉ. एल.ए. पाटील यांनी विकसित केले. विशेष म्हणजे, हे संशोधन त्यांनी अमळनेरसारख्या छोट्या शहरातील एका छोट्याशा लॅबमध्ये केले. त्यांच्या या संशोधनामुळे सेन्सर शोधणार्या निवडक देशांच्या पंक्तीत भारताला स्थान मिळाले.
डॉ. एल.ए. पाटील यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला अमळनेरची नॅनो लॅब हा लेख पुढील पानावर वाचा.
डॉ. एल.ए. पाटील यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला अमळनेरची नॅनो लॅब हा लेख वाचा.
September 7, 2015
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कंजुष गोलंदाज अशी बापूंची ओळख होती. कसोटीत सलग २१ षटके निर्धाव टाकण्याचा विश्वविक्रम बापूंनी १४ जानेवारी १९६४ रोजी इग्लंडविरुद्ध रचला होता. चेन्नईच्या मैदानावर हा सामना झाला होता. बापू डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करायचे. इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात त्यांनी ३२ षटके टाकली. त्यातील तब्बल २७ षटके निर्धाव होती. ३२ षटकांत त्यांनी १.६७च्या सरासरीने केवळ ५ धावा दिल्या होत्या. बापूंचा हा विश्वविक्रम अबाधित राहिला.
April 4, 2022
अनुष्का शर्माचा जन्म बेंगलोर मध्ये झाला, पण तिचे आई वडील गढवालचे आहेत. वडील कर्नल अजय कुमार शर्मा हे एक आर्मी ऑफीसर आहेत. त्यांचा जन्म १ मे १९८८ रोजी झाला. अनुष्का शर्माचे शिक्षण आर्मी विद्यालय व माउन्ट कारमेल कॉलेज, बेंगलोर येथे झाले. अनुष्का शर्माचा सध्या बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रीमध्ये समावेश झाला आहे. आपल्या विविध भूमिकांमधील चांगल्या अभिनयाने तिने बॉलिवूडमध्ये आपलं हे स्थान निर्माण केलं आहे. अनुष्काने आजवर अनेक सिनेमांत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. बॉ़लिवूडच्या 'किंग खान'सोबत 'रब ने बना दी जोडी' या चित्रपटाद्वारे अनुष्काने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटातील तिची 'तानी'ची भूमिका सर्वांनाच आठवत असेल. याच यशराज बॅनरच्या चित्रपटाने तिला स्टारडम मिळवून दिलं. 'बॅन्ड बाजा बारात' या सिनेमात यशराज बॅनरने पुन्हा एकदा अनुष्काला संधी दिली. तिच्या अभिनय आणि तिला मिळालेली लोकप्रियतेमुळे यासाठी ती पात्र होती. या सिनेमातील रणवीर सिंह सोबतची 'श्रुती कक्कर'ची भूमिकाही प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली.शाहरुख खान, कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मा 'जब तक हे जान' सिनेमात मुख्य भूमिकेत होते. या रोमॅन्टिक सिनेमात अनुष्का डॉक्युमेंट्रि फिल्ममेकर 'अकिरा राय'च्या भूमिकेत दिसली होती.
यश चोप्रा यांचा दिग्दर्शित केलेला हा शेवटचा चित्रपट ठरला. नंतर ती राजकुमार हिरानी यांच्या 'पीके' सिनेमात अनुष्का मि. परफेक्टमिस्ट अमिर खानसोबत दिसली. कमाईचे उच्चांक गाठलेल्या या सिमेमात अनुष्का पत्रकार 'जग्गू'च्या भूमिकेत दिसली. चित्रपटतील तिचा छोट्या हेअरकट मधील लूक लोकांनी चांगलाच पंसत केला.NH 10 मधील 'मिरा'च्या भूमिकेतून अनुष्का शर्मानं आपला एक वेगळा बेंचमार्क सेट केला. NH 10 या सिनेमातूनही अनुष्का पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना इम्प्रेस करण्यात यशस्वी झाली. तिच्या करिअरमधला सर्वात उत्कृष्ट अभिनय तिने या सिनेमात केला. सध्या माध्यगमांमध्येा सर्वांत जास्त0 चर्चित जोडी म्हतणजे विराट कोहली आणि अनुष्का् शर्मा होय.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
May 1, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti