(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • विठ्ठल कृष्ण नेरुरकर

    कवी, कथाकार, नाटककार विठ्ठल कृष्ण नेरुरकर यांचा जन्म १४ डिसेंबर १८९२ रोजी झाला.

    “मुलींची शाळा” ही एकांकिका, नागरिकता वाचनमाला पुस्तक १,२ तसेच साधना व नवा नमुना या कादंबर्‍या. प्रतिबिंबे फोटोचं लग्न नि इतर लघुकथासंग्रह, तसेच “मधली सुट्टी, माणूस अणि पशू, शिलाचे मोल” ही लहान मुलांसाठी पुस्तके त्यांनी लिहिली.

    ## Vitthal Krishna Nerurkar

      July 26, 2017


  • संत मोरया गोसावी

      December 15, 2010


  • प्रवीण केशव देशपांडे

    गेली सुमारे २७-२८ वर्षे प्रवीण देशपांडे छाछायाचित्रणाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. छायाचित्रकला हे साध्य नव्हे तर साधन समजून विविध सामाजिक क्षेत्रातील संस्थांशी निगडीत आहेत.

      May 24, 2014


  • दीपक मुजुमदार

    दीपक मुजुमदार एक यशस्वी भरतनाट्यम नर्तक, गुरु आणि नृत्य दिग्दर्शक या तीनही वैशिष्ट्यांचे मानकरी ठरले आहेत. नृत्यातील आपल्या अभिनय कौशल्याने दीपकजींनी भारतीय शास्त्रीय नृत्याची जगभरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

      May 29, 2014


  • साधनाताई आमटे

    साधनाताई आमटे

    महाराष्ट्रातील नामांकित महिला समाजसेविकांपैकी एक तसंच कुष्ठरोगी, आदिवासी यांच्यासाठी निरपेक्ष मनाने काम करणार्‍या साधनाताई आमटे यांचा जन्म नागपूर येथे ५ मे १९२७ साली झाला.

    कुष्ठरोग्यांसाठी काम करणार्‍या मुरलीधर देवीदास आमटे अर्थात बाबा आमटे यांच्यासोबत १९४६ साली त्या विवाहबध्द झाल्या. डॉ. बाबा आमटे यांच्या जीवनपटलावरती धावती नजर फिरवणारे, व त्यांच्या गुण दोषांवर प्रकाश टाकणारे निर्भीड असे “समिधा” हे आत्मचरित्र लिहिले. हे आत्मचरित्र तमाम मराठी साहित्यप्रेमींकडून नावाजले गेले. याशिवाय अनेक दर्जेदार पुस्तके व कादंबर्‍या लिहून त्यांनी आपली एक अत्यंत चौकस व प्रतिभावंत लेखिका ही ओळख मिळविली.

    बाबा आमटे यांच्या जीवनकार्याला व त्यांच्या प्रत्येक निर्णयाला व अभिनव उपक्रमांना, त्यांनी खंबीर व सक्रिय अशी साथ सोबत दिली होती. त्यासोबतच कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाचे कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातल्या आनंदवन आश्रमाच्या उभारणीत सुध्दा त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. चतुरंग प्रतिष्ठानच्या २००७ सालच्या चतुरंग जीवनगौरव पुरस्काराने साधना आमटे यांना सन्मानित करण्यात आले होते.

    डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. विकास आमटे हे त्यांचे पुत्र त्यांचा आणि बाबा आमटे यांचा वारसा चालवित आहेत.

    ९ जुलै २०११ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील आनंदवन येथे साधनाताईंचे निधन झाले.

      January 9, 2015


  • मन्ना डे

    मराठी भाषेत गायलेल्या त्यांच्या गीतांची संख्या इतर कोणाही अमराठी गायकाच्या तोडीस तोड आहे. त्यांनी ५५ मराठी गाणी गायली आहेत ” अ आ आई म म मका, धुंद आज डोळे”. त्याचबरोबर “घन घन माला नभी ” ही त्यांची गाजलेली चित्रपटगीते.”घरकुल” चित्रपटातील “हाउस ऑफ बांबू”हे वेगळ्या शैलीचे गीतही लोकांनी खूपच डोक्यावर घेतले होते.

      July 14, 2022


  • चंडिकादास अमृतराव देशमुख

    क्रांतिसिंह नाना पाटील हे मराठी सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी समाजास आत्मनिर्भर बनविण्यासाठी अथक प्रयत्न केले. भारतीय शासनाने त्यांना त्यांच्या कार्यासाठी पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवले.

      December 15, 2010


  • सुधीर फडके

    सुधीर फडके हे ख्यातनाम गायक व संगीतकार होते. चित्रपटसंगीत, भावगीते, अभंग यासाठी ते खास प्रसिद्ध आहेत. बाबूजी या टोपणनावाने ते परिचित होते. त्यांनी जवळपास ५० वर्षे मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केले. महाकवी गदिमांच्या गीतरामायण या महाकाव्याचे संगीत आणि सादरीकरण अजूनही मराठी संगीतरसिकांच्या मनात घर करुन आहे.

      April 20, 2011


  • वसंत कृष्ण वर्‍हाडपांडे

    लेखक, समीक्षक, भाषाभ्यासक वसंत कृष्ण वर्‍हाडपांडे

      July 26, 2017


  • डॉ.अभय बंग

    बालमृत्यूच्या प्रश्नावर त्यांनी शोधलेले घरोघरी नवजात बालसेवा हे मॉडेल जगभरातील अविकसित देशांमध्ये व भारतात ९ लाख आशांव्दारे बालमृत्यू कमी करण्यासाठी वापरले जाते. त्यांच्या सर्च संस्थेचे कार्य व कार्यपध्दती जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असून विद्यार्थ्यांना ‘केस स्टडी’ म्हणून शिकवले जाते.

      June 8, 2022