मराठी रंगभूमीवरील व चित्रपटातील एक प्रसिध्द गायक-नट म्हणून गोविंद पंत यांची ख्याती होती. आपल्या आयुष्यातील बहुतांश कार्यकाळ पंत यांनी मराठी रंगभूमीचं संवर्धन करण्यात मोलाचे योगदान दिले आहे. “मृच्छकटिक”, “संगीत सौभद्र”, “लग्नाची बेडी” ही नाटके रंगभूमीवर आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
चित्रपट निर्माते व दिग्दर्शक व्ही.शांताराम यांच्या “अमरभूपाळी” या चित्रपटात होनाजी बाळाची भूमिका गोविंद पंतांनी साकारली होती. तसंच लता मंगेशकर यांच्याबरोबर “घनः श्याम सुंदरा” या गाण्यावर आपल्या पहाडी स्वरांचे साज चढवून ही भूपाळी अविस्मरणीय केली. भावमधुर आवाज, तल्लीनता, हे त्यांच्या गायनातील उल्लेखनीय गुण होते.
January 12, 2015
स्वातंत्र्याचा लढा, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि राष्ट्रीय सेवादलाशी जोडले गेलेले प्रमुख महिलांपैकी एक नाव आणि राष्ट्रीय सेवादलाच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणजे सुधा वर्दे. माहेरचं अनुताई कोतवाल हे नाव असलेल्या सुधाताईंचा जन्म १९३२ सालचा;लहानपणापासूनच सुधाताईंना विविध कलांची आवड होती.
April 18, 2014
गायक म्हणून छोटा गंधर्व यांनी आपल्या नाट्यपदां मधुन विविधभावपूर्णता दाखवून दिली; त्यांचा लोकप्रिय नाट्यपदांपैकी ” आनंदे नटती”, “कोण तुजसंग सांग गुरुराया” “चंद्रिका ही जणू” , “चांद माझा हा हासरा”, “छळि जीवा दैवगती”, “तू माझी माउली”, “दिलरुबा दिलाचा हा”, “दे हाता शरणागता”, “नच सुंदरी करु कोपा”, “प्रिये पहा रात्रीचा समय सरुनि”, “बघुनी वाटे त्या नील पयोदाते”, “बहुत दिन नच भेटलो”, “माता दिसली समरी विहरत”, “या नव नवल नयनोत्सवा”, “रजनिनाथ हा नभी उगवला” या नाटकांचा समावेश आहे.
March 13, 2014
दत्तात्रय केसरीनाथ दिघे यांचा जन्म मुंबई येथील बारभाई मोहल्ला या मुस्लिम वस्तीत दि. १८ मे १९१९ रोजी झाला.
(संदर्भ : स्वतः पाठविलेल्या माहितीवरुन)
August 20, 2010
पुरुषप्रधान संस्कृतीवर हल्ला चढविणार्या अनेक महिला आपल्या पाहण्यात येतात. परंतु ही रुळलेली वाट सोडून महिलांइतकाच पुरुषांचाही अभ्यास करुन समान सामाजिक व्यवस्थेसाठी मधू चौगावकर देशभरात काम करीत आहेत. स्त्री-पुरुष समानता खर्या अर्थाने प्रत्यक्षात यावी, यासाठी त्या स्वत:च्या घरापासूनच प्रयत्नशील झाल्या आहेत. युनिसेफच्या जेन्डर एम्पॉवरमेन्ट विषयीच्या कोअर समितीच्या त्या सदस्य आहेत.
स्त्री-पुरुष समानतेसाठी
July 14, 2017
ग्रंथाली प्रकाशन हे साहित्याची जाण व चोखंदळपणा या दोन्ही बाबींसाठी मराठी भाषेतील एक अग्रेसर प्रकाशन समजले जाते. दिनकर गांगल यांचा, या प्रकाशनाला गरूड भरारी मारण्यास प्रवृत्त करण्यामागील सहभाग महत्वाचा व मोलाचा मानला जातो. या रत्नपारखी संपादकाने ग्रंथाली साठी अनेक तळागाळातील हौशी कवींना व लेखकांना हुडकून व त्यांना विविध विषयांवर लिहीण्याबाबत मार्गदर्शन केले आणि त्यांचे विचार सुध्दा समृध्द केले.
दिनकर गांगलांमुळे मराठी वाचकांना अनेक विचारगंगांमध्ये आपले हात धुवावयास मिळाले, व वेगवेगळ्या स्तरांतील तरूणांच्या महत्वाकांक्षा, स्वप्ने, विचार, मनिषा यांचे उत्कट दर्शन या निमीत्ताने साहित्यपटलावरती पाहावयास मिळाले. त्यांच्या रूपाने मराठी साहित्याला चतुरस्त्र विचार करणारा व अफाट नेतृत्वकौशल्ये अंगी बाळगणारा संपादक लाभला हे विशेष!
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
January 3, 2015
हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेचे पार्ल्यातील भाऊबीज कार्यकर्ते गजानन दत्तात्रय जोशी यांचा सुमारे ३६ वर्षांपूर्वी महर्षी कर्वे यांच्या हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेशी त्यांचा संबंध आला.
April 9, 2011
ललित व वैचारिक लेखन करणार्या गांधीवादी लेखिका प्रभा श्यामराव कंटक यांचा जन्म १ जुलै १९०६ रोजी झाला. “काम आणि कामिनी”, “अग्नियान”
या कादंबर्या, “प्रांतजीवन” हा नाटिकांचा संग्रह, हिंदी स्त्रियांचे जीवन, “महाभारत-एक मुक्त चिंतन या पुस्तकांसह “सत्याग्रही महाराष्ट्र”
या ग्रंथातून म. गांधीजींच्या चळवळींचा इतिहास त्यांनी चितारला आहे.
## Prabha Shamrao Kantak
July 27, 2017
मराठी चित्रपटांमधली यशस्वी “वुमन फिल्ममेकर” तसंच प्रतिभावान व संवेदनशील अभिनेत्री, दिग्दर्शक म्हणून ज्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते अश्या स्मिता तळवलकरांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात १९७२ साली दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून केली.
August 14, 2014
ग्रामीण कादंबरी लेखन या प्रांतामध्ये अग्रक्रमाने घेतले जाणारे नाव म्हणजे व. ह. पिटके . ग्रामीण जीवनाची स्पंदने अचूकपणे रेखाटणार्या तसंच १९६० नंतर महाराष्ट्रातल्या खेडयांतील राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक पटलांवर औद्योगिकरणाचे झालेले मुलभूत व महत्त्वपूर्ण बदल, रसिकांपर्यंत पोहोचविणे हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. आभ्यासपुर्ण कल्पकतेने व संशोधनपूर्वक उमटवलेली लेखणी हा त्यांच्या प्रत्येक पुस्तकाचा गाभा होता.
“शिदोरी“ ही त्यांची, १९६९ साली प्रकाशित झालेली व ग्रामीण भागातील नव्याने उदयास आलेली सत्तास्पर्धा रोमांचकपणे उलगडून दाखविणारी कादंबरी, सृजनशीलतेचं उत्तम उदहारण म्हणता येईल. त्याकाळात वाचकवर्गाने या कादंबरीचे भरभरुन प्रतिसाद दिला होता.
January 14, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti