(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ताराबाई मोडक

    (१८९२-१९७३)

    ठाणे जिल्हातील निसर्गरम्य आदिवासी परिसरात ग्रामिण बालशिक्षणाचे यशस्वी प्रयोग करणार्‍या शिक्षणसंशोधक. राज्य विधानसभेच्या सदस्य. त्यांचे कार्य असंख्य कार्यकर्त्यांना व सेवाभावी संस्थाना प्रेरणादायी ठरले. अनेक बालपुस्तकांचे, नियतकालिकांचे लेखन व संपादन त्यांनी केले. बालशिक्षिकांचे प्रबोधन. शिक्षिकांचे प्रशिक्षण, संशोधन हे त्यांच्या कामाचे इतर पैलू होते. अंगणवाडी, कुरणशाळा, विकारवाडी अशा नवनवीन कल्पना त्यांनी रूजवल्या.

      March 12, 2015


  • डॉ. सत्यपाल सिंग

    १९८० च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी असलेले डॉ. सिंग यांनी ठाणे, नाशिक, बुलढाणा, गडचिरोलीचे अधीक्षक, मुंबईत वांद्रे परिमंडळाचे उपायुक्त, ईशान्य मुंबईत अतिरिक्त आयुक्त, गुन्हे अन्वेषण विभागाचे सहआयुक्त, पुण्याचे आयुक्त आणि राज्याचे अतिरिक्त महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) अशा विविधांगी जबाबदारी पार पाडल्या आहेत. डॉ. सिंग हे काही काळ केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागातही होते. ऑगस्ट २०१२ मध्ये मुंबईच्या आयुक्तपदाची धुरा त्यांच्या खांद्यावर आली.

      August 27, 2012


  • ओमी वैद्य

    अरेस्टेड डेव्हलपमेंट, द ऑफिस, दिल तो बच्चा है जी, देसी बॉईज यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये ओमीने उत्कृष्ट भूमिका साकारल्या.

      June 22, 2022


  • (प्रा.) अभय करंदीकर

    करंदीकर, (प्रा.) अभय
    संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पदवी, पदव्युत्तर पदवी शिवाय पीएच.डी. मिळालेली व्यक्ती सर्वसाधारणपणे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एखाद्या नामांकित कंपनीमध्ये अतिवरिष्ठ पदावर गडगंज पगारनिशी रूजू होते. मग काही वर्षांतच सीइओपदापर्यंत पोहोचते किंवा स्वतची कंपनी सुरू करते. या सर्व गोष्टी प्रा. अभय करंदीकर यांनी सहज शक्य होत्या. मात्र त्या मार्गाने न जाण्याचा निर्णय त्यांनी जाणीवपूर्वक घेतला. मूळ शिक्षणामध्येच त्यांना अधिक रस होता.

