जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक, कथालेखक व पटकथाकार अशी ख्याती असलेल्या दिनकर पाटील यांनी शंभरापेक्षाही अधिक चित्रपटांसाठी संवाद लिहिले यामध्ये “जय मल्हार”, “सांगत्ये ऐका”, “बेल-भंडारा”, “शिकलेली बायको”, “बाळ माझं नवसाचं”, “सुधारलेल्या बायका”, “पाटलाची सून”, “फटाकडी”, “कुंकवाचं लेणं”, “गुणवंताची कन्या”, “मोसंबी नारंगी”, असे एकाहून एक दर्जेदार चित्रपटांचा समावेश असून पन्नासाहून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन देखील पाटील यांनी केले.यामाध्ये काही उल्लेखनीय चित्रपट म्हणजे “रामराम पावणं”, “शारदा”, “पाटलाचं पोर”, “मूठभर चणे”, “कुलदैवत”, “उमज पडेल तर”, “प्रेम आंधळं असतं”, “मल्हारी मार्तंड”, “कामापुरता मामा”, “धन्य ते संताजी धनाजी”, “काळी बायको”, “कोर्टाची पायरी”, “जोतिबाचा नवस”, “पैजेचा विडा”, “भामटा”, “भटकभवानी”, “शिवरायाची सून ताराराणी”; तर हिंदीत “मंदीर”, आणि “घरबार”च्या दिग्दर्शनाची धुरा दिनकर पाटील यांनी सांभाळली होती.
July 18, 2014
कोल्हापूरच्या राज्याचा इतिहास या ग्रंथाचे लेखक
January 4, 2021
फडके, ललिता
‘तू नसतीस तर कळले नसते जीवन म्हणजे अथांग प्रीती. तू नसतीस तर जुळल्या नसत्या गीतांच्या या मंजुळ पंक्ती.’ गायक व संगीतकार सुधीर फडके (बाबूजी) यांनी ‘वहिनीच्या बांगडय़ा’ या चित्रपटासाठी स्वत: स्वरबद्ध करून गायलेल्या या गीताच्या ओळी त्यांच्या सहधर्मचारिणीला तंतोतंत लागू पडाव्या, एवढी खंबीर आणि प्रदीर्घ साथ ललिताबाईंनी त्यांना दिली.
‘प्रत्येक कर्तृत्ववान पुरुषामागे एक स्त्री असते,’ या वापरून गुळगुळीत झालेल्या वाक्याची सार्थता ललिताबाईंचं आयुष्य ज्यांनी जवळून पाहिलंय त्यांनाच पटू शकेल. वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी ललिताबाईंनी जगाचा निरोप घेतला, तेव्हा सुधीर फडके या वलयांकित व्यक्तिमत्त्वाला पन्नासहून अधिक वर्षे साथसोबत करणारी ‘गृहिणी-सखी-सचिव’ काळाच्या पडद्याआड गेली. सुधीर फडके यांची पत्नी किंवा आजच्या पिढीतील संगीतकार श्रीधर फडके यांची आई, एवढीच त्यांची ओळख सांगणं त्यांच्यावर अन्याय करणारं ठरेल. हिंदी आणि मराठी चित्रपटांच्या आरंभीच्या काळात आपल्या भावमधुर आवाजानं मोहिनी घालणाऱ्या पाश्र्वगायिकांमध्ये ललिताबाईंचा समावेश करणं अगत्याचं ठरतं. पूर्वाश्रमीच्या त्या ललिता देऊळकर. एका सारस्वत मध्यमवर्गीय कुटुंबात १९२५ सालच्या ललितापंचमीला त्यांचा जन्म झाला. वडील देऊळकर हे कापडाचे व्यापारी. ललिताबाईंचे दोन काका उत्तम गाणारे आणि आजीचाही आवाज गोड. त्यांच्याच प्रेरणेनं छोटी ललिता गाणं शिकली. पण गाणं हे घरापुरतं ठेवायचं, हा त्या काळातल्या सर्वसाधारण सारस्वत मंडळींचा दृष्टिकोन. त्यामुळेच शेजारच्या बंगाली कुटुंबाकडे आलेले कवी आणि अभिनेते हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय यांनी या मुलीचा आवाज ऐकला तेव्हा ‘हिला तुम्ही सिनेमात का पाठवत नाही’, असा प्रश्न केला. देऊळकर खरं तर या गोष्टीला राजी नव्हते. कर्जबाजारीपणामुळे त्यांनी अखेर ती तयारी दर्शविली. चट्टोपाध्याय यांच्याच ओळखीने ललिताबाईंना ‘बॉम्बे टॉकीज’ या मातब्बर संस्थेत प्रवेश मिळाला. ‘बॉम्बे टॉकीज’ची आघाडीची नायिका देविकाराणीसोबत ‘दुर्गा’मध्ये एक फुटकळ भूमिका त्यांनी केली. याच संस्थेच्या ‘अंगूठी’मध्ये त्या दोन गाणीही गायल्या. ‘बंधन’, ‘कंगन’ या चित्रपटांपर्यंत त्या ‘बॉम्बे टॉकीज’मध्ये होत्या. १९४०च्या दशकाच्या अखेरीस खऱ्या अर्थानं पाश्र्वगायनाचं युग आलं. याच काळात सी. रामचंद्र यांनी ललिताबाईंच्या आवाजाचा कल्पकतेनं वापर करून घेतला. त्यांचं संगीत असलेल्या ‘साजन’मधलं ‘हमको तुम्हारा ही आसरा’ हे ललिताबाईंनी मोहम्मद रफीसोबत गायलेलं गाणं चांगलंच गाजलं. पण कहर केला तो सी. रामचंद्र यांच्याच ‘नदिया के पार’मधल्या ‘मोरे राजा हो. ले चल नदिया के पार’ या ललिता आणि रफी यांच्या युगुलगीतानं! बडे संगीतकार मास्टर गुलाम हैदर यांनीही ‘शहीद’साठी ललिताबाईंकडून दोन गाणी गाऊन घेतली. त्यातलं ‘कदम उठाकर रुक नही सकता’ हे समरगीत आजही आठवणीत असणार. याच काळात मराठीतले उगवते संगीतकार सुधीर फडके यांच्यासाठीही त्या गायल्या आणि पुढे त्यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. २९ मे १९४९ रोजी झालेल्या त्या विवाह सोहळय़ात खुद्द मोहम्मद रफीनं मंगलाष्टकं म्हटली होती, हाही एक दुर्लभ योग! मराठीतही त्यांनी आपल्या आवाजाचा ठसा उमटवला. जशास तसे, मायबहिणी, उमज पडेल तर, वंशाचा दिवा, जन्माची गाठ, माझं घर माझी माणसं, रानपाखरं, चिमण्यांची शाळा, प्रतापगड इत्यादी चित्रपटांसाठी त्यांनी पाश्र्वगायन केलं. पुणे आकाशवाणीवर सर्वप्रथम सादर झालेल्या ‘गीतरामायण’मधली काही गाणीही त्या गायल्या. सुधीर फडके यांच्या व्यक्तिमत्त्वाला सामाजिक आणि राजकीय पैलूही होते. त्यातील सर्व टप्प्यांवर बाबूजींना खंबीर साथ मिळाली ती ललिताबाईंची. म्हणूनच गदिमा प्रतिष्ठानतर्फे काही वर्षांपूर्वी ललिताबाईंना लाभलेला ‘गृहिणी-सखी-सचिव पुरस्कार’ त्यांच्या कर्तृत्वाचा मान राखणाराच ठरला. ‘ललिताने घराकडे पूर्णपणे लक्ष दिल्यामुळेच मी एवढे यश मिळवू शकलो,’ असं अभिमानानं सांगणाऱ्या सुधीर फडके यांनी आठ वर्षांपूर्वी निरोप घेतला. तेव्हापासूनच खरे तर त्या खचल्या होत्या. आता ती पणतीही निमाली आहे.
August 5, 2017
भारतीय चित्रपटसृष्टीला कलाटणी देणा-या दादासाहेब फाळके यांचा ‘राजा हरिश्चंद्र’, ‘कालिया मर्दन’, ‘बॉम्बे टॉकीज’, ‘जीवननैया’, ‘बंधन’, ‘कंगन’, ‘अछूत कन्या’, ‘किस्मत’ यांचा नायर यांनी संग्रहित केलेल्या चित्रपटांमध्ये समावेश आहे. त्यांनी संग्रहित केलेल्या १२ हजार चित्रपटांमध्ये आठ हजार भारतीय चित्रपटांचा समावेश आहे. इंगमार बर्गमन, अकिरा कुरोसावा, अन्द्रेज वाजदा, क्रिस्तोफ झानुसी, फेडेरीको फेलिनी, विटोरोयो डे सिका इत्यादी परदेशी दिग्दर्शकाचे ४,००० चित्रपट संग्रहित आहेत.
