गोरे, (डॉ.) मा. स.
मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी कुलपती डॉ. माधव सदाशिव गोरे हे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १९२१ रोजी झाला. त्यांचे प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण धारवाड, पुणे आणि सांगली येथे झाले.
‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस’मध्ये ते शिकले. तिथे त्यांनी ‘सोशल सव्र्हिस अॅडमिनिस्ट्रेशन’ या विषयामध्ये पदव्युत्तर पदविका मिळवली. १९४८ मध्ये त्यांनी समाजशास्त्र या विषयामध्ये मुंबई विद्यापीठातून एम.ए.ची पदवी मिळवली. १९४८ ते १९५३ या काळात ते ‘दिल्ली स्कूल ऑफ सोशल वर्क’मध्ये अधिव्याख्याते होते. त्यांना फुलब्राईट शिष्यवृत्ती मिळाली होती. त्याआधारे त्यांनी १९६१ मध्ये कोलंबिया विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवली. १९८२ पर्यंत ते मुंबईच्या ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्थे’च्या संचालकपदी होते. १९८३ ते १९८६ या काळात ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. बेलॉईट कॉलेज आणि विस्कॉन्सिन विद्यापीठाचे ते नियमित मानद व्याख्याते होते. १९९७ मध्ये ते दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे कुलपती बनले. समाजशास्त्रज्ञ या नात्याने त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव ‘इंडियन कौन्सिल ऑफ सोशल वेल्फेअर’ने केला होता. १९७५ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ हा मानाचा किताब देऊन गौरवण्यात आले होते. समाजशास्त्र क्षेत्रात त्यांनी बजावलेल्या उत्तुंग कामगिरीबद्दल २००६ मध्ये त्यांना ‘इंडियन सोशालॉजिकल सोसायटी’च्या वतीने जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. २००३ पासून त्यांनी अनेक मराठी पुस्तकांचे इंग्रजीत भाषांतर केले. ते अतिशय शिस्तशीर आणि व्यासंगी प्राध्यापक या नात्याने विद्यार्थिवर्गामध्ये प्रिय होते. त्यांनी समाजशास्त्र या विषयामध्ये मूलभूत संशोधन केले आहे. ‘इंडियन यूथ : प्रोसेसेस ऑफ सोशलायझेशन’ हे त्यांचे पुस्तक आधुनिक भारतातील तरूणांची समाजशास्त्रीय चिकित्सा करणारे आहे. १९७७ मध्ये त्यांनी याच विषयावर दिलेल्या व्याख्यानसत्रावर आधारित असे हे पुस्तक आहे. डॉ. गोरे यांनी ‘होमी भाभा फेलोशिप्स कौन्सिल’साठी महाराष्ट्रातल्या ब्राह्मणेतर चळवळीची समाजशास्त्रीय चिकित्सा केली होती. याच काळात त्यांनी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या चरित्राचा अभ्यास करून महाराष्ट्रातल्या ब्राह्मणेतर चळवळीवर पुस्तकही लिहिले. याच विषयावर त्यांनी अलाहाबादच्या ‘गोविंद वल्लभ पंत इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल स्टडीज’मध्ये व्याख्यानसत्रात भाग घेतला होता. त्यांचे असंख्य प्रबंध देशात आणि परदेशात प्रसिद्ध झाले आहेत. समाजशास्त्र या विषयाशी संबंधित अनेक आयोगांवर त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी बजावलेली होती. ते ‘इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च’च्या संचालकपदावरही काही काळ होते. १९७१ ते १९७५ या काळात ते ‘धंदेवाईक शिक्षणात समाजशास्त्राची भूमिका’ या विषयावर काम करणाऱ्या अभ्यासगटाचे प्रमुख होते. १९७७ ते १९७९ या काळात ते ‘इंडियन सोसायटी ऑफ क्रिमिनॉलॉजी’ या संस्थेचे अध्यक्ष होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस’चे संचालकपद स्वीकारले. ‘सोशल डेव्हलपमेंट : चॅलेंजेस फेस्ड इन अनइक्वल अॅण्ड प्लुरल सोसायटी’ हेही त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे त्यांनी ‘द सोशल कॉन्टेक्स्ट ऑफ अॅन आयडॉलॉजी : आंबेडकर्स पोलिटिकल अॅण्ड सोशल थॉट’ हे पुस्तक लिहिले होते. समाजाचा अतिशय बारकाईने अभ्यास करून त्याची मानसशास्त्रीय चिकित्सा करण्याचे काम त्यांनी अनेक वर्षांपासून केले आहे. देशाच्या इतिहासामध्ये घडलेल्या सामाजिक अभिसरणाचा अभ्यास अलीकडच्या काळात त्यांच्याइतका अन्य कोणाचा असेल, अशी शक्यता नाही. एक अतिशय डोळस अशा समाजशास्त्रज्ञास त्यांच्या निधनाने आपण मुकलो आहोत. शुक्रवारी त्यांचे निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.
August 5, 2017
व्यावसायिक रंगभूमीवर त्यांचं पहिलं नाटक ‘ गंध निशिगंधाचा ‘ हे होतं. पुढे त्यांनी अनेक नाटकांमध्ये आपल्या अभिनयाचं गारुड , रसिक प्रेक्षकांच्या मनावर केलं. त्यातील सध्या चर्चेत असलेलं सोयरे सकळ ह्या नाटकात त्यांनी दुहेरी भूमिका साकारल्या आहेत.
December 20, 2023
ठाणे शहर म्हणजे संगीतरत्नांची खाणच आहे. संगीतभूषण राम मराठे यांसारखे ज्येष्ठ गायक याच ठाण्यातले. त्यांच्या पासून सुरु झालेली ही परंपरा आज अभिमान वाटावी इतकी उच्च दर्जाची झाली आहे.
May 29, 2014
शाहू मोडक हे नाव घेतले की समोर संत ज्ञानेश्वर व भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रतिमा आजही समोर येतात. जन्माने ख्रिश्चन असूनही शाहू मोडक यांनी संत ज्ञानेश्वर व भगवान श्रीकृष्ण यांच्या भूमिका लीलया केल्या. त्यांनी ज्ञानेश्वतराची भुमीका शब्दशः जगले कारण त्यांनी त्या भुमीकेनंतर मांसाहार वर्ज केला होता. त्यांनी केवळ या भूमिकांमधून केवळ अभिनयच केला नाही तर तो सात्विक भाव त्यांच्यामध्ये होता. संत ज्ञानेश्वर, माझा मुलगा, माणूस, त्यांनी २९ चित्रपटांत कृष्णाची भूमिका साकारली.
April 13, 2010
यतीन कार्येकर हे आपल्या सगळ्यांच्या ओळखीचं नाव आहे. यतीन कार्येकर हे मराठीतील जेष्ठ अभिनेत्री ज्योत्स्ना कार्येकर यांचे सुपुत्र आहेत.
July 19, 2022
एका दशकापेक्षा ही अधिक काळात सुबोध भावे यांनी नाटकं, दूरचित्रवाणी-मालिका, चित्रपट अशा सर्व दृकश्राव्य माध्यमातून सहज सुंदर आणि ओघवत्या अभिनय शैली मुळे रसिक मनावर अधिराज्य केलं.
June 18, 2013
स्पष्टवत्त*ेपणा, निर्भिडपणा आणि स्वतंत्र विचाराचे प्रकटीकरण हे ज्यांच्या व्यत्ति*मत्त्वाचे वैशिष्ट्य होते ते म्हणजे कादंबरीकार, समीक्षक, वृत्तसंपादक गजानन त्र्यंबक माडखोलकर. माडखोलकरांचा जन्म २८ डिसेंबर १८९९ सालचा. वडील त्र्यंबकराव मुंबईत भिक्षुकी करीत.
January 22, 2010
दत्ता डावजेकर
December 15, 2010
पुरातत्त्व शास्त्राची मुहूर्तमेढ रोवणारे आणि या क्षेत्रातील अभ्यासकांसाठी पितामह असलेले प्रा. डॉ. मधुकर केशव
ढवळीकर यांना यावर्षी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला.
प्रा. ढवळीकर यांचा जन्म १९३०चा. त्या काळात पुरातत्त्वशास्त्र अगदीच दुर्लक्षित होते. अर्थात आजही त्याबाबत सरकारी पातळीवर उदासीनता आहेच. त्यामुळे पदवी-शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतीय पुरातत्त्व विभागामध्ये १९५३ पासून टेक्निकल असिस्टंट म्हणून कामाला सुरुवात करून ढवळीकर यांना वेगळी दिशा पकडली. प्रा. ढवळीकर यांची अभ्यास, चिकाटी आणि विषयाचा चारी बाजूंनी विचार करण्याची वृत्ती यामुळे त्यांनी या शास्त्राच्या संशोधनात मूलभूत स्वरूपाचे कार्य केले.
July 26, 2011
वेंगुर्ल्यातील सामाजिक कार्यकर्त्या सौ. प्रज्ञा प्रदीप परब यांनी ‘कल्पवृक्ष कन्येसाठी…!’ या गाण्याचे बोल सार्थक करीत महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्था, मर्यादित वेंगुर्लाचे सक्षमपणे व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी यशस्वीपणे पेलली आहे.
September 13, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti