अभिनय देव

देव, अभिनय

जागतिकीकरणाच्या युगात जाहिरात क्षेत्राची व्याप्ती ही अमर्याद आणि तेवढीच खोलवर पसरलेली आहे. अर्थात या क्षेत्रामध्ये अनेक स्थित्यंतरे तसेच बदलही काळानुरूप होत गेले. नवनवीन संकल्पना त्यामधून उदयास आल्या. लोकजीवनाशी थेट संबंध येत असलेल्या या क्षेत्राचे आकर्षण आणि गोडी अभिनय देव या अवलियाकडे पहिल्यापासूनच होती. घर रमेश व सीमा देव यांचे, तेथे अभिनयाची सरस्वती वास करीत असली तरी त्यांच्या या ज्येष्ठ पुत्राचा कल जाहिरात क्षेत्राकडे होता.
वास्तुविशारदाचे शिक्षण घेताना याच शिक्षणातून अभिनय यांना वेगवेगळ्या जाहिरातींची संकल्पना सुचत गेली आणि याच ऊर्मीपोटी ते ओ अ‍ॅण्ड एम या प्रख्यात जाहिरात संस्थेत दाखल झाले. आयुष्याला वेगळे वळण देणाऱ्या अभिनय देव यांचा जाहिरात क्षेत्रातील प्रवास त्यानंतर बहरत गेला. काही काळ त्यांनी हायलाइट प्रॉडक्शन या जाहिरात कंपनीमध्येही दिग्दर्शक म्हणून काम केले. पण मनातील तो सुप्त दिग्दर्शक स्वस्थ बसू देत नव्हता. यामधूनच रमेश देव प्रॉडक्शन (आरडीपी) या जाहिरात संस्थेची निर्मिती झाली. तुम्ही जगाकडे कोणत्या दृष्टीने पाहता ती दृष्टी तुम्हाला जाहिरात सुचवून जाते असे अभिनय देव यांचे म्हणणे आहे आणि याची साक्ष पटते ती सर्फच्या ‘दाग अच्छे है’ या जाहिरातीमधील वाक्याने. कल्पकता आणि सृजनशीलतेच्या याच जोरावर अभिनय देव यांनी तब्बल ४५० जाहिरातींना आकार दिला. जाहिरातींमध्ये दिसणारे चेहरे लक्षात राहतात, पण त्यांचे दिग्दर्शक कुणाला माहीतही नसतात.. जाहिरातींच्या या अफाट विश्वामध्ये या दिग्दर्शकांच्या कर्तृत्वाची दखल ‘कान’ महोत्सवामध्ये खास विभागात घेतली जाते. (चित्रपटांचा कान येथे होणारा महोत्सव निराळा) जाहिरात क्षेत्रामधील ऑस्कर अशी ओळख असलेला प्रतिष्ठेचा ‘कान गोल्ड लायन’ (द बेस्ट डिरेक्टर- फिल्मक्राफ्ट) हा पुरस्कार अभिनय देव यांनी पटकावून आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये देशाची माान उंचावली. जगभरातील तब्बल १७०० जाहिरात दिग्दर्शकांमधून अभिनय देव यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. कल्पकता आणि सृजनशीलतेचा हा बहुमान असल्याची अभिनय देव यांची ही प्रतिक्रिया बरेचसे काही सांगून जाते.

Author