March 15, 2022
प्रबोधचंद्र डे असे मूळ नाव असलेल्या मन्ना डे यांचे काका के.सी.डे हे संगीतातील तज्ञ. त्यांचा जन्म १ मे १९१९ रोजी झाला. त्यांनी एस.डी. बर्मन यांना संगीताचे धडे दिले होते व अनेक हिंदी व बंगाली चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले होते. मन्ना डे यांनी त्यांच्याकडून संगीताचे धडे ही त्यांना मिळाले.त्यामुळे लहानपणीही त्यांनी बालकलाकार म्हणून लौकीक प्राप्त केला होता. शास्त्रीय संगीताचे शिक्षण उस्ताद अमान अली खान व उस्ताद अबदुल रहमान खान यांच्याकडून त्यांनी घेतले.
पार्श्वगायनाची सुरवात त्यानी १९४२ मधील ’तमन्ना’या चित्रपटापासून केला.’तमन्ना’चे संगीत दिग्दर्शक के.सी.डे हेच होते मन्ना डे यांनी सुरैय्याबरोबर "जागो आयी उषा "हे युगलगीत गायिले होते. मन्ना डे ची खरी ओळख त्यांच्या "बसंत बहार " मधील "सुर ना सजे" मुळे तसेच "श्री चारसौबीस"मधील "प्यार हुआ "सीमा मधील"तू प्यारका सागर है""दो आंखे बारह हाथ"मधील "ऐ मालिक तेरे बंदे हम" किंवा "लागा चुनरीमे दाग" अश्या निवडक गीतातूनच झाली.राजकपूरसाठी त्यांचा आवाज काही चित्रपटातून वापरला गेला व तो योग्यही वाटला.
शास्त्रीय संगीतावर आधारित गीते म्हणण्याविषयी कुशल अशी प्रसिद्धी असूनही मन्ना डे यांची अवखळ गीतेही तितकीच प्रसिद्ध झाली.विशेषत: रफी यांच्याबरोबर गायलेले परवरिश चित्रपटातील "मामा ओ मामा"किंवा चलतीका नाम गाडी"मधील "बाबू समझो इशारे" किंवा "पडोसन" मधील किशोरकुमारबरोबर गायलेले "एक चतुर नार" ही गीते त्याची साक्ष देतात. मन्ना डे यांनी हिंदी व्यतिरिक्त बंगाली भाषेत गाणी गायली आहेत.
मराठी भाषेत गायलेल्या त्यांच्य गीतांची संख्या इतर कोणाही मराठी गायकाच्या (एक बाबूजी सोडले तर) तोडीस तोड आहे. त्यांनी ५५ मराठी गाणी गायली आहेत " अ आ आई म म मका, धुंद आज डोळे". त्याचबरोबर "घन घन माला नभी " ही त्यांची गाजलेली चित्रपटगीते."घरकुल" चित्रपटातील "हाउस ऑफ बांबू"हे वेगळ्या शैलीचे गीतही लोकांनी खूपच डोक्यावर घेतले होते. सर्व संगीत दिग्दर्शकांबरोबर गीते गायलेल्या मन्ना डे यांनी नौशाद यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली मात्र गायलेले दिसत नाही कदाचित मोहंमद रफी हे नौशाद यांचे आवडते गायक असण्याचा परिणाम असावा व त्यांच्यानंतर महेंद्र कपूर यांच्यावर नौशाद यांची भिस्त होती असे दिसते.
मन्ना डे यांच्या गायनाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा शास्त्रीय पाया. शास्त्रीय ढंगाची गाणी ते अशी काही खुलवत की काही विचारू नका. याबाबतीत ते एकमेवाद्वितीयच म्हणावे लागतील. लोकसंगीताचा बाज असणारी गाणीही ते तितक्याेच सहजतेनं, लीलया गात असत. फुलवत असत. मन्ना डे यांच्या आपल्या "ट्रेडमार्क‘ टोपी बद्दल मन्ना डे नी लिहिले आहे. एकदा ऐन डिसेंबर महिन्यात गाण्यांच्या कार्यक्रमासाठी काश्मीहरला गेलो होते. त्या वेळी केवळ थंडीच नव्हती, तर बर्फ देखील पडत होता.