    कालच घोषित झालेल्या भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी प्रदान केल्या जाणाऱ्या मानाच्या डॉ. विक्रम साराभाई पुरस्कारातील पाच मान्यवरांमध्ये प्रा. अभय करंदीकर यांचा समावेश आहे. स्वत:ची शैक्षणिक आवड जोपासतानाच ज्ञानदानाचे पवित्र कार्य करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतला. शालेय शिक्षण ग्वाल्हेरला झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते बाहेर पडले. कानपूर आयआयटीमधून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग (१९८६) पूर्ण केले. नंतर एम.टेक (१९८८) व पीएच.डी.ही (१९९५) पूर्ण केली. मध्यंतरीचा काही काळ त्यांनी पुण्याला सी-डॅकमध्येही काम केले. सी-डॅकमध्ये असताना हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग ग्रुपचे मुख्य समन्वयक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. सध्या ते आयआयटी पवईमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअिरग विभागात प्राध्यापक असून टाटा टेलिसव्‍‌र्हिसेसच्या निधीतून साकारलेल्या सेंटर फॉर एक्सलन्स इन टेलिकॉमचे समन्वयक आहेत. त्यापूर्वी एम. टेक पूर्ण केल्यानंतर ते भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (इस्रो) रूजू झाले होते. इस्रोच्या अहमदाबाद येथील पीआरएलमध्ये त्यांनी काम पाहिले. माहिती तंत्रज्ञान विषयातील या पीएच.डी.नंतर मात्र त्यांच्या कामाला अधिक आयाम मिळाले. सध्या ते एकाच वेळेस सहा महत्त्वाच्या विषयांवर प्रगत संशोधन करीत आहेत. वायरलेस नेटवर्कमधील कंट्रोल आणि परफॉर्मन्स मॉडेिलग, वायर्ड आणि वायरलेस नेटवर्क मधील रिसोर्स अ‍ॅलोकेशन आणि सेवेतील दर्जा, नेक्स्ट जनरेशन वायरलेस नेटवर्क, को-ऑपरेटिव्ह रीले आणि सेल्फ ऑर्गनायझिंग नेटवर्क, करियर इथरनेट आणि मोबाईल बॅकहॉल, ग्रामीण भागातील वायरलेस नेटवर्क असे हे संशोधनाचे प्रमुख सहा विषय आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयआयटीच्या विद्यार्थ्यांचा एक चमू या विषयांवर काम करतो आहे. ग्रामीण भागातील वायरलेस नेटवर्क हा विषय सर्वाधिक महत्त्वाचा आहे. कारण भारतासारख्या देशांत दूरसंवाद क्रांती खऱ्या अर्थाने तळागाळात पोहोचवायची असेल तर त्यासाठी आपल्याला वायरलेस नेटवर्कवर भर द्यावा लागणार आहे. सध्या त्यांचे डिजिटल कम्युनिकेशन थिअरीवरही प्रगत संशोधन सुरू आहे. करंदीकर व त्यांच्या चमूने केलेल्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली गेली. इन्स्टिटय़ूट ऑफ इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रिकल इंजिनिअर्स ही महत्त्वाची संस्था डिजिटल नेटवर्किंग आणि इतर संबंधित बाबींमधील प्रमाणके ठरविण्याचे काम करते. करंदीकर यांच्या नेतृत्त्वाखालील चमूने यातील एक महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय प्रमाणक निश्चित करण्याची महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रा. करंदीकर प्रमुख असलेल्या सेंटरमध्ये टेलिकॉम क्षेत्रातील महत्त्वपूर्ण संशोधन सुरू आहे. संशोधनाचेही दोन प्रमुख प्रकार असतात. एक पूर्णपणे शक्षणिक स्वरूपाचे आणि दुसरे प्रयोगात्मक प्रत्यक्षात येणारे. प्रा. करंदीकर यांचा विशेष म्हणजे त्यांना शक्षणिक संशोधनाबरोबरच प्रत्यक्षातील त्याच्या उपाययोजनांमधील संशोधनामध्येही तेवढाच रस आहे. आयआयटीतील प्राध्यापकांचा विशेष म्हणजे अनेक महत्त्वाच्या स्टार्ट-अप कंपन्यांच्या स्थापकांमध्ये त्यांचा समावेश असतो. ही बाब प्रा. करंदीकर यांनाही लागू आहे. इसोडस नेटवर्क्‍सच्या उभारणीत त्यांचा मोलाचा सहभाग आहे. ही कंपनी आपल्या देशात तसेच एशिया- पॅसिफिक परिक्षेत्रात मेट्रो इथरनेटच्या क्षेत्रात कार्यरत आहे. आता जाहीर झालेला डॉ. साराभाई संशोधन पुरस्कार म्हणजे त्यांच्या आजवरच्या संशोधनावर उमटलेली राष्ट्रीय मोहोरच आहे.

      August 5, 2017


  • प्रभा अत्रे

    जन्म
    १३ सप्टेंबर १९३२

    प्रभा अत्रे यांचे मराठीसृष्टीवरील लेख.

    किराणा घराण्याच्या जेष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे (13-Sep-2016)

    चिंतनशील ज्येष्ठ गायिका डॉक्टर प्रभा अत्रे (13-Sep-2017)

    mss

    mss-0485

      July 18, 2017


  • यतीन कार्येकर

    यतीन कार्येकर हे आपल्या सगळ्यांच्या ओळखीचं नाव आहे. यतीन कार्येकर हे मराठीतील जेष्ठ अभिनेत्री ज्योत्स्ना कार्येकर यांचे सुपुत्र आहेत.

      July 19, 2022


  • नासिकराव तिरपुडे

    महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्रीपद भूषविणार्‍या नासिकराव तिरपुडे यांनी आदिवासी व मागासवर्गीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला.

      September 3, 2010


  • मधू चौगावकर

    पुरुषप्रधान संस्कृतीवर हल्ला चढविणार्‍या अनेक महिला आपल्या पाहण्यात येतात. परंतु ही रुळलेली वाट सोडून महिलांइतकाच पुरुषांचाही अभ्यास करुन समान सामाजिक व्यवस्थेसाठी मधू चौगावकर देशभरात काम करीत आहेत. स्त्री-पुरुष समानता खर्‍या अर्थाने प्रत्यक्षात यावी, यासाठी त्या स्वत:च्या घरापासूनच प्रयत्नशील झाल्या आहेत. युनिसेफच्या जेन्डर एम्पॉवरमेन्ट विषयीच्या कोअर समितीच्या त्या सदस्य आहेत.

    स्त्री-पुरुष समानतेसाठी

      July 14, 2017


  • मीना प्रभू

    अनेक वर्षांपासून लंडन, न्यूयॉर्क, रोम, इराण, चीन, तिबेट अशा अनेक देशांना भेटी देऊन त्या अनुभवाला शब्दबद्ध करणाऱ्या मीना प्रभू यांनी या प्रवासवर्णने साहित्य प्रकाराला आजही ताजेतवाने ठेवले आहे.

      July 16, 2022


  • गणेश बाळकृष्ण ताम्हणे

    ठाणे शहरातील विख्यात लेखक व कवी अशी ख्याती असलेल्या गणेश ताम्हणे यांचा अलिबाग सारख्या निसर्गरम्य गावी जन्मल्यामुळे निसर्गाबद्दल विशेषतः कोकणातील फुललेल्या निसर्गाबद्दल त्यांना वाटणारी अभिरूची त्यांच्या लेखनातून वाचकांच्या मनात उत्तमरित्या उमटलेली आहे. त्यांनी आजवर नियतकालिकांमधून व मासिकांमधून विपूल प्रमाणात लेखन केले असून “सुमन”, “भारत सेवक” अशा प्रथितयश मासिकांचे सहसंपादकपद, तसेच “बालविश्व” या लहान मुलांच्या नाजुक भावविश्वावरती अलगद प्रकाश टाकणार्‍या मासिकाचे संपादकपद त्यांनी भुषविलेले आहे. “भग्न बासरी”, “रेंगाळणारे सुगंध”,“कोकणाची पाऊलवाट” अश्या निरनिराळ्या विषयांवरती अत्यंत रोचक व लक्षवेधी शैलीने लिखाण केल्यामुळे ते रसिकांच्या साहित्य आठवणींमध्ये ते कायमचे कोंदले गेलेले आहेत. कोकणाची “पाऊलवाट” हे त्यांचे थेट कोकणातल्या दाट वनराईमध्ये वाचकांना घेवून जाणारे व साधेपणाच्या एका वेगळ्याच विश्वाची सफर करून आणणारे त्यांचे आत्मचरित्रपर पुस्तक, विशेष गाजले होते. कोकण संस्कृतीमध्ये, पुस्तक वाचून झाल्यानंतरही सर्वांना आणखी काही क्षण रेंगाळायला लावणार्‍या या पुस्तकामध्ये आपल्याला त्यांचे बालपण, ए.सी.सी. कंपनीमध्ये नोकरी करत असताना त्यांना आलेले अनुभव, भारताचा स्वातंत्र्यलढा, जीवनविषयक त्यांचा ऐकुण दृष्टीकोन, १९२२ पासूनचे ठाणे, आदींचा तपशील संदर्भवार स्पष्ट होतो. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी दत्ताजी ताम्हणे यांनी देखील आपल्या वडिलांकडून म्हणजेच गणेश ताम्हणें कडून देशासाठीच्या योगदाना बद्दलचे मोलाचे धडे घेतले असल्यामुळे ते देखील सामाजिक कार्यात यशस्वी होऊ शकले . ठाण्यातील मराठी साहित्यपरंपरेचे नियोजनबध्द संवर्धन करण्याच्या हेतूने स्थापन झालेले शारदा मंडळ, मराठी ग्रंथसंग्रहालय, कथामाला मध्यवर्ती मंडळ आणि राष्ट्र सेवा दल अशा संघटनांमध्ये पदाधिकारी म्हणून त्यांनी बहुमूल्य योगदान दिले होते. ठाणे पालिकेचे दोन वेळा निर्वाचित सदस्य म्हणून ते निवडून आल्यामुळे त्यांच्या व्यक्तित्वाला राजकीय किनारदेखील लाभलेली होती. पण मूळचा पिंड साहित्यिकाचा असल्यामुळे राजकारणात ते विशेष रमू शकले नाहीत.

    दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित

      January 3, 2015