व्यासपीठावर आल्यानंतर कडाक्या च्या थंडीत गाणी म्हणायची कशी, असा प्रश्नल माझ्यापुढे उपस्थित राहिला. माझ्या चेहऱ्यावरची अस्वस्थता पाहून चाहत्याने तत्काळ व्यासपीठावर येत त्याने मला आपली टोपी भेट दिली. चाहत्याच्या प्रेमाने मी भारावून गेलो. थंडी पळून गेली आणि कार्यक्रम सुरळीत पार पडला. मा.मन्ना डे यांचे २४ ऑक्टोबर २०१३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मन्ना डे यांची गाजलेली काही गाणी
प्यार हुआ..., दिल का हाल सुने... (श्री ४२०)
तू प्यार का सागर है (सीमा)
ना तो कारवॉं की तलाश है (बरसात की रात)
लागा चुनरी में दाग (दिल ही तो है)
ऐ मेरे प्यारे वतन (काबुलीवाला)
जिंदगी कैसी है पहेली (आनंद)
घन घन माला नभी दाटल्या (वरदक्षिणा, मराठी)
अ आ आई (एक धागा सुखाचा, मराठी)
यारी है ईमान मेरा (जंजीर)
ए मेरी जोहराजबी (वक्त)
यशोमती मैया से (सत्यम शिवम् सुंदरम्)
पुछो ना कैसे मैंने रैन बिताई (मेरी सूरत तेरी आँखे)
ए भाय जरा देख के चलो (मेरा नाम जोकर)
कसमे वादें प्यार वफा सब (उपकार)
ये दोस्ती (शोले)
चलत मुसाफिर मोह लियो रे (तिसरी कसम)
चुनरी संभाल गोरी (बहारों के सपने)
November 16, 2017
नाटककार, कथाकार आणि पटकथाकार म्हणून सर्वांना परिचित असलेलं नाव म्हणजे मधुसूदन कालेलकर.
मधुसूदन कालेलकर यांचा जन्म २२ मार्च १९२४ रोजी झाला. त्यांचे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण वेंगुर्ले या गावी झाले. त्यानंतर त्यांनी मुंबईत वास्तव्य केले.
साहित्य हा त्यांचा आवडता विषय होता तर नाटकाविषयी प्रेम होते. अखेर जमलं या मराठी चित्रपटासाठी त्यांनी विनोदी कथा लिहिली आणि तो चित्रपट चांगलाच गाजला. राजा नेने ह्यांच्या हाताखाली काम करून त्यांनी चित्रीकरण आणि पटकथा लेखन यांचा अनुभव मिळविला. त्यानंतर फिल्मिस्तान या संस्थेत त्यांना सेवा करण्याची संधी मिळाली.
त्यांची पटकथा असलेले एकाहून एक दर्जेदार चित्रपट यशस्वी होऊ लागले आणि सिद्धहस्त पटकथा लेखक म्हणून त्यांचा लौकिक झाला. एका मागोमाग एक असे त्यांचे ७५ पेक्षा जास्त चित्रपट प्रदर्शित झाले. आलिया भोगासी, पहिले प्रेम, पतिव्रता, सप्तपदी, ह्याला जीवन ऐसे नांव, हा माझा मार्ग एकला इ. अनेक गाजलेले चित्रपट त्यांच्या नावावर आहेत.
चित्रपटाबरोबर प्रेक्षकांची आवड ओळखून त्यांनी विपूल नाट्यलेखन केले. १९६३ साली दिल्या घरी तू सुखी रहा हे रंगभूमीवर आलेले नाटक खुपच गाजले. त्यानंतर त्यांनी लिहिलेली बरीच नाटकं यशस्वी झालीत. शंभराच्यावर त्यांचे प्रयोग झाले.
स्वातंत्र्य लढ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लिहिलेले उद्याचे जग हे कालेलकरांचे पहिले नाटक. एकंदर तीसच्या वर त्यांची नाटकं प्रदर्शीत झाली. त्यात त्यांनी अनेक विषय हाताळले आहेत. कौटुंबिक, गंभीर, विनोदी आणि सामाजिक सुद्धा. अपराध मीच केला, दिवा जळू दे सारी रात, आसावरी, ही वाट दूर जाते, अबोल झालीस कां, कल्पवृक्ष कन्येसाठी, चांदणे शिपीत जा, या घर आपलंच आहे, नाथ हा माझा, डार्लिंग डार्लिंग, हे फुल चंदनाचे, अमृतवेल, शिकार, आणि माधवराव पेशव्यांच्या जीवनावर आधारित ही श्रींची इच्छा ही सर्व त्यांची लोकप्रिय अशी नाटकं. सहज भाषा आणि पकड घेणारे संवाद त्यामुळे ही नाटकं चित्ताकर्षक ठरली.
मधुसूदन कालेलकर यांचे १७ डिसेंबर १९८५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 3, 2017
रामकृष्ण शिंदे यानी हेमंत केदार या नावाने संगीत दिले. रामकृष्ण शिंदे यांनी १९४७ साली आलेल्या ‘मॅनेजर’ चित्रपटाने आपले करियर सुरूवात केले. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते आई.पी.तिवारी व मुख्य कलाकार होते जयप्रकाश, पूर्णिमा, गोबिंद, सरला, अज़ीज़, अमीना व तिवारी.
April 19, 2022
“आहुती’, “गुन्हेगारी आणि शासन’, “गुन्हेगारांचे जग’, “पुरुषप्रधान संस्कृती’, “दुर्दैवाशी दोन हात’ अशा अनेक पुस्तकांच्या लेखिका सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी यांचे चिरंजीव श्रीनिवास शारंगपाणी यांनी जागवलेल्या त्यांच्या आठवणी…
March 16, 2019
आपल्या कॅमेऱ्याने सिनेतारे-तारकांना ग्लॅमर मिळवून देणारे, कलाकारांना नवा चेहरा देणारे असे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांचा जन्म १६ सप्टेंबर १९५० रोजी झाला.
व्यक्तिचित्रण प्रकारातल्या प्रकाशचित्रांसाठी ते विशेष नावाजले जात असत. आपल्या मितभाषी स्वभावाने, मृदू वाणीने आणि व्यक्तीतील मित्रत्वाचा शोध घेणाऱ्या दृष्टीने त्यांनी केवळ सिनेजगतातीलच नव्हे तर समाजाच्या विविध प्रांगणातील व्यक्तींना आपल्या मित्रपरिवारात सामावून घेतले होते.
गौतम राजाध्यक्ष यांना छायाचित्रणासह कलेच्या विविध प्रांतात आवड होती. १९७७ मध्ये त्यांचा संबंध लिंटाजशी आला आणि त्यांना तिथेच नोकरीची संधी मिळाली. फोटोग्राफीेचे तंत्र ते लिंटाजमध्येच शिकले. या काळात त्यांनी लिंटाज इंडियामध्ये मानाच्या जागाही मिळविल्या होत्या. पुढे १९८० पासून १९८७ पर्यंत फॅशन फोटोग्राफर म्हणूनही काम पाहिले. त्यानंतर त्यांनी स्वतंत्र काम केले.
छायाचित्र काढताना ज्यांचे छायाचित्र काढायचे त्यांचे व्यक्तिमत्त्व त्या छायाचित्रात आणण्याचा त्यांचा कसोशीचा प्रयत्न असायचा. म्हणून त्यांची छायाचित्रे बोलकी असत. १९९७ मध्ये त्यांचे ‘फेसेस’ हे छायाचित्रांचे पुस्तक प्रसिद्ध झाले. यात त्यांनी दुर्गा खोटे, साधना समर्थपासून ऐश्वर्या रायपर्यंतच्या ४५ भावमुद्रा टिपल्या आहेत. दोन वर्षांपूर्वीच त्यांचे ‘चेहरे’ या कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन लता मंगेशकर यांच्या हस्ते झाले होते. त्यांच्या छायाचित्रांची प्रदर्शनेही रसिकांच्या चांगल्याच स्मरणात आहेत.
छायाचित्राबरोबरच स्टील फोटोग्राफीचे कामही त्यांच्याकडे आले. अनेक चित्रपटांची त्यांनी स्टील फोटोग्राफी केली आहे.
गौतम राजाध्यक्ष यांचे १३ सप्टेंबर २०११ रोजी निधन झाले.
मराठीसृष्टीवरील गौतम राजाध्यक्ष यांचा लेख.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 26, 2021
लालबहादूर शास्त्री यांचा संस्कृत भाषेवरही मोठ्या प्रमाणावर पगडा होता. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर ते भारत सेवक संघासोबत जोडले गेले. येथेच त्यांनी देशसेवेचे व्रत घेतले. या सोबतच त्यांच्या राजकीय कार्याला येथूनच सुरुवात झाली.
July 27, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti